(गझल)

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
6 Mar 2008 - 4:35 pm

अजून आहे ठरायचे, उठायचे की 'बसायचे'
इथे न ओठांस ओलही, कसे कुणी आज़ प्यायचे ?

ओळओळ इकडेतिकडे पाडायाचा सोस जुना!
आयत्याच या कविता घ्या, स्वत: कशाला लिहायचे ?

प्रिये तुझ्या त्या बापाचे हात नव्हेतच नाजुकसे!
(गालांवर कडकडलेल्या विज़ांस कैसे स्मरायचे ?)

वेगवेगळ्या कवितांचे मिळत ज़ात आंदण आहे
अंतर दोनच मिनिटांचे, मागे कां मी पडायचे ?

कां पेल्यातून शेवटच्या करावीस मैफल हळवी ?
पेय अनावर झाले तर, पोट दाबुनी धरायचे

आमची प्रेरणा: फिनिक्स यांची गझल

प्रतिक्रिया

सचिन's picture

6 Mar 2008 - 11:01 pm | सचिन

क्या बात है !!
पीने दे मुझे मस्जिद मे ऐ जाहिद !
वरना वो जगह बता जहा खुदा न हो !!!!!

विसोबा खेचर's picture

8 Mar 2008 - 9:34 am | विसोबा खेचर

ओळओळ इकडेतिकडे पाडायाचा सोस जुना!
आयत्याच या कविता घ्या, स्वत: कशाला लिहायचे ?

प्रिये तुझ्या त्या बापाचे हात नव्हेतच नाजुकसे!
(गालांवर कडकडलेल्या विज़ांस कैसे स्मरायचे ?)

क्या बात है..!

तात्या.