user

विळखा - प्रेम, दोस्ती,जबाबदारी आणी एक आत्महत्या...भाग ३

http://www.misalpav.com/node/9965 भाग एक
http://www.misalpav.com/node/9980 भाग दोन..पुढे चालु

दरम्यान मी कोरियन्तीनला असताना योगेश एकदा कस्टमर बनुन तिथे आला,दोन पेग घेतले आम्ही नंतर प्यासात तिन-एक वाजेपर्यंत बसलो .आणी पुन्हा तोच विषय झाला..योग्या खचत चालला होता आणी दारुचा कोटा वाढत चालला होता.

कुठेतरी,आपण सर्वं दोस्तांपेक्षा हलक्या दर्जाच काम करतो, आपण आपल्या दोन्ही भावापेक्षा,हुशार असुनही मागे राहिलो याची खंत त्याला टोचत होती.ते शल्य मला समजत होते.पण त्याविषयी चर्चा करायला योगेश तयार नव्हता.त्या विषयावर काही बोललो की अंगावर धावुन यायचा.

ईकडे मी रिलायन्सला जॉईन झाल्यानंतर,अण्णु हडपसरला नवीन घरात रहायला गेले, योगेशच्या सगळ्यात मोठ्या भावाच लग्न झाल. सर्व घरचे हडपसर ला शिफ्ट झाले,दोन-चार ट्रॅव्हल्स वाल्यांच्या ओळखीवर योग्याच्या कंटीन्यु बदल्या सुरु झाल्या,पण पिण काही थांबत नव्हते, अण्णु ह्या सर्व प्रकाराने वैतागुन गेले होते.जोपर्यंत त्याची वहिनी नवीन होती ,तोवर तिने सर्व काही सहन केले नंतर मात्र घरात योग्याच्या पिण्यामुळे किरकिर सुरु झाली.आणी घरात रजत ने पाऊल ठेवले,रजत, रवी चा मुलगा,योगेश चा बराच वेळ त्याला संभाळण्यात खर्ची व्ह्यायला लागला,पिणे थोड कमी झाले.त्यात अण्णुची बाय-पास झाली. मला ही पटनी त नौकरी मिळाली.मी मुंबईला आलो,त्यांनतर बरेच देश फिरलो. ईतक्या वेळात योगेश आणी बब्याची चांगली जमायला लागली. नागपुरचाळीतील घर भाड्याने दिले आणी योग्या कधीतरी पत्र लिहायला लागला.मी परत आल्यावर माझी,नव्यानेच हवालदार झालेल्या, मंहिद्याशी गाठ पडली आणी नंतर योग्याला बरोबर घेउन काही ही तणतण न करता मस्त पार्टी झाली.

मी योगेशला बर्‍याच दिवसानी असा हसता-खेळता पाहिला. त्याची आख्ख्या महाराष्ट्राशी ओळख झाली होती.एक-एक किस्से एकताना हसता-हसता पुरेवाट झाली.योगेशला असा निट-नेटका झालेला पाहुन मला जरा हायसे वाटले.दिवस असेच सरत होते,योग्याच्या दुसर्‍या भावाच, किरणचे लग्न झाल , मी तेव्हा पुण्यात नव्हतो.माझ्या ही पायाला चाके लागली होती, पण पुण्यात आलो की योग्याला भेटणार म्हणजे भेटणार.थोड्याश्या भेटी-गाठी कमी झाल्या होत्या ईतकच.

१७ एप्रिल २००६

मुबंईत मम्मी चा फोन आला की योगेश लग्न करतोय आणी आत्ता घरात आहे. मम्मील म्हटल त्याला फोन दे , म्हटले काय रे कोणाशी लग्न करतोय तर म्हटला तुच बोल, त्याने तिला फोन दिला.
"अरे ,संध्या बोलतेय!! " मला झटकाच बसला. ईतक्या वेळा तुटले आणी तरीही फेव्हीकॉल का मजबुत जोड. संध्या स्वभावाने फटकळ आणी भडकु होती. मी जरा वेळ योगेशशी ह्या विषयावर चर्चा करावी म्हटल तर म्हटला की ईथे आल्यावर बोल.

२१ एप्रिल २००६

शुक्रवारी संध्याकाळीच मुंबईतुन सटकलो.योग्याला फोन टाकला की स्टेशनला ये .आला . तिथुन थेट "राजधानी " त जाउन बसलो, मग मी त्याला छेडला,म्हटल "संध्या " कशी काय रे ?
"अरे ,लग्न अश्या मुलीशी कराव जिच तुझ्यावर प्रेम असल पाहिजे,तुझ असल-नसल तरी फरक पडत नाही, आपले पुढील आयुष्य सुखाचे जाते "
"ह्म्म "जरा खरी गोम कळायला उशीर होता.आणखी दोन पेग टाकल्यावर योग्याने खरी हकीकत सांगायला सुरुवात केली.

दारुमुळे रोजच अण्णुंबरोबर वाजायच,नागपुरचाळीत रहायला जा अशी शेवटची तंबी मिळाली, योगेशने तंबीचा मान ठेवला, बदल्या मारायच्या आणी नागपुरचाळीतल्या घरी बब्याला घेउन रात्रभर लावाडी करायची, कोणीही विचारणारे नाही.अशात आता आपल्याला पोरगी कोण देणार ? मग M.S.W करणार्‍या एक्स-गर्लफ्रेंड कडे लक्ष गेले.काम तर ती अशी ही करतच होती.तेव्हढाच संसारात हातभार ,आणी ड्रायव्हर ला कोण पोरगी देणार्.त्यात लग्नाचा खर्च उन्म्याकडे,परतफेड म्हणुन ...आणी संध्याच्या रुपात एका दगडात दोन पक्षी होते.एक म्हणजे संध्या जातीबाहेरची म्हणुन अण्णु काय तिला हडपसर च्या घरात ठेवणार नाहीत आपोआप नागपुरचाळीतील घर योग्याच्या नावे होणार, संसाराचा खेळ खतम.फुल टु सेटल . आणी प्रेमाच काय ते ? पुरुषाच्या प्रेमाची शाश्वती कोण देणार ?
मी त्यानंतर काय बोलणार .तीन महिने संध्याला लग्नासाठी तयार करायला लागले . शेवटी एकदाचे ३० एप्रिल ला योगेश आणी संध्याच लग्न व्यवस्थित पार पडले.

पण संसार काही हवा तितका सरळ चालला नाही. " दारु सोडण्याचे वचन " योगेशला पेलवले नाही,संध्या आधीच फटकळ त्यात तिला चटकन येणारा राग. एकदिवस दारु पिउन साईबाबाची पुजा करणार्‍या योगेशला बघुन घरातील साई -मदींरच तिने उखडुन टाकले,मुर्ती फेकुन दिली.योग्याने पहिल्यांदा तिच्यावर हात उचलला.ती रागाने माहेरी निघुन गेली. माहेर म्हणजे शेजारच्याच विंगमध्ये. ते एक स्त्री-प्रधान घर , आई म्हणजे योगेशची सासु घरात कमवती,बाप घर-कोंबडा.योगेशनी मला आणी बब्याला फोनवले.मी मुंबईतुन यायला निघालो,आणी बब्या योग्याकडे पोचला.समजावणी करायला गेलेल्या बब्याला योग्याच्या सासुने हाकलुन दिले, टेन्शंन-टेन्शंन मध्ये दोघे अजुन पिले. दुधाच्या टँकरवाल्याबरोबर काव-काव केली. त्यात योग्याला जबरा मार लागला पण नशेत त्याला समजलच नाही. सकाळी मी घरी पोचल्यावर त्याला उठताही येत नव्हते.अ‍ॅम्बुलन्स मागविली,ससुनला अ‍ॅडमीट केले. ही सारी हकीकत अण्णुंना कळली.अण्णुंनी शेवटी त्याच्या दारुवर ईलाज काढला.

"मुक्तांगण " मध्ये योगेशची रवानगी झाली. ३५ दिवसानी योगेश बाहेर आला.दारु पुर्णपणे सुटली असे सगळेजण मला सांगत होते. मला ही बर वाटले.संध्या डोमॅस्टिक कॉल सेंटरला लागली. तिला योगेशच ड्रायंव्हिग करणे आवडत नसे.योगेशही ,चला आता बायकोचच एकु, म्हणुन एजिसला ४५००/- च्या नोकरीवर लागला. सर्वकाही ठीक होते..पण म्हणाल तर योगेशच आणी म्हणाल तर संध्याच एक चुकत होते.

योगेशची आणी संध्या दोघानांही ड्युटी सकाळी ९.३० ची , योग्याला सवय सहाला उठायची.संध्याला आठ वाजता. योगेश दररोज तिचा आणी सौताचा डबा बनवायचा ,तिचा पाणी ठेवुन घरातुन निघायचा. ती आठ वाजता उठली की आंघोळ करुन एका कलिग(मुलगी) बरोबर कामाला जायची,कलिगकडे अ‍ॅक्टिव्हा होती.पेट्रोल शेअरिंग मध्ये चालायच.पण योगेशची मात्र अडचण होत होती. त्याच्या के.बी.च ईंजिन डाउन झाल्यामुळे तो बसने जायचा.येताना ट्रॅफीकमुळे उशीर व्हायचा. पण आला की घरात संध्याचा पत्ता नाही.ती ह्याच्या सासुरवाडीत बसलेली असायची. हा आल्यावर परत स्वंयपाकाला लागणार, आणी जेवणासाठी वाट पहात बसणार. तिला सारख-सारख सासुरवाडीत बोलावयास जायला योग्याला आवडत नसे.ती साडे-दहाच्या सुमारास येणार आणी विचारणा केली तर मला कधी "बालिकावधु" ही सिरियल बघायची होती तर कधी "कयामत" बघायच होते. योगेशच्या तुटपुंज्या पगारात त्याला टी.व्ही. घेणे परवडणारे नव्हते,संध्या तिच्या घरात पगार देत असे कारणे दोन एक गाडी घेण्यासाठी सेव्हींग्झ आणी बाकीच्या दोन बहिणींची लग्न.

ह्या तणतणीच्या योगेशच्या कामावर परिणाम होउ लागला. त्यात संध्या प्रेग्नंट झाली.मग नोकरीवर रजा टाकुन ती घरातच बसायला लागली , योगेशच्या नव्हे, तिच्या घरात.शेवटी अंडर-परफॉर्मन्स आणी रेसेशनमुळे योगेशची नोकरी गेली. आता काय करणार ..परत तोच मार्ग....मारा बदल्या..योगेश ठीक-ठाक कमवित होता.पण त्याने फक्त घर चालत होते. बाकी उन्म्याच्या घरात दोन पाळणे हलल्याने त्याची जबाबदारी वाढत होती, राज्याच नुकतच लग्न झालेल त्यामु़ळे तो तिकडे व्यस्त्,बब्याला कामासाठी साहेबाची मर्सिडीज चाकण पर्यंत घेवुन जावी लागायची त्यामुळे त्याचा पत्ता नाही. राहिलो मी, कधी बैंगलोर तर कधी चेन्नई ,नुसता पळतोय करियरच्या मागे..ईकडे योगेश एकलंकोडा पडत गेला. पुन्हा गम-मे-रम सुरु झाली. त्यामुळे तर संध्या अजुनच खवळली. ईतकी की बाळाच जन्म झाल्यावर थेट सासुरवाडीतच...

क्रमश...

कॉल सेंटरवाल्या मुलींचे प्रश्न....

भन्नाट कलाटणी आहे सुहास. येऊ दे जरा डीटेल मधे.

घाई नको...

गंभीरपणे थोडा आगाऊपणा करतो - घाई करू नकोस... गुंडाळल्यासारखं लेखन झालंय इथं. पहिल्या भागाशी ताडून पहा पुन्हा एकवार!

+१

श्री सूहास, सावकाश होऊ द्या. हे 'कोरियन्तीन' कोंढव्याला असलेले 'कॉरिंथियन' आहे का?

असेच

असेच म्हणनार होतो ..
सावकाश दमादमानं होऊन जाऊन्दे भावा !!

वाचतो आहे

वाचतो आहे रे...

लिही पटापट.

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

...

वाचत आहे.

मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

मदनबाण.....

"Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once."
Lillian Dickson

तू लिही रे

तू लिही रे तुला लिहायचं तसं.....
हा भाग पण झालाय छान ...पण उगाच घाईत लिहू नकोस.....

आणी काय रे भिकारचोटा....पटनीत होतास हे बोल्ला नाहीस कधी???
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

वाचतोय.....

वाचतोय..... येवु द्या तब्येतीत...

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

--अवलिया
आपली माणसं आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती

वा!!!

सुंदर!!!
पुढचे भाग येउदेत!!

Scroll to Top