मी पहील्यांदाच विडंबन हा प्रकार करत आहे.
प्रेरणा कोण? हे सांगणे न लगे... ;)
घरी रीकामा वेळ काढताना
भेळ करायची ठरवली असताना
चुरमुर्याचा डबा खाली पडला
आणि कांदा रडला
ढसा ढसा ढसा ढसा
पडलेले चुरमुरे गोळा करताना
त्यातले खडे काढताना
फरसाणच्या तोंडाला सुटले पाणी
कैरी कापलेली पाहताना
=P~ =P~ =P~ =P~
नवर्याला भेळ खायला देताना
तोंड केले वाकडे
आणि म्हणाला तो मला,
"त्यापेक्षा प्रिये विकत का आणली नाहीस?"
प्रतिक्रिया
10 Mar 2009 - 2:49 pm | अवलिया
विडंबक पंथात स्वागत असो !!!!
मस्त. :)
--अवलिया
10 Mar 2009 - 2:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वागत ऋचातै!
भेळ खायला आम्हालाही बोलाव गं! ;-)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
10 Mar 2009 - 3:06 pm | मिंटी
मस्तच गं.....
कधी आम्हाला पण बोलाव भेळ खायला.... ;)
11 Mar 2009 - 12:04 am | शितल
सहमत.
भेळ आवडली. :)
11 Mar 2009 - 12:05 am | शितल
सहमत.
भेळ आवडली. :)
10 Mar 2009 - 2:50 pm | बिपिन कार्यकर्ते
ठ्ठो........ =))
या, तुम्ही पण मैदानात.
बिपिन कार्यकर्ते
10 Mar 2009 - 2:53 pm | दशानन
=))
:D
B)
O:) बेचारा नवरा !!!
10 Mar 2009 - 2:56 pm | सहज
स्वागत आहे!
10 Mar 2009 - 2:57 pm | दशानन
ए माला प्अन सिकवा किले कविता लिहायल ... मल प्अन विदबन करयचे आहं ना :(
10 Mar 2009 - 3:08 pm | दिपक
राजे मिसळपाववर लॉगीन करुन बाहेर जावु नका हो.. बघा तुमच्या मुलाने वर काय प्रतिक्रिया दिली ती.. :)
10 Mar 2009 - 3:14 pm | दशानन
अरे रे !
कार्ट जरा आगाऊच आहे... बापावर गेलं आहे =))
10 Mar 2009 - 3:37 pm | वाहीदा
तु भेळ कर अन फक्त सांगच आम्हाला ... आम्ही येतोच मग फस्त करायला !
स्वाहा !!
~ वाहीदा
10 Mar 2009 - 5:24 pm | क्रान्ति
आम्हालाही आवडते हो विडंबनाची भेळ! मस्त जमलीय.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
10 Mar 2009 - 11:20 pm | शरदिनी
भेळ छान