सहज सोपा डिग्री चा छापा कसा मिळवावा ?

रानरेडा's picture
रानरेडा in काथ्याकूट
13 May 2018 - 4:59 pm
गाभा: 

अनेक वेळा काही करणा साठी कोठलीही डिग्री असणे जरुरी असते

काही मुले फार झटपट सेल्स मध्ये लागतात . अभ्यास राहून जातो आणि डिग्री पूर्ण होत नाही . मग काही काळाने प्रमोशन थांबते कारण तुम्ही ग्रेजुएट नसता . ( अशा केस माहित आहेत ) तुम्ही चांगले सेल्स मन असता , टीम लीडर असता पण म्यानेजर बनवायला ती डिग्री लागतेच . अशा वेळी एक छापा डिग्री ची गरज असते .
किंवा
Diploma असेल तर Graduate चा छापा पाहिजे असेल तर काय करावे लागेल ?
हा खूप जणांना प्रोब्लेम येतो . Engineering Diploma / Hotem management diploma ननंतर UPSC /MPSC / Government Exam द्याच्या असतात किंवा MBA करायचे असते .

कधी कधी विदेशात कोठलीही डिग्री चालते पण डिप्लोमा नाही .

12 वी नंतर कामाला लागलेले हि बरेच आहेत

बाहेरून BA आता करता येते का ?
प्रक्रिया काय ?
कोठला विषय सगळ्यात सोपा पडतो ?
कोठली university चांगली आहे ? पास होण्यासाठी चांगली ?
कोठल्या university चा कोर्स सर्वात स्वस्त आहे ?

UPSC /MPSC / Government Exam साठी कोठले विषय सोयीचे पडू शकतात ? ,

बाहेरून बी ए याचेही मार्गदर्शन आणि क्लासेस आहेत का ?
इतर कोठला ग्रॅज्युएशन चा छापा सहज / स्वस्त आणि झटपट देणारा कोर्स आहे का ?

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

13 May 2018 - 5:11 pm | जेम्स वांड

नुसते ग्रॅज्युएशन , पदवी हवी असली तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ उत्तम (महाराष्ट्रात) ऑल इंडिया लेव्हल वर हवं असेल तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुख्य विश्वविद्यालय (ईगनू) आहेच. ह्या दोन्ही विद्यापीठांच्या पदवी, स्पर्धापरीक्षा द्यायला चालतात, तुम्ही तुमचे अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा करताना समांतर ह्या विद्यापीठांतून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून 'ग्रॅज्युएट' होऊ शकता.

ह्यापैकी यचमुवि बद्दल मला तितकी माहिती नाही, पण ईगनू प्रचंड महासागर आहे, इथे बी.ए. , बी. कॉम, बीएससी सोबत एमबीए, फॉरेन लँग्वेजेस, भारतीय भाषा, इत्यादी प्रचंड जास्त डायव्हर्स विषयांत कोर्सेस उपलब्ध आहेत, पार बीसीए-एमसीए सुद्धा करता येतं, इतर तांत्रिक विषय पण उपलब्ध असतात, पण मग त्यात प्रॉब्लेम हा असतो की तांत्रिक विषय पूर्णतः डिस्टन्स एज्युकेशन मोड मध्ये नसतात. त्यांची तुम्ही ज्या गावात आहात तिथली उपलब्धता पहावी लागेल, कारण त्यांचे आठवड्यात दोन दिवस क्लास अन सुटीच्या दिवशी एक्सट्रा क्लास असतात, प्रॅक्टिकल पण करावे लागतात, अर्थात इतर नॉन टेक्निकल विषयात ते बंधन नाहीच, त्यामुळे अगदीच 'पदवी' प्राप्त करणे कठीण नाही.

रानरेडा's picture

13 May 2018 - 5:41 pm | रानरेडा

महा धन्यवाद , अजून माहिती असेल तरी लिहावी .

जेम्स वांड's picture

13 May 2018 - 5:48 pm | जेम्स वांड

आपली दहावी, बारावीची मार्कलिस्ट, पदव्युत्तर करता दहावी बारावी अन पदवीची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून, पैसेही नेटबँकिंगने भरून कुठेही न जाता ऍडमिशन घेतली जाऊ शकते.

प्रभू-प्रसाद's picture

13 May 2018 - 11:20 pm | प्रभू-प्रसाद

Ignou प्रमाणेच बहुतेक सर्व प्रकारच्या पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. फॉर्म online भरावा लागतो,docs scan करून upload करावे लागतात, payment online ट्रान्स्फर करावी लागते.
10/ 12 वी नापास विद्यार्थी Prepatary Exam ऑनलाईन देऊन BA/ BCom पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास पात्र होऊ शकतात.

कंजूस's picture

14 May 2018 - 7:52 am | कंजूस

हे बरोबरच दिलंय.
मुंबई विद्यापीठाचेही दूरशिक्षण अभ्यासक्रम आहेत बरेच. त्यांचा फोन नंबर मात्र व्यस्त फार येतो. साइट रोज चार वाजता बघा. कारण अपडेट्स सकाळी टाकत नाहीत. प्रवेश वगैरे अर्थात ओनलाईन, पुस्तके घेण्यासाठी एकदा कालिना ( कुर्ला )येथे जावे लागेल.

विजुभाऊ's picture

14 May 2018 - 10:28 am | विजुभाऊ

हे सगळे अभ्यासक्रम तीन वर्षांचे आहेत.
डिप्लोमा होऊन एखाद्याला फक्त अभ्यासासाठी बी ए करायचे असेल तर त्याला पदवीसाठी तीन वर्षे शिकावे लागेल.
एखादी पात्रता परिक्षा देऊन थेट शेवटच्या वर्षाला प्रवेश मिळून जेणे करून एका वर्षात पदवी घेता येइल असे काही माहीत आहे का
पूर्वी उस्मानिया युनिवर्सिटी असे कोर्से चालवत होती.

पण,

प्रत्येक विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण विभागाकडून 'ऍडिशनल बीए' ही सुविधा उपलब्ध असावीच. अर्थात त्यासाठी ग्रॅज्युएशन असणे महत्त्वाचे आहे. ऑलरेडी ग्रॅड असाल तर थेट सेकंड इयर बीएला एक्सटर्नल ऍडमिशन घेता यावी असे वाटते, अर्थात ही पूर्णतः ऐकीव माहिती आहे अनुभव नाही

भाते's picture

15 May 2018 - 10:49 am | भाते

तुमच्या लेखनावरून असे वाटते कि तुम्ही सध्याच्या नोकरीत स्थिरस्थावर झालेले आहात आणि फक्त पदवी नाही म्हणुन तुम्हाला सध्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र चांगल्या संधी उपलब्ध होत नाही आहेत.
मी स्वानुभव सांगतो. वाणिज्य शाखेतुन पदवी मिळवल्यावर मी पदविका करायचे ठरवले. मुंबई विद्यापिठातुन (बहिःस्थ) पदविका घेतल्यावर मला शिकण्याची आणखी खुमखुमी होती. म्हणुन मी नोकरी करताना महाराष्ट शासनाची एमबीएची प्रवेश परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात यश आले नाही. दुसऱ्या प्रयत्नात पुणे विद्यापीठात पेमेंट सीट मिळाली. त्यावेळी त्याची फी आणि इतर खर्च बघुन तो नाद सोडला. तेव्हा मला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठापध्दल समजले. तिथली प्रवेश परीक्षा देऊन तीन वर्षात मी एमबीए (बहिःस्थ) पुर्ण केले. त्यावेळी माझ्याबरोबर असलेले इतर सगळे विद्यार्थी (?) चाळीशीच्या आसपासचे आणि अनुभव असुनसुध्दा केवळ एमबीए नसल्यामुळे चांगली संधी मिळत नाही म्हणुन नाईलाजाने तिथे आले होते.
जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर यचममुविच्या पदवीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पण खाजगी क्षेत्रात त्या पदवीला कोणीही विचारत नाही. सगळे तुमच्याकडे तुच्छतेने बघतात. (स्वानुभव) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुख्य विश्वविद्यालयापध्दल मला फारशी माहिती नाही.
तेव्हा स्पष्ट सल्ला असा कि मुंबई किंवा पुणे विद्यापिठातुन (बहिःस्थ) पदवी करा.

भाते साहेब धन्यवाद .
मला स्वतः ला अशी गरज पडली नाही. धडपडत का होईना पण MBA पर्यंत शिकलो .
पण हा प्रश्न अनेकांना पडलेला मी पहिला आहे . आता हे खरे आहे कि एका डिग्री ने प्रत्यक्ष द्यानात काही फरक पडत नाही , पण हा छापा लागतो . सरकारी आस्थापनात तर लागतोच लागतो . आणि एका वेशिष्ट पदापर्यंत वर चढल्यावर तिकडे प्रगती खुंटते - म्हणुन अशा सर्व लोकांना मदत व्हावी म्हणुन हा लेख . आणि इकडे म्हणुन नि डिग्री चा छापा असा उल्लेख करीत आहे ..
धन्यवाद .

मी मुंबई विद्यापिठातुन ईजिंनिरिंग पदविका घेतली आहे. मला ईजिंनिरिंग पदवी[ केमिकल ईजिंनिरिग] हवी आहे कारण ईजिंनिरिंग पदविकेमूळे चांगल्या संधी उपलब्ध होत नाहीत. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयामुळे कोण्त्याही विद्यापिठाची बहिःस्थ ईजिंनिरिंग पदवी ग्राह्य असु शकत नाही. त्यामुळे भारतीय विद्यापीठतुन ईजिंनिरिंग पदवी शक्य नाही. कोणी परदेशातील विद्यापिठातुन बहिःस्थ ईजिंनिरिंग पदविका घेण्याबाबत मार्गदर्शन करेल का ?

मला वाटते आपणास परदेशातील विद्यापिठातुन बहिःस्थ ईजिंनिरिंग पदवि म्हणायचे आहे .
बहुतेक वेळा भारतात बहिःस्थ ईजिंनिरिंग पदवी चा दर्जा अतिशय वाईट होता . म्हणजे पैसे भर आणि पदवी घ्या असा तो धंदा होता . तसे पण अनेक कम्पनी अशी पदवी तेंव्हा हि ग्राह्य मनात नसत.
केमिकल ची सायंकालीन पार्ट टाइम पदवी नाही का? कि आता सायंकालीन ईजिंनिरिंग पदवी हा प्रकार पण काढून टाकला का ? मला याबद्दल माहिती नाही .

किंवा आता खरे तर ईजिंनिरिंग च्या जागा च भरमार झाला आहे . आपण ३ वर्ष चा ब्रेक घेऊन कोठे डिग्री करू शकत नाही ? पण एखाद वेळी हि धोकादायक ठरू शकते ..

कपिलमुनी's picture

24 May 2018 - 2:05 pm | कपिलमुनी

मुन्नाभाई स्टाईलने एका दिवसात सर्टिफिकेट छापून घ्या :)

सर्टिफिकेट छापून घेतल्या वर युनिवर्सिटी मध्ये रेकोर्ड पण अपडेट होतो का ? कसा ?
आणि नुसता सर्टिफिकेट चा कागद असेल तर अनेकदा कागदपत्रांची पुनर्तपासणी होते तेंव्हा काय करावे ? असे करून देणाऱ्या काही कंपनी आहेत . आणि अनेक खोतेप्नामुळे अनेक कंपनी यांची मदत घेत आहेत.
असे कागद बनवून नोकरी मिळाली असेल तर कंपनी ethics and इंटेग्रिटी issues दाखूवून काढून टाकू शकते . म्हणजे राजीनाम्याची संधी न देता काढून टाकणे . आणि काही वेळा अशा व्यक्तींना पुढील नोकरी मिळवायला प्रोब्लेम आलेला पहिला आहे .

सुबोध खरे's picture

26 May 2018 - 6:55 pm | सुबोध खरे

चांगल्या कंपन्या असे तपास ( background check up) हटकून करतात. आणि असे उघडकीस आल्यास आपल्याला खोटेपणाचा आरोपावरून बडतर्फ करण्यात येते. शिवाय पुढच्या कंपनीच्या एच आर व्यवस्थापकांनी अगोदरच्या कंपनीकडे विचारणा केल्यास आपली पुढची नोकरी पण धोक्यात येऊ शकते. आणि आपल्या व्यावसायिक वाटचालीवर कायमचा डाग लागू शकतो.
एशियन हार्ट रुग्णालयातून माझ्या वैद्यकीय महाविद्यालयात (ए एफ एम सी) आणि पुणे विद्यापीठ येथे अशा पदवी (MBBS) आणि पदव्युत्तर पदवी (MD) बद्दल विचारणीचे अधिकारीक पत्र पाठवले गेले होते.
ए एफ एम सी चा रजिस्ट्रार माझा वर्गमित्रच असल्याने त्याने मला हे सांगितले.

कपिलमुनी's picture

26 May 2018 - 10:47 pm | कपिलमुनी

सदर प्रतिसाद केवळ विनोद म्हणून टाकला आहे. असे करणे बेकायदेशीर असून हा गुन्हा आहे.