फी कनसेशन मेडिकल साठी ओबीसी ला आहे का ? sc,st साठी काय?

Primary tabs

तनमयी's picture
तनमयी in काथ्याकूट
8 May 2018 - 1:29 pm
गाभा: 

फी कनसेशन मेडिकल साठी ओबीसी ला आहे का ? sc,st साठी काय?
माझी मुलगी मेडिकल ला प्रवेश घेवू इच्छिते
तर ओबिसिला private ला फी सवलत आहे का?
कारण मेडीकॅल ची फी बघून दडपण आलेय

आणि जरा प्रवेश प्रकिया समजावून सांगितली तर खूप चं होईल

८५ ,१५, नीट प्रकिया डोक्यावरून जात आहे
तरी सोप्पी करून सांगा

collGES लिस्ट private गोव. deemed सर्व सांगा

फी structure पण माहित असेल तर SHARE करा प्लीज
खूप आभारी असेन

प्रतिक्रिया

माहितगार's picture

10 May 2018 - 9:35 am | माहितगार

या अ‍ॅडमिशनच्या पद्धतीत दरवर्षी बदल आणि घोळ असतात, मागच्या वर्षी अ‍ॅडमीशन घेतलेल्यांना जाऊन भेटा, ओळखीत नसतील तर कॉलेज मध्ये जाऊन भेटा.

प्रायव्हेट कॉलेजेस मध्येही पाल्यांसह जाऊन ( काही विभागांच्या एच ओ डी ना सुद्धा आवर्जून भेटा - प्राचार्य किंवा मॅनेजेमेंट देणार नाही अशी माहिती त्यांच्याकडुन भेटू शकते - आणि काही एच ओडींचा ) आणि प्राचार्यांना भेटा , ऑफीशीअल अ‍ॅडमिशन प्रोसेस चालू होण्याच्या आधीच भेटण्यास हरकत नाही - प्रश्न लिहून घेऊन जा म्हणजे सध्याच्या प्रोसेस ची माहिती क्लिअर होण्यास मदत होऊ शकेल . मॅनेजमेंट सीट करताचे पैसे आधी फूगवून सांगितले जातात, पैसे तर देणे शक्य नाही पण संधी हवी आहे म्हणून सांगून पहाण्यास हरकत नसावी. - काही स्वच्छ नाही म्हणाले तर नकार पचवावा हिरमुसले होऊ नये , कारण हि मंडळी पाल्य आणि पालकांच्या सायकॉलॉजीशी खेळण्यात तरबेज असतात - म्हणजे आकडे बर्‍यापैकी खाली येऊ शकतात.