वेब आफ सायन्स काय आहे ? थोमोस रयुतर म्हणजे ते नव्हे काय?स्कॉपूस ला पुब्लीस कसे करावे

तनमयी's picture
तनमयी in काथ्याकूट
9 May 2018 - 2:18 pm
गाभा: 

वेब आफ सायन्स काय आहे ? थोमोस रयुतर म्हणजे ते नव्हे काय?
तर लोकहो आमच्या engg कॉलेज ने पुब्लिकेशन करा म्हणून सांगितले आहे :)
सटर फटर नको वरील हवे
पण भानगड हि आहे कि कमीत कमी १- २ वर्ष काम केल असेल तर ते नित होत पेंपर
अन्यथा ते अच्सिप्त करीत नाहीत
तर तुम्हास अशी जरनल माहित आहे का ती लवकर पुब्लीश करतात
आणि वरील क्रायेतीरिया बसतात
दर सहा महिन्याला पेपर चा रतीब कसा घालावा
पैसे पण फार नकोत

प्रतिक्रिया

तनमयी's picture

9 May 2018 - 2:33 pm | तनमयी

http://mjl.clarivate.com/
ईथे खुप सारे अहेत पन काम्पुटर चे कसे शोधावे

माहितगार's picture

10 May 2018 - 8:48 am | माहितगार

तुम्ही नेमके काय शोधताय ? काय माहिती हवी, ते नीटसे कळले नाही , अंदाजा बांधून खालील माहिती

http://mjl.clarivate.com या वेब साईटवर computer किंवा computer science शब्द शोधायचा असल्यास गूगल मध्ये

computer site:mjl.clarivate.com

असा किंवा

computer science site:mjl.clarivate.com

असा शोध घेतला की गूगल त्या साईट मधून शोधून देऊ शकते, वेबसाईट अंतर्गत शोध तुम्हालाच करुन पहावा लागेल .

माहितगार's picture

10 May 2018 - 9:04 am | माहितगार

ओके https://www.scopus.com/ नावाचे वेबसाईट आहे . How to publish on Scopus ? ह्या प्रश्नाला गूगल वर शोध घेतल्यास बरीच उत्तरे दिसतात. How do I proceed to publish a scopus journal paper?
ह्याचे www.quora.com/ उत्तर दिसते .

* जाता जाता टिप
प्रश्न अधिक सविस्तर विचारा . मराठी टापींगची सवय होईल तसे आपोआप सुधारणा होईल, काळजी करु नका . मराठी भाषा आपली मातृभाषा आहे कुणाही दिडशाण्यांची जहागीर नाही तेव्हा पुढच्या वेळी मिसळपाव वर नवा लेख लिहिताना , अशा मंडळींनी प्रतिसाद देऊ नयेत हे लेखाच्या खाली स्वच्छ लिहा . म्हणजे अशा मंडळींचा त्रास टाळता येतो.

ते उत्तरदायित्वास नकार लागू वगैरे पण शिकवा ना प्लिज.
आम्हाला पण.

माहितगार's picture

10 May 2018 - 9:21 am | माहितगार

:) नक्की शिकवेन हो बाळा ! (चला कटा इथून , नवे कुणि दिसले कि रॅगींग करायला धावतात नुसते आपले ;) )

अभ्या..'s picture

10 May 2018 - 9:26 am | अभ्या..

सॉरी मागाकाका

होय सर तो प्रकार पण केलाय
आणि माझे कलीग पण गोंधळलेले आहेत
काहीतरी काम असतय आमचे पेपर वर्क तयार आहे पण थोड ईझी गोइंग हवे आहे
ती जरनल सहजासहजी select करत नाहीत
पैसे पण घेतात
आभार प्रोत्साहन दिल्या बद्दल

माहितगार's picture

10 May 2018 - 1:01 pm | माहितगार

* ती जर्नल

माहितगार's picture

10 May 2018 - 1:01 pm | माहितगार

ते जर्नल

खिलजि's picture

9 May 2018 - 2:41 pm | खिलजि

तोंडात सुपारी ठेवून लिहीत राहा म्हणजे भाषा व्यवस्थित टंकली जाईल ( ह्घ्या)

तुम्हाला कापूस ला पोलीस करायचे आहे का ? जर उत्तर हो असेल तर आजच पेपरमध्ये वाचलं कुठेतरी विक्रोळीला पोलीसभरती चालू आहे म्हणून . तिथे " स्कोसपूस का कोण ते कापूस आहेत ना त्यांना घेऊन जा .

टवाळ कार्टा's picture

9 May 2018 - 2:52 pm | टवाळ कार्टा

व्वच्ता व्वच्ता द्द्म्म लग्ला...पुर्त व्वच्ल्यवर स्ल्म्ज्लेकी ल्वितो

ईथे खुप सारे अहेत पन काम्पुटर चे कसे शोधावे

काय शोधावे ते जरा संदिग्ध आहे . जरा खुलवून खुलवून सांगता का ?

पुंबा's picture

9 May 2018 - 3:48 pm | पुंबा

चोम्लिचतेद मत्तेर अहे..
कय अद्विचे द्यवि कल्त नहि..

तात्याच्या शब्दात " पहा कशी गोग्गोड आणि अल्लड आहे भाषा"
स्कॉपूस ला पुब्लिस कसे करायचे?........हाणतिज्यायला. एखांद्या इब्लिसाने स्कॉच आणि हापूस एकत्र करुन पिल्यागत वाटतेय.

आताच बुधवार साजरा झाला मित्रा, सर्व मित्रांच्या नावाने दोन दोन थेम्ब आणि पापलेटचे काटे चारी दिशेला काढून ठेवले . यथेच्छ जेवण झाल्यावर , हापूस होतेच हापसायला , मग म्हंटल तूझ्या कल्पनेप्रमाणे करावे . एक स्कॉचचा पेग आणि हापूस खाऊन बघितलं . भन्नाट काम , एक नंबर . ताईंच्या भाषेत " स्कॉसपूस प्येग " झाला .

खिलजि's picture

9 May 2018 - 6:23 pm | खिलजि

स्कॉसपूस प्येग

छान आयडिया , लवकरच सर्व बारमंदी पुब्लीस करायला हवी .

कंजूस's picture

10 May 2018 - 6:21 am | कंजूस

पण युनिवरसिटीने बय्राच संस्थांचे शोधनिबंध रद्द केले आहेत त्यात ही कॉस्पुस येत नाही ना पाहा प्रथम.

माहितगार's picture

10 May 2018 - 8:39 am | माहितगार

धागा लेखिका नेमकी कशाबद्दल चर्चा करत आहेत , त्यांना कोणती माहिती हवी आहे ?

* कॉस्पुस काय असते ?

मी धागा लेखातील मुद्दे खालील प्रमाणे वाचले

* वेब आफ सायन्स काय आहे ?

: इंग्रजी विकिपीडियावर लेख दिसतोय पण आपल्या भाषेत हे माहिती करुन घेणे आवडेल

** थोमोस रयुतर म्हणजे ते नव्हे काय?

: म्हणजे काय ?

तर लोकहो आमच्या engg कॉलेज ने पब्लिकेशन करा म्हणून सांगितले आहे :) सटर फटर नको वरील हवे
पण भानगड हि आहे कि कमीत कमी १- २ वर्ष काम केल असेल तर ते निट होतो पेपर (शोध निबंध )
अन्यथा ते अ‍ॅक्सेप्ट करीत नाहीत
तर तुम्हास अशी जरनल माहित आहे का ती लवकर पब्लीश करतात
आणि वरील क्रायेटेरियात बसतात
* दर सहा महिन्याला पेपर चा रतीब कसा घालावा ? पैसे पण फार नकोत

: यात पैशांचा काय संबंध असतो ?

धागा लेखिकेची नेमकी अडचण काय आहे ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 May 2018 - 3:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

थॉमस रॉयटर?
www.reuters.com

बाकी धागाकर्तीला माहिती मिळवायची ईतकी घाई झाली आहे की आपण नक्की काय टंकतो आहोत याचेही भान राहिलेले दिसत नाही. असो. डिकोड करुनही समजत नसल्याने माझा पास.

माहितगार's picture

10 May 2018 - 3:36 pm | माहितगार

नाही नाही , ते मिपा सदस्य कजूस यांनी म्हटल्यासारखे काही तरी झाले आहे, अटी शिथील असलेल्या संशोधन प्रसिद्ध करण्याच्या अनेक जर्नल ची मान्यता युजिसीनी काढून घेतली.

आता ते वेब ऑफ सायंन्स म्हणजे http://mjl.clarivate.com/ या वेबसाईटवर इंडेक्सींग होईल अशा जर्नल म्हणजे कदाचित ओके https://www.scopus.com/ वर पब्लिश किंवा http://mjl.clarivate.com/ ला इंडेक्सींगसाठी चालेल अशा जर्नल मधे येऊन हवे आहे.

वेब ऑफ सायंन्स चे कंत्राट आधी थॉमस अमकड कडे होते ते बंद होऊन http://mjl.clarivate.com/ कडे गेले ; आता बहुधा थॉमस अबकडचा काही संबंध नाही . http://mjl.clarivate.com/ आणि https://www.scopus.com/ च्य अपेक्षा सिस्टीम्स शी अजून पूर्ण परिचय होणे बाकी आहे म्हणून तात्कालीक गोंधळ उडाला असावा.

http://mjl.clarivate.com/ इथल्या इंडेक्सींग मध्ये पेपर पब्लिश झालेले मिपावर कुणि असते तर त्यांना समस्या लक्षात येऊन लगेच उत्तर मिळाले असते. त्यांना ती मदत मिपा बाहेरच मिळवावी लागेल

चुभूदेघे

मित्रों, मित्रहो,
हा कसला काथ्या नाही की कसलेही कूट नाही.
हे आहे एक निखळ काव्य. अति-आधुनिकोत्त्त्त्त्त्त्तत्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त् - र काव्य.
दिव्य काव्य. भव्य काव्य. सव्य-अपसव्य काव्य. अमूक काव्य. तमूक काव्य.
मर्ढेकरांच्या आत्म्याला आज खरी शांति लाभली असेल.
'दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे' असे ठणकावून सांगणार्‍या गंगाधर गाडगीळांच्या आत्म्यालाही गहिंवरून आले असेल.

कवित्व शब्दसुमनमाळा । अर्थ परिमळ आगळा । तेणें संतषट्पदकुळा । आनंद होये ।।

ही कविता एकात एक गुंफलेल्या शब्दरूप सुंदर फुलांची माळच जणु. कवितेमधील शब्दांना एक वेगळाच अर्थरूप सुगंध आहे. अशा वेगवेगळ्या सुगंधांनी दरवळणा-या प्रासादिक कवितापुुष्पांच्या ताटव्यांवर वाचकरूपी भुंगे प्रतिसादांची पखरण चिरकाल करत राहोत.

या कवितेने मराठी भाषेला नवनवीन शब्दांची अमोल देणगी दिलेली आहे.....
थोमोस रयुतर ....पुब्लिकेशन ....अच्सिप्त ......

..... आणि वरकरणी गूढ, अगम्य भासणार्‍या काही ओळींमधे तर मराठी कवितेला एक सर्वस्वी वेगळे, नवे वळण देण्याचे सामर्थ्य आहे:
...... सटर फटर नको वरील हवे... तर ते नित होत पेंपर.....तर तुम्हास अशी जरनल माहित आहे का ती लवकर पुब्लीश करतात .....आणि वरील क्रायेतीरिया बसतात ......दर सहा महिन्याला पेपर चा रतीब कसा घालावा .....पैसे पण फार नकोत .......

अभिनंदन आणि आणखी अश्याच विलक्षण अर्थवाही कवितेंच्या प्रतिक्षेत.

मोकलयाययाचे गद्य रुपन्तर :) !

तर आम्हा लोकांना दर सहा किवा वर्षाला पेपर करावा लागतो.
चांगल्या जरनल मध्ये. काही जण पैसे घेतात काही नाही.
हे एक जॉब वोर्क आहे आम्हासाठी.
केल नाही तर ओरडा बसतो.
increment cancel करण्याची धमकी देतात.
काय सांगाव जॉब स्ट्रेस असतो

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 May 2018 - 12:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

म्हणजे नियमांचा उद्येश "पेपरच्या संख्येच्या पाट्या टाकणे" हा आहे... संशोधन, ज्ञानवर्धन, अभ्यासूपणा, इ इ इ गेलं खड्ड्यात... असं म्हणायचं काय ?!

तनमयी's picture

10 May 2018 - 12:05 pm | तनमयी

मराठी टायपिंग शिकतेय

माहितगार's picture

10 May 2018 - 12:10 pm | माहितगार

तुमचे बाकी धाग्यांवरचे लेखन वाचण्या समजण्यासारखे होते, या धाग्यात लिहिताना घाई झाली असावी जराशी .

तनमयी's picture

10 May 2018 - 12:24 pm | तनमयी

हो मे एंड ला submit करायचे ahe

तनमयी's picture

10 May 2018 - 12:31 pm | तनमयी

IEEE , ACM , SCOPUS काय खायची गोष्ट नाहीय
खूप काम करावे लागते phd लेवेल चे काम केले तरच select करतात
स्क्रुटिनी असते .research चांगले हवे नोवेल हवे
बर्याच गोष्टी आहेत.तर जाणकारांनी माहिती द्यावी
अश्या जरनल ची जी ईझी गोइंग आहेत अन वरील प्रकारात बसतात

माहितगार's picture

10 May 2018 - 1:14 pm | माहितगार

महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक मिळून दर सहा महिन्याला एक पेपर म्हणजे वर्षातून दोन , समजा वीस प्राध्यापक असतील तर
वर्षातून दोनची अपेक्षा मोठी वाटत नाही. महाविद्यालयात अद्याप पुरेसे PhD मार्गदर्शनार्थ उपलब्ध नसतील तर बाहेरच्या महाविद्यालयातून मार्गदर्शन साठी बोलवावे.

माहितगार's picture

10 May 2018 - 1:18 pm | माहितगार

आमेरीकन विद्यापीठातील प्राध्यापक , आणि आय आय टीअन ना महाविद्यालयात बोलावण्यासाठी मोदी सरकारने योजना चालू केल्याचे ऐकुन होतो.

पिशी अबोली's picture

10 May 2018 - 12:47 pm | पिशी अबोली

कोणताही पेपर किमान वर्षभर काम केल्याशिवाय कसा कोणता चांगला जर्नल घेईल? पेपर तयार होऊन एडिटिंग, पियर रिव्ह्यू, पुन्हा एडिटिंग, प्रूफ रीडिंग इत्यादी अनेक प्रक्रियांमधून जाऊन नंतर पब्लिश होतो कोणत्याही चांगल्या जर्नलमध्ये. या नंतरच्या प्रक्रियेलाच अनेक महिने जाऊ शकतात, प्रत्यक्ष काम तर त्याच्याही कितीतरी आधी करावं लागतं, ऍक्सेप्ट होणंही कठीण असतं. असंख्य वेळा drafts वाचून त्यात सुधारणा कराव्या लागतात. दर सहा महिन्यांनी एक पेपर, आणि तोही उत्तम जर्नलमध्ये ही अपेक्षा अतिशय अवास्तव आहे, क्षेत्र कोणतेही असो. कामाला दर्जा असल्याशिवाय कसं होणार चांगलं पब्लिकेशन?

हां, आता तुम्हाला शॉर्टकट मारायचे असतील (रतीब घालणे, तुमच्या भाषेत) तर एखाद्या साध्या नावापुरत्या International, peer reviewed जर्नलमध्ये देऊन टाका. असतील की असे तुमच्या क्षेत्रात असंख्य जर्नल्स. पण मग ती माहिती तुम्हाला तुमच्या क्षेत्रातल्या असे रतीब घालणाऱ्या सिनियर्सकडून मिळेल. या तुम्ही लिहिलेल्या ठिकाणी सापडणं कठीण आहे आणि शोधत बसलात तर उगाच वेळ जाईल, असं मला वाटतं. माझ्या मताला नाकारण्याचा अधिकार तुम्हाला आहेच.

तनमयी's picture

12 May 2018 - 3:05 pm | तनमयी

तेच सांगते आहे
*दर सहा महिन्यांनी एक पेपर, आणि तोही उत्तम जर्नलमध्ये ही अपेक्षा अतिशय अवास्तव आहे, क्षेत्र कोणतेही असो. कामाला दर्जा असल्याशिवाय कसं होणार चांगलं पब्लिकेशन?
पण इम्प्लोयर ला कसे सांगायचे.
आमचे काम असते काही तरी प्रोजेक्ट वर्क application ,study वर्क असते
नाही असे नाही.
आणि फी पण खूप आहे मान्यता प्राप्त जर्नल ची.

पिशी अबोली's picture

12 May 2018 - 11:46 pm | पिशी अबोली

जर अशा पद्धतीने तिथे सगळेच लोक चाचपडत असतील, तर कुणीच पेपर पब्लिश करू शकणार नाही. तुमचं काम झालेलं असेल, आणि या वस्तुस्थितीची तुम्हा सगळ्यांना कल्पना असेल, तर याविरुद्ध तुम्ही आवाज उठवला पाहिजे. सध्या मान्यता देणाऱ्या सर्व संस्थांकडे grievance redressal system आहे जिथे तुम्ही थेट तक्रार करू शकता. याविरुद्ध आवाज उठवू शकता. बरं आत्ता पेपर मोठ्या जर्नलमध्ये करायला सांगत आहेत, पण तुम्ही म्हणताय काम आहे तर ते अन्य कुठेतरी पब्लिश झालेलं असेलच. त्याचा आधार तुम्ही कामाची क्वालिटी सिद्ध करायला घेऊ शकता.

जर कुठेही काहीही आजपर्यंत काम झालेलं नसेल तर तुम्ही काहीतरी सबमिट करून ते accept होणार नाही, हे तुम्ही जेवढं लवकर समजून घ्याल तेवढं बरं. या प्लॅटफॉर्म वरचे पेपर्स, जे तुमच्या कामासंदर्भात आहेत, ते तुम्ही वाचले आहेत का? त्या क्वालिटीचं काम तुमच्या संस्थेत होऊ शकतं का, त्यापद्धतीचं मार्गदर्शन कुणी करू शकेल का, याचा विचार करा. तुमचा संपूर्ण analysis तयार असेल, तरी नुसता पेपर नीट लिहायलाही वेळ जातो. प्रत्येक शब्द तोलून मापून वापरावा लागतो. हे सगळं मार्गदर्शनाशिवाय, सवय असल्याशिवाय उत्तम जर्नलसाठी करणं अतिकठीण आहे. 'पेपर पाडणे' वगैरे संकल्पना ज्यांच्या डोक्यात आहेत, त्यांना या मेहनतीचा अंदाज येणार नाही, पण वर्षानुवर्षांचं काम असू शकतं एका पेपरमध्ये.

जिथे सुशिक्षितांना बऱ्याचदा संशोधकांबद्दल 'सरकारचा पैसा खाऊन आपलं संशोधन लपवणारे' वगैरे मुक्ताफळं उधळायची असतात, अशा जगात मॅनेजमेंटमध्ये या गोष्टींचा अंदाज येणारे लोक कठीणच. पण तुमच्यावर काहीही नियम लादले गेले, तर त्याचा विरोध करणं तर तुमच्या हातात आहे ना.

जेम्स वांड's picture

13 May 2018 - 10:43 am | जेम्स वांड

जिथे सुशिक्षितांना बऱ्याचदा संशोधकांबद्दल 'सरकारचा पैसा खाऊन आपलं संशोधन लपवणारे' वगैरे मुक्ताफळं उधळायची असतात, अशा जगात मॅनेजमेंटमध्ये या गोष्टींचा अंदाज येणारे लोक कठीणच

जबरी आवडला हा परखडपणा! जीभ उचलून टाळ्याला फेवीक्विक न लावली तरी लोकशाहीत ती हसडली जाऊ शकत नाही ह्याचा पुरेपूर उपयोग जर भारतात कोणी करत असेल तर तो सुशिक्षित वर्गाचा एक मोठा हिस्सा होय

माहितगार's picture

13 May 2018 - 3:33 pm | माहितगार

जिथे सुशिक्षितांना बऱ्याचदा संशोधकांबद्दल 'सरकारचा पैसा खाऊन आपलं संशोधन लपवणारे' वगैरे मुक्ताफळं उधळायची असतात,

व्यक्तिशः घेऊ नये , पण काही वचने प्रथम दर्शनी कडवट वाटली तरी त्यालाही तथ्या ची बाजू असू शकते का ?

पृथ्वी आणि त्यावरील निसर्ग यांच्या पिढी दर पिढी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपयोगा शिवाय इतर प्राणीच नाही मानवाची संस्कृतीही आकारास येऊ शकलेली नाही. पृथ्वी अथवा निसर्गाने येऊन स्वतः:हुन स्वतः:चे एखादा भाग विशिष्ट प्राण्यातील विशिष्ट समुहास अथवा विशिष्ट व्यक्तींना येऊन वाटल्याचा वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध होईल असा , पुरावा देणे कुणासही कितपत शक्य असावे ?

पृथ्वी अथवा निसर्ग ढोबळ मानाने सर्व सजीवांना सामान संधी देत असावेत . वस्तूत: मानव प्राण्यातील अनेक व्यक्ती आणि समूह पृथ्वी आणि निसर्गातील स्रोतवर ज्या क्षणी विशेषाधिकार सांगतात त्या क्षणी उर्वरित मानवी आणि सजीव समूहाचे तुमच्यावर समाज ऋण लागू होत असावे. आपण कोणत्याही समाज ऋणाचे देणे लागत नाही हि भूमिका अनाकलनीय आणि वस्तुस्थिती पासून बरीच लांब असावी असे वाटते .

सरकारी पैशाने झालेल्या संशोधनावर जनतेचा नैतिक अधिकार का अभिप्रेत नसावा . ? आता शोधगंगा प्रकल्पामुळे पैकी बरेच शोध निबंध ऑनलाईन उपलब्ध होऊ लागले आहेत . जिथे राष्ट्रीय सुरक्षेचा संबंध नाही असे संशोधन कपाटामध्ये किंवा अव्वयाच्या सव्वाला किमतीला उपलब्ध करणे कि जेणे करून सर्व सामान्य लोक सहज तुमचे संशोधन ना वापरातील तेवढे बरे ह्या दृष्टिकोनाचे कोणत्याही कोनातून समर्थन कसे काय होऊ शकते हे अनाकलनीय आहे ?

निसर्गातील फळे मुक्तपणे खायचीचे खायची , आणि बोलणाऱ्यांनाच ;मुक्ताफळे वाहणारे ‘ म्हणून नावे ठेवायची ; व्हिक्टीम ब्लेमीन्ग नाही ना हे ?

मतांतरासाठी क्षमस्व

पिशी अबोली's picture

13 May 2018 - 6:17 pm | पिशी अबोली

हैला, भारीच की मतांतर. आता एखादा पेपरच पाडा ब्वा तुम्ही या विषयावर. भारावूनच गेले मी वाचून तुमचे या धाग्यावरचे सगळे सगळे प्रतिसाद.

माहितगार's picture

13 May 2018 - 7:02 pm | माहितगार

जो जे वांछिल तो ते लाहो !!!

या रतीब घालणे पद्धतीमुळे UGC सावध झाले.

लोकसत्ता,शनिवार, ५मेच्या पेप्रातली बातमी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून चार हजार संशोधन पत्रिकांची मान्यता रद्द पाहा.

माहितगार's picture

10 May 2018 - 1:51 pm | माहितगार

ह्म्म , बहुधा म्हणूनच धागा लेखातील माहिती मागण्यास प्रयोजन दिसते आहे.

मिपावर इंजिनिअर असून प्राडॉ कमी असावेत, त्यांना बहुधा बाहेरच्या महाविद्यालयातील इंजिनिअर प्राडॉ ची मदत घ्यावी लागेल.

*मिपावर इंजिनिअर असून प्राडॉ कमी असावेत, त्यांना बहुधा बाहेरच्या महाविद्यालयातील इंजिनिअर प्राडॉ ची मदत घ्यावी लागेल.
-बाहेर पण असेच आहे गोंधळ आहे. जे phd आहेत ती चार पाच वर्षात करून दाखवतात .IEEE or SCOPUS ला.
कॉलेज ला पण बर्याच कमिटी ला apply करावे लागते
त्यामुळे हे अस सर्व सुरु होते त्यांना data भरावा लागतो कि जो कमिटीच्या फोर्माट मध्ये बसावा लागतो मग सुरू होतो जेणे करून त्यांना मान्यता मिळेल
मग काय आहेच employee ना धारेवर धरणे etc

माहितगार कंजूस पिशी अबो. आभार
अजून काय माहिती असेल तर सांगा.

अनिता चित्रगुप्त राजेंद्र मेहेंदळे अभ्या..
खिलजि पुंबा टवाळ कार्टा

मराठी टायपिंग शिकतेय.

डॉ सुहास म्हात्रे

आपणास पण टार्गेट complete असे काही असेल न
काही वेळेला quality quantity मध्ये आपण सापडतोच अश्या वेळेला काय करायचे

माहितगार's picture

12 May 2018 - 4:42 pm | माहितगार

एक सजेशन गांभिर्यानेच देतोय, तुमच्या या अडचणींवर एखादा पेपर होऊ शकेल - तसा संशोधक न भेटल्यास , एखादा वृत्तपत्रीय लेख अवश्य लिहावा.

* अवांतर
तुमचा प्रॉब्लेम फक्त टायपींगचा वाटत नाही - कदाचित आपल्या लेखनाचा काही भाग, आपण इंग्रजीत किंवा इतर भाषेत विचार करुन मग मराठीत अनुवादीत करत असल्या सारखा वाक्यरचेनेच्या दृष्टीने कुठे कुठे जरासा मागे पुढे वाटतो का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2018 - 9:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपणास पण टार्गेट complete असे काही असेल न
काही वेळेला quality quantity मध्ये आपण सापडतोच अश्या वेळेला काय करायचे

भारतात वैद्यकिय शिक्षण क्षेत्रात (डायनॉसॉरसच्या काळात) होतो तेव्हा अशी काही अट नव्हती. :) इथले आताचे निकष माहीत नाहीत. पण जेथे जेथे काम केले आहे तेथे...

(१) प्रत (क्वालिटी) उत्तम राखण्यासाठी, केवळ जागतिक/राष्टिय स्तरावरच्या मान्यताप्राप्त पियर रिव्हुड जर्नल्समध्य प्रसिद्ध झालेले संशोधनच संस्थेच्या क्वालिटी रिव्ह्युसाठी ग्राह्य धरले जाते. राष्टिय स्तरावरच्या जर्नलला मान्यतेसाठी कडक नियमांचे पालन करणे आवश्यक असते... ही मान्यता सहजी किंवा हितसंबंधावर आधारित मिळत नाही.

(२) संशोधानाची क्वांटिटी उत्तम राखण्यासाठी, उत्तम संशोधक-शिक्षक आपल्या संस्थेकडे आकर्षित करणे आणि त्यांना धरून ठेवण्यासाठी आवश्यक ती संशोधनसंसाधने पुरविणे याची जबाबदारी व दडपण व्यवस्थापनावर असते.

पैसे देवून आपले संशोधन प्रसिद्ध करण्याचे प्रकार ऐकून असलो तरी मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव नाही... किंबहुना, असे करणे (अ) क्वालिटी क्रायटेरिया आणि / किंवा (आ) नैतिकतेची चौकट, यांच्यात कितपत बसेल याबद्दल माझ्या मनात संशय आहे.

मुळातच, उच्च संशोधन करण्यासाठी तशी वैयक्तिक आवड, कळकळ आणि प्रवृत्ती असावी लागते. (अ) ती सर्वच शिक्षकांत असण्याचा आणि/किंवा (आ) सर्वच विद्यार्थ्यांना संशोधक बनविण्याचाआग्रह धरणे ही अवास्तव व अनैसर्गिक मागणी आहे. दुसर्‍या शब्दात म्हणायचे म्हणजे, (अ) सगळ्याच विद्यार्थ्यांना संशोधक बनवायचे आहे किंवा (आ) सगळ्याच शिक्षकांना संशोधक तयार करणारे शिक्षक बनवायचे आहे, या गृहितकावर शिक्षणपद्धती बेतणे यासारखे अवास्तव व अनैसर्गिक दुसरे काही नाही.

निम्न व मध्यमस्तरावरच्या शिक्षणात ज्ञानार्जन करण्याचा मुख्य हेतू विद्यार्थ्याला मिळविलेल्या ज्ञानाचा/तंत्रज्ञानाचा उपयोग करून समाजाचा उत्पादक घटक बनविणे हा असावा. या स्तरावर काम करणार्‍या शिक्षकांनी (अ) त्यांच्या ज्ञानाचे सतत अद्यतन (अपडेट) करत राहणे आणि (आ) त्यांच्याकडे शिक्षण देण्यासाठी लागणारे योग्य कौशल्य असणे, या दोन गोष्टी पुरेश्या आहेत. त्या जितक्या जास्त उत्तम प्रतिच्या असतिल तितके जास्त चांगले; त्यांच्या नावावरच्या शोधनिबंधांची संख्या हा फारसा मोठा मुद्दा होऊ शकत नाही. जबरदस्तीने "पाडलेल्या" पेपर्सच्या ठराविक संख्येने हे लक्ष्य कसे गाठता येईल याबद्दल माझ्या मनात संभ्रम आहे.

उच्च स्तराचे (विशेषतः मास्टर्स, डॉक्टोरल व पोस्ट-डॉक्टोरल स्तराचे) शिक्षण देणार्‍या शिक्षकांचे काम मुख्यतः कुशल मार्गदर्शकाचे असते. या स्तराच्या विद्यार्थ्यांनी दुसर्‍यांचे म्हणणे "बाबा वाक्य प्रमाणम्" असे न मानता, किमान आपल्या विषयातल्या (किंबहुना जीवनातल्या सर्वच विषयांतल्या) मुद्द्यांचे सखोल विश्लेषण करून आपले स्वतंत्र मत बनविणे व ते व्यवहारात योग्य प्रकारे मांडणे आवश्यक असते. तसे झाले तरच, त्यांचे शिक्षण पुस्तकी घोकंपट्टी न राहता व्यवहारात आणि संशोधनात उपयोगी ठरेल. हा शिक्षणाचा स्तर गाठण्यासाठी शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांमधील (अ) संशोधक विचारप्रवृत्ती, (आ) संशोधन करण्याच्या विविध तंत्रांची माहिती, (इ) चौकसपणा, (ई) तार्किक विश्लेषण करून शास्त्रिय पद्धतीने निष्कर्षापर्यंत पोचणे, इत्यादी मुलभूत गोष्टींचे संगोपन आणि विकास करण्याचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे. यासाठी, ते गुण या स्तरावरच्या शिक्षकांमध्ये असणे, केवळ कळीचेच नव्हे तर अत्यावश्यकच आहे. अर्थातच, या स्तरावरचे शिक्षक खरे अभ्यासक व संशोधक असणे जरूर आहे... ते तसे असल्यास त्यांच्या नावावरच्या शोधनिबंधांची संख्या आवश्यक अट म्हणून जबरदस्तीने नव्हे तर सहजपणे वाढत जाते. शिक्षक म्हणून खर्ची घातलेली वर्षे यासंबंधात फार मोठा निकष नसतो... नसावा. जबरदस्तीने "पाडलेल्या" पेपर्सच्या ठराविक संख्येने हे लक्ष्य कसे गाठता येईल याबद्दल माझ्या मनात संभ्रम आहे.

वरची वस्तूस्थिती पाहता, हे ध्यानात येईल की, सगळे निम्न व मध्यमस्तरावरचे शिक्षक, केवळ ठराविक वर्षे सेवेत आहेत या कारणाने उच्च स्तराचे शिक्षक बनणे वास्तवात शक्य होत नाही. तशी अपेक्षा ठेवणे अवास्तव व अनैसर्गिक असते.

"ठराविक संख्येने शोधनिबंध पाडणे" या समस्येचे मूळ "प्रमाणन पद्धती आणि निकष (accreditation methodology and criteria)" बनवताना वरच्या वास्तवाकडे केलेल्या दुर्लक्षात असते. भारतातिल बहुतेक शिक्षणसंस्थांना संशोधनात रस नसतो, त्यासाठी लागणार्‍या साधनसंशोधनांची त्यांच्यात वानवा असते. त्या संस्थांमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे लक्ष्य "उत्तम संशोधनाची संधी" हे नसून, "नोकरीचे साधन असलेली डिग्री मिळवणे" हेच असते. अर्थातच, बहुतेक शिक्षणसंस्थांचे "प्रमाणिकरण (accreditation) मिळविण्याचे व ते टिकविण्याचे" मूळ लक्ष्य सरकारी मान्यता आणि/किंवा पर्यायाने सरकारी मदत (ग्रांट) मिळवणे हेच असते. पाश्चिमात्य देशांतही हे काही प्रमाणात होतेच.

पाश्चिमात्य जगातल्या नावाजलेल्या शिक्षणसंस्थाही वरच्या कारणांसाठी आवश्यक ते "प्रमाणिकरण (accreditation)" मिळवितात. अश्या संस्थांच्या दृष्टीने, प्रमाणिकरणाचा मुख्य उद्येश, "संस्था सोडून जाणार्‍या विद्यार्थ्यांना आपले क्रेडिट पॉईंट्स दुसर्‍या संस्थेत बरोबर घेऊन जाता यावे" हा केवळ एक अतिरिक्त फायदा असतो. मात्र त्या तेथेच थांबत नाहीत. कारण, सर्वसाधारण समजुतींच्या विरोधी, "प्रमाणिकरण मिळाले म्हणजे काही फार मोठे झेंडे गाडले असे होत नाही" हे त्यांना समजले-उमजलेले असते. प्रमाणिकरणामध्ये बहुदा प्रमाणिकरण "मिळाले / काही अटींवर मिळले / मिळाले नाही" असा निकाल मिळतो. म्हणजे एका अर्थाने, तो "पास / एटीकेटी / नापास" असा निर्णय असतो. त्यामुळे, प्रमाणिकरण न मिळणारी संस्था कमी प्रतीची आहे असे मानले तरी, ते मिळणारी संस्था "काठावर पास" ते "डिस्टिंक्शन" या वर्णपटावर कोठेही असू शकते.

चांगल्या संस्थेच्या प्रतीचे खरे स्थान तिच्यामध्ये असलेल्या (अ) शिक्षकांची खरी प्रत, (आ) त्यांच्या शिक्षकांचे खरे (पियर रिव्ह्युव्ड जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले) संशोधन, (इ) शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी संस्थेत उपलब्ध असलेली संशोधनसंसाधने, आणि (ई) संस्थेतून बाहेर पडून आपल्या विषयांत जागतिक स्तरावर नामवंत झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या, इत्यादींवर ठरते... त्या सस्थांची संस्थळे आणि माहितीपत्रके पाहिली तर याच गोष्टींना प्रामुख्याने प्रसिद्धी दिलेली दिसते. कारण, याच गोष्टी उत्तम शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करतात हे त्या संस्था समजून-उमजून असतात... ते जमले तर त्यामागून आर्थिक बळसुद्धा चालून येते ही वस्तूस्थिती आहे. अश्या संस्थेतील शिक्षणाची प्रत्यक्ष प्रत "प्रमाणिकरणाच्या पास प्रतिच्या" खूप वर (बहुदा डिस्टिंक्शन किंवा त्यापेक्षा वरची) असते. त्यामुळे, त्यांच्यासाठी "प्रमाणिकरण" हा मुद्दा नसतो. आपल्या शिक्षणदानाची प्रत (क्वालिटी) इतर नावाजलेल्या संस्थांपेक्षा वर कशी न्यावी/ठेवावी (काँपिटिशन विथ पियर्स) आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे, आपल्या प्रतिचा स्तर दिवसेदिवस वर कसा न्यावा (कंटिन्युअसली बिटिंग सेल्फ / ओन परफॉर्मन्स), याचीच त्यांना चिंता असते.

जेम्स वांड's picture

12 May 2018 - 4:46 pm | जेम्स वांड

अभियांत्रिकी शिक्षण विषयात भारत 'वॉशिंग्टन अकॉर्डचा' सभासद होण्याशी अन इंजिनियरिंगच्या मास्तरांस असे पेपर प्रकाशित करायला धावपळ करण्याचा काही आपापसात संबंध असावा काय? असल्यास असुरी का काय म्हणतात तसलं आनंद झालाय. व्हायवा, इंटर्नल, जर्नल, एक्सटर्नल आदीचे मार्क देताना घरच्या वाणसामान दुकानातून केशर फुकट वाटाय लागल्या प्रमाणे चिकटपणा करणाऱ्या सगळ्या मास्तरांना आता जागतिक लेव्हल वर तेच करायला लागणार आहे!.

*एखादा वृत्तपत्रीय लेख अवश्य लिहावा.
घरी बसवताय काय राव
* अवांतर
तुमचा प्रॉब्लेम फक्त टायपींगचा वाटत नाही
थोडी घाई असते. :)
सुधारेन.
इंजिनियरिंगच्या मास्तरांस दिवस वाईट आलेत .
*जेम्स वांड
असुरी आनंद दुसरे काय.
*इंजिनियरिंगच्या मास्तरांस असे पेपर प्रकाशित करायला धावपळ करण्याचा काही आपापसात संबंध असावा काय?
माहिती नाही पण हे सर्व NBA ISO अश्या कमिटी मुळे कॉलेजेस ला करावे लागतेय
खूप इंजिनियरिंग कॉलेज झालीयेत .
student मिळविण्यासाठी खूप कष्ट पडतात .private कॉलेजेस आपले रेप्युटेशन वाढविण्यासाठी असे करतात

private कॉलेजेस मध्ये काय चालते
हे सांगितले तर ते विषयांतर होईल .
आणि सिंहगड ची बातमी माहिती असेल आपणास
employee च्या हक्कावर गदा, कसेही वागविणे , सुटी,हक्काची रजा ,कधीही पगार, DA चे विषय.Direct obervance,कामाचे तास
UGC NBA युनिवर्सिटी management ला शामिल असणे.
किती विषय आहेत.

*महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक मिळून दर सहा महिन्याला एक पेपर म्हणजे वर्षातून दोन , समजा वीस प्राध्यापक असतील तर
वर्षातून दोनची अपेक्षा मोठी वाटत नाही. महाविद्यालयात अद्याप पुरेसे PhD मार्गदर्शनार्थ उपलब्ध नसतील तर बाहेरच्या महाविद्यालयातून मार्गदर्शन साठी बोलवावे.

रुल आहेत काही युनि. ला.की एका university चे दुसर्या युनि PhD मार्गदर्शनार्थ चालत नाहीत.
आणि जागा कमी असतात .specialy cse ला बोटावर मोजण्या एवढ्या जागा निघतात महाराष्ट्र मध्ये तरी

कंजूस's picture

13 May 2018 - 5:19 am | कंजूस

Quora dot com हे खूप दूरवर पोहोचणारे व्यापक माध्यम /वेबसाईट आहे. तिथे हा प्रश्न विचारला का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2018 - 7:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

योग्य दरात योग्य पब्लिकेशन मधे छापुन मिळेल.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

13 May 2018 - 9:18 am | माहितगार

काम फत्ते !!

माहितगार's picture

14 May 2018 - 5:12 pm | माहितगार

कधी कधी घाई होते :)) (ह. घ्या)

तनमयी's picture

14 May 2018 - 1:35 pm | तनमयी

*योग्य दरात योग्य पब्लिकेशन मधे छापुन मिळेल.
असे खूप फोन येतात आम्हा लोकांना
phd ला सहाय्य करून देतो म्हणून ,पेपर प्रकाशित करून देतो आणि बरेच असे काहि .
पण त्यांची विश्वासार्यता काय

अभ्या..'s picture

14 May 2018 - 2:49 pm | अभ्या..

च्यायला काये हे?
म्हणजे हे प्रकाशन, जर्नल्स, पेपर आदिबाबत माझे आकलन कमी पडतंय बहुधा पण आजकाल नरसरीपासून मुलांना विविध प्रोजेक्ट बिजेक्ट करुन आणायला लावतात. त्याचे निम्मे काम पालक करतात, न जमणारे बाहेरुन करुन घेतात. मुले मस्त तगादा लावून करुन घेतात. प्राथमिक, माध्यमिक शाळेत आणखी कॉम्प्लिकेटेड प्रोजेक्ट्स. फक्त मुलांना समोर बसवुन करायला लावले तर ५ टक्के मुलेही करणार नाहीत असे. कित्येक लोक आता त्या प्रोजेक्टस ना लागणार्‍या वस्तू पुरवायचाच व्यवसाय करतात. काही जण तर तयार बनवून देतात. पॉवरप्रेझेंटेशन रेडी करुन मिळतात. मुलेही अगदी विषय मिळाल्या मिळाल्या गुगलावर टाकून रेडी काय आहे ते पाहतात. एका व्यावसायिकाच्या पत्नीने तिच्या चौथीतल्या मुलाचा कात्रणे चिकटावयाचा प्रोजेक्ट तशीच दुसर्‍या मुलाच्या वहीतली कात्रणे स्कॅन करुन ती कलरप्रिंट करुन परत कापून चिकटवून देण्यासाठी ५ हजार मोजलेले स्वतः पाहिलेले आहे. माझे कित्येक व्यवसायबंधू फक्त पीएचडी चे प्रबंध टायपून आपली पोटे शिस्तीत भरतात. त्याचे इनपुटस कसे आलेले असतात ते दिसतेच समोर. पब्लिशिंग डिसेंट दिसावे म्हणून किंवा टायपिंग इतके जमत नाही, पीसी नाही असे म्हणले तरी आक्खे प्रबंध कॉपी मारले जातात. कशासाठी अशी नाटके? प्रमोशने, पगारवाढ किंवा नुसताच दिखावा ह्यासाठी किती फसवायचे सुरुवातीपासून. युनिव्हर्सिटीला पण माहीत नसते का हे? जर पेपर पब्लिश करणे इतके अवघड व त्या विषयाच्या विद्यार्थ्यालाच कळत नसेल तर युनिव्हर्सिटीनेच काहीतरी मार्ग काढावा. त्यांनीच एखादे पब्लिकेशन सुरु करुन सर्व विद्यार्थ्यांचे प्रबंध प्रकाशित करावेत. लगे हाथ डेटाबेसही तयार होईल. कौन कितने पानीमे हेही सम्जून जाईल. आजकालच्या इ बुक आणि वेब जमान्यात हे अवघड नसावे. कशाला दुसर्‍या प्रकाशन संस्थांनी तयार केलेल्या गुडविलवर पाणी फेरायचे. किंबहुना अशा पध्दतीने सारा समाज आणि शिक्षणसंस्थाच सडवण्याचे काम सरकारमान्य मेथडने होत आहे की काय असा संशय येतो. ह्या मेथडमध्ये गव्हासोबत किडे रगडले जातच आहेत पण कोणाची तक्रार सच्ची हेही कळत नाहीये.

माहितगार's picture

14 May 2018 - 5:16 pm | माहितगार

:( कोणत्याही एका क्षेत्रात सरकारची इनव्हॉल्वमेंट सहसा ३० वर्षापेक्षा अधिक असू नये . आणि नियम कायदे बनवणार्‍यांनी डोके जागेवर ठेवण्याचे भान ठेवायला हवे, नियमांचा प्रत्यक्ष परिणामाचा अभ्यास करुन नियमावलीत वेळो वेळी सुधारणा करावयास हव्यअसे, पण हे बदलेल कसे ?

शाम भागवत's picture

14 May 2018 - 9:48 pm | शाम भागवत

आठवीपर्यंत कोणालाही नापास करायचे नाही हे धोरण ज्यांनी आखले त्यांची नेमणूक हा प्रश्न सोडवायला करायला पाहिजे.
म्हणजे प्रोफेसरांनी जर्नल पब्लीश केले की ते मान्य करायची सक्तीच विद्यापीठांवर करायला पाहिजे अस काहीतरी धोरण ते शोधून देतील.

मी गेल्या १० वर्षांपासून वेब ऑफ सायन्स, स्कोपस वापरतोय. तुमच्या लेखातुन असा अर्थबोध होतोय कि तुम्हाला पेपर पब्लिश करायचाय. थॉमसन रॉयटर्स कुठलेही पेपर प्रसिद्ध करत नाही. तुम्हाला पेपर पब्लिश करायचा असेल तर एल्झिविअर, विली, पी. एन. ए. एस. अश्या पब्लिकेशन हाऊसशी संपर्क करावा लागेल. तुमच्या संशोधनाचा दर्जा चांगला असेल तरच वरील पब्लिकेशन हाऊस रीसर्च पेपर स्विकारतात. तुमचा पेपर किति impact factor च्या जरनल मद्ध्ये प्रकाशित झालाय याला महत्व असतं. impact factor काढण्याचं काम बहुदा थॉमसन रॉयटर्स करते.

वेब ऑफ सायन्स हे फक्त मेटा सर्च ईंजिन आहे.

टीप. मी वरील कुठलेही प्रतिसाद न वाचता प्रतिक्रिया दिली आहे.

अभिजीत अवलिया's picture

19 May 2018 - 2:31 pm | अभिजीत अवलिया

तुमच्या इंजिनीयरिंग कॉलेजचे जे कोणी संस्थाचालक असतील त्यांचे डोके ठिकाणावर आहे का किंबहुना त्यांना डोके आहे का हा प्रश्न पडलाय.
आजकाल AICTE ने कॉलेजांवर बराच बडगा उचललाय. जितके कॉलेज मधील शिक्षकांकडून पब्लिश होणारे पेपर जास्त तितके कॉलेजला AICTE काढून मिळणारी ग्रांट चांगली. मग ग्रांट वाढली की जास्त पोर ऍडमिशन घेतात, फी पण वाढवता येते असे हे दुष्टचक्र आहे.

दर सहा महिन्याने चांगल्या जर्नल मध्ये पेपर पब्लिश करणे म्हणजे त्यासाठी नोकरी सोडून संशोधनाचं काम करावे लागेल शिक्षकांना (जसे CID मधले डॉक्टर साळुंखे करत असतात)

गुगल वर AICTE Approved Journals सर्च केलेत तर बरीच सापडतील. त्यातले कुठले चालेल ते तुमच्या कॉलेजला विचारा. एखाद्या विषयावरचे ५-६ पेपर इकडून तिकडून डाउनलोड करायचे आणि जुजबी फेरफार करून पब्लिश करायचे हा एक उपाय आहे. ह्यातली बरीच जर्नल्स अशी कॉपी पेस्ट केलेली कामे स्वीकारतील. कॉलेज ला पण फक्त संख्येशी मतलब आहे त्यामुळे टाकायच्या पाट्या.

नाहीतर दुसरा मला माहीत असलेला उपाय म्हणजे कॉलेज मध्ये मुलांना जे प्रोजेक्ट्स असतात ते तुमच्या मार्गदर्शनाखाली करवून त्यात तुमचे देखील नाव टाकून घेणे. हे जास्त प्रेफर केले जाते असे समजते.

IEEE वगैरे शक्यतो विसरा. तुमचा पेपर सबमिट केल्यानंतर तो पब्लिश होणे हा काळ जवळपास ३-४ महिन्यांचा आहे तिथे. आणि त्यात पण तो नाकारला गेला तर सगळंच मुसळ केरात.

पिलीयन रायडर's picture

19 May 2018 - 2:55 pm | पिलीयन रायडर

आम्हाला प्रोजेक्ट सबमिशनला 2 पेपर पब्लिश करणं कम्पलसरी होतं ते ह्याच साठी. सर काहीही न करता स्वतःचं नाव छापून घ्यायचे. मी तेव्हा न्यू मदर कॅटेगरी मध्ये असल्याने मी "जमणार नाही" सांगून डिग्री पूर्ण केली. पण बाकी पूर्ण वर्गाने असे 2 - 2 पेपर कसे बसे छापून आणले. अनेकांनी बहुदा 1 करूनच हात जोडले की घ्या नाही तर घेउ नका.

अभिजीत अवलिया's picture

19 May 2018 - 3:21 pm | अभिजीत अवलिया

आमची पण तीच गत.
एक तर आम्ही 'इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम' ह्या तथाकथित एव्हरग्रीन ब्रॅन्चचे विद्यार्थी. आमचे मार्गदर्शक शिक्षक त्यावेळी M.E. करत होते. त्यांनी IEEE चा एक MATLAB मधील शोधनिबंध आम्हाला इम्प्लिमेंट करायला सांगितला. आणि हे करावेच लागेल असे देखील बजावले. तोपर्यंत MATLAB नावाचा काही प्रकार असतो हेच आमच्या गावी न्हवते. त्यांना काही विचारले तर एकच उत्तर 'तुमचे तुम्ही करा. नेटवर शोधा.' पूर्ण कॉलेज मध्ये एखाद दुसऱ्या पी.सी. वर नेट ज्याच्यावर लॅब असिस्टन्ट दिवसभर शेषनागासारखा पडून. बाहेर ४० रु. ताशी देणे म्हणजे घरच्यांनी जोडे मारले असते. ही गोष्ट २००६ ची. शेवटपर्यंत आम्हाला तो पेपर काय आहे ते पण कळले नाही. गळ्यापर्यंत आल्यावर मुंबईच्या एका मार्गदर्शकांची मदत घेतली आणि करून टाकला इम्प्लिमेंट. तेच इम्प्लिमेंटेशन सबमिट करून कॉलेज मधील मार्गदर्शक पण M.E. झाले. आता HOD पण झालेत. चांगलं चाललंय त्यांचं.

माहितगार's picture

19 May 2018 - 3:31 pm | माहितगार

:)

पिलीयन रायडर's picture

19 May 2018 - 3:43 pm | पिलीयन रायडर

आमचं फक्त एक पायरी वर! सर पी.एच.डी करत होते आणि आम्ही एमई. त्यांची इच्छा होती की सेमिनार का काय तरी होतं तेव्हा बारीकस, ते पण मी त्यांच्या विषयात करावं म्हणजे ह्यांचं काम मी थोडं पुढे न्यावं. त्यात मला काही रस आहे, काही समजतंय वगैरे चा प्रश्नच नव्हता.

टवाळ कार्टा's picture

19 May 2018 - 4:04 pm | टवाळ कार्टा

ME करत असताना न्यू मदर झालात?

पिलीयन रायडर's picture

19 May 2018 - 5:17 pm | पिलीयन रायडर

Yaass!

आजच्या नॉलेज इकोनॉमीच्या काळात आपला देश आंतरराष्ट्रीय स्पर्धाना तोंड देता असताना, जनते पर्यंत आणि अथवा उत्पादन प्रक्रियेत पोहोचणारे संशोधन आणि पेटंटसची मोठी आवश्यकता असावी.

अडचणींना तोंड देऊन सुयोग्य बदल घडवण्यासाठी कार्यरत होण्या ऐवजी नकारात्मक आणि निराशात्मक सूर देश हिताच्या विरुद्ध दिशेने कार्यरत होतो याचे विस्मरण होणे तसे पहाता योग्य नव्हे -आणि हे देश हित परकीयांचे नसते आपल्याच बांधव आणि पुढच्या पिढयांची रोजगार क्षमता देशाचे आर्थिक सामरिक सामर्थ्य सर्व यावर अवलंबून असणार आहे .

आंतरराष्ट्रीय रिकग्निशन कामाच्या दर्जाची तौलनिक पडताळणी करण्याचा दृष्टीने ठीक पण संशोधन पब्लिश कुठे होते ह्या ऐवजी ते दर्जेदार आहे का आणि जाणते पर्यंत अथवा उत्पादन प्रक्रिये पर्यंत पोहोचते आहे का हे निकष खऱ्या अर्थाने महत्वाचे असावयास हवेत.

विद्यार्थयांचा सहभाग घेतला असेल त्या विद्यार्थ्याना सुयोग्य क्रेडिट द्यावे पण मर्यादित विद्यार्थी सहभाग -समजा वर्षातून २० एक दिवस - घेण्यात तत्त्वता: अयोग्य असे काही नसावे .

अडचणी सोडवण्याचा इथे आधीच्या प्रतिसादात कुणी अंतर्गत तक्रार व्यवस्थेचा उल्लेख केला आहे . विद्यापीठ , अनुदान आयोग , किमान महाराष्ट्रात विधान परिषद आणि पदवीधर मतदार संघ आहे , सध्याचे केंद्रीय ह्युमन रिसोर्स मंत्री मराठी आहेत . आवाज पोहोचवण्यासाठी जागाच नाही म्हणणे रास्त वाटत नाही. अर्थात अपेक्षाही रास्त असावयास हव्यात किंवा कसे .

माहितगार's picture

19 May 2018 - 8:02 pm | माहितगार

* जनते पर्यंत

तनमयी's picture

21 May 2018 - 12:12 pm | तनमयी

आत्ता कसे विषयानुसार प्रतिक्रिया येत आहेत
मी सुध्धा वरील अनुभवातून गेलेय.
एक केलाय पेपर .करते submit.
तेवढाच तीन महिने आराम.
तेवढा वेळ मिळेल नवीन काहीतरी लिहीन.
सध्या status सबमिट .