सारखं सारखं त्याच झाडावर का ?

Primary tabs

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in काथ्याकूट
7 May 2018 - 12:12 pm
गाभा: 

ते सकाळी उठल्यापासून फेसबुक, व्हाट्सअप, वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, या सारखच मिपावरसुद्धा, राजकारण, मोदी, राहुल, हिंदू, मौलवी, गांधी, याच विषयावर लेख जिलेब्या, चकल्या, कविता पाडलेल्या दिसतात. याच विषयावर कोणी तावातावाने समर्थन करतो तर कुणी विरोध करीत बसतो. बरे यावर प्रतिक्रिया सुद्धा भरपूर येत असतात कारण तेच मर्यादित लोक्स दिवसभर भांडत बसलेले असतात.. इतक्या चर्चा असल्या निरर्थक धाग्यावर होत असतात जितक्या लोकसभा राज्यसभा किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यालयात देखिल होत नसाव्यात.
काही लोक या असल्याच धाग्यांची वाटच पाहत असतात. रोज सकाळी उठून बघावे तर २-४ हे असले धागे आलेलेच असतात. या काही लोकांनी अक्खा मिपा राजकीय करुण सोडलय. बरे जे राजकीय धागे नाहीत तिथेही हे आपले राजकीय चिमटे प्रतिक्रियेच्या रुपात सोडत असतात.

आमच्या सारखे लोक जे चांगले लेखन, अनुभव, कविता भटकंती,विनोदी लेखन या विषयात रस घेतात, काहीतरी चांगले वाचायला मिळेल या अपेक्षेने मिपावर येतात त्यांचा चांगलाच हिरमोड होतोय.
बस झाले यार कंटाळ आलाय आता.

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

7 May 2018 - 12:56 pm | श्वेता२४

आता अनुभवाने आपल्याला असले धागे कोणते हे कळतेच. त्यामुळे असे धागे आपण वाचून नये. मिपावर अजुनही इतर विषयांवर लेखन येतेच आहे. आपण त्याचाच आस्वाद घ्यावा व अशा ठिकाणी व्यक्तही व्हावे.

प्रकाश घाटपांडे's picture

7 May 2018 - 3:13 pm | प्रकाश घाटपांडे

सहमत

शाली's picture

8 May 2018 - 1:47 pm | शाली

++१

जेम्स वांड's picture

7 May 2018 - 1:08 pm | जेम्स वांड

'जनातलं मनातलं' किंवा काव्य विभागात किंवा पाककृती विभागात कोणी राजकीय धागे काढलेत का?

मालकांनी त्या चर्चांसाठी 'काथ्याकूट' अन 'राजकारण' हे दोन विभाग काढून दिलेत अन त्यातच चर्चा निघते, मिपाच्या नव्या ले आऊट नुसार पाहिजे त्या विभागात एका टिचकीत जाता येते, कश्याला पाहता राजकीय विभाग इतका कंटाळा येतो तर? ,सरळ लेख-कविता इत्यादी टॅब वर जावा अन तुम्हाला आवडते ते वाचा, लोकांच्या अवडीनिवडीवर शंका घेणे बरे नव्हे, दोष मिपाचा नाहीये तर तुम्हाला नीट नॅव्हीगेशन जमत नाहीये हा असे असे वाटते.

अभिजीत अवलिया's picture

7 May 2018 - 1:28 pm | अभिजीत अवलिया

सहमत.

बिटाकाका's picture

7 May 2018 - 2:30 pm | बिटाकाका

संपूर्ण सहमत! वाचता येईना मिपा वाकडं :):).
----------------------------------
तसंही तथ्यहीन/विदाउट डेटा बोलायची सवयच जडत चालली आहे लोकांना. आता या घडीला मिपाच्या नवे लेखन लँडिंग पेजवर ७० धागे लिस्टेड आहेत. त्यातील ओढून ताणून उणेपुरे ७ धागेही राजकारण सदरात जाणारे नाहीत. म्हणजे १०%. बाकी ९० टक्के धागे दुरलक्षिण्याइतके आवडले नसावेत का? मुळात तथ्यहीन असल्याने हाच लेख एक जिलेबी वाटतोय. अर्थात आम्हाला मिपा आवडत असल्या कारणाने आम्ही हा लेखही उत्सुकतेने उघडून वाचलाच!
---------------------------------
राजकारणावर चर्चा करणारे लोक्स म्हणजेच अगदीच ह्या असतात हा नवीन ट्रेंड दिसतोय. ते तर असोच!

जेम्स वांड's picture

7 May 2018 - 2:42 pm | जेम्स वांड

तसंही तथ्यहीन/विदाउट डेटा बोलायची सवयच जडत चालली आहे लोकांना. आता या घडीला मिपाच्या नवे लेखन लँडिंग पेजवर ७० धागे लिस्टेड आहेत. त्यातील ओढून ताणून उणेपुरे ७ धागेही राजकारण सदरात जाणारे नाहीत. म्हणजे १०%. बाकी ९० टक्के धागे

प्रश्न धागा संख्या नसून, सतत राजकीय धाग्यांवर येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे कायम तेच सात धागे वर दिसणे असा आहे, कारण सर्वात नवी प्रतिक्रिया असणारा धागा सर्वात वरती असतो (नवे लेखन मध्ये)

पण,

नवे लेखन वर जायची गरजच नाही हे मिपाचे नवे लेआऊट माहिती असणाऱ्या माणसाला सहज कळेल, पाहिजे त्या टॅब मध्ये जाऊन त्या विषयसंबंधीत लेखन वाचण्याचा अतिशय सुलभ मार्ग उपलब्ध आहे.

बिटाकाका's picture

7 May 2018 - 2:54 pm | बिटाकाका

अगदीच तसंही नसतं ते

लेखकाचं म्हणणं तरी तसंच दिसतंय.

याच विषयावर लेख जिलेब्या, चकल्या, कविता पाडलेल्या दिसतात.
रोज सकाळी उठून बघावे तर २-४ हे असले धागे आलेलेच असतात.
-------------------------------------
याशिवाय, नियमित मिपा बघणार्याला माहित असतं कि एकच नाही तर अनेक वेगवेगळे धागे वेगवेगळ्या वेळी वर खाली होतच असतात. असं लक्षात ठेवून अमुक एक प्रकारचे धागे वर दिसतात वगैरे अजिबात तथ्याला धरून नाहीये. मागच्या आठवडाभरात तर खिलजींच्या एक दोन कविताही टॉप पाच मधेच होत्या. आता राजकारणाच्या धाग्यांनी पहिल्या नंबरवर किंवा गेला बाजार पहिल्या पाचात असू नये, तसे झाल्यास बाकीचे धागे दुर्लक्षिले जातात वगैरे कोणाचे मत असेल तर त्याला नाईलाज आहे.

सदानंद's picture

7 May 2018 - 3:08 pm | सदानंद

अगदी १००% सहमत.
चर्चा विकृती...!!

नाखु's picture

7 May 2018 - 4:50 pm | नाखु

थोडंसं काव्यात्मक आहे,म्हणजे काही धाग्यांवर संधीप्रकाश असतो तर काही पहाटेची लाली अता रात्र कुठे आणि सकाळ कुठे ते वाचकांनी ठरवायचे.

राजकीय विम्बल्डन (टेनिस) सामन्यांच्या लढती पाहीलेला नाखु वाचकांची पत्रेवाला

जेम्स वांड's picture

7 May 2018 - 6:00 pm | जेम्स वांड

बॉल कोर्टात आला की मी ह्या कोर्टात खेळतच नाहीये, बॉल निर्माता राष्ट्रद्रोही आहे, कोर्ट मार्क करणारे हलकट आहेत वगैरेच जास्त सुरू असते, तुम्ही असल्या पंचायतींसच सामने समजले वाटते बहुतेक.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 May 2018 - 5:50 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सतिशा, अरे अनेक अ-राजकीय धागे आहेत ना वाचायला. मेथीचे ठेपले आहेत,कोल्हापूरी भेळ आहे,पुणे-ते लेह लेखमाला वाचनीय आहे..चार्ली चॅप्लिनवर लेख आहे...
सध्या निवडणूकीचा मोसम असल्याने जरा जास्त राजकीय धागे येणार . १५ ते २० मे दरम्यान तर राजकीय चर्चांना जास्तच जोर येणार. "बघा ,मी सांगतच होतो.ते "सामान्य मतदारच नालायक... हा तर मोदींचा विजय्/पराभव.." असे सर्व काही तेव्हा असणार.
कर्नाटकात मुख्यमंत्री निवडला गेला की मग आपसूक राजकीय धाग्यांची संख्या/चर्चा तात्पुरती कमी होईल असे ह्यांचे मत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 May 2018 - 6:52 pm | राजेंद्र मेहेंदळे

हे असं बेअरींग सांभाळुन प्रतिक्रिया लिहिणं म्हणतो मी :)

नाखु's picture

8 May 2018 - 10:15 pm | नाखु

एकदा माई सार्वकालिन असल्याने बेअरींग (सदाहरित)सार्वकालिन असणं आवश्यक आहे.

अखिल मिपा माईलेखन साहित्य वाचन संघाचा किरकोळ सदस्य नाखु

सोमनाथ खांदवे's picture

10 May 2018 - 5:40 pm | सोमनाथ खांदवे

पाटील साहेब ,
उत्तर भारतीय सगळे न्यूज चॅनेल 24 तास राजकीय निरर्थक बातम्या ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली दाखवत असतात , आपण त्या बघत बसायचे नसते . मी स्वतः गेली चार पाच वर्षे कुठलेही न्यूज चॅनेल बघत नाही . टी व्ही वर इतर भरपूर मनोरंजक व ज्ञानवर्धक चॅनेल्स आहेत , आपल्या आवडी नुसार ती निवडायची असतात . तसच मिपा वर भरपूर वाचनाचा आनंद देणारे भरपूर पर्याय आहेत .

विजुभाऊ's picture

10 May 2018 - 7:24 pm | विजुभाऊ

सहमत आहे.
राजकीय धुराळा नावाचा विभाग सुरू करावा त्यात ज्याना रडायचे/ लढायचे त्यानी ते ते करावे.
सध्या लेख या विभागात इतके लिखान होते की कधीकधी आपण वाचायच्या आतच ते लेखन दिसेनासे होते.
सम्पादक दादानु यावर काही करता येईल का

तुम्ही जे म्हणताय तो वैताग बऱ्याच लोकांना आलाय, पण वरती जेम्स वांड यांनी म्हंटल्याप्रमाणे त्या धाग्यांवरती जाताच नाही, नळावरची भांडण बरी त्यापेक्षा. हा धागा शिफारस मध्ये का दिसतोय देव जाणे.

सतिश पाटील's picture

11 May 2018 - 10:15 am | सतिश पाटील

मिपावर वाचण्यासारखे चांगले धागे भरपूर आहेत, पण हे असले राजकीय धागे अणि प्रतिक्रिया म्हणजे जेवताना दाताखाली खड़े यावे .......
असो.