मराठी भाषा शिकणाऱ्यांना थेट व्हिडिओ चॅटद्वारे सरावाची सोय

Primary tabs

कौशिक लेले's picture
कौशिक लेले in तंत्रजगत
5 May 2018 - 6:17 pm

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेच्या सेवेत अजून एक उपक्रम. आता मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट ऑनलाईन व्हिडिओ चॅटद्वारे माझ्याशी बोलून मराठी बोलण्याचा सराव आणि शंका निरसन करता येईल. परस्परांच्या सोयीने वेळ ठरवून बोलता येईल. प्रायोगिक तत्त्वावर असल्याने सध्या हा उपक्रम मोफत ठेवत आहे.

Practice Marathi through live chat

संवादसत्रांची सुरुवात आजपासून झाली. दोन जणांशी बोललो. अजून दोन-तीन जण सरावासाठी उत्सुक आहेत. पुढच्या वीकेंडपासून एका अमेरिकन व्यक्तीशीही सराव सुरू करायचा आहे.

माझ्या ब्लॉगच्या द्वारे मी गेल्या ६ वर्षांपासून मराठी शिकवत आहे. पण थेट संवादातून शिकवण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेतो आहे. जर तुम्हाला अशाप्रकारे भाषा शिकण्या-शिकवण्याचा अनुभव असेल तर माझ्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी या माध्यमाबद्दल काही विशेष टिप्स असतील तरी सांगा .

मराठी शिकू इच्छिणारे तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक, सहकारी यांना याबद्दल जरूर माहिती द्या.

धन्यवाद,
कौशिक लेले

प्रतिक्रिया

काय काय नवनवीन प्रयोग करत असता तुम्ही!!!

भाषा शिकण्याचे चे व्हिडिओ आहेत युट्युबवर त्यामध्ये " learn ***** while you sleep" फार चांगली पद्धत वाटली. ते ४/५/६/७/८/१० तासांचेही असतात. त्या व्हिडिओंचे mp3 करून घेतलेत. लॅाक स्क्रीनमध्येही ऐकता येतात.

कौशिक लेले's picture

6 May 2018 - 10:24 am | कौशिक लेले

"काय काय नवनवीन प्रयोग करत असता तुम्ही!!!" ... आवडली ही प्रतिक्रिया आपल्याला. धन्यवाद

अभिनन्दन! काही काळानन्तर आपला अनुभव इतराना मि पा वर सान्गालच!!

कौशिक लेले's picture

6 May 2018 - 10:24 am | कौशिक लेले

धन्यवाद. हो नक्की सांगेन.

तुमच्या धडपडीचे कौतुक करावे तितके थोडे आहे. मनःपूर्वक शुभेच्छा!

कौशिक लेले's picture

6 May 2018 - 10:25 am | कौशिक लेले

आपण केलेले कौतुक बघून आनंद झाला. धन्यवाद

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2018 - 10:31 am | डॉ सुहास म्हात्रे

मराठी भाषेच्या विस्तारासाठी तुमचे सतत चाललेले नवनवीन प्रयत्न अत्यंत स्पृहणिय आहेत यात संशय नाही ! त्यासाठी तुमचे आभार व अभिनंदन !!

कौशिक लेले's picture

17 May 2018 - 10:12 pm | कौशिक लेले

धन्यवाद !

गामा पैलवान's picture

23 May 2018 - 1:51 am | गामा पैलवान

कौशिक लेले,

तुमच्या कल्पकतेस अभिवादन. तुम्ही जो ध्यास घेतला आहे त्यामुळेच तुम्हांस हे सगळं सुचतं. तुमच्यासारखे लोकं मराठीस परत ऊर्जितावस्था आणणार आहेत.

आ.न.,
-गा.पै.

कौशिक लेले's picture

25 May 2018 - 4:15 pm | कौशिक लेले

धन्यवाद. अशा कौतुकामुळे अजून हुरूप येतो नवनवीन काम करायला

छान उपक्रम आहे.. आपल्याला मदत हवी असल्यास मला विद्यार्थ्यांना सराव द्यायला आवडेल...

माझा नंबर - ९८५०८३१८३१

छान उपक्रम आहे.. आपल्याला मदत हवी असल्यास मला विद्यार्थ्यांना सराव द्यायला आवडेल...

माझा नंबर - ९८५०८३१८३१

कौशिक लेले's picture

25 May 2018 - 4:20 pm | कौशिक लेले

अरे वा. छानच. आपला सक्रीय पाठिंबा बघून आनंद झाला.
https://www.facebook.com/groups/learnmarathi.wid.bk
कृपया या फेसबुक ग्रुप जॉइन करता का? तिथे नवशिक्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन तुम्ही या कामात सुरुवात करू शकता.
फेसबुक वर आपलं नाव काय आहे? म्हान्जे तुम्ही जॉइन केलात की कळेलच. तुमचा नंबर मी लिहून घेतला आहे.

तुमच्या विद्यार्थ्यांना मदत हवी असल्यास मलाही याचा एक भाग व्हायला आवडेल.

कौशिक लेले's picture

25 May 2018 - 4:23 pm | कौशिक लेले

मलाही आवडेल जास्तीत जास्त मराठी लोक शिकणाऱ्यांच्या मदतीला पुढे आले तर.
https://www.facebook.com/groups/learnmarathi.wid.bk
कृपया या फेसबुक ग्रुप जॉइन करता का? तिथे नवशिक्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन तुम्ही या कामात सुरुवात करू शकता.
फेसबुक वर आपलं नाव काय आहे? म्हणजे तुम्ही जॉइन केलात की कळेल.