कर्नाटक विधानसभा निवडणुक - मे २०१८

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
24 Apr 2018 - 2:53 pm
गाभा: 

कर्नाटक विधानसभा निवडणुक १२ मे या दिवशी आहे. निकाल १५ मे या दिवशी जाहीर होतील. कर्नाटक विधानसभेत २२४ आमदार असून बहुमतासाठी ११३ आमदारांची गरज आहे.

कर्नाटकात ३ मुख्य पक्ष आहेत. काँग्रेस, भाजप व निधर्मी जनता दल. या तीन पक्षातच मुख्य लढत आहे. निजदचे फारसे आमदार निवडून येत नसले तरी दक्षिण कर्नाटक व म्हैसूर च्या आजूबाजूच्या भागातील वोक्कलिंग मतदारांमध्ये या पक्षाला चांगले समर्थन आहे. या निवडणुकीसाठी निजदने बसपशी युती केली आहे.

इतर सर्व राज्यांप्रमाणेच कर्नाटकमध्ये सुद्धा जातींचे प्राबल्य आहे. लिंगायत (१७%), वोक्कलिंग (१२%) या दोन प्रमुख जाती आहेत. त्या व्यतिरिक्त मुस्लिम मोठ्या संख्येने आहेत. दलित व ब्राह्मण यांचाही काही प्रमाणात प्रभाव आहे. केरळला लागून असलेल्या मेंगलोर मध्ये ख्रिश्चनांचा प्रभाव आहे. निजदचे अध्यक्ष देवेगौडा वोक्कलिंग आहेत. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा लिंगायत आहेत. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या मागासवर्गीय आहेत.

निजद पक्षाला मिळणारी बहुसंख्य मते वोक्कलिंगांची आहेत. मागील ३ निवडणुकीमध्ये या पक्षाची कामगिरी तिसर्‍या क्रमांकाची होती (२००४ मध्ये ५६ जागा, २००८ मध्ये २८ व २०१३ मध्ये ४०). भाजपने २००४ मध्ये ८०, २००८ मध्ये ११० तर २०१३ मध्ये फक्त ४० जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने २००४ मध्ये ६५, २००८ मध्ये ८० तर २०१३ मध्ये १२२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले होते.

मागील ८ दिवसात ३ वृत्तसंस्थांनी आपल्या मतदानपूर्व सर्वेक्षणाचे अंदाज जाहीर केले. त्यानुसार यावेळी कर्नाटकात अधांतरी विधानसभा येण्याची शक्यता असून कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही.

१) इंडिया टुडे - कार्वी

https://www.financialexpress.com/elections/karnataka-assembly-elections-...

१३ एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या या सर्वेक्षणानुसार काँग्रेस ९६ (९०-१०१), भाजप ८२ (७८-८६), निजद + बसप ३९ (३४-४३) व इतर ५ (४-७) जागा जिंकू शकतील.

२) एबीपी - सीएसडीएस

https://www.bloombergquint.com/politics/2018/04/23/karnataka-elections-a...

२३ एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या या सर्वेक्षणानुसार काँग्रेस ८८ (८५-९१), भाजप ९२ (८९-९५), निजद + बसप ३५ (३२-३८) व इतर ९ जागा जिंकू शकतील.

३) टाईम्स नाऊ - व्हीएमआर

https://www.hindustantimes.com/india-news/karnataka-assembly-elections-t...

२३ एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या या सर्वेक्षणानुसार काँग्रेस ९१, भाजप ८९ व निजद + बसप ४० जागा जिंकू शकतील.

या तीनही अंदाजात काही समान गोष्टी आहेत. त्या म्हणजे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. २ सर्वेक्षणांनी काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा दिल्या आहेत तर एका सर्वेक्षणानुसार भाजप काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळवेल. पण दोन्ही पक्षांनी मिळविलेल्या एकूण जागांमध्ये फारसा फरक नसेल. २०१३ मध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना तब्बल १२२ जागा होत्या तर उर्वरीत दोन पक्षांना प्रत्येकी ४० जागा मिळाल्या होत्या. म्हणजे प्रथम व दुसर्‍या क्रमांकाच्या पक्षांच्या जागांमध्ये खूप अंतर होते. परंतु यावेळी तितके अंतर असणार नाही असा अंदाज दिसतो. तीनही सर्वेक्षणांनी पुन्हा एकदा निजदला तिसर्‍या क्रमांकाच्या जागा दिल्या आहेत. जर दोनही पक्षांना बहुमत मिळणार नसेल तर निजदला किंगमेकर या नात्याने प्रचंड महत्त्व येईल.

निजदला किंगमेकर होण्याइतक्या जागा मिळणार असल्या तरी त्या पक्षाला त्याचा फायदा कितपत उठविता येईल याविषयी शंका आहे. २००४ मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत नसताना काँग्रेस (६५ जागा) व निजद (५६ जागा) मध्ये जेमतेम ९ जागांचा फरक होता. या संधीचा फायदा उठवून आपला मुख्यमंत्री करण्याची निजदला सुवर्णसंधी होती. परंतु निकाल लागताक्षणीच देवेगौडांनी आपले पत्ते उघड करून संधी घालविली. निकाल लागल्याच्या दिवशीच त्यांनी जाहीर केले की निजद कोणत्याही परिस्थितीत सरकार बनविण्यासाठी भाजपला पाठिंबा देणार नाही (भाजपला ८० जागा मिळाल्या होत्या). हे जाहीर करून देवेगौडांनी आपले इतर सर्व पर्याय स्वहस्ते बाजूला केले व त्यामुळे त्यांना नाईलाजाने काँग्रेसला पाठिंबा द्यावा लागला असता. देवेगौडांच्या जागी धूर्त मायावती असती तर मायावतीने कोणतीही घोषणा न करता दोन्ही पक्षांशी एकाचवेळी बोलणी करून डबलगेम खेळून शेवटी स्वतःच्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद मिळविले असते. २००४ मध्ये देवेगौडा या खेळात नक्कीच कच्चे ठरले.

२०१८ मध्ये सुद्धा देवेगौडा भाजपला पाठिंबा द्यायची सुतराम शक्यता नाही. अर्थात त्यांचा मुलगा कुमारस्वामी वडीलांना धुडकावून भाजपशी युती करू शकतो (२००६ मध्ये कुमारस्वामीने भाजपच्या पाठिंब्याने २० महिने मुख्यमंत्रीपद मिळविले होते). जर काँग्रेस-निजद संयुक्त सरकार स्थापन झाले तर नवीन सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या असणार नाहीत. सिद्धरामय्या पूर्वी निजदमध्येच होते. निजद सोडून काँग्रेसमध्ये गेल्याने देवेगौडांचा त्यांच्यावर राग आहे. त्यामुळे कॉंग्रेसला पाठिंबा देण्यासाठी सिद्धरामय्यांऐवजी नवीन मुख्यमंत्री आणायचा ही त्यांची प्रमुख अट असेल. २००४ मध्ये सुद्धा पाठिंबा देण्यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एम कृष्णा यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास भाग पाडले होते. त्यांनी आपले पत्ते नीट खेळले तर त्यांना कुमारस्वामीला मुख्यमंत्री करता येईल. काँग्रेसला सिद्धरामय्यांच्या जागी नवीन चेहरा आणण्यासाठी फारसे पर्याय शिल्लक नाहीत. त्यातल्या त्यात लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे हाच एक चांगला पर्याय होऊ शकेल. खरगे फारसे वादग्रस्त नाहीत व केंद्रात त्यांचे भाजपच्या नेत्यांशी उत्तम संबंध आहेत. त्यामुळे केंद्र-राज्य संबंध सुरळीत राहू शकतील. ते तयार नसतील तर कॉंग्रेसने धाडस करून नंदन नीलेकणींना मुख्यमंत्री करावे. २०१४ मध्ये नीलेकणी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुक लढवून पराभूत झाले होते. त्यांची कॉर्पोरेट कार्यक्षमता वादातील आहे. ते मुख्यमंत्री झाले तर सुशिक्षित मध्यमवर्गीय मतदारांमध्ये एक चांगला सकारात्मक संदेश जाईल (हाच वर्ग भाजपचा तगडा पाठीराखा आहे). अर्थात इन्फोसिसची जबाबदारी नुकतीच पुन्हा एकदा खांद्यावर घेतलेले निलेकणी परत राजकारणात येतील का याविषयी खात्री नाही. तसेच जातीय व धार्मिक ध्रुवीकरण होत असलेल्या कर्नाटकात नीलेकणी हा ब्राह्मण चेहरा कितपत तग धरू शकेल याविषयी शंका आहे.

सिद्धरामय्यांनी मागील ५ वर्षात मोठ्या प्रमाणात जातीय, प्रादेशिक व धार्मिक ध्रुवीकरण करून आपले आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. कन्नड भाषेची सक्ती, कर्नाटक राज्यासाठी वेगळा ध्वज, क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंती साजरी करणे, हिंदूंच्या हत्या करणार्‍या मुस्लिम गुन्हेगारांकडे दुर्लक्ष, लिंगायतांना वेगळा धर्म व अल्पसंख्याक अशी मान्यता अशा अनेक वादग्रस्त निर्णयांमुळे हिंदू-मुस्लिम व हिंदूंमधील विविध जातींमध्ये फूट पाडून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यात त्यांना कितपत यश येईल ते १५ मे या दिवशी कळेलच.

एकंदरीत सध्याच्या अंदाजानुसार कर्नाटकात कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळण्याची चिन्हे असून अधांतरी विधानसभा होण्याची व काँग्रेस-निजद यांचे संयुक्त सरकार एका नवीन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली येण्याची शक्यता आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जो सर्वाधिक मोठा पक्ष असतो, तो पक्ष नंतर लगेच होणार्‍या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तेवर नसतो असा १९८३ पासूनचा इतिहास आहे. यावेळी या इतिहासाची पुनरावृत्ती होते का हे बघण्यासाठी मे २०१९ पर्यंत वाट पहावी लागेल.

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

24 Apr 2018 - 3:34 pm | प्रसाद_१९८२

छान विश्लेषन, श्रीगुरुजी.
आता १५ मे ची वाट पाहणे आले.

84.00% of the population were Hindu, 12.92% were Muslim, 1.87% were Christian, 0.72% were Jains, 0.16% were Buddhist, 0.05% were Sikh and 0.02% were belonging to other religions and 0.27% of the population did not state their religion.[53]

संदर्भ

अर्थात उत्तर कर्नाटकात त्यांचे बाहुल्य असलेले काही जिल्हे आहेत, पण ते मोठ्या संख्येत (पूर्ण राज्यात) नाहीत. बाकी विश्लेषण उत्तम अन अभ्यासू आहे

माहितगार's picture

24 Apr 2018 - 5:58 pm | माहितगार

चांगले विश्लेषण . हे वृत्त अणि इतर वृत्त पाहील्या नंतर का कोण जाणे कर्नाटक भाजपा विभक्त , दिशाहीन आणि अकाली राजकीय युद्ध अकाली हरल्यासारखे वाटले.

अर्धवटराव's picture

24 Apr 2018 - 6:45 pm | अर्धवटराव

कर्नाटक निवडणुकीला धार्मीक रंग यायला लागल्यापासुन असच वाटतय.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Apr 2018 - 7:37 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सिद्दारामय्या सरकार परत निवडून येईल अशी चिन्हे आहेत. गेल्या २/३ वर्षात सरकारच्या 'अन्न भाग्य योजना' क्षीर भाग्य योजना यशस्वी झाल्या. ( http://www.thehindu.com/news/national/karnataka/anna-bhagya-ksheera-bhag...)
इंदिरा कँटिन(झुणका भाकर योजेनेसारखे!!) योजना बर्यापैकी यशस्वी झाली. एकंदरीत सरकारविरुद्ध क्षोभ्,राग वगैरे काही नाही असे दिसते आहे. राज्याच्या काही भागात भाजपावाल्यानी स्थानिकांना भडकावल्याने तेथे भाजपा मुसंडी मारेल असे ह्यांचे मत.. शिवाय भाजपावाल्यांकडे टिपू जयंती वगैरे सारखे मुद्दे आहेत ज्यांना फार महत्व नाही पण वॉट्स अ‍ॅप्, फेसबूकच्या माध्यमातून 'मुस्लिम कसे वाईट' प्रचार चालत असल्याने शहरी मध्यमवर्ग भाजपाला मतदान करेल असे वाटते.

जेम्स वांड's picture

24 Apr 2018 - 8:48 pm | जेम्स वांड

हा कायमच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे, अर्थात आता भाजप बाकी ठिकाणीही पक्षी ग्रामीण भागातही प्रचार कार्य करण्यावर जोर देतोच आहे असे वाटते.

मोदी प्रचाराला उतरायच्या आधीच समसमान परिस्थिती झालेली दिसतेय. सर्वात मोठा पक्ष भाजप असेल असे दिसते.

माहितगार's picture

24 Apr 2018 - 9:49 pm | माहितगार

ऐन वेळी मणि शंकर अय्यरांची कन्नड आवृत्ती मिळाली तर वारे नक्की फिरु शकतील

१०१% मिळणार. मिपावरचंच सँपल थोडं काँसंट्रेट करून काँग्रेसमधे वापरतात.

फेसबूकच्या माध्यमातून 'मुस्लिम कसे वाईट' प्रचार चालत असल्याने

???

डँबिस००७'s picture

24 Apr 2018 - 9:37 pm | डँबिस००७

कर्नाटकात भाजपच विजयी होणार आहे !!

जनतेची २०१९ ची पुर्व तयारी चालु आहे ! जनता २०१९ ला मोदीजींनाच निर्विवाद निवडणुका जिंकुन देणार आहे.
मोदींवर देशातील १००% जनतेचा विश्वास आहे. ह्या विश्वासाला सार्थ ठरवत मोदीजी देशाला पुढे नेण्याच काम सुरुच ठेवणार !!

मोदींवर देशातील १००% जनतेचा विश्वास आहे. ह्या विश्वासाला सार्थ ठरवत मोदीजी देशाला पुढे नेण्याच काम सुरुच ठेवणार

मग कशाला घेता निवडणुका? फालतूचा खर्च उगी?
देशातील सोडा, इथे मिपावर 100 टक्क्याचा दावा सिद्ध करा. आयुष्यभर सिध्देश्वर पाटणकराच्या कवितांचे पारायण करिन.
अर्थात तसे असले तर मिपावर दुसरे काय दिसणार म्हणा. ;)

विशुमित's picture

25 Apr 2018 - 12:01 am | विशुमित

भक्तांना नवा देश सापडला की काय??
मोदींना (आय मिनि भाजप) म्हानाव 50 काय 100 वर्ष राज्य करा.

जसा नेहरूला सापडला होता? तेवढं लक प्रत्येकाचं नसतं बाबा!

विशुमित's picture

25 Apr 2018 - 7:12 pm | विशुमित

भावड्या लंका तू लगेच कच खाऊ नको ना!

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 7:22 pm | मार्मिक गोडसे

तो लकी माणूस भावड्याच्याच लाडक्या पक्षाचा परंतू भावड्या जाम जळतो त्या माणसावर, आणि ढकलतो त्याला विरोधी पक्षात.

जेम्स वांड's picture

25 Apr 2018 - 5:32 am | जेम्स वांड

आयुष्यभर सिध्देश्वर पाटणकराच्या कवितांचे पारायण करिन.

काय हे, पाटणकर भलताच अर्थ घेऊन चेकाळतील अन आयुष्यभर खरेच मिपावर भज्यांचा घाणा पाडत बसतील.

(फक्त झ्याटलिंग भजीपाव चाहता) वांडो

Super Excited Boy

बिटाकाका's picture

25 Apr 2018 - 7:52 am | बिटाकाका

अभ्या आणि जेम्स वांड साहेब, पाटणकरांचे वैयक्तीक नाव घेऊन इथे ट्रोलिंग करणे पटले नाही. मला वाटले म्हणून सांगितले.

अभ्या..'s picture

25 Apr 2018 - 8:37 am | अभ्या..

ना तो त्यांचा आयडी आहे, ना सिद्ध झालेले आहे. त्यांचा आयडी खिलजी हा आहे सो आपण जरा निवांतच राहणे काका, ट्रोल अलर्ट अजून आम्ही द्यायला सुरू केला नाही. देईन तवा पुराव्यासह देईन.
बादवे ते कागलकराचा उद्धार चाललेला तवा नाही जागृत झाला हा अलर्टनेस? सिलेक्टिव्ह आहे काय?

जेम्स वांड's picture

25 Apr 2018 - 9:11 am | जेम्स वांड

बिटाकाका यु टू ब्रूटस? ते स्वतःच स्वतःच्या धाग्यांखाली 'सिद्धेश्वर विलास पाटणकर' असे स्वाक्षरी रुपी नाव टाकत असतात. त्यामुळे नाव घेऊन अभ्याने/मी काही फार भयानक ट्रोलिंग केले आहे असे मला वाटत नाही. तरीही तुमच्या सदिच्छा सूचनेचा सन्मान. हीच निस्पृहता तुम्ही अभ्या म्हणतंय तसं कागलकरांचं नाव घेऊन ट्रोल करताना आढळणाऱ्या लोकांना चार समजुतीचे शब्द सांगताना दाखवाल ही विनंती.

बिटाकाका's picture

25 Apr 2018 - 10:01 am | बिटाकाका

माझी सगळ्यांकडूनच अपेक्षा नाहीये. माझ्या थोड्या काळाच्या वास्तव्यात काही आयडींबद्दल विशेष आदराचे नाते बनले आहे (त्यांची मते, लिखाण पाहून). तिथे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. नाही आवडले तर द्या सोडून. तुम्हाला अपेक्षित असेल तर दिलगिरी व्यक्त करण्यास माझी ना नाही.

जेम्स वांड's picture

25 Apr 2018 - 10:06 am | जेम्स वांड

हेच ओळखलं का पुतण्याला? ऑ? तुम्हाला तर हक्कचे कान धरायचा, फक्त सगळ्यांचे धरा इतकी विनंती होती, दिलगिरी वगैरे बोलून आम्हाला कश्याला लहान करताव मालक.

(सुर्रर्रर्र पुतण्या) वांडो

अभ्या..'s picture

25 Apr 2018 - 10:38 am | अभ्या..

दिलगिरी बिलगिरी नको काका, आमचाकडून अपेक्षा आहेत हैत हेच लै झाले.
बाकी ते ट्रोल अलर्ट बिलर्ट असल्या फालतूगिरीत इंटरेस्ट नाही. आक्खी जिंदगी फोडाफोड करून तेढ वाढवणारे ट्रोल म्हणून दुसर्याकडे बोटे दाखवायला लागले तर अक्खा मिपा ट्रोलांचाच अड्डा होईल.
सो आरामसे घ्या. आदर असला तरी चांगलेच आहे, नसला तरी उत्तम आहे. आम्हाला मंगू जितका प्यारा आहे तितकेच श्रीगुर्जी.

आक्खी जिंदगी फोडाफोड करून तेढ वाढवणारे ट्रोल म्हणून दुसर्याकडे बोटे दाखवायला लागले

हम्म, खेद वाटला.
*******************************************
आम्हालाही सगळे सदस्य म्हणून सारखेच, प्रत्येकांच्या मतांशी देणे घेणे - इतर कशाशीही नाही. काही आदरणीय आयडींना कुणी ट्रॉल म्हणू नये म्हणून सांगायचा प्रयत्न केला, जसा खाली इतरांना सांगायचा केला होता. अनावधानाने तुमच्या वाचनात आला नसेल पण तुमच्याआधी त्यांना सांगायचा प्रयत्न झाला आहे एकदा.
http://www.misalpav.com/comment/992095#comment-992095
********************************************
असो.

जेम्स वांड's picture

25 Apr 2018 - 11:09 am | जेम्स वांड

आम्हाला मंगू जितका प्यारा आहे तितकेच श्रीगुर्जी.

जियो!

कागलकरांचं नाव घेऊन ट्रोल करताना

कागलकर काय प्रकरण आहे?

जेम्स वांड's picture

25 Apr 2018 - 3:40 pm | जेम्स वांड

पण तुम्ही परत तुमचं पॅराडाइम शिफ्ट थिंकिंगचा बाजार मांडायला त्यावरही भाकभाक काय तर लंबचवडं लिहाल अगम्य, असो!, हे पातक आपल्याच्याने होणारे नाही :D

विशुमित's picture

25 Apr 2018 - 7:13 pm | विशुमित

भावाला खासगीत सांगतो.

जेम्स वांड's picture

25 Apr 2018 - 7:25 pm | जेम्स वांड

पाटलांची मर्जी ! :D

कपिलमुनी's picture

25 Apr 2018 - 12:10 am | कपिलमुनी

Vote Share of different parties in the election.

BJP (31.0%)
INC (19.3%)
BSP (4.1%)
AITC (3.8%)
SP (3.4%)
AIADMK (3.3%)
CPI(M) (3.3%)
BJD (1.7%)
SS (1.9%)
TDP (2.5%)
Other (25.7%)

बाकी चालू द्या !!

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2018 - 12:12 am | श्रीगुरुजी

याचा इथे काय संबंध?

बिटाकाका's picture

25 Apr 2018 - 8:00 am | बिटाकाका

"देशातील जनतेचा १००% विश्वास आहे" आणि "देशातील १००% जनतेचा विश्वास आहे" यातील फरक (नॉन-भाजप) भक्तांना कळतो की नाही अशी शंका चाटून गेली. असो....

बिटाकाका's picture

25 Apr 2018 - 8:04 am | बिटाकाका

आणि भाजप भक्तांना पण...त्यांच्या २०१४ च्या मतदानात ३-४% फरक जरी झाला तरी ते हरू शकतात.
**********************
तसेही १००% जनता मतदान करत नाही, त्यामुळे मतदानाची टक्केवारी तर अजूनच चुकीची आहे या संदर्भात...

कपिलमुनी's picture

25 Apr 2018 - 9:16 am | कपिलमुनी

मराठी मध्ये 100% लोकांचा विश्वास आणि लोकांचा 100% विश्वास यात फरक असतो .

(संपादित)

जेम्स वांड's picture

25 Apr 2018 - 10:15 am | जेम्स वांड

गोड बोलून रट्टे मारायची कला नसेल त्यांना अवगत इतरांसारखी, शेवटी गोड बोला का कडवट बोला मुद्दा फक्त रट्टे मारणे इतका असतो, त्यांना तरी काय दोष द्यायचा ढवळ्या शेजारी पवळ्या बांधलाय वाण नाही तर गुण लागणारच, बिटकाकांचा इतका वाईट पाणउतारा केल्याबद्दल निषेध. सन्माननीय काकांनी एकदातरी कोणाचा पाणउतारा केला असल्याचं दाखवून द्यावं हे माझं चॅलेंज आहे कपिलमुनींस

manguu@mail.com's picture

25 Apr 2018 - 8:46 am | manguu@mail.com

Shining India वाल्याना म्हणूनच हाकलले होते.

आता Ruining India वाल्यांचा नंबर .

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2018 - 8:56 am | श्रीगुरुजी

Ruining India वाल्यांना २०१४ मध्येच हाकलून लावलंय.

जेम्स वांड's picture

25 Apr 2018 - 9:21 am | जेम्स वांड

मिपावरील मातब्बर फक्त हिडीसफिडीस करून घाण पाणउतारा सतत करत असताना विनोदबुद्धी (ती पण बोचरी) जागृत ठेवतं राव ह्ये बेनं. कधीकधी फिस करून हसायला येतं कॉमेंट्स वर, मंगुल्याच्या मोदीविरोधाला आमच्याजवळ स्थान नाही पण म्हणून मंग्याला वैयक्तिक बोलणे पण जमणार नाही!. मंग्या भाजप प्रवक्ता असता तर मजा आली असती राव.

ROFLMAO

manguu@mail.com's picture

25 Apr 2018 - 9:35 am | manguu@mail.com

सगळ्या पृथ्वीचे राज्य मिळाले तरी हिंदुत्वाच्या गटात मी कधीही जाणार नाही .

जेम्स वांड's picture

25 Apr 2018 - 9:56 am | जेम्स वांड

म्हणून शिव्या खातोस मंगुल्या! अर्थात तुम्हांस शिव्या देणारे कमी रिजिड नाहीत पण त्यांना स्वतःची कमीज सफेत असल्याचे आकांडतांडव करून सिद्ध करवून घेता येतं इतकंच! असो, तूर्तास तरी मोदी सोडून देशाला समर्थ पर्याय नाहीये हे आमचे तरी ठाम मत आहे (आमची बी रिजीडीटी) त्यामुळे २०१९ मध्ये हरहर मोदी घरघर मोदी परत होवो हीच आमची मनःपुर्वक इच्छा.

... ही कुणाची जहागीर?

जेम्स वांड's picture

25 Apr 2018 - 10:11 am | जेम्स वांड

अल्लाताला, जिझस ह्यांची

अन आपल्यासाठी फक्त न फक्त एकमेवाद्वितीय मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची!

।।रामलला आएंगे मंदिर वही बनाएंगे।। _/\_

सगळ्या पृथ्वीचे राज्य मिळाले तरी हिंदुत्वाच्या गटात मी कधीही जाणार नाही .

का हो?
हिंदुत्वात असं काय वाईट आहे असं विचारायचं नाहीय, इतकी विरक्ती कोठून शिकलीत असं म्हणायचं आहे.

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2018 - 2:29 pm | श्रीगुरुजी

सगळ्या पृथ्वीचे राज्य मिळाले तरी हिंदुत्वाच्या गटात मी कधीही जाणार नाही .

घेतंय कोण हिंदुत्वाच्या गटात? तिथे येण्यासाठी एक किमान पात्रता लागते. ते येरागबाळ्याचे काम नोहे.

arunjoshi123's picture

25 Apr 2018 - 2:36 pm | arunjoshi123

ती कोणती?

arunjoshi123's picture

25 Apr 2018 - 2:27 pm | arunjoshi123

कपिलमुनी,
प्रत्येक कुत्र्याला आपला भुभुत्कार झाला की सगळ्या गल्लीतून सर्व बाजूंनी भुभुत्कारच भुभुत्कार ऐकू येण्याचा अनुभव असतोच, पण ते असो.
=============================
लोक जेव्हा मत देतात तेव्हा ते त्यांचे त्यावेळेसचे सर्वोच्च प्राधान्य असलेल्या व्यक्तिस वा पक्षास देतात. कोणा एका पक्षास सर्वोच्च प्राधान्य असणे म्हणजे कोण्या अन्य पक्षाचा विरोध असणे असं होत नाही.
आपण जी आकडेवारी देताहात त्यात आपण असं सुचित करताहात कि ६९% लोकांना मोदी पसंद नाहीत, इ इ. पण असं नाही, मोदी पसंद नसणे हेच जर सर्वोच्च प्राधान्य असतं तर ३१% पेक्षा जास्त मते अजून एका सबल पक्षास देण्यासाठी ते एकवटले असते. पण असं नाही. मोदी या ६९% केवळ पहिले प्राधान्य नाहीत.
हेच सोनिया गांधींचे आहे, ८१% लोक त्यांना नापसंद करतात असं नाही. त्या या ८१% लोकांच्या द्वितीय वा त्यामागचे प्राधान्य आहेत.
=================
काही जातींचे, धर्मांचे, विचारसरणींचे लोक ठरवून एखाद्या पक्षास हारवण्यासाठीच मतदान असे सत्य असेल, पण लोकशाहीय मतदानाच्या मूल्यमापनात तसा निष्कर्ष ठामपणे काढता येत नाही. पक्षीय निष्ठा तीव्र असलेले नेतेलोक देखील पक्षबदल करतात, युत्या करतात. हे हेच सुचित करते की त्यांचा देखील विरोध नसतो, प्राधान्यक्रम असतो. भारतातल्या अनेक राज्यांत अनेकदा अनेक प्रकारच्या पक्षांचे राज्य राहिले आहे तरी देखील तुलनात्मक दृष्ट्या लोकांच्या परिस्थितीत फारसा फरक नाही, त्यामुळे किमान सध्याला तरी भारतीय लोकांना कोणा एका पक्षाबद्दल असाधारण प्रेम वा असाधारण द्वेष आहे असे म्हणणे तितके सयुक्तिक वाटत नाही.

कपिलमुनी's picture

25 Apr 2018 - 2:53 pm | कपिलमुनी

काका , वरती प्रतिसाद नीट वाचत चला ,
१०० % लोकांना मोदी हवे आहेत असे लिहिले आहे म्हणून आकडेवारी दिली आहे . त्यात सूचित वगैरे काहि करायचा नाहि. सूचित करायचा असता तर तसा स्पष्ट लिहिला आसता. उगा अंगावर येउ नका. आधि सगळ वाचत जावा .
लोकशाही मधे १०० कोटी पैकि १० लोकांनी मतदान करून एखादा निवडून आला तरी ते वैध आहे हे महिती आहे . त्याचा प्रॉब्लेम नाही . फक्त १०० % लोकांना भाजपा हवे आहे अशा डींग्या हाकणार्‍यांसाठि तो प्रतिसाद होता .

स्वाक्षरी : - इजा बिजा आणी तिजा : एक भाकरी टाकली की तिघेही जण धावत येतात !

arunjoshi123's picture

25 Apr 2018 - 3:12 pm | arunjoshi123

चिल कपिलमुनी चिल.
त्यांनी १००% हा आकडा दिला त्याच्या उत्तरादाखल तुम्ही ३१% हा आकडा दिला.
===============
बाकी भाकरी मला लै आवडते.

कर्नाटक निवडणूक: विधानसभेत पॉर्न पाहणाऱ्या आमदारांना पोर्न जनता पार्टीने पुन्हा एकदा दिली संधी !

पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या भाजपाने सभागृहातच पॉर्न पाहताना पकडल्या गेलेल्या तीन आमदारांना पुन्हा एकदा कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे तिकिट दिले आहे. त्यामुळे भाजपावर चहूबाजूंनी टीका होत असून विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे. भाजपाने नुकतीच सात उमेदवारांची यादी जाहीर केली त्यामध्ये हे तीन आमदार आहेत. ज्यांना २०१२ मध्ये कर्नाटक विधानसभेत पॉर्न पाहताना पकडण्यात आले होते.

(संपादित)

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2018 - 1:02 pm | श्रीगुरुजी

बलात्कार प्रकरणात आरोपी असलेल्या एका खांग्रेसीला २००९ व २०१४ मध्ये लोकसभेचे तिकिट मिळाले होतेच की. २००० कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या खांग्रेसींचे २०१९ चे तिकीट नक्की आहे.

(संपादित)

तुम्ही तसले नाहीत म्हणौनच लोकांनी तुम्हाला बसवलंय ना? का प्रत्येक गोष्टीत बरोबरिच करायची आहे?

बिटाकाका's picture

25 Apr 2018 - 1:32 pm | बिटाकाका

का प्रत्येक गोष्टीत बरोबरिच करायची आहे?

अजिबात नाही करायला पाहिजे. भाजपने त्यांना द्यायलाच नव्हते पाहिजे तिकीट.
-----------------------------------------
पण, जर एखाद्या पक्षाला नावे ठेवण्यासाठी हा निकष असेल तर तो सगळ्यांना लावावा लागेल ना? ते रेशन कार्ड प्रकरण न विसरता आआप ला ठोकून काढावं लागेल आणि तो पक्ष हि इतर पक्षांसारखा फालतू म्हणावा लागेल. ते होत नाही. सगळेच आपापल्या आवडत्या पक्षाला पाठिंबा द्यायच्या नादात दुटप्पी भूमिका घेतात.
------------------------------------------
एक पक्ष म्हणून अशा लोकांना तिथले तिकीट नाही दिले तर दुसरे लोक निवडून येतील का हा विचार पक्षाने करायचा कि नाही? जर तिथले लोक त्याच माणसाला निवडून देणार असतील तर पक्षाने आपली सीट गेली तरी चालेल हि भूमिका सध्याच्या भारतीय राजकारणात व्यवहार्य आहे का?

अभ्या..'s picture

25 Apr 2018 - 1:47 pm | अभ्या..

मस्तच बिटाकाका,
माझे तर ह्यापेक्षा प्रगत मत आहे, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा राजकारणात सगळेच क्षम्य असते असे धरून चाला, शुचिता बिचिता काय नको. हाय तसे प्रेझेंट व्हा. कशाला प्रचार अन झाइराती. कशाला इलक्षणात लाखो अब्जोचा चुराडा. सरकार जे लोक इलक्षणाला उभारतील त्यांची लिस्ट प्रकाशित करेल. पब्लिक वाटेल त्याला मत देईल. जो निवडून येईल त्याला पण कुणी विचारायचे नाही. केला विकास तर राव्हा नायतर जावा.

बिटाकाका's picture

25 Apr 2018 - 2:39 pm | बिटाकाका

राजकारणात सगळेच क्षम्य असते

काय क्षम्य असते हे जनतेने डिक्टेट करावे. उदाहरणार्थ, काँग्रेसने आणि निजदने यांनी पॉर्न क्लिप पहिल्या असा प्रचार करावा. जनतेने पॉर्न पाहणारे नको म्हणून त्यांना पाडावं. मग पुन्हा हे पक्ष ते उमेदवार उभे करतील का पाहणे रोचक ठरेल. पण ते जिंकले तर....तर तिथेच तर मेख आहे.
------------------------------------------------

कशाला इलक्षणात लाखो अब्जोचा चुराडा. सरकार जे लोक इलक्षणाला उभारतील त्यांची लिस्ट प्रकाशित करेल. पब्लिक वाटेल त्याला मत देईल.

हे काही कळले नाही. सध्याही पब्लिक वाटेल त्याला मत देते. पक्षांचे सोडले तर सरकारचे कोणालाही मत देता यावे यासाठी जवळजवळ ८ ते ९ हजार कोटी जातात.

arunjoshi123's picture

25 Apr 2018 - 2:34 pm | arunjoshi123

सहमत आहे.
=================
भाजप जोपर्यंत लहान पक्ष होता तोपर्यंत "अति अति शुद्ध" राहणं शक्य होतं. आता ते शक्य नाही. अन्य पक्षांशी लक्षणीय भेद असावा, पण सोवळेपणाची गरज नाही. भारतीय जनमानसाची प्रतिमा पक्ष वाढेल तशी त्याच्यात उमटणारच. सोवळेपणाची अपेक्षा करत टिका करणारे लोक पक्षाचे अजूनच नुकसान करत आहेत.
=======================
ज्या देशातील भ्रष्टाचाराचे स्वरुप व्यक्तिगत नसून व्यवस्थांतर्गत आहे त्या देशात स्वच्छ राजकारणाची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे.

जेम्स वांड's picture

25 Apr 2018 - 3:02 pm | जेम्स वांड

ज्या देशातील भ्रष्टाचाराचे स्वरुप व्यक्तिगत नसून व्यवस्थांतर्गत आहे त्या देशात स्वच्छ राजकारणाची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे

आवडलं आपल्याला हे विश्लेषण

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 3:40 pm | मार्मिक गोडसे

ज्या देशातील भ्रष्टाचाराचे स्वरुप व्यक्तिगत नसून व्यवस्थांतर्गत आहे त्या देशात स्वच्छ राजकारणाची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे.
अगदी बरोबर.

arunjoshi123's picture

25 Apr 2018 - 2:51 pm | arunjoshi123

कपिलमुनी,
दरवेळेस आवाहनकर्त्याच्याच स्पेसिसचा प्राणी धाडला जाणे आवश्यक आहे का? ते असो.
==========================
https://www.oneindia.com/bengaluru/watching-porn-assembly-in-public-even...
चला तन्वीर सैतची जागा गेली म्हणायचं का?
============================
पुरोगाम्यांचे आगळे विश्वः
१. पॉर्न पाहणे योग्य.
२. पॉर्न बंदी अयोग्य.
३. पॉर्न हानिकारक म्हणणे मूर्खपणा
४. असेंब्लित पॉर्न पाहणे वाईट.
५. सरकारी समारंभाच्या व्यासपीठावर पाहणे योग्य.
=====================
https://www.thenewsminute.com/article/bjps-amit-malviya-tweets-video-cas...
मुख्यमंत्री लाइव पॉर्नस्टार आहेत.

कपिलमुनी's picture

25 Apr 2018 - 2:57 pm | कपिलमुनी

असेंब्लित पॉर्न पाहणे वाईट की चांगले ?

arunjoshi123's picture

25 Apr 2018 - 3:03 pm | arunjoshi123

पॉर्न पाहणे वाईट असं व्यक्तिगत मत आहे. त्यावर बंदी असावी असं देखील मत आहे. पण बंदी आणल्यावर सगळ्या पुरोगाम्यांनी जो कांगावा केला तो पाहता:
=====================
जर पॉर्न पाहणे वाईट नसेल तर असेंब्लित पाहणे देखील वाईट नाही.

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2018 - 6:20 pm | टवाळ कार्टा

जर पॉर्न पाहणे वाईट नसेल तर असेंब्लित पाहणे देखील वाईट नाही.

people get what they deserve

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2018 - 3:07 pm | श्रीगुरुजी

https://www.thenewsminute.com/article/bjps-amit-malviya-tweets-video-cas...
मुख्यमंत्री लाइव पॉर्नस्टार आहेत.

बापरे, असा माणूस यांचा मुख्यमंत्री आणि त्याला दोन मतदारसंघातून तिकिट!!!!!

यांच्या नेत्यावरही बलात्काराचे आरोप असताना त्याला २००९ आणि २०१४ मध्ये तिकिट दिले होते. तोच नेता २००० कोटी रूपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी असून सध्या त्याला जामिनावर सोडला आहे. सध्या हा यांचा स्टार प्रचारक आहे व २०१९ मध्ये हा यांचा नेता असणार आहे.

(संपादित)

विधानसभेत पॉर्न पाहणाऱ्या आमदारांना पोर्न जनता पार्टीने पुन्हा एकदा दिली संधी !

असेंब्लित पॉर्न पाहिलं (वय १८ पेक्षा जास्त आहे.) हा निकष असू शकतो का उमेदवारी नाकारण्याचा?
आणि पॉर्न पाहिलं मंजे काही पडद्यावर सगळ्यांना दाखवलं नाही. चोरून पाहिलं.
===================
ह्याच नियमानं राहुल गांधी संसदेत झोपला म्हणून त्याची उमेदवारी का कँसल करू नये?

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2018 - 6:19 pm | टवाळ कार्टा

ह्याच नियमानं राहुल गांधी संसदेत झोपला म्हणून त्याची उमेदवारी का कँसल करू नये?

आहे ती करावीच आणि परत १ टर्म साठी बॅन करावे....आपण आपल्या ऑफिसात कामे न करता झोपलो तर चालेल का?

संपूर्ण लेखात केवळ जाती नि धर्मांचा उल्लेख आहे. यात लेखक म्हणून श्रीगुरुजींना दोष द्यावा कि आजच्या भारतीय राजकारणाचे वास्तव म्हणून विषाद करावा यांच्यात निर्णय करता येत नाहीये. भारताच्या राजकारणाचे वास्तव असेल तर नरेंद्र मोदींचे अपयश आहे, कारण निवडणूका जातीधर्मांपलिकडे नेऊ इच्छीणारे ते स्वतंत्र भारतातील एकमात्र नेतृत्व आहे.

जेम्स वांड's picture

25 Apr 2018 - 3:47 pm | जेम्स वांड

कधी अन कसे नेणार म्हणे जाती पलीकडे राजकारण मोदी साहेब? मोदीजी सध्याचा बेस्ट पर्याय हा तर माझाही मुद्दा आहेच पण तुम्ही वर म्हणालात तसे भाजप आता लहानसहान पक्ष उरलेला नाही. त्यामुळे भाजपने टोटल शुचिर्भूत असण्याचा प्रयत्न सोडून द्यावा, विरोधकांनी भाजपची प्रयत्नपूर्वक तयार केलेली 'शेटजी भटजीचा पक्ष' ही इमेज मोडून काढायला भाजप स्वतःला 'ओबीसी हितरक्षक पक्ष' म्हणून पुढे आणतोय, त्यात शहा साहेबांना जबरी यश लाभत असून बसलेलं मृगाजीन बुडाखालून ओढावं तसा ते आता ओबीसी सपोर्ट काँग्रेस कडून भाजपकडे वळतोय असे वाटते. यश मिळत असले तर जातीपातीचे राजकारण भाजपने सोडावे ही अतिशयोक्त मागणी असेल. असो!

१. माणसाच्या अस्मिता सरकारी कागदांवरील व्याख्यांनी बदलत नाहीत. ओपन, एस्सी, एस्टी, ओबीसी, मायनॉरीटी नावाच्या भारताच्या परंपरागत अस्मिता नाहीत. ओबीसी नावाची तर अस्मिता अत्यंत ढिली आहे. सोनारांचं आणि सुतारांचं प्रेम कायदे बदलले म्हणून बदलत नाही. सोनाराला सुतारही तितकाच दूरचा आणि गुप्ताही तितकाच दूरचा.
२. नीट डोळे उघडून पाहिलं तर दिसेल कि शेटजी भटजीचा पक्ष नेहमी काँग्रेस हाच होता. आजही आहे. पक्ष रोडावला आहे म्हणून त्यांचं नेतृत्व इतरत्र गेलेलं नाही. अगदी १९४७ मधे शेटजीला राष्ट्रपिता केलेला आणि भटजीला पंतप्रधान. कोणता पक्ष कोणाचा हे सांगणारी माध्यमे खोटारडी आहेत.
३. नविन पिढी (ब्राह्मण पुरोगाम्यांच्या विळख्यात आलेले दलित आणि मुस्लिम सोडून, आणि भारताचा मध्ययुगीन इतिहास जास्त वाचलेले सवर्ण सोडून) जातीवर, इ मत देत नाही. बिहार, आसामात मुस्लिम बहुल मतदारसंघात भाजपला प्रचंड मते मिळालीत. (हे पुरोगाम्यांचे फार मोठे दुखणे आहे.). इतकेच काय अलिकडे मुस्लिम मतदाते भाजपला हारवणे या एकमात्र सर्वोच्च प्राधान्यासाठी अजिबात मतदान करत नाहीत. जवळजवळ प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक जातीची मते प्रत्येक पक्षाला वाटून वाटून मिळत आहेत.
४. मोदी आपल्या भाषणांत कधीच ते शिसारी आणणारे "हिंदू, मुस्लिम, शीख ,...." चे उच्चार वारंवार करत नाही.

नीट डोळे उघडून पाहिलं तर दिसेल कि शेटजी भटजीचा पक्ष नेहमी काँग्रेस हाच होता. आजही आहे. पक्ष रोडावला आहे म्हणून त्यांचं नेतृत्व इतरत्र गेलेलं नाही

बरोबर! नेहरू पासून ते गोविंद वल्लभ पंत ह्यांच्यापर्यंत ब्राह्मणांनाच चान्स जास्त दिलाय काँग्रेसने, अपवाद फक्त मराठी ब्राह्मण कारण त्यात गांधीहत्या अन १९४८ची जाळपोळ अँगल येतो.

जोशी, थोडा विचार करता असे वाटते की भटजींचा सर्वात मोठा पक्ष तर साक्षात भारतीय कम्युनिस्ट पक्ष अन त्याची ऑफशूट आहेत. आजवर ह्या दलितांचा/मुस्लिमांचा कैवार घेणाऱ्या पक्षात किती दलित अन मुस्लिम 'पॉलीट ब्युरो सभासद' होते ह्याची उत्तम चिरफाड करणारा एक लेख मध्यंतरी वाचला होता, दुर्दैवाने त्याची लिंक आत्ता हाताशी नाही नाहीतर मजा आली असती वाचायला!.

या पार्श्वभूमीवर जन्माने ब्राह्मण नसलेल्या मोदींना पंतप्रधान बनू देणारा, बनवणारा तसेच अनंत मोदीभक्त ब्राह्मणांची फौज उभी करणारा रा स्व संघ मला बर्‍यापैकी जातसेक्यूलर वाटतो.

जेम्स वांड's picture

25 Apr 2018 - 5:16 pm | जेम्स वांड

संघशक्ती युगे युगे म्हणतात ते काही उगाच नाही.

लफडं काय एकच आहे मोदीभक्त ब्राह्मण फौजेत ९९.९९% लोकं भावनिक ड्रीफ्ट मध्ये वाहतात, pragmatism बऱ्यापैकी गायब असते, मोदी नॉन ब्राह्मण, ब्राह्मण (युपी, उत्तराखंड हे अपवाद सोडले तर) वोट बँक वगैरे नाही, त्यामुळे भाजपला ब्राह्मण लोकांचे इतके जास्त प्रेम नाहीये, हे ही फौज लक्षात घेत नाही. अर्थात ह्याचा अर्थ ब्राह्मणांनी मोदींना सपोर्ट करू नये असा काढला जाऊ नये, साक्षात स्वतःची हाडे दान करणाऱ्या दधिचीमुनींचा आदर्श ठेवायला हरकत नसावी, एरवी जात म्हणून ब्राह्मणांचं भाजप वर प्रेशर आहे किंवा ब्राह्मण फार मोठा प्रेशर गृप आहे (वरील अपवाद सोडून) हे स्वप्न ब्राह्मण दिवसाढवळ्या पाहणे सोडतील तो सुदिन.

मराठी कथालेखक's picture

11 May 2018 - 5:05 pm | मराठी कथालेखक

कारण निवडणूका जातीधर्मांपलिकडे नेऊ इच्छीणारे ते स्वतंत्र भारतातील एकमात्र नेतृत्व आहे.

वाचून मनोरंजन झाले.. धन्यवाद

पैसा's picture

25 Apr 2018 - 6:44 pm | पैसा

या धाग्यावर एक आयडी लोकांना कुत्रे म्हणत आहे. Disgusting.

जेम्स वांड's picture

25 Apr 2018 - 7:37 pm | जेम्स वांड

वरतून अजून अश्लाघ्य प्रकार म्हणजे एकाने तुम्हाला कुत्रा म्हणल्यावर त्याला वळून कुत्रा म्हणणे, हे म्हणजे तू गाढवाचे शेण खाऊन माझ्यावर थुंकतोस तर मीही खेचराचे खाऊन तुझ्यावर थुंकणार अश्यातली गत वाटते, किंवा कुत्रं तुम्हाला चावलं तर उलट कुत्र्याला चावण्याचा प्रकार वाटतो, ग्रेसफुली फाट्यावर मारणे ही कला एकंदरीतच मराठी आंतरजालावरून लुप्त पावते आहे का काय! किती ती खुमखुमी एकमेकांची भोंड जिरवायची, श्या!

Sad crying smiley face

बिटाकाका's picture

25 Apr 2018 - 9:12 pm | बिटाकाका

संपादकांनी दुसऱ्या एका धाग्यावर कुणाचातरी गुलाम की काय शब्द उडवला म्हणजे संपादक आहेत पण इथे ते फिरकले नाहीत.
*********************
टॉमी मोती वगैरे बोलणाऱ्या सभासदांना मी सुज्ञ आयडी समजत होतो पण हाय रे दैवा....वैचारिक पातळी खूप खालची दिसली वरच्या प्रतिसदांमध्ये. आणि एकदा नाही तर परत परत दिसली. जर संपादक लक्ष देत नसतील तर काय भूमिका घ्यावी बरे? म्हणजे जाऊद्या म्हणून सोडून द्यावे?

बिटाकाका's picture

25 Apr 2018 - 10:45 pm | बिटाकाका

धन्यवाद संपादक मंडळी, फेथ रिस्टोअर्ड!

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2018 - 6:18 pm | टवाळ कार्टा

या धाग्यावर एक आयडी लोकांना कुत्रे म्हणत आहे. Disgusting.

असहमत....कोणीही दुसर्याला कुत्रे म्हटलेले नाहीये

पैसा's picture

26 Apr 2018 - 6:39 pm | पैसा

सगळा हिंदी सिनेमा संपल्यावर पोलीस येतात तसे तुम्ही आलाव.

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2018 - 7:57 pm | श्रीगुरुजी

=))

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Apr 2018 - 8:00 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

प्रचाराला मिसळपाववर जोर चढला असला तरी कर्नाटकात अजून मोदींच्या सभा अजून सुरू झालेल्या नाहीत. असो.
बेळगावी-गदग मतदारसंघांमध्ये मजा आहे. तेथील (कु)प्रसिद्ध जारकीहोळी कुटुंब- अनेक साखर कारखाने,शैक्षणिक संस्थांवर मालकी आहे. कुटुंबाताले दोघे कॉंग्रेसमध्ये तर एक जण भाजपामध्ये तर आधी कुणीतरी जनता दलात. गेले २० वर्षे जारकीहोळी कुटुंबातील सदस्यच निवडून आला पाहिजे हे बघितले जाते.! मग तो जनता दलाचा असो,वा कॉण्ग्रेसचा वा भाजपाचा.
आणी मिसळपाववर 'तो खांग्रेसी तर तो भक्त' अशी भांडणे चालू असतात.!
http://www.newindianexpress.com/states/karnataka/2018/apr/09/in-belagavi...

जेम्स वांड's picture

25 Apr 2018 - 10:49 pm | जेम्स वांड

समतोल कारवाई बद्दल मनःपूर्वक अभिनंदन अन आभार

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 10:52 pm | मार्मिक गोडसे

संमं चे आभार.

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2018 - 6:22 pm | टवाळ कार्टा

अभ्याश्री कधीपासून अश्या धाग्यांवर बॅटिंग करायला लाग्ला??? पिंका मात्र बर्या टाकतो =))

राहुल गांधी यांनी गळ्यात क्रॉस आणि शिवलिंग घालून हिंदू मंदिरांमध्ये नमाज अदा करावी.

सुखीमाणूस's picture

26 Apr 2018 - 11:40 pm | सुखीमाणूस

त्याना मुसलमानांना गोन्जरयची, ख्रिश्चन लोकाना आन्जारयची सवय!
काँग्रेस म्हनजे अल्पसन्ख्यान्कान्चा मसीहा. ते देवळात गेले तर साक्षात इन्द्रदेवान्चे आसन डळमळायला लागेल.. सेक्युलर धाय मोकलून रडतील..
पण कल्पना मस्त आहे. करतील हे राजकारणी कांहीही करतील...

श्रीगुरुजी's picture

2 May 2018 - 8:19 am | श्रीगुरुजी

http://voiceofbengaluru.com/post/838/

वरील वृत्तानुसार खांग्रेसी जाहीरनाम्यातील काही प्रमुख आश्वासने -

- 4% reservation to minority Muslims in Government appointments

- The State government has introduced various developmental schemes to promote and uplift minority communities such as Muslims, Buddhist, Jains, Christians, Sikhs, and Parsis to bring them on par with other communities

- To reduce the dropouts among 60,000 minority students, we propose construction of 1000 Maulana Azad schools

- We will setup Maulana schools in every taluk

- Madrasa board will be established to manage affairs of Madrasas regarding employment, self-employment and skilling

- Support WAQF by developing their 300 commercially potential properties in the next five years and Constitution of Wakf Properties Development Corporation

- Soft loans will be provided to minorities to set up quality education institutions through KMDC upto Rs. 5 Crores for those institutions who provide collateral security at 4% interest

- Insurance Scheme to cover the health and children’s education of minority Auto and Taxi drivers

arunjoshi123's picture

2 May 2018 - 4:17 pm | arunjoshi123

- To reduce the dropouts among 60,000 minority students, we propose construction of 1000 Maulana Azad schools

साठ पोरांची एक शाळा मंजे लक्झरी आहे कि राव.

काँग्रेसचा एवढाच जाहीरनामा आहे का ?

वरील वृत्तानुसार खांग्रेसी जाहीरनाम्यातील काही प्रमुख आश्वासने ->>
==>> तिकडे आमच्या भावाचा "नालयाकसत्ता" हा शब्द संपादित केला पण "खान्ग्रेस्स" शब्द संपादक मंडळाच्या डोळ्याखालून गेला नाही का ?

इथून पुढे ज्याला पक्षीय ओकाऱ्या काढायच्या आहेत त्याने आपल्या स्वतःच्या भिंतीवर कराव्यात. मिपा हे सभ्य लोकांचे संकेतस्थळ आहे.
सं.मं ला विनंती आहे त्यांनी हा शब्द संपादित करावा आणि सदस्याला विशेष समज देऊन कारवाई करावी.
====
मालकाची विशेष सूचना:
बरेचदा असे लक्षात आले आहे की काही मिपा सदस्यं हे एका पक्ष विशेष बाबत कायम लिहीतात. ते तसे लिहून थांबत नाहीत तर त्यांच्या विरोधी विचारसरणीच्या लोकांच्या प्रतिक्रियांवर योग्य उत्तर न देता. अवांतर किंवा त्यांना त्रास देणे असे वागतात. अश्या सर्व सदस्यांनी ही जाहीर आणि सामायिक सूचना आहे की त्यांनी हे असे करने थांबवावे अन्यथा कुठल्याही पुर्वसुचनेशिवाय त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मिपा हे कुठल्याही एका पक्षाचे मुखपत्र नाही किंवा कुठल्याही एका ठराविक विचारसरणीचे समर्थक नाही. येथे मराठी भाषेवर प्रेम करणार्‍या लोकांना एकत्रित येता यावे आणि त्यांना व्यक्त होता यावे यासाठी हा प्रयत्न आहे. आपणासर्वांकडून याबाबत दक्षता घेतली जावी अशी अपेक्षा आहे.
====

मालकांच्या संपादनांचा आणि विशेष सुचनेचा काही एक संबंध नाही. एक चायना बॉर्डर आहे एक पाकिस्तान.
===================
बा द वे, संस्थळास अमान्य असणार्‍या सर्व शब्दांची एक सूची मिळाली तर बरं होईल. नालायक हा एक सामान्य शब्द आहे असा आमचा समज होता.

<<मालकांच्या संपादनांचा आणि विशेष सुचनेचा काही एक संबंध नाही. एक चायना बॉर्डर आहे एक पाकिस्तान.>>>
==>> काहीही हा भावा. काहीतरी अगम्य लिहायचे आणि हरणे दाखवायची तुझी जुनी खोड मला माहित आहे.

<<<बा द वे, संस्थळास अमान्य असणार्‍या सर्व शब्दांची एक सूची मिळाली तर बरं होईल.>>>
==>> मी तरी एक सुचवलं आहे खान्ग्रेस्स= काँग्रेस, बाकी इतरांनी सुचवत राहा. वाटल्यास कोणीतरी सेपरेट धागा काढा.

<<<नालायक हा एक सामान्य शब्द आहे असा आमचा समज होता.>>>
==>> तुझ्यासाठी म्हणून तर प्रतिसाद टाकला.

काहीतरी अगम्य लिहायचे

आभार.

नालायक हा शब्द असांसदिय नसावा निश्चितच.
काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर १७ मेच्या लोकसत्तेतील संपादकियाचे शिर्षक होते: 'नालायकांचे निर्दालन'
कुठल्याही पक्षाला एवढा खरपूस मार पडलेला त्यानंतर किंवा पुर्वीही पाहिले नाही. अपवाद: रझा अकादमीने केलेल्या दंगलीनंतर राष्ट्रवादी पक्ष आणि मुस्लिम मूलतत्ववादी यांच्याविरोधात आलेला अग्रलेख, 'अधर्मवादी राष्ट्रविरोधी'.

मार्मिक गोडसे's picture

2 May 2018 - 12:17 pm | मार्मिक गोडसे

चांगली गोष्ट आहे की मग.

कोणता शब्द अधिक शोधला जातो या बद्दल हिंदी किंवा इंग्रजीतील आंतरजालीय तौलनीक शोध काही वेळा फसवे असू शकतात, , जसे नरेंद्र मोदींबद्दलचे इंग्रजी शोध हे केवळ पतप्रधानपदावर असल्यामुळे भारत देश विदेशातून नाव शोधल्याने सुद्धा नाव शोधले जाऊ शकते पण कन्नड लिपीतल्या मधल्या sh शोधात
शब्दांच्या स्थानिक लोकप्रयतेचा अल्प अंदाज येण्यास मदत होऊ शकते .

खाली नावांचे कन्नड रूपांतर देता आहे

सिद्धरामय्या ( कर्नाटकचे सध्याचे काँग्रेस मुख्यमंत्री ) ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ

गुगल ट्रेंड निळा रंग रेषा आलेख

येडियुरप्पा (कर्नाटक माजी मुख्यमंत्री भाजपा ) ಬಿ.ಎಸ್. ಯಡಿಯೂರಪ್ಪ

गुगल ट्रेंड लाल रंग आलेख रेषा

देवेगौडा ( कर्नाटक माजी पंत प्रधान जनता दल एस ) ಹೆಚ್.ಡಿ.ದೇವೇಗೌಡ

गुगल ट्रेंड पिवळ्या रंगाची आलेख रेषा

राहुल गांधी ( काँग्रेस अध्यक्ष पंतप्रधान इच्छूक ) ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ

गुगल ट्रेंड हिरव्या रंगाची आलेख रेषा

सोनिया गांधी (माजी काँग्रेस अध्यक्ष ) ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ

गुगल ट्रेंड जांभळी रंग आलेख रेषा

नरेंद्र मोदी ( सध्या पंतप्रधान भाजपा ) ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ

गुगल ट्रेंड नुसार सिध्दरामय्या वर मग राहुल गांधी बाकी सर्व सपाट दिसताहेत , (कन्नड भाषा विकिपीडिया ट्रेंड कदाचित वेगळा आहे तो थोड्याच वेळात देण्याचा प्रयत्न करतो ) गुगल ट्रेंड मध्ये नाव लेखना मध्ये बदल करून पाहिल्यास जरासा फरक पडू शकतो मला कन्नड लिपी येत नसल्याने मी फारसे प्रयत्न केले नाहीत इतर कुणास येत असल्यास प्रयत्न अथवा क्रॉसचेक करावे उपरोक्त कन्नड चुकल्यास चूभूदेघे

https://trends.google.com/trends/explore?date=today%201-m&q=ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ,ಯಡಿಯೂರಪ್ಪ,ದೇವೇಗೌಡ,ರಾಹುಲ್%20ಗಾಂಧಿ,ನರೇಂದ್ರ%20ಮೋದಿ

हे आलेख दुवे अथवा चित्र मला नीट शेअर करता आलेले नाही , इतर कुणी मदत केल्यास स्वागत असेल

माहितगार's picture

11 May 2018 - 3:39 pm | माहितगार

गेल्या ३० दिवसांसाठीचा आलेख निवडला आहे .

माहितगार's picture

11 May 2018 - 4:01 pm | माहितगार

हा कन्नड विकिपीडिया पेज व्ह्यू दुवा आहे

https://tools.wmflabs.org/pageviews/?project=kn.wikipedia.org&platform=a...ಬೆಕ್ಕು|ನಾಯಿ

सध्याचे ಬೆಕ್ಕು|ನಾಯಿ शब्द ( उंदीर । मांजर ) काढून स्पेस देऊन खालील लेखांचे शब्द टाकून पाहावे लागतील

खाली नावांचे कन्नड रूपांतर देता आहे

सिद्धरामय्या ( कर्नाटकचे सध्याचे काँग्रेस मुख्यमंत्री ) ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ

येडियुरप्पा (कर्नाटक माजी मुख्यमंत्री भाजपा ) ಬಿ.ಎಸ್. ಯಡಿಯೂರಪ್ಪ

देवेगौडा ( कर्नाटक माजी पंत प्रधान जनता दल एस ) ಹೆಚ್.ಡಿ.ದೇವೇಗೌಡ

राहुल गांधी ( काँग्रेस अध्यक्ष पंतप्रधान इच्छूक ) ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ

सोनिया गांधी (माजी काँग्रेस अध्यक्ष ) ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ

मोदी ( सध्या पंतप्रधान भाजपा ) ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ

पेज व्ह्यू क्रमांक
क्रमांक १ मोदी (आलेख रेषा पोपटी)
क्रमांक २ सिद्ध रामय्या ( आलेख रेषा गुलाबी लाल )
क्रमांक ३ येडियुरप्पा (आलेख रेषा पिवळी ऑरेंज )
क्रमांक ४ देवेगौडा (आलेख रेषा जांभळी )
क्रमांक ५ राहुल गांधी (आलेख रेषानिळी )
क्रमांक ६ सोनिया गांधी (आलेख रेषा ऑलिव्ह ग्रीन )

माहितगार's picture

11 May 2018 - 4:04 pm | माहितगार

कन्नड गूगल शोध आणि कन्नड विकि पेज व्ह्यूज मधील मोठ्या फरकाचे कारण तेवढे लक्षात आले नाहीत -सहसा एवढा फरक पडत नाही - पण गूगल ट्रेन्ड अधिक व्यापक म्हणून अधिक विश्वासार्ह वाटतो .

श्रिपाद पणशिकर's picture

13 May 2018 - 1:43 am | श्रिपाद पणशिकर

चला नावनोंदणि सुरु झालिय.
EVM च्या नावाने ज्यांना ज्यांना गळा काढायचा आहे चला बिगि बिगि नाव नोंदवा.

राजमान्य राजश्रि नव तरुण बुध्दिवादि नेते ह्यांच्या बँ कॉक प्रवासाचे तिकिट बुक झाले असेलच.

रडणार्या रुदालि आणि रडे वाहिंन्यावर जमतिलच.

कोणाला जास्त त्रास झाल्यास डॉ. घुंघरूसेठ ह्यांचे चालते फिरते मोहल्ला क्लिनिक, चिल्लम ऐ सर कुप्ता ह्या पँथॉलॉजिस्ट सोबत असेलच. काळजी नसावि.

डँबिस००७'s picture

13 May 2018 - 11:16 am | डँबिस००७

सहीये !!

प्रसाद_१९८२'s picture

13 May 2018 - 11:55 am | प्रसाद_१९८२

चला नावनोंदणि सुरु झालिय.
EVM च्या नावाने ज्यांना ज्यांना गळा काढायचा आहे चला बिगि बिगि नाव नोंदवा.

<<
बहुदा ह्याची वेळ या निवडणुकीत विरोधकांवर येणार नाही.
कारण निवडणुक आयोगाने ह्या निवडणुकीत VVPAT मशीन सर्वत्र लावल्या होत्या.

काही नाही. ९९ झालेले दिसले. म्हणून आमच्यातर्फे फूल ना फुलाची पाकळी म्हणून एक प्रतिसाद. :-D