भारत बायकांसाठी अवघड देश आहे ...

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
16 Apr 2018 - 9:40 am
गाभा: 

भारत बायकांसाठी अवघड देश आहे ..... आणि ह्याचं मूळ आपल्या विचारसरणीत आहे.

हि दोन विधाने पिलीयन रायडर यांच्या दुसर्‍या एका धागा प्रतिसादातून घेतली आहेत . शीर्षकात पहिले वाक्य वापरले तरी चर्चेचा मुद्दा दुसरे वाक्य आहे. तिकडे त्यांनी एलॅबोरेट केलेले नाही तरी दुसरे विधान मला अंशतः मान्य आहे पण सरसकट मान्य नाही परस्त्री कडे आदराने पहाण्या बद्दलचे सुसंस्कारही ह्याच भारतीय भूमीत केले जातात. पण एनी वे

१) विचारसरणीत कोणते बदल व्हावेत असे तुम्हाला वाटते ?

२) स्त्री अत्यचारांवर रिअ‍ॅक्ट करणारे अनेक , स्त्री स्वातंत्र्य आणि संबांधीत स्त्रीयांच्या स्वाभीमानापलिकडे जाऊन , शुचिता आणि कौटूंबीक , समुह, जात, धर्म, भाषा इत्यादी ओळखींच्या स्वाभीमानावरुन रिअ‍ॅक्ट होत नाहीत ना अशी साशंका वाटते असे असणे स्त्री स्वातंत्र्य आणि स्वाभीमान विषयक सकारात्मक विचार सरणीस कितपत पोषक आहे ?

३) प्रत्येक घटना घडल्या नंतर शीक्षा वाढवा शीक्षा बदला किंवा विना चौकशी शिक्षा द्या अशा मागण्या होताना दिसतात , कायदा व्यवस्थे पलिकडे जाऊन पुरुषांवरील सामाजिक संस्कार हा विषय चर्चेत कमी येतो , शिक्षा स्वरुप बदलत जाणे पुरेसे आणि स्त्री
स्वातंत्र्यास खरेच पोषक असते का ? पुरुषांवरील सामाजिक संस्कार यात काय बदल व्हावेत ?

४) ह्या विषयावर सामाजिक राजकीय दबाव निर्माण करण्या एवढ्या चर्चा निश्चतच गरजेच्या आहेत , पण अती चर्चांनी तेही स्वातंत्र्यास बाधा न आणता सुरक्षा कशी वाढवावी या वर फोकस नसणार्‍या पोकळ चर्चांनी स्त्रीयांमध्ये भितीचे वातावरण निर्मिती होत नाही ना ? भिती चे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून चर्चांचे स्वरुप
कसे असावे ?

* आता वरचे धागा शीर्षक आहे , ते कमतरतांकडे लक्ष्य वेधण्यास यशस्वी होते पण ते सुरक्षेची भावना निर्माण करते का ? किंवा भिती च्या वातावरणाची निर्मिती करणारी जोड देणार नाही हे कसे पहायचे ?

* माझी एक धागा चर्चा स्त्री पोषाख, स्त्री-पुरुष संबंध आणि (अ)सुरक्षिततेचा सांभाळ
दुवा ज्यात चर्चेसाठी काही प्रश्नही दिले आहेत त्यांचा येथील चर्चेत काही उपयोग होत असल्यास पहावे . किंवा त्या धाग्यावर लिहायचे असल्यास हरकत नाही.

* या चर्चेत सहभागी अत्याचारांची निखालस निंदाकरतात असे गृहीत धरले आहे . त्यामुळे इमोशनल बाजू पेक्षा वैचारीक बाजूने चर्चा या धाग्यात अभिप्रेत आहे.

* दुसर्‍या देशांशी तुलना अभिप्रेत नाही , आपल्या देशात काय सुधारण्णा असाव्यात यावर फोकस असावा .

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

16 Apr 2018 - 11:09 am | प्राची अश्विनी

व्यवस्थित मांडणी असलेला धागा.

अंतरा आनंद's picture

16 Apr 2018 - 11:33 am | अंतरा आनंद

चांगला आणो व्यवस्थित मांडलेला चर्चाविषय.

परस्त्री कडे आदराने पहाण्या बद्दलचे सुसंस्कारही ह्याच भारतीय भूमीत केले जातात

या ऐवजी स्त्रीकडे माणूस म्हणून पहाण्याचे संस्कार केले जात नाहीत हे या दुखण्याचं मूळ आअहे. कारण तिला मखरात बसवायचं मग ती चुकली की तिचा न्यायनिवाडा करायचा आणि अर्थातच मान सन्मान हा तिला व्यक्ती म्हणून न असता एक देवीरुपिणी म्हणून असतो. यामुळे येणारी बंधनं, इच्छा मारण्याची अदृष्य सक्ती हे तोंड दाबून बुक्कयाचा मार दिल्यासारखं होत. 'तिच्या अमूकतमूक वागण्याने आदर गेला' हे कोणीही गयागुजरा सहज म्हणू शकतो आणि आपल्या परिनं तिला शिक्शाही देऊ शकतो.

वेळेअभावी हे एवढंच. नंतर अजून लिहीन.

गामा पैलवान's picture

16 Apr 2018 - 6:15 pm | गामा पैलवान

वरील प्रतिसादांतला 'माणूस' म्हणजे काय? इथे 'पुरुष' अभिप्रेत आहे का?

तसेच 'निवाडा' म्हणजे काय? आणि तो केल्यावर बायकांचं काय बिघडतं? समजा काही बिघडलंच तर बायका त्या निवाड्यास फाट्यावर का मारंत नाहीत?

-गा.पै.

माहितगार's picture

18 Apr 2018 - 8:25 am | माहितगार

@ अंतरा आनंद
तुमच्या कडून अधिक मते जाणून घेणे आवडेल. चर्चेस कदाचित उपयोगी होईल म्हणून एक प्रश्न

नात्यांमध्ये आदराची भावने बद्दलचे संस्कार असे म्हणायचे आहे. आधी बहीणीच्या नात्याची महती अधिक होती आता मैत्रीच्या नात्याची महती वाढते आहे. समस्या नात्यांबद्दलच्या महतीत आहे की शुचिता बद्दलच्या महतीत आहे असे वाटते.

प्रश्ना बद्दल मीही क्लिअर आहे असे नाही . इतराम्नी त्यात सुधारणा सुचवण्याचे स्वागत आहे .

या ऐवजी स्त्रीकडे माणूस म्हणून पहाण्याचे संस्कार केले जात नाहीत हे या दुखण्याचं मूळ आअहे.

हे एक तद्दन हास्यास्पद विधान आहे.
---------------------------------------
माझ्याकडे कोणी भारतीय म्हणून पाहिले तर मी त्याला "माझ्याकडे मनुष्य म्हणून (आणि केवळ तितके आणि तितकेच) पाहा" असे सांगणार काय? स्त्री कडे स्त्री म्हणून पाहण्यात मनुष्य म्हणून पाहणे अंतर्भूत आहेच. पुढे वर्गिकरणच करू नका ही अट विक्षिप्त आहे.
======================================

कारण तिला मखरात बसवायचं मग ती चुकली की तिचा न्यायनिवाडा करायचा आणि अर्थातच मान सन्मान हा तिला व्यक्ती म्हणून न असता एक देवीरुपिणी म्हणून असतो. यामुळे येणारी बंधनं, इच्छा मारण्याची अदृष्य सक्ती हे तोंड दाबून बुक्कयाचा मार दिल्यासारखं होत.

अगदी सुस्पष्ट राक्षशीणीसारखं वागलं तर कोणताही मार सहन करावा लागणार नाही. स्त्रीयांना देवी म्हणत असले तरी त्यांनी देवींसारखं वागावं अशी मूर्खांचीही अपेक्षा नसते. ती एक म्हणायची पद्धत असते.
-----------------------
हेच विधान ब्राह्मणांबद्दलही खरे नसावे का? त्यांना देखील देव मानतात. मग बंधनं, इच्छा मारणं इ इ आलं.
=================================
आधुनिक संस्कृतीत कोणतेही संस्कार केले जात नाहीत. म्हणून बलात्कार होतात. त्याचं खापर जुन्या संस्कृतीत देवी म्हणून पाहायला शिकवायचे या संस्कारावर फोडायचे कारण नसावे.

पुरुषांच्या शारीरिक व मानसिक गरजांची परिपूर्ती नवीन सामाजिक आर्थिक सरंचनेत होत नसावी
त्यामुळे आपले frustration तुलनेने सॉफ्ट टार्गेट असलेल्या स्त्री मुली यावर काढणे त्याचबरोबर ढासळत चाललेली न्याय व पोलीस यंत्रणा त्याची भीती, न्यायदानात होणारा विलंब, त्यात होणारी फरफट, ह्यामुळे अशी भावना स्त्रियांची होणे स्वाभाविक आहे

माहितगार's picture

18 Apr 2018 - 8:37 am | माहितगार

...पुरुषांच्या शारीरिक व मानसिक गरजांची परिपूर्ती नवीन सामाजिक आर्थिक सरंचनेत होत नसावी

अधिक नेमके पणाने मांडता येईल, खासकरुन नवीन संरचना म्हणजे काय अभिप्रेत आहे ? कारण शारीरिक व मानसिक गरजांची परिपूर्ती या नाण्याला दुसरी बाजूही असते . हवा तोच जोडीदार मिळण्याची आणि तयार असण्याची शक्यता बहुतांश वेळा नसते तरीही पूर्ण परिपूर्ती न झालेले सर्व जण अपमार्ग वापरत नाही

पॉझीटीव्ह एंगेजमेंट्सच्च्या साधनांची अधिक उपलब्धता जसे कि खेळ परिस्थिती बदलू शकेल का ? कारण परिपूर्ती न होताही कशात तरी गुंतवून घेतलेल्यांची अपमार्गास न जाणार्‍ञांची संख्या मोठी असते .

अत्याचार झालेल्या स्त्रिया हया जर विवाहयोग्य म्हणजे17 ते 25 या वयोगटातील असतील तर त्यांना न्यायालयात हेलपाटे घालण्यापेक्षा प्रकरण परस्पर बाहेर मिटविणे जास्त सुकर वाटते
अशा अवस्थेत सामान्य माणसाला हतबलता अनुभवायला मिळून त्याचे मत लेखाचा शीर्ष प्रमाणे होऊ शकते

माहितगार's picture

18 Apr 2018 - 8:39 am | माहितगार

असे आहे का ? असेल तर या मुद्यावर चर्चेस अधिक स्कोप असावा .

श्वेता२४'s picture

17 Apr 2018 - 5:42 pm | श्वेता२४

भारतीयांच्या विचारसरणीतच याचे मूळ आहे. आणि याला केवळ पुरुषच नाही तर स्त्रियासुद्धा जबाबदार आहेत असं मला वाटतं. यौनशुचिता ही पुरुष व स्त्रियांच्या मानत इतकी घट्ट बसलिय तीच मुळात बदलणं गरजेचं आहे. इथे मला एक वेगळाच मुद्दा मांडायचाय. तसेच मी केवळ बलात्कार या मुद्याच्या अनुषंगाने बोलत आहे. देश कुठलाही असो, कायदे नियम सर्वत्र अस्तित्वात असतानाही स्त्रियांवर बलात्कार होतात. सगळेच पुरुष वाईट नसतात तसेच कोणतेच आई-बाप मुलांवर वाईट संस्कार करत नाहीत तरीही या घटना घडतात याचा अर्थ संस्कारांपेक्षाही त्या व्यक्तीची मनावृत्तीच याला कारणीभूत आहे. अशी मनोवृत्ती कोणतेही संस्कार बदलवू शकत नाहीत असं मला वाटतं (कदाचित माझी धारणा चुकीचीही असेल). त्यामुळे स्त्रियांनीच (व शक्य असल्यास पुरुषांनीही) यौनशुचितेबद्दलचे निष्कारण जोखड झुगारुन द्यावे. बलात्कार हा एखाद्या अपघाताइतकाच सामान्य समजला गेला पाहिजे. अपघातामुळए जशा शरीरावर व मनावर झालेल्या जखमा भरुन येतात व काही काळाने का असेना ती व्यक्ती सर्वसामान्य आयुष्य जगू शकते तसे बलात्कारीत व्यक्तीला जगता आले पाहिजे. समाजातल्या सर्व स्त्री व पुरुषांनी अशीच धारणा ठेवली तर कोणत्याही बलात्कात पिडीतेला सर्वसामान्यपणे लग्न करता येऊन सामान्य आयुष्य जगता येईल. अर्थातच हे कठुआ किंवा उन्नाव प्रकरणात लागू होणार नाही याची मला जाणीव आहे. तसेच लहान मुलगी असली तरी आता आईने तीला विश्वासात घेऊन शरीरसंबंधांबद्दल माहिती दिली पाहिजे तसेच लहान मुलिंना स्वसंरक्षणाचे धडे पालकांनी देण्याची सोय करावी. माझे हे विचार परिपूर्ण आहेत असा माझा मुळीच दावा नाही. तरीपण असं असावं असं वाटतं.

माहितगार's picture

18 Apr 2018 - 8:50 am | माहितगार

प्रतिसादातील विचारांशी बर्‍यापैकी सहमत , बहुतेक मिपाकर ह्या मुद्यावर अद्याप खुल्या मनाचे आहेत का कारण पुरेशी चर्चा या मुद्यांच्या ओघाने होताना दिसत नाही.
शुचितेच्या मुद्द्या सोबत स्त्रीलाच दोषी ठरवण्याचा प्रकार जोडलेला असतो तो बाजूस ठेऊन स्त्रीच्या निवड स्वातंत्र्यास महत्व आणि निवड स्वातंत्र्याचा आदर या बाबत सामाजिक जागृतीची गरज असावीच पण सोबत विवीध कथासूत्रांचा narrative समाज मनावर मोठा प्रभाव असतो, स्त्रीच्या निवड स्वातंत्र्यास महत्व आणि निवड स्वातंत्र्याचा आदर निर्माण करणार्‍या पर्यायी कथा सूत्रांची रचना आणि प्रसारण टिव्ही धारावाहीके आणि चिरपटाच्या माध्यमातून
करणे आणि त्यातील सध्याच्या कथासूत्रांची उपरोक्त मुद्यांच्या आधारे चिकित्साही महत्वाची असावी असे वाटत

चित्रगुप्त's picture

17 Apr 2018 - 10:47 pm | चित्रगुप्त

अलिकडे बलात्कारांच्या संख्येत आणि त्यातील निर्घृणपणात जी वाढ झालेली दिसून येत आहे, त्यामागचे एक महत्वाचे कारण जे असावे असे वाटते, त्याकडे फारसे कुणी लक्ष दिल्याचे दिसत नाही.
हल्ली प्रत्येकाच्या खिशात मोबाईल, त्यात अगदी स्वस्त इंटरनेट आणि त्यामुळे केंव्हाही, कुठेही, कितीही पोर्न बघण्याची झालेली सोय, यामुळे शाळकरी मुलापासून ते तथाकथित थोर आदरणीय स्वामी बापू इ. पर्यंत काही पुरुषांमधील बेछूट सुटलेली कामांधता ... हे एक महत्वाचे कारण असावे. काट्याने काटा निघतो तसे आधुनिक तंत्राज्ञानानेच यावर मात करण्यासाठी सरकारने नेट संबंधी जास्तीत जास्त कठोर निर्बंध घालणे अगत्याचे आहे. भलेही यामुळे तथाकथित व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आल्याची हाकाटी पिटली जावो.

वीणा३'s picture

17 Apr 2018 - 11:30 pm | वीणा३

१) विचारसरणीत कोणते बदल व्हावेत असे तुम्हाला वाटते ?
घरातून :
(मुलं = मुलगा आणि मुलगी )
प्रत्येक घरात मुलांना स्वतःचे आणि दुसऱ्याचे हक्क याबाबत सांगितलं गेलं पाहिजे. त्यांनी कधीही वाईट गोष्टींची सुरवात करू नये आणि त्यांच्या बरोबर वाईट गोष्ट होत असेल तर गप्प बसू नये हे सतत सांगितलं गेलं पाहिजे.
बरीच अभ्यासात हुशार असलेली मुलं शारीरिक ताकदीत कमी असतात, तरीही त्यांना समोरच्याला दुखापत पोचवण्याच्या काही ट्रिक्स माहिती पाहिजेत.
मुलीला - "तू मुलगी आहेस म्हणून " ने सुरु होणारी बरीच पारंपरिक वाक्य बोलायचं टाळलं गेलं पाहिजे.
मुलांना घरातून सतत सांगितलं पाहिजे कि तुझी चूक नसेल तर आम्ही तुझी मदत करायचा १००% प्रयत्न करू.
स्वतः आई वडिलांचे एक मेणबरबरच वागणं आदर आणि मैत्रीपूर्ण पाहिजे. "हि बायकांची कामं / हि पुरुषांची कामं" इ बोलणं टाळलं पाहिजे. माझा मुलगा जेव्हा मला विचारतो कि तू स्वयंपाक का करतेस तेव्हा "मला जास्त चांगला जमतो म्हणून मी करते, तुझ्या बाबाला जास्त चांगला जमत असता तर त्याने केला असता" किंवा "घरात ४ काम आहेत थोडी मी थोडी तुझ्या बाबाने वाटून घेतली आहेत " अशा पद्धतीची उत्तर देणे, किंवा सगळ्यात उत्तम म्हणजे आलटून पालटून कामं करणे.
खास करून वयात आलेल्या मुलांना (मुलग्यांना ) हे नीट सांगितलं पाहिजे कि, "तुला स्त्री च्या शरीराचं आकर्षण वाटणं साहजिक आहे, पण ते विचित्र पद्धतीने व्यक्त केलंस तर त्या स्त्री ला मानसिक / शारीरिक त्रास होईल, जे अतिशय चुकीचं आहे. आणि इथे जर तू चुकीचा वागलास तर तू आमचा पाठिंबा गमावशील. तुला एखादी मुलगी आवडते तर तिलाही तू आवडावास हे तुला वाटत असेल तरी तसाच होईल असं नाही. जर एखादी मुलगी आवडली तर तू तिला चांगल्या पद्धतीने विचारू शकतोस. जर ती नाही म्हणाली त्याचा अर्थ "नाही" असाच आहे." -

माझा प्लॅन - अमेरिकेत "law and order SVU (special victim unit )" नावाची सिरीज लागते. त्यात न्यू यॉर्क पोलीस वेगवेगळ्या प्रकारचे बलात्कार आणि abuse शी समबंधित गुन्हे हाताळताना दिसतात. मुलगा १३ वर्षाचा झाला कि त्याला त्याचे सगळे भाग बघायला लावणार आहे, तुझ्या बरोबर काय काय होऊ शकत आणि तुझ्या वागण्यामुळे कोणाचं किती वाईट होऊ शकत किंवा पालकांना किती त्रास होऊ शकतो - हे बघून ठेव, मित्र निवडताना नीट विचार कर हे सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं - एकवेळ आनंदाच्या वेळी आम्हाला विसरला तरी चालेल पण प्लिज प्लिज - तू प्रॉब्लेम मध्ये असशील तर पहिल्यांदी आम्हाला सांग - सगळं खरं सांग, आम्ही शक्य ती शक्य तेवढी मदत करायचा प्रयत्न करू.

सामाजिक बदल - हे कसे करायचे माहित नाही पण गरजेचे आहेत असं वाटत.
१. मेणबत्ती मोर्चा फक्त एका रेप साठी काढण्याऐवजी न्यायदान पद्धत प्रचंड वेगवान होण्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. फक्त रेप केसेस नाहीत तर एकूणच "आपल्यावर अन्याय होतोय, इथे न्याय मिळणं शक्यच नाही, आपला बदला आपल्यालाच घ्यायला लागेल " हि भावना कमी करण्याची एकूणच अतिशय गरज आहे. समाजातल्या प्रत्यके निर्दोष व्यक्तीला आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास आला पाहिजे. म्हणजे कुठली तरी चीड कुठेतरी काढण्यासाठी बलात्कार करायचा हे तरी कारण राहणार नाही (अर्थात अशा माणसांना कारणांची गरज नसतेच)

२. भारतात मानसोपचार तज्ञ / कॉऊन्सिलर यांची संख्या वाढण्याची खूप गरज आहे. भारतात बऱ्याच ठिकाणी (शाळा, पोलीस, सरकारी, खासगी नोकऱ्या ) मानसोपचार तज्ज्ञ / कॉऊन्सिलर पूर्णवेळ उपलब्ध असले पाहिजेत. बरेच त्रास कधीच समोरच येत नाहीत.

३. नाटक / पुस्तक / लेख सिनेमे - या प्रत्येक ठिकाणी स्त्री बरोबर वागण्याची पद्धत नीट दाखवली गेली पाहिजे. छेड काढली तरी पोरगी पटते, किंवा छेड काढणं हा पोरगी पटवण्याचा राजमार्ग आहे किंवा ती पटेपर्यंत छेड काढत राहावी हे दाखवणं बंद झालं पाहिजे. जमल्यास स्त्री वर बलात्कार / छेडछाड होत असताना तिने काही ट्रिक्स वापसून स्वतःची स्वतः सुटका करून घेतली हे दाखवावं (दर वेळेला हिरो येऊन वाचवतोय हे बघून वैताग आलाय). अजूनही जमल्यास नुकताच बलात्कार झालेल्या स्त्री ने बलात्कार करणाऱ्या पुरुषाला "अय्यो हा बलात्कार होता!!!", "काय धड जमत नाही आणि आला म्हणे बलात्कार करायला" अशा टाईप चा डायलॉग / लुक मारावा (भरपूर सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावी). थोडक्यात बलात्कार म्हणजे स्त्री चा आयुष्य संपल ह्या गोष्टीचा जो प्रचंड पगडा लोकांवर आहे तो कमी करायला मदत करावी. अजूनही जमल्यास - वडील किंवा भावाचा बदल - त्यांच्यावरच बलात्कार - मारामारी इ इ करून घेतलेला दाखवावा . दोन पुरुषांचं भांडण झालं तर एकमेक्नावर बलात्कार केलेत / सुपारी देऊन करून घेतले - असं दाखवावा . तो माणूस आयुष्यातून उठेल, त्याच्या घरच्यांना लांब ठेवावं. नाटक / सिनेमाचं समाजावर प्रभाव असतो म्हणतात, त्यांनी घरातल्या बाई वर बदला म्हणून बलात्कार केला असं दाखवण्यापेक्षा, पुरुषाने बदला म्हणून त्या पुरुषावर बलात्कार केला /करवून घेतला असं दाखवायला हरकत नाही.

५. बलात्कार हा एखाद्या अपघाताइतकाच सामान्य समजला गेला पाहिजे.
+१००० - जर स्वतःच्या मुलीला एखाद्या अप्रिय (अगदी धक्काबुक्की, छेडछाड ) घटनेला सामोरं जायला लागलं तर, छोट्या ट्रिकस शिकवून ठेवाव्यात.शारीरिक त्रास दिला तर
१. डोळ्यात बोटं घालायचा प्रयत्न कर,
२. कान पिरगाळ,
३. दोन पायाच्या मध्ये जोर लावून गुढग्याने मारायचा प्रयत्न कर,
४. सतत विचार कर कि मी काय केला तर हा माझ्या अंगापासून लांब जायची शक्यता आहे.
५. अगदी ओकारी काढता आली तर काढ. किळस वाटून, घाबरून कशाने का होईना त्याला तुला शारीरिक त्रास देण्यापासून थांबवायचा प्रयत्न कर.
६. आसपास काही त्याला मारता येईल का असं बघ
७. चेहरा घाबरलेला रडका दिसणार नाही असा प्रयत्न कर, कारण ही माणसं विकृत असतात, आपल्यामुळे समोरच्याला त्रास होतोय हे त्यांचं टॉनिक असतं. ८. सगळ्यात महत्वाचं - do not give up .

मी एकुलती एक मुलगी. मी लहान असताना शेजारी एक कुटुंब राहायचं त्यांना २ मुलं २ मुली, खेळायला गेले कि चौघं पण माझ्यावर एकत्र ओरडायचे, माझ्या मागे मारल्यासारखं करत धावायचे, मी घाबरायचे, एकदा वडलांनी बघितला आणि मला सांगितलं कि परत असं केलं ना तर घट्ट हात आवळ जोराने दात ओठ खात चिडून ओरड "ए मला मारू नको नाहीतर मी पण मारेन" - खरोखर शक्यतो मारू नको पण दगड बघून ठेव. मी घबराट असल्याने २-३ वेळा मला सांगायला लागलं, आणि मग मी ते एकदा केलं. त्यानंतर कधीही सगळे एकत्र होऊन माझ्यावर आरडाओरडा केला नाही.
वडिलांनी सांगितलं कि आपण घाबरलो तरी तसं कधीच दाखवायचं नाही उलट जास्त चिडून दखवायचं, समोरचा पण आपल्याला जोखत असतो. घाबरलो असं दिसलं तर जोर चढतो, चिडलोय असं दिसला तर तोच माणूस घाबरायची शक्यता असते. मुंगी सुद्धा चावते हे लक्षात ठेव.

पैसा's picture

18 Apr 2018 - 8:47 am | पैसा

बऱ्याच अंशी सहमत आहे.

विशुमित's picture

18 Apr 2018 - 12:29 pm | विशुमित

पालकत्व पार पाडण्यासाठी बऱ्याच नवीन गोष्टी समजल्या.

माहितगार's picture

18 Apr 2018 - 2:25 pm | माहितगार

+१

मार्मिक गोडसे's picture

18 Apr 2018 - 3:24 pm | मार्मिक गोडसे

मच्छिविक्रेत्या कोळीनी, भाजीवाल्या गर्दीच्या ठिकाणी परपुरूषाणे त्यांच्या शरीराला स्पर्श केला तर आकाशपाताळ एक करतात. स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला जागीच शाब्दिक व शारीरिक शिक्षा करतात. हेच नेमकं बहुतांश स्त्रियांना जमत नाही, त्याचा फायदा आंबटशौकीन घेत असतात.

माहितगार's picture

18 Apr 2018 - 3:06 pm | माहितगार

यातील इतर देशांतील मिडिया रिप्रेझेन्टेशन या धाग्याच्या परिघात येत नसले तरी तिकदच्या धाग्यात बर्‍यापैकी सहमत होत माझे मत मांडले आहे. मारीयांचे एक विधान मात्र अधिक वस्तुनिष्ठ पणे या धाग्याच्या कक्षेत समजून घ्यावे लागेल.

युद्धा दरम्यान सशस्त्र सन्घर्षा दरम्यान प्राप्त होणार्‍या स्त्रीयांचे लैन्गिक शोषण (याची सुद्धा निष्पक्शतेला सोडून एकान्गी बातमीदारी वगैरे केली जाते पण तो विषय सध्या येथील चर्चेत अवान्तर ठरेल) ब्लॉग लेखिका म्हणतात तसे हे प्रकरण अगदी धर्माचा आधार घेऊनही केले जाताना दिसते, यात बहुतेक धर्म आणि देश अपवाद नसावेत. पण इस्लामिक ग्रन्थां मध्ये निश्चितपणे यास आधिक आधार दिला गेला आणि अधिक छळ तोही अनरेकॉर्डेड झाला असावा सगळ्यात अलिकडचे प्रकरण याझीदी स्त्रीयांच्या लैंगीक गुलामगिरीकरुन घेण्याचे पण हे परदेशातले झाले. असे प्रकार जपान ने दुसर्‍या महायुद्धात चीन मध्ये केले . बर्‍याच देशान्चा बराच इतिहास असावा .

अर्थात ह्या धाग्याचा उद्देश भारत आणि वस्तुनिष्ठता हा नक्कीच आधार आहे. आपल्या देशात मध्ययुगात युद्ध आणि सन्घर्षा दरम्यान लैन्गीक शोषण सती प्रथेपर्यंत स्त्रीला जावे लागले ते वेगळ्या भारता बाहेरच्या धर्मग्रन्थाच्या प्रभावाने अधिक हे खरे. (तरीही अलिकडे एका स्त्री कलाकाराने म्हटले तसे युद्धा दरम्यान शोषण झालेली स्त्री सुद्धा सती अथवा इतर प्रथेस बळी न घालता स्विकारावयास हवी , तिने न केलेल्या चुकिची तिला सजा देणार्या प्रथात हशील नाही. पण या नाण्याला भारतीय साहित्यात तुरळक एखाद दोन पण काही दुर्दैवी पौराणिक उल्लेख आहेत. ( तुम्हाला कल्पना नसली तरी तुमचे धार्मिक विरोधक त्याला बरोबर हाय लाईट करत असतात) जी स्त्री पतिव्रता आहे तिचा पती युद्धात अजिन्क्य असतो अशी पहिली थेअरी , मग त्याला जोडून युद्धात सगळे माफ या इस्लामी पद्धतीने नसेल पण वाईट प्रवृत्तीच्या राक्षसीय प्रवृत्तीचा युद्धात विनाश करण्यासाठी अशा व्यक्तीच्या पत्नीच्या पातिव्रत्याचे भंग हनन झाले तर तो युद्धात सहज हरेल असा बादरायण आणि घृणास्पद तर्क कदाचित प्रक्षिप्त पौराणिक उल्लेखातून दिसतो ; इस्लाम प्रमाणे या तर्कान्चा प्रभाव असलेल्या घटना प्रमाण इतिहासात दिसत नाही , पौराणिक साहित्यातही उल्लेख अपवादान्म्त्मकच आहेत, पण रामाय्णा सारख्या कथेचा जनमानसावर प्रभाव असूनही काही प्रमाणात हरलेल्या राजाचा जनान खाना जिन्कलेला राजा आपल्या जनान खान्याला जोडण्याचे उल्लेख रावनवहो सारख्या प्राकृत साहित्य ते शिंद्यांनी होळकरांच्या स्त्रीस बंदीवासात ठेवणे अशा घटना दिसतात. मुख्य म्हणजे हे उल्लेख असलेल्या पौराणिक साहित्याला स्मृतींचा अथवा वेदांचा आधार नव्हता चुभूदेघेऑ) त्यामुळे असेल कदाचित पण प्रमाण साधनांच्या इतिहासात असे घडल्याचे आधार आतापर्यंत तरी वाचनात आले नाहीत .

ज्यांना माहित नाही त्यांच्या साठी एक वृंदेची अशी एक कथा आहे , आणि मग वाल्मिकी रामायणात रावणाच्या शस्त्र प्राप्तीत व्यत्यय आणण्यासाठी अंगदाने मंदोदरीला रावणासमोर आणल्याचा उल्लेख क्रिटीकल एडीशन सोडून इतरत्र वेगळ्या एडीशन मध्ये असावा , पण या उल्लेखास वृंदा कथेचा उल्लेख न करता तसाच आधार देण्याचा प्रयत्न काही भारत बाह्य प्रक्षिप्त रामायण आवृत्तीत काही उल्लेख आंतरजाल आणि इंग्रजी विकिपीडियातील मंदोदरी विषयक लेखातून दिसतात . ( मंदोदरी विषयक उल्लेख एका संस्कृत जाणकार व्यक्तीस तपासण्याची विनंती केली आहे . चुभूदेघे) पौराणिक कथेत पातिव्रत्याची परीक्षा सारख्या आजच्या कालातल्या मापदंंडाने टाळण्या जोग्या कथाही दिसतात पण मुख्य म्हणजे वरच्या एका प्रतिसादात म्हटले गेल्या प्रमाणे दृष्य शुचिता , स्पर्ष शुचिता , योनी शुचिताच्या सन्कल्पनांना अवाजवी महत्व दिल्यामुळे आपल्याकडिल चुकीच्या कल्पना रंगवणार्‍या पौराणिक कविंचे फावले असावे. जे काही असेल . आपल्या पौराणिक साहित्यातील या मर्यादेस कधी शब्दपुजेचा मान मिळाला नव्हता आणि पुढेही मिळू नये एवढेच नव्हे तर शुचितान्चे अवडंबर बाजूस ठेऊन स्त्रीचा मोकळ्या मनाने आदर करण्याच्या सांस्कृतिक संवर्धनाची गरज असावी असे वाटते.

चुभूदेघे .

माहितगार's picture

18 Apr 2018 - 3:43 pm | माहितगार

उपरोक्त लिहिताना काही जातक कथांकडे निर्देश करण्याचे राहून गेले . सर्वच जातक कथा सारख्या नाही पण , बोटावर मोजक्या जातक कथात गृहस्थ जिवन व्यक्तीस संसाराचा मोह सोडून संन्यास घेण्याचे पटविण्यासाठी स्त्री चारित्र्याबद्दल संशयी वातावरण निर्मितीचे पयोग आहेत. बघा प्रत्येक स्त्री व्याभिचारी असू शकते त्याने दुख्ख येते त्या पेक्षा संसराचा मोह सोड अशी ती थेअरी . अर्थात रामायण कथासुत्राने स्पर्धा दिल्याने भारतातून मागे पडली पण स्त्रीयांना ती थेअरी सिद्ध करावयास शुचितांवर भर देणारा धार्मिक स्पर्धात्मक प्रभाव पडत गेला असेल ?

बलात्कार ह्या विषयावर भारतीय माध्यमे थोडा जास्तच भर देतात आणि त्यांत सुद्धा बलात्काराच्या लैंगिक दृष्टिकोनामुळे जास्त वाचक/दर्शक भेटतील ही त्यांची अपेक्षा असते. बहुतेक वेळा हि गोष्ट मला बलात्कार पेक्षा जास्त किळसवाणी वाटते आणि मी ह्या बातम्या वाचत नाही आणि त्यातील चर्चेत सुद्धा भाग घेत नाही.

अनेक देशांत फिरून मी असे ठाम पाने म्हणू शकते भारतात स्त्रियांचे जास्त उत्पिडन होत आहे अश्यातला प्रकार नाही पण चूल आणि मूळ सोडून महिला घरा बाहेर पडून स्व कतृत्व दाखवायला लागली कि अश्या प्रकारांची रिस्क हि असतेच. (म्हणून घराबाहेर पडू नये असा निष्कर्ष काढू नये).

** मानसकिता बदलायला पाहिजे **

ह्यापेक्षा मूर्खपणाची अपेक्षा असू शकत नाही. समाजाची मानसिकता प्लॅनिंग करून बदलत नाही (नेहरूंना विचारा). ती आपोआप बदलते.

पुरुष आणि स्त्री ह्या मध्ये स्त्री हे जास्त "इन डिमांड" लिंग आहे त्यामुळे टोमणे, नको तिथे हात लावणे, विकृत चाळे कधी कधी बलात्कार ह्या गोष्टींना आधुनिक स्त्रीला सामोरे जावे लागेलच आणि इतर कुणी काही तरी करावे ह्यापेक्षा अश्या गोष्टींना आपल्या प्रमाणे प्रत्येक महिलेने तोंड द्यायला तयार राहायला पाहिजे. त्याला काहीही उपाय नाही.

आता ८ वर्ष्यांच्या मुलीवर वगैरे बलात्कार होतात ते पूर्णपणे विकृती आहे. अश्या विघातक व्यक्तीसाठी कायदा आणि कोर्टानी खरेखोर कंबर कसायाला पाहिजे. ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारा जर २० वर्षे खटला चालून सुटणार असेल तर इतर सर्व काही व्यर्थ आहे.

बलात्कार ह्या विषयावर भारतीय माध्यमे थोडा जास्तच भर देतात आणि त्यांत सुद्धा बलात्काराच्या लैंगिक दृष्टिकोनामुळे जास्त वाचक/दर्शक भेटतील ही त्यांची अपेक्षा असते.

ह्या बातम्या नकळत मेन स्ट्रीम मेडीया मधील सब्टल पॉर्नचे काम करतात का अशी आपल्या प्रमाणे शंका वाटते. अशा बातम्यांसोबत मागच्या एखाद्या केस मधील न्यायालयाने शीक्षा दिलेली बातमी देण्याचा सुद्धा मिडीयाने आवर्जून पाळावयास हवा असे वाटते. कारण काही अपवाद वगळता शीक्षा दिलेल्या बहुतेक बातम्या येत नसाव्यात किंवा आतल्या पानावर जात असाव्यात असे वाटते.

छेडछाडीसारख्या गुन्ह्यांना ओप्न जेल टाईप - रस्ते झाडण्यासारख्या किंवा अजून काही छोट्या शीक्षा पण वेगवान शीक्षा देण्याचा आधीकार स्थानिक महिला आयोगांना देण्यास हरकत नसावी असे वाटते. अधिक शीक्षेसाठी खटला पुढे न्यायालयात चालवण्याची सोय असावी.

ह्यापेक्षा मूर्खपणाची अपेक्षा असू शकत नाही. समाजाची मानसिकता प्लॅनिंग करून बदलत नाही (नेहरूंना विचारा). ती आपोआप बदलते.

आहाहाहा, या वाक्यासाठी तुम्हाला 10000 टाळ्या.. इतकं मुद्देसूद आणि नेमकं मला कधीच लिहिता आलं नसत.

संस्कार आणि संस्कृती हे घटक लैंगिक अत्याचार होत असताना उतपिडन करणाऱ्या पुरुषास थोपवू शकत नाहीत
अन्य वेळी संस्कारी आणि शांत असणारे पुरुषही आत्याचार करून जातात
नंतर कदाचित पश्चाताप करितही असतील परंतु संधी उपलब्ध आहे तर ती का सोडावी असा विचार मनुष्याचा असतो नरक स्वर्ग कोणी पाहिलाय जो होगा देखा जायेगा
असा तात्कालिक विचार होतो असे वाटते
यापेक्षा स्त्रियांनी स्वतःच्या स्वातंत्र्याचा संकोच झाला तरी सरंक्षण हा विषय मुख्य मानून वागले पाहिजे
आणि त्या रीतीने आपल्या लहान मूलामुलींना देखील शिकविले पाहिजे

माहितगार's picture

18 Apr 2018 - 6:56 pm | माहितगार

इतरांना काय वाटते ?

बलात्काराच्या आरोपीला फाशीची किंवा अधिक कठोरात कठोर शिक्षा सुनावली तरी ,
त्यानंतर होणाऱ्या इतर घटनांमध्ये त्याची भीती वाटून बलात्कार कमी झाले किंवा नाही यासंबंधित काही सर्वे वगैरे झाला आहे का?

सुबोध खरे's picture

18 Apr 2018 - 7:03 pm | सुबोध खरे

बलात्काराच्या गुन्ह्याला फाशीची सजा असेल तर गुन्हेगार त्या स्त्रीला पुरावा नष्ट करण्यासाठी ठारच मारून टाकेल.
(नाहीतरी बलात्काराला फाशीच आहे आणि खून केला तरी फाशीच)
याचमुळे बहुसंख्य कायदेपंडित बलात्काराला फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करण्याच्या विरुद्ध आहेत.

अर्धवटराव's picture

18 Apr 2018 - 6:38 pm | अर्धवटराव

विक्राळ समस्या डोळ्यासमोर दिसते, त्याचे भीषण परिणाम देखील जाणवतात, मुळापासुन काहितरी उपचार हवा हे देखील कळतं... पण उपाय काहि सुचत नाहि :(

प्रसाद गोडबोले's picture

18 Apr 2018 - 7:49 pm | प्रसाद गोडबोले

पण उपाय काहि सुचत नाहि :(

लोकांची मानसिकता बदलणे हाच एकमेव उपाय सुचतो पण तेही एखाद्यादुसर्‍या छोट्या समुहाकरता करणे शक्य आहे , कोटीच्या कोटी लोकांची मानसिकता कशी बदलणार ?

खरंच अवघड प्रश्न आहे !
भारत खरंच स्त्रीयांसाठी अवघड देश आहे ! मी न्युयोर्क पहातोय अन आधी रियाध पाहिलं आहे ! ह्या दोन्ही ठिकाणी स्त्रीया मुंबई दिल्लीच्या तुलनेत नक्कीच जास्त सुरक्षित आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे !

( आता लगेच माझ्यावर देशद्रोहाचा आरोप करु नका , मी तर एकदम ओपनली सनातनी हिंदु आहे :P पण जे चुकीचे दिसत आहे ते मान्य करायला हरकत नसावी. यत्र नार्यस्तु पुज्यन्ते वगैरे वगैरे निव्वळ गफ्फा आहे , गेली किमान हजार वर्षे स्त्रीयांना केवळ उपभोग्य वस्तु मानणे ही विचारधारा लोकांच्यासाठी अत्यंत सामान्य झालेली आहे. जोवर काही फंडामेन्टल बदल होणार नाहीत तोवर हि मान्सिकता सुधारणे अशक्य वाटते .)

माहितगार's picture

18 Apr 2018 - 10:28 pm | माहितगार

....जोवर काही फंडामेन्टल बदल

कोणते ?

प्रसाद गोडबोले's picture

19 Apr 2018 - 12:42 am | प्रसाद गोडबोले

अनेक लेव्हलला अनेक फंडामेन्टल बदल केले पाहिजेत . आणि बहुतांश सारेच मानसिकतेतील फरक आहेत. उदा.
१) सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोणत्याही स्त्रीवर होणारा अन्याय हा केवळ एका व्यक्तीवर होणारा अन्याय नसुन आसपासच्या सार्‍या समाजवर होणारा अन्याय आहे आणि त्याविरुध्द पेटुन उठणे ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे हे मनावर ठामपणे बिंबवले गेले पाहिजे !
( माझा वैयक्तिक अनुभव सांगतो एकः मी एकदा मुंबई लोकलने रात्री उशीरा प्रवास करत होतो, बायको सोबत होती, तेव्हा एका स्टेशनवर २-४ पोरं डब्यात चढली अन त्यात्ला एक जण म्हणाला " औरतोंके लिये अलग डब्बा हो के भी क्याँ चढती है मर्दोंके डिब्बे मे" आणि काहीबाही .... मला ऐकु आलं , आसपासच्याही लोकांना ऐकु आल , मी शांतपणे म्हणालो " काय म्हणालास , परत बोल" तेवढ्यात मागुन दोन चार जण भडकुन म्हणाले , " अरे विचारर्तोस काय , दोन कानाखाली लाऊन दे म्हणजे अक्कल येईल त्याला." पोरगं जागच्या जागी गळपटलं . मी त्या पोरांना म्हणालो " विचार करुन बोलायचं, ही मुंबई आहे. " त्या दिवशी मी जर एकटा पडलो असतो तर कदाचित राडा झाला असता आय डोन्ट नो कि काय झालं असतं. पण जेव्हा लोकं सामुहिकपणे चुक ते चुक म्हणायला लागतात तेव्हा अन्यायला फारसं काही करत येत नाही ! मुंबईत किमान थोड्याफार प्रमाणात तरी लोकांची सतत्सद्विवेक बुध्दी जागृत असल्याचे मला जाणवले आहे , दिल्लीत अन नॉर्थ मध्ये विवेक बिवेक असलं काही नसतंय म्हणुनच तिकडं करा जपुन रहायचं . )

२) तरुण पोरापोरींच्या बाबतीत:
लडकी की ना का मतलब हां होता है, किंव्वा हसी तो फसीं असले भोंगळ विचार लोकांच्या मनतुन काढुन टाकण्यासाठी पोरींनी एकदम स्पष्ट बोलाय्ला सुरुवात करायला हवी . एकदम स्पष्ट सिग्नलिंग मेथड असायला हवी ! तुमचा नकार इतका स्पष्ट आणि फर्म असायला हवा कि समोरच्याच्या डोक्याला झिणझिण्याच आल्या पाहिजेत . नुकत्याच एका ओळखीतल्या स्त्री व्यक्तीने फेसबुक वर तिच्याशी कोणीतरी आक्षेपार्ह भाषा वापरुन लगट करायचा प्रयत्न केला तर सरळ स्क्रीन शॉट घेवुन टॅग करुन नावासकट शेयर केले ! विषयच कट , ५०० १००० फ्रेंडससमोर त्या लगट करणार्‍या पुरुषाची बिनपाण्याने केली! सदर व्यक्ती आयुष्यात परत फेसबुकवर असले काही करु शकेल असे वाटत नाही ! ती पोस्ट मी घरातल्या सगळ्यांना दाखवली होती . This is the right approach to deal with unwanted approaches. Don't even tolerate once !
तुमचा " नॉट अ‍ॅव्हेलेबल" हा सिगन्ल इतका स्पष्ट हवा की कोणाचे डेरिंगच होता कामा नये तुम्हाला अ‍ॅप्रोच करायचे ! हां अर्थात तुम्ही अ‍ॅव्हेलेबल असाल आणि किणी अनवॉन्टेड तुम्हाला अ‍ॅप्रोच करत असेल तर किमान समोरच्याला दोन संधी तरी द्या नकार समजुन घ्यायच्या , तरीही तिसर्‍यांदा त्याने अ‍ॅप्रोच केले तर मग डोक्याल जिणझिण्या येतेल इतका स्पष्ट नकार द्या !

३) ह्या फेमीनाझी लोकांना आवर घातला पाहिजे . असल्या लोकांच्या अतातायीपणामुळे स्त्री पुरुष समानन्ता असावी अशा विचारचीमाणसेही अलिप्त रहातात, एक सोप्पा थंबरुल आहे : जी प्रेगनंट आहे फक्त ती स्पेशल स्त्री आहे असे समजुन तिला स्पेशल प्रिव्हिलेजेस मिळावेत , बाकी सार्‍यांना पुरुष सम्जुन समान वागणुक मिळावी समान संधी , समान कंपेन्सेशन, समान कपडे घालयचा अधिकार , समान पॅरेंटल लीव्ह , समान पोटगी , समान गुन्ह्यांना समान शिक्षा , समान प्रॉपर्टी राईट्स . ऑल ईक्वल !

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Apr 2018 - 9:44 am | डॉ सुहास म्हात्रे

+१

फक्त एक छोटिशी तांत्रिक दुरुस्ती...

"...बाकी सार्‍यांना पुरुष सम्जुन समान वागणुक मिळावी... ऐवजी "बाकी सार्‍यांना एक व्यक्ती समजू समान वागणुक मिळावी".

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Apr 2018 - 10:17 am | डॉ सुहास म्हात्रे

आणि एक भर...

मुलींना फक्त "हे कर ते कर", "ही सावधगिरी घे ती सावधगिरी घे" असे सांगण्याऐवजी:

१. मुलींना/स्त्रियांना स्वसंरक्षणासंबंधी शारिरीक (उदा: कराटे, इ) व मानसिक (उदा: स्वतःचे मत स्पष्टपणे आणि निर्भिडपणे कसे व्यक्त करावे, इ) मार्गदर्शन करणे जरूर आहे.

२. मुलांना/पुरुषांना आपली मुली/स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी योग्य ठेवण्यासाठी शाळा-कॉलेजातच नाही तर घरातूनही शिक्षण/आग्रह असला पाहिजे. यात घरातल्या स्त्रियांचा सिंहाचा वाटा असेल तर घरातला मुलगा/पुरुष गैरकृत्य करण्यास सहसा धाजावणार नाही. बर्‍याचदा, "आपला तो बाब्या..." या नियमाने किंवा लाजेकाजेखातर घरातला मुलगा/पुरुष यांचे प्रसंगी खोटे बोलून समर्थन केले जाते अथवा 'मुलाची/पुरुषाची जात' असे म्हणून दुर्लक्ष केले जाते... मुख्य म्हणजे, गैरवर्तनाला असे पाठीला घालण्यात बहुदा घरातल्या स्त्रिया पुढे असतात. या मानसिकतेतून बाहेर येण्याची फार मोठी गरज आहे.

३. संबंधित कायदे तर हवेच पण त्यांचे पालनही कडक असायला हवे. मात्र, कायदे याबाबत तेव्हाच सबळपणे व्यवहारात येतात जेव्हा मार्कस ऑरेलियस यांच्या वरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे गैर घटना घडत असता आजूबाजूचे लोक तिच्या विरोधात सक्रियपणे उभे राहतात. जेव्हा आपल्याविरुद्ध आवाज करायलाही लोक घाबरतात अशी खात्री असते तेव्हाच गुंड शिरजोरी करू शकतात. जर आजूबाजूचा जमाव सक्रियपणे विरोधी आहे हे दिसते तेव्हा (कदाचित धोपटून काढले जाईलही या विचाराने) गुंडगिरी गळपाटते. कोणत्याही देशात शासन सर्वकाळ/सर्व जागी उपस्थित राहू शकत नाही, नागरिकांच्या सक्रिय सहभागाच्या अभावी कोणत्याही कायद्याचा पूर्ण फायदा व्यवहारात येऊ शकत नाही.

४. इतर अनेक गोष्टींप्रमाणेच, आपला समाज स्वतःला तोशिश लागेपर्यंत, "आपल्याला काय त्याचे?" याच मनस्थितीत असतो. त्याऐवजी, "समाजाचा सर्वसमावेशक फायदा (common good) असेल त्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी माझी आहे" ही सामाजिक मनस्थिती बनणे जरूर आहे. हा प्रवास लहान काळाचा नाही आणि सोपा तर नाहीच नाही... पण त्या मार्गावरून बरेच अंतर घालविल्याशिवाय इतर सर्व प्रयत्न केवळ पुस्तकी अभिप्राय राहतील.

सुबोध खरे's picture

19 Apr 2018 - 10:42 am | सुबोध खरे

+१००

पण उपाय काहि सुचत नाहि :(

समाज सुसंस्कारित असावा.
दररोज संस्कृतीची लाज वाटून घ्या असे शिकवले गेले तर काही उपाय सुचत नाही अशा अनेक बाबी अजून ज्वलंत होणार.

नाखु's picture

18 Apr 2018 - 8:13 pm | नाखु

असणारे खटले, अक्षम्य दिरंगाई आणि पराकोटीचा भ्रष्टाचार (पैश्याने/सत्तेने न्याय विकत घेऊ शकतो हाच माज ) याच्या मुळाशी आहे.

कुणाचीही मुलाहिजा न ठेवता काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आणि या गणंगावर सामाजिक/आर्थिक बहिष्कार टाकला तर नक्कीच आटोक्यात येईल.
परिणामांची दहशत निर्माण झाली पाहीजेच.

सुस्पष्ट नाखु पांढरपेशा

गामा पैलवान's picture

18 Apr 2018 - 11:32 pm | गामा पैलवान

मार्कस ऑरेलियस,

यत्र नार्यस्तु पुज्यन्ते वगैरे वगैरे निव्वळ गफ्फा आहे

मला वाटतं इथलं आकलन वेगळं अभिप्रेत आहे. जिथे बायकांची पूजा केली जाते तिथे देवतांचा वास असतो. हे जर-तर विधान आहे. याचा पोकळ गप्पांचा संबंध नाही. जरी असं उदाहरण पाहण्यात नसलं तरी या विधानाची सत्यता किंचितही कमी होत नाही.

आ.न.,
-गा.पै.

प्रसाद गोडबोले's picture

19 Apr 2018 - 7:11 am | प्रसाद गोडबोले

ह्म्म्म , सहमत आहे ! हे जर-तर विधान आहे हे ही मान्य ! पण ह्याचा अर्थ (बहुतांश आणि सो कॉल्ड) हिंदुंना कळतंय पण वळत नाही असा होतो !

पैसा's picture

19 Apr 2018 - 9:34 am | पैसा

इथे आपण फक्त शहरात राहणाऱ्या बायकांचा दृष्टिकोन गृहीत धरतो आहोत. पण या सगळ्यापासून फार दूरवर ग्रामीण भागातील बायकांना त्यांचे वेगळे प्रश्न भेडसावणारे आहेत. अशिक्षितपणा, बालविवाह, हुंडाबळी, सतत उपासमार व छळ, सरपण व पाणी डोक्यावरून वाहून आणायचा वेळ आणि कष्ट. या सगळ्याची आपल्याला माहिती नसते. तरीही किंवा आयुष्याचा सामना करूनच या बायका निडर होतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्यात किती आत्महत्या बायकांच्या असतात? त्या मुलाबाळांना जमेल तसे वाढवत आयुष्याशी झुंजत राहतात. इंग्लंड अमेरिकेच्या आधी भारतात आणि भारतीय उपखंडात महिला पंतप्रधान आणि देशाच्या अध्यक्ष झाल्या हे माझ्या मते पुरेसे बोलके आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Apr 2018 - 10:30 am | डॉ सुहास म्हात्रे

+१

वर वर पाहता, (शहरी मानसिकतेने विचार केल्यामुळे) विसंगत वाटत असले तरी, खेड्यातल्या स्त्रिया स्वतःवर जास्त निर्भर आणि जास्त निर्भय असतात. वेळप्रसंगी दोन शिव्या देवून आणि दोन दगड मारून आपले संरक्षण करण्यास त्यांना (फुकाचा) संकोच वाटत नाही. केवळ खेड्यातल्याच नव्हे तर शहरातल्या झोपडपट्टीत राहणार्‍या स्रिया या बाबतीत तुलनेने सधन गटांतील स्त्रियांपेक्षा याबाबतीत अनेक पावले पुढे असतात.

शहरी स्त्रिया, "रस्त्यावर आपण तमाशा केला असे लोक म्हणतील की काय (उर्फ 'जोशी काय म्हणतील' अश्या मनस्थितीमुळे)", या भितीने आजूबाजूला लोक असले तरी आरडाओरडा करण्यास त्यांना संकोच (भिती ?) वाटते. याउलट, "स्त्री स्वतःच विरोध करत नाही तर मग आपण कशाला मध्ये पडावे" या 'सोईस्कर' विचाराने आजूबाजूचे लोकही दुर्लक्ष करतात. पिडीत स्त्रीने पुढाकार घेऊन गुंडाला खडसावले, तर आजूबाजूच्या लोकांपैकी एकदोन जण तरी तिच्या बाजूने पुढे येण्याला धजावतील. असे सतत होत आहे असे दिसून आले तर गुंडगिरीवर आपोआप एक प्रकारे सामाजिक टाच येईल,

सरपण व पाणी डोक्यावरून वाहून आणायचा वेळ आणि कष्ट.

यात अन्याय काय आहे?

पैसा's picture

19 Apr 2018 - 10:57 am | पैसा

हमाली इतकेच शारीरिक कस लागणारे काम आहे. शिवाय तासंतास फुकट जातात ते वेगळेच. १०० मध्ये ९९ वेळा ही कामे बायकाच करतात. त्यावेळी पुरुष चौकात विडया फुकत बसलेले असतात. बरे शहरी बायकांचा यात किती वेळ आणि श्रम फुकट जातात? त्यांना नळ सोडला की पाणी हाताशी असते. गॅस आणि विजेमुळे स्वयंपाक करणेही बरेच सोपे असते.

arunjoshi123's picture

19 Apr 2018 - 11:26 am | arunjoshi123

मी आणलेलं आहे.
त्यात अन्यायात्मक इ इ काही नसतं.
हे काम बायकाच करतात हा ही जावईशोध आहे.
==============================
कृपया न्यूनगंडी लोकांच्या कादंबर्‍यांतून ग्रामीण भारत पाहणे सोडून द्या. विहिरी उपसायचं काम मुख्यतः पुरुष करतात. गावांत अत्यंत कष्टाची कामे फक्त पुरुष करतात.

मार्मिक गोडसे's picture

19 Apr 2018 - 11:36 am | मार्मिक गोडसे

गावांत अत्यंत कष्टाची कामे फक्त पुरुष करतात.
कष्टाची व्याख्या काय आहे तुमची?

पैसा's picture

19 Apr 2018 - 12:22 pm | पैसा

मी फक्त ग्रामीण कादंबऱ्या वाचल्यात की जन्मापासून गावात राहिले आहे/राहते आहे याबद्दल तुम्हाला काय माहीत आहे?

मला काही माहीती नाही कोणाची.
================================
सहसा ग्रामदृश्टी कुठून येते याची ही आयडिया आहे.

पैसा's picture

19 Apr 2018 - 5:54 pm | पैसा

तुम्ही गावात असताना पाणी आणले म्हणालात त्याबद्दल प्रचंड कौतुक! फक्त लहान मुलावर आणि त्याच्या आयाबहिणीवर आतातरी पाणी काढून आणायची वेळ येऊ नये असं वाटतं.

मी आजवर लहान असताना आणि लग्नानंतर नोकरीचा काळ वगळता २ अतिशय दुर्गम खेड्यात रहात आले आहे.

गावातल्या बायका नवऱ्याची मारहाण म्हणजे गंभीर काही समजत नाहीत. परवाच गावच्या मोलकरणीला आणि तिच्या नवऱ्याला पुन्हा हे मारहाणीचे कानावर आले तर पोलिसात देईन म्हणून दम देऊन आले आहे.

arunjoshi123's picture

19 Apr 2018 - 6:04 pm | arunjoshi123

I had a very limited point to make, don't mix hard-work with injustice. देशाच्या, गावाच्या वा घराच्या दैन्यग्रस्त परिस्थितीमुळे काबाडकष्ट करावे लागणे हा अन्याय नव्हे.

पैसा's picture

19 Apr 2018 - 6:16 pm | पैसा

तशाच आर्थिक परिस्थितीत शहरात राहणाऱ्यांना ज्या सुविधा मिळतात त्या गावात मिळत नाहीत हा अन्याय आहे. निर्भर, सुरक्षित बालपण, शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. ज्यांना मिळत नाही त्यांच्यावर तो अन्याय आहे.

कथुवा घटनेत पीडित मुलगी शाळेत जात असती तर या दुर्दैवी घटनेत सापडली नसती अशी एक विफल हळहळ क्षणभर वाटून गेली. तिच्या गुन्हेगाराला फाशी नको त्याहून अमानुष काही शिक्षा असेल तर ती द्यावी.

arunjoshi123's picture

19 Apr 2018 - 6:32 pm | arunjoshi123

असो.

पुंबा's picture

19 Apr 2018 - 11:45 am | पुंबा

+११
वर्षानुवर्षे हे पाणी- सरपण आणण्याचे काम करणार्‍या स्त्रियांना आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. मणक्याचे दुखणे, केस जाणे(खरोखर माझ्या पाहण्यात अशी उदाहरणे आहेत), मेंदूसंबंधीत काही प्रश्न, स्त्री- आरोग्यासंबंधी अडचणी इ. मराठवाड्यात काही गावांत चक्क १- १.५ किमि वरून पाणी वाहून आणावे लागते डोक्यावर. लहान मुलींना कित्येक वेळा शाळा बुडवून या कामाला जुंपले जाते. चूलीवर तासंतास स्वयंपाक करणार्‍या स्त्रियांना डोळ्याचे तसेच श्वसनसंबंधी होणारे आजार बहुतेकांस माहित आहेतच. ग्रामिण स्त्रियांच्या समस्या खरोखरच शहरी स्त्रियांच्या समस्यांहून निराळ्या आहेत, बर्‍याच प्रमाणात जास्त गंभीर आहेत(शहरी स्त्रीयांच्या प्रश्नांचे अवमुल्यन करण्याचा हेतू नाही). स्त्री- शेतकर्‍याच्या प्रश्नांविषयी शरद जोशींनी शेतकरी चळवळीमध्ये अतिशय मूलगामी चिंतन केले आहे. तर्कशुद्ध पद्धतीने तरीही करूणेचा धागा न हरवू देता जोशींनी स्त्री- प्रश्न व शेतकर्‍यांच्या प्रश्नाची सांगड घालत उपाय सुचवले आहेत. चांदवडची शिदोरी या पुस्तकात याविषयी जोशींचे चिंतन आहे.
त्यामुळे स्त्रीयांच्या समस्यावर तीनही स्तरांवर उपाय करण्याची आवश्यकता आहे.

१. ग्रामीण स्त्रियांच्या समस्या, ज्यात आरोग्य, शिक्षण, लोकशाही प्रक्रियेत अधिकाधिक सक्रिय व जाणता सहभाग, सुरक्षा, शेतीचे प्रश्न, स्त्री-भ्रूणहत्येसंबंधी जागृती, जातपंचायतीसारख्या प्रतिगामी संस्थांचे महत्व कमी करणे, आर्थिक स्वावलंबित्व वाढवणे, शौचालय- पाणी- पर्यावरणाचे प्रश्न सोडवणे, बचत गट चळवळ, विधवा, परित्यक्त्या महिलांची एम्पॉवरमेंट यांचा समावेश करता येईल.

२. शहरी - निमशहरी स्त्रियांचे प्रश्नः मुख्य मुद्दा एकट्या राहणार्‍या वा नोकरी- व्यवसायासाठी बाहेर पडणार्‍या स्त्रियांची सुरक्षा, समान वेतन- मानधनाचा मुद्दा, आर्थिक स्वावलंबन, वृद्ध स्त्रियांचे प्रश्न, सुरक्षीत परिवहन सुविधा, कामाच्या ठिकाणी होणारे शोषण थांबवणे, संपतीच्निर्मितीचा प्रश्न, मुस्लिम स्त्रियांच्या संबंधात म्हणायचे झाले तर शिक्षण, तलाक- पॉलिगमी- संपत्तीच्या मालकी हक्क यात समानता, एकल मातांचे प्रश्न, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संशोधन यात स्त्रियांचा टक्का वाढणे, ऑनलाईन ट्रोलिंग, डिजिटल जेम्डर रिलेटेड गुन्हे, इनोव्हेशन, स्टार्ट अप यामध्ये महिलांचे प्रमाण वाढवणे, पुरूषांचा घरकाम- अपत्यसंगोपन यातील सहभाग वाढणे, मॅटर्निटी रजेचा, पाळणाघरांच्या सुरक्षेचा प्रश्न आदी गोष्टींचा समावेष शहरी- निमशहरी भागातील स्त्रियांसंबंधी चर्चेत करता येतो.

३. वर प्रतिसादांत उल्लेखलेल्या आणि अतिशय गरजेच्या स्त्री- पुरूष दोहोंच्याही मानसिकता बदलासंबंधी काम करावे लागेल. स्त्रीप्रश्नावर संशोधन, तत्वज्ञान, अर्थशास्त्र यातील संशोधन यासाठी अतिशय आवश्यक आहे. जागरूक, सजग, सुजाण पालकत्व यात मह्त्वाची भुमिका बजावू शकते असे वाटते.

वरील तिनही मुद्द्यांवर एकाच वेळी काम करावे लागेल, ठामपणे, कृतीशीलपणे व विवेकी वृत्तीने, वितंडवादाने प्रश्न सुटू शकणार नाहीत असे वाटते.
स्त्री-पुरूष समानता हा मानवजातीच्या भल्यासाठी आवश्यक असलेला मुद्दा आहे. स्त्री विरूद्ध पुरूष असा हा लढा नाही. समानतावादी विरूद्ध असमान व्यवस्था टिकवू इच्छिणारे असा हा लढा आहे.

वर्षानुवर्षे हे पाणी- सरपण आणण्याचे काम करणार्‍या स्त्रियांना आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. मणक्याचे दुखणे, केस जाणे(खरोखर माझ्या पाहण्यात अशी उदाहरणे आहेत), मेंदूसंबंधीत काही प्रश्न, स्त्री- आरोग्यासंबंधी अडचणी इ. मराठवाड्यात काही गावांत चक्क १- १.५ किमि वरून पाणी वाहून आणावे लागते डोक्यावर.

उगाच काहीही. राजस्थानात बायका हजारो वर्षांपासून कितीतरी किलोमिटर्स वरून डोक्यावरून वाहून पाणी आणतात. आजही आणतात. तिथे काही प्रॉब्लेम आला नाही. मराठवाड्याच्या आणि राजस्थानाच्या बायकांची बायोलॉजी वेगळी आहे का?
----------------------------
या गोष्टींचा आणि पाणी आणण्याचा काय संबंध?
------------------------------
एका विशिष्ट खोलीच्या पलिकडे जाऊन पाणी काढले तर तिथल्या पाण्यातल्या काही तत्त्वांमुळे केस जातात. डोक्यावरून आणल्याने नव्हे.

पुंबा's picture

19 Apr 2018 - 12:22 pm | पुंबा

And in many places, water sources are far from homes. In Asia and Africa, women walk an average of 3.7 miles per day collecting water. Carrying such loads over long distances can result in strained backs, shoulders, and necks, and other injuries if women have to walk over uneven and steep terrain or on busy roads.

The burden is even heavier for women who are pregnant or are also carrying small children. Moreover, pregnant women worry that transporting these heavy loads will lead to early labor or even miscarriage.

लिंकः https://qz.com/1033799/women-still-carry-most-of-the-worlds-water/

आणखी:

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2939590/

http://www.downtoearth.org.in/news/fetching-water-is-a-woman-s-responsib...

माझी आई तसेच इतर ग्रामीण महिलांचे विश्व जवळून अनुभवल्याने त्यांच्या दु:खांशी, समस्यांशी फार गहिरा सम्बंध आलेला आहे माझा. माझ्यासाठी हा अतिशय हळवा कोपरा आहे. आपल्याशी वाद घालण्यापेक्षा या विषयावर अधिक चिंतन करणे मला योग्य वाटेल. त्यामुळे कृपा करून त्यांच्या कष्टांचा, दु:खांचा, समस्यांचा अपमान करू नका अशी नम्र विनंती.

माझ्यासाठी हा अतिशय हळवा कोपरा आहे.

This ends all the possibilities of an objective discussion.
और आप कहें और हम न मानें, ऐसा कभी हो सकता है?

arunjoshi123's picture

19 Apr 2018 - 1:10 pm | arunjoshi123

In Asia and Africa, women walk an average of 3.7 miles per day collecting water.

पावनं कुंकडलं मनायचं?

चूलीवर तासंतास स्वयंपाक करणार्‍या स्त्रियांना डोळ्याचे तसेच श्वसनसंबंधी होणारे आजार बहुतेकांस माहित आहेतच.

याची अधिक माहीती मिळेल?
माझं व्यक्तिगत निरीक्षण असं नाही.

पैसा's picture

19 Apr 2018 - 12:27 pm | पैसा

युयुत्सू यांच्या धाग्यात डॉ खरे यांनी या संदर्भात लिंक दिली आहे.

पुंबा's picture

19 Apr 2018 - 12:30 pm | पुंबा

https://timesofindia.indiatimes.com/india/Chulha-smoke-choking-Indian-wo...

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2491593/

https://sites.ndtv.com/breathe-clean/smoke-from-chulahs-biggest-killer-i...

मोदींच्या उज्ज्वला योजनेला म्हणूनच माझे पूर्णतः समर्थन आहे. या योजनेमुळे लाखो महिलांची सुरक्षीत स्वयंपाकाची सोय होईल.

कोणाच्याही नाजूक भावनांना हात घालण्याची इच्छा न करीत ...
=======================
एक काळ होता ज्यावेळी खनिज तेलाच्या विहिरीत निघणार्‍या प्राकृतीक वायूचे काय करावे हे कोणासही कळत नसे. त्यावेळी तो असाच जाळून टाकला जाई. मग हिरव्या लोकांनी सुचवलं कि आपण तो जंगले तोडणार्‍या आदिवासींना, इ फुकट देऊ. ....
त्यावेळी हे सग्ळं माहितिपुराण पसरावलं गेलं.
आपण वापरतो तो नॅचरल गॅस वा एल पी जी आणि लाकडे यांतून तेच प्रदूषक गॅस उत्पन्न होतात. उलट खनिज पदार्थांचे गॅस अधिक विषारी असतात. (सिगारेट पिणारे
चिमूटभर तंबाखू जळल्याने मरत नाहीत तर त्यातील अत्यत्यत्यल्प प्रमाणात असलेल्या, मायक्रोग्रॅम मधल्या, खनिज टारने मरतात.)
आधुनिक बायकांच्या चुली बंद किचनमधेच असतात. चिमणी लावायचे प्रमाण खूप कमी आहे.
हां, नॅचरल गॅस ने एस पी एम निर्माण होता नाही हा एक फायदा आहे.
====================
असो.

पैसा's picture

19 Apr 2018 - 12:25 pm | पैसा

@पुंबा, बहुतेक गोष्टीत सहमत आहे.

अभ्या..'s picture

19 Apr 2018 - 1:35 pm | अभ्या..

१. ग्रामीण स्त्रियांच्या समस्या, ज्यात आरोग्य, शिक्षण, लोकशाही प्रक्रियेत अधिकाधिक सक्रिय व जाणता सहभाग, सुरक्षा, शेतीचे प्रश्न, स्त्री-भ्रूणहत्येसंबंधी जागृती, जातपंचायतीसारख्या प्रतिगामी संस्थांचे महत्व कमी करणे, आर्थिक स्वावलंबित्व वाढवणे, शौचालय- पाणी- पर्यावरणाचे प्रश्न सोडवणे, बचत गट चळवळ, विधवा, परित्यक्त्या महिलांची एम्पॉवरमेंट यांचा समावेश करता येईल.

२. शहरी - निमशहरी स्त्रियांचे प्रश्नः मुख्य मुद्दा एकट्या राहणार्‍या वा नोकरी- व्यवसायासाठी बाहेर पडणार्‍या स्त्रियांची सुरक्षा, समान वेतन- मानधनाचा मुद्दा, आर्थिक स्वावलंबन, वृद्ध स्त्रियांचे प्रश्न, सुरक्षीत परिवहन सुविधा, कामाच्या ठिकाणी होणारे शोषण थांबवणे, संपतीच्निर्मितीचा प्रश्न, मुस्लिम स्त्रियांच्या संबंधात म्हणायचे झाले तर शिक्षण, तलाक- पॉलिगमी- संपत्तीच्या मालकी हक्क यात समानता, एकल मातांचे प्रश्न, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संशोधन यात स्त्रियांचा टक्का वाढणे, ऑनलाईन ट्रोलिंग, डिजिटल जेम्डर रिलेटेड गुन्हे, इनोव्हेशन, स्टार्ट अप यामध्ये महिलांचे प्रमाण वाढवणे, पुरूषांचा घरकाम- अपत्यसंगोपन यातील सहभाग वाढणे, मॅटर्निटी रजेचा, पाळणाघरांच्या सुरक्षेचा प्रश्न आदी गोष्टींचा समावेष शहरी- निमशहरी भागातील स्त्रियांसंबंधी चर्चेत करता येतो.

३. वर प्रतिसादांत उल्लेखलेल्या आणि अतिशय गरजेच्या स्त्री- पुरूष दोहोंच्याही मानसिकता बदलासंबंधी काम करावे लागेल. स्त्रीप्रश्नावर संशोधन, तत्वज्ञान, अर्थशास्त्र यातील संशोधन यासाठी अतिशय आवश्यक आहे. जागरूक, सजग, सुजाण पालकत्व यात मह्त्वाची भुमिका बजावू शकते असे वाटते.
बापरे...
तुम्ही तर व्हीजन ३००० मांडलेत. ब्रावो.

स्त्री-पुरूष समानता हा मानवजातीच्या भल्यासाठी आवश्यक असलेला मुद्दा आहे. स्त्री विरूद्ध पुरूष असा हा लढा नाही. समानतावादी विरूद्ध असमान व्यवस्था टिकवू इच्छिणारे असा हा लढा आहे.

झाला ना गोंधळ? आता कोण कुठली बाजू कधी घ्यायची? समानतावादी आणि समानताविरोधी म्हणजे पंडूचे पाच ते पांडव अन धृतराष्ट्राचे ते कौरव असा सोपा हिशोब नाहीये ना.

arunjoshi123's picture

19 Apr 2018 - 11:20 am | arunjoshi123

भारत बायकांसाठी अवघड देश आहे

आणि

* दुसर्‍या देशांशी तुलना अभिप्रेत नाही ,

याला काही अर्थ आहे का?
======================================
खासकरून अधिकांश उरबडवे, न्यूनगंडी लोक देशात असताना असलं शीर्षक आणि असली अट अयोग्य आहे.
=====================================
१. भारताचा रेप रेट १९८० पासून २०१८ पर्यंत घातांकित प्रमाणाने वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे.
२. अमेरिका व सर्व प्रगत देशांचा रेप रेट १९८० पासून आजपावेतो घातांकित प्रमाणाने घटत आहे. हे त्यांच्या यंत्रणांचं यश आहे.
३. तरीही २०१६ च्या आसपास अमेरिकेचा रेप रेट हा भारताच्या १५ पट आहे. अगदी त्यामानानं सुसंस्कारित मानलेल्या युरोपातही प्रत्येक देशात भारतापेक्षा ४-५ पट अधिक बलात्कार होतात.
=======================================
आणि तरीही ---------
१. प्रगत देशात शिक्षण १००% आहे.
२. पाश्चात्य देशांत संभोगमूल्ये भारतासाठी कडक नाहीत. नैसर्गिक भावनांची कोंडी म्हणा वा काही, पश्चिमेत तितकी होत नाही.
३. बलात्कारांच्या गुन्ह्यांत प्रगत देशात कव्हिक्शन रेट ९९% आहे जो भारतात खूप कमी आहे. गुन्हा केला तर जवळजवळ सजा होतेच. भारतात (जवळजवळ सर्वच प्रकारचे) गुन्हे करायला जणू काही मोकळीकच आहे!
४. आर्थिक प्रगतीच्या प्रमाणात गुन्हे कमी असतात असं मानलं जातं आणि भारताचा नॉमिनल पर कॅपिटा जीडीपी अमेरिकेपेक्षा ३० पट कमी आहे.
५. बलात्कारांचं अंडररीपोर्टींग पाशाच्त्य देशांतच जास्त आहे.
https://www.quora.com/Is-it-true-the-USA-and-Europe-are-more-unsafe-in-t...
==================================
असं असलं तरी आपल्याकडे तथाकथित प्रगत देशांपेक्षा १५ कमी बलात्कार होतात.... आणि याचं मूळ भारतीय विचारधारा, संस्कृतीत, इत्यादिंत आहे.

पैसा's picture

19 Apr 2018 - 12:34 pm | पैसा

अगदी बरोबर. यावर सहमत आहे.

एक जनरल मत मांडतो. अनेकदा कराटे वगैरेचा उल्लेख एक मुख्य उपाय म्हणून केला जातो. दोनपाच गुंडमवाली हल्ला करुन आल्यास कराटे वगैरेने मुकाबला इज फिल्मी डेड्रीमिंग at best आणि बुलशिट at worst..

त्यापेक्षा स्त्रीला फायरआर्म लायसेंस सहज मिळेल असं बघणं बेटर.

(स्त्रीच्या नावाखाली पुरुषच ती शस्त्रं वापरतील, स्त्रिया गैरवापर करतील इ. आक्षेप येतीलच.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Apr 2018 - 11:49 am | डॉ सुहास म्हात्रे

तुमचे म्हणणे खरे असले तरी... 'प्रतिकार होतो आहे' हा मुद्दा बर्‍याच वेळेस गुन्हा पुढच्या पायरीवर जाण्यास प्रतिबंधक ठरतो. याशिवाय, कराटे किंवा तत्सम शिक्षण प्रतिकार करण्यासाठी लागणारे मानसिक धैर्य वाढवते. काहीच संरक्षण नसण्यापेक्षा, किमान प्रतिबंक उपाय तरी हाती असणे, हे केव्हाही जास्त चांगले.

गवि's picture

19 Apr 2018 - 11:52 am | गवि

यावर फुरसतीत लिहितो.

arunjoshi123's picture

19 Apr 2018 - 12:04 pm | arunjoshi123

स्त्री जर अन्यथाही पुरुषांइतकाच समान क्षमतांची असेल तर आपल्या इक्वल्सला हाताळण्याकरिता अ‍ॅडीशनल टूल्सची गरज काय? मुलगी + कराटे = मुलगा असा हिशेब कशाला?

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Apr 2018 - 1:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

याशिवाय, कराटे किंवा इतर कोणताही एक उपाय सर्व समस्येवर रामबाण उपाय होऊ शकणार नाही. आजार मोठा आहे, जुनाट आहे आणि मुख्य म्हणजे जनमानसात खोलवर रुजून राहिलेला आहे... त्याच्या विरुद्ध, एकमेकांना पूरक असलेले अनेक प्रकारचे उपाय एकत्रितपणे करावे लागतील... काही सोपे व प्रसंग तारून नेणारे असतील, तर काही समस्येच्या मूळावर दूरगामी उपाय करणारे पण किचकट आणि वेळखाऊ असतील.

स्त्रिया गैरवापर करतील

अर्थातच करतील. करतात. स्त्रीयांना भारतीय संस्कृतीने देवीत्व दिलेले असले तरी त्यांची क्रिमिनॅलिटि पुरुषांच्यापेक्षा अजिबात कमी नाही.
-------------------
एक साधं निरीक्षणः
भारतात ज्या ज्या राज्यांत, समाजांत सांपत्तिक अधिकार स्त्रीवंशाला जातात नेमक्या तितक्या राज्यातच, समाजांत जेंडर रेशो स्त्रीयांच्या फेवर मधे आहे.

फार उपयुक्त होईल असं वाटत नाही. किती स्त्रिया पेपर स्प्रे सारखे प्रकार पर्स मध्ये ठेऊन हिंडतात ? लायसन्स सहज मिळणार असेल तरी किती स्त्रियांना ते परवडेल ? पब्लिक प्लेस मध्ये कायम फायरआर्म घेऊन हिंडणे शक्य आहे का ?
बाकी सहज फायरआर्म्स पँडोराज बॉक्स आहे असे वाटते.

नीमूट सहन करणं, प्रतिकार न करणं आणि शारीरिक हानि कमी करणं हा उपाय अत्यंत "नीच प्रकारची सूचना" समजला जात असताना उगीच कराटे वगैरे "दिलके बहेलाने के लिए ए गालिब" टाइप उपायांपेक्षा "किमान शारीरिक अपाय" हा गोल साध्य करणारा फायरआर्म्स हा उपायही मान्य होत नाही यात काहीतरी गोची आहे.

वुई डोंट वॉन्ट "सॉल्यूशन" बट जस्ट डिस्कशन, असं म्हणावं का?

जगात सर्वत्र ही समस्या असेलच. सर्वत्र हाच उपाय केलाय का? यशस्वी झालाय का?
अमेरिकेत तरी जबरदस्त फेल्यूअर आहे?
अ‍ॅनी मोअर डिस्कशन नॉट नीडेड ऑन आर्म्स.

किती स्त्रिया पेपर स्प्रे सारखे प्रकार पर्स मध्ये ठेऊन हिंडतात ?

ट्रेड मार्क's picture

19 Apr 2018 - 6:54 pm | ट्रेड मार्क

स्टन गन वा टेझर बाळगणे हा पण एक चांगला उपाय आहे. हे वापरून समोरच्याला विजेचा झटका दिला जातो ज्यामुळे ती व्यक्ती काही काळ पॅरालाईझ होते. याने जीवित हानी वा अन्य कायमची शारीरिक हानी होत नाही, थोड्या काळाने ही व्यक्ती पूर्ववत होते.

स्टन गन अगदी जवळून वापरता येते तर टेझर हे १२-१५ फूट लांब पर्यंत वापरता येतं. याचा आकार फक्त बंदुकीसारखाच नसून फ्लॅश लाईट, लिप स्टिक, की चेन, मोबाईल केस ई प्रकारात सुद्धा मिळतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला रिचार्जेबल बॅटरी असते.

सुबोध खरे's picture

20 Apr 2018 - 11:57 am | सुबोध खरे

कुठलेही शस्त्र हे त्याच्या स्वतःच्या शक्तीपेक्षा ते वापरणाऱ्यांच्या मानसिक शक्तीवर जास्त अवलंबून असते.
दोन उदाहरणे --
१) दिवस ०६ डिसेंबर १९९२ स्थळ- चितोडगड रेल्वे स्टेशन-- बाबरी मशीद पडल्यामुळे शहरात कर्फ्यू होता- मी( वजन ६५ किलो उंची ५'१०" किडकिडीत शरीर यष्टी) लग्नानंतर २ महिन्यात दुसऱ्या हनिमूनसाठी गेलो होतो.
दुसऱ्या दिवशीची गाडी पाहायला १० पावले पुढे गेलो असताना चार जणांच्या गटातील एका हलकटाने आसपास कोणी नाही हे पाहून माझ्या बायकोची छेड काढली. दोन मिनिटात परत आल्यावर बायकोने हि कहाणी सांगितली. मी ताबडतोब जाऊन त्या हलकटाच्या एक सण सणीत मुस्कटात मारली माझा हात आणि त्याचा गाल लालबुंद झाला. त्याचे तिन्ही साथीदार आवाज करीत पुढे आले. मी त्यांना धमकी दिली कि आर्मीतील कमांडो आहे जास्त शहाणपणा कराल तर हाडांची माळ करून गळ्यात घालीन. अख्ख्या स्टेशन वर आम्ही ६ जण आणि लांबवर फक्त स्टेशन मास्तर. पण माझ्या आवाजातील जोर पाहून चाऱ्हीजण मागे हटले. ( अर्थात हा जोर लष्करामुळे आला हे मान्य) पण असेच अनेक प्रसंग लष्कर सोडल्यावर झाले आहेत.
कुलाब्याला जात असताना सी एस टी स्थानकाच्या बाहेर बसमध्ये चढायला गेल्यावर एका हलकटाने माझ्या समोरच्या मुलीला धक्का मारला. मी कुणाचीही वाट न पाह्ता त्याच्या कानाखाली आवाज काढून रांगेतून बाहेर हाकलले. आम्ही बस मध्ये चढलो तो हलकट चढला नाही. दुर्दैवाने ती मुलगी गपचूप बायकांच्या सीटवर जाऊन बसली जसा काही घडलेलंच नाही.

२) स्थळ विशाखापट्टनम- १९९८. बायको एकटी बाजारात गेली होती. एका हलकटाने बायकोला मागून धक्का दिला. तिने त्याच्या मागे जाऊन खांद्यावर टकटक केले. त्याने वळून पाहताच एक सणसणीत कानफटात मारली. लाल गाल घेऊन तो काही ना बोलता गर्दीत गायब झाला.
मुद्दा -- पुरुष सुद्धा( आणि बायका) अशा वेळेस शेपूट घालतात. जाऊ दे कशाला भांडण, लोक काय म्हणतील? गर्दी जमली आहे. म्हणून गुंडांचे फावते.
बाकी -- आयत्या वेळेस हातात येईल ते शस्त्र सर्वात चांगले हि बिरबलाची शिकवण लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

जर १० पैकी ५ स्त्रियांनी प्रतिकार करायला सुरुवात केली आणि त्यांच्या नवऱ्याने बापाने भावाने त्यांना साथ दिली तर बहुसंख्य गुंड गर्दीचा गैरफायदा घेऊ धजणार नाहीत.
पण लक्षात कोण घेतो?

श्वेता२४'s picture

20 Apr 2018 - 12:38 pm | श्वेता२४

तुमचे म्हणणे पटले. मलाही एक प्रसंग नमुद करावासा वाटतोय. मी एकदा सीएसटी वरुन लोकलने (हार्बर)रात्री येत असताना स्त्रीयांच्या डब्यात एक मद्यधुंद तरुण मधेच चढला. तो जोरजोरात हातवारे करत दरवाज्याच्या पॅसेजमधून फिरत होता. डब्यात आम्ही तशा 10-12 स्त्रिया होतो पण कोणीच काही बोलेना. सगळ्याच तशा घाबरल्या होत्या (मीही). अचानकच तो आमतच्या दिशेने आत वळला तशी मी जोरात ओरडले बाहेर हो नाहीतर तुडवून मारीन. तसा तो जरा घाबरुन दरवाज्यात थांबला. मी तात्काळ डब्यात लिहीलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. सुदैवाने फोन उचलला गेला व पुढच्या स्टेशनवर एक-दोन होमगार्ड डब्यात चढले व त्याला ताब्यात घेऊन गेले. परंतु हे सगळं होईप्रयंत एकाही स्त्रीने मला पाठींबा दिला नाही की काही बोलल्यादेखील नाहीत याचं आश्चर्य वाटतं. त्या मानाने वेस्टर्न लोकलमधल्या बायका धाडसी आहेत व त्यांच्यात एकी दिसून येते. काही वावगं झालं की लगेच काही संबंध नसला तरी मधे पडतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Apr 2018 - 12:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

बंदूक फार "तीक्ष्ण दुधारी (लक्ष्यार्थाने)" शस्त्र आहे, हे अमेरिकेच्या सद्य परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे. शिवाय, तो उपाय एकदा खुला केला की त्याला मागे घेणे शक्य होत नाही, हे पण अमेरिकेच्याच उदाहरणात सिद्ध झाले आहे.

यांचे प्रतिसाद अत्यंत मौलिक आहेत असं वाटलं

काही लोकांना आपलं नागरिकत्व बदलायचं असतं. यात बराच अपराधबोध असतो. मग स्वतःच्या मनाची समज काढायला, लोकांना आपला थातुर मातुर स्टान्स दाखवायला भारत कसा वाइट आहे याचं थोडं प्रदर्शन करायचं असतं. आणि अलिकडे सोशल मिडीयामुळे "तिकडे" ठोकलेल्या बोंबा इकडे व्यवस्थित ऐकू यायची सोय आहे. नेमक्या अशाच मंडळींना भारत आणि विचारसरणी यांचं सुचतं.
यातली बहुतांश मंडली भारतात असताना फुकटे आणि दळिद्र जीवन जगत असते. भारत सरकारच्या सबसिडिवर जगतानाचा आणि उत्पन्न चालू होण्याआधी जीवनाचा जो स्तर असतो तीच त्यांची भारताची प्रतिमा असते. दुसर्‍या देशात प्रतिष्ठित कमावती नोकरी, इ मिळाल्याने व्यक्तिगत जीवनमान उंचावल्याने ते नेहमी समृद्ध विकसित देश नि तेव्हाचा गरीब भारत अशीच तुलना करत असतात.
भारतात सायकलवर जातानाचे तरुणपण असुरक्षित आणि विदेशात कारमधे जातानाचे प्रौढपण अतिसुरक्षित असेच यांचे डोके चालते.
============================================
आपला देश अतिशय उत्तम संस्कार असलेल्या लोकांचा देश आहे, रादर आधुनिकता येण्यापूर्वी होता.

अतिविकसित मानल्या जाणार्‍या स्कँडेनेवियन देशांत तर ५% लोक (होय ५%) हे म्हणायला घाबरत, लाजत नाहीत कि बालसंभोगाची ते कल्पना करतात.
http://www.bbc.com/news/magazine-28526106
------------------
अमेरिकेतले काही सरकारमान्य बालविवाह?
http://www.collective-evolution.com/2017/11/29/pedophilia-in-the-us-more...
===========================
यांच्यामानाने आपण खूप बरे.

धाग्याचा विषय भारतातील परीस्थिती तुलनेने चांगली की वाईट हा नसून भारत स्त्रियांसाठी अवघड बनत चाललाय व त्याचे मूळ विचारसरणीत आहे हा आहे. चर्चेचा रोख भरकटत आहे असं वाटतय

arunjoshi123's picture

19 Apr 2018 - 2:13 pm | arunjoshi123

भारत स्त्रियांसाठी अवघड बनत चाललाय व त्याचे मूळ विचारसरणीत आहे हा आहे.

याला अजिबात काही अर्थ नाही. कारण ज्या विचारसरणीला या धाग्यावर जबाबदार धरले जात आहे ती तर केव्हापासून लयाला जात आहे. १८५० पासून इंग्रजांनी नवे शिक्षण आणले आणि १९५० पासून नेहरूंनी अतिनवे शिक्षण आणले तेव्हापासून या शिक्षणाचा वा माध्यमांचा स्पर्श झालेले न झालेले अनंत लोक दिवसेंदिवस भारतीय विचारसरणीपासून दूर चालले आहेत.
आणि हा धागेवाला (आणि त्याचे अनेक टाळ्यावाजवी प्रतिसादक) म्हणतो कि वाढत्या बलात्कारांचे मूळ या जुन्या भारतीय विचारसरणीत आहे? पण भाऊ, तेव्हा तर बलात्कार जवळजवळ होत नसत. आणि असले तरी त्या विचारसरणिचा प्रभाव कितीतरी पट कमी झालाय. तिथे उत्तर शोधण्यात काय शहाणपणा? अरे, काही अर्थ आहे का असल्या चर्चेला? धागा जाग्यावर आणायला नको का?

कपिलमुनी's picture

19 Apr 2018 - 3:07 pm | कपिलमुनी

यावंर एक डिटेल लेख लिहून लोकांचे डोळे उघडून त्यांना भारतीय विचारसरणीची ओळख करून द्यावी ही नम्र विनंती !

श्वेता२४'s picture

19 Apr 2018 - 2:54 pm | श्वेता२४

वाढत्या बलात्कारांचे मूळ या जुन्या भारतीय विचारसरणीत आहे?

असं धागाकर्त्याने कुठं म्हणलंय?
पण भाऊ, तेव्हा तर बलात्कार जवळजवळ होत नसत

हे तर अजिबातच पटत नाही.

arunjoshi123's picture

19 Apr 2018 - 3:52 pm | arunjoshi123

सदर धाग्यावर भारतीय विचारसरणीचा उल्लेख कितीतरी जागी झाला आहे. यात कुठेही एकाही प्रतिसादकाला भारतीय विचारसरणी म्हणजे आजच्या आधुनिक शिक्षणाने, वैज्ञानिक दृश्टीकोनाने प्रदान केलेली विचारसरणी असं अभिप्रेत नाही. शिव्या देताना, दुषणं देताना जिला भारतीय विचारसरणी म्हटलं आहे ती पारंपारिकच आहे. हे सिद्ध करण्यात वेळ घालवायची गरज नाही.
भारतीयांना विषाद वैगेरे आपल्या परंपरांचाच होतो, त्यात चर्चा करायचा प्रश्नच येत नाही.
=========================

हे तर अजिबातच पटत नाही.

का नाही पटत?
अगोदरच्या काळात सगळे तुम्हाला ओळखत, लग्नं वेळेत होत, बेकारी नसे, स्थित्यंतरं अव्वाच्या सव्वा नसत, मोबाइलवर पॉर्न लागत नसे, घरी अत्यंत दृढ धार्मिक संस्कार असत, त्यातूनही एखादा वासनेला बळी पडला तर त्याला (स्त्रीच्याच) तप्त पुतळ्याला अलिंगन असल्या सजा असत.
युद्धोत्तर बलात्कार नि लव जिहाद सोडलं तर जवळजवळ सन्नाटा असायचा.
============================
२०१५ मधे नागालँडमधे बलात्काराची (इतिहासातली) पहिली केस झाली. (असं मी ऐकलं आहे.). त्यावेळी १० हजार लोकांनी आरोपीला तुरुंगातून काढून मारून टाकले.

श्वेता२४'s picture

19 Apr 2018 - 4:48 pm | श्वेता२४

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची इतिहासाची (इतर कोणत्याही विद्यापीठाची किंवा पाठ्यक्रमाची पुस्तके पण हेच सांगतात.)प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक स्त्रीजीवन यावरील पुस्तके वाचा. तुमच्या सगळ्या दाव्यातील फोलपणा कळून येईल. या तीनही काळआतल्या स्त्रियांचे अवेळी लग्न होत असे, त्यांना पळवून नेले जाई तसेच या काळातील विधवांवर सर्रास बलात्कार होत व त्यांना वाळीत टाकले जाई त्यामुळे तर काहीजणी वेश्यव्यवसायात ढकलल्या जात. उगाच नाही महात्मा फुल्यांना बालहत्याप्रतिबंधकगृहाची स्थापना करावी लागली. असेच एक गृह पंढरपुरात स्थापन केले गेले होते. यावरुन ही समस्या किती गंभीर होती हे लक्षात येईल. याला तुम्ही अत्यंत दृढ धार्मिक संस्कार म्हणता कि काय? आता तुम्हाला शिकविण्यात येणारी इतिहासाची पुस्तके खोटा इतिहास शिकवितात असे म्हणायचे असेल तर पुढे बोलण्यात अर्थ नाही.

विशुमित's picture

19 Apr 2018 - 5:16 pm | विशुमित

| श्वेता ताई अजोनी दिलेले दाखले जास्त मनावर नाही घायचे. जेवढा मनोरंजक भाग आहे फक्त तेवढ्याचाच आस्वाद घायचा.

श्वेता२४'s picture

19 Apr 2018 - 5:41 pm | श्वेता२४

वेळीच हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. मी जरा जास्तच गंभारपणे घेतलं. यापुढे घेणार नाही.

बिटाकाका's picture

19 Apr 2018 - 7:41 pm | बिटाकाका

माझे मत (वेळीच) सांगतो. अजोंनि मांडलेले मुद्दे बऱ्याच अंशी रास्त आहेत ( त्यांचे मुद्दे बहुतांश वेळी डेटा आणि फॅक्टस वर आधारित असतात असे माझे निरीक्षण आहे) काही लोकांचं काशातूनही मनोरंजन होऊ शकतं पण त्याला इलाज नाही. तुमचे आणि त्यांचे या धाग्याशी निगडित मुद्दे मनोरंजनासाठी खचितच वाटले नाहीत. त्यामुळे त्यांचे मुद्दे तुम्हाला पटले नाहीत तर त्याचे विश्लेषण जरूर करा, अमच्यासारख्यांच्या ज्ञानात भर पडते.

arunjoshi123's picture

19 Apr 2018 - 5:59 pm | arunjoshi123

विशुमित,
खास तुझ्यासाठी अजून काही मनोरंजन ...
=======================================
बलात्कार या क्षेत्रात भारताची जी दैदिप्यमान घोडदौड चालू आहे ती अशीच चालू राहिली तर २०-२५ वर्षांत आपण "वन ऑफ द मोस्ट सेफ नेशन्स फॉर विमेन" पासून एक "मोस्ट अनसेफ नेशन" च्या पदाला पोचू.
अर्थातच तुला ठावे असेलच जगात केवळ भारतातच ही समस्या नाही. ती अन्य अनेक देशांत आहे. आणि जिथे जिथे या समस्येला वचक बसला आहे तिथे तिथे त्या त्या सरकारांनी तिथल्या लोकांच्या (या धाग्यावरील प्रकट झालेल्या जुनाट) विचारसरणींवरच आघात करून ही समस्या सोडवली आहे!
==============================================
याला उत्तर शोधताना "आपली पारंपारिक विचारसरणी" हे कारण मानून जर उपचार चालू केले तर ही घोडदौड अजून १० वर्षे अगोदर पूर्ण होईल
असे म्हणणार्‍या आमचे मनोरंजनमूल्य देशास कायमचे उपयोगाचे राहिल.

अरे तुरे वाचलेले पाहून मोठ्या भावाने आपल्याला पत्र लिहलेले प्रतीत झाले. असो..
====
बरं मग करायचे काय आता ?

माझ्या ठायी पैलेपासूनच बंधुभाव आहे.
==================

बरं मग करायचे काय आता ?

कोणी काहीही केलं तरी तुमचं मनोरंजनच होणार आहे.

विशुमित's picture

19 Apr 2018 - 8:27 pm | विशुमित

अरे भावा आपल्या भाऊकीतल्या भाऊकीत मनोरंजन होईल पण ज्या त्रयस्थाला तुझे मुद्दे पटत आहेत त्यांच्या ज्ञानात भर पडेल ना..
तुला लिहायला काय नॅट कमी पडतय का?
तु काही बी लिहलं तरी आपला पाठिंबा पहिल्या पासूनच हाय...
पुढे काय करायचं??

अभ्या..'s picture

19 Apr 2018 - 5:59 pm | अभ्या..

अजोनी दिलेले दाखले जास्त मनावर नाही घायचे. जेवढा मनोरंजक भाग आहे फक्त तेवढ्याचाच आस्वाद घायचा.

हा ना. नाहीतरी आपल्याला कुठं सोल्युशन काढायचेय? एकतर पार पुराणकालातले दाखले देत बसायचे नाहीतर अस्तित्वात यायला कदाचित १०० वर्षे लागतील अशा युटोपियाचे वर्णन करायचे. सद्यस्थितीत काय उपाय म्हणले की ब्लेमगेम सुरुच. कोर्टातही हेच चालत असेल आणि नुसत्या बालिका/स्त्रियाच नव्हे तर समस्त निर्बल, हताश, कायद्यावर विश्वास ठेवणारे कायदेशीर बलात्कार सहन करत असतील.

अर्धवटराव's picture

20 Apr 2018 - 5:58 pm | अर्धवटराव

फार मागे वळुन बघणे हा आपला एक प्रॉब्लेम आहेच.
क्रॉनीक समस्येवर चर्चा करताना, उत्तर शोधताना फार मागे वळुन बघावं लागतं, संस्कृती-समाज रचना वगैरे मुद्दे ध्यानात घ्यावे लागतात, हे मान्य. पण समस्या वर्तमान काळात उग्र झाली आहे आणि भविष्यात ति आणखी त्रास देणार आहे, शिवाय वर्तमानाचे आणि भविष्यकालीन समाजव्यवस्थेचे संदर्भ भूतकाळापेक्षा प्रचंड भिन्न आहेत. त्यामुळे उपाय शोधायचे असतील तर ते पुढे बघुन शोधावे लागतील, मागे वळुन नाहि.

arunjoshi123's picture

19 Apr 2018 - 5:33 pm | arunjoshi123

या तीनही काळआतल्या स्त्रियांचे अवेळी लग्न होत असे,

पण सासरी त्या वयात आल्यावर जात.

त्यांना पळवून नेले जाई

कोण?

वेश्यव्यवसायात ढकलल्या जात

आता तर या व्यवसायाला आधुनिक मान्यताच आहे!
=================================================
तरीही मला जे म्हणायचं आहे ते प्रमाणाबद्दल म्हणायचं आहे. आणि प्रकाराबद्दलही म्हणायचं आहे.
इतकं प्रमाण आणि इतकं विकृतीकरण कधीही नव्हतं.

https://www.ndtv.com/india-news/4-year-old-girl-allegedly-raped-head-sma...
प्रक्षोभ केव्हा व्हावा?
मिडियाला पाहिजे तेव्हा?
स्वप्रताडन करायला जास्तीत जास्त स्कोप मिळेल तेव्हा?
कि घटना किती निंदनीय आहे यावरून?
================================
वरील बातमी जम्मूपेक्षा खूप घाण्णेरडी आहे. अलिकडचीच आहे. याच्यावर एकही चर्चा झालेली नाही. बातमीवरही कुणी कमेंट केलेली नाही इतकी ती त्यावेळी निरुपयुक्त असावी!

अभ्या..'s picture

19 Apr 2018 - 7:11 pm | अभ्या..

परफेक्ट.
आजकाल कुठल्या प्रकरणात जनमानस उठेल न चर्चा होइल त्याचे आडाखे ठरल्यासारखे झालेले आहेत. एखादा क्रियेटिव्ह स्क्रीप्ट रायटर लिहिलेल्यासारख्या प्रतिसादाच्या घटना घडत आहेत. कुठलिही घटना/दुर्घटना घडली की ती अशा पध्दतीने प्रोजेक्ट केली जाते की हमखास टाळ्या शिट्ट्या मिळवणारे बच्चनचे सलीम जावेद कृत डॉयलॉग जणू. बर जनमानसही अगदी चाकोरीतून जात अपेक्षित असे प्रतिसाद देत बसते. त्यातून अपेक्षित कोण काय साध्य करतंय हेही जाणून घ्यायची तसदी कोणी घेत नाही. दिवाळी आहे ना, मग वाजवून घेतला आपला पण फटाका. किंवा पेटलीय ना होळी मग घ्या बोंबलून आपल्याला वाटते त्याच्या नावाने.
गेली ती असिफा, माझ्या लेखाला प्रतिसाद मिळाले ना, झाला तो बलात्कार, मी तर आहे ना देशाबाहेर. झाला ना तो खून, मग केलाय ना निषेध, होतीय ना दंगल, तसलेच आहेत ते,
दळभद्री जिण्याची फेस्बुकी कहाणी नुसती सार्‍यांची. बजाव ताली, मारो लाइक.

चित्रगुप्त's picture

19 Apr 2018 - 11:22 pm | चित्रगुप्त

दळभद्री जिण्याची फेस्बुकी कहाणी नुसती सार्‍यांची. बजाव ताली, मारो लाइक.

या वाक्यास आमचेकडून शंभर टाळ्या आणि हजार लाईक मारले जात आहेत.

पैसा's picture

19 Apr 2018 - 7:24 pm | पैसा

पुढच्या लोकसभा निवडणुका होईपर्यंत दर महिन्यात काहीतरी धुरळा उडवला जाईल. पिडीतांचे किंवा त्यांच्या घरच्यांचे नंतर काय झाले याचे कोणाला पडलेले नसते. आम्हाला मेणबत्त्या लावून निषेध करायला मिळाला की आम्ही कर्तव्य भावनेने खुश. ही घ्या अजून एक बातमी.
https://www.google.co.in/amp/www.dnaindia.com/india/report-cleric-held-f...
शोधले तर खूप मिळतील. स्त्रियांचे भ्रूण मारून लोकसंख्येचा तोल बिघडला आहे हे कोणाच्या गावी नसेल.

प्रसाद गोडबोले's picture

19 Apr 2018 - 7:56 pm | प्रसाद गोडबोले

पुढच्या लोकसभा निवडणुका होईपर्यंत दर महिन्यात काहीतरी धुरळा उडवला जाईल.

>>> +१ .

अत्यंत घाणेरड्या स्तराला पोहचलेले राजकारण पाहुन खेद वाटतो. काँग्रेस , सेक्युलर लोकं कशाचं भांडवल करत आहेत ? बलात्काराच्या घटनेचं ? तेही आठ वर्षांच्या चिमुरड्या पोरीच्या ? आणि भाजपा वाले तरी काय करत आहेत ? असल्यांना बलात्कार प्रकरणात संशयित असालेल्यांना बचावायचा प्रयत्न? न्यायव्यवस्थेवर दबाव आणणे ?

अवघड आहे .

गामा पैलवान's picture

19 Apr 2018 - 8:20 pm | गामा पैलवान

मार्कस,

आणि भाजपा वाले तरी काय करत आहेत ? असल्यांना बलात्कार प्रकरणात संशयित असालेल्यांना बचावायचा प्रयत्न?

इथे संशयित हाच गुन्हेगार आहे हे गृहीतक आहे. हे चुकीचं असू शकतं. ज्या मुलाकडे बोट दाखवलं आहे तो हजार किमी दूर परीक्षा देत होता. त्याचा बाप सांझीराम या संशयिताची मागणी सीबीआय चौकशीची आहे.

आ.न.,
-गा.पै.

प्रसाद गोडबोले's picture

19 Apr 2018 - 9:19 pm | प्रसाद गोडबोले

गा.पै.,

माझे काहीही गृहीतक नाही. संशयित हा संशयित च आहे आणि कोर्टात पुराव्याने शाबित होत नाही तोवर निर्दोषही आहे . पण तोवर त्याला न्यायालयीन प्रक्रियेपासुन वाचवण्याचा प्रयत्न करणे , मोर्चा बिर्चा काढणे हे योग्य नाही. सीबीआय ने तपासणी जरुर करु दे पण तोवर सदर व्यक्ती संशयित गुन्हेगार असल्याने तुरुंगात (लॉक अप ) असावी .

न्यायालयीन प्रक्रियेला अडथळा आणणे हेच ह्या प्रकरणात संशय निर्माण करणारे आहे . दुर्दैवाने भाजपाशी आणि हिंदु समता मंच की काय शी निगडीत लोकं ते करतन दिसले आहेत म्हणुन उगाच सुज्ञ आणि सुजाण हिंदु बदनाम होत आहेत. सदर संशयित आरोपी निर्दोष असेल तर नक्की सुटेल , पण तो आरोपी सिध्द झाला तर तुम्ही त्याच्या बचावार्थ इथे प्रतिसाद लिहिलेला होता हे लोकांच्या कायम लक्षात राहील !

बाकी ह्या सार्‍या प्रकरणात बहुतांश हिंदुत्ववादी नेतेलोकांनी घेतलेला स्टॅन्ड अत्यंत निराशाजन्क आहे . एक तर न्यायालयीन प्रक्रियेला अडथळा आणणे चुकीचे , त्यानंतर व्हॉटअबाऊटरी करणे त्याहुन चुकीचे ! मीडीयाचा हिंदुद्वेषी बायस मी जाणतो, बॉलीवुडमधल्या उपटसुंभांचे सिलेक्टीव्ह अरण्यरुदनही मला माहीत आहे पण म्हणुन हिंदुंनी व्हॉटाअबाऊटरी करणे समर्थनीय नाही !

आपले हिंदुत्व शिवरायांचा आदर्श ठेवणारे आहे , अत्याचारी व्यक्तीला , त्याचा गुन्हा पुराव्याने शाबित झाल्यावर , त्याची जात पात पक्ष बिक्ष न पहाता चौरंगा करण्यात आलं पाहिजे !

बिटाकाका's picture

19 Apr 2018 - 9:47 pm | बिटाकाका

काही सायलेंट गृहीतके नको म्हणून -
१. भाजप नेते आणि हिंदू एकता मंच यांच्या मोर्चाची मागणी सगळ्या आरोपींच्या सुटकेसाठी नव्हती, फक्त दीपक खजुरीया (पोलीस अधिकारी) याच्या सुटकेसाठी होती. त्याला ओळखणाऱ्या समाजातील लोकांचे म्हणणे तो असे कधीच करणार नाही असे असल्याने बराच पाठिंबा होता.
२. इतर बहुतेक सगळ्या मोर्चांची मागणी प्रकरण सीबीआय कडे सोपवावे अशी होती. या मागणीत काही गैर वाटते काय?
**************************
यातील किंवा यापुढील कुठलीही असंवैधानिक कृती नक्कीच ठोकून काढली जावी (वकिलांवर गुन्हे दाखल जझाले आहेत). पण त्याबरोबरच संवैधानिक गोष्टींबद्दल फक्त भावनेच्या भरात असहिष्णुता दाखवली जाऊ नये ही अपेक्षा रास्त नाहीये का?

गामा पैलवान's picture

19 Apr 2018 - 10:18 pm | गामा पैलवान

मार्कस,

तुम्ही शिवाजीने केलेला चौरंगा उल्लेखलात. त्यात उघड पुरावा होता. पण या प्रसंगी प्रथमदर्शी पुरावा संबंधित संशयिताकडे अणुमात्रही निर्देश करीत नाही. खून झाला दिवसांपूर्वी आणि प्रेत आज सापडलं. कुठे? तर हिंदू मंदिरात. हा सरळसरळ सत्याचा अपलाप नव्हे काय? मग काश्मीर पोलिसांवर विश्वास बसेल काय कोणाचाही? बकरवाल समाजाची मुलगी होती. तिच्या समाजातले लोकंही सीबीआय चौकशीची मागणी करताहेत. त्यांचाही काश्मिरी पोलिसांवर विश्वास नाही. कृपया हे चलचित्र पाहणे : https://www.facebook.com/tgtpost/videos/2122302284655399/

वरील चलचित्रात १ मिनिट २० सेकंदांनी बकरवाल माणूस स्पष्टपणे सीबीआय चौकशीची मागणी करतांना दिसतो आहे. मग हिंदुत्ववादी नेतेलोकांनी तशीच मागणी केली तर काय बिघडलं?

आ.न.,
-गा.पै.

शिवराय न्यायकर्तेही होते आणि दंडकर्तेही.
इथे कुठला पुरावा कुणाकडे निर्देश करतो हे ठरवायचे काम न्यायालय असताना दुसर्‍याने का करायचे? सत्य काय आहे ते ठरवायचा अधिकार एखाद्या व्यक्तीने/जमावाने घेतला तर हीच पध्दत प्रत्येक जण अनुसरेल. नुसती डोकी जमवून मोर्चे काढले तर कायदेशीर रित्या त्याला मज्जाव करता येत नाही (प्रॉपर परवान्ग्या घेऊन वगैरे) पण मोर्चाचा उद्देश काय? फिर्यादीच्या नातेवाईकांनी ठरवायचे का कुणी तपास करायचा ते? मग आरोपीच्या नातेवाईकांनी अजुन कुणाकडे तपास द्या म्हनले तर?
कश्मीर पुलीस इतकीच हरामखोर आहे, कुणाचाच त्यांच्यावर विश्वास नाही तर तर कुठेतरी उघडी पडेलच ना? इतकी हरामखोरी कुणाच्या जीवावर करताहेत ते? कश्मीरमधली न्याव्यवस्था पण तशीच आहे का? कुठेतरी पुलीस उत्तरदायी असेलच ना? भारतातले कुठलेच कोर्ट त्यांना बोलावू शकणार नाही काय? त्यांना प्रश्न विचारु शकणार नाही काय?
मला जास्त माहीत नाही पण कश्मीर कायदा आणि न्यायव्यवस्थेसाठी पण भारतापासून इतके तुटलेले आहे काय?
आणि इतकी गचाळ पध्दतीने सारीच व्यवस्था किडलेली असेल फक्त विचाराने अन चर्चा करुन मार्ग निघेल असे तरी वाटत नाही. सरळ आमच्या सन्नी पाजींच्या सिनेमांतून प्रेरणा घ्यावी हे उत्तम.

ट्रेड मार्क's picture

20 Apr 2018 - 3:31 am | ट्रेड मार्क

इथे कुठला पुरावा कुणाकडे निर्देश करतो हे ठरवायचे काम न्यायालय असताना दुसर्‍याने का करायचे?

आता कसं बरोब्बर बोललात. सध्या हे काम आधीच काही ठराविक लोक करून टाकत आहेत ना? परत आपल्याला पाहिजे तास निकाल नाही लागला तर न्यायालयाच्या विश्वासार्हतेवर पण प्रश्न विचारला जातो.

सत्य काय आहे ते ठरवायचा अधिकार एखाद्या व्यक्तीने/जमावाने घेतला तर हीच पध्दत प्रत्येक जण अनुसरेल.

आपली वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल्स, पुरोगामी विचारवंत आणि कलाकार हाच तर अधिकार हातात घेत आहेत आणि त्यालाच तर आमचा आक्षेप आहे. त्यावर ते फक्त त्यांच्या अजेंड्याला पुष्टी मिळेल एवढंच सत्य म्हणून ठासून सांगतात. इथे तर संपूर्ण देश आणि धर्माला वाईट ठरवलं जातंय.

फिर्यादीच्या नातेवाईकांनी ठरवायचे का कुणी तपास करायचा ते? मग आरोपीच्या नातेवाईकांनी अजुन कुणाकडे तपास द्या म्हनले तर?

कठुआच्या या घटनेत सगळेच गावकरी सीबीआय कडे तपास द्या म्हणत आहेत. फिर्यादी (पीडित) कुटुंब आणि त्या जमातीतले इतर लोक सुद्धा तीच मागणी करत आहेत. मग फक्त काही न्यूज चॅनेल्स, काही राजकारणी आणि पुरोगाम्यांना फक्त त्या पुजाऱ्यालाच आधीच गुन्हेगार का ठरवायचंय?

arunjoshi123's picture

19 Apr 2018 - 6:38 pm | arunjoshi123

जम्मूच्या घटनेने अनेक लोकांना आपण हिंदू असल्याची लाज वाटली आहे.
============================
अगोदर कोणी असला हिडीसपणा केला तर त्यास धर्मबाहेर काढत. आता केला धर्म त्याला अर्पण करून स्वतः धर्माबाहेर होत आहेत. खूप आधुनिक प्रकार दिसतो हा. आता कोण्या भारतीयाने दुश्कृत्य केले तर देश त्याला अर्पण करून लोक श्रिलंकेत जाणार वाटतं.

आणि विशेष म्हणजे इंडिया किंवा जास्तीत भारत पर्यंत पोहीचणार्यांना अचानक "हिंदुस्थान"ची लाज वाटायला लागणे जर विस्मयकारकच आहे.

माहितगार's picture

19 Apr 2018 - 9:57 pm | माहितगार

अ जो नी वर एका प्रतिसादात नागालॅण्ड मध्ये स्त्री विरोधी गुन्ह्यांचे प्रमाण कमी होते आणि आता ते वाढते आहे याचा उल्लेख केला आहे .

या नाण्याच्या दोन्ही बाजू बघणे गरजेचे आहे . जी सकारात्मक बाजू होती ती आधी बघू . ब्रिटिशकृत ख्रिश्चनीकरणाआधी ; नागा लॅण्ड मध्ये प्रत्येक खेड्यात सायंकालीन अथवा रात्रकालीन वास्तव्य आणि सांस्कृतिक संवर्धन आणि मनोरंजनासाठी ; वयात आलेल्या
तरुणांसाठी सामायिक तरुण गृह आणि वयात आलेल्या तरुणींसाठी सामायिक तरुणी गृह वसती गृह असते या वसतिगृहांना मोरुंग आणि इतर अनेक स्थानिक नावे असत विवाह होईपर्यंत रोज या वसतिगृहांतच रात्र घालवली जाई दिवस आपापल्या कुटुंब आणि जमाती सोबत शेतकी शिकारी त घालवला जात असे .
(तरुणींना तरुणांच्या वसती गृहास जाण्याची आणि मुलांना मुलींच्या वसतिगृहास एक ट्याने जाण्याची अनुमती नसे ) गाणी नृत्ये स्थानिक सांस्कृतिक धार्मिक कर्मकांडे आणि काही जमातीय मूल्यांचे मार्गदर्शन केले जात असे . पण बाकी सांस्कृतिकते पलीकडे जाऊन तरुण मुले गटाने मुलींच्या वसती गृहात जा ऊन एकमेकांच्या प्रति गीतांच्या माध्यमातून व्यक्तिगत प्रेम स्पष्ट आणि मोकळेपणे व्यक्त केले जाई . वसतिगृहातील मुले मुली लग्न ठरलेल्याना संसार उभा करण्यात त्यांच्या परीने मदत करत अर्थात प्रॉपर्टी राईट वडिलांकडून मुलांकडे जात . कुटुंब आणि समाजाच्या हस्तक्षेपा शिवाय जोडीदाराने प्रोपोज करण्याचे आणि जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य वसतिगृहातून होणाऱ्या मैत्रीतून मिळणारे संरक्षण या सकारात्मक बाजू झाल्या . म्हणजे कुणी आवडले आणि व्यक्तच करता आले नाही असे बरेच कमी होत असेल . (यात पुरुषांच्या पुर्नविवाह विषयक काय व्यवस्था होत्या ते अधिक अभ्यासावे लागेल पण स्त्रियांना घटस्फोट घेता येत असे , विधवा घटस्फोटित तरुणी वसतीगृहाचा आसरा घेत . ) अर्थात या वसतिगृहातून ख्रिश्चनेतर संस्कृती टिकूनये म्हणून नव्याने धर्मान्तरित होणाऱ्या नागांना चर्च प्रचारक धर्ममार्तंडांनी ह्या वसतिगृहातील सहभाग बंद पाडला आणि तरुण - तरुणींसाठी योग्य मोकळीक उपलब्ध करणारी एका संस्कृती लयास गेली .

या नागा संस्कृतीची दुसऱ्या बाजूस काही महत्वपूर्ण मर्यादाही होत्या , जमाती आणि खेडे यांची आपापसात शतकोशतके चालत आलेली वैर आणि सातत्याची अतिहिंसक संघर्ष ज्यात जो शत्रूंचे जास्तीत जास्त शिरकापुन जमा करत असे तो पुरुष शूर समाजाला जाई . प्रॉपर्टी आजही वडिलांकडून मुलांना जाते स्त्रियांना प्रॉपर्टी आणि न्याय - स्थानिक जमात पंचायत यंत्रणा आणि राजकारणात मुंगी एवढा स्वतः:साठी न्याय मागण्यासाठीही पाय ठेवण्याची २१व्याशतकातही अनुमती नाही. बाकी भारताची न्याय व्यवस्था लागू ना होऊ देण्यासाठी प्रॉपर्टीचे हितसंबंध चर्च यांचे हितसंबंध तयार होऊन बसले आहेत . एकदा जमात पंचायतीने माघारी दिलेला जोकाही निवाडा असेल तो नैसर्गिक न्यायाच्या तत्वांवर उत्तराला नाही तरीही स्त्रियांना निमूटपणे स्वीकारावा लागतो . जिथे तुम्हाला पंचायती समोर केसाच नेता येत नाही , भारतीय न्याय यंत्रणेत केसच नेता येत नाही तिथे गुन्हे झाल्याची नोंद दिसेलच कशी . ठीक आहे शिरा कापले जाण्याच्या भीतीने सर्वसामान्या पुरुषांकडून स्त्रियांनां हात लावला जाताही नसेल पण जे स्वतः: शिरकापण्यात एक्सपर्ट असत आणि पंचायतीचा न्याय फिरवान्या एवढी प्रॉपर्टी असेल त्यातील काहींनी स्वतः: स्त्रियांचे शोषण केले तारा त्याची नोंद सुनावणीस या नागा संस्कृतीत जागा नव्हती हेही लक्षात घेतले पाहिजे .

अर्थात मोरुन्ग वसतीगृह संस्कृतीतील पहिला भाग सकारात्मक निवड स्वातंत्र्याचा आजही विचार करण्यासारखा म्हणवता येईल .

परस्त्री कडे आदराने पहाण्या बद्दलचे सुसंस्कारही ह्याच भारतीय भूमीत केले जातात.

हाच प्रॉब्लेम आहे. परस्त्री मातेसमान मानण्याचे ढोंगी संस्कार करत राहणे, शाळांमधून सक्तीने मुलांना मुलींकडून राखी बांधून घ्यायला लावणे, मानलेला/ली भाऊ/बहीण असली तद्दन फालतू नाती ग्लोरिफाय करत राहणे, स्त्री ही शक्ती, देवी आहे वगैरे तद्दन निरर्थक संकल्पनांना खतपाणी घालत राहणे....असल्या कुचकामी संस्कारांमुळे आपल्या देशात "स्त्री" म्हणजे एक फिल्मी, काव्यात्म, अध्यात्मिक वगैरे ऊर्जा-बिर्जा आहे असे चित्र निर्माण झाले आहे. हे सगळे मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे. परस्त्री मातेसमान मानणे यासारखा भिकार आणि ढोंगी संस्कार फक्त भारतातच असू शकतो. साहजिकच अशा संस्कारांमुळे बंधने आली, बांध आले आणि स्त्री म्हणजे एक दुष्प्राप्य स्वप्न आहे असा समज सगळीकडे पसरला. सामाजिक, शारिरिक, मानसिक कुचंबणा वाढली. मूळ मानवी स्वभाव उसळ्या मारत राहिला. त्यातूनच वखवख वाढली आणि बलात्कारासारखे क्रूर गुन्हेदेखील वाढले. आपण स्त्रीला स्त्रीच राहू दिले असते तर कदाचित चित्र वेगळे असले असते. असो. दांभिकपणा आणि ढोंगीपणा हा भारताइतका प्रचलित आणि शिष्टसंमत इतरत्र कुठेच नसेल.

गामा पैलवान's picture

20 Apr 2018 - 1:11 am | गामा पैलवान

समीरसूर,

मुलीकडे बहिणीसारखं बघायला लावणारे शाळेतले संस्कार ढोंगी आहेत का? तसं असेल तर मग महाराष्ट्र टाईम्स मध्ये येणारी अनावृत्त स्त्रीचित्रे सुसंस्कार करणारी म्हणायला हवीत. तुम्ही म्हणताय ती वखवख अशा नागड्या स्त्रीदेहांमुळे वाढलीये. तिचा संस्कारांशी कसलाही संबंध नाही.

आ.न.,
-गा.पै.

असं कसं कुठल्याही मुलीकडे बहिणीसारखं बघता येईल हा मोठा प्रश्न आहे. ज्या वयात मुले शाळेतल्या शिक्षिकेकडेदेखील कुतुहलमिश्रित नजरेने बघतात त्या वयात कुठलीही परकी मुलगी बहिणीसमान असते हे कसं पटेल? असं परस्त्रीकडे इतक्या पवित्र नजरेने बघणं कितपत शक्य आहे मला माहित नाही. परस्परांविषयी आकर्षण हा निसर्गधर्म आहे. तो दाबून मानलेली बहिण वगैरे नाती बनवणं हा तद्दन मूर्खपणा आहे. कित्येक अशा 'मानलेल्या' नात्यात असं नातं फक्त सोय म्हणून असतं; समाजाने नावे ठेवू नयेत म्हणून.

आकर्षण असणारच; आपल्या शिक्षणाचा, विचारशक्तीचा, भाव-भावनांचा, माणूसपणाचा सदुपयोग करून माणूस म्हणून जगायचं हा यावरचा खरा उपाय आहे. हे शिक्षण झालं पाहिजे. दुर्दैवाने भारतात खरं शिक्षण बाजूला पडतं आणि फिल्मी संस्कारांचं स्तोम माजवलं जातं. आजकाल शाळांमधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम हद्दपार झाला आहे ते हे सत्य उमगल्यामुळेच!

असं कसं कुठल्याही मुलीकडे बहिणीसारखं बघता येईल हा मोठा प्रश्न आहे.

का? का? काय प्रॉब्लेम आहे?
==============================
यना जसं "सारे भारतीय माझे बांधव आहेत" असं म्हणतात मात्र प्रॉपर्टी कोणाशीच वाटत नाहीत तसं असतं. इतकं लिटरली घेत नसतात. बादवे, हिंदूंत आते, मामे मुसलमानांत चुलत आणि पारश्यांत सख्ख्या बहीणिशी लग्न करतात. अशा शंभर गोश्टी असल्या तरी मनात, समाजात जनरली भगीनीभाव असणंच बरं. आमच्याकडे बायकांना ताई म्हणणे, गुजरातमधे बेन म्हणणे (तसेच बंधुवाचक शब्द) ही भारतीय परंपरा चांगली आहे.

समीरसूर's picture

20 Apr 2018 - 4:13 pm | समीरसूर

जे नैसर्गिक नाही ते मुद्दाम आटापिटा करून कसं आणता येईल? अहो, माणसाचं मन हे एक निबिड अरण्य असतं. असं ठरवून सगळं करता आलं असतं तर प्रत्येक जण सुखी, आनंदीच राहिला असता. :-) नर आणि मादी या दोघांमध्ये आकर्षण असणारच. ते टाळणं विश्वामित्राला, इंद्राला नाही जमलं; तुमची-आमची काय कथा...

@ समीरसूर

मला हि किंवा ती एकांगी भूमिका घ्याय्ची नाही . सध्याची भूमिका समाजाने बदलावी वाटत असेल तर १) आपले तर्क सध्याचा समाज व्यवस्थीत तपासून मागेल २) आपल्या पर्यायी मांडणीचीही चिकित्सा होईल.

१ संदर्भाने काही प्रश्न मला ही आपणापूढे उपस्थित करावयाचे आहेत पण तत्पुर्वी मुद्दा २ साठी पर्यायी सांस्कृतीक व्यवस्था काय असावी असे तुम्हाला वाटते ? याच्या आपल्या उत्तराची प्रतिक्षा प्राधान्याने आहे.

समीरसूर's picture

20 Apr 2018 - 4:27 pm | समीरसूर

आपल्या शिक्षणाचा, विचारशक्तीचा, भाव-भावनांचा, माणूसपणाचा सदुपयोग करून माणूस म्हणून जगायचं हा यावरचा खरा उपाय आहे. हे शिक्षण झालं पाहिजे. दुर्दैवाने भारतात खरं शिक्षण बाजूला पडतं आणि फिल्मी संस्कारांचं स्तोम माजवलं जातं. आजकाल शाळांमधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम हद्दपार झाला आहे ते हे सत्य उमगल्यामुळेच!

माहितगार's picture

20 Apr 2018 - 5:04 pm | माहितगार

"माणूस म्हणून जगायचं' म्हणजे नेमके काय ? समजा तुम्हाला तुमच्या मुलांना मार्गदर्शन करायचे आहे तुम्ही नेमके कसे कराल ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Apr 2018 - 4:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहमत.

सगळ्या स्त्रीजातीची आई अथवा बहिण अशी अनैसर्गिक विभागणी करण्यापेक्षा, "इतर कोणत्याही जवळीक नसलेल्या व्यक्तीशी आदराने, सौहार्दाने आणि त्या व्यक्तीच्या स्वत्वाला धक्का न लावणारी एक मर्यादा ठेवून कसे वागावे याचे (पक्षी : समाजात जबाबदार नागरिक म्हणून कसे वागावे याचे) शिक्षण देणे जरुरीचे आहे". ही शिकवण देणे केवळ कोणत्या शिक्षणसंस्थेची जबाबदारी नसून, एक आवश्यक कौटुंबिक संस्कार आहे, अशी जाणीव समाजात निर्माण करणे जरूरीचे आहे.

कोणाचा जबरदस्तीने मुलगा अथवा भाऊ बनण्याऐवजी, "आपल्या आई-बहिणींशी इतरांनी जसे वागावे असे वाटते, तसेच आपण इतरांच्या आई-बहिणींशी वागले पाहिजे" इतका किमान समजूतदारपणा व्यवहारात आला तरी खूप झाले.

बिटाकाका's picture

20 Apr 2018 - 4:52 pm | बिटाकाका

आदराने, सौहार्दाने आणि त्या व्यक्तीच्या स्वत्वाला धक्का न लावणारी एक मर्यादा ठेवून

म्हणजेच आपण आपल्या आई बहिणीसोबत जसे वागतो तसे ना?
******************************************
बहिणीसामान मानावे म्हणजे लैंगिक दृष्टीने बघू नये हा एकमेव अर्थ का चिकटवावा? बहिणीसामान म्हणजे आपण म्हणता तसे वागावे असा अर्थ अभिप्रेत नाहीये का?
******************************************

समाजात जबाबदार नागरिक म्हणून कसे वागावे याचे

आई बहीण मानणे ह्याच प्रोसेसचा एक भाग नाहीये का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Apr 2018 - 8:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

सगळ्या प्रयत्नांचा उद्येश काय असावा याचा सारांश वर दिला आहेच.

कोणाचा जबरदस्तीने मुलगा अथवा भाऊ बनण्याऐवजी, "आपल्या आई-बहिणींशी इतरांनी जसे वागावे असे वाटते, तसेच आपण इतरांच्या आई-बहिणींशी वागले पाहिजे" इतका किमान समजूतदारपणा व्यवहारात आला तरी खूप झाले.

"नातेवाईक नसलेल्यांना नातेवाईक समजा" असा वरवरचा अशक्य उपदेश यात नाही. केवळ, "एकमेकांच्या नातेवाईकांशी सभ्यपणे वागण्यात सर्वांचाच फायदा (common good) आहे " हे पटण्यासारखे प्रोत्साहन आहे.

मला वाटते, घरच्यांचे वागणे-बोलणे, समाजातली समज-मान्यता आणि कायदा यांच्या एकत्रित दबावाने अशी सामाजिक जाणीव निर्माण झाली तरी खूप फरक पडेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Apr 2018 - 9:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुख्य म्हणजे, "एखाद्याशी सभ्यपणे वागायला तो आपला नातेवाईकच असायला हवा", ही कल्पना मनात रुजवणे हे सभ्य व्यवहाराला मारक ठरू शकते... कारण त्या वाक्याचा व्यत्यास, "नातेवाईक नसलेल्या व्यक्तिशी 'सभ्यपणे वागू नये' किंवा 'सभ्यपणे वागले नाही' तरी हरकत नाही" असा होतो, नाही का ?

त्याऐवजी, "नाते, जात, धर्म, देश, इत्यादींच्या पलिकडे जाऊन प्रत्येक सभ्य व्यक्तीला माणूस म्हणून सभ्यतेची वागणूक देणे, ही माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे" हा विचार जास्त योग्य आहे. सभ्य व्यवहारासाठी, कोणत्याही असलेल्या/नसलेल्या/मानलेल्या नातेसंबंधांच्या भावनांची किंवा भावनिक ब्लॅकमेलिंगची गरज नसावी.

बिटाकाका's picture

20 Apr 2018 - 9:42 pm | बिटाकाका

नातेवाईक बनवा हा त्यातला एस्सेन्स आहे असे मला अजिबात वाटत नाही. माझ्यामते, आपल्या बहिणीला, आईला जो आदर देता तोच तुम्ही इतर स्त्रियांना द्या असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. बहीण बनवा म्हणजे लगेच सगळ्यांकडून राख्या बांधून घ्या, किंवा भाऊबीजेला ओवाळून घ्या असा त्याच अर्थ खचितच नाही.
***************************
तुम्ही म्हणता तो सभ्यतेचा विचार योग्यच आहे पण तोच बेस्ट आहे म्हणणे योग्य नाही. तो जर रुजने सोपे असते तर दुसरा विचार आला नसता.
***************************
बहीण माना याला टवाळकीगिरी करणाऱ्यांमुळे एक वेगळा लौकिक अर्थ प्राप्त झाला आहे असे वाटते. पण मूळ विचार हा आदराशी निगडित आहे असे नमूद करतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Apr 2018 - 10:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

नातेवाईक बनवा हा त्यातला एस्सेन्स आहे असे मला अजिबात वाटत नाही.

तर मग, उपमा-उत्प्रेक्षा वापरून जबरदस्तीने/आडवळणाने नात्याचा उल्लेख आणून मानसिक गोंधळ करण्याची गरजच काय ? आदराला आदर म्हणावे, त्याला नात्याचा आधार हवाच कशाला ?

दुरान्वयाने नात्याचा संबंध वापरणारी पद्धत वापरल्यास मग, मोठ्या माणसांना आई-काकू-मामी-इत्यादी किंवा वडिल-काका-मामा-इत्यादी समजून सभ्य व्यवहार करावा अशी न संपणारी यादी बनत जाईल !

त्यापेक्षा, "सभ्य व्यक्तीचा, इतर सभ्य व्यक्तींशी, सभ्य व्यवहार असावा कारण तसे वागणे आपल्यासकट सर्व समाजाला फायद्याचे आहे. (त्यासाठी त्या व्यक्तीचा आपल्याशी प्रत्यक्ष, मानलेला किंवा इतर कोणत्याही प्रकारचा संबंध असण्याची गरज नाही)" हे सरळ, सोपे, सर्वसमावेशक व व्यावहारीक सत्य समजून सभ्यपणा अंगवळणी पडणे जास्त प्रभावी व दूरगामी असेल, असे मला वाटते.

असो. तेच ते म्हणणे मी वेगवेगळ्या प्रकारे मांडून झाले आहे. तेव्हा, इत्यलम.

तुमची व्याख्या मुळात सभ्य आणि तेवढी समज असणाऱ्या लोकांना लागू होईल . जमिनी सत्यता बहिणीला देता तसा आदर द्या म्हणण्यात आहे असे मला वाटते.
********************
नात्यांनी गोंधळ उडून जातो वगैरे उगाच आपल्यासारखे (म्हणजे मी आणि तुमच्यासारखे इतर) आशा गिष्टींचं इतका किस पाडणारे यांना वाटते. सर्वसामान्य लोकांना मतितार्थ सहज कळत असेल. माझ्या लहानपणी मला तरी साधारण हाच अर्थ पटला असेल असे वाटते.
*******************
तुम्ही म्हणता ती ना संपणारी यादी आपल्या संस्कृतीने विचारपूर्वक "वडीलधारे" या एका शब्दात उरकली आहे.
*******************
बादवे, तुम्ही म्हणता तो विचारही आपले संस्कार आणि संस्कृती शिकवतेच ना?
*******************
या मुद्द्यावर एकमवकांचे विचार खूपच वेगळे आणि पक्के असल्याने, असहमतीवर सहमती दर्शवण्यास माझी हरकत नाही.

माहितगार's picture

20 Apr 2018 - 4:16 pm | माहितगार

....कित्येक अशा 'मानलेल्या' नात्यात असं नातं फक्त सोय म्हणून असतं; समाजाने नावे ठेवू नयेत म्हणून.

याला नेमकी हरकत काय आहे ?

समीरसूर's picture

20 Apr 2018 - 4:26 pm | समीरसूर

हरकत काहीच नाही पण मग असा बुरखा तरी का पांघरायचा? काय गरज असावी? आणि अशा कित्येक नात्यांमध्ये बर्‍याच इतर 'सोयी' देखील भागवल्या जातात हे जगजाहिर आहेच. थोडक्यात हे नातं ढोंगच ठरतं...सोय ठरतं.

@ समीरसूर निवडस्वातंत्र्य अधिक विकसीत व्हावयास हवे हे मान्य आहे.

पण ज्या पुरुषांनी या पारंपारीक संस्कृतीस अंगी बाणून पर स्त्रीयांचा मान राखला त्यांची त्यांच्या तत्वावरची पाळलेली सकारात्मक निषपूर्ण, आणि अशा निष्ठेने ज्या स्त्रीयांना संरक्षण आणि आदर मिळाला असेल त्याचे क्रेडीट पूर्ण नाकारयचे का ?

एनीवे पर्यायी सांस्कृतीक व्यवस्था काय असावी असे तुम्हाला वाटते ?

असल्या कुचकामी संस्कारांमुळे आपल्या देशात "स्त्री" म्हणजे एक फिल्मी, काव्यात्म, अध्यात्मिक वगैरे ऊर्जा-बिर्जा आहे असे चित्र निर्माण झाले आहे.

हे सगळे संस्कार कुचकामी आहेत असं वाटणारांची एक मोठी फौज निर्माण झाली आहे आणि ती भारतीय स्त्रीला स्त्री म्हणून अप्रोच करत आहे. त्यातूनच सगळ्या नात्यांचं पावित्र्य नष्ट झालं आहे. शिवाय मधे मधे कठूआ वैगेरे होत आहे. आहात कुठे?

समीरसूर's picture

20 Apr 2018 - 3:59 pm | समीरसूर

आपले संस्कार पोथीनिष्ठ, फिल्मी, अतिआदर्श असतात. आपण स्त्रीला देवी मानतो आणि मुलगी होणार असेल तर गर्भाचा क्रूर खूनही करतो आपणच! परवा एकाने थेरगावला (पुणे) गरोदर बायकोच्या पोटात लाथा मारल्या. का? त्याला असं वाटलं की ती मुलीला जन्म देणार आहे. हे सुशिक्षित कुटुंब होतं. गेल्या ७-८ दिवसात भयानक बलात्काराच्या बातम्या वाचून दर वेळेस अंगावर काटा आला. एका घटनेत बापानेच मुलीवर बलात्कार केला आणि स्वतःच्या मित्रांना तिच्यावर बलात्कार करण्यासाठी बोलावलं. अक्षरशः ६-७-८ वर्षांच्या मुलींवर राजरोस, दररोज, भयानक पद्धतीने बलात्कार होतात. आपले शेकडो वर्षे जुने असलेले संस्कार गेले कुठे? ते जर खरोखर सशक्त असते तर भारतात मुलींची-महिलांची इतकी वाईट परिस्थिती असली असती का? मी वर सांगीतलेल्या उदाहरणात त्या माणसाच्या गरोदर बायकोला त्याच्या दोन बहिणींनी घट्ट धरले आणि मग त्याने तिला पोटात लाथांनी मारलं. बाईच बाईच्या जीवावर उठते. कुठे जातं बाईचं तथाकथित देवीपण?

आपले संस्कार आणि त्यातला फोलपणा तपासून बघण्याची गरज आहे. आणि बदलण्याची तर नितांत गरज आहे. तरच आपली मानसिकता बदलेल. नाहीतर हे असंच चालू राहिल....नुसतं भारतीय संस्कार, भारतीय संस्कृती वगैरे पोपटपंची करून काही उपयोग नाही.

arunjoshi123's picture

20 Apr 2018 - 4:16 pm | arunjoshi123

ओके ओके

बिटाकाका's picture

20 Apr 2018 - 5:22 pm | बिटाकाका

गृहीतक चुकीचे नाहीये का? जो "अमुक एक" स्त्रिला देवी मानतो तोच "अमुक एक" गर्भाचा क्रूर खून करतो असे आहे का ते? कि मुच्युअली एक्सकलूजीव आहे ते? जो देव मानत होता त्यानेच पोटात लाथा मारल्या असा अर्थ काढला जाऊ शकतो का?
----------------------------------------------------------

आपले शेकडो वर्षे जुने असलेले संस्कार गेले कुठे? ते जर खरोखर सशक्त असते

ते सशक्त राहिले नाहीयेत म्हणूनच या घटना घडतात असे मत बऱ्याच जणांनी वर मांडले आहे तेव्हा...
----------------------------------------------------------
याबाबतीतील/अशा घटनांच्या विरोधातील भावनेची धार बोथट होऊ नये म्हणून प्रयत्न करणे आवश्यकच आहे पण चुकीचे संदर्भ, बातम्या, तथ्य पुरविले जाऊ नयेत हि अपेक्षा रास्त नाहीये का?
एका घटनेत बापानेच मुलीवर बलात्कार केला आणि स्वतःच्या मित्रांना तिच्यावर बलात्कार करण्यासाठी बोलावलं. - ती बातमी बाप आणि मुलीचे (सोळा वर्षांपूर्वी लग्न झाल्यावर दोन वर्षात वेगळे झाल्यावर) संबंध होते असं गावकर्यांचं म्हणणं आहे असेही सांगते. गावकऱ्यांच्या तक्रारीने त्याला अटक झाल्यावर दोन महिन्यापूर्वी जमीन मिळाला होता. कृपया माझ्या मुद्द्याचा विपर्यास ना करता फक्त डेटा कडे लक्ष द्यावे हि विनंती.
अक्षरशः ६-७-८ वर्षांच्या मुलींवर राजरोस, दररोज, भयानक पद्धतीने बलात्कार होतात. - दररोज? हि अतिशयोक्ती नाहीये का?
कुठे जातं बाईचं तथाकथित देवीपण? - त्या प्रकारात हे दिवीपण तिला देण्यात आलं होतं? तसे संस्कार देऊन हे घडले आहे? याबद्दल काही माहिती असल्यास पुरवावी.
---------------------------------------------------------
आपण आपल्यात बदल जरूर घडवावेत, पण अंधपणाने नाही. या वाढत्या घटनांमुळे आणि त्यांच्या ऍग्ग्रेसिव्ह रिपोर्टींगमुळे आपण बलात्कार करणार्यांना संस्कार देण्यात आले होते पण तरीही ते तसे वागले हे हळूहळू गृहीत धरायला लागलो आहोत का?

मार्मिक गोडसे's picture

20 Apr 2018 - 4:38 pm | मार्मिक गोडसे

नैसर्गिक अवस्थेत फिरणाऱ्या अंदमानातील जारवा जमातींमध्ये बलात्कार होतात का?

बलात्कार माकडात पण होतात.

माहितगार's picture

20 Apr 2018 - 5:12 pm | माहितगार

तुम्हा दोघांनाही नेमके काय म्हणायचे आहे ?

मार्मिक गोडसे's picture

20 Apr 2018 - 7:57 pm | मार्मिक गोडसे

शेकडो वर्ष जारवा जमाती नैसर्गिक अवस्थेत वाढत असताना monogamy पाळतात, की इतर प्राण्यांसारखी polyagamy ही आढळते?

माहितगार's picture

20 Apr 2018 - 8:24 pm | माहितगार

monogamy , अर्थात वैधव्यानण्तर पुर्नविवाह होतात असे दिसते. संदर्भ पिडीएफ

मार्मिक गोडसे's picture

20 Apr 2018 - 8:37 pm | मार्मिक गोडसे

मर्यादित लोकसंख्येमुळे समजा जोडीदार उपलब्ध नसेल तर?

चित्रगुप्त's picture

20 Apr 2018 - 5:44 pm | चित्रगुप्त

तुम्हा दोघांनाही नेमके काय म्हणायचे आहे ?

सहमत. दोन्ही प्रतिसादकर्त्यांनी कृपया खुलासा केल्यास या विषयाचा आवाका समजण्यास मदत होईल. या दोन्ही प्रतिसादातून सूचित होणारी दिशा मूलभूत मानवी वर्तनाचे आकलन करून घेण्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. डेस्मंड मॉरिस यांनी The Naked Ape आणि The Human Zoo या महत्वाच्या पुस्तकांमधे याबद्दल उहापोह केलेला आहे.

...

गामा पैलवान's picture

20 Apr 2018 - 6:17 pm | गामा पैलवान

समीरसूर,

आपले शेकडो वर्षे जुने असलेले संस्कार गेले कुठे? ते जर खरोखर सशक्त असते तर भारतात मुलींची-महिलांची इतकी वाईट परिस्थिती असली असती का?

तुमचं वरचं विधान रोचक आहे. तुम्ही सशक्त हा शब्द वापरला आहे. सशक्त म्हणजे शक्ती धारण केलेला किंवा शक्ती धारण करू शकणारा. साहजिकंच एखादा बलदंड माणूस नजरेसमोर येतो.

आता असं बघा की त्या बलदंड माणसाला आपलं बल टिकवून धरण्यासाठी खायला पौष्टिक अन्न व यथोचित व्यायाम हवाच ना? तोच न्याय संस्कारांनाही लावला पाहिजे. शाळेत झालेले संस्कार जर दृढ ठेवले नाहीत तर ते गंजून जाणारंच ना?

म.टा. मधली उघडीनागडी सनी लियोन शालेय संस्कार बळकट करतेय का? वखवख संस्कारांमुळे होत नसून सनी लियोनमुळे वाढतेय. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी तर होत नाहीये ना?

आ.न.,
-गा.पै.

मार्मिक गोडसे's picture

20 Apr 2018 - 8:17 pm | मार्मिक गोडसे

म.टा. मधली उघडीनागडी सनी लियोन शालेय संस्कार बळकट करतेय का? वखवख संस्कारांमुळे होत नसून सनी लियोनमुळे वाढतेय. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी तर होत नाहीये

शाळेत नेमके कोणते संस्कार केले जातात ?
माझ्या दिवसाची सुरवात सनी दर्शनाने होते, परंतु वखवख नाही वाढत. तुमच्या बंबानी कधी आग विझवली आहे का?

गामा पैलवान's picture

21 Apr 2018 - 1:24 am | गामा पैलवान

मा.गो.,

१.

शाळेत नेमके कोणते संस्कार केले जातात ?

ते समीरसूर यांना विचारायला हवं. त्यांनी शालेय संस्कारांना चर्चेत आणलं.

२.

माझ्या दिवसाची सुरवात सनी दर्शनाने होते, परंतु वखवख नाही वाढत.

अभिनंदन. सनीला पाहिल्याचं नव्हे तर वखवख न वाढल्याबद्दल अभिनंदन. मात्र सगळे तुमच्यासारखे सोज्वळ नसतात. सनीदर्शनाने बऱ्याच लोकांची वखवख वाढू शकते.

३.

तुमच्या बंबानी कधी आग विझवली आहे का?

मी आग विझवायच्या धंद्यात नाही.

आ.न.,
-गा.पै.

चित्रगुप्त's picture

21 Apr 2018 - 3:51 am | चित्रगुप्त

माझ्या दिवसाची सुरवात सनी दर्शनाने होते, परंतु वखवख नाही वाढत.

.

बाबौ.... या सनीला बघून वखवख वाढणार तरी कशी आणि कुणाची ?

टवाळ कार्टा's picture

21 Apr 2018 - 5:07 am | टवाळ कार्टा

प्रथेप्रमाणे याही धाग्याचे काश्मीर होण्याचे दिसत आहे

नाखु's picture

21 Apr 2018 - 8:40 pm | नाखु

यालाच म्हणतात हरिदासाची कथा मूळ पदावर!!

गुलाल बुक्का यांपासून दूर असलेला नाखु वाचकांची पत्रेवाला