दोन "भयचकीत" करणारी संशोधनवृत्ते

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
14 Apr 2018 - 1:04 pm
गाभा: 

मी नुकत्याच अधिजनुकशास्त्रावर लिहीलेल्या लेखात काही धोक्याच्या इशारे दिले. ते इशारे देण्य़ाने मी भीति पसरवत आहे असा एक आरोप माझ्यावर करण्यात आला. हे इशारे काही वास्तव बिंदूना जोडून उभे राहणार्‍या चित्राकडे पाहून दिले होते, याकडे पूर्ण दूर्लक्ष करण्यात आले होते. पण ते असो.

नुकतीच दोन "भयचकीत" करणारी संशोधनवृत्ते वाचनात आली. त्यांचे दूवे देत आहे -

० २०५० पर्यंत अन्नधान्याची समस्या वाढून समाज कोलमडू शकतो.

या धोक्याचा अधिजनुकीय बदलांशी निकटचा संबंध आहे, हे "त"वरून ताकभात ओळखणार्‍याना सहज कळेल.

पृथ्वीवरचे जर सर्व बर्फ वितळले तर संपूर्ण मुंबई पाण्याखाली जाईल आणि पुण्याच्या सीमेपर्यंत समुद्राच्या लाटा पोचतील.
याला जवळजवळ ५००० वर्षांचा अवधी आहे.

या इशारे देणार्‍या संस्थाकडे कुणी समस्यांची उत्तरे मागितल्याचे दिसले नाही.

धोक्याचे इशारे विज्ञानातून मिळतात तेव्हा शहाणे ते गंभीरपणे घेतात आणि आपला पुढचा मार्ग आखतात आणि मूर्ख लोक स्वत:ला आणि इतरांना फसवत राहतात.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

14 Apr 2018 - 1:47 pm | कपिलमुनी

>>>>पुण्याच्या सीमेपर्यंत समुद्राच्या लाटा पोचतील.

मुंबईकर सतत पुणेकरांना तुमच्याकडे समुद्र नाही म्हणून हिणवत असतात त्यांची चांगली खोड मोडेल

नाखु's picture

14 Apr 2018 - 9:14 pm | नाखु

माझ्या घरापर्यंत येईल का? कारण जवळच्या चौकात चौपाटी नावाचं उपहारगृह आहे!!!

नजर हटी दुर्घटना घटी या धास्तीने धास्तावलेल्या मिपाकरांपैकी एक नाखु

सुबोध खरे's picture

14 Apr 2018 - 2:15 pm | सुबोध खरे

इशारा देणे आणि भयगंड निर्माण करणे यात फरक आहे.

दुर्दैवाने आपल्याला तो समजून घ्यायचाच नाही.

तुम्हाला मधुमेह आहे त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर तुम्हाला हृदय विकाराचा झटका येऊ शकतो हा इशारा देणे
आणि तुमचा मधुमेह नियंत्रणात नाही त्यामुळे तुम्ही सहा आठ महिन्यात मरणार तेंव्हा सर्व निरवानिरव करून ठेवा असा भयगंड निर्माण करणे यात जो फरक आहे तोच इथे आहे

उगाच सवंग सनसनाटी विधाने करायची ( DNA टेस्टिंग करू इ) सिस्टिमला विचारा-म्हणजे नक्की कुणाला काय आणि कसे याबद्दल अवाक्षर नाही

बाकी चालू द्या.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Apr 2018 - 3:14 pm | प्रकाश घाटपांडे

होय. वर्तमानपत्राच्या आरोग्य पुरव्ण्या आरोग्य जागृती या नावाखली या दोन्हीच मिश्रण वापरतात.

मार्मिक गोडसे's picture

14 Apr 2018 - 5:36 pm | मार्मिक गोडसे

क्या आप क्लोज अप करते हैं?
या दूनियाको डराते हैं?
उलटी सिधी बाते करतें हैं?
कॉन्फिडन्ससे जलते हैं?
आप क्लोज अप क्यूँ नही करते हैं?
आप चले तो बात बने l

युयुत्सु's picture

14 Apr 2018 - 6:44 pm | युयुत्सु

महानगरीय प्रदूषण आणि आत्महत्या

महानगरीय प्रदूषण आणि आय० क्यु० वरील परिणाम

अवांतर - भारतीयांचा आय क्यु कमी असण्याचे संभाव्य कारण प्रदूषण असू शकेल काय?

सुबोध खरे's picture

14 Apr 2018 - 8:42 pm | सुबोध खरे

हा डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा आणि अधिजनुकशास्त्राचा काय संबंध आहे?
the apolipoprotein ε4 allele असलेल्या बालकाना प्रदूषणामुळे अल्झायमर होईल किंवा त्यांचा बुध्यांक कमी होईल.
the apolipoprotein ε३ allele असलेल्या बालकांना हे होणार नाही. ठीक आहे. मुंबईत ४ लाख मुलांना e ४ allele आहे आणि ४ लाखांना नाहीये. मग apolipoprotein ε4 allele असलेल्या बालकाना मुंबईच्या बाहेर काढता येणार आहे का?
यात प्रदूषणामुळे अधिजनुकांवर परिणाम झाल्याने हि मुले किडकी निघाली आणि त्यांची संतती अजून किडकी निघाली असे काही तरी वाचायला मिळेल वाटले होते
प्रदूषणामुळे असले "फार काळाने होणारे"च काय हृदयाचे, फुफुसाचे, पोटाचे अनेक आजार होतात ज्याने माणसाचे आयुर्मान कमी होते आणि आजारपण वाढते हे वैद्यक शास्त्राला माहित आहे. अहो गरोदर स्त्रीने एक पेग दारूचा घेतला तरी होणाऱ्या बालकाच्या मेंदूवर गंभीर परिणाम होतो हेही सिद्ध झाले आहे.
उगाच pm २.५ मुळे काही तरी होते हे कशाला सांगताय? खेड्यात चुलीच्या धुरातिल pm २.५ मुळे कित्येक बायका लवकर मरण पावतात हे मी तुम्हाला सप्रमाण दाखवलंय. त्यांच्या अधिजनुकांवर काय परिणाम होतो ते पहिल्यान्दा पहा कि
कशाला उगाच शहरी प्रदूषणाबद्दल टाहो फोडताय?

दीपक११७७'s picture

15 Apr 2018 - 12:30 am | दीपक११७७

५००० हजार वर्षात पुणेकर मासळी सारखे पोहायला आणि मासळी खायला शिकले म्हणजे मिळवले!
बादवे,
ते एकदम उकळत्या पाण्यात टाकुन अॅडाॅप्शन कसं होत हे पाहाणे झाले काय?

राई का पहाड

राजे, पृथ्वी वर उल्था पालथ तर होतच राहणार. साध्या चुलीच्या धुरा मुळे किती परिणाम होतात, मग विचार करा प्रचंड ज्वालामुखी स्पोट अथवा एखादा जबरी उल्कापात याने भुतकाळात किती प्रदूषण केलं असेल. तरीपण जगलेच की नाही आपले पूर्वज, आणि अातातर काय मंगळावर जाणार आहोत आपण.
हे सगळ चालायचंच हो अभ्यास करण पण ठिक आहे, पण उगाच बाऊ करण्यात काय अर्थ आहे.

आणखी एक बादवे,
HIV AIDS चा पण असाच बाऊ केला होता, तसं मात करण्यासाठी प्रयत्न पण छान केले गेले, पण त्या साठी समागम करण्याचे सोडुन द्या, ब्रम्हचारी व्हा असा कांगावा केल्याचे स्मरत नाही असो

परत नंतर कधी तरी

ज्वलामुखी आणि स्फोट दिवसभर होत नाही आणि अक्खा देशभर होत नाही

लाखो चुली दिवसातून दोन वेळा तरी पेटत असतात

युयुत्सु's picture

16 Apr 2018 - 6:01 pm | युयुत्सु

व्यस्त असल्यामुळे प्रतिसाद द्यायला उशीर झाला.

वर एका प्रतिसादामध्ये खालील विधाने केली गेली आहेत.

"मग apolipoprotein ε4 allele असलेल्या बालकाना मुंबईच्या बाहेर काढता येणार आहे का?
यात प्रदूषणामुळे अधिजनुकांवर परिणाम झाल्याने हि मुले किडकी निघाली आणि त्यांची संतती अजून किडकी निघाली असे काही तरी वाचायला मिळेल वाटले होते"

पुढे केवळ वानगीदाखल प्रदूषणामुळे निर्माण होणारे हृदयातील जन्मजात दोष सिद्ध करणार्‍या संशोधनाचा दाखला देत आहे. माझ्यासारख्यांसाठी अधिजनुकीय बदलांच्या परिणामांची व्याप्ती कळण्यासाठी एव्हढे पुरेसे आहे.

"Journal of Cardiovascular Development and Disease
Review
Genetic and Epigenetic Mechanisms Linking
Air Pollution and Congenital Heart Disease

Cecilia Vecoli *, Silvia Pulignani and Maria Grazia Andreassi
Institute of Clinical Physiology-National Research Council (CNR), Via Moruzzi, 1 56124 Pisa, Italy;
pulignani@ifc.cnr.it (S.P.); andreas@ifc.cnr.it (M.G.A.)
* Correspondence: vecoli@ifc.cnr.it; Tel.: +39-050-3152688
Academic Editors: Bradley B. Keller and Andy Wessels
Received: 28 July 2016; Accepted: 26 November 2016; Published: 29 November 2016
Abstract: Epidemiological studies strongly suggest that parental air pollutants exposure during the
periconceptional period may play a major role in causing fetal/newborn malformations, including
a frequent heterogeneity in the methods applied and a difficulty in estimating the clear effect of
environmental toxicants. Moreover, only some couples exposed to toxicants during the pre-conception
period give birth to a child with congenital anomalies.
The reasons for such phenomena remain
elusive but they can be explained by the individual, innate ability to metabolize these contaminants
that eventually defines the ultimate dose of a biological active toxicant. In this paper, we reviewed
the major evidence regarding the role of parental air pollutant exposure on congenital heart disease
(CHD) risk as well as the modulating effect on detoxification systems. Finally, major epigenetic
alterations induced by adverse environment contaminants have been revised as possible mechanisms
altering a correct heart morphogenesis"

या बालकांना मुंबईबाहेर काढायचे की अशी बालके जन्माला येऊ नयेत यासाठी एड्स आणि एचाय्व्ही सारखी लोकजागृती करायची
हे समाजासाठी आह्वान आहे. अशी लोकजागृती केली जाणार नाही कारण मोठ-मोठी हॉस्पीटल्स आणि त्यांनी ठेवलेले हृदय-शल्य विशारद रिकामे राहतील.

सुबोध खरे's picture

16 Apr 2018 - 8:18 pm | सुबोध खरे

All the contradictory studies on the potential impact of environmental exposures in affecting congenital anomalies have been recently reviewed in two different meta-analyses [37,40]. The two studies found some evidence for an effect of ambient air pollutants on congenital cardiac anomaly risk although the most recent study showed only a significant association between NO2 concentrations and aortic coarctation


Conclusions


Altogether, the data available so far suggest a possible role of air pollution in the onset of congenital heart malformations. New focused studies should be designed in order to confirm this hypothesis. Indeed, only a precise (direct) measure of exposure level together with the knowledge of individual susceptibility to contaminants—as well as the identification of genetic factors able to define the predisposition to disease—could help to explain the real effects of air contaminants and make possible effective prevention policies and interventions. Moreover, future prospective investigations need to determine whether exposed subjects develop epigenetic alterations over time and, in turn, whether these alterations that regulate the expression of genes involved in heart development increase the risk of CHD in their offspring. Information about molecular mechanisms involved in the onset of heart abnormalities is fundamental in order to develop new strategies directed specifically at reducing the public health impact of CHD.

हे आपण वर दिलेल्या शोधनिबंधातील आपण गाळलेल्या जागा मी भरल्या आहेत.

भयगंड निर्माण करण्यात आपला काय नक्की हेतू आहे हे कळत नाही. coarctation of aorta हा रोग नायट्रोजन डायऑकसाइडच्या प्रभावाने होतो हा एकंदर जन्मजात हृदयरोगापैकी ४ टक्के आहे आणि (०.०४ %) १०,००० पैकी ४ बालकांना होतो.
https://www.cdc.gov/ncbddd/heartdefects/coarctationofaorta.html

यात प्रत्यक्ष धुरामुळे किती होतात आणि माहित नसलेल्या घटकांचा ज्यात आई काय "खाते" काय "पिते" त्यांचा काय प्रभाव आहे हे अजून वैद्यकीय शास्त्रज्ञांना माहिती नाही.

याउलट आईने दारू प्यायल्यामुळे बालकांना होणारा आजार हा जास्त गंभीर आणि जास्त मोठ्या वारंवारतेने होतो. FASD is estimated to affect between 2% and 5% of people in the United States and Western Europe.[6] FAS is believed to occur in between 0.2 and 9 per 1000 live births in the United States.[6] In South Africa, some populations have rates as high as 9%
Fetal alcohol spectrum disorders are caused by drinking alcohol during pregnancy.[1] Surveys from the United States have found about 10% of pregnant women have drunk alcohol in the last month, and 20% to 30% drank at some point during the pregnancy.[10] About 4.7% of North American women who are pregnant are alcoholics.[11
https://en.wikipedia.org/wiki/Fetal_alcohol_spectrum_disorder

आपला उंदीर पहा आणि आता खेड्यातील प्रदूषणाचा राक्षस पहा.

According to a global comparative risk assessment organised by the World Health Organisation (WHO), solid-fuel soot accounted for about 2.6% of illnesses worldwide in 2000.

Solid fuels emit substantial amounts of health-damaging pollutants, including particulates, carbon monoxide, nitrogen oxides, benzene, formaldehyde, 1,3-butadiene, and polyaromatic compounds such as benzo(α)pyrene.

Respiratory diseases and lung infections are common consequences of exposure to fumes from cooking in rural households.

Tuberculosis, stillbirths, low birthweight, heart diseases are also increasingly being connected pollution caused by burning solid fuels.

Women and children are the worst affected. Here are a few statistics that will leave you alarmed:

Over 800 million people in India are affected by indoor air pollution, mainly caused by smoke from burning solid, according to a report by the Global Alliance for Clean Cookstoves.

About one million deaths occur annually in India due to household air pollution, according to a report by The Lancet Respiratory Medicine Commission.

– About 25% of the 4.3 million global premature household air pollution (HAP) deaths occur in India every year, according to World Health Organisation estimates. The main contributor to household pollution is the smoke released by cook stoves

Nearly 39% of early neonatal stillbirths were attributed to cooking fumes, according to a study by the National Center for Biotechnology Information that examined the relationship between biomass fuel-use and stillbirths in India.

स्रोत https://sites.ndtv.com/breathe-clean/smoke-from-chulahs-biggest-killer-i...

नीट डोळे उघडून पहा आणि शहरातील किडकी प्रजा सारखी भयगंड निर्माण करणारी भाषा सोडून द्या.

मी दिलेले दुवे सोडून असंख्य दुवे तुम्हाला सापडतील ज्यात असे स्पष्टपणे लिहिलेले आहे. पण मी खेड्यातील स्त्रिया आणि बालके विषारी वायू आणि प्रदूषणामुळे खुरटली आणि खंगली आहेत आणि "चुलीतील धुरामुळे" त्यांची गुणसूत्रे आणि अधिजनूके सडली आहेत तेंव्हा त्यांच्याशी लग्न करू नका अशा तर्हेची भंपक वाक्ये कधी लिहीत नाही.
या गोष्टी मला आपल्या पहिल्या लेखांमध्येहि लिहिता आल्या असत्या परंतु "केवळ घबराट" निर्माण करून काहीही निष्पन्न होत नाही हे माझ्या ३४ वर्षांच्या वैद्यकीय प्रवासात उत्तम तर्हेने समजलेले आहे.

आपली मेहेरनजर फिरवण्यासाठी काही दुवे देतो आहे. जमले तर पाहून घ्या

The World Health Organization (WHO) had said that indoor air pollution (IAP) was claiming 500,000 lives in India every year, most of whom were women and children.

According to WHO, India accounted for 80% of the 600,000 premature deaths that occur in south-east Asia annually due to exposure to IAP. Nearly 70% of rural households in India don't even have ventilation.

WHO estimates that pollution levels in rural Indian kitchens are 30 times higher than recommended levels and six times higher than air pollution levels found in the national Capital.

https://timesofindia.indiatimes.com/india/Chulha-smoke-choking-Indian-wo...

यात गाळलेल्या जागा भरायची गरज नाही.

आता तुम्हीच ठरवा शहरं किडलेली आहेत कि खेडी

स्वधर्म's picture

16 Apr 2018 - 9:15 pm | स्वधर्म

डाॅ खरे यांच्या प्रतिसादाला उत्तर द्यावे अशी नम्र विनंती. तुमचे लागोपाठ तीन धागे अाले, तेंव्हा तुमचे लेखन पाहिले. तुंम्ही ज्योतिष विषयावर लेख लिहीले अाहते, त्याला तुंम्ही विज्ञान (शास्त्र शब्द धर्मशास्त्र म्हणूनही येतो, म्हणून विज्ञान शब्द वापरला अाहे, याची नोंद घ्यावी) मानता का? तसेच पूर्वी अोक साहेबांचे नाडी ग्रंथावरील संशोधनाबाबतही काही लेख इथे वाचल्याचे अाठवते. त्यात युयुत्सु नांव वाचल्याचे अाठवते. ते अापणच का? नाडी हे देखील एक विज्ञान अाहे असे अापली चिकित्सा सांगते का?

युयुत्सु's picture

23 Jul 2019 - 3:46 pm | युयुत्सु

A new study found that pregnant women exposed to higher levels of air pollutants had children with lower IQs, compared to the children of women exposed to lower levels.

Researchers looked at 1,005 pregnant women participating in the Conditions Affecting Neurodevelopment and Learning study, set in Shelby County, Tenn., and assessed the IQs of their offspring between the ages of 4 and 6. They found that exposure to PM10—pollutant particles with a diameter of one-seventh the width of a human hair that are produced by industry, power plants, cars, air traffic and railways —was negatively associated with IQ. Children whose mothers were in the highest 10 percent of exposure had IQ scores that were 2.5 points lower than those in the lower 10 percent.

नवे संशोधन

नक्की काय सांगायचे आहे कळाले नाही. प्रदुषणामुळे होणार्‍या जेनेटिक म्युटेशन बद्दल सांगायचे आहे का समाजाच्या जबाबदारी बद्दल बोलायचे आहे. वैयक्तीक पातळीवर न बोलता सगळ्यांना समजेल अशा शब्दांनी सांगावे.