विकीपेडिया वरील माहितीचे संकलन...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in तंत्रजगत
7 Apr 2018 - 7:09 am

विकीपेडिया हा वाचकांच्या सहकार्याने माहिती पुरवणारा संदर्भ कोश आहे असे मानले जाते...
विकीपेडियात खालील माहिती वाचनात आली ती बरोबर आहे असे मानावे काय? जर संदर्भ न देता माहिती भरली गेली असेल ती चुकीची किंवा अपुरी असेल तर तिला दुरुस्त करायची काय सोय आहे? ...
येथील तज्ज्ञ सदस्यांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे...

https://mr.m.wikipedia.org/wiki/
पावनखिंडीतील_लढाई
१) ... सर्वच ३०० जण कामी आले पण मसूदचे प्रचंड नुकसान झाले; जवळपास १४००० सैनिक मारले गेले. प्रत्येक मावळ्या ने ५५-६० मुगल कापून काढले, इतके शुर मावळे, इतिहासात क्वचितच पाहायला मिळतात....
२) ... ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासारख्याच दिसणाऱ्या शिवा काशीद नावाच्या न्हाव्याला शिवाजी म्हणून जौहरकडे बोलणी करण्यासाठी पाठवले होते....
https://mr.m.wikipedia.org/wiki/शिवाजी_महाराज
३)... आग्य्राहून सुटका

इ.स. १६६६ साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली.
...

Ref
 In one of the incidences, Shivaji tried to conquer an Adilshahi fort named Khelna but the terrain of the fort was difficult; conquering the fort was easier said than done. The Adilshahi garrison at the fort was also defending the fort valiantly. Then, Shivaji came up with a plan. Accordingly, a group of Marathas went up to the fort and convinced the Adilshahi chief (killedar) at the fort that they were not content with the rule of Shivaji and thus, had come to serve the Adilshah. The Marathas were successful and the next day, they revolted and caused total chaos inside the fort. Simultaneously, Shivaji attacked the fort from outside and in no time captured the fort. Shivaji renamed the fort as Vishalgad.
...

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

8 Apr 2018 - 7:40 pm | दुर्गविहारी

पावनखिंडीचा लढाईचा संदर्भ मी कधी विकीपेडीयावर जाउन पाहिला नव्हता. आपल्या धाग्यामुळे ते पान उघडले. माहिती वाचून धक्काच बसला. तसेही विकीचा माहिती स्त्रोत फारसा विश्वसनीय वाटत नाही, त्यामुळे मी लिखाण करताना फारसा विकीचा संदर्भ घेत नाही. यापेक्षा समकालीन आणि विश्वसनीय बखरी, शकावली आणि करिना यांचा आधार घेतलेला चांगला.
आता पावनखिंडी लढाईची जी माहिती दिली आहे त्याविषयी, मुळात शिवकालाचा विचार केला तर सर्वात जास्त विश्वसनीय साधन म्हणजे सभासदाची बखर, कारण सभासद हा शिवाजी महाराजांचा समकालीन होता आणि राजाराम महाराजांच्या आज्ञेने त्याने बखर लिहीलेली आहे. या खेरीज जेधे शकावलीसुध्दा विश्वसनीय म्हणता येईल. खेरीज महाराजांच्या पदरी असलेले कविंद्र परमानंद यांनीही शिवभारत लिहीले. दुर्दैवाने शिवभारताचा फक्त पहिला भागच उपलब्ध आहे. यामधे सभासदाच्या लढाईत पावनखिंडीच्या लढ्याचा उल्लेखच नाही. कविंद्र परमानंद जे पन्हाळ्याचा वेढा, सिध्दी जोहर आणि पावनखिंडीच्या लढाईविषयी जे लिहीतात ते मुळातून वाचण्यासारखे आहे.
विकीवर हि माहिती लिहीताना वरच्या साधनांचा किती संदर्भ घेतलाय ते समजत नाही. पण मुळात सिध्दी मसुद साधारण २००० ( दोन हजाराची फौज ) घेउन निघाला असताना १४००० हा आकडा कोठून आणला ? अशी चुकीची माहिती तातडीने दुरुस्त करावी.
याशिवाय बहुतेक साधने शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची एकमेव भेट आग्र्याला झाली असे सांगत असताना हा दिल्लीचा लाल किल्ला कोठुन आला? नुकतेच लंडनला ब्रिटीश लायब्ररीत १६६५ चे वर्तमानपत्र सापडले त्यातही शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले असाच उल्लेख आहे. जिथे महाराज राहिले होते ती हवेली आग्र्यात आहे.
अश्या चुका तातडीने दुरुस्त व्हाव्यात हि ईच्छा. आपले मि.पा,कर माहितगार हे विकीसदस्य आहेत, त्यांनी लक्ष घातले तर सुधारणा शक्य होइल.
बाकी विकीपेडीयावरचे लिखाण आपणही दुरुस्त करु शकतो किंवा त्यात भर घालू शकतो. '
यासाठी खालील पायर्‍या वापराव्यात.
विकीपानाच्या कोपर्‍यात हे बटन आहे
Viki1
त्यानंतर पुढील स्क्रिन येईल. इथे सनोंदप्रवेश वर क्लिक करावे.
Viki 2
यानंतर आपली माहिती भरुन विकीसदस्य व्हावे आणि आवश्यक ते बदल किंवा नवीन माहितीची भर आपण घालू शकतो.
Viki 3

लाल किल्ला आग्रा आणि दिल्ली दोन्हीकडे आहेत . शहाजहानच्यापूर्वी आग्र्याला एक लाल किल्ला होता. त्याने दिल्लीचा लाल किल्ला साधारण १६४० च्या सुमारास बांधला ( म्हणजे आजचा दिल्लीचा लाल किल्ला) आणि राजधानी तिथे हलवली. औरंगजेबाचा काळ त्यानंतरचा आहे. त्यामुळे कदाचित दोन्ही लाल किल्ले वापरले जात असावेत.

https://en.wikipedia.org/wiki/Agra_Fort

https://en.wikipedia.org/wiki/Red_Fort

शशिकांत ओक's picture

8 Apr 2018 - 10:59 pm | शशिकांत ओक

ते तीनही वापरात होते. इथे महाराजांची भेट कुठल्या लाल किल्ल्यात झाली ते महत्वाचे आहे. ती आग्र्याच्या लाल किल्ल्यात झाली हे सर्वमान्य आहे.

माहितगार's picture

8 Apr 2018 - 9:46 pm | माहितगार

मराठी विकिपीडिया मराठी बद्दलचे प्रेम साशंकीत असलेल्यांच्या ताब्यात जाणे माझ्या स्वाभिमानी आणि विचारी मनास न रुचणारे होते; आणि मी असतानाचे मराठी विकिपीडियाच्या निती स्वातंत्र्यास ग्रहण लागले आहे. ते ग्रहण दूर होत नाही तो पर्यंत मी विकि रजेवर आहे हे खेद पुर्वक नमुद करु इच्छितो. जेव्हा पासून ग्रहण लागले तेव्हा पासून मी तेथे जवळपास अनुपस्थीत आहे.

आपण आपुलकीने आठवण केलीत पण तत्वतः तुर्तास आपल्या मदतीस येऊ शकत नाही या बद्दल सादर क्षमस्व.

प्रचेतस's picture

9 Apr 2018 - 9:25 am | प्रचेतस

का हो, नेमकं काय झालं?

माहितगार's picture

9 Apr 2018 - 10:48 am | माहितगार

मराठीत लिहिता येणार्‍यांनी चर्चा पानांवरुन बहुतांश संवाद मराठीतच साधावा असा काहीसा माझा आग्रह होता. १ मेच्या आसपास लिहीन म्हणतोय. तुर्तास एवढेच असो.

प्रचेतस's picture

9 Apr 2018 - 11:05 am | प्रचेतस

ओके

१ मेच्या आसपास लिहीन म्हणतोय. तुर्तास एवढेच असो.

प्रचेतस आणि मी वाट पाहतोय आपल्या तात्कालिक वैराग्याच्या अंताची!

माहितगार's picture

1 May 2018 - 11:13 pm | माहितगार

विकिवैराग्यातून लगेच तरी बाहेर येणे अवघड असेल पण अनुभवा विषयी लिहावे म्हणतोय , त्या बद्दल लिहिन लवकरच . आपुलकीने आठवण करण्या बद्दल अनेक आभार.

शशिकांत ओक's picture

2 May 2018 - 11:12 am | शशिकांत ओक

सध्या तूर्तास इतके सांगता आले की असे संदर्भ दुरुस्त करायला अन्य कोण मार्गदर्शन करेल त्यांना संपर्क करायला मो क्र द्यावा ही विनंती...

शशिकांत ओक's picture

11 Apr 2018 - 1:09 am | शशिकांत ओक

बहुतेक साधने शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची एकमेव भेट आग्र्याला झाली असे सांगत असताना हा दिल्लीचा लाल किल्ला कोठुन आला?

हा प्रश्न निर्माण व्हायला कारण असावे की औरंगजेबाशी वैर पत्करून शाहजहाँ आग्र्यातील लाल किल्ल्यात लपून राहिला. बाहेरून किल्ल्यात प्रवेश करायला बंदी करून व यमुनेच्या बाजूच्या दरवाजाला कायम बंद करून बापाला प्यायला पाणी तोडून मुलाने हिशोब चुकता केला. (या काळात एका पत्रात शाहजहाँ म्हणाला होता की तुझ्यापेक्षा हिंदू बरे! ते आपल्या पूर्वज मृतपितरांना पाणी अर्पण करतात!) १६५८ ते१६६५ पर्यंत औरंगजेबाने दिल्लीच्या लाल किल्ल्यातून राज्य केले. २० फेब्रुवारी १९६६ रोजी शाहजहाँने दम तोडल्यावर त्याच्या सडलेल्या शवाला ताज मधे पुरायच्यासाठी तो आग्र्यात आला. नंतर पुन्हा एकदा आपला राज्याभिषेक मार्च मधे केला. मे १२ ला ५०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो तिथेच थांबून राहिला. म्हणून महाराजांची भेट(?) आग्र्यात झाली. या मुळे ताजमहालात मुमताज महल च्या शेजारी शाहजहाँची खरी आणि खोटी कबर बसवायचे काम कदाचित चालू किंवा नुकतेच पार पडले असावे. रामसिंगाशी अन्य विषयांवर बोलताना ताजमहलाच्या जागेचा उल्लेख दोघांच्या संभाषणात झाला असावा. असे मत पु. ना. ओकांच्या लेखनातून वाचायला मिळते. असो...

शशिकांत ओक's picture

11 Apr 2018 - 12:01 pm | शशिकांत ओक

शाहजहांचा जनाज़ा
शाहजहांचा जनाज़ा
चित्रात शाहजहाँच्या शवाला लाल किल्ला आग्रातून जाताना....
पुढे चालणाऱ्या खोज़ाने वैद्य म्हणून त्याच्या अंगाला खाज सुटून फोड आणणारे तेल लावून ठेवले होते. 22 जानेवारीला 1666 तो दाह होऊन मेला. दरवाजातून त्याच्या दोन राण्यांना पुढे येऊ दिले गेले नाही. मिनारावरून मुलगी जहाँआराने ते दृष्य पाहिले. असे राजस्तानी पत्रातील मजकुरावरून काढलेले काल्पनिक चित्र... ते शव पुढे ताज महालात दोन (खरे व खोटे किंवा दर्शनी) थडगी तयार होईपर्यंत कसे व कुठे ठेवले गेले? याचे तपशील कदाचितअज्ञात राहिले आहेत...
"खोटी किंवा दर्शनी कबर...
खोटी किंवा दर्शनी कबर...

"खरी तळघरातील कबर"
खरी तळघरातील कबर

शशिकांत ओक's picture

11 Apr 2018 - 12:58 pm | शशिकांत ओक

शाहजहांचा जनाज़ा
शाहजहांचा जनाज़ा
चित्रात शाहजहाँच्या शवाला लाल किल्ला आग्रातून जाताना....
पुढे चालणाऱ्या खोज़ाने वैद्य म्हणून त्याच्या अंगाला खाज सुटून फोड आणणारे तेल लावून ठेवले होते. 22 जानेवारीला 1666 तो दाह होऊन मेला. दरवाजातून त्याच्या दोन राण्यांना पुढे येऊ दिले गेले नाही. मिनारावरून मुलगी जहाँआराने ते दृष्य पाहिले. असे राजस्तानी पत्रातील मजकुरावरून काढलेले काल्पनिक चित्र... ते शव पुढे ताज महालात दोन (खरे व खोटे किंवा दर्शनी) थडगी तयार होईपर्यंत कसे व कुठे ठेवले गेले? याचे तपशील कदाचितअज्ञात राहिले आहेत...
"खोटी किंवा दर्शनी कबर...
खोटी किंवा दर्शनी कबर...

"खरी तळघरातील कबर"
खरी तळघरातील कबर

manguu@mail.com's picture

11 Apr 2018 - 3:35 pm | manguu@mail.com

छान माहिती

शशिकांत ओक's picture

8 Apr 2018 - 8:34 pm | शशिकांत ओक

प्रतिसादाने बऱ्याच गोष्टींंचा उलगडा झाला...
त्यात म्हटल्याप्रमाणे वरील माहितीत योग्य बदल करायला कोणी पुढाकार घेतील काय?

तसं मी विकिश्रर सदस्य झालो आहे मागेच. विकिकॅामन्सवर चित्रं टाकून पाहिली मोबाइलवरून. त्याची लिंकही वापरली. परंतू संपादन /दुरुस्ती वगैरे कधी केली नाही. म्हणजे तसं केल्यावरही पुन्हा कुणी येऊन ते बदलतात/ बदलू शकतात असे म्हणतात.
बाकी अभय/अरविंद? नातू नावाचे कुणी विकिमराठीवर प्रचंड लेखन/संपादन करतात हे जालावर दिसते.

बरीचशी कागदपत्रं दिल्लीच्या ASI भारतीय पुरातत्व विभागाच्या कोषागारात आहेत आणि ती वारंवार पावसाने ( खिडक्यांतून आलेल्या पावसाने) भिजतात ती वाळवून जोपासली जातात. कारण विभागाच्या इमारतीची देखभाल करणारे खाते दुसय्रा कोणत्या बांधकाम खात्याकडे आहे. शिवाय फंड देणारा विभाग तिसय्राच खात्याकडे आहे.
असो.

शशिकांत ओक's picture

17 Apr 2018 - 7:26 am | शशिकांत ओक

निराशा वाढली...
मी दुरुस्तीसाठी वरील माहितीतून लिहून पाहायचे प्रयत्न केले. पण चर्चा वर लिखाण, चित्रे टाकली. पण विसंगती दूर कशा कराव्यात यावर व्हिडिओतून मार्ग दर्शन होऊ शकले नाही. भाषा बदलून प्रयत्न केला. तिथे लेखन करायला काही पुर्व अटी आहेत. त्यामुळे मराठीतील विसंगती ताबडतोब दूर व्हाव्यात यासाठी वैयक्तिक पातळीवर मतभेदांना मागे ठेवून काम हाती घेतले तर काही घडेल. अन्यथा 'मला काय त्याचे?' या मानसिकतेचा तडाखा सहन करावा लागत आहे...