मोदी सरकार केव्हा सुरु करणार प्रचार

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in राजकारण
11 Mar 2018 - 1:59 am

निवडणुकीला एक वर्षे राहिलेय
२०१३ ला जसा जोरात प्रचार केला होता ( निर्भया ,उत्तराखंड ) अजून कुठेच जोर नाहीये
मित्र पक्ष दुरावलेत
नोटबंदी gst उद्देश्य चांगला होता पण धंधे बंद पडलेत
परिणाम अजून दिसले नाही
मुख्य मंत्रांच्या विडिओ गाणे ,आपल्याच सरकारचा चिक्की घोटाळा
अर्थ संकल्प पण काही जोर नाही
पुण्यात काँग्रेस ने निवडणुकी साठी फ्लेक्स बाजी सुरु केली आहे

कुठे नेऊन ठेवलाय चाणक्य माझा

प्रतिक्रिया

arunjoshi123's picture

8 Apr 2018 - 12:22 am | arunjoshi123

मंगू,
ब्रिगेडचे इतिहासकार (ज्यांचा तू एक दांडगा वाचक आहेस) १९४७ च काय इसवीसन पूर्व १९४७ चे सज्जन सज्जन ब्राह्मण उकरून काढता आणि त्यांना मरणोत्तर फाशी देता. नै का? लोकांना इतिहासातून उकरून फाशी द्यायची इच्छा ब्रिगेडीच का असावी? प्रत्येकालाच तो अधिकार आहे.

manguu@mail.com's picture

7 Apr 2018 - 7:13 pm | manguu@mail.com

585,00,00,00,000 इतकी रक्कम प्राविडंट फंड अनक्ल्मेड सरकारी खाते मध्ये जमा. काँग्रेसचे नेते आणि आधार कार्डचे जनक नंदन निलकेणी सुद्धा असंच म्हणतात. फक्त ते काँग्रेसचं नाव न घेता असं म्हणतात, मोदी सरकारने ही इतकी प्रचंड रक्कम आधार कार्डला जोडल्यामुळे ती फ्रॉड लोकांच्या हातात गेली नाही आणि सरकारी खजिन्यात शिल्लक राहिली.

निलकेणी ही राजकारणी व्यक्ती नाही, तर इन्फोसिसचे सह संस्थापक आहेत. त्यामुळे त्यांच्या शब्दांना खूप गांभीर्याने घ्यायला हवे.
देशातील 80% लोकांना हे आकडे पाहून ही किती रक्कम आहे हे सांगताही येणार नाही. ही रक्कम आहे 58500 कोटी (585 अब्ज) म्हणजे अर्धा लाख कोटीहूनही अधिक. सामान्य माणसाला यात काही कळत नाही आणि मग ही रक्कम अगदी सहजपणे चोरांच्या खिशात जात राहिली आणि आम्हाला त्याचा कधी पत्ताही लागला नाही.

--------------------------------------------------------------------------

पूर्वी प्रॉव्हिडंट फंड आधारला लिंक नव्हते, म्हणून त्यातले पैसे कुणीही चोर कढून नेत होते, हे म्हणणे अगदीच हास्यास्पद आहे. तेंव्हाही असे अनक्लेमड पैसे होतेच . ही रक्कम २०१४ नंतर एका रात्रीत आलेली नाही.

लोकांचे अन्क्लेमड पैसे आहेत. आणि भक्त नाचत आहेत. म्हणे सरकारने पैसे वाचवले.

गामा पैलवान's picture

7 Apr 2018 - 7:45 pm | गामा पैलवान

मंगू,

कुलूप लावणे हे कधी ऐकलंय का तुम्ही?

आ.न.,
-गा.पै.

पूर्वी प्रॉव्हिडंट फंड आधारला लिंक नव्हते, म्हणून त्यातले पैसे कुणीही चोर कढून नेत होते, हे म्हणणे अगदीच हास्यास्पद आहे.

एल पी जी गॅस सिलिंडरच्या पैशाचंही असंच असेल, नै का?

manguu@mail.com's picture

2 May 2018 - 10:53 pm | manguu@mail.com

कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपा आणि काँग्रेस एकमेकांची उणीदुणी काढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नुकतेच १५ मिनिटे कागद समोर न ठेवता भाषण करुन दाखवण्याचे आव्हान दिले होते. यावरुन आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदींवर पलटवार केला असून त्यांना खुले आव्हान दिले आहे. मोदींनी केवळ १५ मिनिटांत कागदावर पाहून मागील येडीयुरप्पा सरकारची कामगिरी सांगावी असे त्यांनी मोदींना सांगितले आहे. ते चामराजनगर येथील निवडणूक रॅलीदरम्यान बोलत होते. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

मोदींनी राहुल गांधी यांच्याबरोबरच सिद्धरामय्या यांना देखील आपल्या प्रचारसभेत टार्गेट केले होते. सिद्धरामय्या यांना प्रचारादरम्यान व्यासपीठावर झोप लागली होती, त्यावरुन मोदींनी त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र, मोदींच्या या टिप्पणीला सिद्दरामय्या यांनी उत्तर दिले असून ते म्हणाले, पंतप्रधान विनाकारण अनावश्यक मुद्द्यांकडे लक्ष केंद्रीत करतात. आपल्याला ‘स्लीप एपनिया’ची समस्या असून त्यामुळे बऱ्याचदा दिवसा आपल्याला झोप लागते, यावर मी उपचारही घेत आहे. मात्र, मोदींनी माझ्या या समस्येवर अशा प्रकारे बोलण्याची गरज नव्हती. अशा टिप्पण्या करून मोदी एखाद्या ट्रोलरप्रमाणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

----------------

एखाद्याच्या आजारपणाची खिल्ली उडवण्याचा पराक्रम मोदीजी करतात , हे पाहून वाइट वाटले.

गामा पैलवान's picture

3 May 2018 - 12:11 pm | गामा पैलवान

मंगूश्री,

एखाद्याच्या आजारपणाची खिल्ली उडवण्याचा पराक्रम मोदीजी करतात , हे पाहून वाइट वाटले.

सारा देश एका माणसाच्या आजारपणाची खिल्ली उडवतोय. पैचान कोन!

आ.न.,
-गा.पै.

Blackcat's picture

7 Jan 2019 - 4:26 am | Blackcat (not verified)

भाजपाचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होईल.

जाहीरनामा तयार करणाऱ्या टीममध्ये नारायण राणेंचा समावेश.

जाहीरनामा समितीमध्ये नारायण राणे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी विविध १७ समित्यांची रविवारी घोषणा केली. यात जाहीरनामा समितीच्या प्रमुखपदी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत खासदार नारायण राणे यांचाही समावेश करण्यात आला आहे.