मराठी दिन २०१८: चला मालनाक! (मालवणी)

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in भटकंती
2 Mar 2018 - 12:08 am

चला मालनाक
सुस्वागतम. आपल्या मालनाक आपले स्वागत आसां. हुमयसून राष्ट्रीय महामार्ग १७ ने मालनाक येऊचा झालां की पयलो पळस्पा फाट्याक उजवीकडे बळूचा. मगे वडखळ नाक्याऽऽर डाव्यां वळाण घेतलां की आपलो कोकणचो रस्तो लागतां; होच आपलो राष्ट्रीय महामार्ग १७. महाड, खेडचो भरणो नाको, चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा, लांजा, राजापूर, तळेरे, नांदगांव, कणकवली करान आपण कसालाक इलों की उजवो फाटो सरळ मालनाक. तसो कणकवल्येवरसून आचरामार्गे पण एक रस्तो आसां. पण अंतर पाचधा किमी. कमी असलां तरी रस्तो आवळ (अरुंद) आणि खड्ड्यान भरल्यालो. मगे कसालावरसून येणारो हायवे रस्तोच बरो.

निळां रेशमी आभाळ, फेसाळत्यो लाटो आंगाखांद्यार खेळवणारो निळोशार समुद्र आणि पांढर्याफेक वाळूत डोलणार्या माडांनी आणि हिर्व्यागार झाडांनी सजलेया वेळां, या वेळांक लागान लाऽऽलभडक पायवाटांनी नटलेली डोंगरां. मालनाच्या परिसरात कर्ली, गड अशो नद्यो समुद्राक मिळतत, त्या नद्यांनी केलेल्यो खाड्यो, खाड्यावरसून जाणारे पूल आणि खाड्यावयली आपणांक खूळावणारी जुवां आणि तरियेची बंदरां.

कवळकाठी कातळाच्या सड्यावरान नागमोडी वळणां घेत जाणारो रस्तो नि दोनवल्या बाजूक घाट्येवरसून उतरान गावात झाडामाडातून कौलारू घरां देकवत गावात गायब होणार्ये रस्त्ये. सकल सपाटीवर खाजणां आणि मळ्ये. डोळ्यांचा पारणां फेडतच आपण देऊळवाडीची घाटी उतरत आपण मालनात इलंव पण. मालनाच्या पर्यटनान आता बाळसां धरलां आसां.

मालवण म्हटलां की गमतां तो सिंधुदुर्ग, दरवळतां तां तोंडाक पाणी आणणारां मालवणी रांधपाचां जेवाण, आंबेगरे आणि काजू. कानावर पडतां ती हेलात, ठेक्यात पण गाळियानी भरल्याली मालवणी बोली. हय रवल्याऽऽर अगदी गुजराती, मारवाडी, भैये, सरदारजी, सारीच माणसां सरसकट मालवणीच बोलतत.

सरळ रस्तो जातां तो मालवण शेरात. पैलो उजव्या बाजूक दिसतां तो भारत पेट्रोलियमचो पेट्रोल पंप.
थोडां फुडे गेलां मगे डावीकडे यष्टी स्ट्यांड, तसांच फुडे गेल्यार डावीकडचो फाटो जातां वायरी, तारकर्ली आणि देवबागाक. जरा फुडे गेल्यार वाय – Y – जन्क्शन लागतां.
डावीकडचो रस्तो सोमवार बाजारातसून जातां.

रस्त्याच्या डावीकडसून समुद्रार जाणार्यो चार गल्ल्यो लागतत. गल्ल्यांच्या दोनवल्या बाजूक दुकानां आणि टोकाक दिसतां समुद्र. चौथ्या गल्लीहारी रस्तो उजवीकडे वळतां. या चौथ्या गल्ल्येच्या टोकाऽऽर धक्को. धक्क्यावरसून किल्ल्यार जाणारी ‘तऽऽर’. तर म्हटल्यार माणसांका भाड्यान नेणारी होडी. हुमयची बीईएसटी रस्त्यावरसून चलता तर हयची ‘तऽर’ पाण्यातसून चलतां. आता तरीची जागा लांचेन घेतलली आसां. किल्ल्यात गेल्यार गाईड घेतलो तर बरां. हैलो एकपण गैड मालनातलो नाय. जे गावतले ते कोलापुरातसून इलेले. गैडान तोंड उघडलां मगे कळतांच तां.

1

किल्ल्यार जावच्या लांचेचो धक्को:

1

संबूर पाण्यातलो सिंधुदुर्ग

पण किल्लो सकळच म्हणजे दिवसाचो बघूचो.

1

धक्को डावीकडे सोडान रस्तो वळान येतां फोवकांड्या पिंपळाकडे. थयसून थोडां सरळ जावन डावीकडे समुद्राहारी जावचां. रस्तो वर चढान जाता मगे संबूर दिसतां मामलेदार कचेरी. डावीहारी कोर्टाची इमारत. थयसून थोडां फुडे गेलां की किनारो. हयतांच रॉक गार्डन.

1

वर्षभरानंतर रॉक गार्डन आता मस्तच झाल्याले आसा.

1

किनार्यावरसून थोडां उजवीकडे जावयां. किनार्याच्या पोटात उजवीकडे समुद्र घुसलोहां. तो आत घुसल्यालो देखणो किनारो दूरवर दिसतां तो आसा चिवला बीच.

रॉक गार्डनवरसून चिवला बीच.

1

आता पयले मालनातल्या गणेश मंदिरात जावया. थयले सुंदर हत्ती. मगे मंदीर किती सुंदर आसात? तां हय येवनच बघूक होयां म्हणान फोटो देत नाय.

चला तर चिवला बिचाचर जावया.

1

चिवला बीचवरसून डावीहारी रॉक गार्डन.

1

चिवला बीच.

फोटो गुदस्ताचे असत. चिवला बीच आता जास्तच देखणो केल्यालो हां.

1

चिवला बीच, पाण्यात दिसतां तो सर्जेकोट किल्लो.

1

चिवला बीचपासून सुमारे पाच किमी. वर ओझरावर कवळकाठी कातळाखाली ह्यां हिरव्यांगार सुंदर स्थान आसां

1

थयसून एका बाजूक मच्छिंद्र कांबळींच्या रेवंडीची भद्रकाली, सरळ दुसर्या बाजूक १९ किमी. आचर्याचो रामेश्वर तर घाटी उतरून ५ किमी. गेल्यार

1

थयसून ११ किमी. वर आसा आंगणेवाडी

1

भराडी मातेच्या मदिरात असत सुंदर तीर्थपात्रां.

1

हयसून तीनचार किमी. बिळवस. थय आसा एक सातेरी मंदीर. तां हौदासार्या खोलगट भागात उभे असां. जोरदार पाऊस पडलो की मंदिराच्या भोवताल पाणी साठतां आणि मंदीर पाण्यात हुबां आसां असां वाटतां. म्हणून तां जल मंदीर.

1

बिळवसचां जल मंदीर.

1

ओझरापास्न आचरा रोडला ५-६ किमी. वर डावीकडे गेलां की लागतां पाणखोल जुवां. तरयेन जाऊचां लागतां. ती बगा धक्क्याक लागलेली तर.

1

जुवां म्हटल्यार नदीतला बेट.

1

बगूनच डोळे निवतत.

आचर्याच्या वाटेर हड्येक एक सुंदर मठ असां. थयली सजावट अप्रतिम, आणि शांत वातावरण तर एक नंबर.

1

थयसून थोडां फुडे गेलां की मगे डावीकडचो फाटो धरूचो. सरळ तोंडवळ्येच्या सी वर्ल्डाक. अशी एकापरीस एक ठिकाणा असत मालनाक. तारकर्ली, देवबाग तर फेमसच आसत.

तारकर्ल्येक लागीच आसा कर्ली नदीची खाडी. खाड्येच्या पल्याड कर्ली, भोगवे आन निवती.
भोगवे
भोगव्याचां दीपगृह

1

तारकर्ली – देवबाग: यष्टी डेपोच्या फुडे इल्यावर डावीकडचो रस्तो आपणाक नेतां तारकर्ल्येक आणि देवबागाक. तारकर्ली आसां ८ किमी. आणि त्याफुडे दोन किमी. देवबाग. कर्ली नदी हैसरच समुद्राक मिळतां. पण पल्याडच्या बाजूक आसां भोगवे आणि निवती.

1

भोगव्यातसून दिसतत तारकर्ली देवबागची वॉटर स्पोर्टां

1

नदीपल्याड जो किनारो दिसतां तां आसां भोगवे. तारकर्ली देवबाकाक डॉलफीन दर्शन आणि स्पीडबोट, बलून रायडिन्ग, स्नोरकेलिन्ग, अशी वॉटर स्पोर्टां करूक मिळतत.

फाटफटीच इलंव तर डॉल्फीन दर्शन बरेंऽऽ मिळतां. फाटफटी समुद्राचां पाणी पण शाप, निवळ मिळतां.
निवती किल्ल्यावरसून दिसणारो निसर्ग

1

निवतीवरून येतांना चिपीच्या विमानतळाचां काम चालू आसा तां दिसतां

1

तारकर्ली देवबागसंबूर नदीबुडातसून वर इल्यालो एक जुवो दिसतां. तां असां त्सुनामी आयलंड. त्सुनामी इली त्याच्या अदूगर हैसर कायपण नवतां त्सुनामी इली आणि हैसर नद्येखालसून बेटच वर इलाहां. निसर्गाचो चमत्कार, दुसरां काय?

विष्णूच्या या पयल्या अवताराचां दर्शन घेवान मगे किल्लो बघूचो. आणि सांच्याक रॉक गार्डन, चिवला बीच पायचो असां पर्यटन अगदी बेष्ट बघा. तोंडवळी, इतर पर्यटन ठिकाणां आणि मंदिरांक आणखी एकदोन दीस अशे दोनतीन दीस मालनात मस्त जातत. मालवणी निस्त्याक आणि शीत म्हटल्यार पूर्णब्रह्मच गावतला.
चला तर मगे. चाकरमानी असलांस तर सुट्ट्यो टाका आणि धंदो असलो तर सवड काढा आणि येवा. मालवण आपलांच आसां.

- X – X – X -

1

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

2 Mar 2018 - 9:56 am | प्राची अश्विनी

घरी गेल्यासारका वाटला मा रे!

अहाहा! मालवण आणि परिसर खूप आवडला. निवतीच्या किल्ल्याचा उल्लेख नाही? पुन्हा कधी मालवणला जायला मिळतेय माहीत नाही.

पैसा's picture

2 Mar 2018 - 1:53 pm | पैसा

ब्येश्ट लिवलांहा तुमी. फोटोही बरे इले हत. हालीच तारकर्ल्ये राहून इलंय. सगळां मालन पुन्ना एकदा बगुक होयां.

पद्मावति's picture

2 Mar 2018 - 10:27 pm | पद्मावति

मस्तच.

पिवळा डांबिस's picture

2 Mar 2018 - 10:46 pm | पिवळा डांबिस

मालनावरचो लेख आणि फोटो झकासच!
पण सुधीरमामांनु, ह्यां म्हणजे कसां सगळां शिवराक शिवराक झालां. मालनात गांवणार्‍या नुस्त्यांचे आणि नुस्त्याच्या जेवणाचे फोटो देंवचे रंवले की हो!
ते बघांक मिळले आंसते तर कथा कशी सफळ संपूर्ण झाली असती नांय?
:)

खूप छान लिहिलंय. छायाचित्रेही आवडली.

दुर्गविहारी's picture

3 Mar 2018 - 12:57 pm | दुर्गविहारी

मस्तच लिहीलय ! निवती, भोगवे, कर्ली नदीची खाडी, देवबाग, तारकर्ली, सिंधुदुर्ग, सर्जेकोट, मसुरे आणि भरतगड, भगवंतगड हि सगळी बाईक राईड डोळ्यासमोर आली. ह्यो कोकणचा गाईड माका भावला हं.

सस्नेह's picture

3 Mar 2018 - 9:15 pm | सस्नेह

छानच की मालवणची सफर !
बाकी, सागराच्या फोटूंची कमी जाणवली.

निशाचर's picture

4 Mar 2018 - 4:23 am | निशाचर

मस्त!

राही's picture

4 Mar 2018 - 3:19 pm | राही

आवडले. स्थानिक लोक मालवणाला मालन म्हणतात हे माहीत नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे लेखात काही शब्दांची रूपे मी वाचलेल्या मालवणी लिखाणाहून वेगळी आणि अधिक योग्य वाटली. उदा. नद्यो, खाडयो, गल्ल्यो . अलीकडे ही रूपे नदये, खाडये, गल्ल्ये अशी पुंलिंगासारखी असतात, जे चूक असावे असे वाटते. आवळ, जुवां, देकवत, सकल, हारी, म्हटल्यार, गुदस्ता,रांधाप, हड्येर, लागी, फाटपटी हे शब्द किंवा रूपे अलीकडचे नवे लेखक वापरीत नाहीत असे दिसते. अलीकडच्या मालवणीवर मराठीची गडद छाया जाणवते. मालवणी आणि कोंकणीचे सुंदर अलंकार असलेले अनुस्वारसुद्धा लोप पावू लागले आहेत. हंय, हंय्सर, थंय, थंयसर असे शब्द दळवी-कर्णिकांच्या वाङ्मयात वाचले आहेत.
बाकी वर्णन छान. ही सगळी स्थळे पाहिलेली नसल्याने फोटोवरून तहान भागवली.

नाखु's picture

4 Mar 2018 - 5:32 pm | नाखु

ला भैट देताना ही माहिती फार उपयोगी आहे

सतिश गावडे's picture

4 Mar 2018 - 6:39 pm | सतिश गावडे

हेच म्हणतो.

सुधीर कांदळकर's picture

4 Mar 2018 - 8:01 pm | सुधीर कांदळकर

@पैसा, नाखु आणि सतीश गावडे: पुढच्या वेळी धामापूर तलाव आणि तोंडवळी चुकवू नका. मालवणहून ५२ किमी. देवगड बाजूचे कुणकेश्वर मंदीर आणि त्याशेजारचा किनारा नितांतसुंदर आहे. गणपतीपुळेची आठवण येईल असा.

@पिडा: माफ करा राव. मी शाकाहारी, म्हणान नुस्त्याचे फोटो रंवले.

@राही: दर बारा मैलागणिक बोली बदलते म्हणतात ते खरे आहे. राजापूर देवगडला खाड्ये, इ. एकारान्त रूपे वापरतात. नुस्ते ला आमच्याकडे निस्त्याक म्हणतात. शिवाय इथे जातीजातीगणिक देखील बोली सूक्ष्मफरकाने वेगळी असते. कुडाळदेशकरांची वेगळी, मराठा आदि जातींची वेगळी, मागासवर्गीयांची वेगळी. वाडी, बांद्याची बोली आणखी वेगळी आणि कोंकणीची घसट असलेली वाटते. शुद्धलेखनाच्या नव्या नियमांमुळे अनुनासिक उच्चारांसाठी अनुस्वार लिहिणे हळू हळू लोप पावते आहे.

धामापूर, कुणकेश्वर, विजयदुर्ग पाहिले आहे. तोंडवळी मात्र पाहिले नाही. सागरी महामार्ग रत्नागिरी ते गोवा २-३ वेळा झालाय.

मित्रहो's picture

4 Mar 2018 - 9:07 pm | मित्रहो

छान ओळख तिही मालवणी भाषेत
मालवण फिरताना या माहितीचा उपयोग होईल.

जस्काय टाकिजात जाउनसनी पिच्चर पघातल्यासार्खं वाटत व्हतं केन्धुळ

कुमार१'s picture

7 Mar 2018 - 1:00 pm | कुमार१

आणि फोटो मस्तच !

अनिंद्य's picture

13 Mar 2018 - 3:01 pm | अनिंद्य

@ सुधीर कांदळकर,

मोठया आवाजात लेख वाचून पहिला. खूप छान,कानाला गोड वाटते कोंकणी भाषा.

आंगणेवाडीच्या पांढऱ्या जीर्णोद्धाराने आणि गणेश मंदिराच्या त्या पांढऱ्या हत्तींनी मात्र निराशा केली - they look so out of place ! अगदी मुंबई- अहमदाबादेतून उचलून नेल्यासारखे वाटतात. तीर्थपात्रां सुंदर !

एक प्रश्न - जुवां म्हणजे काय ?

राही's picture

13 Mar 2018 - 4:13 pm | राही

जुवें म्हणजे पाणथळ जागेतली उंचवट्याची जमीन. नदी/ खाडीच्या प्रवाहात छोटी छोटी बेटें तयार झालेली दिसतात त्यांना जुवें म्हणतात. जुवेकर, जूकर अशी आडनावे काहींनी ऐकली असतील. मुंबईपरिसरात जुहू, जूचंद्र, पाणजुवे(पाणजू) अशी जुनी गावे आहेत. जुव्यां, जुआं अशीही रूपे होतात.
मिऱ्यें, भाटी यांचेही अर्थ साधारण असेच आहेत. मुंबईजवळच्या मिरा रोड या रेल्वेस्टेशनचे नामकरणही ब्रिटिश नॉमेंक्लेचर पद्धतीप्रमाणे 'काशीमिऱ्यें गावाला जायचा रस्ता' या अर्थाने केले गेले आहे.

ब्रिटिश नॉमेंक्लेचर पद्धतीप्रमाणे 'काशीमिऱ्यें गावाला जायचा रस्ता' या अर्थाने केले गेले आहे.

हे नव्हतं माहीती. तुम्ही पण का लिहीत नाही मालवणीत लेख. मला इलो-पुल्लिन्गी आणि इला- स्त्रीलिंगी क्रियापद हे तुमच्या एका कमेंटमुळे कळ्लं. मालवणी कळत असलं तरी 'शामल खंय गेला रे बबलू?' असा प्रश्न मित्राच्या घरी ऐकल्यावर चुकल्यासारखं वाटायचं कारण मी ऐकलेली मालवणी ही मराठीचे संस्कार झालेली होती.

राही's picture

15 Mar 2018 - 7:52 pm | राही

खरे तर ते इलां असे हवे. अनुस्वारयुक्त. गुजराती, कोंकणी, हिंदीp आणि कोंकणातल्या बोली यांनी अनुस्वाराचे उच्चारण आताआतापर्यंत राखून ठेवले होतें. हिंदी- गुजराती- कोंकणीमध्ये अजूनही ते आहे. हिंदीत नपुंसकलिंग नाही. पण कोंकणी गुजराती मराठीत ते आहे. अनुस्वारामुळे ते स्पष्ट कळते. मराठीतले कळत नाही. मराठीतले अनेक नपुंसकलिंगी शब्द अलीकडे पुंलिंगी म्हणून वापरले जाऊ लागले आहेत. उदा. ऋण, धाबे, लिंबू वगैरे
तर 'इलां' हे रूप नपुंसकलिंगी आहे. गुजरातीत आव्युं आणि कोंकणीत आयलें किंवा आयलां. मालवणीत इलां. मुलगी लग्न होईपर्यंत ' तें पोर ' असते. क्षुद्रतावाचक नपुंसकलिंगी. म्हणून तां इलां, तें आयलें. ते आव्युं. तो कुत्रा आला. तें कुत्रें आलें. तां कुत्रां इलां. अनुस्वार वगळला की व्याकरणातला लिंगभेद स्पष्ट होत नाही. मराठीत अनुस्वार अधिकृतपणे जाऊन पन्नास वर्षे झाली. पण गुजराती, कोंकणी (आणि हिंदीसुद्धा) या भाषांत ते टिकून आहेत.

पैसा's picture

13 Mar 2018 - 10:53 pm | पैसा

ही नावे रत्नागिरीजवळही आढळतात. जुवें, जू, भू, सडामिर्‍या, जाकीमिर्‍या, मिर्‍याबंदर, मिर्‍याचा डोंगर इत्यादी. पणजीतील मिरामार पण याचाच प्रकार काय नकळे.

खटपट्या's picture

14 Mar 2018 - 8:43 pm | खटपट्या

हो भू हे माझ्या बाजूच्या गावाचे नाव आहे. :)

निशाचर's picture

15 Mar 2018 - 5:34 am | निशाचर

मिरामार हे नाव पोर्तुगीज असावं. समुद्राला पोर्तुगीज आणि स्पॅनिश भाषांत mar तर इटालियनमध्ये mare म्हणतात. मिरामार नावाच्या अनेक जागा आहेत.

अवांतरः इटालियन Frut­ti di Ma­re म्हणजे शब्दशः समुद्राची फळे अर्थात seafood.

सुधीर कांदळकर's picture

16 Mar 2018 - 8:11 pm | सुधीर कांदळकर

इत्यादींना अनेक धन्यवाद. उत्तरादाखल पैसाताई इ. नी दिलेल्या माहितीबद्दल त्या सर्वांना धन्यवाद. भू चा हा अर्थ ठाऊक नव्हता. मीरामारची व्युत्पत्ती कमाल अहे. वा निशाचर वा!

@अनिंद्य: मोठ्याने वाचल्यावर मजा आली, बरे वाटले. मालवणी बोली नादमय आहे. गजाली करतांना कुणी काही भाष्य केले की होयतऽऽर म्हणून जो दुजोरा दिला जातो तो हेल लाजबाब आहे. जुव्याच्या तरीच्या चित्राखाली जुवां म्हटल्यार नदीतलां बेट असे मी अशुद्ध लिहिले आहे. नद्येतलां असे हवे होते.

टिंगलीचा स्वर पण मस्त असतो. खुळावलेलां तांऽऽ म्हणून एखादीवर झकास टिप्पणी केली जाते.

माझ्या तोंडून आपसूकच मुंबईची शुद्ध मराठी बाहेर पडते. त्यामुळे गावाले बहुतेक सुशिक्षित माझ्याशी शुद्ध मराठीत किंवा मराठीमिश्रित मालवणीत बोलतात. पण सरकारी कर्मचारी मालवणीतच बोलतात. केस चेतल्यासारी झाली म्हणजे खटल्याचा निकाल चेतनच्या बाजूने लागला. तलाठी बाई देखील मराठी मालवणी बोलते. कामगारवर्ग आणि इतर अशिक्षित/अल्पशिक्षित मात्र आवर्जून मालवणीतच बोलतात. त्यांच्या बोलीत त्यामानाने अनुनासिके कमी आहेत. हैसर थैसर अशी वेगळी बोली. मधु मंगेश कर्णिकांची बोली फक्त वयस्कर कुडाळदेशकरच बोलतात. काही ठिकाणी हैसर थैसर ला हडे तडे बोलतात. नगर वाचनालयाचे शिंदे सर शुद्ध मराठीत बोलतात. पण मधूनच काही वाक्ये मालवणीतून आली की बरे वाटते.

असो विविध रंजक प्रतिसादांमुळे मजा आली. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.

मदनबाण's picture

17 Mar 2018 - 1:11 pm | मदनबाण

सुरेख लेखन... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Counting Stars [Lyrics] :- OneRepublic