नवीन भ्रमण-संगणक (लॅपटॉप) घ्यावयाचा आहे. मार्गदर्शन करावे.

shashu's picture
shashu in तंत्रजगत
22 Jan 2018 - 6:51 pm

नवीन भ्रमण-संगणक (लॅपटॉप) घ्यावयाचा आहे. मार्गदर्शन करावे.
दैनंदिन घरगुती वापरासाठी भ्रमण-संगणक (लॅपटॉप) घ्यावयाचा आहे.
बजेट : ३००००-४००००.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

22 Jan 2018 - 6:55 pm | प्रचेतस

अमेझॉन, फ्लिपकार्टवर जाऊन तुलना करा आणि योग्य वाटेल तो घेऊन टाका.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Jan 2018 - 7:36 pm | राजेंद्र मेहेंदळे

https://www.flipkart.com/search?as=on&as-show=on&count=40&otracker=start...

माझ्या मते ब्रँडमध्ये एसर घेउ नका (सगळ्यात कमी किमतीत मिळाले तरी) त्याऐवजी मला एच पी /तोशिबा /डेल बरे वाटतात. ( अनुभवाने)
आणि प्रोसेसर मध्ये ए एम डी घेउ नका ईंटेलच घ्या (सध्या आय ७ लेटेस्ट आहे पण आय ५ सुद्धा छान चालतो आणि किंमत तुमच्या बजेटमध्ये) पुन्हा माझ्या अनुभवाने .

बाकी घेताना ब्रँडेड दुकानातुनच घ्या. नेटवरुन मागवु नका.

shashu's picture

22 Jan 2018 - 10:18 pm | shashu

धन्यवाद
दुकानातून घ्यावा किंवा ऑनलाइन घ्यावा याबद्दल शंका होतीच.

दुकानातून घेताना आणि ऑनलाइन घेताना कीमती मधे काही फ़रक पडतो का? (खुपच बेसिक प्रश्न आहेत, पण मी या संगणक प्रकरणात फारच अनभिद्य आहे.)

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Jan 2018 - 2:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

दुकानदार कधी कधी माल खपविण्यासाठी किंमत कमी करुन विकतो. दुसरे म्हणजे वस्तु समोरासमोर बघुन घेता येते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Jan 2018 - 2:29 pm | राजेंद्र मेहेंदळे

दुकानदार कधी कधी माल खपविण्यासाठी किंमत कमी करुन विकतो. दुसरे म्हणजे वस्तु समोरासमोर बघुन घेता येते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Jan 2018 - 2:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

दुकानदार कधी कधी माल खपविण्यासाठी किंमत कमी करुन विकतो. दुसरे म्हणजे वस्तु समोरासमोर बघुन घेता येते. आज काल ऑन्लाईन मार्केटमध्ये फसवाफसवीचे प्रकार वाढलेते. त्यामुळे ईतकी महागाची वस्तु ऑनलाईन घेउ नये असे मला वाटते.

रॉजरमूर's picture

1 Feb 2018 - 9:14 pm | रॉजरमूर

ते घेतीलच त्यांना कुठला घ्यायचा तो ....
पण बाकी AMD ची अशी लाज काढलीय प्रतिसादात की जणू AMD म्हणजे नाक्यावरच्या कोपर्यातली पत्र्याच्या फडताळात चालणारी कंपनी आहे .
काय माहिती आहे तुम्हाला AMD बद्दल ?
आणि त्यांना घरगुती कामाला पाहिजे तर एकदम i7 अन i5 नशीब i9 नाही सुचवला कारण लेटेस्ट म्हणाल, तर तोही आलाय आता .

नुसते i3, i5, i7 म्हटले की झाले असं काही नसते .......
म्हणजे i3 पेक्षा i5 भारी अन त्याच्यापेक्षा i7 एकदम भारी इतके साधे सरळसोट परिमाण नसते तिथे .त्याच्या जनरेशन,सिरीज ही बघाव्या लागतात .
i3 चा top लेवल चा प्रोसेसर सुद्धा आय ५ च्या मधल्या रेंज च्या आणि आय ७ च्या एन्ट्री लेवल प्रोसेसर पेक्षा उत्तम परफोर्मंस देतो .

आणि latest म्हणजे i5 काढला म्हणजे i3 बंद केला किंवा i7 आला म्हणून इंटेल ने i3 ,i5 जुने झाले अन बंद केले असं नाही होत. सगळ्या सेग्मेंट मध्ये नवीन लेटेस्ट प्रोसेसर येत असतात नवीन जनरेशन मध्ये.
आपापल्या आवश्यकतेनुसार सिस्टीम निवडावी .
हे म्हणजे जिथे बादली भर पाण्याने काम भागू शकतेय हे माहित असताना उगीचच पैसे आहेत म्हणून पाण्याचा टँकर मागवण्यासारखे होईल.

अर्जुन's picture

22 Jan 2018 - 11:06 pm | अर्जुन

बाकी घेताना ब्रँडेड दुकानातुनच घ्या. नेटवरुन मागवु नका.
किंमती व्यतिरिक्त काही फरक पडतो का?

पगला गजोधर's picture

25 Jan 2018 - 4:10 pm | पगला गजोधर

मी दुकानातुन लॅपटॉप घेतला, लीगल लेजिटीमेटऑफिस डिस्काउंटेड किमतीत इन्स्टॉल करून मिळाले, शिवाय सर्व्हिस सेंटर पण त्याच दुकानदाराचे आहे...
सर्व्हिस करताना आपल्याकडला लॅपटॉप व बाहेरचा लॅपटॉप, असा दुजाभाव दुकानदार करतात, असं माझं निरीक्षण....

अर्जुन's picture

22 Jan 2018 - 11:06 pm | अर्जुन

बाकी घेताना ब्रँडेड दुकानातुनच घ्या. नेटवरुन मागवु नका.
किंमती व्यतिरिक्त काही फरक पडतो का?

शब्दबम्बाळ's picture

23 Jan 2018 - 10:58 am | शब्दबम्बाळ

जर तुम्हाला ब्रॅण्डचा काही फार फरक पडत नसेल तर ASUS चे पण बघू शकता.
तुम्हाला i5 प्रोसेसर पुरेसा होईल, २ गिबि ग्राफिक्स कार्ड असू द्यात, रॅम ८ जीबी घ्या. आणि वॉरंटी किती आहे बघा
दुकानातून घेतला तर संपर्कासाठी बरे पडते तसेच बॅग, माऊस, led lamp , एखादा अँटीव्हायरस इत्यादी गोष्टी मागून घेता येतात.
ASUS ला २ वर्ष worldwide वॉरंटी आहे. किंमत ४१ हजारापर्यंत जाईल, दुकानात जाऊन पाहू शकाल.

मी फक्त dell चे लॅपटॉप वापरले आहेत चांगले टिकतात पण महाग असतात बाकीच्यांपेक्षा...
तुमच्या गरजेनुसार निवडा! :)

घरगुती वापराकरिता ८ जीबी रॅम, २ जीबी ग्राफेक्स?
अर्र् काय राव थट्टा मांडलीया?
उगीच पैसे आहेत म्हणून कसे पण घालवायचे? एमेस ऑफिसला, पिक्चर बघायला आणि साध्या गेम खेळाया कशाला लागतीय इतकी रॅम?
गे सगळे कॉन्फीग्रेशन ग्राफीक्सवाल्यांचे झाले. तेसुध्दा मोठमोठ्या फाईली २-४ जीबी रॅमवर ओपन करतात.

शब्दबम्बाळ's picture

24 Jan 2018 - 10:12 am | शब्दबम्बाळ

लॅपटॉप हा मोबाइलला सारखा २-३ वर्षात बदलायची वस्तू नाही असे मला तरी वाटते.
माझा डेल लॅपटॉप ९ वर्षाचा झाला आत्ता, त्या वेळी चांगलं कॉन्फीग घेतलं त्यामुळे अजूनही तो गरजेची काम व्यवस्थित करू शकतो आणि काही नवीन सॉफ्टवेर देखील बऱ्यापैकी चालवू शकतो.

त्यांना आत्ता घरगुती वापरासाठी लॅपटॉप घ्यावा वाटतोय पण म्हणून सगळ्यात साधं कॉन्फीग घेऊन उद्या(किंवा काही वर्षांनी) त्यावर काही भारी सॉफ्टवेर अथवा गेम इन्स्टॉल कराव्या वाटल्या तर केवळ हार्डवेर नीट हाताळू शकत नाही म्हणून वापरताच येत नाही असे व्हायला नको!
"त्यांच्या अपेक्षित बजेट मध्ये" जो सगळ्यात भारी कॉन्फीगचा लॅपटॉप येतोय तोच घ्यावा असेच माझे तरी मत राहील.

गामा पैलवान's picture

24 Jan 2018 - 7:26 pm | गामा पैलवान

शब्दबम्बाळ,

तुमचं उदाहरण आवश्यकता बदललेली आहे. भावी काळात गरजा कशा बदलतील हे आजंच सांगणं अवघड आहे. म्हणून साधं मशीन घ्यावं म्हणतोय. एकदा का आपल्याला काय हवंय आणि काय आवडतंय ते कळलं की मग भारीतलं घ्यायला हरकत नाही. कसे?

आ.न.,
-गा.पै.

(((लॅपटॉप हा मोबाइलला सारखा २-३ वर्षात बदलायची वस्तू नाही असे मला तरी वाटते.)))
हा विचार करूनच मी म्हटले होते की " घ्यावयचा आहे तर एकदमच साधा का घ्यावा?"

गामा पैलवान's picture

25 Jan 2018 - 1:46 pm | गामा पैलवान

shashu,

ल्यापटॉपाच्या बाबतीत नेमकं तेच तर करायचंय. तुम्ही केलेल्या एकंदरीत वर्णनावरून वाटतंय की हे घरातलं पाहिलंच मशीन आहे. भारीतला घेतला तर नुसता पडून राहण्याची शक्यता आहे. साधा घेतल्याने कुटुंबियांपैकी कोणाची कसली आवड आहे हे कळून येईल. मग दोनेक वर्षांनी नवा घ्यायला जाल तेव्हा आवडनिवड नक्की व पक्की असेल. तुम्ही जुना विकू देखील शकाल. हां पण द्रव्यसाठा (=बजेट) थोडा वाढवावा लागेल. पण तो पैसा योग्य कारणी खर्ची पडल्याचं समाधान लाभेल.

थोडी माझी पार्श्वभूमी सांगतो.

मी कधीही भारीतली मशीनं घेतली नाहीत. घरगुती वापरासाठी सेलेरॉन सीपीयू पुरेसा आहे. साधारणत: जितका सीपीयू भारी तितकी किंमत वाढंत जाते. मात्र सीपीयू सर्वात जास्त वेगवान भाग असतो. परंतु मशीनचा वेग हा सर्वात हळू घटकावर अवलंबून असतो. त्यामुळे भारीतला सीपीयू असेल तर अन्य घटक देखील भारी प्रतीचे लागतात. इतका भारीतलं मशीन घेतलं तरी घरी वापर होईलच याची खात्री नसते. मेमरी आणि हार्ड डिस्क भरपूर घ्यायची. कामास येते.

माझं मशीन सेलेरॉन एन-२९४० ड्युअल कोअर + ८ जीबी ऱ्याम + १ टीबी हार्डडिस्क आहे. गरज पडली की नवं घेऊ म्हणून विचार केला होता. आजूनही गरज पडली नाही. मशीन उत्तम चाललं आहे. घरगुती सोडून इतर कामासाठी सुद्धा वापरतो. अद्यापतरी काही अडचण नाही. २०१३ डिसेंबरात घेतलंय. हे काढून दुसरं घ्यावं अशी वेळ आलेली नाही.

तुमच्यासमोर दोन मार्ग आहेत.

१. भारीतला घ्यायचा, पण आवडनिवड माहित नाही.

२. साधा घ्यायचा आणि नंतर त्या अनुभवावरून शहाणं होऊन नंतर भारीतला घ्यायचा.

निर्णय अर्थात तुमच्या हाती! :-)

ऑल-द-बेस्ट!

आ.न.,
-गा.पै.

आ.न.,
-गा.पै.

पहिला एक डेस्कटॉप होता/आहे ( वयवर्षे ८). पण कालानुपरत्वे तो उतारवयात असल्या कारणाने त्यावर खर्च करणे योग्ग्य नाही असे वाटते. तसेच माझ्या एक मित्राने काही महिन्यांपूर्वी डेस्कटॉप खरेदी केला होता. पण एकंदरीत त्याचे असे मत आहे की लैपटॉप घेणे चांगले (अनुभववारुन).
साधारण गेली १० वर्षे संगणक हातालत आहे. पण बाकि तांत्रिक बाबींचे (हार्डवेयर) बाबतीत अद्यानि (खूपच ) आहोत. उदा. ग्राफिक्स कार्ड मधील फरक, RAM +-, प्रोसेस्सर कोणता?
पण लैपटॉप घ्यायचा आहे तर चांगलाच घेवूयात हा विचार पक्का आहे.

मुळात स्वस्त आणि महाग यापेक्ष्या मी जो बजट समोर (३००००-४००००) ठेवला आहे त्यात एखादा ठीकठाक भ्रमण-संगणक मज़या पदरात पडावा ही अपेक्षा आहे. (आता पदर कुठे आहे ते विचारु नका.)

मराठी कथालेखक's picture

23 Jan 2018 - 12:43 pm | मराठी कथालेखक

Fujitsu बघा.

अरे बापरे!!!!! हे सुद्धा नवीनच आहे आमच्यासाठी.

मराठी कथालेखक's picture

24 Jan 2018 - 8:05 pm | मराठी कथालेखक

चांगले असतात.. फारसं मार्केटिंग नाही त्यांचं भारतात पण लॅपटॉप चांगले असतात. घेवू नका हवं तर पण दुकानदाराला नक्की विचारा तरी. बहूधा मेड इन जर्मनी असतात (चायना नव्हे !!)

चौथा कोनाडा's picture

26 Jan 2018 - 1:16 pm | चौथा कोनाडा

आमच्या एका मित्रानं हा फुजितसु घेतलाय.
त्याचा फीडबॅक चांगला आहे.

FUJITSU Notebook LIFEBOOK A514

https://youtu.be/h_4cMaiENCE

गामा पैलवान's picture

23 Jan 2018 - 1:42 pm | गामा पैलवान

shashu,

तुम्ही ल्यापटॉप कशासाठी घेणार आहात? सर्वसाधारण वापरासाठी हवाय की काही खास कारण (उदा. : चित्र रेखाटन, ग्राफिक डिझाईन, जटील व्यूहक्रीडा, गेम्स, वगैरे) आहे?

आ.न.,
-गा.पै.

दैनंदिन घरगुती वापरासाठी, बाकि काही विशेष वापर नाही. पण घ्यावयचा आहे तर एकदमच साधा का घ्यावा? हा एक विचार.

गामा पैलवान's picture

23 Jan 2018 - 7:50 pm | गामा पैलवान

shashu,

तुम्ही कितीही भारीतला संगणक घेतलात तरी दोन वर्षांत निरुपयोगी नसला तरी कालबाह्य निश्चितंच होतो. त्यामुळे विशिष्ट कार्यासाठी वापर नसेल तर मग मी सुचवेन की साधाच घ्या.

आ.न.,
-गा.पै.

भित्रा ससा's picture

23 Jan 2018 - 2:11 pm | भित्रा ससा

लॅपटॉप घेताना आपला वापर काय आहे याचा विचार करणे गरजेचे आहे
तसेच os की डॉस ह्याचापन विचार करा
आपल्या प्रतिसदानंतर आपणास काही ब्रँडची माहिती देईल
कॉम्पुटरवाला भित्रा ससा

ससेराव उशिरा प्रतिसाद देत आहे त्याबद्दल क्षमस्व.
ल्यापटॉप चा वापर हा नेहमीची घरची बिले ऑनलाइन पे करण्या करता, छायाचित्रे पाहण्या करता, चित्रपट पाहण्या करता, कधी वाटले तर खेळ खेळण्या करताच जास्त होइल आणि हो आपले मिपा असणारच की २४ तास ऑनलाइन तसेच MS Office मधे काही ना काही काम असतेच म तेहि वापरू. आणि हो महत्वाचे म्हणजे auto cad ही लोड करून घ्यायचा विचार आहे.

मुक्त विहारि's picture

26 Jan 2018 - 1:37 am | मुक्त विहारि

मग ही सगळी कामे घरी बसल्या-बसल्या, संगणक करून देत असेल तर, मग उगाच तो फिरता संगणक कशाला?

पैसा तुमचा ... पण हा अनावश्यक खर्च जरूर टाळा....

कृपया खालील लिंका बघीतल्यात तर फार उत्तम

https://www.pcworld.com/article/2048257/why-you-may-want-a-desktop-inste...

http://www.differencebetween.info/difference-between-desktop-and-laptop

https://www.t3.com/features/desktop-vs-laptop

शिवाय, लॅपटॉप हातोहात चोरीला जावू शकतो पण संगणक मात्र घरफोडी झाली तरच चोरीला जावू शकतो.हा पण एक मूद्दा लक्षांत घेवू शकता.

sagarpdy's picture

23 Jan 2018 - 2:25 pm | sagarpdy

विषय सुरु आहेच तर
मध्यंतरी इंटेल च्या प्रोसेसर मधील एक बग सापडला. तो कव्हर करण्यासाठी लिनक्स व विंडोज दोघांनाही अपडेट द्यावे लागणार आहेत आणि त्यामुळे परफॉर्मन्स वर परिणाम होणार आहे - असे वाचले
https://www.theregister.co.uk/2018/01/02/intel_cpu_design_flaw/

तर नवीन लॅपटॉप / डेस्कटॉप घेताना इंटेल ऐवजी AMD कडे वळावे का ?

चौथा कोनाडा's picture

23 Jan 2018 - 5:48 pm | चौथा कोनाडा

आम्हालाही घरगुती वापरासाठी अंकधर (लॅपटॉप) घ्यायचा होता ( चार-पाच वर्षांपुर्वी). आंजावर वाचून, कॉनफिगरेशन ठरवून डेल घ्यायचा ठरवला (किं रू ४०,००० /- )
जवळच्या विश्वासू संगणक शो-रूम (नॉन-ब्रॅण्डेड) मध्ये गेलो. सेल्समन ने आमच्या गरजांनुसार काही ब्रॅण्दस दाखवले व डेल पेक्षा बर्‍या कॉनफिगरेशनचा लेनोवो दाखवला व रास्त किंमतीच्या गुणावर शिफारस केली, मग, तो विकत घेतला (किं रू ३३,००० /- ) सात हजार वाचले. काही प्रॉब्लेम नाही आला. कधी कधी कॅड ससॉफ्ट्वेअर्स देखिल वापरतो. (थोडक्यात जस्स्त तांत्रिक बाबी पाहू नका, जनरलाइझ्ड कंसिडरेशनने घ्या.

शिंपल म्हंजे टॉप पाच लिस्ट करा, प्रत्यक्ष पहा व विकत घ्या. चांगला मिळायला हरकत नाही.

काही मुलभूत बाबी....

१. शेजार्‍याकडे जाय आहे ते बघू नये.मायक्रोवेव घरी पडून आहे. १२-१५ हजाराचा शो पीस.

२. आपल्या ऐपती प्रमाणे वस्तू घ्यावी.मी बर्‍याच वस्तू सेकंड हँड वापरतो.दुचाकी-चारचाकी-टी.व्ही.-लॅपटॉप सेकंडहँदच घेतले.निम्मे तरी पैसे वाचतात.चार चाकी बाबतीत खूप पैसे वाचले.दोन-अडीच लाखाची गाडी २०,०००/- (वीस हजारात मिळाली आणि पंधरा हजारात फुंकून टाकली.)

३. सामान्यतः संगणाकाचा उपयोग एक्सेल, वर्ड, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, गेम्स, पिक्चर अथवा नाटक बघणे आणि इंटरनेट इ.पुरताच राहतो. १०एम.बी.पी.एस. वर चालू शकणारा आणि ४ टी.बी.ची एक्सटर्नल हार्ड डिस्कला सपोर्ट करणारा घेतलात तर उत्तम.

४. वस्तू शक्यतो दुकानातूनच घेतल्यास, दुरुस्ती बाबतीत अडचण येत नाही.

५. शक्यतो सगळ्य्य अ‍ॅसेसरीज त्याच वेळा घ्या.माऊस वायरलेस घेऊ नका.बॅटरीचा खर्च वाढतो.अँटी व्हायरस मात्र घ्याच.शक्यतो सगळ्या फाइल्स "डी" मध्ये किंवा दुसर्‍या हार्ड डिस्क मध्ये सेव्ह करा.

६. माझ्या कडे लीनोवा, एसर, डेल आणि एच.पी.चे लॅपटॉप्स आहेत. पण एसर आणि लीनोवा अद्याप सुरु आहेत.डेलने आणि एच.पी.ने मान टाकली.लीनोवा माझ्या घरी सुखाने नांदतात.मग ते माबाइलच्या रुपात असोत किंवा लॅपटॉपच्या रुपात.सेल आणि एच.पी. बायकोच्या आग्रहा खातर घेतले.आमच्या मेहूण्याचा सल्ला.

७. संगणक बनवून घेतला.५ वर्षे झाली.अद्याप तरी अँटी व्हायरस शिवाय दुसरा कुठलाच खर्च करायला लागला नाही.

८. स्पेअर पार्ट्स ज्याचे स्वस्त असतील, अशाच वस्तू शक्यतो घ्या.माझ्या अंदाजाने लीनोवा आणि एसरचे स्पेअर पार्ट्स स्वस्त असतील.

९. वस्तू विकणार्‍यांपेक्षा, वस्तू दुरुस्त करणार्‍याला जास्त ज्ञान असते.पण असा दुरुस्त करणारा माहितीतला असावा.माझ्याकडे अद्याप तरी व्हिडिओकॉनचेच बझूका टी.व्ही. आहेत.२ हजारात मिळाले. सध्या तरी सगळे कार्यक्रम---क्रिकेट आणि सेनेमे आणि नाटके--- आंतरजालावरच बघत असल्याने, टी.व्ही. म्हणजे शोभेची वस्तू झाली आहे.

१०. वस्तू पसंत पडली असेल आणि बजेट मध्ये बसत असेल तर लगेच घ्या.देखण्या बायका दुसर्‍यांच्या आणि टिकणार्‍या वस्तू पण दुसर्‍यांच्या आणि हुशार मुले पण दुसर्‍यांची आणि सुखी माणसांचे सदरे पण दुसर्‍यांचेच.

विशुमित's picture

24 Jan 2018 - 4:10 pm | विशुमित

मुवि काका भुसभुशीत मशागत केलीत.
प्रतिसाद आवडला.

चौथा कोनाडा's picture

24 Jan 2018 - 5:46 pm | चौथा कोनाडा

+१

थोडासा प्रकाश पडलाय आमच्या टाळक्यात.

चौथा कोनाडा's picture

24 Jan 2018 - 5:45 pm | चौथा कोनाडा

मुविसाहेबांचे सर्व मुद्दे सहमतीएबल !
जेव्हढे तुम्हाला पटतायत तेव्हढे कन्सिडर करा.

बाकी, बायको अन मेव्हणा हे दोन कळीचे मुद्दे काळजीपुर्वक हाताळा !

मुविसाहेब ... :-)))

अहो,

भले भले इथे हरतात.

आमच्या हेरॉल्ड लॉईडची पण हीच बोंब.

ह्याविषयाला धरून त्याने "हॉट वॉटर" नावाचा सुंदर सिनेमा पण काढला.

चौथा कोनाडा's picture

26 Jan 2018 - 8:47 pm | चौथा कोनाडा

हेरॉल्ड लॉईड : हॉट वॉटर

आज तूनळीवर काही भाग पाहिले ! जब्री आहेत, काही सीन पाहून खो खो हसलो !

:-))))

एकदा का तुम्ही ह्यांच्या तावडीत सापडलात, की रोज त्यांचे दर्शन घ्यावेच लागते.त्याशिवाय मनुष्याने केलेल्या माकडचाळ्यांच्या उपद्र्वाला तोंड देता येत नाही.

जमल्यास "बस्टर कीटन"चा "द जनरल" हा सिनेमा जरूर पहा.

सर्वसाक्षी's picture

25 Jan 2018 - 1:24 pm | सर्वसाक्षी

घरात वापरायचा असेल तर लॅपटॉप ऐवजी डेस्कटॉप उत्तम.
मी चार महिन्यांपूर्वी डेल घेतला. १९" एलीडी पडदा,८ जीबी रॅम आय ५ , अतिरिक्त दोन वर्षांची सेवाहमी, क्विकहील, मूळ परवान्यासहीत अधिकृत विंडो व ऑफिस यासह ४५०००.००. डबा बोजड नसून बर्‍यापैकी लहान आहे
डेस्कटॉप अधिक दणकट, दुरुस्तील सोपा (लॅप्टॉप दुरुस्ती करायला कुणी फार उत्सुक नसते व ते खर्चिक असते असे ऐकुन आहे(अनुभव नाही). आणखी एक असे की फोटोशॉप वर प्रतिमा पाहताना लॅपटॉप चा पडदा जसा कोन बदलेल तसे रंग व प्रकाशमनता बदलते त्यापेक्षा स्थिर पडदा बरा

पगला गजोधर's picture

25 Jan 2018 - 4:14 pm | पगला गजोधर

लेनेवो डेल हे चांगले वाटतात...
लीगल ओ एस , ऑफिस जरूर घ्या (घरगुती वापरा साठी स्टुडंट एडिशन बरी)...

प्रभो's picture

25 Jan 2018 - 11:57 pm | प्रभो

म्याकबूक :)

गामा पैलवान's picture

26 Jan 2018 - 1:07 pm | गामा पैलवान

shashu,

महत्वाचे म्हणजे auto cad ही लोड करून घ्यायचा विचार आहे.

अत्यंत महत्त्वाची माहिती. best config for autocad वर गूगल सर्च मारला. हे सापडलं : https://forums.autodesk.com/t5/autocad-forum/best-pc-configuration-for-a...

जर ऑटोक्याड वापरणार असाल तर त्याच्यासाठी सुयोग्य मशीन घ्या. त्या क्षमतेअंतर्गत ऑफिस, मिपा वगैरे इतर गरजा आपसूक भागतील.

आ.न.,
-गा.पै.

शाली's picture

26 Jan 2018 - 4:46 pm | शाली

अतीशय स्मुथ मशीन. युजर फ्रेंडली.
माझ्यासाठी तरी वर्ड पेक्षा पेजेस, एक्सेल पेक्षा नंबर्स, पावर पाॅईंट पेक्षा कीनोट जास्त सोपे आहे. ट्रॅकपॅड तर अप्रतीमच. प्रिंट, पीडीएफ, फोटो एडीटींग वगैरे मधे जास्त फिचर्स आहेत. क्लाऊडचा ईतका सुंदर ऊपयोग क्वचितच कुणी केला असेल. जसे फॅमिली शेअरींग, कीचेन, आय बुक वगैरे. अमर्याद ॲप्स. कॅड, फोटोशॉप ऊत्तम चालते. आय मुव्ही, फायनल कट प्रो, दाविंची स्टुडीओ सारखी व्हिडीओ एडीटींग ॲप्स ऊपयोगी. अँटी व्हायरसची आवश्यकता नाही. अजून बरच काही.

मुक्त विहारि's picture

26 Jan 2018 - 9:19 pm | मुक्त विहारि

मग तर फार उत्तम.

माझे वर्षाचे दोन हजार तरी नक्कीच वाचतील.

आनन्दा's picture

29 Jan 2018 - 3:54 pm | आनन्दा

किंमत पण बघुन घ्या एकदा म्हण्तो..

मराठी कथालेखक's picture

1 Feb 2018 - 11:55 pm | मराठी कथालेखक

मी गेली अनेक वर्षे फुकटचा (पण पायरेटेड नव्हे..अधिकृत फ्री एडिशन) अ‍ॅंटी व्हायरस वापरतो आहे (Avira नावाचा) काही अडचण नाही वाटली. विषाणू आले नाहीत की संगणक संथ झाला नाही.

मुक्त विहारि's picture

2 Feb 2018 - 12:14 am | मुक्त विहारि

नेट वरून डाऊनलोड करता येतो का?

नेत्रेश's picture

3 Feb 2018 - 4:59 am | नेत्रेश

मस्त छोटासा पोर्टेबल डेस्क्टॉप, पाहीजे तो कीबोर्ड, माउस, मॉनिटर लाउन वापरा.
Intel NUC

विंडोज डीफेंडर हे मायक्रोसॉफ्टचे फ्री अँटीव्हायर आहे.
Windows Defender

गामा पैलवान's picture

3 Feb 2018 - 1:35 pm | गामा पैलवान

नेत्रेश,

तुम्ही पण फ्यान आहात होय विंडोज डिफेंडरचे? मी दुसरा कोणताही विषाणूप्रतिबंधक वापरंत नाही. उगीच मशीन स्लो होतं. आणि फायदा काही नाही. किमान काळजी घेतली की कोणी विषाणू घुसखोरी करू शकंत नाही. गेल्या अनेक दशकांत माझ्याकडे एकही विषाणू/शतपाद शिरला/सापडला नाही.

आ.न.,
-गा.पै.