उठ मावळ्या ...

गबाळ्या's picture
गबाळ्या in जे न देखे रवी...
22 Nov 2017 - 11:13 pm

आपल्याबरोबर नेहमी पार्टी करणाऱ्या आपल्या साथीदाराने आता फक्त घास फुस अशी प्रतिज्ञा केल्यावर त्याच्या साथीदारांना धक्का बसला. त्याला परत आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी ते म्हणतात.

उठ मावळ्या फोडू चल नळ्या
कुकुटाची सर ना कधी पाचोळ्या
चल मदिरालयी तु घुस
ये सोडूनि घास फूस

कोंबड्यासम केस रंगविसी
कोंबडीस मग का तू वर्जिशी
६५, lolly-pop वर लिंबू टाकुनी चुस
ये सोडूनि घास फूस

वय का आपुले असे मोजिले
चार पेग जर रिते तू केले
यौवन भासेल तूस
ये सोडूनि घास फूस

मुक्त कवितावीररसमुक्तकशब्दक्रीडाविनोदसमाजमत्स्याहारीमांसाहारीशाकाहारीमौजमजा

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

25 Nov 2017 - 7:47 pm | पाषाणभेद

उठ मावळ्या ... हे शिर्षक पाहून अपेक्षेने कविता उघडली पण भ्रमनिरास झाला. उठ मावळ्या ... या ऐवजी तुमच्याच समोरचा एक शब्द वापरता आला असता. असो.

मावळा हा शब्द इथे उपरोधाने वापरला आहे.

पैसा's picture

27 Nov 2017 - 9:44 pm | पैसा

गवत खाणार शाकाहारी हत्ती 100 वर्षे जगतो आणि फक्त मांस खाणारा वाघ 10 15 वर्षं.

गबाळ्या's picture

27 Nov 2017 - 11:13 pm | गबाळ्या

पैसा ताई,

प्रतिसादाबद्दल खूप आभार तुमच्या सारख्या जेष्ठ सदस्याने आणि लेखिकेने नवीन सभासदांना प्रतिसाद देणे हे आमचे भाग्य आहे. त्याबद्दल पुन्हा धन्यवाद.