उमलत जाणारे प्राक्तनाचे ओझे
तणावाच्या पसार्यात गरगरताना
कोणी धाडलंय तुला
कल्पनेपलिकडील जगातून
माझ्या विसविशीत देहसावलीवर
हळूवार फुंकर घालायला
पण चालेल,
काळजात रुतलेला तुझा तो स्पर्श
आणि ती क्षणभंगुर भीक पेलताना
वृथा वैफल्याचा चोरटा सूर...
प्रतिक्रिया
3 Mar 2009 - 1:20 am | चतुरंग
:(
चतुरंग
3 Mar 2009 - 1:26 am | प्राजु
.................
:(
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Mar 2009 - 1:53 am | विसोबा खेचर
कोणी धाडलंय तुला
कल्पनेपलिकडील जगातून
माझ्या विसविशीत देहसावलीवर
हळूवार फुंकर घालायला
बापरे! लै भारी कविता. आमच्या आवाक्याबाहेरची...!
आपला,
(साध्यासोप्या कविता आवडणारा) तात्या.
3 Mar 2009 - 11:15 am | नाना बेरके
१. उमलत जाणारे प्राक्तनाचे ओझे
तणावाच्या पसार्यात ? गरगरताना
२. विसविशीत देहसावलीवर ?
- हे कंप्लीट - "मी .........हिमालयाची उशी. " आहे.
- माफ करा, पण कळ्ळी नाही.