श्रीगणेश लेखमाला २०१७ : प्रस्तावना आणि अनुक्रमणिका

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in लेखमाला
25 Aug 2017 - 8:57 am

lm

नमस्कार वाचक मित्रहो,

श्रीगणेशचतुर्थीचा योग साधून दर वर्षीप्रमाणे श्रीगणेश लेखमाला आपल्यासमोर सादर होत आहे. इतर अनेक उपक्रमांप्रमाणेच ही लेखमाला मिपाचे खास वैशिष्ट्य ठरत आली आहे.
तरी आवाहनास मान देऊन आवर्जून लेखन पाठविणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. वाचकांनी लेखमालेचा आस्वाद घ्यावा आणि आपले अभिप्राय नोंदवावेत ही विनंती.

लेखमालेचा या वर्षीचा विषय आहे, 'माझा मी जन्मलो फिरुनी.'
प्रस्तुत विषय जेव्हा आवाहन धाग्यात मांडण्यात आला, तेव्हा अनेकांनी त्याबद्दल शंका व्यक्त केली, विषयाच्या सयुक्तिकतेबद्दल संदेह मांडण्यात आले. काहींना हा विषय अहंमन्यता, मीपणा, आत्मस्तुती या गोष्टींना खतपाणी घालणारा वाटला. हे सर्व समज की गैरसमज ते लेख पाहून लक्षात येईलच, तसेच वरील विषयातून नक्की कशा प्रकारचे साहित्य अपेक्षित होते ते लेखमालेतील लेख सोदाहरण स्पष्ट करतील अशी आशा आहे.

जुन्या गोष्टी, आचार-विचार, विकार, रिती, पद्धती, अप्रासंगिक ते सर्व मागे सोडून नव्या विचारसरणीचा अंगीकार, तसेच आयुष्यात कुठल्याही प्रकारे केलेला सकारात्मक बदल म्हणजेही नव्याने जन्म. दर वेळी आयुष्य बदलण्यास एखादी मोठी घटना, कलाटणी कारणीभूत असेल असे नाही. ज्या क्षणी माणूस त्याच्या आताच्या जगण्यास सुसंगत नसलेल्या गोष्टींचा त्याग करून उपयुक्त गोष्टींचा स्वीकार करत पुढे जातो, तोच त्याचा पुनर्जन्म म्हणता येईल.

पाच वर्षांपूर्वी आपण कसे होतो, तेव्हाचे आपण आणि आताचे आपण यात किती फरक आहे, असा विचार केला तरी आपल्याला कळून येईल, आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर आपल्यात अनेक प्रकारे बदल होत जातात, जुने विचार बदलत जाऊन त्यांची जागा नवीन विचार घेतात, राहणीमान, जीवनशैली यातही बदल होत राहतात. या सर्वांतून एक नवीन 'मी' दर क्षणी घडत असतो आणि तसा तो घडलाही पाहिजे, कारण बदल हा आयुष्यातील एकमेव स्थायिभाव आहे.

फिरून जन्म होणे, चुकांमधून मार्ग काढत पुढे जाणे यातून भव्य-दिव्य असे काही अभिप्रेत नाही. यात कुणा थोर व्यक्तींच्या, सेलिब्रिटीजच्या, ख्यातकीर्त लोकांच्या आयुष्यातील रोचक घटना असाव्यात, कुणी काही जगावेगळे अनुभव, किस्से सांगावेत असेही गरजेचे नाही. अतिसामान्य लोकांच्या आयुष्यातही अशा काही घटना घडतात की त्यांना स्वत:मधील, स्वत:सही जाणीव नसलेले सुप्त गुण बाहेर आणून प्राप्त परिस्थितीवर मात करून आयुष्यात पुढे मार्गक्रमण करावे लागते. अशाच काही अनुभवांचा या वर्षीच्या लेखमालेत समावेश आहे.

विषयानुरूप उदाहरणे द्यायची, तर कुणी असाध्य आजारावर, अपघातावर मात करतो, कुणी नोकरीतील चाकोरीबद्ध साचलेपणातून बाहेर पडून नवी वाट चोखाळू पाहतो. कुणी स्त्री आलेल्या संकटांवर, परिस्थितीवर मात करत स्वयंसिद्ध बनू पाहते. कुणी गरिबीचे चटके सोसून स्वकष्टाने एक संपन्न आयुष्य घडवितो, कुणी परिस्थितीची जाण ठेवून समाजाला आपण काही देणे लागतो याचे भान ठेवत हे देणे कुठल्याही स्वरूपात फेडू पाहतो. अशा अनेक उदाहरणांतून 'फिरुनी जन्मणे' हा लेखमालेचा विषय योग्य प्रकारे स्पष्ट होईल असे वाटते.

प्रत्येक व्यक्ती ही सामान्यच असते; मात्र काही वेळा अशा येतात, जेव्हा त्या व्यक्तीला ठरावीक चौकटीतून बाहेर पडून, आपल्यातील ताकद, क्षमता पूर्णपणे वापरून वेगळ्या वाटा निवडून त्यावरून चालावे लागते. हीच ती वेळ असते जेव्हा त्या सामान्यांतील असामान्यत्व ठळकपणे दिसून येते आणि त्यांच्याबरोबर इतरांचेही आयुष्य उजळून टाकते.

असेच काही सामान्यांतील असामान्यत्व दाखविणारे अनुभव आपल्यासमोर ठेवण्यास आम्हांस अत्यधिक आनंद होत आहे. तरी सर्वांनी लेखमालेचा आस्वाद घ्यावा आणि आपले अभिप्राय अवश्य नोंदवावेत, ही पुन्हा एकदा विनंती.

चला तर मग, जयदीप साहनींच्या या अत्यंत सुंदर आणि प्रभावी शब्दांसह लेखमालेचा श्रीगणेशा करूया.

उलझे नहीं तो कैसे सुलझोगे,
बिखरे नहीं तो कैसे निखरोगे,

उड़ने दो..

हवा ज़रा सी लगने दो,
सोया था अब जगने दो,

पंखों को हवा ज़रा सी लगने दो..

अनुक्रमणिका

श्रीगणेश लेखमाला भाग १: माझा मी जन्मलो फिरुनी!
लेखक : माम्लेदारचा पन्खा

श्रीगणेश लेखमाला भाग २: क्ष
लेखक : पैलवान

श्रीगणेश लेखमाला भाग ३: फोडणी पहावी टाकून, अर्थात 'संगीत गोईंग डच'
लेखक : आदूबाळ

श्रीगणेश लेखमाला भाग ४: एका अनोळखी जगातला प्रवास.
लेखक : अनिवासि

श्रीगणेश लेखमाला भाग ५: माझी मी जन्मले फिरुनी.
लेखिका : ज्योति अलवनि

श्रीगणेश लेखमाला भाग ६: माझा मी जन्मलो फिरुनी.
लेखक : Kishan Vasekar

श्रीगणेश लेखमाला भाग ७: कुण्या देशीचे पाखरू
लेखिका : Naval

श्रीगणेश लेखमाला भाग ८: दिव्यत्वाची प्रचिती
लेखक : बाजीप्रभू

श्रीगणेश लेखमाला भाग ९: एका बापाचा जन्म
लेखक : दशानन

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

25 Aug 2017 - 9:08 am | अनुप ढेरे

लेख वाचायला उत्सुक आहे.

बाजीप्रभू's picture

25 Aug 2017 - 10:06 am | बाजीप्रभू

मी देखील..

मस्त.. लेख वाचायला उत्सुक आहे.
शेवटी दिलेल्या ओळी फारच आवडत्या आहेत.. त्यामुळे प्रस्तावना जास्तच आवडली.

यशोधरा's picture

25 Aug 2017 - 10:53 am | यशोधरा

उलझे नहीं तो कैसे सुलझोगे,
बिखरे नहीं तो कैसे निखरोगे,

उड़ने दो..

हवा ज़रा सी लगने दो,
सोया था अब जगने दो,

पंखों को हवा ज़रा सी लगने दो..

क्या बात! प्रस्तावना आवडली.

तुषार काळभोर's picture

25 Aug 2017 - 1:02 pm | तुषार काळभोर

उलझे नहीं तो कैसे सुलझोगे,
बिखरे नहीं तो कैसे निखरोगे,

उड़ने दो..

हवा ज़रा सी लगने दो,
सोया था अब जगने दो,

पंखों को हवा ज़रा सी लगने दो..

याने मुळातल्या सुंदर प्रस्तावनेला चार चांद लावले आहेत!

अतिशय उत्कृष्ट बॅनर!!
श्री गणेश लेखमालेच्या इतिहासातील सर्वांत देखणं बॅनर!!

यशोधरा's picture

25 Aug 2017 - 2:52 pm | यशोधरा

हो, बॅनर फार सुरेख जमलंय.

मितान's picture

25 Aug 2017 - 1:51 pm | मितान

लेखमाला वाचायला उत्सुक :)

स्वाती दिनेश's picture

26 Aug 2017 - 6:37 pm | स्वाती दिनेश

हेच म्हणते.
स्वाती

अत्रे's picture

25 Aug 2017 - 2:53 pm | अत्रे

वाचण्यास उत्सुक. लेख टाकण्यासाठी मुहूर्ताची वाट बघताय का :)

प्रस्तावना आवडली. बॅनर अगदी मस्त झालय.

पैसा's picture

25 Aug 2017 - 3:21 pm | पैसा

श्रीगणेश लेखमालेला शुभेच्छा!

सर्व मिपाकरांना मिपा १०व्या वर्धापन दिनाच्या आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!

सस्नेह's picture

25 Aug 2017 - 4:01 pm | सस्नेह

रोचक प्रस्तालना !
लेखमालेच्या प्रतीक्षेत...

ज्योति अळवणी's picture

25 Aug 2017 - 4:43 pm | ज्योति अळवणी

अप्रतिम सुंदर प्रस्तावना. लेख कधीपासून टाकणार?

लेखमालिका सवडीने वाचणार.

मदनबाण's picture

25 Aug 2017 - 7:19 pm | मदनबाण

अभ्या बॅनर आवडला आहे रे... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आला रे... आला रे गणेशा... :- Daddy

सर्व मिपाकरांना मिपा १०व्या वर्धापन दिनाच्या आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!

गणेश लेखमालेचा हा प्रस्तावनेचा लेख खूप छान झालाय, आवडला. लेखमाला वाचण्यास उत्सुक आहे.

प्रचेतस's picture

25 Aug 2017 - 8:45 pm | प्रचेतस

उत्तम प्रस्तावना.
लेखांच्या प्रतिक्षेत.

नि३सोलपुरकर's picture

25 Aug 2017 - 9:17 pm | नि३सोलपुरकर

अभ्या बॅनर आवडला आहे.
प्रस्तावना , दिलेल्या ओळी फारच आवडत्या आहेत.. त्यामुळे प्रस्तावना जास्तच आवडली.
लेखमाला वाचायला उत्सुक .

सहजसुंदर आणि अत्यंत प्रभावी प्रस्तावना. लेखमालेबद्दल उत्सुकता अधिकच वाढली आहे. उद्याच्या लेखाची आतुरतेने वाट पाहत आहे. घरची गडबड सांभाळुन इथले उपक्रम पार पाडणार्‍या सर्व साहित्य संपादकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.

पिलीयन रायडर's picture

26 Aug 2017 - 4:19 am | पिलीयन रायडर

फारच छान प्रस्तावना. लेख वाचण्याची उत्सुकता शिगेला पोहचलीये. लवकर लवकर लेख टाका!!

रुस्तम's picture

27 Aug 2017 - 10:34 am | रुस्तम

लेखाची वाट पाहतोय... नवीन लेख कधी प्रकाशित होणार?

प्रस्तावना अगदी मुद्देसूद आणि उत्सुकता वाढवणारी आहे! लेखमालेची सुंदर सुरुवात!

आतापर्यंतच्या ३ लेखांत पहिला जास्त आवडला.

प्रीत-मोहर's picture

28 Aug 2017 - 2:04 pm | प्रीत-मोहर

वाचतेय!!

सही रे सई's picture

28 Aug 2017 - 11:37 pm | सही रे सई

हि प्रस्तावना आणि त्या नंतर आलेले तीनही लेख खूप आवडले. बॅनर पण मस्त दिसतयं.
आता नवीन लेखांची उत्सुकता वाढली आहे.
सगळ्या संयोजकांच मनापासून कौतुक.

राघवेंद्र's picture

29 Aug 2017 - 2:29 am | राघवेंद्र

असेच म्हणतो

संग्राम's picture

30 Aug 2017 - 12:44 pm | संग्राम

रोज एक लेख प्रकाशित करण्याची कल्पना आवडली ...

रोज एक लेख प्रकाशित करण्याची कल्पना आवडली .>>+1. सोप्प पडतं वाचायला. पण मला वाटतं आतापर्यंतच्या श्रीगणेश लेखमालेत नेहमीच रोज एकच लेख यायचा.
दसरा आणि दिवाळीला पण असेच केले तर बरे होईल.

पिलीयन रायडर's picture

30 Aug 2017 - 6:34 pm | पिलीयन रायडर

हो. मिपाची सिग्नेचर श्री गणेश "लेखमाला"च असते.

वाचकांना अंकापेक्षा लेखमाला जास्त सोयीच्या असतात असे माझेही मत आहे. सर्वच लेखांना न्याय देत येतो आणि प्रत्येक लेखकाला नीट वाचकवर्ग मिळतो. शिवाय बोर्डावरचे बाकीचे लेखही झाकोळले जात नाहीत. त्यामुळे दिवाळी अंक टप्प्या टप्प्यात आला तर आवडेल.

प्रस्तावना आवडली. लेख वाचतेय.

यशोधरा's picture

2 Sep 2017 - 1:08 pm | यशोधरा

सगळ्यात शेवटी मिपागणेशचित्रमालेमध्ये झळकलेले सगळे गणपतीबाप्पा एकच धाग्यात बघायला आवडतील.