adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती

कोंबडी प्रेमी's picture
कोंबडी प्रेमी in काथ्याकूट
21 Jul 2017 - 5:47 pm
गाभा: 

https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU

हि एक लिंक पाहिली.

ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत

मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे

ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ??

एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ??
“मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर”

अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात.

मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम
मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा”
मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ?

मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे)

तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल ....

समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..

प्रतिक्रिया

सुस्पष्ट, संतुलित प्रतिसाद.

एखाद्याला खरंच घर सावरायचं असेल, तर त्या माणसाने घरातल्या प्रत्येक माणसाकडून चूक होऊ शकते आणि त्यामुळे एक संसार मोडू शकतो हे गृहीत धरून असे विडिओ बनवावेत. पण बरेचदा तुम्हाला टार्गेट ऑडियन्स कुठलाच मिळत नाही कारण तुम्ही सगळ्यांनाच आरसा दाखवता आणि तो कोणालाच बघायचा नसतो. त्यापेक्षा टोकाचं फेमिनिस्ट होणं किंवा अपर्णा ताईंसारखं दुसरं टोक गाठणं सोयीचं पडत.

टोकाचे क्रिमिनल पुरुषवादी पुरुष ते पुरूषवादी पुरूष ते साधे पुरुष ते साध्या स्त्रीया ते स्त्रीवादी स्त्रीया ते टोकाच्या क्रिमिनल स्त्रीवादी स्त्रीया हा सगळा स्पेक्ट्रम संख्याशास्त्रातल्या नॉर्मल डिस्ट्रिब्यूशन प्रमाणे समाजात असणार. आणि पर्यायाने या स्पेट्रमच्या प्रत्येक होल किंवा पार्ट भागाची दखल घेणारे सुधारक देखिल असणार असा दृष्टिकोन बरा. असो.

विशुमित's picture

27 Jul 2017 - 11:23 am | विशुमित

सुस्पष्ट, संतुलित प्रतिसाद.

+१११११

लहान मुलांचे उदाहरण तंतोतंत पटले.

<<<<<सुनेच्या बाबतीत अगदी शिकलेल्या घरांमध्ये, एरवी स्वभावाला चांगल्या असणाऱ्या माणसांमध्ये सुद्दा हक्क गाजवायची, तिने सगळ्या गोष्टीत आपलं ऐकलं पाहिजे हि वृत्ती उफाळून येते.>>>
==>> मित्राच्या लग्नाला जाऊ नाही शकलो म्हणून काही दिवसांनी त्याला भेटायला घरी गेलो. ओळख करून देता देता त्याने चक्क त्या नवऱ्यामुलीला माझ्या पाया पडायला सांगितलं. मी मित्राला म्हंटले "अरे मी काय एवढा बुजुर्ग व्यक्ती नाही, मी तुझ्या समवयस्क आहे" तर त्याची आई लगबगीने स्वयंपाक घरातून लगबगीने बाहेर आली आणि म्हणाली " संस्कार असतात, केलेच पाहिजे हे"

ओळख करून देता देता त्याने चक्क त्या नवऱ्यामुलीला माझ्या पाया पडायला सांगितलं

ही म्हणजे हैट्ट झाली!

आमचे लग्न झाल्यावर एकदा माझ्या पाया पडायला कोणीतरी सांगितले होते आमच्या हीला. जाम संतापलो होतो तेव्हा मी. चालणार नाही म्हटले!

त्यात काय संतापायचे उगाच ब्वा,
चांगला थाटात उभे राहून आशीर्वाद म्हणून दोन गुगलच्या अन विकिपीडियाच्या लिंका द्यायच्या.
हाकानाका.

काका उगाच खस्पट काढू नका. ह घे :)

खुसपट असते हो ते बाळा, लक्षात ठेव. खसपट वेगळे.
आयुष्यमान हो, जाललिंकासंपन्न हो.

उगा प्रमाणभाषा नको. बोलीभाषेत लिहिलंय.

अगदी हेच! आमच्यापेक्षा वयाने लहान मित्र भारतातून लग्न करून आला. त्यानंतर दोनेक अठवड्यात उपहारगृहात भेटला असता "भाभीके पैर छुओ" असं म्हटल्यावर ती मुलगी हाटेलातच पन्नास लोकांच्यादेखत पाया पडली. हे अजिबात म्हणाजे अजिबातच एक्सपेक्टेड नव्हते. मला काय करावे समजेना. "अगं, नको नको" वगैरे म्हटलं पण हातभर लाल पांढर्‍या बांगड्या भरलेल्या मुलीने माझ्या गुढग्यांना हात लावून पाय लागू म्हटलेही. नंतर तीनेक वर्षात बाळाला फिरवताना भेटली होती. खूप बदलली होती तेच बरे वाटले.

स्वधर्म's picture

26 Jul 2017 - 1:24 pm | स्वधर्म

ईतर सामाजिक सुधारणांबद्दल त्यांची मते काय अाहेत, ते ऐकायला अावडेल. उदा. अांतरजातीय विवाह किंवा अारक्षण (महिला अारक्षण किंवा मागासवर्गियांसाठी सरकार देत असलेले). हे जर त्यांना मान्य असेल, एकूण विचार सुधारणावादी असतील, तर मग त्यांचे भाषण म्हणजे कुटुंबव्यवस्था टिकावी म्हणुन केलेले कदाचित भाबडे प्रबोधन मानता येईल.

त्यांच्या भाषणात लिव इन चा उल्लेख आहे. एका आंतरजातीय विवाहाचा देखिल आहे. त्यांचं काही "इन-प्रिंसिपल" निगेटिव मत नाही. पण त्या अनुषंगाने येणार्‍या बाबींचे ध्यान ठेवा नि राडा करू नकात असा काहिसा सुर आहे.

मी अगदी खरं खरं सांगू का!!!! अरुण जोशींचं लिखाण वाचायला आवडते.
पण मला या धाग्यातील अरुण जोशींचा एकही प्रतिसाद कळलेला नाही.
"अरे भाई...आखिर केहना क्या चाहते हो!!!"

आज पुछुन्गा खुदा से, थोडासा दिमाग और क्यो नही दे दिया मुझे. अरुणजी की बाते तो समझ में आती.

इथल्या अलमोस्ट सर्व वाचकांचं मला उत्तम ललित लिहिता येतं (आणि अललित तितकंसं लिहिता येत नाही) असं मत आहे.
मला अललित उत्तम लिहिता येतं (शेवटी काय सत्ये आणि भूमिका लिहायच्या. ) आणि लेखकाचा पिंड माझा नाही असं माझं मत आहे (वर मला ललित लिहिता येत असं माझं प्रामाणिक लोकांना विनय वैगेरे वाटतं.).
त्यामुळं माझी देखिल अवस्था "ये क्या हो रहा है, भाई?" अशी आहे. सो चिलॅक्स.

वर मला ललित लिहिता येत असं माझं प्रामाणिक लोकांना विनय वैगेरे वाटतं.
हे
वर मला ललित लिहिता येत नाही असं माझं प्रामाणिक मत लोकांना विनय वैगेरे वाटतं.
असं वाचावं.

अजो, तुम्ही एक हुशार व्यक्ती आहात. अ‍ॅबस्ट्रॅक्ट पद्धतीने विचार करणं तुम्हाला जमतं.

तुम्ही ललित लिहिता तेव्हा ते ललित आहे याचं भान ठेवून नॉन-अ‍ॅबस्ट्रॅक्ट पद्धतीने लिहिता. त्यामुळे माझ्यासारख्या जन्तेला ते समजतं, आवडतं. पण ते तुम्हाला व्यक्तिशः ते रुचत नाही, कारण अ‍ॅबस्ट्रॅक्ट पद्धतीने विचार करण्याची खाज त्यात भागत नाही.

उलट, तुम्ही जेव्हा अललित लिहिता, तेव्हा ती भागते, त्यामुळे तुम्ही खूश असता. पण हा अ‍ॅबस्ट्रॅक्ट विचार जन्तेला कळत नाही, त्यामुळे लोक वैतागतात.

यावर उपाय म्हणून तुम्ही एकदा ललित पद्धतीने (म्हणजे 'प्लेयिंग टू द ऑडियन्स' पद्धतीने) अललित लिहून बघा. म्हणजे तुमची ललित लेखनातली आणि अललित विचारांतली बलस्थानं एकत्र आणून बघा.

पिराताई,

बायकांना सुखी संसारासाठी इतके उपदेश करत असताना, दोन शब्द पुरुषांनाही सांगायला काय जातं?

अपर्णाबाई पुरुषांना उपदेश का देत नाहीत याचं उत्तर पंधरा सेकंदांत इथे मिळेल : https://youtu.be/HI7GBWFU3Pw?t=7m34s

आ.न.,
-गा.पै.

कोंबडी प्रेमी's picture

26 Jul 2017 - 7:48 pm | कोंबडी प्रेमी

ठीक आहे हे १५ सेकंद ....
पण पुढच्या काही मिनिटातील उर्वरित क्लिप्स मधल्या मुद्द्यांच काय ?

युनिसेक्स सलून बद्दल ह्यांना प्रोब्लेम्स आहेत
५० हजार देऊन अंगभर टाटू वगैरे अतिरंजित आहे ...
flat नि सगळ flat केलाय
मामा १३व्य मजल्यावर राहायला जाऊन हरवलाय ...
पुरुषांनी स्त्रियांच्या हातावर मेंदी काढणे ह्यात ह्यांना प्रचंड भ्रष्टाचार दिसतो ....
नवर्या शिवाय कोणत्याही पर पुरुषाचा स्पर्श मला झाला नाही हे त्या अभिमानाने सांगतात .... म्हणजे कॉर्पोरेट विश्वात रोज करायला लागणारा शेक hand म्हणजे ह्यांना डायरेक्ट बदफैलीच वाटत असणार ...

ह्या अतिपणाला अंत नाहीये

कोंबडी प्रेमी's picture

26 Jul 2017 - 7:55 pm | कोंबडी प्रेमी

शिकल्या सवरलेल्या मुलींना मोठ्या शहरातील वास्तव्य, परदेशातील वास्तव्य करायची वेळ आली आणि हे असले बावळट सल्ले घेऊन त्या वावरल्या तर कुत्रे हाल खाणार नाहीत ....

म्हणजे ह्या बाईंच्या मते त्या मुलींनी तिथेच संकुचित वातावरणात बुरसटलेले राहावे ...वेल, मुंबई पुण्यात हे ओपन फोरम मध्ये बोलून बघा म्हणावं ...

अभ्या..'s picture

26 Jul 2017 - 8:03 pm | अभ्या..

तिथेच संकुचित वातावरणात बुरसटलेले राहावे

बळंच...काहीही

मुंबई पुण्यात हे ओपन फोरम मध्ये बोलून बघा म्हणावं ...

जरा उलट करुयात काय? हीच आपली मते उर्वरीत आक्ख्या महाराष्ट्रात आपण कीती जोरात बोलू शकाल?

कोंबडी प्रेमी's picture

26 Jul 2017 - 8:11 pm | कोंबडी प्रेमी

कुणाला दुखवायचे नाही, पण लहान गावातून आलेल्या (महाराष्ट्र आणि बाहेरील सुद्धा) मुलींची सोडा मुलांची देखील मोठ्या शहरात रूलतांना जी फे फे उडते सुरुवातीला ती आठवून लिहिलं आहे ...

उर्वरित महाराष्ट्रात हि मते बोलायचं म्हणताय तर जरूर बोलता येईल, वेळ आली पाहिजे आणि संधी मिळायला हवी ....

पुन्हा एकदा : पुणे मुंबई म्हणजे जग नाही हे माहिती आहे आणि इतरांना काही वेगळ लेखून दुखवायचा हेतू नाही पण तरीही काही त्या दृष्टीने खटकल तर प्लीज माफ करा

मुलांची देखील मोठ्या शहरात रूलतांना जी फे फे उडते सुरुवातीला

हे सगळीकडे असते. मग पुणे मुंबईकर काय न्युयॉर्क वॉशिंग्टनात पेठेत/चौपाटीवर फिरल्यासारखे फिरतात काय सुरुवातीला?

उर्वरित महाराष्ट्रात हि मते बोलायचं म्हणताय तर जरूर बोलता येईल, वेळ आली पाहिजे आणि संधी मिळायला हवी ....

लवकर बघा संधीचं, सोलापुरात काही करायचे अस्ल्यास अवश्य कळवा. मी असतो इथेच.

कोंबडी प्रेमी's picture

26 Jul 2017 - 8:37 pm | कोंबडी प्रेमी

हे सगळीकडे असते. मग पुणे मुंबईकर काय न्युयॉर्क वॉशिंग्टनात पेठेत/चौपाटीवर फिरल्यासारखे फिरतात काय

नै नाहो दादा ...पण म्हणूनच इंडक्शन मध्ये आवश्यक माहिती देतात कि नै ...तिथ्ले डूज आणि donts सांगतात

लवकर बघा संधीचं, सोलापुरात काही करायचे अस्ल्यास अवश्य कळवा. मी असतो इथेच.

अवो आमच कै मेन काम ते नै पण तुमी शिरीयस असाल तर बोलवा आमास्नी येऊ आम्ही ...

जेम्स वांड's picture

26 Jul 2017 - 9:34 pm | जेम्स वांड

चुना घुसळून लोणी निघत नसतं! हे गावठी ज्ञान पुन्हा एकदा रोकडे असल्याची जिवंत प्रचिती आली हा धागा वाचून, मेगाफायटी लोक एकमेकांना बडवत बसली अन कीबोर्ड चेपत बसली, कोणी एक पाऊल पुढं घ्यायला तयार नाही का बारक्या बापाचा व्हायला तयार नाही. इतकं कसं लोक कळफलक बडवतात देव जाणे, मानवाधिकार आयोग असतो तसा कळफलक बडवणे बंदी आयोग निघेल अश्याने एखादा.

एवढ्या राड्यात अपर्णा रामतीर्थकर ताईंची भाषणे समक्ष ऐकलेला अभ्याच एकटा बोंबलभिक्या ठरला! त्याचे अनुभव तर कोण रुजू बी करून घेईना.

चुना कुठला जेम्सराव, पब्लिक पाण्यावर लोणी काढाया बघतेय.
असो. सिलेक्टिव्ह रीडिंग प्रमाणे सिलेक्टिव्ह लिसनिंग पण असतेच म्हणा.
आम्हाला जे पटलं, आवडलं ते घेतलं.
बाकी कुणाविषयीच बोलायची आमची औकात नाहीये.
धन्यवाद.

जेम्स वांड's picture

27 Jul 2017 - 7:09 pm | जेम्स वांड

अवो अत्रे आहात हो!! मराठी शब्द नवीन कळला म्हणता तवा काळजात दुकत राहतंय बगा.........

अत्रे's picture

27 Jul 2017 - 7:12 pm | अत्रे

:)

गामा पैलवान's picture

27 Jul 2017 - 2:31 am | गामा पैलवान

कोंबडी प्रेमी,

पुरुषांनी स्त्रियांच्या हातावर मेंदी काढणे ह्यात ह्यांना प्रचंड भ्रष्टाचार दिसतो ....
नवर्या शिवाय कोणत्याही पर पुरुषाचा स्पर्श मला झाला नाही हे त्या अभिमानाने सांगतात .... म्हणजे कॉर्पोरेट विश्वात रोज करायला लागणारा शेक hand म्हणजे ह्यांना डायरेक्ट बदफैलीच वाटत असणार ...

हस्तांदोलन करतांना हात उघडावा लागतो. अंगभर मेंदी काढायला कपडे उघडून बसावं लागतं.

(संपादित) (लेखनात वैयक्तिक उल्लेख अथवा टिप्पणी टाळावी.)

अपर्णाबाईंचा प्रश्न 'मुलीच्या आईला काहीच कसं वाटंत नाही मुलीला परपुरुषासमोर उघडं बसवायला' असा होता. म्हंटलं कुण्या मुलाच्या जवळच्या स्त्रीला लक्ष्य करून हा प्रश्न करून बघूया. एखाद्या मुलीला केला तर अनाहितांची नसती आफत यायची. म्हणून तुम्हांस प्रश्न करतो आहे. कृपया सांभाळून घेणे. तुमची आई मलाही आईसारखीच आहे.

आ.न.,
-गा.पै.

कोंबडी प्रेमी's picture

27 Jul 2017 - 9:35 am | कोंबडी प्रेमी

अंगभर मेंदी अथवा टाटू हे जरा अति वाटतय अस मी म्हटलंय ... त्यामुळे तो मुद्दा बाद

एखादी स्त्रीला पुरुष किंवा स्त्री कुणाकडूनही मेंदी काढून घेतांना बघून ज्याला त्यात लैंगिकता दिसते त्याने स्वत:च मानसोपचार घ्यावे असे वाटते ...
तुमच्या एखाद्या पुरुषाला कुणा स्त्रीबरोबर हस्तांदोलन करताना त्यांच्याही चारित्र्यावर तुम्ही आक्षेप घेत असाल ह्या न्यायाने ..

तुमच्या इतक्क्या खालच्या पातळीला उतरून मी बोलू शकत नाही पण वरच्या स्त्री किंवा पुरुष ह्यामध्ये तुमच्या घरातले किंवा निकटचे किंवा तुम्ही स्वत: ह्यांचे नाव घालून बघायला हरकत नाही ...

असो

निदान तुमच्यापुरते मी तुमच्याशी संवाद थांबवतो आहे; तुमचे तुम्ही बघा ...

कोंबडी प्रेमी,

माझ्याशी संवाद थांबवल्याबद्दल अभिनंदन. असे सुस्पष्ट विचार पाहिजेत.

नेमकं इथंच त्या मुलीच्या आईचं घोडं पेंड खातंय. अंगभर गोंदवण्यासाठी कुणासमोर उघडं बसावं आणि कुणासमोर उघडं बसू नये याचे काही सुस्पष्ट निकष असतात. हे त्या माऊलीच्या गावी नाही. हातभर मेंदी आणि अंगभर मेंदी यांत तुम्हाला जशी सीमारेषा आखंता येते, तशीच त्या माऊलीसही येवो. इतकंच.

आ.न.,
-गा.पै.

मला ते ट्याटूचं जरा वाढवून सांगितल्यासारखं वाटलं. लग्नाची मेंदी फारतर हात भरून व कोपरापर्यंत काढण्याची पद्धत आहे. आता कोणी खांद्यापर्यंत मेंदी काढून घेतली असेल तर आभावाने आढणारी गोष्ट म्हणून सोडून द्यायला हवे. पायावरही जास्तीतजास्त गुढग्यापर्यंत! उगीच त्या काहीही सांगतात. आणि पन्नास हजार वगैरे मेंदीला देणारे किती श्रीमंत असतील पहा म्हणजे झालं! अश्यांच्या लेकीसुनांकडे डोळे वाकडे करून पाहताना त्या मनुष्याला स्वत:च्या जिवाची पर्वा सोडून द्यावी लागेल. अंगभर मेंदी काढणारे लोक्स असतील पण तयार ट्याटूज मिळतात ते काही मिनिटात चिकटवून होतात. आजचे पुण्यातले मेंदीचे दर सांगते. एका हाताला मनगटापर्यंत काढताना १५० रुपये साधी मेंदी (काही ठिकाणी दोनशे रु.). अरेबिक मेंदी हातावर थोडीच असते म्हणून १०० रुपये. त्यावर चकमक चिकटवायचे आणखी थोडे पैसे. प्र्त्यक्षात एक गोष्ट होणे आणि ती आपल्यापर्यंत येताना वाढवलेली असण्याची शक्यता असते. राजस्थानी कारागीरांकडून काढून घेण्याबद्दलही त्यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. अरेच्च्या! ती कला आहे, ज्यावर ते पोट भरतात. चावटपणा करून पाहू देत की! उलट इथे नटणे मुरडणे या बायकांच्या प्रांतात खूप कमी टक्के पुरुष चावटपणा करण्याची शक्यता आहे. नवरीची मेंदी काढायला दसपटीपेक्षा पैसे जास्त घेतले तरी पाच हजार दोन्ही हात व आणखी पाच हजार पायांवर काढायचे!
आता एरवीपेक्षा पाचपट जास्त पैसे वरील उदाहरणात दिले आहेत जे एरवी समान्य मनुष्य देणार नाही.

व्हिडिओत ते पुरुषांनी बायकांना साडी नेसवण्याचे ऐकले. मेक अप करण्याचेही. आजकाल मेकअप आर्टीस्ट असे असतात. तसं पहायला गेलं तर पुरुष डॉक्तरांकडे कितीतरी महिला जाऊन आपली खासजी दुखणी सांगून औषधे घेतात, तपासून घेतात. तसेच हे आहे असे वाटते. हा त्या त्या मनुष्याचा व्यवसाय आहे. मग यात वाईट वागणारे कोणी नसतीलच असे कसे सांगणार? पुरुष मेकअप आर्टीस्ट व साडी नेसवणारे परवडतील इतकी मध्यमवर्गीय लग्ने अजून खर्चीक व्हायचियेत. आणि ज्यांना हे परवडते त्यांच्याकडे शुद्ध व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता येणारे कोणी चालणार नाही हे सरळ आहे.
आमची आख्खी फ्यामिली जवळच्या सलोनमध्ये जाऊन केस कापून घेते. तिथे बायका आहेत. माझ्या नवर्‍याचे केसही बाईच कापते. आता यात जर कोणी तिरकी बात शोधायचा प्रयत्न केला तर मलाच हसू येईल.
उद्या एखाद्या उपहारगृहात पुरुष शेफच्या हातचं बनवलेलं खाल्लंत म्हणतील पण आपल्याकडे वर्षानुवर्षे महाराज, आचारी असतात. महाभारतापासून भीमाने बल्लवगिरी केल्याचे दाखले असताना उगीच या गोष्टींवर वाद घालणे कितपत व्यवहार्य आहे?

पिलीयन रायडर's picture

27 Jul 2017 - 3:57 am | पिलीयन रायडर

तुला एक गंमत सांगु?! पुण्यात बरं का, पाश्चात्य देशात वगैरेही नाही... बायकांचे आतले कपडे डिझाईन करणारे आणि हे कपडे घेताना बायकांना सल्ला देणारे "पुरुष" अस्तित्वात आहेत. अनेकांना अनेक अश्लील विचार ह्यातुन सुचतील (ज्याची त्याची लेव्हल!), धर्म वगैरे बुडाला असेही वाटेल. पण हे अगदी खरंय.

हे पुरुष प्रोफेशनली मदत करतात, तशी मदत करण्याच्या "सभ्य" पद्धती आहेत. बायका आधी बिचकायच्या, पण आता असा प्रोफेशनल सल्ला घेतल्याने आपण योग्य मापाचे कपडे वापरत आहोत (ही एक आवश्यक बाब आहे, अनेकांना माहिती नसते) हे ही मान्य केलेल्या बायका मला पर्सनली माहिती आहेत. अत्यंत चांगल्या घरातल्या ह्या स्त्रिया आहेत. आणि ते ही चांगल्या घरातले पुरुष आहेत.

प्रोफेशनल सोड, गल्ली बोळातले टेलर्स सुद्धा बायकांची मापं घेताना अगदी सभ्यपणे घेतात. एक सेकंदही अवघडलेपणा येत नाही.

जगात बायकांच्या म्हणुन ओळखल्या जाणार्‍या सर्व क्षेत्रात पुरुष आहेत आणि त्यांना बायकांना अवघडलेपणा न आणता आपलं काम करता येतं. त्याचं पोट पाणी त्यावर आहे.

तुमचा प्रत्येक प्रतीसाद १००% पटला आहे .. संयत , मुददेसुद भाषेचे विशेष कौतुक ...

arunjoshi123's picture

27 Jul 2017 - 12:13 pm | arunjoshi123

बायका आधी बिचकायच्या

यातनं आधी म्हणजे पूर्वीच्या काळात म्हणायचं असेल तर विधान चूक आहे असं मी वाचलं आहे.

रेवती's picture

27 Jul 2017 - 5:28 pm | रेवती

सल्ला देणारे "पुरुष" अस्तित्वात आहेत.
हे माहित नव्हतं.

तसं पहायला गेलं तर पुरुष डॉक्तरांकडे कितीतरी महिला जाऊन आपली खासजी दुखणी सांगून औषधे घेतात, तपासून घेतात. तसेच हे आहे असे वाटते.

हा दृष्टिकोन बरोबर आहे असं वाटतं. अपर्णाताइंना मात्र केवळ पारंपारिक पुरुषी सेवा मान्य आहेत नि नविन प्रोफेशन्स बद्दल त्यांना बायस आहे असं दिसतं.

लग्नाची मेंदी फारतर हात भरून व कोपरापर्यंत काढण्याची पद्धत आहे.

त्या लग्नाच्या मेंदिचं उदाहरण देत नव्हत्या. त्यापूर्विच्या टॅटूच्या फॅडचं देत होत्या.

अश्यांच्या लेकीसुनांकडे डोळे वाकडे करून पाहताना त्या मनुष्याला स्वत:च्या जिवाची पर्वा सोडून द्यावी लागेल.

हे काही पटलं नाही. प्रत्येक वेळी मुलगी तक्रार करतेच, किंवा तिला वाकड्या डोळ्यांचा अपराध सिद्ध करता येतोच किंवा त्याकडे ती लक्ष देत असेल इ इ नसतं. प्रत्येक श्रीमंत का क्रूर अस्तोच? कायदेशीर नसतोच?
बाईंचा आक्षेप नको तिथे पुरुषांकडून टॅटू बनवण्याकडे असावा. आणि आजकाल टॅटू कुठे काढावा त्याच्या कौतुकाचं काय सांगावं!

माझ्या नवर्‍याचे केसही बाईच कापते. आता यात जर कोणी तिरकी बात शोधायचा प्रयत्न केला तर मलाच हसू येईल.

या उदाहरणात काही दम नाही. बायकांनी पुरूषांच्या केलेल्या विनयभंगांच्या केसेस ना के बराबर आहेत. म्हणून तुम्ही कोणती स्त्री पुरुषांबरोबर कशी मिसळली वा सेवा घेतली असं उदाहरण द्यायला हवं.
ऑन अ लायटर नोट - इथे तिरकि बात शोधायला तुम्हालाच सर्वाधिक स्कोप आहे.

उद्या एखाद्या उपहारगृहात पुरुष शेफच्या हातचं बनवलेलं खाल्लंत म्हणतील.

विषय अंगप्रदर्शन आहे. खाताना बायका कपडे काढून खात नाही. सबब उदाहरण गैरलागू आहे.
===================================================================
एकूण काहीही असो, आपली मतं प्रामाणिक वाटतात. त्यात तुम्ही तुम्हाला पटलेली रास्त टिका करता. असा संवाद उत्तम.

विशुमित's picture

27 Jul 2017 - 11:54 am | विशुमित

डॉक्टर आणि टेलर बद्दलचे मुद्दे पटले. प्रामाणिकपणे सांगतो सुरवाती सुरुवातीला मलाच खूप अवघडल्यासारखे वाटत होते. पण कालांतराने नाते घट्ट झाल्यानं ह्या गोष्टी गौण ठरल्या. आम्हा भावंडाना बहिणी नव्हत्या म्हणून असेल कदाचित.
बिग बाजार/ विशाल मेगामार्ट समोर राजस्थानी मेहेंदी काढणारे पोरं ठीकठाक वाटली.

महिलांचे विश्व पुरुषांपेक्षा खूप वेगळे असते पण त्याला पुरुषांच्या विश्वात संरेखन करण्याच्या नादात गुंतागुंत वाढते.

बाकी या धाग्यात अपर्णाताईना पाठिंबा देणाऱयांत ९९.5% पुरुषच दिसत आहेत. असे का बुवा? म्हणजे त्यांची बाजू बरोबर असती तर स्त्रियांनीही सपोर्ट नसता केला का .. ?

मिसळपाव किंवा तत्सम ठीकाणि सक्रीय असणार्‍या स्त्रीया (लेखनशील स्त्रीया) झाडून स्त्रीवादी आहेत. माझा ऐसी नि मिसळपाव वरचा अनुभव असे सांगतो कि जर एखाद्या स्त्रीने पारंपारिक, धार्मिक, रुढिवादी, पुरुषप्रधानतावादी, इ इ किल्ला जरी नाही लढवला पण नुसती अभिव्यक्ति केली (जसे एखादीने वटपौणिमेला मी किती छान पूजा केली असा सर्वांगसुंदर लेख लिहिला) तर या बायका तिला फाडून खातील. त्यावरचे आक्षेप इतके असतील कि पुन्हा कोणी हींमतच नाही करणार. हे मी पाहिलेलं आहे. त्याउलट याच बायका एखादीने "मूल (उणे ९ ते) ५ वर्षांचे होईपर्यंत त्याला कधीही मारून टाकायचा अबसॉल्यूट अधिकार स्त्रीस हवा" असे मत मांडले तर अजिबात काहीच म्हणत नाहीत (२०० प्रतिसाद झाले तरी!!!). यावरून ब्रेनवॉशिंगची आणि एकजुटीची पातळी लक्षात यावी.
बाकी व्यक्तिगत आयुष्यात स्त्रीयांना अक्कल नसते असे मानणारे (आणि अशा बर्‍याच गोष्टी मानणारे) आणि थेट म्हणणारे बरेच महाभाग भेटले आहेत. मी त्यांना परवडले तर तिथेच धुणे पसंद करतो. कोणाचं समर्थन करायचं हे ठरवायला त्याचं जेंडर कसा क्रायटेरिआ असू शकतो?

विस्तृत प्रतिसादासाठी धन्यवाद.

कोणाचं समर्थन करायचं हे ठरवायला त्याचं जेंडर कसा क्रायटेरिआ असू शकतो?

अनबायस्ड सॅम्पलिंग असेल दोन्ही जेंडर कडून सारख्या प्रमाणात सपोर्ट / विरोध असायला हवा, हे गृहीतक समोर ठेऊन प्रश्न विचारला होता.

अप्पा जोगळेकर's picture

27 Jul 2017 - 12:31 pm | अप्पा जोगळेकर

मिसळपाव किंवा तत्सम ठीकाणि सक्रीय असणार्‍या स्त्रीया (लेखनशील स्त्रीया) झाडून स्त्रीवादी आहेत.
असे आहे की टोकाचे स्त्रीवादी असणे जालावरच परवडते. प्रत्यक्षात नाही.

एमी's picture

27 Jul 2017 - 1:55 pm | एमी

=))

"तीसरादेखील मुलगाच आहे हे कळल्यावर माझ्या आईने पपई खाऊन मला अबोर्टायचा प्रयत्न केला म्हणून जगातल्या कुठल्याच स्त्रीने गर्भपात करायचा नाही" म्हणून थयथयाट करणार्या पुरुषलादेखील कोणी अजिबात काहीच म्हणत नाहीत (२०० प्रतिसाद झाले तरी!!!). यावरून ब्रेनवॉशिंगची आणि एकजुटीची पातळी लक्षात यावी.

किंवा माझ्या फिट येणाऱ्या मुलाला माझी बायको मारून टाकेल अशी मला भीती वाटते म्हणून चार्ली गार्डच्या RTL चे ओझे अख्ख्या जगाने वागवलेच पाहिजे म्हणून थयथयाट करणारे....

रेवती's picture

27 Jul 2017 - 5:37 pm | रेवती

'काहीही हं' प्रकारातला प्रतिसाद आहे. मला हवी तर मी वडाची पूजा करीन, नाहीतर पिंपळाची करीन व कोण फाडून खातय ते बघते. आता उद्या श्रावणी शुक्रवारची सवाष्ण आहे माझ्याकडे. कोणाला वाद घालायचेत त्यांना येऊ द्या.
"मूल (उणे ९ ते) ५ वर्षांचे होईपर्यंत त्याला कधीही मारून टाकायचा अबसॉल्यूट अधिकार स्त्रीस हवा" असे मत मांडले तर अजिबात काहीच म्हणत नाहीत
हे तर काही म्हणण्याच्या पलिकडे आहे. स्त्री च असे नव्हे तर पुरुषांनाही चटका लागेल असलं काही म्हणाताना. अबॉर्शनवाल्या स्रियांचा निर्णय पेनफुल असणार. उगीच नको त्या वाटेनं संभाषण नेण्यात अर्थ नाही अजो. तसं तर पोटची पोरे विकणार्‍या महिला व पुरुषही आहेत. याने विषय भरकटणार.

arunjoshi123's picture

27 Jul 2017 - 6:04 pm | arunjoshi123

संपूर्ण सहमत.
=============
मी माझी निरिक्षणे मांडली आहेत, पण तुमची मते १००% मान्य आहेत.

अप्पा जोगळेकर's picture

27 Jul 2017 - 12:27 pm | अप्पा जोगळेकर

बाकी या धाग्यात अपर्णाताईना पाठिंबा देणाऱयांत ९९.5% पुरुषच दिसत आहेत. असे का बुवा? म्हणजे त्यांची बाजू बरोबर असती तर स्त्रियांनीही सपोर्ट नसता केला का .. ?
त्यांना विरोध करणार्‍या ९९.५ % बायकाच दिसत आहेत. असे का बुवा? म्हणजे त्यांची बाजू चूक असती तर बाप्यांनीही विरोध नसता केला का .. ?

विरोध करणाऱ्यातत ६०% बायका दिसत आहेत. विरोधात पुरुष पण बरेच बोलत आहेत.

sagarpdy's picture

27 Jul 2017 - 4:43 pm | sagarpdy

Ensuring diversity of the sample is a tall order, as reaching some portions of the population and convincing them to participate in the survey could be difficult. But to be truly representative of the population, a sample must be as diverse as the population itself and sensitive to the local differences that are unavoidable as we move across the population.

population चे खरे रिप्रेझेन्टेशन मिपा व अन्य साईट वर होऊ शकत नाही. उदा. समान नागरी कायदा असावा का ? या विषयी धागा टाकल्यास (माझ्या मते) मोठ्या बहुमतासह उत्तर "हो" असे मिळेल.

पण भारताच्या लोकसंख्येने मतदान केल्यास हे बहुमत राहील अथवा तेवढे मोठे असेल असे वाटत नाही.
तसेच पूर्ण भारताने मतदान केल्यास कदाचित या बाईंच्या बाजूने (अथवा इथे जशा मांडल्या गेल्यात त्या बाजूने) फार मोठे बहुमत असू शकेल (किमान ग्रामीण भागातून)

अर्थात याचा अर्थ असाही होत नाही कि समान नागरी कायदा अयोग्य आहे वा या बाई सर्व काही योग्य बोलत आहेत. लोकशाही कायमच बरोबर असते असेही नाही.

टीप : या सांख्यिकीने असे म्हणावे का या बाई २०-३० % बरोबर आहेत ?
अजून वेगळे संख्याबळ मांडून असेही काही म्हणता येईल कि युनिक आयडी पाहिल्यास बाईंच्या बाजूने अगदी मोजके आयडी आहेत तर विरुद्ध खूप.
वेगळे काहीतरी म्हणून - वेगवेगळी मुद्द्यांसोबत अजोनि प्रतिवाद केला आहे तर विरुद्ध बाजूने भाकरी, पोशाख असे तेच तेच मुद्दे येत आहेत.

Torture numbers, and they'll confess to anything. Gregg Easterbrook

टीप2 : या धाग्याशी काही घेणे-देणे नाही. कितीही चर्चा केली तरी कोणी मत बदलणार नाहीये. पण सांख्यिकीचा मुद्दा इथे गौण आहे / त्यातून काहीच सिद्ध होत नाही.
परत वाचनमात्र होत आहे

हतोळकरांचा प्रसाद's picture

27 Jul 2017 - 5:25 pm | हतोळकरांचा प्रसाद

प्रतिसाद आवडला!

arunjoshi123's picture

27 Jul 2017 - 6:00 pm | arunjoshi123

कितीही चर्चा केली तरी कोणी मत बदलणार नाहीये.

माणसानं मतं आपल्या अनेक वर्षांच्या आयुष्यात अनेक विचाराअंती बनवलेली असतात. त्यामुळे ती चूक आहेत वा असू शकतात असला विचार कोणी मनातही करत नाही. कोणी प्रभवनशील प्रतिमेचा मनुष्य आयुष्यात असेल तर त्याच्यापुढे वागताना बोलताना मन आपसूक परिवर्तनशील होतं. मात्र ज्यांचेशी काही संबंधच नाही वा ज्याचा नि आपला इगो क्लॅश अजून चालू झालेला नाही वा सेटल झालेला नाही अशांसोबत का मन परिवर्तनशील ठेवायचं? मन परिवर्तनशील नसेल तरच आपण स्थिर आयुष्य जगू शकतो.
जिथे वैचारिक देवाणघेवाणीला द्वंद्वाचे स्वरुप येते तिथे परिवर्तनशीलता अजूनच थिजून जाते. आणि कहर म्हणून कि काय बर्‍याच सदस्यांच्या मते आंतरजाल ही वैचारिक
आदानप्रदानाची नसून वैचारिक द्वंद्वाचीच जागा आहे जिथे परिवर्तनशीलता हे पराभवाचे प्रतिक मानले जाते.
=============================
पण म्हणून विरुद्ध भूमिकेचं तुमच्यासमोर झालेलं प्रतिपादन पूर्णतः वाया जात नाही. त्या भूमिकेतली सत्यं मनात घर करतात, आपण लक्षात न घेतलेले बिंदू लक्षात येतातच आणि अजून अभ्यासावयाच्या गोष्टी पूर्वग्रह खिळखिळे करतात. विरोधक तुमच्या मेंदूत एक किडा टाकून गेलेला असतो आणि आपल्या भूमिकेतला बदल आपण आपल्या आत्मसन्मानाची आब राखून विरोधकासमोर कबूल करायचाच नसतो. मात्र विरोधकाने टाकलेल्या मेंदूतल्या किड्याला मालकाच्या कार्याचा भरपूर आनंद मिळत असतो.

अत्रे's picture

27 Jul 2017 - 6:04 pm | अत्रे

विरोधकाने टाकलेल्या मेंदूतल्या किड्याला मालकाच्या कार्याचा भरपूर आनंद मिळत असतो.

वा! काय वाक्य आहे!

sagarpdy's picture

27 Jul 2017 - 6:25 pm | sagarpdy

+१०००

पण म्हणून विरुद्ध भूमिकेचं तुमच्यासमोर झालेलं प्रतिपादन पूर्णतः वाया जात नाही. त्या भूमिकेतली सत्यं मनात घर करतात, आपण लक्षात न घेतलेले बिंदू लक्षात येतातच आणि अजून अभ्यासावयाच्या गोष्टी पूर्वग्रह खिळखिळे करतात. विरोधक तुमच्या मेंदूत एक किडा टाकून गेलेला असतो आणि आपल्या भूमिकेतला बदल आपण आपल्या आत्मसन्मानाची आब राखून विरोधकासमोर कबूल करायचाच नसतो. मात्र विरोधकाने टाकलेल्या मेंदूतल्या किड्याला मालकाच्या कार्याचा भरपूर आनंद मिळत असतो.

वा. आबांचा सल्ला अंमलात आणलात. :)
हा परिच्छेद तुफान आवडला आहे.

arunjoshi123's picture

28 Jul 2017 - 10:47 am | arunjoshi123

आदूबाळ यांचा आदेश न जुमानण्याइतकी हिम्मत आहे का कोणाची? हा हा हा ...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jul 2017 - 1:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

छान चर्चा आहे. वाईट बियर संपवण्यासाठी उपयुक्त होती. आवडली नाही तरी फुकट कशी घालवणार! चढलेली दारू उतरेल असं चर्चेत काही सापडलं नाही; बेटर लक नेक्स्ट टाईम.

बियरमध्ये खूप हॉप्स घातले की चव फार कडवट होते; मला आवडत नाही. ल-चीपो असली तरी वाईन वाईट असू शकतच नाही.

गामा पैलवान's picture

28 Jul 2017 - 2:43 am | गामा पैलवान

चढलेली दारू आजून उतरलेली दिसंत नाहीये, हे प्रतिसादातून कळलं. कीपीटप.
-गा.पै.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jul 2017 - 2:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ज्या जगातल्या लोकांना अपर्णा रामतीर्थकरांचं भाषण मनापासून किंव मनाविरोधात ऐकणाऱ्यांना, त्या काहीकिंचित स्त्रीवादी असल्याचं लक्षात येत नाही, त्या दूश्ट, दूश्ट, वैट्ट जगात दारू उतरून कसं बरं जगावं?

चढलेली दारू उतरेल असं चर्चेत काही सापडलं नाही

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या म्हणीची उपयुक्तता आम्हाला माहीत आहे.

अत्रे's picture

28 Jul 2017 - 9:32 am | अत्रे

हा निर्णय ताजा कुठाय? JULY 2, 2014

हतोळकरांचा प्रसाद's picture

28 Jul 2017 - 10:25 am | हतोळकरांचा प्रसाद

याच निर्णयाबद्दल टाकायला इकडे आलो होतो. वरील बातमीत तारीख आधीची का दाखवत आहेत कळले नाही. काल बातम्यात पहिली आणि आज इथे आली आहे -

http://abpmajha.abplive.in/india/new-delhi-no-arrest-in-dowry-cases-till...

एबीपी ने जुनी बातमी रिसायकल केली असावी.

हतोळकरांचा प्रसाद's picture

28 Jul 2017 - 10:52 am | हतोळकरांचा प्रसाद

नाही हो, बहुतेक २०१४ ला चेकलिस्ट दिली होती आणि त्यानुसार अटक झाली पाहिजे असं सांगितलं होतं आणि आता दोन्ही बाजूना बोलावून कमिटीतर्फे चौकशी झाल्याशिवाय अटक करू नये असे नमूद करण्यात आले आहे. शिवाय जामीनही होता होईल तेवढा त्याच दिवशी देण्यात यावा असेही नमूद करण्यात आल्याचे दिसते.

https://barandbench.com/supreme-court-misuse-section-498/

अत्रे's picture

28 Jul 2017 - 11:30 am | अत्रे

धन्यवाद.

१. चोरी आणि हल्ले यानंतर तिसर्‍या क्रमांकावर अटका
२. खोट्या केसेस बाकी सर्व गुन्ह्यांपेक्षा सर्वाधिक
३. विदेशात वर्षानुवर्षे राहणार्‍या , काही संबंध नसलेल्या नातेवाईकांना अटका
४. रुग्ण पालकांच्या अटका
५ .....
===================================
अपर्णाताई तुम आगे बढो, ...
तुम्ही खरंच आई आहात.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

28 Jul 2017 - 11:13 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

या अपर्णा बाई शंकराच्या लिंगाची पूजा करतात का? काय म्हणने आहे ह्याच्या वर त्यांचे.
या बाई राष्टीय स्वयंसेवक संघाच्या असाव्यात ,ब्राह्मण समाजात पुन्हा कर्मठपणा यावा म्हणून या सुपारी घेऊन काम करत असाव्यात.एका भाषणात या म्हणतात ,ब्राह्मणाच्या बायका तुम्ही कसे नीटच वागले पाहीजे,बाकीच्या खालच्या जातीचे सोडा म्हणे.
पक्की जातीयवादी बाई आहे.काय तर म्हणे हीचा नवरा कट्टर हिंदुत्ववादी आहे,आम्हाला कशाला सांगताय हे?
ह्या बाईला तिच्या तरुणपणात कसलेही स्वातंत्र मिळालेले दिसत नाही,त्यामुळे हिच्या मनात खोलवर जखम झाली असावी,आजच्या महीलांना मिळालेले स्वातंत्र बघून हिला एन्वी येत असावी.

सुबोध खरे's picture

28 Jul 2017 - 11:22 am | सुबोध खरे

ह्या बाईला तिच्या तरुणपणात कसलेही स्वातंत्र मिळालेले दिसत नाही,त्यामुळे हिच्या मनात खोलवर जखम झाली असावी
कशावरून बोलताय हो हे? काही पुरावा वगैरे?
का हातात कळफलक आहे म्हणून बडवायचा?

हतोळकरांचा प्रसाद's picture

28 Jul 2017 - 11:27 am | हतोळकरांचा प्रसाद

एका भाषणात या म्हणतात ,ब्राह्मणाच्या बायका तुम्ही कसे नीटच वागले पाहीजे,बाकीच्या खालच्या जातीचे सोडा म्हणे.

कृपया याचा संदर्भ द्याल का?

पुंबा's picture

28 Jul 2017 - 11:28 am | पुंबा

एका भाषणात या म्हणतात ,ब्राह्मणाच्या बायका तुम्ही कसे नीटच वागले पाहीजे,बाकीच्या खालच्या जातीचे सोडा म्हणे.

हे कुठे ऐकलंत?
लिंक द्या..

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

28 Jul 2017 - 12:35 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

एका व्हिडूमध्ये आहे,बहुधा नाशिकमधल्या कार्यक्रमाचा.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

28 Jul 2017 - 12:35 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

एका व्हिडूमध्ये आहे,बहुधा नाशिकमधल्या कार्यक्रमाचा.

arunjoshi123's picture

28 Jul 2017 - 11:42 am | arunjoshi123

खालच्या जातीच्या हा अपर्णाताईंचा शब्दप्रयोग चूक आहे. वकील असल्यानं त्यांचेकडून "चूक" म्हणून असं म्हटलं जाणं अपेक्षित नाही.
==============================================================
इतर जातींना खालचे मानणारांचा संघाना सपोर्ट आहे हे सत्य असलं तरी ती प्रेरणा संघाची नाही. टॅक्स चोरणारांचा पी चिदंबरम यांस सपोर्ट असे, पण चिदंबरम हे लोकांस टॅक्स चोरा म्हणत असे म्हणणे अन्यायकारक आहे.
=============
संघाचे असणे भूषण आहे. देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपति, कितितरी मंत्री आणि लोकसेवक संघाचे आहेत.

इतर जातींना खालचे मानणारांचा संघाना सपोर्ट आहे हे सत्य असलं तरी

जोशी.. पुरावे वगैरे आहेत का..? का या पण गावगप्पाच..?

गामा पैलवान's picture

28 Jul 2017 - 5:50 pm | गामा पैलवान

टर्बोचार्जड फिलॉसॉफर,

१.

या म्हणतात ,ब्राह्मणाच्या बायका तुम्ही कसे नीटच वागले पाहीजे,बाकीच्या खालच्या जातीचे सोडा म्हणे.
पक्की जातीयवादी बाई आहे.

मीसुद्धा पक्का जातीयवादी आहे. ब्राह्मण सुधारला तर आख्खा भारत सुधरेल. म्हणूनंच मी नुसता जातीयवादी नाही तर ब्राह्मणजातीयवादी आहे. त्यामुळे अपर्णाबाईंचा जातीयवाद मला माझाच वाटतो.

२.

काय तर म्हणे हीचा नवरा कट्टर हिंदुत्ववादी आहे,आम्हाला कशाला सांगताय हे?

तेच तर म्हणतोय मी पण. कशाला ऐकायला जाता अपर्णाबाईंचं !

पण एक सांगू? अपर्णाबाईंचं ऐकून तुमची जी चडफड होते ना, ती बघायला मला ज्याम आवडतं.

आ.न.,
-गा.पै.

कोंबडी प्रेमी's picture

28 Jul 2017 - 10:06 pm | कोंबडी प्रेमी

खरे म्हणजे हा धागा आटपला गेला ते उचितच झालं

पण हे बघितला आणि ह्या त्याचं पंथातल्या आहेत कि काय अस वाटल

https://www.facebook.com/chakombarmas/photos/a.234981440228477.107374183...

मी कोण's picture

30 Jul 2017 - 8:31 am | मी कोण

अक्षदा's picture

29 May 2018 - 2:37 am | अक्षदा

गामा, अजो, अभ्या वरील सर्व चर्चा वाचून फार वाईट वाटले. मी बरेच दिवस मिपा सदस्य आहे परंतु र्पतिसाद फार क्वचित दिला असेन. आज लॉगिन करून लिहिण्याचे कारण इतकचं की या मॅडम च्या भाषणाच्या क्लिप्स खरंच अनेक संसार बिघडवण्यास कारण ठरत आहेत आणि हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. तुम्ही म्हणता तस ताईंच म्हणणं नसेलही. परंतु अनेक जणांना मी पाहिलं जे ह्या भाषणाच्या क्लिप्स सुनांना त्रास देण्यासाठी करताना. अगदी माझ्या स्वतःच्या नात्यातल्या घरात. त्यामुळे त्या काहीही उद्देशाने सांगत असल्या तरी प्रथम दर्शनी त्यांचा रोख हा शिकलेल्या मुली सुना असच वागतात हे सरसटीकरण आहे. उदाहणादाखल सांगायचं झालं तर माझ्या एका भावाने लव मैरज केले त्याच्या ऑफिच्या जवळच एका ऑफीस मध्ये वहिनी काम करत असे. त्या मुलाच्या आई बाबांना फार काही रुचली नवती मुलगी पण मुलाने तिच्याशीच लग्न करणार असं पक्क सांगितल्यावर आणि नातेवाईकांनी समजल्यावर तयार झाले. पण आल्या दिवसापासून तिच्याबद्दल घरच्यांचं मत काही चांगलं नव्हतच. तिला शेतीतील कामे करायची सवय नव्हती तचेच घरातील कामे स्पीड ने करता येत नसत कारण लग्नाआधी अगदी सराईतपणे ती काही रोज ही सर्व काम करत नव्हती. अर्थातच तिला वेळ लागणार परंतु घरातील लोक काही ना काही कारण घेऊन बोलतच असतं, भावाने सुरुवातीला जाऊदे म्हटले पण नेहमी नेहमी घरच्यांच्या तक्रारी ऐकून त्यानेही तिला दमात घेण्यास सुरू केलं. नंतर नंतर तर त्याने अनेकदा तिच्यावर हात उचलला. सासरे सगळ्यांना असच दाखवत की सून कामे करायला किती नालायक आहे. असच मी एकदा तिथे असताना सुनेच्या सासऱ्यांनी ही अपर्णा ताईंची क्लिप सुरू केली. पूर्ण भाषण ऐकून हसावे की रडावे हेच कळेना. त्या भाषणाचां सासऱ्यांवर पगडा होता की हेच खरे असे म्हणत शिकलेल्या सुना अशाच नालायक कामे नको म्हणणाऱ्या. स्वतच्या सुनेला ऐकवण्या करता नेहमी ती क्लिप वाजवत. कहर म्हणजे स्वतःच्या सुनेने वाढलेले जेवण ही जेवत नसत. घरात इतर कुणी स्त्री नसल्यास शेजारील घरी हाक मारून त्यांच्या सुनेला बोलावून स्वतला जेवण वाढण्यास सांगत. सून तरी किती दिवस सहन करणार. पुढे मुलगा सून वेगळे गेले राहण्यास गेले. यात सुनेची काही चूकच नाही अस मी म्हणत नाही पण ती प्रयत्न करत होती अपेक्षा पूर्ण करायच्या. पण आता ज्या मुलीने कधीच शेती केली नाही तिला लगेच कसं जमेल शेतीत काम करणं. आता भविष्यात ती कशी वागेलं आपल्या सासू सासऱ्यांशी. मी तीच्याजगी असेन तर नक्कीच काही बरी वागणार नाही. खरंच ग्रामीण भागात आता कुठे मुलीच शिक्षण वैगेरे लोक डोक्यात घेत आहेत पण ही असली भाषण ऐकून खरंच त्यांच्यावर परिणाम होतो आहे आणि तो निगेटिव्ह आहे हे नक्की. त्यामुळे कृपया करून ही भाषण योग्य वगैरे पसरवू नका. माझ्या गावात अनेक मुली आहेत ज्यांना दहावी नंतर फार तर एखादा मशीन क्लास करू दिला जातो व लगेच लग्न लावली जातात. खरी परिस्थिती फार भयानक आहे. मी पहिली मुलगी आहे आमच्या घरी जी ग्रज्यूएट होऊन जॉब करत आहे. हे फक्त माझे वडील गावात न राहता कामानिमित्त शहरात राहत आहेत म्हणून. ताई म्हणत आहेत तशा वागणर्या स्त्रियाही असतील की पण त्यामुळे अशा ओपन फोरम मध्ये जे काही वक्तव्य त्या करत आहेत ते योग्य अस मला वाटतं नाही. आताच्या फ्री इंटरनेटच्या जमान्यात ह्या अशा गोष्टी फार लवकर पसरत आहेत. आणि खरंच आपल्या पथ्यावर जे पडत आहे तेही खूप लवकर फेमस होत. ग्रामीण भागात मुलीच शिक्षण लग्नाचं वय या गोष्टीत अजून लोक म्हणावे तितके जागरूक नाहीत. अशात हे म्हणजे अनेक मुलींच्या शिक्षणात अडथळा ठरू शकतो. ही उदाहरणे सुद्धा मी पाहिली आहेत. माझ्या वडिलांच्या फोन मध्ये सुद्धा ही क्लिप त्या नातेवाईकांनी दिली होती. बाबांनी घरी येऊन ती वाजवली माझ्याकडे बागितल. मी मोबाईल उचलून क्लिप डिलीट केली. अजून काय सांगू. माझे उच्च शिक्षण मी कसे घेत आहे मला माहिती. नातेवाईकांनी माझ्या लग्नाचं टूम लावूनही माझ्या वडिलांनी मला जसा सपोर्ट केला तसा सगळ्याच मुलींचे वडील करू शकतील अस नाही. कारण भावकीचा दबाव आजूबाजूची स्थिती काहीही असू शकतील. पण ही भाषण चांगली परिस्थिती निर्माण करत नाहीयेत हे नक्की.

गामा पैलवान's picture

29 May 2018 - 12:22 pm | गामा पैलवान

अक्षदा,

अपर्णाबाईंच्या कथनाचा गैरवापर केला तर त्याला अपर्णाबाई जबाबदार नाहीत. उद्या समजा त्या सासऱ्यांनी बंबईसे आया मेरा दोस्त चं गाणं वाजवलं, तर धर्मेंद्रला दोषी ठरवणार का?

अपर्णाबाईंनीच सांगून ठेवलंय की त्यांच्या कथनाचा उद्देश मुलींनी ऐकावं हा आहे. बायको नवऱ्याचं मन वळवू शकते. पण बायकांना सांगायला कोणीच नाही. ही समस्या आहे. तुमच्या उदाहरणांत सुनेने नवऱ्याचं मन वळवून वेगळं घर केलं ते योग्यंच आहे. संसार टिकवण्यासाठी टोकाची पावलं उचलावी लागतात. वेगळी चूल मांडून अडचणी कमी झाल्या ना, मग त्याबद्दल अपर्णाबाईचं काहीच म्हणणं नाही. दोघांचा संसार सुखाने झाल्याशी कारण.

आ.न.,
-गा.पै.

पिलीयन रायडर's picture

29 May 2018 - 7:30 pm | पिलीयन रायडर

कथनाचा गैरवापर असतो तसं मुळातच चुकीचं कथन असू शकत नाही का? नाही म्हणजे फारच गडबडलेलं विधान आहे हे! उलट अति लिटरल होणे हा प्रॉब्लेम आहे बैंचा! (मुलींना मुलासारखं वाढवणे वगैरे..)

चर्चा वगैरे नाही करायची, आपली मतं ठाऊक आहेत. फक्त "बायकांना" कुणी काही स्पेसिफिकली सांगायची गरज नाही. जोडप्यांना वगैरे सांगा हवं तर. त्याचा बहुदा फायदा पण होईल आणि फुकट पोरींवरचं मोरल पोलिसिंग जरा कमी होईल.

गामा पैलवान's picture

29 May 2018 - 8:08 pm | गामा पैलवान

पिराताई,

नेमकं मॉरल पोलिसिंगच करायचं आहे मुलींवर. (हां, ते फुकट मिळतंय म्हणून काहींना किंमत नसते.)

याचं कारण असं की मुलींना सांगणारं कोणीच नाही. मुली आपापल्या नवऱ्यांच्या मागे लागून त्यांच्या गळी आपलं म्हणणं उतरवू शकतात. पण मुलींना सांगणारं कोणीच नाही. मुलींवर जे मॉरल पोलिसिंग होतं अगदी तस्संच मॉरल पोलिसिंग मुलींनी त्यांच्या नवऱ्यांवर करायचं असतं. पण ते थेट नवऱ्यांवर करता नाही येत. ते बायकोच्याच मुखातनं यावं लागतं. नाहीतर नवरे ऐकंत नाहीत.

आ.न.,
-गा.पै.

पिलीयन रायडर's picture

29 May 2018 - 8:12 pm | पिलीयन रायडर

मुलींना सांगणारं कुणीच नाही?!!!

असोच! चालू दे तुमचं!

फक्त "बायकांना" कुणी काही स्पेसिफिकली सांगायची गरज नाही.

बायका, नवरे, सासू, सासरे, मूले, सुना, जावई, व्याही, जावा, नणंदा, दिर, भावजयी, आत्या, मामे, इ इ कोरमची पूर्तता झाल्याशिवाय कोणीही कोणास काहीही सांगू नये.

बायकांना सांगायला कोणीच नाही.. उलट सगळ जग काही झालं की बायकांनाच सांगायला येत बाई तुझा नवरा असा तूच त्याच्या मनासारखं वाग वाद घालू नको.. तो बरोबर असो चूक असो येऊन बायकोला मारहाण करत असो. तूच घे बाई सांभाळून तो नवरा आहे तो तसाच वागणार हा सूर असतो. घरगुती लेव्हल ला बघाल तर सर्व नातेवाईक येऊन त्या बाईला च सांगत असतात जाऊदेना तू नीट वाग सांभाळून घे. वरील उदाहरणात देखील सगळ्या नातेवाईकांनी त्या सूनेलाच येऊन सूनवल होत की नीट वाग, सासऱ्यांना वा नवऱ्याला नवते कोणी म्हणले की ती नवीन आहे समजून घ्या. त्यामुळे बायकांना सांगायला कोणीच नाही हा गैरसमज नसावा. सगळ घर बायकांनाच सांगत, नवऱ्याला नाही सांगत. त्याला काही बोलावं आणि त्याने अजून डोक्यात राग घालून काही केलं तर हे वरून पालुपद.

रामतीर्थकरबैंची भाषणे ऐकणार्‍या लोकांमध्ये स्वतंत्र विचार करणार्‍या, कमावणार्‍या स्त्रीविषयी किती घृणा निर्माण होते याचा अनुभव मलादेखिल आला आहे. मुलींना मुळीच कॉलेजमध्ये जाऊ न देता, १८ वर्षे झाली की तिचे लग्न लावून दिले पाहिजे असे दीव्य विचार एका मित्राच्या उच्चपदस्थ वडिलांकडून गेल्या ३-४ वर्षांपुर्वी ऐकायला मिळाले. त्याच्या मागे रामतीर्थकरबैंची भाषणे आहेत असे मित्रांकडून कळले. काही घरात संस्कार म्हणून मुलींना हे व्हिडीओज ऐकवले जातात हेदेखिल ऐकून आहे.
आपला अनुभव शेयर केल्याबद्दल धन्यवाद.

अगदी अगदी.. हे तर नेहमी होत. चांगलं आहे मुलींनी ऐकल पाहिजे हे पुढे जाऊन ह्या मुली पण अशाच वागल्या तर सासरी आमचं नाव नको जायला की संस्कार केले नाहीत.. अस बरच काही ऐकायला मिळते वर भाषणे ऐकवली जातात

त्याच्या मागे रामतीर्थकरबैंची भाषणे आहेत असे मित्रांकडून कळले.

उचलली जीभ लावली टाळाला. ती बाई स्वतः स्वतःच्या शिक्षणाचं बोर मारेस्तोर कौतुक करते. मुलिचे उच्च शिक्षण न होऊ तिचे लग्न करावे असं बाई म्हणाल्याचं कोण्या बाबाला कसं म्हणे ऐकू आलं??
============================
मूर्ख लोकांनी मूर्ख अर्थ काढलेले वेगळे, पण पुरोगाम्यांना भास होणे आवश्यक आहे का?

एमी's picture

30 May 2018 - 6:18 pm | एमी

अक्षदा,
तुझे आणि तुझ्या आईवडिलांचे कौतुक वाटते _/\_

===
तू फारच कळवळून प्रतिसाद दिला आहेस इथे पण त्याचा कितपत परिणाम होईल शंकाच आहे :(
तुला नाउमेद करत नाहीय पण मराठी आंजावरचा एकंदर अनुभव हा असाच आहे...

स्वतःला टॉप ५% म्हणत फिरणारे (जे खरंतर जास्तीजास्त उच्च मध्यम वर्गात येतात) इथले बायका आणि पुरुष. यांच्या शिक्षणात स्त्री असल्याने काही अडचणी येत नाहीत, शिक्षण घेऊनही या बायका आर्थिक स्वतंत्र रहात नाहीत, प्रोमोटही करत नाहीत, ४००००+ पगार - 2bhk - no dustbin असल्या अटी टाकून या लग्न करतात, त्यांना तसे बकरे मिळतातदेखील (कारण त्या बकऱ्यांसाठी आमटीत गुळ पडतो कि नाही हे अतिशय महत्वाचे असते), मग या कसबसे एकाध मुल जन्माला घालतात आणि जगावर उपकार केल्यासारखे 'होममेकर' म्हणून मिरवत फिरतात....
त्यांना स्वतःला
"ग्रामीण भागात आता कुठे मुलीच शिक्षण वैगेरे लोक डोक्यात घेत आहेत पण ही असली भाषण ऐकून खरंच त्यांच्यावर परिणाम होतो आहे आणि तो निगेटिव्ह आहे हे नक्की. त्यामुळे कृपया करून ही भाषण योग्य वगैरे पसरवू नका. माझ्या गावात अनेक मुली आहेत ज्यांना दहावी नंतर फार तर एखादा मशीन क्लास करू दिला जातो व लगेच लग्न लावली जातात. खरी परिस्थिती फार भयानक आहे. मी पहिली मुलगी आहे आमच्या घरी जी ग्रज्यूएट होऊन जॉब करत आहे. हे फक्त माझे वडील गावात न राहता कामानिमित्त शहरात राहत आहेत म्हणून. ताई म्हणत आहेत तशा वागणर्या स्त्रियाही असतील की पण त्यामुळे अशा ओपन फोरम मध्ये जे काही वक्तव्य त्या करत आहेत ते योग्य अस मला वाटतं नाही. आताच्या फ्री इंटरनेटच्या जमान्यात ह्या अशा गोष्टी फार लवकर पसरत आहेत. आणि खरंच आपल्या पथ्यावर जे पडत आहे तेही खूप लवकर फेमस होत. ग्रामीण भागात मुलीच शिक्षण लग्नाचं वय या गोष्टीत अजून लोक म्हणावे तितके जागरूक नाहीत. अशात हे म्हणजे अनेक मुलींच्या शिक्षणात अडथळा ठरू शकतो. ही उदाहरणे सुद्धा मी पाहिली आहेत. माझ्या वडिलांच्या फोन मध्ये सुद्धा ही क्लिप त्या नातेवाईकांनी दिली होती. बाबांनी घरी येऊन ती वाजवली माझ्याकडे बागितल. मी मोबाईल उचलून क्लिप डिलीट केली. अजून काय सांगू. माझे उच्च शिक्षण मी कसे घेत आहे मला माहिती. नातेवाईकांनी माझ्या लग्नाचं टूम लावूनही माझ्या वडिलांनी मला जसा सपोर्ट केला तसा सगळ्याच मुलींचे वडील करू शकतील अस नाही. कारण भावकीचा दबाव आजूबाजूची स्थिती काहीही असू शकतील. पण ही भाषण चांगली परिस्थिती निर्माण करत नाहीयेत हे नक्की" हे दिसत नाही, सांगूनही झेपत/लक्षात रहात नाही, पांढरपेशा रामतीर्थंनकर बायका जालावर दिसत राहतात, त्यातल्या काहीजणी स्वतःला स्त्रीवादी समजतात, इतरजन त्यांना आदरणीय स्त्रीवादी म्हणतात, एकंदरच situation is hopeless. मिपा आणि ऐसीलातर मी कधीच उतरून टाकलंय आता थोडीफार भिस्त माबोवर आहे. कारण तिथे स्त्रियांनी आर्थिक स्वतंत्र असणे आणि 'दुसऱ्याच्या' घरी रहायला न जाणे याला aggressive support करणारे काहीजणतरी दिसतायत.

एमी's picture

6 Jun 2018 - 3:16 am | एमी

अक्षदा,

तू सांगितली आहे साधारण तशीच केस https://www.maayboli.com/node/65776 इथेदेखील दिसतेय.
प्रतिसाद वाच. बरेच प्रकार दिसतील. सासूच्या रुपातली रामतीर्थनकर, आईच्या रुपातली रामतीर्थनकर -> हा सगळ्यात डेंजर प्रकार असतो. यांना सगळ्यात पहिल्यांदा दूर ठेवायचं. वरवर पाहता हे आपली फार काळजी करतायत, आपला आनंद यांच्यासाठी महत्वाचा आहे वगैरे गैरसमज होऊ शकतात, होतातच. पण यांच्या सुचवण्यांचा एन्ड रिझल्ट रामतीर्थनकर बाईना जो हवा तोच असतो. एकवेळ सासूच्या रु. रा. परवडली पण हा दुसरा छुपा, न/कळत तेच अजेंडे राबवणारा, स्वघोषित स्त्रीवादी प्रकार जास्त डेंजरस.

गामा पैलवान's picture

6 Jun 2018 - 12:28 pm | गामा पैलवान

अॅमी,

स्वत:चा आनंद स्वत:च शोधता येत असेल तर रामतीर्थकर बाईंची गरज नाही.

आ.न.,
-गा.पै.

पिशी अबोली's picture

7 Jun 2018 - 10:54 am | पिशी अबोली

अक्षदाताई,

तुम्ही कळवळीने लिहिलेला प्रतिसाद खूप आत पोहोचला. या बाईंनी दिलेले आदर्श मुलींसमोर अगदी सुशिक्षितांना पटतात(शिक्षणाचा विचारांवर काही फरक पडत नाहीच. उलट मागासलेल्या विचारांना मुद्देसूद मुलामे देता येतात बऱ्याचवेळा).
आणि स्वतंत्र विचारांच्या आणि कुणावरही कोणत्याच बाबतीत अवलंबून नसलेल्या मुलीला कौतुकापेक्षा बऱ्याचदा अखंड टीकाच सहन करावी लागते. तुम्हाला हे इथले प्रतिसाद वाचून त्रास होणं स्वाभाविक आहे, आणि तुम्ही मांडलेले मुद्दे अतिशय रास्त आहेत. पण जे चित्र तुम्हाला एक स्वतंत्र मुलगी म्हणून वावरताना जगात दिसतं, तेच इंटरनेटवर दिसणार. उलट इथे चेहरा दाखवायचा नसल्याने त्यातून अजून टोकाच्या भूमिका दिसणार हे गृहीत धरून चाला. याचा अर्थ विरोध करू नये असा मुळीच नाही, पण तुमच्या प्रतिसादातून तुम्हाला स्वतंत्र उभं राहण्यासाठी कराव्या लागत असलेल्या संघर्षाची कल्पना आहे म्हणून एवढाच सल्ला, की इथे कळफलक बडवणाऱ्या लोकांचा त्रास करून घेऊ नका. आणि इथे मनोऱ्यात बसलेले लोक तुम्हाला दोन्ही बाजूंना सापडतील. पण तुमची कळकळ ही तुमच्या स्वतःच्या संघर्षातून आलेली आहे, आणि तिला बरोबर-चूक, किंवा किती प्रमाणात बरोबर आणि किती प्रमाणात चूक अशी लेबलं कुणी लावू शकत नाही, एवढं नक्की लक्षात ठेवा.

पिशी अबोली's picture

7 Jun 2018 - 10:54 am | पिशी अबोली

*मुलींसमोर दिलेले आदर्श

श्वेता२४'s picture

7 Jun 2018 - 2:29 pm | श्वेता२४

अक्षता तुझं म्हणणे अगदी रास्त आहे. बऱ्याचदा लोकंचे जग व वृत्ती दोन्ही संकुचित असतात त्यामुळे अशा लोकांना अनुल्लेखाने मारावे या हेतूनेच मी इतके दिवस या मुद्यावर व्यक्त झाले नव्हते. पिशी अबोलीने जो सल्ला दिला आहे तो अत्यंत रास्त आहे. तुझा प्रतिसाद अत्यंत प्रामाणिक, स्वानुभवातून आलेला असल्याने मला लिहील्याशइवाय राहावलं नाही. बाकी परदु:ख शितळ एवढं लक्षात ठेव. तुझ्या पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

गामा पैलवान's picture

7 Jun 2018 - 6:28 pm | गामा पैलवान

श्वेता२४,

एक गंमत दाखवतो. वर अॅमीताईंनी माबोवरचा धागा दिलाय ना तो हा आहे : https://www.maayboli.com/node/65776

त्याच्या खालचे पहिले चार प्रतिसाद अपर्णाबाईंचे वाटतील असेच आहेत.

शेवटी मर्जी अपनी अपनी.

आ.न.,
-गा.पै.

या बाईंनी दिलेले आदर्श मुलींसमोर अगदी सुशिक्षितांना पटतात(शिक्षणाचा विचारांवर काही फरक पडत नाहीच. उलट मागासलेल्या विचारांना मुद्देसूद मुलामे देता येतात बऱ्याचवेळा).

बाईंचे मुद्दे तुम्हाला पटत नसतील स्वतःस सुशिक्षित मानू नकात आणि इतरांस सुशिक्षित मागास मानू नकात. बाईंनी तथाकथित सुशिक्षित, आधुनिक, शहरी बायकांना दिलेले डोस कडवट असले तरी अत्यावश्यक आहेत. आईच्या अत्यंत लाडागोडात वाढलेल्या सुस्त मुलाला अचानक मिलिटरी स्कूलमध्ये टाकलं तर जसं होतं तसं अपर्णाताईंचं भाष्य ऐकताना तथाकथित शहरी, स्वतंत्र, पाश्चात्य, हिंदू संस्कृतीचा गंड असलेल्या, पुरोगामी, इ इ प्रकारच्या बायकांना होतं.
यात आमचं मुद्देसुद मुलामा देण्याचं कौशल्य अजिबात नाही, केस ही बडी जेन्यूइन है जी.

तुम्ही म्हणता तस ताईंच म्हणणं नसेलही.

आपण अत्यंत रास्त व्यक्ति आहात. एक वाईट केस प्रत्यक्ष पाहूनही या आपण असं म्हणू शकता. या वाक्यात आपणांस जे म्हणावयाचं ते म्हणू शकण्याची किमान पात्रता या धाग्यावर अनेक दाखवू शकलेले नाहीत.
=========================================
अनेक गोष्टींच्या अनेक महान प्रवर्तकांचे आत्मे आज त्यांच्या चळवळींची झालेली गत पाहून रडत असतील. तिथे बाईंचा काय पाड?
=======================================
व्हिक्टिमच्या बाजूचे बोल असलेल्या क्लिप्स देखिल बनवता येतील त्यांच्या भाषणातून.
=====================================
छोटासा मुद्दा सांगायला बाई १५-२० मिनिटे किमान घेतात. या क्लिप्स वारंवार वाजवणारे लोक गंमतशीर असले पाहिजेत.

त्यामुळे कृपया करून ही भाषण योग्य वगैरे पसरवू नका.

अपर्णाताईंचं भाषण योग्यच आहे. या धाग्याचा विषय योग्यतेचा आहे. आणि ही भाषणं पसरणं आवश्यक आहे. एका मूर्खाने घटनेचा अर्थ मूर्खासारखा काढला (उदा घटनेने स्वातंत्र्य दिले आहे म्हणून मी एखाद्याचा खून करायचे स्वातंत्र्य घेत आहे,) तर घटना कॅन्सल करा म्हणणं चूक आहे.
==================
त्यांनी क्लिप्स नीट ऐकल्या असतील तर स्त्रीवर हात उगारणे वा घराबाहेरचे अन्न खाणे या बद्दल ताईंचं काय म्हणणं आहे ते क्लिपमधून सासर्‍यांना ऐकवा. ईथल्या स्त्रीवाद्यांत आणि त्या सासर्‍याच्या क्लिपा ऐकण्याच्या पद्धतीत काहीही फरक नाही.
======================
यात नशीबाची किंवा तुमच्या भावाची चूक आहे. त्यानं तिला नंतर शेतकाम येईल असं गृहित धरलं किंवा येणार नाही हे पक्कं माहित असून लग्न केलं. सुनेनं घरातलं काम करावं ही अपेक्षा अजिबात चूकीची नाही. आजकालच्या बायकांना काम हेच अन्याय वाटतो. गावातले आईवडील शेत, गुरे सोडून शहरात जाऊन नवर्‍याने कॅब चालवायची असा त्यांचा हेका चाललेला असतो. अर्थातच आईवडीलांचा याला प्रचंड विरोध असतो म्हणून घरात अस्वस्थता असते. यात बाईंचा काय संबंध?
=================================
मिपा सोडून ह्या बाई कोणालाही माहीत असल्याचे पाहिले नाही. इतक्या क्लिप्स व्हॉट्सअ‍ॅपवर आल्यात पण ही दिसली नाही.
=============================
एकवेळ ग्रामीण भागात, जिथे अगोदरच स्त्रीयांवर क्कमी जास्त अन्याय होतो अशी कल्पना आहे तिथे आपलं म्हणणं बरोबर आहे. पण ज्यांना बाइंचं म्हणणं झोंबतं त्या शहरी बायकांसाठी या व्हिडिओंचा प्रसार होणं अत्यंत आवश्यक आहे.

मुली शिकू लागल्या की संघीय गोटात अस्वस्थता पसरणार हे नैसर्गीकच आहे.. शिक्षणासारखा बेसीक हक्क सुद्धा मुलींना नसावा असे मत असणार्या महाभागांना आपण प्रिविलेज्ड क्लास मध्ये येतो, आणि आपल्या प्रगती मधे आपले शूण्य कतृत्व आहे.. हे समजण्याची सुतराम शक्यता नाही.. यांच्या मुली-बाळीच पुढे जाउन यांना धडे शिकवतील

गामा पैलवान's picture

5 Jun 2018 - 3:27 am | गामा पैलवान

मुली गेले ७० वर्षं शिकताहेत. संघ गेले ९० वर्षं अस्तित्वात आहे. कसली आलीये डोंबलाची अस्वस्थता!

-गा.पै.

माहितगार's picture

5 Jun 2018 - 10:48 am | माहितगार

श्रीमान गा.पै. कुठे आहात ?

मुली भारताला स्वातंत्र्य मिळण्यापुर्वीच शिकु लागल्या ( स्वातंत्र्यानम्तर प्रमाण वाढले असणारे ह सहाजिक) . सावित्री बाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा १८४८ मध्ये काढली. त्याला आता अदमासे १७० वर्षे झाली असावीत .

गामा पैलवान's picture

5 Jun 2018 - 12:06 pm | गामा पैलवान

माहितगार,

अगदी बरोबर बोलत पहा. संघाच्या आधीपासून मुली शिकंत होत्या. त्यामुळे संघाला अस्वस्थता यायचं कारणंच काय?

आ.न.,
-गा.पै.

संघीय गोटात अस्वस्थता

आजच संघाचा विटाळ संपला म्हणून इतर सर्व गोटांत मुलखाची अस्वस्थता पसरली आहे.
काही मात्र अजून नशेतच दिसताहेत.

सुबोध खरे's picture

7 Jun 2018 - 8:30 pm | सुबोध खरे

आबा साहेब

मुली शिकू लागल्या की संघीय गोटात अस्वस्थता पसरणार हे नैसर्गीकच आहे.

या विधानाला काही पुरावा का अशीच पुडी सोडली आहे.

तुम्ही पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या एक दोन संघ नेत्यांचे मत पुराण मतवादी असले म्हणजे सगळी संघटना पुराण मतवादी आहे असे म्हणण्यासारखे आहे.

सध्या जालावर श्री अशोक गेहलोत या काँग्रेसच्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य फिरत आहे कि धरणाच्या पाण्यातून वीज निर्मिती केली ( पाण्यातील वीज काढून घेतली) तर उरलेल्या निर्जीव पाण्यावर शेती कशी चांगली होणार?

हे वक्तव्य पाहून कोणी असे म्हणू लागले कि काँग्रेसचे सगळेच नेते मूर्ख आहेत आणि काँग्रेस हा पुराण मतवादी पक्ष आहे तर त्याला तुम्ही काय म्हणाल?

बाकी प्रतिगामीपणा किंवा मूर्ख वक्तव्ये हि कोणत्याच एका पक्षाची मक्तेदारी नाही असे नम्र पणे नमूद करू इच्छितो.

मराठी कथालेखक's picture

8 Jun 2018 - 4:08 pm | मराठी कथालेखक

श्री अशोक गेहलोत यांच्या वक्तव्याविषयीचे वास्तव काहीसे वेगळे आहे.

लोकसत्तातील या वृत्तानुसार

खरे तर गेहलोत यांनी केलेले पाण्याविषयीचे विधान हे संघपरिवाराच्या प्रचारकी तंत्राविषयी होते. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात भाक्रा धरण बांधण्यात आले. त्या वेळी संघ परिवाराने त्याविरोधात प्रचार सुरू केला होता. गेहलोत म्हणाले, ‘मला आठवते, माझ्या बालपणी संघाचे कार्यकर्ते जिथतिथे व्याख्याने देत फिरत होते. ते विचारीत, भाक्रा धरणातील वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यातील वीजच (शक्ती) नष्ट केली जाणार आहे, त्यामुळे असे शक्तीहीन पाणी शेतीसाठी वापरण्यात काय उपयोग?’

मराठी कथालेखक's picture

7 Jun 2018 - 7:43 pm | मराठी कथालेखक

अक्षदा यांचा प्रतिसाद आवडला.

अण्णांच्या आंदोलनाच्या वेळी रहदारीचे नियम कडक असलेल्या दिल्लित आंदोलनकारी म्हटलं कि नियम तोडायची मुभा झालेली. मग काय, ३-३ तरुण बिनाहेल्मेट बाइकवर बसून दारू पिउन महिलांना छेडत अण्णांच्या टोप्या घालून त्रास देत असत. त्यांच्याकडे पाहून अण्णांनी आंदोलन बंद करावं वा त्यांचं आंदोलन टिवीवर येणं बंद व्हावं असं वाटल्याचं आठवत नाही.

श्वेता२४'s picture

8 Jun 2018 - 5:16 pm | श्वेता२४

काळाप्रमाणे मुलींना वाढवताना बदल होत गेले, जसे त्यांना शिकवणे, आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी पाठींबा देणे. पण हे होत असताना मुलांना वाढविण्यात अजिबात बदल केला गेला नाही. जसे मुलांना मुलींची कामे करावयास लावणे, मुलींचे अधिकार मान्य करुन त्याप्रमाणे तडजोड करणे, त्याग करणे इ. याचा परिणाम म्हणून मुलीं शिकतात, नोकरी करतात, घरचीही कामे सांभाळतात. पण पुरुष आधीही फक्त अर्थार्जन करत होते आताही फक्त तेवढेच करु शकतात. (इथे व्यक्त होणारे बहुतेक त्याच पिढीचं प्रतिनिधीत्व करतात.) स्त्री ज्या क्षमतेने घर व करीयर सांभाळी शकते त्याच क्षमतेने संसार सांभाळणारे पुरुष दुर्मिळ असतील. त्यामुळे आता स्त्रियांबरोबर पुरुषांनीही बदल घडवून घेणेच योग्य आहे. मंगळावर/चंद्रावर जाण्याची योग्यता ठेवणाऱ्या स्त्रीच्या नवऱ्याने आता ती नसल्यास स्वत: भाकऱ्या बडवायची तयारी ठेवणे आवश्यक आहे किंवा जेवणाकरीता अन्य पर्याय शोधणे आवश्यक आहे पण स्त्रीला तीच्या करीयरशी तडजोड करण्यास सांगणे अयोग्य आहे. जागतिकीकरण स्वीकारलेच आहे तर परदेशात ज्याप्रमाणे नवराबायको मिळून घरातली कामे करतात, जबाबदाऱ्या वाटून घेतात त्याप्रमाणे भारतातल्या पुरुषांनी वर्षानुवर्ष वागविलेला पुरुषी अहंकार बाजुला ठेवून संसार दोघांचा आहे हे मनात बिंबवून कामे वाटून घेतली तर वाद होण्याचा प्रश्नच येणार नाही. हा समजूतदारपणा सासू सासऱ्यांच्या पातळीवरही यायला हवा . .
मुळात खरा प्रश्न स्त्रियांचे शिक्षण किंवा नोकरी हा नसुन पुरुषांनी वर्षानुवर्ष भोगलेले स्त्रियांवरचे वर्चस्व, आयतेपणा ते सोडणार का हा आहे.

विशुमित's picture

8 Jun 2018 - 5:25 pm | विशुमित

<<<पण हे होत असताना मुलांना वाढविण्यात अजिबात बदल केला गेला नाही.>>>
==>>वरील दिलेल्या सर्व बाबी मध्ये आताची नोकरी करणारी पोरं लग्न झाल्यावर बायकोच्या हाताखाली लगेच ट्रेन होत आहेत. मुलांना अड्जस्ट होयला मुलीं इतका वेळ लागत नाही आजकाल.
नवीन सोसयट्यात भाड्याने राहणाऱ्या नवं दाम्पत्यांच्या घरात डोकावून हे अनुभवू शकता.
===
मला फक्त एवढे कळते स्त्री असो व पुरुष प्रत्येकाला किमान चॉइसस पाहिजेत, बाकी सगळं आपोआप मिळत जाते.

श्वेता२४'s picture

8 Jun 2018 - 6:10 pm | श्वेता२४

मला तुमचे म्हणणे मान्य आहे. आताची पिढी हळूहळू याला सरावतेय पण तेही शहरात (आपण सोसायट्यांचा उल्लेख केला आणि मीही हे चित्र शहरात किंवा स्त्रीया नोकरी करणाऱ्या कुटुंबातच पाहिले आहे.). हे चित्र सरसकट नाही. आजच्या काळातील मुले पत्नीचा आणि संसारातील जबाबदाऱ्यांचा वाटा उचलण्याचा मनापासून प्रयत्न करत आहेत आणि हा बदल नक्कीच सुखावणारा आहे. पण ज्यावेळी ऑफीसमधून घरी येताना नवऱ्याच्याही मनात येईल की उद्या नाश्ता / किंवा भाजीला काय करायचं, मुलांचा अभ्यास, त्यांच्या काही गोष्टी किंवा तत्सम काहीही., आणि घरी गेल्यावर तोही या कामांचा भार उचलेल त्यावेळी खरा समतोल साधला जाईल. सध्याच्या (काही) पुरुषांची प्रगती बायकोला स्वयंपाकात मदत करणे, कधीतरी स्वता काही बनवून तीला खायला घालणे इतपतच आहे.प्रश्न केवळ स्वयंपाक बनविण्यापुरताच नाही इतरही अनेक गोष्टी असतात. आताच्या काही नवऱ्यांना बायकोचा त्रास कळतो व तो दूर करण्यात ते स्वत सहभागी होतात त्यास घरातल्या लोकांचाही पाठींबा असतो. नाहीतर बऱ्याच आयांना आपल्या मुलाने घरात कामे केलेली आवडत नाहीत. हेही नसे थोडके. असा समंजसपणा संसारातल्या प्रत्येकाने दाखवला तर वाद होण्याचा प्रश्नच येणार नाही इतकच.

सुबोध खरे's picture

8 Jun 2018 - 6:43 pm | सुबोध खरे

आताची पिढी हळूहळू याला सरावतेय पण तेही शहरात
शहरातही हे प्रमाण १० टक्क्यांच्या वर असेल असे वाटत नाही. खेड्यात तर क्वचितच.
अतिउच्च शिक्षित बापही( पी एच डी झालेले) आपल्या मुलीला समान हक्क देताना दिसत नाहीत. मुलगी जास्त शिकली तर लग्नाला त्रास होऊ शकतो हाच विचार यामागे आहे. शिवाय वारसाहक्काने मालमत्ता देताना सुद्धा सुशिक्षित बाप मुलीला फारच क्वचित समान हक्क देताना आढळतात.( दोन मुली किंवा दोन मुलगे असले तर हा प्रश्न येत नाही).
आजतागायत जितक्या वारसापत्रांवर मी डॉक्टर म्हणून सही केली आहे तेथे मला हि समानता आढळलेली नाही हे खेदानेच नमूद करावेसे वाटते. मुंबई सारख्या शहरात मुलगा पाहिजे म्हणून दोन मुली असल्यावर तिसऱ्यांदा गरोदर राहणाऱ्या महिला मी दर वर्षी निदान ७५-१०० पाहतो आहे. असे एकही जोडपे मलागेल्या दहा वर्षात दिसलेले नाही ज्यांनी दोन मुलगे असल्यावर मुलीसाठी तिसरे मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे.
एकीकडे ज्या मुलींना मिळत आहे त्या ते ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करतात अशा फार तर २% असतील आणि उरलेल्या ९८ टक्के मुली या संसारासाठी नवऱ्यासाठी आणि सासू सासर्यांसाठी अविरत कष्टच करताना दिसत आहेत आणि समानता त्यांच्यासाठी सध्यातरी कागदोपत्रीच आहे.

विशुमित's picture

8 Jun 2018 - 6:43 pm | विशुमित

आमचं फादर अजून पण आईला अंघोळीला पाणी इस्नून देतं. आता बोला?

पिलीयन रायडर's picture

8 Jun 2018 - 7:03 pm | पिलीयन रायडर

तुमचं फादर ग्रेट हैत, पण इथे अंघोळ झाल्यावर आपली अंतवस्त्रे सुद्धा तशीच जमिनीवर टाकून निघून येणारे आणि बायकोने ती धुवावीत अशी अपेक्षा असणारे बापये मोप हायेत आमच्या मराठवाड्यात..

*हे तुम्हालाच उद्देशून असे नाही*

माझ्या घरात समानता आहे, मी समानतेने वागतो असं म्हणण्याला काही अर्थ नाही. हा प्रश्न वैश्विक आहे. अमेरिकेत बायका समान वेतना साठी लढत आहेतच की. वर अक्षदा ह्यांचे प्रतिसाद अनुभवातून आलेत. मी तर एका उच्छशिक्षित, ब्राह्मण घरात जन्मलेले आहे. मुलगी म्हणून वेगळं वागवणाऱ्या कुणाला कधी भीक घातली नाही. तरीही मी किमान 100 उदाहरणं देऊ शकते जिथे हा प्रयत्न तरी झाला. आणि माझ्या आजूबाजूच्या बायका "उगाच वाद नको" किंवा "अशीच पद्धत असते" म्हणून ते सहन करत राहिल्या. "बायकांनी पुरुषांची बरोबरी करायचीच नसते" हे वाक्य मला उद्देशून एक व्यक्ती म्हणलेली आहे. आता असे विचार असणाऱ्या व्यक्तीच्या हातात बाईंची भाषणे गेली ज्यात "चंद्रावर जा पण घरी येऊन भाकरी बडावावीच लागते, नवऱ्या पुढे काही चालत नाही" हे विचार गेले तर आमच्या सारख्या नवऱ्याला स्वयंपाकघरात धडाधड कामे सांगणाऱ्या बायकांना किती ताप देतील?!! मी एक भीक न घालणारी असेन, मोस्टली बायका "वाद नको" कॅटेगरी मध्ये असतात.

असो.. कोळसा उगळवा तेवढा काळा. स्वातंत्र्य ही कुणी दिलेली भीक नसते. त्यामुळे कुणी काय करावं आणि कसं वागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जोवर माझ्या वागण्याने इतर कुणाच्या स्वातंत्र्याला बाधा येत नाही तोवर मी माझी मुखात्यार आहे. आणि हे मनाशी ठरवलं की अपराधीपणा न बाळगता वागावं. कुणीही बायकांना येऊन समानता देणार नाहीये. ती देण्याची गोष्ट च नाही. तो हक्क आहे. जो मला (आणि इतरांनाही) आहे हे मानूनच वागायचं असतं.

विशुमित's picture

8 Jun 2018 - 7:31 pm | विशुमित

<<<मी एक भीक न घालणारी असेन, मोस्टली बायका "वाद नको" कॅटेगरी मध्ये असतात.>>>
==>> प्रत्येक पुरुष "घरात मी वाघ आहे" अशाच डिंग्या बाहेर हाकत आला आहे. मोस्टली बायका "वाद नको" कॅटेगरी मध्ये असतात हा खूप मोठा विनोद पचायला जड जात आहे.
===
मी पहिल्यांदा जेव्हा अपर्णा ताई ना ऐकले होते खरंच खूपच प्रभावित होऊन बायको आणि मातोश्रीना जवळ बसवून ऑडिओ ऐकवला होता.
आमच्या आईसाहेब खूप लाडिक म्हणाल्या होत्या, " माझं बाळ आलड आहे ग अजून, नको त्याच जास्त मनाव घेऊ."
===
ह्या असली भाषण देणाऱ्या ताई, कीर्तनकार आणि टीव्ही मालिकांनी लोकांच्या संसारांचे वाटोळे केले आहे. त्याची अंमलबजावणी करायला महिलाच जास्त अग्रगणी राहिल्या आहेत, हे पण नमूद करू इच्छितो. बाकी बापायांचे कोठे काय चालते घरात??

गामा पैलवान's picture

8 Jun 2018 - 8:18 pm | गामा पैलवान

विशुमित,

तुम्ही म्हणता की अपर्णा बाई संसाराचं वाटोळं करताहेत. पण प्रत्यक्ष अनुभव वेगळा आहे. त्यांनी समुपदेशनाद्वारे अनेकांचे संसार सावरलेत.

आ.न.,
-गा.पै.

पिलीयन रायडर's picture

8 Jun 2018 - 9:47 pm | पिलीयन रायडर

अहो ते नवऱ्याचं डोकं खाणं वेगळं हो. नवीन लग्न झालेल्या पोरी बंडखोरी करत नाहीत फारशा. साधा मुद्दा आहे. शहरी भागात नाही पण गावाकडे मुळात हातात पैसा नसलेली बाई किती बंडखोरी करणार? समानता वगैरे सोडा हो. फार दूरच्या गप्पा आहेत त्या. जनरली जे होतंय ते चुकतंय हेच कळत नाही. पुण्यात आमच्या घरात पुरुषांनी आधी जेवणे, उरलं ते बायकांनी खाणे, नोकऱ्या करून सुद्धा स्वयंपाक करून नवऱ्याला हातात ताट देणे टाईप गोष्टी सर्रास घडतात. शिकलेल्या बायकांना त्यात चूक वाटत नाही तर बाकीच्यांचे काय? माझा नवरा स्वयंपाक करतो तर मी किती बोलणी ऐकली आहेत काय सांगावे. ते सोडा, मला अजिबात न ओळखणारे लोक इथे मला आणि माझ्या नवऱ्याला जाम जज करतात इथे. का तर ही इतकी बोलते तर नवरा किती बिचारा असेल! विचार करा एरवी प्रत्येक्ष जगात मी किती बडबड ऐकली असेल. मग माझ्या सारखी व्यक्ती सुद्धा "वाद नको" मोड मध्ये जाऊन चार गोष्टी नजरेआड करते.

अहो किरकोळ वाटतील पण नसानसात भिनलेले इतके मुद्दे आहेत की जाऊ दे मरू दे असं होऊन जातं. इथे लोकांना टाईमपास वाटत असेल, पण अक्षदा सारखे कळवळून प्रतिसाद का देतात ते 100% समजू शकते मी.

गामा पैलवान's picture

8 Jun 2018 - 10:50 pm | गामा पैलवान

पिराताई,

तुमचं लग्न तुम्हीच टिकवलंय ना? मग लोकांना फाट्यावर मारायला काय अडचण पडते तुम्हाला? बाकी अक्षदा जे म्हणतात त्याचा अपर्णाबाईंच्या कथनाशी काहीही संबंध नाही.

आ.न.,
-गा.पै.

पिलीयन रायडर's picture

8 Jun 2018 - 11:31 pm | पिलीयन रायडर

मग मी काय करते असं वाटतं तुम्हाला?

बाकी "तुम्हाला" असं वाटतं की संबंध नाही. ते तुमचं मत झालं. आम्ही पुष्कळ जणी तसं मानत नाही आहोत.

गामा पैलवान's picture

9 Jun 2018 - 2:13 am | गामा पैलवान

पिराताई,

एव्हढा लांबलचक प्रतिसाद लिहिलात तो कशासाठी ते कळलं नाही. कोण काय निरर्थक बोलतोय त्यावर इतका मजकूर लिहायचा?

आ.न.,
-गा.पै.

शिकलेल्या पोरी असल्या दबावाला बळी पडतात त्याच खूप वाईट वाटते.
लय टारटूर कार्य लागले तर पोराला आई बापासकट जेलची हवा द्यायची, धमकी द्याची. सरळ होतात. माझ्या ओळखीतील सरळ झालेत.
====
घरात योग्य आणि मुद्देसूद वादाला मुली घाबरतात का तेच कळत नाही ?
(एक उपाय सांगतो - लग्न ठरल्यावर फोनवर बोलण्यात वेळ घालवण्या पेक्षा मुलींनी पोरांना मिपा वर अकाउंट खोलून द्यायचं आणि तिथे प्रतिवाद करायला सांगायचं. तो आयुष्यभर चाकोरी सोडायचा प्रयत्न करणारच नाही. केला की आऊट.)
====
<<<पुण्यात आमच्या घरात पुरुषांनी आधी जेवणे, उरलं ते बायकांनी खाणे, नोकऱ्या करून सुद्धा स्वयंपाक करून नवऱ्याला हातात ताट देणे टाईप गोष्टी सर्रास घडतात.>>>
==>> हे असले लाड ठेवायचेच नाहीत. त्यासाठी सुरवातीपासूनच टाईट राहायचा. लग्न झाल्या झाल्या वावर च असा ठेवायचा की आता घरातील एम डी मी च आहे. बुजायचं नाहीच. चान्स च द्यायचा नाही पुढच्यांना.
====
पिरा ताई मी तुमचे प्रतिसाद कित्येक वर्ष वाचत आहे, त्यावर माझे मत झाले आहे की मुलींनी घरात असेच खमकेपणाने राहिले पाहिजे.
====

विशुमित's picture

9 Jun 2018 - 12:08 pm | विशुमित

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwad...
अशी कमांड पाहिजे घरात. सर्व जवाबदाऱ्या सांभाळून नातीबरोबर दहावीला बसून पास होऊन दाखवले. कोणाला न लाजता, न बुजता आणि घरातील लोकांनी पण साथ दिली आणि शिक्षण घेण्याची जिद्ध किंवा त्याला चॉईस म्हणा पूर्ण केली.
===
घरातली सगळी सूत्रे बाई ने हातात घेतली पाहिजेत. प्रपंच नेटका होतो. अशाच स्त्रीला समाज्यात मान मिळत असतो. ताई ने "करून दाखवलं" हे बिरुद पण भेटतं.
शोभेच्या भावल्या, इथे बस्स म्हंटले की बसायचे, उठ म्हंटल्यावर उठायचे, अशा मुली आयुष्यभर रडत असतात.

श्वेता२४'s picture

9 Jun 2018 - 12:37 pm | श्वेता२४

घरातील सर्वांनी सहकार्य केल्याने हे यश मिळविता आले.'' - ध्रुपदा बाई एडके
हे त्यांचे वाक्याच पुरेसे बोलके आहे. सर्वांचे एकमेकांना सहकार्य असले की संसारातील असचणींवर हसत मात करता येते

विशुमित's picture

9 Jun 2018 - 12:49 pm | विशुमित

नसते केले सहकार्य तरी ह्या वर्षी नाही तर पुढच्यावर्षी त्या नक्कीच पास झाल्या असत्या.
===
एकूण एडके काकूंबद्दल वाचल्यावर जाणवते की कुटुंबावरची त्यांची पकड बिलकुल सैल दिसत नाही.
सहकार्य न करून जातील कुठे ?

पुंबा's picture

11 Jun 2018 - 11:17 am | पुंबा

अगदी खरं साहेब..
एडके काकी मुळात स्वयंसिद्धा आहेतच. त्यांना 'काय करायचंय म्हातारपणात शिकून' असं कुणी म्हटलं जरी असतं तरी त्यांनी त्याला भिक घातली नसती.
पण शिक्षण अर्धवट सोडून लग्न करायला लागलेल्या आणि स्वत:च्या पायावर उभ्या नसलेल्या एखाद्या मुलीला अश्या प्रकारे शिक्षण पूर्ण करायचं म्हटलं तर प्रचंड अडचणी येतात. पुरूषसत्ताक समाजात स्वतंत्र निर्णय घेताना एखाद्या मुलीला आणि त्यात जर ती ग्रामीण भागातली किंवा समाजाच्या निम्न वर्गातून आली असेल तर तीला खूप त्रास होतो. अशी अनेक उदाहरणे जवळच्या वर्तुळात बगहयला मिळाली आहेत. अजो किंवा गामा यांना अपर्णाबाईंच्या व्याख्यानांमुळे प्रतिगामी लोकांना थोडे का होईना बळ मिळते हेच कसे मान्य होत नाही याचे नवल वाटते.

प्रचंड अडचणी प्रत्येकाच्या जीवनात आहेत.
===
त्रयस्थ माणसांच्या हस्तक्षेपामुळे संसाराला खूप क्षती पोहचते यात वादच नाही.
अपर्णाताईंसारखे वक्ते, कीर्तनकार आणि टीव्ही मालिका त्यात सगळ्यात जास्त भर घालतात.

गामा पैलवान's picture

11 Jun 2018 - 5:14 pm | गामा पैलवान

विशुमित,

एकाकी पडलेल्या वयस्कर बाईची हालत कशी वाईट होते हे सांगण्याचा अपर्णाबाईंच्या व्याख्यानांचा हेतू नाही. शिकलेल्या व स्वतंत्र वृत्तीच्या बाईने नवऱ्याशी कसं जुळवून घ्यावं याविषयी ते विवेचन आहे. कुठे तोडावं ते शिकलेल्या मुलीस ते कळणं सोपं असावं.

जर तरुणपणी त्या बाईने तडजोड करायला शिकलं नाही तर म्हातारपणी हालत अत्यंत खराब होते. तुम्ही म्हणता ती पुरुषसत्ताक वगैरे भुतं छळायला लागतात. तुम्ही वर उल्लेखलेली समस्या उद्भवू नये अशा हेतूने अपर्णाबाईंची व्याख्यानं आकळायला हवीत.

आ.न.,
-गा.पै.

मुली दुसऱ्यांकडून अपेक्षा खूप ठेवतात.

दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे जेव्हा बंद करतील तेव्हा खरा फेमिनिज्म अस्तित्वात येईल.

पिलीयन रायडर's picture

9 Jun 2018 - 4:44 pm | पिलीयन रायडर

तेच तर म्हणतेय मी! कुणी तरी येऊन मला स्वातंत्र्य देईल, समानता देईल असं काही नसतं. ते माझं मला लोकांना फाट्यावर मारून मिळवावं लागतं. आणि हो त्यात जास्त कष्ट आहेत, रिस्क आहे, निर्णय घ्यावे लागतात,अवलंबून राहता येत नाही कुणावर. ते ही अनेकांना नको असतं किंवा तितका आत्मविश्वास नसतो. ज्यांना तो असतो, त्या जातात मस्त पुढे.

विशुमित's picture

9 Jun 2018 - 5:33 pm | विशुमित

<<<ते ही अनेकांना नको असतं किंवा तितका आत्मविश्वास नसतो.>>
==>> मग बसा तसेच. जगाला कोसत. (हे स्त्री पुरुष बाल वृद्ध सगळ्यांसाठी लागू आहे)
====
महिन्यापूर्वीचा आमच्या वाडीतील किस्सा सांगतो..
सासू रोज सुनेला घालून पाडून बोलायची. ती बिचारी (?) जास्त प्रतिवाद न करता ऐकून घायची.
पण सासूची मजल तिच्यावर हात उचलण्यापर्यंत गेली. ती पण शेजाऱ्यांसमोर.
२-४ फटके खाल्यावर सुनेने जे दोन थोबाडीत मारल्या सासूच्या की ती खाली पडून फडतळीवर आदळली. सासूचा हात मोडला.
आपण काहीतरी खूप मोठा अपराध केला हे सुनेच्या क्षणार्धात लक्ष्यात आले.
आता तीच पोरगी सासूची सेवा करताना मी पाहत आहे. वातावरण एकदम शांत आहे.
पण त्याचा इम्पॅक्ट असा झाला आहे की वाडीतील बाकीच्या सासवा रुळावर आल्या आहेत. (आणि सुनांना जोर चढला आहे.)
====
हे असा इंगा दाखवावा लागतो तरच जगात माणूस टिकू शकतो. असो...
आता बास करतो.. नाहीतर म्हणाल विशुमितला आज काय कामधंदा दिसत नाही आहे :)

प्रसाद गोडबोले's picture

8 Jun 2018 - 8:57 pm | प्रसाद गोडबोले

हायला

अजुन चालु आहे की काथ्याकुट ! भारीच बरेच दिवसांनी मिपाकट्टप्पा मुवींच्या धाग्यांना प्रतिसाद संक्झ्येत हरवु शकेल असा धागा दिसला =))))

चला मग आम्हीही आमच्या मताची पिंक टाकुन जातो !
आम्ही अन्यत्र म्हणल्या प्रमाणे भारतीय समाजचे क्लस्टरिंग झालेले आहे आणि गेल्या काही वर्षात त्यांच्यातील बाऊंडरीज ठळक होवुन एकदम प्रकर्षाने दिसायला लागल्या आहेत :)
आता " एका विशिष्ठ" क्लस्टर ने अपर्णा मॅडमचे सल्ले ऐकावेत , थोडी पडती बाजु घेवुन नाती जपावीत, बायकांनी भाकर्‍या बडावाव्यात , नवर्‍यांनी " बायको इवढे करीयर करुनही केवळ प्रेमाखातर आणि अपर्णा मॅडमने सांगितले म्हणुन भाकर्‍या बडवत आहे " हे पाहुन तिला जमेल तितकी मदत करावी , तिच्या आनंदाच्या ४ गोष्टी कराव्यात ! मध्येच सर्प्राईज म्हणुन तिला छानश्या ट्रिपला न्यावे किंव्वा छानशी साडी किंव्वा दागिना खरेदीला न्यावे किंव्वा अजुन काहीतरी जेणे करुन तिला आनंद होईल असे काही करावे ! सायकॉलॉजीत ज्याला ओफ्हरंट कंडीशनिंग म्हणातत तसे काहीसे ! पॉसिटीव्ह रीइन्फोर्समेन्ट दोघांचेही बिहेवीयर एकमेकांना सुखद होईल :)

आणि " दुसर्‍या क्लस्टर" ने , सतत नवर्‍याशी / बायकोशी बरोबरी करत रहावी , तो म्हणला भाकरी कर कि त्याला म्हणावे तु भाजी कर , तो म्हणाला साडी नेस कि त्याला म्हणावे तु धोतर नेस, चान्स मिळेल तेव्हा नवर्‍याशी कचकुन भांडावे , जरा काही बोलाला तर लगेच माहेरी जावे !

:)

आणि हो सर्वात महत्वाचे म्हणाजे कृपया आम्हाला तुमचा थोडासा डेटा प्रोव्हाईड करावा ;)

आमचे हायपॉथेसीस आहे : H0 : लग्न ही एक अत्यंत टाकाऊ आणि निरर्थक संस्था आहे. सशक्त विवाहसंस्थेचा कौटुंबिक आणि पर्यायाने सामाजिक आर्थिक विकासाशी काडीमात्र संबंध नाही.
हे हायपॉथेसीस सिध्द किंव्वा असिध्द करायला आम्हाला डेटा हवा आहे. हा डेटा मिळाल्यास ह्या दोन क्लस्टरमधील लोकांच्या लाँङगटर्म मधील आर्थिक सुबत्तेवरुन योग्य अनुमान काढता येईल अशी आशा आहे :)

मा-ऑ,, इथे संसार बसवायचं चालय तुमचा काय उगाच हायपॉथेसीस हायपॉथेसीस चाललंय! :)

प्रसाद गोडबोले's picture

9 Jun 2018 - 7:18 pm | प्रसाद गोडबोले

हे पहा , एकदम सोप्प आहे,

तुम्हाला वाटतंय की अपर्णा मॅडम म्हणाल्या त्याने संसार मोडतात, बायकांना परत माजघरात ढकलले जाते वगैरे वगैरे।
बाकी काहींना वाटत आहे, की अपर्णा मॅडम म्हणतात ते योग्यच आहे , बायका गोडबोलून च नवऱ्याला अन घराला मुठीत ठेवतात । उर्मट बोलून अन तुसडे पणा दाखवून फक्त नाती तुटतील जुळणार नाहीतच ।

आता ह्यातील कोणते विधान सत्याच्या कसोटीवर खरे उतरते हे पडताळून पाहण्यासाठी हायपोथॅसिस टेस्टिंग करावेच लागेल । नुसत्या अर्ग्युम्नेट्स ने काहीही सिद्ध होत नसते , पुरावा द्यावा लागतोच , एखाददुसर्या वैयक्तिक अनुभवांवरून काहीही सिद्ध होत नसते.

प्रसाद गोडबोले's picture

9 Jun 2018 - 7:34 pm | प्रसाद गोडबोले

माझ्या पाहण्यात दोन्ही बाजूची उदाहरणे आहेत,
तुसडेपणाने बोलणारी सून कसें का होईना पण
गोड बोलायला लागली अन अचानक अक्षरशः अविश्वसनीय रित्या संसार सुखाचा झाल्याचे एक अतिषय जवळचे उदाहरण आहे
तसेच
प्रचंड मान राखूनही हिडीस फिदीस करणारे सासू सासरे सहन करणारी एक सून ही पाहण्यात आहे .

तस्मात मी कोणत्याच बाजूला बायसड नाहीये ।
पुराव्याने शाबीत केल्याशिवाय कोणत्याही एका बाजूच्या मतावर विश्वास ठेवणे मला जमणार नाही :)

ज्यांचं लग्न झालंय त्यांच्या साठी नाही, पण ज्यांचा होऊ घातलाय, लग्नासाठी मुली किंवा मुलं बघणं चालू आहे त्यांनी कुंडली बघताना या ताईंच्या भाषणाची रेकॉर्ड (वॉट्सअँप मेसेज) दुसऱ्या पार्टी ला पाठवून द्यायचा आणि विचारायचं कि तुमचे साधारण असेच विचार आहेत का ? जर दोन्ही बाजूचे विचार असेच असतील तरच लग्न लावायचं. बऱ्याच ठिकाणी सेल्स डिपार्टमेंट वेगळं आणि प्रत्यक्ष काम वेगळं असाच असतं. तसं न करता मुलीला कांदेपोहे कार्यक्रमातच नीट कल्पना द्यायची. आणि जी तयार होईल (झाली तर) तिच्याशीच लग्न करायचं. जरी लग्न जमायला उशीर झाला तरी अजिबात अटींवर तडजोड करायची नाही. ताईच भाषण ऐकवल्याशिवाय लग्न करायचा नाही.

बरेचदा काय होत, लोकांना घरात घालायचा गाऊन घ्यायचा असतो पण बघायला गेले कि शर्ट-पॅन्ट पसंत पडते, दिसते स्मार्ट, पटकन आवडते, घेऊन येतात, आणि मग आल्यावर प्रश्न पडतो कि आरे आपल्याला गाऊन हवा होता. डिमांड क्लिअर असूनहि ती आयत्यावेळी बदलल्याने नसल्याने सप्लाय चुकीचा होतो :P , :D .

प्रेमात पडताना पण आपल्याला आवडलेली मुलगी आपल्या घरी नीट राहील का, याचा अंदाज येणं अशक्य नसत. पण लग्नाआधी "लग्न होणं" महत्वाचं असतं. आणि लग्न झाल्यावर इतर गोष्टी महत्वाच्या होतात.

आपल्या इथे लग्न मोडणं हि अजूनही "टॅबू " गोष्ट असूनही करताना अजिबातच विचार न करता करतात. हल्ली किमान शिकलेल्या, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र मुली त्यामानाने सावध झाल्या आहेत.

पिलीयन रायडर's picture

8 Jun 2018 - 11:40 pm | पिलीयन रायडर

झी मराठीची जाहिरात पाहिली का? एक मुलगा म्हणतो की मला "घरी बसून आई वडिलांची सेवा करणारी" बायको हवी आहे. लोकांना मोलकरीण किंवा रामागडी हवा असतो, शोधतात बायको!

पण तुमचं मला अगदी पटलं! मी नुकताच एका अत्यन्त जवळच्या व्यक्तीच्या वधुसंशोधनात भाग घेतलाय. त्याला नीट शिकलेली, नोकरी करणारी पण ह्याने जॉब बदलला की सेंकदात जॉब सोडून त्याच्या मागे जाणारी, आई वडिलांची सेवा करणारी, सर्व धार्मिक कार्य करणारी, पण मॉडर्न, आणि भाऊ असलेली, अजिबात एकुलती एक नसलेली (तिच्या आई वाडीलांची ब्याद माझ्या गळ्यात नको) आणि मग बाकी नाजूक, गोरी, सुंदर मुलगी हवी होती. अशा परस्परविरोधी अपेक्षा ठेवून कसं होणार? बरं मग फोटो मध्ये फटकड्या मुली आवडायच्या आणि प्रत्यक्षात त्या "बरं मग किती स्वयंपाक येतो तुला" इथून सुरुवात करायच्या! आणि घरगुती साध्या मुली अजिबात आवडत नव्हत्या.

साडे तीन वर्षा नन्तर त्याने ह्यातली एकही अट पूर्ण न करणारया मुलीशी लग्न केलं!

आईच्या पदराड जगलेली लग्नाऊ पोरांच्या बावळट अपेक्षा असतात. नंतर आपोआप सरळ होतात.

एमी's picture

9 Jun 2018 - 7:00 am | एमी

प्रतिसाद आवडला.

विशुमित's picture

9 Jun 2018 - 9:14 am | विशुमित

वीणा ताई वंटास प्रतिसाद...
===
आमच्या कडे सुपारी फोडताना लग्नाच्या याद्या केल्या जातात. त्यावर लग्न ठरवायला आलेल्या दोन्ही कडच्या पाहुण्याच्या सह्या असतात.
अपर्णा ताईचं संपूर्ण भाषणच लिहून आणायचं, करा सह्या म्हणायचं.
===
हे एक वर्ष सगळ्यांनी काटकोर पाळले तर कापड बस्ते, फर्निचर आणि भांडीवाल्याना गबाळ बांधून काशी यात्रेला जावे लागेल.
आणि फोटूवले झाडाला उलटे लाटून स्वतःचेच फोटो काढत बसतील.

विशुमित's picture

9 Jun 2018 - 9:46 am | विशुमित

लाटून== लटकून

अपर्णाबाईंच्या भाषणाचा परत चुकीचा उपयोग होतोय.
-- लग्नाच्या आधी जसं मुलीला स्वयंपाक येतो का हे विचारतात, तसंच आहे हे. आपल्या घरात येणार नवीन माणूस आपल्या विचारांचं आहे कि नाही हे शोधायचा अगदीच सोपा मार्ग आहे हा. आणि मला खात्री आहे कि मुलांकडचे कधीच हा मार्ग वापरणार नाहीत, मुलींनीच सुरवात करायला हवी. आधीच विचारून घ्यावं कि तुमचे विचार अपर्णाताईंच्या विचारांशी मिळतेजुळते आहेत का? म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेणं सोपं जाईल.

दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे जेव्हा बंद करतील तेव्हा खरा फेमिनिज्म अस्तित्वात येईल.
हे अगदी बरोबर बोललात.

-- हे तुम्ही परस्परविरोधी बोलताय असं नाही वाटत का? जर सगळ्या बाबतीत "नवऱ्याचं / सासरच्यांच ऐक " हा मुख्य सल्ला ७०% भाषणात असेल तर दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणं कसाकाय बंद करणार. कितीतरी ओळखीच्या मैत्रिणी इंजिनिअरिंग करून लग्न झाल्यावर घरी बसल्या आहेत, आधी सांगितलं होता कि नोकरी केली तरी चालेल, लग्न झाल्यावर ३-४ महिन्यात नोकरी बंद, घरातली कामवाली बाई बंद. फक्त भांडण नको म्हणून संसार चालू. दुसरीच्या ओंजळीने पाणी प्यायचं नसे तर लग्नच करू नये किंवा घटस्फोट घेऊन एकटं राहावं हि बऱ्याच घरातली परिस्तिथी आहे.

प्रॉब्लेम असा आहे कि अपर्णा ताई अशा पद्धतीने भाषण करतात कि "नवीन सून /बायको" हा घर मोडण्यातला एकमेव मुद्दा आहे. काही घरात तो असेलही (पण तो अगदी अगदी कमी टक्के असावा (विदा नाही )) . पण इतर मुद्यांबद्दल त्या बोलताच नाहीयेत हेच खूप लोकांना खटकतंय. पण इथे बऱ्याच लोकांना असं वाटतंय कि जेव्हा तुम्ही पब्लिक फोरम वर बोलता तेव्हा एखाद्या चांगल्या (किंवा जुळवून घेण्याचा प्रयत्न करणारी) सूनेला (वरती अक्षदा नि म्हटल्याप्रमाणे ) टोचून बोलणारी लोक ढिगाने सापडतील.

खूप जवळून बघितलेलं एक उदहारण आहे. मुलीचे वडील बिल्डर होते, मुलाला मुंबईत एक फ्लॅट, गाडी, भरपूर सोन, अतिशय खर्चिक लग्न असा मामला होता, मुलीला काय जमत नाही लाडात वाढलीये असं आधीच सांगितलं होतं. लग्नामुळे आर्थिक फायदे भरपूर झाले आणि करून घेतले पण. इतर नातेवाईंकांनी सावध पण केलं होत कि बाकी सगळं चॅन आहे पण हिला सांभाळून घायला लागेल. आधी एवढं काय म्हणाले, आणि नंतर (स्वतःच्या मुलासारख्याच :P )सुनेच्या सवयी बघून जमेनास झालं. तरी ती बिचारी कायतरी स्वयंपाक करायला बघायची पण सवय नसल्याने अगदीच वाईट व्हायचा. १००% मुलीची चूक असं खरंच एकही उदाहरण नाहीये. लग्नाआधीच्या भन्नाट अटी दोन्ही बाजूनी ऐकल्या आहेत. पण लग्नानंतर (माझ्या पाहण्यातला) ९०% घरात मुलींनीच जुळवून घेतलंय

गामा पैलवान's picture

12 Jun 2018 - 2:54 am | गामा पैलवान

वीणाताई,

१.

.... मुलींनीच सुरवात करायला हवी. आधीच विचारून घ्यावं कि तुमचे विचार अपर्णाताईंच्या विचारांशी मिळतेजुळते आहेत का? म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेणं सोपं जाईल.

मान्य. साधारणत: मुली विवाहाबाबत जास्त चोखंदळ असतात. त्यांना स्वत:चं घर सोडून दुसरीकडे जायचं असतं म्हणून. त्यामुळे त्यांनीच पुढाकार घेतलेला बरा पडावा.

२.

हे तुम्ही परस्परविरोधी बोलताय असं नाही वाटत का? जर सगळ्या बाबतीत "नवऱ्याचं / सासरच्यांच ऐक " हा मुख्य सल्ला ७०% भाषणात असेल तर दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणं कसाकाय बंद करणार.

जरी ते परस्परविरोधी वाटंत असलं तरी प्रत्यक्षात तसं नाही. इतरांचं ऐकण्याचा सल्ला कुटुंबात रुळेपर्यंत लागू आहे. एकदा का रुळली की स्वत:च्या ओंजळीनं पाणी कसं प्यावं ते हल्लीच्या मुलींना चांगलंच जाणून असतात.

आ.न.,
-गा.पै.

मुली विवाहाबाबत जास्त चोखंदळ असतात.

ते हल्लीच्या मुलींना चांगलंच जाणून असतात.
>> हे तुम्ही एका अतिशय छोट्या गटातल्या मुलींविषयी बोलत आहात. १९ वर्षाच्या आत एक/दोन मुल होणाऱ्या ४७% मुली आहेत भारतात...
कित्येक शिकलेल्या मुलीदेखील पाहिल्या आहेत ज्या आपल्याला होकार देणाऱ्या पहिल्याच मुलाशी लग्न करतात, आवडला नसेल तरीही. कारण मुलीने नकार दिला तर समाजात बोभाटा होऊन तिला पुढे फारशी स्थळच येणार नाहीत...

असो. मी आधीच म्हणल्याप्रमाणे म आं जा वर फक्त (इतर समाजाशी नाळ तुटलेल्या) 5% लोकांविषयी बोलणं चालू असत...ं

एमी's picture

10 Jun 2018 - 6:54 am | एमी

ही बघा आळशी 'नोकरदार' बाईबद्दल 'कामसू' गृहिणीची कमेंट:

तथाकथित उच्चभ्रू वस्तीत ते तरुण जोडपं राहत होतं. फक्त ब्रँडेड वस्तू आणि सगळे व्यवहार ऑनलाइन.
शेजारीपाजारी कोण राहतोय, कोण जगला मेला सोयरसुतक नाही.
दोघे एका उच्च बँकेत उच्च पदावर.
एकदा त्यांच्याकडे काम करणारी बाई एक आठवडा सुट्टीवर गेली. आठव्या दिवशी आली आणि नाक दाबत बाहेर आली. शेजारची पन्नाशीची बाई तेव्हा नेमकी स्वतःच्या दाराबाहेर झाडत होती.
म्हणाली, काय गं, काय झालं?
तर काम करणारी बाई सांगू लागली "काय सांगू ताई. सिंक आणि ओटा भरून खरकटी भांडी आणि बाकी घरभर घाण कचरा आहेच पण अहो सात दिवसांच्या चड्ड्या बॉड्या आणि नाक पुसलेले चिकट रुमाल सुद्धा तसेच पडलेत."
किळस शिसारी राग चीड व्यक्त करावी (अर्थात फक्त स्वतःशी) की "मला काय त्याचे" म्हणत पुढे जावे !
हं.
शिक्षणाचा, पदाचा, भाषेचा, प्रांतांचा, पिढीपिढीतल्या अंतराचा कशाकशाशी कशाचाच संबंध नसतो.
संबंध असतो फक्त माणूस असा किंवा तसा असण्याशी.
बाकी गोष्टी छोट्याच असतात.
- स्मिता गानू जोगळेकर

>>अगदी खरं आहे शिक्षणाचा, पदाचा, भाषेचा, प्रांतांचा, पिढीपिढीतल्या अंतराचा कशाकशाशी कशाचाच संबंध नसतो.
शिक्षणात काडीचीही अडचण न आलेली बाई, आयुष्यभर कुठल्या ना कुठल्या पुरुषवर अवलंबून राहते, स्वतःखेरीज जास्तीजास्त ३ लोकांचा स्वैपाक करायच्या बदल्यात ४० हजार महिनाची लाईफस्टाईल मिळवते आणि उच्च बँकेत उच्च पदावर काम करणाऱ्या बाईचे चार घरी काम करून स्वतःचे घर चालवणाऱ्या बाईसोबतचे वागणे याबद्दल जालावर येऊन पो टाकते....

दुपारी ढाराढुर झोपणाऱ्या किंवा माझ्या नवऱ्याची बायको बघत बसणाऱ्या किंवा जालावर येऊन होममेकरी पो टाकणाऱ्या बायकांची कमी नाही जगात!

अनन्त अवधुत's picture

10 Jun 2018 - 2:02 pm | अनन्त अवधुत

शिक्षणात काडीचीही अडचण न आलेली बाई, आयुष्यभर कुठल्या ना कुठल्या पुरुषवर अवलंबून राहते, स्वतःखेरीज जास्तीजास्त ३ लोकांचा स्वैपाक करायच्या बदल्यात ४० हजार महिनाची लाईफस्टाईल मिळवते आणि उच्च बँकेत उच्च पदावर काम करणाऱ्या बाईचे चार घरी काम करून स्वतःचे घर चालवणाऱ्या बाईसोबतचे वागणे याबद्दल जालावर येऊन पो टाकते....

दुपारी ढाराढुर झोपणाऱ्या किंवा माझ्या नवऱ्याची बायको बघत बसणाऱ्या किंवा जालावर येऊन होममेकरी पो टाकणाऱ्या बायकांची कमी नाही जगात!

हे मत वाचल्यावर

शिक्षणाचा, पदाचा, भाषेचा, प्रांतांचा, पिढीपिढीतल्या अंतराचा कशाकशाशी कशाचाच संबंध नसतो.
संबंध असतो फक्त माणूस असा किंवा तसा असण्याशी.

हे मत पटले.

अनन्त अवधुत's picture

10 Jun 2018 - 1:54 pm | अनन्त अवधुत

.

चामुंडराय's picture

12 Jun 2018 - 7:02 am | चामुंडराय

हा धागा आणि या सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या आणि जगातील सर्वात लहान फेअरी टेल (shortest fairy tale) आठवली.

A boy proposed to a girl.
She refused.
And he lived happily ever after.

पिरीयड.

एमी's picture

12 Jun 2018 - 7:08 am | एमी

And they both lived happily ever after. Separately!!

असं पायजे.