adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती

कोंबडी प्रेमी's picture
कोंबडी प्रेमी in काथ्याकूट
21 Jul 2017 - 5:47 pm
गाभा: 

https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU

हि एक लिंक पाहिली.

ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत

मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे

ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ??

एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ??
“मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर”

अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात.

मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम
मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा”
मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ?

मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे)

तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल ....

समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..

प्रतिक्रिया

हतोळकरांचा प्रसाद's picture

24 Jul 2017 - 9:41 pm | हतोळकरांचा प्रसाद

घ्यावाच कि आक्षेप, त्यांच्या चुकीच्या गोष्टींवर घ्यावाच आक्षेप! पण त्यांच्या एकूण भाषणातील आपल्याला खटकणाऱ्या वाक्यातून आपल्याला हवी तशी प्रतिमा उभी करणे मला चुकीचे वाटते. त्या मुलींना (फक्त) भाकऱ्याच बडवा असे सांगत आहेत अशी प्रतिमा कशाला? तुम्ही करता ते करून तुम्हाला या गोष्टी यायला पाहिजेत असा त्याचा मतितार्थ नाहीये का? मला वाटते साधारणपणे प्रत्येक स्त्रीला तिच्या आईने हि गोष्ट एकदातरी नक्कीच सांगितली असावी. तेव्हा ती इतकीच खटकणारी वाटली होती का? पुरुषांनाही स्वैपाक यायलाच हवा आणि त्याबद्दल काहीही दुमत नाही. पण पुरुषांना सांगत नाही मग स्त्रीला का सांगता हे मला बायस्ड मत वाटते.

बाकी त्या ज्या मुद्द्यांबद्दल सांगत आहेत ते मुद्दे संघर्ष होत असलेल्या कुटुंबाबद्दल आहेत, त्यातून संघर्ष निर्माण होण्याचा मुद्दा गैरलागू वाटतो. कोणत्या मुद्द्यांनी संघर्ष निर्माण होईल असे आपल्याला वाटते? "संसारात जे वाट्याला येईल ते भोग बाई" असे म्हणणारी माता आणि त्यांचे भाषण याची तुलनाच मुळी पटत नाही. त्यांचे सल्ले हे संघर्ष टाळण्यासाठी तुम्ही काय भूमिका बजावू शकता या बाबतीत आहेत असे मला वाटते.

नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात.

मला हे कळत नाही लोक सरकारच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या नितीला बळी पडून स्वतःचं डोकं का खराब करून घेतात. मंजे लग्नास सर्वात सुयोग्य वय काय याचं उत्तर काय आहे? १८-२५ वर्षे. आज जे लोक २५ नंतर लग्न करतात ते चूक आहे. चूक म्हणजे १८ ते २५ पेक्षा चूक. सरकारची ही एक्सप्लिसिट निती आहे कि स्त्री असो वा पुरुष , शक्य तितके लग्न उशिरा व्हायच्या फेवरमधे बोलायचे. मंजे लोकसंख्या वाढिचा दर मंदावतो. अजून तरि तिशोत्तरित लग्न करणार्‍या पोरिंची चिंता करणारी डॉक्यूमेंटरी राज्यसभा टिवीवर (त्यांना भारतातले असले सगळे प्रॉब्लेम सर्वात अगोदर कळतात.) नाही पाहिलि.
==========================
शिक्षणाचा आणि लग्नाचा काय संबंध? मुलगी शिकेल नि मगच लग्न करेल ही भूमिका माजोरडी नाही का? म्हणजे १८- २५ या काळातच लग्न करण्याचा सर्वात सुयोग्य नैसर्गिक काळ असतो, आणि याच काळात तुमचं ग्रॅज्यूएशन आणि पोस्ट ग्रॅज्यूएशन पण करायचं असतं. मग अगोदर शिक्षणच हा अट्टाहास का? लग्नानंतर ८ तासाची (आणि दोन तास प्रवासाची) नोकरी करता येत असेल, तर शिक्षण करता का येत नाही? आजकालचे आधुनिक बाप मुलिंचं ब्रेनवॉश करतात, म्हणून मुली आपल्या तारुण्याच्या पिकला वैवाहीक सुखं घेण्याची इच्छा असलेल्या मुली नंतर १२-ते १८ वर्षे ताटकळत बसू शकतात.

तुमच्यामध्ये पण व्हिडीओमध्ये जाऊन व्हायरल होण्याची क्षमता आहे.

arunjoshi123's picture

24 Jul 2017 - 5:54 pm | arunjoshi123

तुमच्यासारख्या बॅक्टेरियांसाठीच तर आमच्यासारखे व्हायरस असतात.

हा हा हा. बॅक्टेरीया नाही हो. मीच व्हायरस आहे असे एकेकाळी माझ्यावर भडकलेले एक मिपाकरकाका म्हणाले होते. ;)

कोंबडी प्रेमी's picture

24 Jul 2017 - 6:16 pm | कोंबडी प्रेमी

वाटलं ....

अपर्णा तैंचा हा डू आयडी असावा अशी शंका येते

हघ्या

समजा ड्यू आय डी आहे. पण आपणच म्हणालात नि कि यावर सर्व अंगानी चर्चा व्हावी.
=================================================
ऑन ए लायटर नोट - ताईंनी भावांसाठी एवढं करावं आणि भावांनी त्यांना असं वार्‍यावर सोडावं हे पटतं का? तुमी बी ना.

३-४ लग्न जुळवण्याचा बैठकीत जाण्याचा योग आला. त्यात एक लेटेस्ट ट्रेंड पाहिला मिळाला आणि चर्चिला सुद्धा गेला. .

मुलीचे शिक्षण एफ वाय; एस वाय (कला, वाणिज्य,शास्त्र, अभियांत्रिकी, इतर). साधारणता वय १९-२० वर्ष. मुलीचे वडील लग्नाबाबत एक अट टाकताना दिसत होते. मुलीचे राहिलेले शिक्षण मुलाकडच्यांनी पूर्ण करायचं आणि तिला नोकरी करून द्यायची.

वधुपित्याच्या बाजूने ह्याचे फायदे असे चर्चिले गेले: (माझी सगळ्याच गोष्टींना सहमती नाही आहे)
१) मुलीचे संपूर्ण शिक्षण आणि तिचे लग्न करण्याचा दुहेरी खर्च कमी होतो.
२) आताच्या सामाजिक परस्थिती मध्ये वयात आलेली मुलगी सांभाळणे, तिच्यावर देखरेख ठेवणे जिकिरीचे असल्यामुळे लग्न करून जवाबदारी नवरामुलांच्याकडे देणे
३) योग्य वयात लग्न लागते
४) लग्न झाल्या झाल्या कौटुंबिक जवाबदाऱ्या लगेच पडत नाहीत.
५) शिक्षणाचे कारण पुढे असल्यामुळे मातृत्वाची घाई सासरचे करत नाहीत.

वधुपित्याचं बर्‍यापैकी पटलं.
======================================

शिक्षणाचा आणि लग्नाचा काय संबंध?

यातनं शिक्षण आधीच झालं पाहिजे असं लॉजिक लावायचा संबंध काय असं म्हणायचं होतं. शब्द चूकिचे निवडले वाटतं.

सतिश गावडे's picture

25 Jul 2017 - 9:54 am | सतिश गावडे

नोकरी करता येत असेल, तर शिक्षण करता का येत नाही?

कारण नोकरी करणारी स्त्री पैसे घरी आणते तर लग्नानंतर स्त्रीने शिकायचे ठरवले तर तिच्या शिक्षणाचा खर्च काही सन्माननीय अपवाद सोडले तर सासरचे लोक नक्कीच करणार नाहीत.

मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम
मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा”
मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ?

मुलगी सुंदर हवी का कुरुप, चांगल्या परिस्थितीची का वाईट, कमवती का नाही याबद्दल त्या काही कोणाला रिकमेंड करत नाहीत. मुलांना तसंही उद्देशून त्यांचं बहुतांश बोलणं नसतं. सुनेच्या आईवडिलांना चांगलीच ट्रिटमेंट द्या असे त्या म्हणतात. समाजात मिळत नसेल तर त्यात त्यांचा काय दोष? पुरुषांचं प्रबोधन करायला अनंत स्त्रीवादी आहेत, रिकामटेकडे आहेत, सरकार आहे. त्या युनिक यासाठी आहेत कि त्या स्त्रीयांचं प्रबोधन करतात. पुरुषांनी विषम वागावं असं म्हणत नाहीत. त्यांनी देखिल फक्त पुरुषांना झोडणारांना काही टक्के सामिल झालं पाहिजे आहे विचित्र आग्रह आहे. त्या म्हणतात कि पुरुषांच्या बाजूने त्यांच्यावर स्त्रीयांकडून होणार्‍या अन्यायाविरुद्ध लढणे हा माझा पेशा आहे.

कोंबडी प्रेमी's picture

24 Jul 2017 - 6:21 pm | कोंबडी प्रेमी

अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात.

हि पोस्त अपर्णाताई ह्यांची नाही पण सिमिलर मुद्दे होते

...पुढे ....

मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे)

१. तुम्हाला एक फंडामेंटली रॅडिकल कुटूंबव्यवस्था सुचवायची आहे का? मंजे काय, कि मुलगी मुलाच्या घरी जाते, आणि ते घर आणि तिथली सगळी व्यवस्था तिथल्या अगोदरपासून असलेल्या लोकांच्या मालकिची असते. आता इथे तिथे रेसीडेंट नसलेल्या सुनेच्या आईबापांना देखिल निर्णयन अधिकार दिले, आणि ते इतरांच्या पसंदीच्या विरुद्ध निघाले तर काय मेकॅनिझम?
२. ती मुलगी सासरी जाण्यासच प्रचंड अल्टनेटिव्ज आपण बनवू शकतो. म्हणजे खूप तितक्या समाज व्यवस्था बनवू शकतो. तुम्हाला "ह्यूमॅनिटि पुढे चालू ठेऊ देणे" याबद्दल आपणांस आस्था आहे असे समजून (वा अदरवाईज) नक्की कशी समाजव्यवस्था सुचवायची आहे? न्यूक्लिअर फॅमिली पैकी एक. लिव इन दुसरं. पण असेट ओनरशिप अजून पॅट्रीयार्किकल आहे, म्हणून वावर मुलाच्या बाजूचाच जास्त असू शकतो.

समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..

आपण समाज म्हणून अत्यंत परिपक्व होतो, आता हळूहळू आपण परिपक्वता म्हणून अपरिपक्वता स्वीकारत आहोत. हे स्वतःस आधुनिक आणि पुरोगामी समजणार्‍या लोकांच्या बाबतीत होत आहे.
समाजात कौटुंबिक अन्याय आणि कौटुंबिक कलह यांचा एक समतोल असावा. कौटुंबिक अन्यायाला फुगवून फुगवून सांगून आपण फार मोठा बागलबूवा निर्माण केला आहे. याला नियंत्रित ठेवण्यासाठी आपण समाजव्यवस्थेचे नियम इतके जास्त बदलले कि सार्वत्रिक कौटुंबिक कलहाचा अजून मोठा राक्षस उभा राहिला आहे. आपण या सुधारांतून कमावलं जास्त का गमावलं जास्त याची प्रामाणिक चिकित्सा करावी.
अपर्णाताईंची भाषणं अभ्यासू, तार्किक, चिंतक, विदाधारी, शास्त्रीय इ इ नसली तरी भावनिक, अनुभवातून आलेली, सधेतूप्रेरित, आणि कदाचित मानसशास्त्रीयरित्या उपयुक्त असू शकतात. आणि "भाषण" म्हणून त्यांचा दर्जा आहेच आहे, इंटेरेस्टींग आहे.
तुम्ही या सगळ्यापलिकडचे असाल तर भरपूर टीपी आहे.

पिलीयन रायडर's picture

24 Jul 2017 - 6:25 pm | पिलीयन रायडर

बरीच चर्चा झाली की! म्हणजे अरुण जोशींचा मोनोलॉग वगळला तरीही बरीच चर्चा शिल्लक राहतेय वाचायला.

अच्छा है!

अरुण जोशींचा मोनोलॉग वगळला

अशी फ्रेज वापरण्याचा बदला लवकरच पिरांशी डायलॉग करून घेण्यात येईल. हा हा हा.

सतिश गावडे's picture

25 Jul 2017 - 10:11 am | सतिश गावडे

मोनोलॉगच असू द्या. कारण तसेही पुरुषांचा मोनोलॉग असे काही नाही सध्या.

पिलीयन रायडर's picture

24 Jul 2017 - 7:52 pm | पिलीयन रायडर

बादवे,

"भाकरी बडवण्याबद्दलचे" ते सुप्रसिद्ध विधान इथुन पहा - https://youtu.be/_k51WrMVYps?t=1263

त्या चक्क असं म्हणताएत की "अंतराळात जा वा पाताळात, मुलींना स्वयंपाक आलाच पाहिजे. आजकाल शिकलेल्या मुलींना स्वयंपाक येत नाही. मी तर मुलांना सांगतेय, शिकलेली मुलगी घरात आणायची असेल तर पार्सल आणायची तयारी ठेव नाही तर स्वयंपाक शिकुन घे, पर्याय नाही. आज काल पुण्यात स्वयंपाक करतच नाहीत. मी एका ठिकाणी श्राद्धाला गेले होते तर तिथे केटररकडुन स्वयंपाक येणार होता. ह्यांचे पितर केटररच्या हातचं खाऊन मुक्त होणारेत. सुनांना वेळ नाही. आता मी हे भाषण संपवुन घरी गेले आणि हे म्हणाले की जरा काही तरी करुन दे तर पदर खोचुन उभं रहावंच लागतं. असं नाही म्हणतात येत की साप्ताहिक जनहिंदोळा मध्ये उद्या फोटो येणारे. आता भाकरी बिकरी काही करणार नाही. चालत नाही. नवर्‍यासमोर वकिली चालत नाही. हे पक्कं लक्षात ठेवा. काहीच चालत नाही नवर्‍या समोर."

आणि हे बोलताना शिकलेल्या मुली, पुणे आणि केटरर ह्यांच्याबद्दल बोलताना जो टोन आहे ना, माशाल्ला!!

खरोखर लोकांना "भाकरी बडवणे" म्हणजे कुटूम्बातला आपला सहभाग विसरु नको वगैरे सल्ले त्या देत आहेत असे वाटतेय?!! =))

त्या ठोक म्हणत आहेत "नवर्‍या समोर चालत नाही" आणि तुम्ही लोक गर्भितार्थ काढताय!

सामान्य वाचक's picture

24 Jul 2017 - 8:07 pm | सामान्य वाचक

सुपुत्र रामतीर्थकर काय करतात
विवाहित आहेत का
किंवा कसे
का धसक्यानी त्यांनी लग्न केले नाही वगैरे

नगरीनिरंजन's picture

24 Jul 2017 - 8:10 pm | नगरीनिरंजन

मला एक कळत नाही की जर पार्सलच आणायचं असेल किंवा स्वत: स्वयंपाक करायचा असेल आणि शिवाय मुलीपेक्षा जास्त कमाई करायचंही बंधन असेल तर मुलांना लग्नाचा फायदा नक्की काय? फक्त शरीरसुखासाठी? तेही हक्काचं नाही.
स्त्रिया पुरुषांना जे स्थैर्य आणि कम्फर्ट देऊ शकतात त्यासाठी पुरुष लग्न करतात. लग्न करायचं असतं म्हणून नाही.

पिलीयन रायडर's picture

24 Jul 2017 - 8:13 pm | पिलीयन रायडर

ओके. आणि त्याबदल्यात स्त्रियांना ते काय देतात? किंवा स्त्रिया काय मिळवायला लग्न करतात? (जस्ट उत्सुकता!)

नगरीनिरंजन's picture

24 Jul 2017 - 8:18 pm | नगरीनिरंजन

काही देत नसतील तर स्त्रिया का करतात लग्न? एवढंच जर असेल तर अविवाहित स्त्रियांची संख्या वाढायला हवी होती. उलट चांगला मुलगा पाहून लग्न करणे हेच जीवनध्येय असल्यासारख्या बहुसंख्य मुली वागतात.

पिलीयन रायडर's picture

24 Jul 2017 - 8:37 pm | पिलीयन रायडर

मी कुठे म्हणलं की काहीच देत नाहीत? मी तर तुम्हालाच विचारतेय की कशासाठी स्त्रिया लग्न करत असतील?
म्हणजे स्थैर्य आणि कम्फर्ट तर स्त्रीयाच देताएत, पैसा आता स्त्रियाही कमावतात, शरीरसुखासाठी लग्न करायची गरज कुणालाच नसते. म्हणजे फक्त मुल का? तर एका मुलापायी जन्मभर पुरुषाला स्थर्य द्यायचे? काय गरज? स्पर्म बँकेतुन स्पर्म घेऊन मुल पैदा करता येईलच.

मी सिन्सिअरली विचारतेय. स्त्रियांना पुरुषांकडुन काय मिळतं?

उलट चांगला मुलगा पाहून लग्न करणे हेच जीवनध्येय असल्यासारख्या बहुसंख्य मुली वागतात.

सोशल कंडिशनिंग. लग्न आणि मुल इतिकर्तव्यता असते असे मानणे, समाजाने कानीकपाळी ओरडुन सांगणे, त्यापायी पालकांनीच तसे प्रेशर आणणे, १४ व्या वर्षीच लग्न लावणे, शिक्षण थांबवुन लग्न करणे. इ इ....

सामान्य वाचक's picture

24 Jul 2017 - 9:38 pm | सामान्य वाचक

भाकऱ्या थापायचे बघा जरा. अमिरिकेत गेलात म्हणून काय झाले, संस्कृतीची काही चाड आहे कि नाही

arunjoshi123's picture

25 Jul 2017 - 12:32 am | arunjoshi123

अमिरिकेत गेलात म्हणून

हे काय असतं? अमेरिकेत गेलं म्हणून मेंदूतले न्यूरॉन्स वाढतात कि काय? संस्कृतीची चाड वा अक्कल येते? फार तर फार तिथे जाऊन भारताबद्दल गंड उत्पन्न होतो असं मॅक्सिमम केसेसमधे होतं.

माझे म्हणणे होते कि, अमेरिकेत गेलात तर आपली संस्कृती विसरू नका. भाकऱ्या बडवणे विसरू नका.

विशुमित's picture

25 Jul 2017 - 10:37 am | विशुमित

तुम्ही नेहमीप्रमाणे कात्रजच्या घाटात बैल सोडले.
==> हाहा पु वा

परत यायचं असलं तर विसरू नका. यायचं नसलं शक्य तितक्या लवकर विसरा.
===========================================================

रेवती's picture

25 Jul 2017 - 12:53 am | रेवती

हा प्रतिसाद समजला नाही. तुम्हीच नव्हे पण हा प्रतिसाद कोणाकडूनही आला तरी
भाकरी थापायची की नाही हे जी ती व्यक्ती ठरवते. घराबाहेरील कोणीही सांगितल्यास का ऐकावे?
अमेरिकेत जाण्याचे विशेष काय होते?
हां, भाकरीचे चांगले पीठ मिळत नाही. भारतात ते चांगले मिळते पण भारतातल्या मुलींनाच तर अपर्णाबाई सांगतायत की भाकरी गोल थापायला आली पाहिजे.
संस्कृतीची चाड म्हणजे काय? ती असणे म्हणजे काय?
माझा बेसिकातच घोळ आहे असे दिसते.

सा.वा.नी तो प्रतिसाद बहुतेक उपरोधाने लिहिलाय.

अरेच्च्या! मला खरच समजले नव्हते.
चला आता मी तुम्हाला भाकरी व भरल्या वांग्याची भाजी पार्सलाने पाठवते. ;)

रुपी's picture

25 Jul 2017 - 3:36 am | रुपी

मस्तच :)
आत्ता पाठवल्या तर छानच, पण मी चंद्रावर गेल्यावर मात्र माझ्या घरच्यांसाठी नक्की पाठवा ;)

अरे, पाठवू की! पौर्णिमेच्या चंद्रासारख्या गोल भाकरी. ;)

कोंबडी प्रेमी's picture

25 Jul 2017 - 9:38 am | कोंबडी प्रेमी

भाकरी पौर्णिमेच्या चंद्रा सारखी
ह्यात बरेच फाटे फोडता येतील/जाऊ शकतील/जातील (मग आम्ही च फाटे का फोडू नयेत :-D)

-हि पौर्णिमा कोण आणि चंद्रा तिची कोण सून मुलगी कि अजून कुणी ?
-अष्टमीच्या चंद्रा सारखी भाकरी का नाही ?
-अमेरिकेत चंद्र दिसतो का ? का नुसतेच ढग असतात ...
-भाकरी त्रिकोणी असते का? आणि तशी ती केली तर संस्कृती जतन होईल कि नष्ट ??

सामान्य वाचक's picture

25 Jul 2017 - 9:19 am | सामान्य वाचक

आता खरंच पार्सल पाठव

स्पर्म बँकेतुन स्पर्म घेऊन मुल पैदा करता येईलच.

जाज्वल्य स्त्रीवादाचा हा देखिल घोर अपमान आहे. स्टेम सेल रिसर्च आता कोणत्याही पेशी पासून कोणतीही पेशी बनवायच्या फार जवळ आहे. तेव्हा स्पर्म बँक इ इ घोर पुरुषप्रधानतावादी कंसेप्ट कशाला हवेत?

arunjoshi123's picture

25 Jul 2017 - 12:41 am | arunjoshi123

तर एका मुलापायी जन्मभर पुरुषाला स्थर्य द्यायचे?

बरोबर आहे. ही वीर्य फॉर स्थैर्य डिल एकदम अनफेअर आहे. सिंगल माता हिच खरी माता. किंबहुना, मुलांना जन्म देऊन ही मानवजात पुढे चालू ठेवायचीच कशाला हाच मूलभूत प्रश्न आहे.

शब्दबम्बाळ's picture

25 Jul 2017 - 11:06 pm | शब्दबम्बाळ

भारी डायलॉग! वीर्य फॉर स्थैर्य! :P
भारी चाललीये चर्चा... लय कंफ्यूस व्हायला होतंय आत पण...
च्यामारी मी लग्न का केलं हा प्रश्न इतका अवघड असेल वाटलं नव्हतं!
बायकोला विचारला तर मला ताप बीप आलाय का बघेल! :D

लग्न करण्याला ते मुलगी/मुलगा एकमेकांना आवडणे वगैरे बंद झालं का सध्या?
आता आवडणे म्हणजे नक्की काय हे पण लय अवघडे राव! ते डोपामाईन वगैरे बाद झालं ना यातून...
मग नक्की काय, आवडणे = डोपामाईन + संपत्ती + जबाबदारपणा + कुटुंब + शिक्षण..... इ.इ. असे काही असेल का??

नगरीनिरंजन's picture

25 Jul 2017 - 8:08 am | नगरीनिरंजन

मी स्त्री नसल्याने स्त्रियांना लग्नातून काय मिळतं ते मी सांगू शकत नाही. ते खरं तर तुम्ही सांगायला हवं.

बाकी स्त्रियाही पैसे कमवतात, पुरुषांची गरज काय इत्यादी मुद्दे गैरलागू आहेत. पुरुषांनी निर्माण केलेल्या इंडस्ट्रीयल इकॉनॉमीला गृहीत धरुन अशी विधाने करणे सध्या खूप सोपे असल्याने त्याचा प्रतिवाद करण्यात हशील नाही.

सुबोध खरे's picture

25 Jul 2017 - 10:01 am | सुबोध खरे

बहुतांश स्त्रिया चरितार्थासाठी लग्न करतात-- र धों कर्वे

एमी's picture

26 Jul 2017 - 3:46 am | एमी

खिक् :D

भाकर्या बडवणे या cheap labour मधूनदेखील उच्च/मध्यमवर्गीय आयुष्य मिळवण्याचा समाजमान्य मार्ग याखेरीज इतर कोणताच नसेल :P

लग्नं फक्त खालच्या सामाजिक स्तरातून वरच्या सामाजिक स्तरात होतात ही नविन माहीती मिळाली.

"अंतराळात जा वा पाताळात, मुलींना स्वयंपाक आलाच पाहिजे. आजकाल शिकलेल्या मुलींना स्वयंपाक येत नाही. मी तर मुलांना सांगतेय, शिकलेली मुलगी घरात आणायची असेल तर पार्सल आणायची तयारी ठेव नाही तर स्वयंपाक शिकुन घे, पर्याय नाही. आज काल पुण्यात स्वयंपाक करतच नाहीत. मी एका ठिकाणी श्राद्धाला गेले होते तर तिथे केटररकडुन स्वयंपाक येणार होता. ह्यांचे पितर केटररच्या हातचं खाऊन मुक्त होणारेत. सुनांना वेळ नाही. आता मी हे भाषण संपवुन घरी गेले आणि हे म्हणाले की जरा काही तरी करुन दे तर पदर खोचुन उभं रहावंच लागतं. असं नाही म्हणतात येत की साप्ताहिक जनहिंदोळा मध्ये उद्या फोटो येणारे. आता भाकरी बिकरी काही करणार नाही. चालत नाही. नवर्‍यासमोर वकिली चालत नाही. हे पक्कं लक्षात ठेवा. काहीच चालत नाही नवर्‍या समोर."

१) त्यांनी केलेली विधानं आणि "भाकर्‍या बडवणे" ही तुम्ही वापरलेली फ्रेज यात जमीनअस्मानाचा फरक आहे. त्या किमान स्वयंपाक आला पाहिजे म्हणत असतील तर त्यात वावगं काय आहे? त्याला भाकर्‍या बडवणे म्हणून ते फार काही खालच्या दर्जाचं काम असल्यासारखा उल्लेख करु नये. आमच्या घरात एकजात सगळे स्वयंपाक करतात (बाया-बाप्ये सगळे). अशा वेळी येणार्‍या मुलीला किमान वरण भात भाजी पोळी करता यावी अशी अपेक्षा असली तर त्यात चूक काय आहे असं मला वाटत नाही. येत नसेल तर किमान शिकायची तयारी तरी असावी. आम्ही संक्रांतीला गूळपोळ्या नेल्या की "ओह माय ग्गॉड कित्ती पेशन्स" अशा कमेंट ऐकल्या की त्या मुली आणि त्यांच्या माऊल्यांना दंडवत घालावासा वाटतो. तुम्ही शिक्षणाचं म्हणत असाल तर नऊ वर्षाचा असताना मी वरणभाताचा कूकर लावत होतो. ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपले जवळपास सगळे पारंपारिक पदार्थ (मला आणि माझ्या भावालाही) एकाहाती जमत होते.
ऑफिसचं कवतिक सांगायचं घरी नवरात्रात नवमीला आमच्याकडे पुरणपोळ्यांचा नैवेद्य असतो. कित्येकदा सकाळी साडेपाचला उठून पुरणपोळ्या करुन त्या हापिसात पण नेलेल्या आहेत.

२) काहीच चालत नाही नवर्‍या समोर. त्यांचं त्यांच्या नवर्‍यासमोर काही चालत नसेल तर आपण त्रागा करण्यात काय अर्थ आहे.

३) त्यांचं मुलींनी काय घालावं काय घालू नये याबद्दलचं विधान मला खटकलं होतं. पण मुली मुलांबद्दल विधानं करत असतील तर चालेल का? "ए तू आळस देऊ नकोस, हात वर केलेस की टीशर्ट वर सरकतं आणि पोट वैगरे दिसतं. त्यात तुम्ही लोक कधी लो वेस्ट जीन्स घालता" हे एका मुलीने मला तोंडावर सांगितलेलं आहे. आता हेच मी जर एखाद्या मुलीला सांगितलं तर केवढा गहजब होईल?

तात्पर्य: एकांगी विचार नको. आणि स्वयंपाकाचं म्हणाल तर आपल्या पोटाला लागतं ते करुन खाता येण्यात कमतरता वाटून घेण्यासारखं काही नाहीये. त्या बाई तशाही एरवीच धन्यवाद आहेत. पण भाकर्‍या बडवणं भाकर्‍या बडवणं केव्हापासून चाललंय म्हणून बोललो.

त्यांचं मुलींनी काय घालावं काय घालू नये याबद्दलचं विधान मला खटकलं होतं.

मुलींचे, बायकांचे कपडे ( मेकपचा आकर्षकपणा, स्किनचा ओपन सरफेस, प्रॉक्सिमिटि ऑफ ओपन सरफेसेस टू प्रायवेट ऑर सेक्श्यूअल पार्ट्स, टाईटनेस रिविलिंग प्रोफाईल) आणि पुरुषांत्यांच्याबद्दलचे प्रेमजनक आकर्षण, शारिरिक आकर्षण, सेक्स्यूअल अरावजल, नजर खुल्या भागांकडे खुलेपणे वा चोरून नेण्याची प्रवृत्ती, आणि (माझ्या स्वतःच्या मतांप्रमाणे इथून पुढे गुन्हेगारी अशा) उपभोगासाठी फसवेगिरि करण्याच्या प्रवृत्ती वा जबरदस्ती करण्याच्या प्रवृत्ती यांचा संबंधच नाही हा अत्यंतिक मूर्खपणाचा कांगावा आहे. द रिअ‍ॅक्शन इज इजडायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सपोजर. मोअर सो फॉर द पिपल हू हॅव फस्ट टाईम एक्सपोजर टू एक्सपोजर्स इन अ कंट्रि लाईक इंडिया.
नामिबियात आदिवास्यांत हा नियम लागू पडत नाही. इथे भारतात पडतो. तर ट्रांझिशन करायचं असेल तर सावकाश, दमानं, धीरानं, स्मॉल डोसेजमधे करा.
=================
कपड्यांच्या बाबतीत अत्यंत प्रतिगामी राहणं ही योग्य आहे आणि संपूर्ण नागडं राहणं ही योग्य आहे. त्यातल्या "कमी कंजर्वेटिव ते कमी लिबरल" अशा ट्रांझिशनमधून भारतीय समाज जात आहे. तेव्हा प्रतिक्रिया अकोमोडेटिव आणि सुधारितच येतील असं नाही, अयोग्य असल्या तरी. हे सामाजिक स्थित्यंतरण आहे कोणता इंद्रियनियमनाचा अध्यात्मिक प्रयोग नाही आपल्या अपेक्षा काहिच्या काही असायला.

अप्पा जोगळेकर's picture

26 Jul 2017 - 1:22 pm | अप्पा जोगळेकर

तर ट्रांझिशन करायचं असेल तर सावकाश, दमानं, धीरानं, स्मॉल डोसेजमधे करा.
जोशी सर तुम्ही या धाग्यावर खूप बोअर करताय.
ते 'रैना' सारखे लिहा काहीतरी पुन्हा. तुमच्या लिखाणाच्या क्षमता कशाला वाया घालवताय.

हा धागा पुढील प्रतिसादांसाठि बंद करण्यात यावा.

अत्रन्गि पाउस's picture

26 Jul 2017 - 2:21 pm | अत्रन्गि पाउस

फारच चिडलेले दिसताय

मी पाहतोय कि तुम्ही प्रत्येक प्रतिसादकर्त्याला उत्तर देताय आणि तुमच्या चिकाटीचे लोकांनी कौतुक सुद्धा केले आहे.
एका प्रतिसादात तुम्हाला नं पटणारे सत्य आले तर लगेच धागा बंद ? तुमचे मुद्दे संपले असतील तर तुम्ही थांबा कि

मी कशाला चिडू? अहो, हे अप्पा जोगळेकर इथले संपादक (का तसले काय तरी) आहेत असं माझं इंप्रेशन आहे. मी कोण टिकोजीराव धागा बंद का चालू ठेवावा ते सांगणारा? पण मागे काही प्रतिसादासाठी बंद धागे पाहिलेत. त्यांना बोर झालं म्हणून उपाय सांगितला.
================
मला एक सांगा चिडलेला माणूस सतत इतका वेळ चीडलेला राहू शकतो का?
===========================
शिवाय मी कोणत्याही कौतुकाची दखल घेतलेली नाही. प्रश्न माझ्या लैखनकौशल्याचा नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Jul 2017 - 2:40 pm | हतोळकरांचा प्रसाद

तर ट्रांझिशन करायचं असेल तर सावकाश, दमानं, धीरानं, स्मॉल डोसेजमधे करा.

या वाक्यासाठी - +१०००००.

मला नेमका हेच खटकतं कि प्रत्येक पुरोगामी सुधारणवाद्याला प्रत्येक सुधारणा हि दुसऱ्या दिवशीपासूनच झाली पाहिजे असे का वाटत असते कोण जाणे? खासकरून धर्म, संस्कृती, समाज याबाबतीतील सुधारणांच्या बाबतीत तर हा अट्टाहास टोकाला पोहोचल्याचे जाणवते. सद्यपरिस्थितीत समाजामध्ये एक जुन्या संकेतांनुसार घडलेली आणि आता सहजासहजी मते बदलू न शकणारी (आपली माणसे असणारी) पिढी आहे, दुसरी आपल्यासारखी मुद्दे समजून मग मते बनवणारी आणि सुधारणांसाठी स्वतःला तयार ठेवणारी पिढी आहे आणि तिसरी आपली पुढची पिढी आहे ज्याला आपल्याला घडवायचे आहे. ह्या सुधारणा आपल्या पुढच्या पुढील लागू करताना आपल्याला अडचण येईल असे वाटते काय? पण आपल्या आधीच्या पिढीचीही जीवन जगण्याची काही पद्धत आहे आणि आपण त्यांचा त्यांच्या पद्धतीने जगण्याचा हक्क त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात हिरावून घेतो आहोत याचा विचार करून सध्याची दुसरी पिढी आधीची पिढी होईपर्यंत तरी जरा सबूरीनेच घ्यायला हवे असे वाटते.

अत्रन्गि पाउस's picture

26 Jul 2017 - 3:09 pm | अत्रन्गि पाउस

ह्यातील राज कपूर चा हतबल बाप आठवला ....

वा बुवा सुंदर प्रतिसाद

तर ट्रांझिशन करायचं असेल तर सावकाश, दमानं, धीरानं, स्मॉल डोसेजमधे करा.

माझ्या मते कोणतेही सामाजिक बदल जाणूनबुजून + स्टेप-बाय-स्टेप करता येत नाहीत (असल्यास याची उदाहरणे द्यावीत). दोन टाईपचे लोक असतात. एक टाईप - जे नेहमी समाजाचे अनुकरण करतात. दुसरा टाइप - जे स्वत:ला जे चांगलं वाटेल ते करतात - इतर लोकांचा विचार न करता. सामाजिक बदल हे फक्त दुसऱ्या कॅटेगरीतल्या लोकांमुळेच शक्य होतात.

समजा एका गावात पुरुशांनी टी-शर्ट घालून हिंडण्याची पद्धत नाही. सगळे फुल शर्ट घालून फिरतात.

अशा वेळी एक कोणीतरी माणूस ठरवतो - की आज बनियन घालून बाहेर हिंडायचं. लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने बघतात. काही काळाने अजून काही लोक गरमीमुळे कंटाळून बनियनवर फिरू लागतात.

अशा वेळी - असे म्हणून चालत नाही - की त्या माणसाने आधी टी - शर्ट पासून सुरवात करायला हवी होती. मुळात त्या माणसाने बनियन घालायचा निर्णय फक्त स्वत:चा विचार करून घेतलाय.
आणि सामाजिक बदलांची सुरवात स्वत:पासूनच होते.

आणि नंतर टी-शर्ट विरुद्ध बनियन असे दोन समाजगट शेकडो वर्षे भांडत राहतात. त्यांच्या अस्मिता बनतात. त्यांच्या सुसंवादाची संभावनाच शून्य होते. मग दोन पैकी काय चांगलं किंवा दोघांचं कोणतं काँबिनेशन चांगलं इ इ ठरवायचा फोरमच शिल्लक राहत नाही.
समाजाचा जो संमती द्यायचा मंच आहे, सिस्टिम आहे त्याला टाळून किंवा त्याच्याशी घर्षण करून जाण्यात बर्‍याच सुधारकांना एक प्रकारची मस्ती येते, विकृत आनंद येतो किंवा इगो आडवा येतो. या व्यक्तिगत घमेंडीचा आणि सुधारणेचा काही संबंध नसतो. हे लोक स्वतः सुधारक असले तरी सध्या अस्तित्वात असलेली व्यवस्था मुद्दाम म्हणून लोकांवर अन्याय करते आणि लोक तो मूर्खासारखा मान्य करतात अशी धारणा बाळगून असतात. व्यवस्थेशी भांडण करणे हा एकमेव पर्याय असतो अशी बुद्धि सुधारकांमधे का असते ईश्वर जाणो.
वारकरी संप्रदायात सर्व जातीचे लोक असणे हे एक हळूहळू दिलेल्या डोसाचे उदाहरण म्हणून मी सांगेन (किती बरोबर आहे याची खात्री नाही.)
कोण्या सुधारकाने धमाक्याने सुधारणा केली आणि त्या कलहाची बीजे आज नाहीत याची उदाहरणे आपण देऊ शकता का?

समाजाचा जो संमती द्यायचा मंच आहे, सिस्टिम आहे त्याला टाळून किंवा त्याच्याशी घर्षण करून जाण्यात बर्‍याच सुधारकांना एक प्रकारची मस्ती येते, विकृत आनंद येतो किंवा इगो आडवा येतो

शक्य आहे. पण सुधारक (किंवा पहिल्यांदा बदलाची सुरवात करणारे लोक) यांनी समाजाला समजावून सांगायलाच पाहिजे असे कुठे आहे? ते म्हणतात - समाज गेला खड्यात!

वारकरी संप्रदायात सर्व जातीचे लोक असणे हे एक हळूहळू दिलेल्या डोसाचे उदाहरण म्हणून मी सांगेन (किती बरोबर आहे याची खात्री नाही.)

या बाबतीत माहिती नाही, अजून वाचायला आवडेल.

कोण्या सुधारकाने धमाक्याने सुधारणा केली आणि त्या कलहाची बीजे आज नाहीत याची उदाहरणे आपण देऊ शकता का?

नाही. किंबहुना अशा फार कमी गोष्टी असतील ज्यात समाजातल्या सगळ्या लोकांचे एकमत असेल.

त्या बाई तशाही एरवीच धन्यवाद आहेत.

अभ्याचा प्रतिसाद वाचल्यानंतर हे वाक्य काढून टाकावं ही सा सं ला विनंती त्या खरोखरीच एवढी चांगली कामं करत असतील, तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं ठीक.

पिलीयन रायडर's picture

26 Jul 2017 - 6:11 pm | पिलीयन रायडर

केवळ तू प्रतिसाद दिलास म्हणुन उत्तर.

तू विपर्यास करुन घेतलास हे पाहुन आश्चर्य जास्त वाटलं. एक तर तू व्हिडीओ पाहिला आहेस का हा प्रश्न पडलाय. बहुदा नाही पाहिलास. त्यामुळे त्या "सगळ्यांना स्वयंपाक आलाच पाहिजे" असं म्हणत नाहीयेत हे तुझ्या लक्षात आलेलं नाही. मी काय लिहीलंय ते सोडा, शहाण्या माणसाने त्यांचे व्हिडीओ पाहिले तर त्याला हे उपदेश "सर्वांना" नाहीत हे पहिल्या २-४ मिनिटात कळेल.

दुसरं असं की मला स्वयंपाक येतो, ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ५ वर्षाच्या मुलाला स्वयंपाकघरातला लहान कामांमध्ये सोबत घेतलंय आणि नवरा - वडिल - भाऊ - मेव्हणा इ पुरुष सुद्धा घरात बरोबरीने स्वयंपाक करतात. (दोन्ही आजोबा सुद्धा पुरणपोळ्या करायचे. ) तेव्हा स्वयंपाकाला कमी लेखणे किंवा पुरुषांच्या स्वयंपाकाचे कौतुक असणे, ह्या दोन्ही गोष्टींची मला गरज नाही. बळंच नसते अर्थ काढु नये. प्रश्न केवळ आणि केवळ "बायकांनीच" स्वयंपाक केला पाहिजे ह्या वृत्तीचा आहे.

आता महत्वाचं, हे काही त्यांच्या एकट्याच्या नवर्‍या बद्दल नाही चालु. "नवर्‍या समोर काहीच चालत न स तं. हे पक्कं लक्षात ठेवा" हा जाहिर सल्ला आहे माऊलींचा. म्हणूनच म्हणते, आधी व्हिडीओ पहा. मग बोला.

कपड्याविषयी म्हणशील तर कुणीच कुणाला हे सांगु नये. सोप्पंय.

तात्पर्य - व्हिडिओ पहावे आणि मग मत व्यक्त करावे.

अवांतर - बाई धन्यवाद आहेत ह्याशी सहमत. त्यांचे गहिवर मला नाटकी वाटतात. ४५८ रोज भाषणं देणार्‍याला रोज गहिवरुन येत नसतं किंवा तो ते आयुष्यात पहिल्यांदा बोलत नसतो की त्याला भरुन यावं. ज्यांना ते बघुन उमाळे येत आहेत, ते नक्की कशामुळे येत आहेत ते ज्याचं त्यानी तपासुन घ्यावं.

प्रश्न केवळ आणि केवळ "बायकांनीच" स्वयंपाक केला पाहिजे ह्या वृत्तीचा आहे.

हे असं त्यांचं म्हणणं असेल तर वरचा अख्खा प्रतिसाद बाद आहे. आपल्याला जे काही लागतं खायला ते त्या त्या व्यक्तीला बनवता यायला हवं. ना पुरषांनी सगळं करायचा पत्कर घेतलाय ना बायकांनी.

अभ्या..'s picture

26 Jul 2017 - 6:44 pm | अभ्या..

बाद बिद कै नै रे सुडक्या. आम्ही स्वतः शिव्या खाल्लेल्या आहेत त्यांच्या.
मुलांचा ग्रुप होता. सकाळी लवकर कार्यक्रम अस्ल्याने त्यांनी विचारले नाष्ता कुणीकुणी केलाय. बरेच जण नकार दिले. एकाने घरी बनवला नाही असे उत्तर दिले. सगळ्यांची सामूहिक हजामत झालेली.
लाजा वाटत नाहीत का? तुमची आंघोळ करुन भांग पाडून डिओ मारण्याच्या वेळात आई आक्खा स्वयंपाक करते, तिनेच सर्व रोजच्या रोज करायचा पत्कर घेतलेला नाही, तिच्यासारखी चव जमत नसेल तर मदत करा, भाज्या चिरुन द्या, भांडी घासा, झाडून काढा, आठवड्यातला एखादा दिवस स्वतः सर्व घरासाठी सिंपल नाष्टा तयार करा. नुसती अमेरिकेची स्टाईल कपड्यात बोलण्यात करण्यापेक्षा कामात अमेरिकनांचे अनुकरण करा, स्वावलंबी व्हा, खाल्ली ताटे धुवुन ठेवणे, उचलणे, कपडे धुणे हे व्यवस्थित आणि सर्वांनी केलेच पाहिजे हे उपदेश आम्ही स्वतः ऐकलेले आहेत. स्वयंपाक, घरातील लहानसहान कामे आलीच पाहिजे मग कॉलेजचा मुलगा असो की मुलगी ह्यावर त्या ठाम असतात हे निश्चित.

इथे बर्‍याच बायका बाईंच्या जेन्यूइननेसवरच शंका घेत आहेत. तुझा प्रत्यक्ष अनुभव त्यांचे बायस, अर्थाचा अनर्थ करायच्या पद्धती आणि एक वाट चुकलेला स्त्रीवादी आकस इ इ ना उघडा पाडतो.
बेसिकली परंपरावादी लोक जेव्हा काही म्हणायला जातात तेव्हा पुरोगाम्यांची इंद्रिये काम करणं बंद करतात असं म्हणावं लागेल.

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Jul 2017 - 10:25 pm | हतोळकरांचा प्रसाद

अभ्याराव, सोडाहो! तुमचे अनुभव खरे कशावरून? तुमचे हे त्यांच्याबद्दलची उमाळे खोटेही असू शकतात! ;)

मी वर एका प्रतिसादात म्हटले होते की त्यांचे गहिवरनेही काहींना खोटे वाटू शकते आणि त्याला नाईलाज आहे, सिद्ध झाले.

arunjoshi123's picture

26 Jul 2017 - 6:58 pm | arunjoshi123

प्रश्न केवळ आणि केवळ "बायकांनीच" स्वयंपाक केला पाहिजे ह्या वृत्तीचा आहे.

या वाक्यात व्याकरणाच्या जबरदस्त चूका आहेत.
१. ते "स्वयंपाक केला पाहिजे" असं नाही - "आला पाहिजे" असं आहे.
२. "केवळ आणि केवळ बायकांनीच" असं देखिल बाई अजिबात म्हणालेल्या नाहीत. त्या "सर्व बायकांना" वा "प्रत्येक स्त्रीला" असं म्हणालेल्या आहेत.

म्हणून ते सुधारित विधान सर्व स्त्रीयांना स्वयंपाक आलाच पाहिजे असं आहे.
मग -
१. काही पुरुषांना आला तरी चालेल.
२. काही पुरुषांनी केला तरी चालेल.
असा अर्थ निघतो.
====================
बाईंनी स्वयंपाकात मदत करणार्‍या नवर्‍यांचं कौतुक केलं आहे. पण अशी अपेक्षा प्रत्येकाकडून ठेऊ नका असं म्हटलं आहे.
====================
काही काही व्यक्तिंची अभिव्यक्त होण्याची इडिओसिंक्रसी असते.

बाईंनी स्वयंपाकात मदत करणार्‍या नवर्‍यांचं कौतुक केलं आहे. पण अशी अपेक्षा प्रत्येकाकडून ठेऊ नका असं म्हटलं आहे.

लोल, मग प्रत्येक बायकोने स्वयंपाक केलाच पाहिजे हा आग्रह का? अपेक्षा नसतीलच ठेवायच्या तर दोघांनिही नका ठेवू ना..

पिराताई,

मी सिन्सिअरली विचारतेय. स्त्रियांना पुरुषांकडुन काय मिळतं?

मला खरंच माहीत नाही. पण स्त्रियांच्या अपत्यांना एक बाप नक्कीच मिळतो. किंवा मिळावा अशी अपेक्षा तरी असते.

आ.न.,
-गा.पै.

स्त्रियांच्या अपत्यांना एक बाप नक्कीच मिळतो.

पण पुरुषांच्या सर्व अपत्यांना तो मिळतो का (बाप) ?

गामा पैलवान's picture

25 Jul 2017 - 5:17 pm | गामा पैलवान

स्नेहांकिता,

तुमचा प्रश्न योग्य आहे. मात्र पिराताईंनी विचारलेला प्रश्न स्त्रियांना काय मिळतं हा होता. त्यामुळे माझं उत्तर स्त्रीपुरुषांच्या अपत्यांना बाप मिळतो असं असलं तरी पिराताईंचा संदर्भ ठळक करण्यासाठी केवळ स्त्रियांचा उल्लेख केला आहे.

आ.न.,
-गा.पै.

सस्नेह's picture

25 Jul 2017 - 5:26 pm | सस्नेह

आले लक्षात !

मोदक's picture

25 Jul 2017 - 5:50 pm | मोदक

फाऊल.. फाऊल..

सस्नेह's picture

26 Jul 2017 - 1:09 pm | सस्नेह

तुझं काय गेलं रे ?
अग्नितैलपुरवठा कमी पडला काय ? विघ्नसंतोषी मेला !

तुम्ही खूपच लवकर मुद्दा मान्य केलात... तोही फार वाद न घालता..

म्हणून मी फाऊलचा लाल झेंडा फडकवला.

अजोंच्या मुद्दा लढवण्याच्या आणि पिराताईंच्या संयत आणि मुद्देसूद प्रतिसाद करण्याच्या कौशल्याला सलाम.
बाकी, बाई मुलगी बाहेर कितीही यशस्वी करियर करत असेल तरीही घरकाम, देवधर्म साग्रसंगीत केलंच पाहिजे असे जे आग्रहाने सांगतात ते ऐकणार्‍या(त्यांचेच असे नव्हे अश्या प्रकारे 'संस्कार' करणार्‍या कोणाचेही) मुली सुपरवूमन बनण्याच्या नादात प्रकृतीची वाट लावून घेतात असे वाटते.
बाईंचे म्हणणे पटत आजिबात नाही आणि नवरा बायकोने एकमेकाशी, त्यांच्या कुटुंबांशी कसे वागायचे हे ठरवण्यात समाजाचा घंटा स्टेक नाही असे वाटते, ते त्यांनीच आपापसात सुसंवादातून ठरवावे असे माझे मत आहे. बाईंचं भाषण ऐकूण लोक लगेच बायकांना घरकामाला जुंपतील असे नाही. तेव्हा त्यांना पुरुषांच्या बाजूने लढा द्यायचा आहे तर देऊ द्या, ज्यांना त्यांचे पटत नाही त्यांनी विरोधी बाजू लढवावी. विनोदबुद्धी मात्र भारी आहे बाईंना.

विशुमित's picture

25 Jul 2017 - 10:55 am | विशुमित

""""नवरा बायकोने एकमेकाशी, त्यांच्या कुटुंबांशी कसे वागायचे हे ठरवण्यात समाजाचा घंटा स्टेक नाही असे वाटते, ते त्यांनीच आपापसात सुसंवादातून ठरवावे असे माझे मत आहे."""

==>> विशेष आवडलं.
घरामधील वाद वाढायला त्रयस्थ लोकांचा जास्त हात असतो असे माझे मत आहे.

माझेच उदा घायचे तर :
मी जन्मापासून माळकरी माणूस. माझी बायको लग्नाआधी एक सोमवार सोडला तर एकादशीलासुद्धा मांसाहार करणारी, पण लग्नानंतर बाहेरच्या लोकांनीच तिच्यावर माळ घालण्यासाठी दबाव आणला. मग आमच्या घरचे पण हुरळले. हा प्रश्न आम्ही दोघांनीच चर्चेने सोडवला.
म्हातारी करत होती कुरकुर काही दिवस.बायकोच्या ऐकण्यात गेला वगैरे. मी तिला म्हंटलं लहानपणा पासून बघतोय म्हतारच तुला अंघोळीला पाणी विसणून देतंय. मग गप्प बसली. विषयच बंद ..!!

पुंबा's picture

25 Jul 2017 - 11:00 am | पुंबा

मस्त साहेब!

arunjoshi123's picture

25 Jul 2017 - 11:21 am | arunjoshi123

नवरा बायकोने एकमेकाशी, त्यांच्या कुटुंबांशी कसे वागायचे हे ठरवण्यात समाजाचा घंटा स्टेक नाही असे वाटते, ते त्यांनीच आपापसात सुसंवादातून ठरवावे असे माझे मत आहे.

लेट मी रिफ्रेजः
गुन्हेगार नि व्हिक्टिम्सनी, त्यांच्या संपत्तीच्या स्टेकहोल्डर्सशी कसे वागायचे हे ठरवण्यात समाजाचा घंटा स्टेक नाही असे वाटते, ते त्यांनीच आपापसात सुसंवादातून ठरवावे असे माझे मत आहे. न्यायपालिका गेली उडत. कायदे गेले उडत. समाज गेला उडत.
====================================
आता थोडं यावरच पुढे -
कोणत्याही नात्यातली काही मूळ तत्त्वे समाजातून उचलायची असतात आणि मग त्याचं थोडं थोडं स्वतःच्या चवीप्रमाणे कस्टमायझेशन करायचं असतं. कोणासोबत कसे वागायचे याला बेंचमार्क हवाच. अर्थात हे बेंचमार्क हळूहळू सुधारायचे सध्याला वाईट असले तर.
मनुष्यास कोणाशी कसे वागावे याची मूलभूत अक्कल असती तर शाळेत सतत संस्कार करावे लागले नसते. आयुष्यभर सतत लोकांशी कसं वागावं हे शिकावं लागलं नसतं.
स्वतःच्या किंवा समाजाच्या एकूण व्यवस्थितिसाठी कसं वागायचं हे शून्यातून ठरवणं हे सामान्यांचं विसरा, अगदी तत्त्ववेत्त्यांना कठीण आहे. आणि असे काही वर्कींग रुल्स बनवायची अक्कल असली तरी बुद्ध्या स्वार्थापोटी बरेच असे चांगले प्रोटोकॉल पाळले जाणार नाहीत.
आता हे पहा -
"वडिलधार्‍यांशी बाय डिफॉल्ट आदराने वागावे. त्यांचे वर्तन कडक असेल तर अ‍ॅडजस्ट करून घ्यावे"
आणि
"वडिलधार्‍यांना विशेष वागणूक देऊ नये. त्यांची लायकी असेल तर सन्मान कमवतील."
समाज हा मूलतः आणि बहुधा क्रिमिनल नसतो असं मानून चलायचं असेल तर दोन पैकि काय सामाजिक प्रथा असायला हवी?
ज्या गोष्टिंना कायद्याचं फ्रेमवर्क नाही त्या गोष्टींना फ्रेमवर्कचीच आवश्यकता नाही हे म्हणणं फार विचित्र आहे हो.
अशी फ्रेमवर्क काढून घेतल्याने संसार हे संघर्षपूर्ण झाले आहेत, आपण भांडू नये हे कळेपर्यंत (नशिबाने कधी कळल्यास) कितितरी वर्षे वाया जातात.
लहानपणी "बायकोवर हात उचलणाराचे" नाव १-२ महिने गावात गाजत असे. त्या माणसाने पुन्हा तसे केले तर सरळ शेजारी जाउन त्यालाचा ठोकत असे. स्त्रीयांवर हात उचलू नये ही प्रथा. आता शहरात लोकांच्या व्यक्तिगत आयुस्यात ढवळाढवळ करू नये हा संकेत इतका प्रबल झाला आहे कि सामाजिक सुरक्षा नावाचा प्रकार उरलेलाच नाही. मग कोणत्या फ्लॅटमधून काय आवाज येतोय आणि कोणाचा चेहरा किती मूलूल दिसतोय याचेशी आपल्याला देणं घेणं उरलेलं नाही.
समाजाचा जो काही आय क्यू आहे, अशिक्षण आहे त्याप्रमाणे समाज पुढारलेल्या लोकांना बरेच मूर्खपणे करणे अपेक्षा करतो. त्या मूर्खपणांत सहभागी नाही झालं तर चिडचिड करतो, मात्र समाजाचं ओरियंटेशनच लोकांना डिस्टर्ब करणे आणि त्यांच्यावर अन्याय करणे असं असतं ही धारणा चूक आहे. सबब सामाजिक अपेक्षा प्रत्येकाच्या जीवनाच्या अभिन्न हिस्सा असायला हव्या.

बाई मुलगी बाहेर कितीही यशस्वी करियर करत असेल तरीही घरकाम, देवधर्म साग्रसंगीत केलंच पाहिजे असे जे आग्रहाने सांगतात ते ऐकणार्‍या(त्यांचेच असे नव्हे अश्या प्रकारे 'संस्कार' करणार्‍या कोणाचेही) मुली सुपरवूमन बनण्याच्या नादात प्रकृतीची वाट लावून घेतात असे वाटते.

समजा कोण्या मुलीची क्षमता सुपरवुमन होण्याची नसेल तर १. बाईंने प्राधान्य दिलेल्या गोष्टी २. स्त्रीमुक्ती गोष्टि पैकी काय प्राधान्य असावं? का? (बाई सुपरवुमन आहेत, त्या तसं म्हणत नाहीत, पण आपण म्हणता तसा प्रभाव मुलींवर त्या निश्चित पाडणार. आणि ते अनिष्ट आहे.)

विनोदबुद्धी मात्र भारी आहे बाईंना.

बघा ना, तेवढं तरी चांगलं बोलायचं बिचारीबद्दल.

कोंबडी प्रेमी's picture

25 Jul 2017 - 11:31 am | कोंबडी प्रेमी

( नवरा बायको ) आणि (गुन्हेगार आणि इतर स्टेक होल्डर्स ) हि अनोलोजी ??

उगीच वादे वादे ?

काय पण शब्द टाकाहो,, हाव डज दॅट मॅटर? तंटा असला पाहिजे.
कोंबडी प्रेमी आणि कोंबडी सेवन प्रेमी असे शब्द टाका. माझं काय जातंय? खाली आहेच उदाहरण माळेचं.

सतिश गावडे's picture

25 Jul 2017 - 10:36 am | सतिश गावडे

या धाग्याच्या निमित्ताने बरेच दिवस घरी पडून असलेले मंगला सामंत लिखित "स्त्री पर्व" वाचायला सुरुवात केली आहे.

asdf

मातृसत्ताक ते पुरुषप्रधान पद्धती हा मानवजातीचा प्रवास रोचक आहे.

अभिजीत अवलिया's picture

25 Jul 2017 - 12:13 pm | अभिजीत अवलिया

काय ठरलं मग? कुणी बडवायच्या भाकर्या?

भाकरी माहित नाही पण किबोर्ड चांगलाच बडवलाय सर्वांनीच!

विशुमित's picture

25 Jul 2017 - 12:36 pm | विशुमित

अनाहिता पेक्षा जोशी सरांनी गोल गोल भाकऱ्या (पक्षी किबोर्ड) बडवल्या आहेत.

ज्यांच्यासमोर डोके बडवून घ्यायची पाळी आहे त्यांच्यासमोर फक्त किबोर्ड बडवला आहे.
=============================
आपला नवरा सामंजस्याने सगळे प्रश्न, मतभेद मिटवतो म्हणजे जगात सर्वच ठीकाणी ते संभव आहे असा आत्मविश्वास. आपण नवर्‍याला काही इजा केली नाही म्हणजे असा कोणता प्रॉब्लेमच नसतो असा आत्मविश्वास. पडते घेणे (जे देश सुद्धा करतात, कंपन्या करतात) असं काही नसतंच, समता नाहीतर काडिमोड हा अप्रोच हाच खरा अप्रोच. आणि हो, पिढ्यान पिढ्यांचं शोषण ... त्याचा राग आत्ता...उत्तम पिता, भ्राता, पति, मूल असताना...

एका भाषणाच्या वेळी एका महिलेने त्यांना तुम्ही भाषणे देत गावभर हिन्डत असताना तुमच्या घरी कोण भाकर्‍या बडवता ? असा प्रश्न विचारल्यावर बाई जाम पिसाळली होती.

अत्रन्गि पाउस's picture

25 Jul 2017 - 1:24 pm | अत्रन्गि पाउस

आता हे कुठल्या क्लिप मध्ये बघितलं ?

तिच्यापेक्षा क्रॅक स्त्रीवादी स्त्रीया आहेत. पण असो.
हे एक रत्न
http://indiatoday.intoday.in/story/anyone-who-denies-being-a-feminist-is...
हे अजून एक रत्न
http://www.india.com/news/india/men-do-not-commit-suicide-never-heard-a-...

तुम्ही भाषणे देत गावभर हिन्डत असताना तुमच्या घरी कोण भाकर्‍या बडवता ?

लोल! एक नंबर! कोणत्या व्हिड्योत आहे?

विशुमित's picture

25 Jul 2017 - 2:07 pm | विशुमित

व्हिड्योत असो किंवा नसो पण लॉजिकली पाहिले तर लगातार ४५८ दिवस फिरणाऱ्या आईंच्या घरी भाकरी कोण बडवत असतील ?

विशुमित's picture

25 Jul 2017 - 1:58 pm | विशुमित

हायला खरंच की हे बाईंच्या घरातील "भाकरी बडवायचे" डोक्यातच नाही आले.

बाईंची (आईंची) भाषण देण्याची फी किती असते कोणाला माहित आहे का?

बाईंची (आईंची) भाषण देण्याची फी किती असते कोणाला माहित आहे का?

अज्ञानामूलक असा आत्तापर्यंतचा सर्वात लाजिरवाणा प्रतिसाद. बधाई हो.

विशुमित's picture

25 Jul 2017 - 2:15 pm | विशुमित

प्रश्न अज्ञानमूलक असेल पण लाजिरवाणा कसा ते नाही कळलं.
इथे जेवढे या चर्चे मध्ये सहभागी आहेत त्या पैकी किती जणांना माहित की आई किती फी घेतात किंवा फुकट ज्ञान वाटतात.

कीर्तनकार, वक्ते, सेमिनार घेणारे, पोवाडे गाणारे, गोंधळी, नाटककार, एका स्वरात शिवाजी महाराजांवर भाषण देणारे (नितीन , आडनाव विसरलो ) वगैरे सगळे जण समाजप्रबोधन केल्याच्या बदलात पाकिटे घेतात.

फी घेत नाहीत असे ऐकले आहे..

विशुमित's picture

25 Jul 2017 - 2:23 pm | विशुमित

फी घेत नाहीत हे शक्य आहे का?

नाहीत घेत, येण्याजाण्याचा खर्च घेत असतील.

फी घेत नाहीत हे शक्य आहे का?

ज्यांच्यासाठी पेड स्त्रीवादी स्त्रीया हाच निरीक्षण संच आहे त्यांना हे नवल वाटणारच.

अभ्या..'s picture

25 Jul 2017 - 4:01 pm | अभ्या..

अपर्णाबाई रामतीर्थकर व्याख्यानाला आल्यावर फी घेत नाहीत. मानधन दिले तर घेतात पण बर्‍याचदा त्या गावातील अनाथ विद्यार्थी गृहाला देऊन टाकतात. गरीब महिलांची कोर्ट प्रकरणे पण त्या फुकटात लढतात. सोलापूर आणि जवळपासच्या जिल्ह्यातील फसवल्या गेलेल्या (अल्पवयीन वगैरे) मुलींचे रिमांडस, गुन्हेगारांवर गुन्हानोंदणी अशा प्रोसीजरमध्ये स्वतः अटेंड राहुन मदत करतात. मुलींनी स्वसंरक्षण करावे आणि शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे कसे याचे, न्याय, कायद्याचे, त्यातील महिलाविषयक तरतूदींचे, सरकारी योजनांचे मार्गदर्शन करतात. कुटुंबातील मतभेद, घटस्फोटासारख्या प्रकरणात समुपदेशक म्हनून काम करतात. पोलीस, कार्यालये अशा ठिकाणी महिलांवर होणार्‍या अत्याचारात महिलांची बाजू मांडतात.
त्यांचे पती (स्व. अरुण रामतीर्थकर) दै. सोलापूर तरुण भारतमध्ये कित्येक वर्षे रोखठोक नावाचे सदर सातत्याने लिहित होते. सदैव व्हीलचेअरवर असतानाही त्यांनी प्रखर हिंदुत्ववादी लेखनाचा वसा सोडला नाही. सामाजिक घटना, राजकारण आदि विषयांवर वेगळ्याच अँगलने स्पष्ट आणि सडेतोड लिहायच्या त्यांच्या शैलीसाठी रविवार तरुण भारत प्रसिध्द होता. अगदी शुध्द संघ विचारांचा पाईक असलेला हा लेखक भाजपाच्या चुकाही निरपेक्षपणे दाखवून देत असल्याने संघ परिवारात त्यांच्या मताला भरपूर मान होता.

कपिलमुनी's picture

25 Jul 2017 - 4:22 pm | कपिलमुनी

अपर्णाबाई रामतीर्थकर चांगले काम करत आहेत हे वाचून आनंद आणि आदर वाटला!
त्यांच्या चांगल्या कामाला _/\_
फक्त त्यांच्या स्त्र्यीयांविषयीच्या जोखडवादी मताला राम राम !

उदडामाजी काळे गोरे ! आपण काय घ्यायचे ते आपण ठरवायचे.

अभ्या..'s picture

25 Jul 2017 - 5:03 pm | अभ्या..

आपण काय घ्यायचे ते आपण ठरवायचे.

हांगाश्श्श्शी.
यु ट्युबवर आशिष चंचलानी सारखे कित्येक आईबहीणींवर शिव्याचा रतीब घालून ५ - ५ लाख व्ह्युअर्स मिळवतेत. त्याने काही फरक पडत नाही.
समाज लावणीने बिघडत नाही की किर्तनाने सुधरत नाही. आपण आपले बघावे चांगले. हैकिनै

अपर्णाबाई रामतीर्थकर चांगले काम करत आहेत हे वाचून आनंद आणि आदर वाटला!
त्यांच्या चांगल्या कामाला _/\_
फक्त त्यांच्या स्त्र्यीयांविषयीच्या जोखडवादी मताला राम राम !
अगदी सहमत.

त्यांचे समाज कार्य मला माहीत नव्हते.
उदडामाजी काळे गोरे ! आपण काय घ्यायचे ते आपण ठरवायचे. +१००

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Jul 2017 - 5:32 pm | हतोळकरांचा प्रसाद

अभ्याराव, +१००००. खरंतर मी तुम्ही वर नोंदलेल्या गोष्टीच आधी ऐकल्या होत्या नंतर त्यांची भाषणे ऐकली.

अत्रन्गि पाउस's picture

25 Jul 2017 - 2:21 pm | अत्रन्गि पाउस

काही क्लिप्स मध्ये त्या स्वत:च मला बोलवा पुन्हा पुन्हा बोलवा असं सांगत आहेत. त्या फुकट येत नसाव्यात ...आणि येऊ हि नव्हे ...कारण घरी भाकरी बडवायला कुणी असो नसो ... चूल पेटती ठेवावी लागेलच ...

दुसर एक वाटले म्हणजे हि भाषण देत फिरत असतांना त्या वकिली कधी करतात कोर्टात ?

अवघड आहेट प्रश्न

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Jul 2017 - 2:46 pm | हतोळकरांचा प्रसाद

त्या फी घेत नाहीत, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्या फी घेत नाहीत हे त्या भाषणाच्या शेवटी सांगतात! बाकी त्या वकिली केव्हा करतात हा प्रश्न अतार्किक आहे.

मला एक सांगावेसे वाटते, त्यांच्या काही अतर्क्य किंवा पुरातन/सनातन विचारांवर आक्षेप असेल तरी त्यांचे काम आणि समाजाचे देणे म्हणून त्यांनी केलेली सेवा याची थोडी माहिती घेऊन टीका करायला हरकत नसावी. वरील एका प्रतिसादात तर त्यांना क्रॅक संबोधले गेले, हे सभ्यपणाच्या कुठल्या निकषांमध्ये बसेल? राहता राहिला प्रश्न (परत एकदा) त्यांच्या घरी भाकऱ्या बडवण्याचा तर मला वाटते सगळा घोळ तिथेच तर आहे. त्या तुम्ही चंद्रावर आहात तर तिथेही भाकऱ्या भडव्या असं सांगायचा प्रयत्न करत नाहीयेत हे न समजण्याइतकं क्लिष्ट आहे का? तुम्ही जेव्हा घरी असाल तेव्हा करा असा त्याचा अर्थ नसतो का? शिवाय रोजच करा, नवऱ्याची मदत घेऊ नका, किंवा एखाद दिवशीही पार्सल मागवू नका हे उप-अर्थ कशाला?

मला आता असे वाटू लागले आहे कि इथे बरेच लोक पूर्ण भाषण न बघताच स्वतःला खटकणारे दोन तीन वाक्य शोधून (फॉर द सेक ऑफ डिबेट) मुद्दे मांडत आहेत. शिवाय वरून "भाषण ऐकवले गेलेच नाही" वगैरे पळवाटा. हैला आमी तर ओवेसी बंधूंचं भाषणबी "काय म्हणणं हाये" म्हणून ऐकून घेतो. असो ज्याचा त्याचा दृष्टिकोन!

arunjoshi123's picture

25 Jul 2017 - 3:36 pm | arunjoshi123

अगदी अगदी.
==================
वाचायला नको, ऐकायला नको. डिटेल जाणून घ्यायला नको. त्यांची प्रेरणा परंपरावाद आहे इतके त्यांना क्रॅक म्हणायला खूप आहे.
====================
अपर्णाताईंनी खरं तर बायकांच्या घरगुती वागण्यावर खूप ताशेरे ओढले आहेत म्हणून ९३५ संसार उध्वस्त न होऊ देणे हे काम कोणी पाहत नाही. शिवाय दुष्ट, क्रिमिनल स्त्रीयांनी देशोधडीला लावलेले पुरुष हा त्यांचा विषय असल्याने "सर्व सुखवस्तू" बायकांना त्यांची विधाने कुठुनही उचलून संदर्भहिनतेने झोडणे गंमतशीर वाटत आहे.

विशुमित's picture

25 Jul 2017 - 3:54 pm | विशुमित

त्यांनी जरी ९३५ संसार उध्वस्त होण्या पासून वाचवले असले तरी त्यांच्या भाषणांमध्ये ९.३५ कोटी (आकडा काल्पनिक आहे) संसारामध्ये स्फोट घडवण्याचे पोटेन्शियल आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे.

बाकी त्यांच्या घरी भाकरी कोण बडवतात ह्याच उत्तर काही दिले नाही कोणी.

विशुमित's picture

25 Jul 2017 - 4:09 pm | विशुमित

बाकी त्यांच्या घरी भाकरी कोण बडवतात ह्याच उत्तर काही दिले नाही कोणी.

कृपया हे वाक्य संपादित करा (काढून टाका).

(अभ्या च्या प्रतिसादातून उपरती )

त्यांच्यावर तुमचा विश्वास अजिबात दिसत नाही. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या भाकर्‍या त्याच बडवतात नि मी ते मानतो.
================
बाकी तुमच्या मतांचा आदर आहेच.

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Jul 2017 - 5:17 pm | हतोळकरांचा प्रसाद

त्यांच्या सांगण्यातून स्त्रियांना फायदा होणार नाही असे क्षणभर गृहीत धरू पण त्यांच्या सल्ल्यांमुळे हजारो लोकांचे (तुमचा आकडा कमी केला) संसार कसे मोडले जाऊ शकतात हे जरा लगडून सांगाल का? हाच प्रश्न मी वर पण एके ठिकाणी विचारला होता पण उत्तर मिळाले नाही. बाकी त्यांच्या भाकरी बडवण्यावर मी वर मत मांडले आहे ते पटते का बघा. मला अजोंचे खालील उत्तर पण पटते.

कोंबडी प्रेमी's picture

25 Jul 2017 - 4:33 pm | कोंबडी प्रेमी

ह्यातील उसंडू आणि किंचित विनोद समजून घेण्यात आलेला आहे चिंता नसावी.

आता त्या वकिली करत नाहीत. कोर्टात चालणारा भ्रष्टाचार पाहून त्यांनी प्रॅक्टिस सोडली.

आदूबाळ's picture

25 Jul 2017 - 3:20 pm | आदूबाळ

पण मग भाकर्‍यांचा कांय?

- बाळोबा रेगे, भाकर्‍यांची चाळ

ह्या बाळोबाला मेल्या शंकाच फार! :प :प
लष्करच्या भाकर्‍या भरपूर जमतात. त्यामुळे म्हणावा असा प्रॉब्लेम नसतो.

इथे जेवढे या चर्चे मध्ये सहभागी आहेत त्या पैकी किती जणांना माहित की आई किती फी घेतात किंवा फुकट ज्ञान वाटतात.

बाई खूप सेवाभावी काम मोफत करतात हे जवळजवळ सर्वांना माहित आहे. कित्येकांनी त्यांच्या विचारांचा विरोध केलाय, पण कामाची योग्य ती दखल घेतली आहे.

विशुमित's picture

25 Jul 2017 - 3:47 pm | विशुमित

मला खरंच माहित नव्हतं त्या मोफत सेवाभावी काम करतात त्या. विडिओ ऐकण्यातून सुटले असेल कदाचित. पण तरी मला शंका आहे की मोफत भाषण देत असतील म्हणून. किमान येण्या जाण्याची बिदागी (यासाठी दुसरा शब्द असेल तर कृपया सुचवा) त्या घेत असाव्यात. खात्री करण्यासाठी आमच्या घरातील अखंड हरिनाम सप्ताहाला त्यांना आमंत्रित करण्याचा माझा मानस आहे.

पण त्यांच्या कामाबद्दल मी कुठेही वेगळे मत प्रदर्शन केलेले नाही. तसे कुठे आढळले असेल तर कृपया दाखवून द्या.

खात्री करण्यासाठी आमच्या घरातील अखंड हरिनाम सप्ताहाला त्यांना आमंत्रित करण्याचा माझा मानस आहे.

मागे पुढे काय पाहता मग?

सतिश गावडे's picture

25 Jul 2017 - 6:48 pm | सतिश गावडे

कीर्तनकार

एक नामवंत कीर्तनकार (खरं तर rural stand-up comedy म्हणायला हवे त्यांना) युट्युबवर एका चित्रफितीत "मग मी पैसे घेतले तर/ मला पैसे दिले तर काय बिघडले" अशा आशयाचे प्रवचन झोडताना दिसतात.

हो, पैसे हे फक्त एम एन सी कंपन्यांच्या अगदी ज्यूनिअर अधिकार्‍यांनासुद्धा फाईव स्टार लाईफ जोपासायलाच द्यायचे असतात. बाकी कुणाचा पैश्यांवर अधिकार काय?

सतिश गावडे's picture

27 Jul 2017 - 12:14 pm | सतिश गावडे

एम एन सी मधल्या साऱ्याच जणांचे ध्येय पैसे कमावणे हेच असते. मात्र तुमच्या या प्रतिसादावरुन किर्तनकाराने कीर्तनाच्या नावाखाली स्टॅन्डअप कॉमेडी करुन पैसे कमावणे योग्य आहे असे दिसते. :)

किर्तनात उभे राहणे बॅन नाही.
किर्तनात विनोद करणे बॅन नाही.
=================================
आता ध्येयाबद्दल. तुम्हाला स्कोप आणि कंसिडरेशन हा कंसेप्ट माहित असावाच.
एम एन सी मधलया लोकांचे ध्येय (स्कोप) पैसे कमावणे नसते, प्रकल्प (वा तत्सम) पूर्ण करणे हे असते. पैसे हे त्याचे कंसिडरेशन असते.
किर्तनकाराचे* ध्येय हे अध्यात्मिक प्रबोधन असते (विनोद हे हत्यार झाले) आणि पैसे हेच त्याचे कंसिडरेशन असते.

सुचिता१'s picture

26 Jul 2017 - 11:21 pm | सुचिता१

ह ह पु वा ... काय तर सी न असेल .. कुणी तरी क्लीप पाठवा प्लीज 

अत्रन्गि पाउस's picture

25 Jul 2017 - 1:21 pm | अत्रन्गि पाउस

एकंदर विषय, वादविवाद, पूर्व उत्तर पक्ष आदी गोष्टींनी फार दिवसांनी एक जोरकस चर्चा अनुभवतो आहे ...
खुद्द तीर्थंकरबाईंना हे सगळे मतमतांतरे पोचवले तर त्यांना ह्या चर्चेची दखल पुढील भाषणात घ्यावी लागेल असं वाटत .

पण एकंदरीत त्या जरा अति बोलतात आणि अनावश्यक सल्ले देतात हे माझे मत.
त्यांच्या सामाजिक कार्याला किंवा सद्हेतू बाळगून कार्य करण्याला सलाम ...पण ..सनी लीयोनी वर पोलीस क्म्प्लेंत आणि हैट्ट म्हणजे पोलिसांनी संध्याकाळ पर्यंत निर्णय देण्याच वचन वगैरे वाचून भरपूर आश्चर्य वाटले

बाकी चलने दो

अत्रन्गि पाउस's picture

25 Jul 2017 - 1:23 pm | अत्रन्गि पाउस

ते रामतीर्थ अस पाहिजे, तीर्थंकर शब्द कुठून डोक्यात घुसला आणि टंकला गेला देव जाणे ...
सं म तेवढा बदल करून हा प्रतिसाद उडवला तर बर होईल

पुंबा's picture

25 Jul 2017 - 5:53 pm | पुंबा

रामतिर्थकर पाहिजे..

सस्नेह's picture

25 Jul 2017 - 5:31 pm | सस्नेह

आज धाडस करून ऐकल्या दोन क्लिप्स, अपर्णाबाईंच्या.
भाषा थोडी रांगडी आहे, शब्द ओबडधोबड आहेत, पण हेतू चांगला वाटला मला.
नाती टिकवणे, कुटुंबव्यवस्था टिकवणे हे खरंच आज गरजेचे झाले आहे. त्या काही कुणा एकाचा कैवार घेतात असे वाटले नाही. सासू आणि सून दोघींनी करायची तडजोड सांगतात. नवरा आणि बायको दोघांनी नाते टिकवण्यासाठी काही करावे असे सांगतात.
कोबीच्या भाजीचा किस्सा आवडला त्यांचा.

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Jul 2017 - 5:38 pm | हतोळकरांचा प्रसाद

+१००००. सातही ऐका, नक्की मत बनवायला सोपे जाईल. काही गोष्टी पटणार नाहीत पण काही गोष्टी हृदयाला स्पर्शून जातील. काही ठिकाणी त्यांचा भरून आलेला गळाच त्यांचा हेतू सांगून जाईल (काही लोकांना तेही खोटे वाटेल पण त्याला नाईलाज आहे.)

arunjoshi123's picture

25 Jul 2017 - 6:34 pm | arunjoshi123

नि:पक्ष मत.
तुमचा प्रतिसाद आवडला (मागच्या प्रतिसादांच्या तुलनेत).
================================================
त्यांचे साती व्हीडीओ मस्त टाईमपास म्हणून ऐकावेत.

सुबोध खरे's picture

25 Jul 2017 - 7:00 pm | सुबोध खरे

एकंदर प्रतिसाद वाचून मनोरंजन झाले.
आपण लोक स्वतःच्या चष्म्यातून पाहून किती झटकन निवड करून एखाद्याला गुन्हेगार ठरवून मोकळे होतो याचे आश्चर्य आणि गम्मत वाटली.

पिलीयन रायडर's picture

25 Jul 2017 - 7:09 pm | पिलीयन रायडर

बापरे! खुपच पुढे गेला की हा धागा!

१. अपर्णाबै समाजकार्य करतात हे मी सुद्धा ऐकुन आहे. पण त्यातही त्या वकिली करत नाहीत आता आणि कोर्टात लोकांना मदत करतात अशी दोन परस्पर विरोधी विधाने ऐकलेली असल्याने खरे खोटे देव जाणे. तरीही त्यांच्या कार्याचा आदर करुनन सांगते, त्यांची अनेक मते टोकाची आहेत. चांगले कार्य केले म्हणुन हे ही ऐकुन घ्यावे अशी कुणाची अपेक्षा नसावी.

२. त्या काही का हेतुने बोलेनात, इथे लोक त्यांच्या व्हिडीओंचा वापर सुनांना.. बायकोला ऐकवायला वगैरे करत आहेत. त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ त्यांच्या डोक्यात काही का असेना, अजुन त्यांच्या बाकी भाषणांमध्ये त्या काही का बोलेनात, जे सध्या सगळीकडे फिरतंय ते "बायकांनो भान ठेवा, नंतर बलात्काराचे मुद्दे लढवताएत, पण आधी भान नको का?" ,"पुरूषांसमोर केस विंचरतात काय.. हात काय वर नेतात.." ,"आजकाल शिकलेल्या मुलींना स्वयंपाक येत नाही, शिकलेली बायको करायची असेल तर पार्सलची तयारी ठेवा नाही तर स्वतः स्वयंपाक शिका" इ. आहे. ह्यातुन कितीही फिलॉसॉफिकल अर्थ काढायचा म्हणला तरी जो निघायचा तोच अर्थ निघतो.

सार्वजनिक ठिकाणी अशी भाषणे देणार्‍या वक्त्याला "ह्या भाषणात मी असं बोलले असले तरी माझे भाषण क्रमांक ५ आणि ७ ऐका, मग तुम्हाला मुद्द्यांचा उलगडा होईल" असे म्हणता येत नसते. बरं, विषय समजा आजकालच्या स्त्रिवाद्यांच्या चुका किंवा बायका कसा कायद्याचा गैरफायदा घेतात असा काही असेल तर हे सिलेक्टिव्ह बोलणे समजु शकतो. पण "चला नाती जपुया" असे म्हणुन बायकांना झोडपणे अत्यंत चुकीचे आहे. भाषणाची सुरुवात ऐका - कुटुंबव्यवस्था मरायला टेकलीये म्हणून बोलतेय अशी म्हणुन होते ती बायका कशा कायद्याचा दुरुपयोग करातात, भान सुटतंय, धर्म बुडतोय, बंधनं नाहीत अशा अंगाने होत जाते. भाषणात सरसकटीकरण तर वाक्या वाक्याला आहे. शिकलेल्या, बाहेर जाणार्‍या बायका (खास करुन आयटी मधल्या) ह्यांच्या विषयी काहीही बोलल्या जातेय. जणु काही सगळ्याच्या सगळ्या आयटी मधल्या पोरी मातृत्व विकायल निघाल्यात. "माझं १५ लाखाचं नुकसान होतं बाळामुळे" हे म्हणणारी बाई भारतात तरी अजुन रेअर केस आहे. बाई एका उदाहरणाला बेमालुमपणे आजकाल आयटीच्या मुली असंच "सर्रास" करत आहेत असं प्रोजेक्ट करत आहेत.

बाहेर काहीही काम करा, त्या कामाच्या जीवावर तुम्ही अधिकाराने लोकांना असे काही सांगता, तेव्हा तुम्ही समाजाची स्त्रियांच्या अनिर्बंध वागण्यामुळे भयानक अधोगती होत आहे चित्र उभे करता आणि अनेक लोक त्याचा सोयीस्करपणे स्त्रियांनी म्हणुनच घरात बसायला हवे असा अर्थ काढु शकतात.

३. भाकरी बडवण्याचा काय तो फायनल प्रतिवाद.

मी मागच्या पानावर त्यांनी नक्की म्हणले आहे ते शब्द न शब्द लिहुन सांगितले आहे. त्यात त्या स्पष्टपणे म्हणत आहेत की "तुम्ही डॉक्टर असा, इंजिनिअर असा, .... अमुक असा...तमुक असा... अंतराळात जा.. पाताळात जा... स्वयंपाक आलाच पाहिजे, घरात आले अन नवरा म्हणला की जेवायला कर तर असं नाही म्हणता येत की भाषण देऊन आलेय, भाकरी करत नाही. नवर्‍यासमोर वकिली नाही चालत. नवर्‍यासमोर काही चालत नसतं. हे पक्कं लक्षात ठेवा. " (टाळ्यांचा कडकडाट!)

ह्यात आता लोकांनी मला सांगाच की कसं "केवळ बायकांनी स्वयंपाक करावा" हे सूचित होत नाही. खास करुन हतोळकर. तुम्ही म्हणताय की ह्यात असं कुठे म्हणलंय की नवर्‍याने मदत करु नये वा नवर्‍याने स्वयंपाक करु नये. तर हे घ्या. मी तुम्हाला त्या जे म्हणल्यात ते लिहुन दिलंय. मागे तर लिंक पण दिलीये. ती क्लिक कराल तर अगदी ह्याच वाक्याला व्हिडिओ सुरु होईल.

शिकलेल्या मुलींना स्वयंपाक येत नाही, शिकलेली बायको आणायची असेल तर पार्सलची तयारी ठेवा नाही तर स्वयंपाक शिका , केटरचा स्वयंपाक आणणार आहेत, सुनांना वेळ नाही. - ही सर्व वाक्ये त्या काही कौतुकाने म्हणलेल्या नाहीत. समाजाची कशी अधोगती चालु आहे त्यावर हे भाष्य आहे त्यांचं.

एका भाषणाच्या पहिल्या २० मिनिटात ही रत्ने मला सापडलीत. आणि दुर्दैवाने हेच सतत व्हायरल होत आहे. "आजकाल मुलींना नवरा कसा हवा" ह्यात आयटीच्या मुली मातृत्व विकायला निघाल्यात हे इतकं ड्रामाटिक पद्धतीने सांगत आहेत आणि फेसबुक वर सतत हाच व्हिडीओ शेअर होतोय.

मी एक साधं उदाहरण देऊन थांबते.

माझी एक मैत्रिण आहे. त्यांच्या घरात / जातीत, तीच एक मुलगी आहे जी बाहेर पडुन प्रचंड शिकली. त्यासाठी पुण्याबाहेर राहिली. तिला एक मुलगा आवडायचा खुप. पण जाती बाहेरचा होता. तिने लग्न केले नाही त्याच्याशी. का? तर म्हणाली की जर मी घरच्यांच्या विरोधात जाऊन असं केलं तर माझ्या समाजाचे लोक नक्कीच असं म्हणतील की पोरी जास्त शिकल्या, घराबाहेर गेल्या की हे असं होतं. आणि मग लोक मुलींना तेच उदाहरण देऊन बाहेर जाऊ देणार नाहीत. मला काहीही झालं तरी वडीलांच्या मनाप्रमाणेच लग्न करायला हवं. माझं उदाहरण चुकीच्या कारणाने दिलं जायला नको.

आपला समाज हा असा आहे. आज आयटीतल्या मुलींची क्लिप व्हायरल होतेय. कुठल्या तरी घरात एखाद्या मुलीच्या आयुष्यावर त्याचे पडसाद उमटलेही असतील. बायकांनी भान सोडु नका वाली क्लिप सुद्धा व्हायरल होऊन सुनांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर धडकतेय. ह्यांच्यातलं कुणीही (नसलेला) गर्भितार्थ शोधणार नाही हे मी पैजेवर सांगते. पण बघा त्या बाई काय सांगताएत, हे असं होतं पोरींना डोक्यावर घेतलं की वगैरे सोयीस्कर अर्थ निघताएत हे नक्की.

कोंबडी प्रेमी's picture

25 Jul 2017 - 8:10 pm | कोंबडी प्रेमी

पिराताई पुन्हा एकदा १००% सहमत !!!

रामपुरी's picture

25 Jul 2017 - 8:19 pm | रामपुरी

" पण बघा त्या बाई काय सांगताएत, हे असं होतं पोरींना डोक्यावर घेतलं की वगैरे सोयीस्कर अर्थ निघताएत हे नक्की."

कुणीतरी एक बाई काहितरी सांगताहेत म्हणून लगेच लोकांची मते बदलतात? भलताच विनोद आहे.

बाकि चालू द्या...

रेवती's picture

25 Jul 2017 - 8:35 pm | रेवती

छे हो, अशी कोणाची मतं एका सांगण्यात्/ऐकण्यात बदलत नाहीत पण आधीपासून ज्यांची अशीच आहेत त्यांना "बघा बघा, आम्ही हेच म्हणतोय" असा सपोर्ट मिळाल्यागत होतं. आणि दुर्दैवानं अजूनही समाजाचा बराचसा भाग दुसर्‍या (सोयिस्कर) बाजूला झुकलेला आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Jul 2017 - 10:37 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुमच्या आणि माझ्या मतांमध्ये खूप अंतर असल्याने असहमतीवर सहमती नोंदवितो. बाकी ते भाषण क्रमांक ५ आणि ७ बघा ह्याचा उल्लेख खटकला. यूट्यूबवर ते तुकड्यात आहे याचा दोष वक्त्यावर फोडण्यात काय अर्थ? स्वैपाक यायलाच हवा आणि नवरा स्वैपाक कर म्हणाल्यावर स्वैपाक करावाच लागतो हि वस्तुस्थिती यातून नवऱ्याने स्वैपाकात मदत करू नये असे त्यांचे मत ध्वनित होत असेल असे मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. असा तुकड्या तुकड्यात वाक्यांचा अर्थ काढण्यात मला तरी हशील वाटत नाही. पूर्ण विडिओ पाहून त्यांचं स्त्रियांबद्दलचं मत, पुरुषांबद्दलचं मत (हो विडिओ पूर्वग्रह न ठेवता पहिला तर हेहि सापडेल त्यात), स्त्री-पुरुष समानतेबद्दलचं मत पाहून मग स्वतःची मते बनवणं योग्य होईल हा अनाहूत सल्ला! बाकी या पूर्ण विडिओत घेण्यासारखे काही विचार सापडले नसतील हे पाहून आश्चर्य वाटलं! असो! पूर्ण विडिओ आधीच मत न बनवता सलग पहावा, अपर्णाजींच्या काम जाणून घ्यावं मग टोकाची मते जरूर मांडावीत!

पण त्यातही त्या वकिली करत नाहीत आता आणि कोर्टात लोकांना मदत करतात अशी दोन परस्पर विरोधी विधाने ऐकलेली असल्याने खरे खोटे देव जाणे.

तुम्ही आमचाही (सर्वनामाचं लिंग बरोबर आहे.) अपर्णाताई बनवला असल्यामुळे तुम्ही हे ही इग्नोर करालच, पण तरीही सांगावसं वाटतं कि मनुष्याने आपल्या अज्ञानाचा वन्ही आपल्या पूर्वग्रहदोषाच्या ठिणगिसोबत वापरू नये.
तर तंटा सोडवण्याची खालील प्रकारच्या पद्धती असतातः
१. अमिकेबल सोल्यूशन
२. मेडियेशन
३. आर्बिट्रेशन
४. लिटिगेशन
५. इंटरनॅशनल डिस्प्यूट रिझोल्यूशन
६. आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट

यातल्या सर्व सरकारमान्य आहेत. आणि क्रिमिनल केस नसेल तर लिटिगेशन टाळावे (मंजे सरकारची अधिकृत मशिनरी टाळावी) असा सरकारचा आग्रह असतो. अगदी या इतर बर्‍याच फोरम्सचे अवार्ड्स फायनल आणि बाईंडिंग असावेत आणि त्याविरुद्ध लिटिगेशन बर्‍याच परिस्थितिंत चालणार नाही असेही सरकार म्हणते. हे सगळे प्रकारे चालवणारे लोक जनरली वकील असतात. बाई आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करतात असं त्या स्पष्ट म्हणाल्या आहेत. (पहा, बायस नसल्यामुळं मी किति व्यवस्थित आठवू शकतो.)
=============================
आपल्या विधानाविधानात इतके अज्ञान, बायस आणि समाजशास्त्राच्या तत्त्वांचा अनभ्यास, शिवाय अर्थनिर्णयनाची अतार्किकता ठासून भरली आहे कि कोंबडी प्रेमी सारख्या टाळ्यापिटू स्त्रीवादी लोकांना आपण अपर्णाताई परंपरावाद्यांना जितक्या मिसलिड करत असतिल त्यापेक्षा जास्त मिसलिड करत आहेत.
===========================
या प्रतिसादाची भाषा उग्र, टिपिकल अजो स्टाईल आहे हे मान्य. बाकी तुम्ही आपल्या मिसळपावच्या एक गोड ताई आहात अशीच कल्पना आहे नि राहिल. ही मतांतरं केवळ तात्विक आहेत. स्त्रीवादी ज्या उग्रतेने मते मांडतात त्यापेक्षा झोंबणार्‍या उग्रतेने उलट दिशेने लिहिता येते का असा प्रयत्न मी करत असतो. डोल्ट टेक अ‍ॅनिथिंग पर्सनली.

आपल्या विधानाविधानात इतके अज्ञान, बायस आणि समाजशास्त्राच्या तत्त्वांचा अनभ्यास, शिवाय अर्थनिर्णयनाची अतार्किकता ठासून भरली आहे कि कोंबडी प्रेमी सारख्या टाळ्यापिटू स्त्रीवादी लोकांना आपण अपर्णाताई परंपरावाद्यांना जितक्या मिसलिड करत असतिल त्यापेक्षा जास्त मिसलिड करत आहेत..

आहहहह, जोशीसाहेब मानले तुम्हाला.
बाकी आपले मतभेद काहीका असेनात, चिकाटी अन मुद्देसूद पणे किल्ला लढवण्याला सलाम.
आपल्याला हे जमत नाही. त्यातल्या त्यात ढीगभर वर्ड सॅलडला हुशारी मानणाऱ्या विरुद्ध प्रतिसादात तुमचे प्रतिसाद प्रचंड कंसिस्टंट आहेत हे मान्य केले आहे. किपीटप.

arunjoshi123's picture

26 Jul 2017 - 12:00 pm | arunjoshi123

आपल्याला हे जमत नाही.

१.जालीय संवादांची ही एक त्रुट आहे की आपण "पुरेसा" संवाद करू शकत नाही. माझे प्रतिसाद पाहिले तर सहसा मी प्रतिवादयाच्या फक्त पहिल्या , दुसर्‍या विधानाचा प्रतिवाद करतो. अन्य सर्व विधानांचा करणं वेळेअभावी अशक्य आहे.
२. समोरचा खरे, प्रामाणिक बोलत आहे असे "माहित असणे", मानणे नव्हे. समोरच्याच्या नि आपल्या प्रभूत्वांची तुलना हा खेळ न खेळता आपल्याला न पटणार्‍या विधानांवर प्रामाणिक भाष्य करणे.
३. अगदी अपरिहार्य होत नाही तोपावेतो समोरच्याचा व्यक्तित्वाबद्दल भाष्य न करणे. मी जर तुला ढोंगी म्हणालो तर तू माझं काही म्हणणं मान्य करण्याचा स्कोप संपतो. म्हणून तह होईपर्यंत आदर देत राहणे.
४. प्रतिवाद्यांच्या माहीतितून आपली मतं सुधारत, रिफाईन आणि डायल्यूट करत जाणे. मंजे शेवटी आपण खूप तिखट भाजी खाऊ शकत असलो तर त्यांना थोडि लींबू पिळून देणे.
५. योग्य तिच भूमिका घेणे.
६. सगळीकडे एकोळी थूंकून जाणारांस इग्नोर करणे. एकोळे फार धारदार आणि विचारहीन लोक असतात. सुसंवादातून काही शिकायची, शिकवायची त्यांची मानसिकता नसते. म्हणून मुख्य हरिण सोडून झांडांवरून पळणार्‍या माकडाच्या पाठीमागे न धावणे.
७. समोरच्या व्यक्तिला आपला अपमानच करायचा आहे अशी धारणा नसणे. जालीय आयड्यांच्या भावनांची आपण काही समीकरणे बनवतो. प्रतिसादातले विधान हि सगळी समिकरणे तोडून पाहणे. प्रतिवाद्यांचा नेहमी योग्य तो सन्मान करणे.
८. फार गंभीर न होणे. शैली खेळकर ठेवणे. मी स्वतः फार अशिष्ट लिहितो. ते मला सुधारायला हवं.
९. जालावर आपली एक विशिष्ट प्रतिमा न बनवणे. उदा., लोकांनी तुम्हाला मूर्ख मानलं तर ओके म्हणावं. त्यानं एवढा काही फरक पडत नाही. तुमची लाँग टर्म इमेज तुम्ही आहात तशीच बनणार असते.
१०. आपण आहोत तसे प्रकट व्हावं.

मला वाटतं रफ्लि या गाईडलाईन्स फॉलो कराल तर जमत नाही असं वाटणार नाही.
बाकी जालीय संभाषणकौशल्या या विषयात मी सगळे चढ उतार पाहिलेत असं नाही. बराच पूर्वीचा फ्लॅशिपणा बराच नियंत्रित केला आहे.

विशुमित's picture

27 Jul 2017 - 11:00 am | विशुमित

हा प्रतिसाद वाचनखुणांमध्ये साठवून ठेवणार आहे.

४. प्रतिवाद्यांच्या माहीतितून आपली मतं सुधारत, रिफाईन आणि डायल्यूट करत जाणे. मंजे शेवटी आपण खूप तिखट भाजी खाऊ शकत असलो तर त्यांना थोडि लींबू पिळून देणे.

विशेष आवडलं

डोल्ट टेक अ‍ॅनिथिंग पर्सनली आणि कोंबडी प्रेमी सारख्या टाळ्यापिटू स्त्रीवादी लोकांना हे एकदा टंकल कि वाटेल ते लिहायला मोकळ असतो.
खरे तर सकाळपासून ह्या धाग्याचे भरतवाक्य ऐकू येत होते तथापि तुमचा हा प्रतिसाद वाचून उत्तर देणे भाग आहे.

खरे तर पिरा तैंनी अत्यंत समर्पक प्रतिसाद देऊन मूळ धाग्याची भूमिका व्यवस्थित मांडली आहे, तरीही पुन्हा त्या वाचल्यास बरे होइल.

पहिल्यांदा ऐकतांना कसलाही पूर्वग्रह नसतोच त्यामुळे अज्ञानाचा वन्ही वगैरे शब्दबंबाळपणा हि हौस असू शकते सत्य नाही. पण पुन्हा ऐकतांना आणि अजून ऐकतांना मुळचा झरा कळतोच त्यातही शितावरून भाताची परीक्षा होऊ शकते.

असो तर एक बाई २०१७ मध्ये जाहीर रित्या लोकांना विशेषत: स्त्रियांना

-चूल आणि मूल हेच प्रायमरी असल्याची शिकवण देतात (बोट्म लाईन तीच)
-आईच एकवच लागेल आणि मला प्रश्न विचारू नका अशी भम्पक दादागिरी ची भाषा करतात
-नवर्याशी जुळवून घे, पाणी पी असली तद्दन कचखाऊ भूमिका स्वीकारायचा सल्ला देतात
-सासूला नवीन सुनेशी बोलतांना खोट बोलायला उद्युक्त करतात
-स्वतच्या ४८ व्या वर्षी केलेल्या एल एल बी च कौतुक आपणच गाऊन दाखवतात आणि फालतू गहिवर आणतात
-स्वताच्याच मुलाच कौतुक जाहीर पाने करतात का तर त्याने आजीला ज्ञानेश्वरी वाचून दाखवली
-स्वताला पुन्हा पुन्हा बोलवा असे आवाहन करतात
-सनी लीयोनी बद्दल कुठल्यातरी कोपर्यातल्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करून त्याचा फोटो छापून आणतात

बर्यापैकी वक्तृत्वावर चार मुद्दे मांडता येतात म्हणून जाहीरपाने हे असले कुचकामी सल्ले देत राहायचे आणि काहीतरी जुनाट विचार लोकांवर लादायचा प्रयत्न करायचे. कशाचा कशाला पत्ता नाही.

त्यांना मुंबई पुणे दिल्ली बंगलोर आदी महानगरातील आयुष्यातील रोजच्या संघर्षाची , (विशेषत: स्त्रियांच्या आणि त्यातही नवीन लग्न झालेल्या मुलींच्या बाबत च्या समस्या ) आणि काडीमात्र जाणीव दिसत नाही आणि अनुभव तर मुळीच वाटत नाही (नवीन लग्न झालेल्या मुलीकडून सासर्यांच्या श्राद्धाचा साग्रसंगीत स्वयपाक ,तो हि एकहाती बहुतेक, अपेक्षित आहे ह्या बैईना) आणि ग्रामीण स्त्रियांना ह्या जुळवून घेण्याचे जे सांगतात त्यात काहीच नवीन नाही (निदान नसाव).

त्यांच्या सामाजिक कार्य आणि तळमळीबद्दल जास्त माहिती नाही पण तरीही असे काही काम करणाऱ्या कुणाचाही करावा तसा मनापासून आदर आहेच. त्यांनी उल्लेख केलेले कायद्याचे गैरवापर हे होत असतीलच पण म्हणून त्याच्या सरसकटीकरण आणि फोफस तत्वज्ञान मांडण्याला आक्षेप आहेत. त्यांची मते आणि विचार ज्यांना मान्य आहेत त्यांनी ते जरूर स्वीकारावेत आणि आपल्या वैयक्तिक परिघात रुजवावेत आणि जमल्यास पुढील पिढीत जोपासावेत.

तथापि आपण जरूर अशा क्रॅक बाईंना सपोर्ट करतांना केवळ विरोधासाठी विरोध करावा आणि त्याचे अपर्णातैन्सार्खेच तत्वज्ञान हि बनवावे मधून मधून आपणच आपल्याच पाठीवर कौतुकाची थाप हि मारून घ्यावी (नंतर तो विनोद होता असहि म्हणता येईल).

पहिल्यांदा ऐकतांना कसलाही पूर्वग्रह नसतोच

मान्य. पण बाईंची कोणतीही दोन वाक्ये स्त्रीवाद्यांचे सगळे पूर्वग्रहदोष प्रवण क्षेत्र अ‍ॅक्टिवेट करायला पुरेशी आहेत.

-चूल आणि मूल हेच प्रायमरी असल्याची शिकवण देतात (बोट्म लाईन तीच)

फूड आणि सस्टेनेबिलिटी हे खरंच प्रायमरी इश्श्यूज आहेत.

-आईच एकवच लागेल आणि मला प्रश्न विचारू नका अशी भम्पक दादागिरी ची भाषा करतात

चूक आहे ते. स्त्रीवाद्यांशी वादात हरायची नाचक्की होऊ नये वा वेळ जाऊ नये म्हणून त्या असं करत असाव्यात.

-नवर्याशी जुळवून घे, पाणी पी असली तद्दन कचखाऊ भूमिका स्वीकारायचा सल्ला देतात

स्त्रीशक्ती बद्दलही बरंच बोलल्यात.

-सासूला नवीन सुनेशी बोलतांना खोट बोलायला उद्युक्त करतात

तुमचा आयडी कोंबडि प्रेमी असणं हे माझ्याशी खोटं बोलणं आहे. असो.

-स्वतच्या ४८ व्या वर्षी केलेल्या एल एल बी च कौतुक आपणच गाऊन दाखवतात आणि फालतू गहिवर आणतात

जनरली या वयात कमी लोकं शिकतात. आणि स्वतःचं कौतुक असणं, गहिवर येणं हे सामान्य आहे. बाय द वे, तुम्हाला कशाचा गहिवर आल्ता ते सांगा मी त्याला फालतू म्हणून झीडकारून दाखवतो. मंजे काय तुमची मतं चूक?

-स्वताच्याच मुलाच कौतुक जाहीर पाने करतात का तर त्याने आजीला ज्ञानेश्वरी वाचून दाखवली

मग काय बडवायला पाहिजे होता यासाठि अशी अपेक्षा आहे का?

-स्वताला पुन्हा पुन्हा बोलवा असे आवाहन करतात

कंपन्या जाहिरातिंनी इतक्या पकवतात म्हणून त्यांचे प्रॉडक्त घेत नाही का तुम्ही? असतात पकाऊ लोक. पण टाळता येत नाहीत.

-सनी लीयोनी बद्दल कुठल्यातरी कोपर्यातल्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करून त्याचा फोटो छापून आणतात

इस्रोच्या चेअरमने (व्यक्तिगत पातळिवर) प्रक्षेपण निट व्हावे म्हणून (आवश्यक त्या बाबींत काही हलगर्जी न करता) बालाजीची पूजा केली म्हणून देशातल्या अनेक शिकल्या सवरल्या गधड्यांनि रान माजवलं होतं. म्हणून तक्रार कशाची करावी याची अक्कल असण्याचा आग्रह त्यांच्यापासून सुरु करायचं कारण नाही. आणि प्रसिद्धिच्या हौसेत काय चूक आहे? आता तुमच्या मिसइंटरप्रिट करायच्या हौसेत काही चूक नसेल तर त्यांना पण समान अधिकार नको का?

त्यांना मुंबई पुणे दिल्ली बंगलोर आदी महानगरातील आयुष्यातील रोजच्या संघर्षाची , (विशेषत: स्त्रियांच्या आणि त्यातही नवीन लग्न झालेल्या मुलींच्या बाबत च्या समस्या ) आणि काडीमात्र जाणीव दिसत नाही आणि अनुभव तर मुळीच वाटत नाही

त्यांच्या समस्यांचा अनुभव का म्हणे असायला पाहिजे? उद्या असंही म्हणाल की त्यांना लॉस अँजिलिस, टोक्यो, मोसूल, लिमा, इ इ जागच्या स्त्रीयांच्या प्रश्नांची कल्पना नाही. काय संबंध आहे. सोलापूरातल्या कंच्यातरी धांदलगावात भाषण द्यायला, त्यांचे प्रश्न सोडवायला मुंबईच्या अनुभवाची अट कशाला?
कौटुंबिक नाती, घरी कष्ट करणे, थोरांचा सम्मान करणे, स्वयंपाक करणे, सांस्कृतिक प्रथा पाळणे (जेणे करून या अपेक्षापूर्तींनंतर संसार नीट चालतील) हे शिकवायला मुंबईची डिग्री कशाला लागते?
प्रत्येक ठिकाणि शहरांचा जीडीपी वाढवायचा अट्टाहास झेपण्यापलिकडचा आहे.

चांगले कार्य केले म्हणुन हे ही ऐकुन घ्यावे अशी कुणाची अपेक्षा नसावी.

अहो, ऐकून घेणे या फ्रेजला त्या मेटॅफोरिक अर्थापूर्वी एक लिटरल अर्थ देखिल आहे. तुम्ही लिटरली घ्या ना हो. ऐकणे म्हणजे कानात वायूच्या मेकॅनिकल वेवज जाणे असे घ्या ना. त्या काय तुमच्या सासू आहेत का कि ध्वनिकंपनंही (इतकी मागास असती तर) सहन न व्हावी?
तुम्हाला एक मनःपूर्वक सांगतो, अपर्णाताईंचे व्हिडिओ ऐकताना मला एका गोष्टीचं अतीव दु:ख झालं. काय? ते मंजे मी "वाहिलेला स्त्रीवादी" नाही. असतो तर माझ्यासाठी हा जबर्‍या कॉमेडी प्रकार राहीला असता नि मी पुनःपुनः पाहीला असता. पण मला त्यांच्या विचारांशी बरीच सिंपथी आहे, म्हणून मी असं हसूच शकत नाही.
दुसरिकडे युट्यूबवर मी बर्‍याच स्त्रीवाद्यांची पेटलेली भाषणं शांतपणे ऐकतो - त्यांचं विचारप्रसारण आणि माझं मनोरंजन एकत्र होतं. बर्‍याच प्रबोधनही करून जातात.
===========================
जर तुम्ही बजरंगदली शिवसैनिक आहात तर अकबरुद्दिन ओवैसीचं भाषण शांतपणे ऐकणं (रक्तदाब, हार्टबिट तिच ठेऊन, कोणतेही स्वगत मधेच चालू न करता, किंवा तोंडातनं कोणता प्रशंसाशब्द न आणता.) एक कला नाही का?

मार्मिक गोडसे's picture

25 Jul 2017 - 9:41 pm | मार्मिक गोडसे

मला काहीही झालं तरी वडीलांच्या मनाप्रमाणेच लग्न करायला हवं. माझं उदाहरण चुकीच्या कारणाने दिलं जायला नको.

आणि समाज भाकरीभोवती गोलगोल फिरतोय किंवा फिरवला जातोय. बॅन करायला हवेत असले विडिओ

मोदक's picture

25 Jul 2017 - 10:33 pm | मोदक

...आणि एकदा बॅन केले की तुम्हीच असहिष्णुता आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे असे बोलायला मोकळे.

;)

मार्मिक गोडसे's picture

25 Jul 2017 - 10:46 pm | मार्मिक गोडसे

सरकारने नव्हे हो समाजाने

अभ्या..'s picture

25 Jul 2017 - 11:37 pm | अभ्या..

बर बर,
सांगितलंय सेक्रेटरीला. करतील ते नळ बंद हं.
या आपण.

बर आज पुण्यात अंजीराचा काय भाव आहे?

अभिदेश's picture

26 Jul 2017 - 2:13 am | अभिदेश

नागपूरला जा संत्री खा , वाळ्याचे पडदे लाऊन पडले राहा आरामात.

अभिजीत अवलिया's picture

26 Jul 2017 - 7:56 am | अभिजीत अवलिया

बाकी ह्या धाग्यावर अरुण जोशी साहेबानी फार नेटाने किल्ला लढवला. अगदी संक्षींची आठवण आली.

कोंबडी प्रेमी,
तुम्हाला कोंबडी आवडते असे तुमच्या आयडीवरून वाटते. त्यामुळे हा धागा काढल्याबद्दल तुम्हाला गावरान कोंबडीचा रस्सा आणि ज्वारीची भाकरी (मी थापलेली नाही नाही बडवलेली) बक्षीस देण्यात येत आहे.

कोंबडी प्रेमी's picture

26 Jul 2017 - 9:37 am | कोंबडी प्रेमी

ती ज्वारीची भाकरी पौर्णिमेच्या चंद्रा सारखी गोल असावी लागते

इथे पदर खोचून तर्जनी प्रत्येक वर ठेका देत हलवली आहे अशी कल्पना करावी

प्रकाश घाटपांडे's picture

26 Jul 2017 - 9:35 am | प्रकाश घाटपांडे

बर मंग आता कुठल्या कुठल्या गोष्टी पुर्ण झाल्या कि स्त्री मुक्ती झाली असे म्हणायचे?

सुबोध खरे's picture

26 Jul 2017 - 10:20 am | सुबोध खरे

एक विचार --
लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालविलेले राज्य
तसेच
स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रीने, स्त्रीची, स्त्रीपासून केलेली मुक्ती

मनिमौ's picture

26 Jul 2017 - 10:21 am | मनिमौ

अजून एक व्हिडिओ बघितला. त्यात त्या म्हणाल्या की आजकाल लग्नात वधूला साडी नेसावायला पुरूष असतो. हे त्यांनी कुठे बघितल आहे देव जाणे. माझ्या आणी मित्र मैत्रीणी नातेवाईक ह्या सर्व लोकाकडच्या लग्नात वधूला तयार करणार्या बायकाच होत्या

हे त्यांनी कुठे बघितल आहे देव जाणे.

हाय क्लास सोसायट्यांत.
मिडलक्लासांना कशीबशी लग्नाची साडी परवडते, नेसवणारा कसा परवडेल?
http://www.beyondthefringe.in/bridal.html

अप्पा जोगळेकर's picture

26 Jul 2017 - 1:28 pm | अप्पा जोगळेकर

पोलकी शिवणारे टेलर तर वर्षानु वर्षे पुरुषच आहेत. साड्या नेसवल्या किंवा उतरवल्या तर काय बिघडले.
ती बाई आणि पुरुष बघून घेतील.
अपर्णाताईंचा टेलर स्त्री आहे का ?

शिवणयंत्र यायच्या अगोदरपासून?

पिरा ताईंच्या शब्दा - शब्दाशी सहमत. माझ्या शेजार-पाजारी आणि नातेवाईकांमध्ये टीव्ही वरच्या सासू - सुनांच्या सिरिअल्स वरून सुद्द्धा घरच्या सुनेला बोलत असल्याची उदाहरणं आहेत. आणि आपल्या समाजात (सगळीकडेच खरं तर , त्या ट्रम्प चे वोटर्स, ते विविध बाबा-बापूंचे शिष्य, एमवे मध्ये अडकलेले ) अनेक कारणांनी प्रचंड भारावून जाणारी माणसं भरपूर आहेत. या लोकांना बरेचदा लॉजिकल विचार करता येत नसतो किंवा करायचा नसतो. किती तरी वेळा बाहेरून आलेल्या मुलीने कुठलाही मत मांडलेलं अगदी शिकलेल्या लोकांना पण आवडत नाही.

कितीतरी घरांमध्ये लहान मुलं ऐकत नसेल, तर पटकन म्हणतात, तो बघ शेजारचा कसा वागतो / किंवा टीव्ही मधला मुलगा बघ किती शहाणा आहे. त्यामागे लॉजिक नसतं, फक्त त्या मुलाने आपलं ऐकावं हि इचछा असते. आणि त्याच वेळी त्या मुलाने आपलं मनापासून ऐकावं म्हणून प्रयत्न करायची, किंवा त्याला समजून घ्यायची तयारी नसते. किंवा अगदी कितीतरी वेळा बॉस फक्त बॉस आहे म्हणून त्याला / त्याच्या बरोबर सांगण्याला नाव ठेवणारी लोक आसपास असतात. तो सांगतोय त्यात लॉजिक आहे, भले ते आपल्या मना प्रमाणे नसलं / आपल्याला जास्त कष्ट पडणार असलं तरीही बरोबर आहे, एवढा सारासार विचार कोणाला करायची इचछा नसते - खरंतर ते सोयीचं पण नसतं. त्यापेक्षा नावं ठेवणं हा अतिशय सोपा पर्याय उपलब्ध असतो

सुनेच्या बाबतीत अगदी शिकलेल्या घरांमध्ये, एरवी स्वभावाला चांगल्या असणाऱ्या माणसांमध्ये सुद्दा हक्क गाजवायची, तिने सगळ्या गोष्टीत आपलं ऐकलं पाहिजे हि वृत्ती उफाळून येते. आणि आजकाल मुलीना माहेरी नीट वागवत असल्यामुळे, अशा वागण्याशी पूर्वी सारखं जुळवून (सोशिक, सहनशील इ इ ) वागण्याची सवय नसते. वेग-वेगळी बघितली तर सासरची माणसं पण वाईट नसतात आणि ती सून पण वाईट नसते. एकूण परिस्तिथि - ज्यात ह्या टीव्ही सिरिअल्स, शेजार पाजारी आणि नात्यातली भोचक मंडळी आणि या अपर्णा ताईंसारखे बाईला आरोपी ठरवणारे (किंवा टोकाचे फेमिनिस्ट ) विडिओ चुकीची मत बनवायला करणीभून बनू शकतात. कारण ते प्रत्येक पार्टी ला स्वतःच्या सोयीने वापरता येतात.

एखाद्याला खरंच घर सावरायचं असेल, तर त्या माणसाने घरातल्या प्रत्येक माणसाकडून चूक होऊ शकते आणि त्यामुळे एक संसार मोडू शकतो हे गृहीत धरून असे विडिओ बनवावेत. पण बरेचदा तुम्हाला टार्गेट ऑडियन्स कुठलाच मिळत नाही कारण तुम्ही सगळ्यांनाच आरसा दाखवता आणि तो कोणालाच बघायचा नसतो. त्यापेक्षा टोकाचं फेमिनिस्ट होणं किंवा अपर्णा ताईंसारखं दुसरं टोक गाठणं सोयीचं पडत.

अवांतर - सासू-सासर्यांना नाव ठेवणाऱ्या / पटत नाही म्हणून घटस्फोट घेणाऱ्या मुलीला (सरसकट) चूक म्हणणाऱ्या पुरुषांपैकी किती लोक स्वतःच्या कंपनीला / बॉस ला शिव्या घालत असतील किंवा छोट्या छोट्या कारणावरून नोकरी सोडत असतील देव जाणे :P .