रश्दी अबाझा

खडूस काका's picture
खडूस काका in जनातलं, मनातलं
25 Jul 2017 - 6:00 pm

रश्दी अबाझाचा जन्म तेरेझा लुईगी, जी इटालियन होती आणि सैद अबाझा, जो जन्माने इजिप्तीयन होता या दांपत्याच्या पोटी ३ ऑगस्ट १९२६ ला झाला. रश्दी अबाझाचे कुटुंब खूप श्रीमंत होते आणि इजिप्तच्या राजकारणात मोठे स्थान होते. रश्दी च्या कुटुंबात बरेच लोक राजकारण, वकिली, पत्रकार, लेखक होते, पण त्याला शरीर सौष्ठव मध्ये रस होता. त्याचे अरबी सोबत इंग्रजी, स्पॅनिश, इटालियन, फ्रेंच या भाषांन्वर प्रभुत्व होते.

१९४८ मध्ये रश्दी एका कॅसिनो मध्ये बिलियर्ड्स खेळत असताना त्याला कमाल बरकत नावाच्या दिग्दर्शकाने पाहिले, त्याला पाहून कमाल इतका प्रभावित झाला कि आपल्या चित्रपटात प्रमुख भमिका दिली. त्या चित्रपटाचे नाव होते " द यंग मिलिनिअर (el Millionnairah el saghîrah ). हा चित्रपट कोसळला आणि त्याचवेळी रश्दीच्या वडिलांनी त्याला हा मार्ग सोडायला सांगितला कारण त्यांचे कुटुंब पुढारलेले होते आणि चित्रपटात काम करणे कमीपणाचे समजले जाई. त्याने ते ऐकले नाही (त्याला आईचा पाठींबा होता).

पुढे ३ वर्षात त्याने ४ चित्रपटात काम केले, पण दुर्दैवाने चारही चित्रपट कोसळले. रश्दी इटलीला निघून गेला आणि तिथेच चित्रपटात छोट्या भूमिका करत राहिला. फारसे काही हाती लागले नाही म्हणून तो परत इजिप्तला आला आणि जोडधंदे म्हणून सुएझ कालव्यावर काम केले, हॉटेल चालवून बघितले.

१९५८ मध्ये ईद एडिन झुल्फिकार ने अ वूमन ऑन द रोड (Imra’h fî-l-tarîq) या चित्रपटात रश्दीला नायकाची भूमिका दिली, आणि हा त्याच्या जीवनातला टूर्निन्ग पॉईंट ठरला. हा चित्रपट खूप चालला. त्यानंतर आलेल्या चित्रपटात, द सेकंड मॅन (el Ragoul el thânî), त्याने खलनायक रंगवला आणि खलनायकाची इमेज बदलून टाकली. तो रातोरात मोठा कलाकार झाला. १९४८ ते १९८० पर्यंत त्याने १०० हुन अधिक चित्रपटात काम केले. टेन कमांडर, तारीक अल अमल, अपॉइंटमेंट विथ लव्ह यातल्या भूमिका खूप गाजल्या. त्याची गणती जगातल्या सुंदर पुरुषांमध्ये होऊ लागली

त्याने राजकारण विषयावर बनलेल्या बर्याच चित्रपटात अफलातून भूमिका केल्या, खलनायक रंगवला, विनोदी चित्रपटात काम केले. त्याची 5 लग्ने झाली. सबाह, तहेया, समीया गमाल, नबीला आबझा आणि बार्बारा या त्याच्या पत्नी, बार्बारा पासून त्याला एक मुलगी झाली, किस्मत.

जुलै २७, १९८० ला वयाच्या ५३ व्या वर्षी त्याचा कॅन्सरने मृत्यू झाला
1

2

3

4

कलाजीवनमानलेख

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

25 Jul 2017 - 6:44 pm | ज्योति अळवणी

अनपेक्षित वेगळं आयुष्य

अभ्या..'s picture

25 Jul 2017 - 6:51 pm | अभ्या..

रवि शास्त्रीगत चेहराय.

त्याची गणती जगातल्या सुंदर पुरुषांमध्ये होऊ लागली

असणारच. इटालिअन आई आणि इजिप्शिअन बाप हे कॉम्बो खतराच आहे म्हणा अ‍ॅनॉटोमीच्या दॄष्टीने.

रामदास२९'s picture

27 Jul 2017 - 2:01 pm | रामदास२९

इटालिअन आई आणि इजिप्शिअन बाप हे कॉम्बो खतराच आहे म्हणा अ‍ॅनॉटोमीच्या दॄष्टीने.

बरोबर ..

तुषार काळभोर's picture

29 Jul 2017 - 10:30 am | तुषार काळभोर

सही पकडे है!

अभ्या भौ अगदी हेच माझ्या मनात आले...

पैसा's picture

28 Jul 2017 - 3:34 pm | पैसा

ओळख आवडली