आमचं पानीपत- द बिगीनिंग.

भीमराव's picture
भीमराव in जनातलं, मनातलं
21 Jul 2017 - 6:50 pm

आमच्या गोष्टीची सुरुवात होते ती एका चकाचक मल्टीन्याशनल कंपनी पासुन,
अँपरेंटीस अँक्ट च्या कृपेने आमचा येथे प्रवेश झाला हे सुरुवातीलाच सांगुन टाकलेलं बरं,
आमचं आव्या मी अन तात्या या सर्वांच्या एका असामान्य संघर्षाची ही कथा, कंपनी मधेच आमची ओळख झालेली, तात्या व मी एकाच डिपार्टमेंट साठी सिलेक्ट झालो होतो, तर आव्याची तात्यासोबत कँटीन मधे ओळख झाली होती,
आमचं आव्या सांगलीच्या कुठल्याशा कॉलेज मधुन यांत्रिक अभियंता झालेलं, मी सोलापुरातुन विद्युत अभियांत्रीकी शिकुन आलेलो, आणि आमच्यामधले सर्वात अँक्टीव, मोस्ट हँडसम असे तात्याबा पुण्यात शिकलेले होते,
ग्रामीण भागतल्या कॉलेजात ईंजिनेरींग शिकणाऱ्या तमाम कार्ट्यांच १ स्वप्न असतय- पुण्यात जायचं. आव्या आणी मी त्याच स्वप्नाच्या पदराला धरुन आपोआप आपापल्या गावातनं पुण्याला स्थलांतरीत झालेलो, स्ट्रगलींग च्या काळात कधी पावणे रावळे तर कधी एखाद्या मित्राची रुम असे दिवस ढकललेले, जॉब लागल्यानंतर गरज होती एखाद्या हक्काच्या निवाऱ्याची, तसे आम्ही हॉस्टेल कार्यकर्ते त्यामुळे बादलीयुद्धासारखेच रम्य दिवस आम्हीही जगलो आहोत, रुम व रुममेटचं कौतुक, लागेबांधे, रुसवे फुगवे हे सारं कॉलेजच्या गेटच्या आतच सोडुन पुण्यनगरीत दाखल झालेले आम्ही 'पुण्याच्या वळचणीला' स्थीरावलो.
आमचे एक नातलग यांचे कृपेने त्यांच्याच एका जवळच्या मित्राची एक रुम आम्हाला पसंद पडली, एक ऐसपैस हॉल, किचेन व बाहेर भलीमोठी गँलरी बास की राव बँचलर पोरांना आणि काय पाहीजे?
रुमचा जीना मात्र खड्या चढणीचा होता, त्यामुळे चढऊतर करताना आम्हांला रॉकक्लायंबींग चा फुकट अनुभव भेटत असे.
नव्या नवरीचे नऊ दिवस असतात तसेच नव्या रुममेट्स चे सुद्धा असतात, एकमेकांचे स्वभाव जाणवु न देता दुसऱ्याचे अंदाज बांधायचे स्पाय धंदे, खोटंखोटं मनमिळाऊ वागणं, रुम झाडुन काढणं ही त्याची लक्षणं. आव्याकडे पहिल्यांदाच पाहिल्यावर माझ्या मनात आलेला विचार- हि ऊडाणटप्पु दिसतय. फर्स्ट इंप्रेशन ईज लास्ट इंप्रेशन नावाच्या आंग्लदेशी म्हणीला मात्र ह्यो माणुस कायम चॉलेंज करत आला आहे, मनमिळाऊ, पापभिरु,सिन्सीयर, कट्टर शिवप्रेमी आसलं आमचं आव्या दिसाय दहाव्वीच्या पोरासारखं, अंगाचा बारकाटपणा झाकुन जावा म्हणुन आव्या गच्चमगच दाढी वाढवायचा, आणि त्यामुळं ऊडाणटप्पु दिसायचा.
तात्या मात्र महाकाव्याचा विषय होता. याच्या मोबाईलमधे एकाचढ एक ईंग्लीश गाणी, ज्यांच्या गायकांची नावं सुद्धा आम्हाला ऊच्चारता येत नसत, तात्या मात्र लाऊडस्पीकर लाऊन गुणगुणायचा त्यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला सुरुवातीला आदरयुक्त दरारा वाटायचा,
सुरुवातीला आम्हाला वाटायचं नवीन ठिकाणी आल्यामुळं होतं थोडं. पण हा तात्या मात्र कायम स्वरुपी हँग होता, हा बाबा स्वतःच्या गोष्टी स्वतःच रुममधे हरवायचा, आणि त्यानंतर तासभर बाकींच्याचं डोकं खात बसायचा. तो 'काय यार' बोलला की आव्या न मी समजुन जायचो हा आता तासभर नक्की रडणार, त्याला एकच वाक्या किमान चार वेळा बोलायची सुद्धा सवय होती. त्याच्या 'काय यार' ला आम्ही रडारड म्हाणायचो.
कंपनीत पहिले तिन चार महिणे हँड्सऑन वर्क एक्सपीरेंस च्या नावाखाली आम्हाला असेंबली लाईनला हेल्पर बनवलं गेलं आणि आमचा मल्टीनँशनल ड्रीम्स चा गॉगल खाळकण फुटला. मि निमुटपणानं आलेलं काम करु लागलो, तात्याच्या मात्र ते स्वभावात बसणारं नव्हतं, हार्ड वर्क मुळे कावलेला तात्या रुममधे आल्यावर 'काय यार' करुन आमच्या डोक्याचं हनीमुन करायचा.
आमच्या तात्याला विद्युत ऊपकरणांची विशेष आवड. त्यामुळे तो दिवसाच्या लख्ख ऊजेडात सुद्धा रुममधल्या साऱ्या लायटी लाऊन बसायचा. रुममधे एकुलती एक मोडकी कॉट होती, तिच्यावर तात्यानं पहिल्याच दिवशी रुमाल टाकुन कब्जा केलेला, तिथं झोपुन तो निवांत वेळात फेसबुक वरच्या एंजल्स ला रिक्वेस्टा सोडत बसायचा.
रुम मधे पोरं रहायला आलेलीशी पाहुन मालकानं १ बजाज कंपनीचा फँन आम्हाला घेऊन दिला, सुरुवातीला निट्ट चालला, नंतर नंतर मात्र तो इतका स्वार्थी भावनेनं फिरायचा की त्याचा स्वतःचा स्वतःला देखील वारा पुरत नसावा, आम्हांला आजतागायत त्याचा कधीच ऊपयोग झाला नाही. फँन मुळे तात्याच्या 'काय यार' ची तिव्रता मात्र वाढली.
माझे छंद निराळे होते, शनिवार- रवीवार, सुट्टी किंवा मी कामावर नसलेला प्रत्येक दिवस मी डेडबॉडी सारखा अंथरुनावर निपचीत पडलेला असे. भाषेची गरज नसनारे ईंग्लीश पिच्चर मि फावल्या वेळात पाहत असे.
पुणे व पुण्याची वळचण दोन्ही महानगरांमधे रुममालकांच्या स्वभावात कमालीचं साम्य आहे, तुम्ही किती लोक रुम मधे राहणार यावर यांचे जागाभाडे ठरते. अर्थात ईथल्या निम्म्या जनतेचं पोटापाण्याचं साधन रुम भाड्याने देणे व मेस चालवने हेच आहे म्हणा.
त्याचं झालं आसं की माझा कॉलेजचा एक मित्र चाकण ला आमचापेक्षा चकाचक जापानी कंपनीमधे काम करत होता. बिच्याऱ्याची रहायची मात्र अडचण होत होती, रुम चं भाडं सुद्धा आम्हाला जरा जास्तच वाटत होतं, म्हणुन आम्ही त्याला रुम मधे घेतला. रुम मालकाला प्रामाणिकपने हे सांगीतल्यावर मात्र त्या महात्म्याने आमचे भाडे हजार रुपयांनी वाढवले.
त्या नव्या माणसाचं नाव चंदु पठाण. तसा हा विरशैव लिंगायत धर्मीय आहे, पण कॉलेज मधे त्याचं हे नामकरण झालेलं. तो आपल्याला त्यांच्या कंपनीत रेफरंस देणार आहे या वचनावर मी तात्या व आव्याची परवानगी त्याला रुम मधे आणण्यासाठी घेतली होती. तसा रडारडीत हा तात्याच्या वरचढ होता, ते मात्र मला एकट्यालाच माहीत होतं.
कंपनी- काम, रुमवरचा धिंगाना, मजाकमस्ती, कधीकधी संध्याकाळी पोरी पहायला जाणे, आणि यातली किमान एक तरी भेटावी याची स्वप्न पाहत रात्र घालवने, परत कामाला जाने.
एकंदरीत आमचं रुटीन मस्त चाललं होतं तात्या आणि चंदु दोघांच्या ही स्वभावाला सारे सरावले होते. आणि अचानक आमच्या प्रायवेट गाडीमध्ये फुकट प्रवास करणाऱ्या नव्या सहप्रवाशाचं आगमन झालं.............(रहिल्यालं पुढच्या वेळी)

(प्रस्तुत लेखासाठी श्री आव्या यांचे विशेष सहकार्याबद्दल आभार.)

संस्कृतीजीवनमानप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

21 Jul 2017 - 7:04 pm | आदूबाळ

वाचतोय! पुभाप्र!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jul 2017 - 7:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय. छान लिहिलय पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

-दिलीप बिरुटे

उगा काहितरीच's picture

21 Jul 2017 - 7:50 pm | उगा काहितरीच

बिटवीन द लाईन्स मस्त आहेत . ज्याला झेपलं त्याच्यासाठी ;-)

अमितदादा's picture

22 Jul 2017 - 1:19 am | अमितदादा

भारीच ना राव ... येऊद्या अजून

ज्योति अळवणी's picture

22 Jul 2017 - 1:26 am | ज्योति अळवणी

मस्त

चांदणे संदीप's picture

22 Jul 2017 - 1:33 am | चांदणे संदीप

कुटशी व्हताव इतके दिस?
मस्त लिव्लय!
पुभाप्र!

Sandy

कंजूस's picture

22 Jul 2017 - 7:28 am | कंजूस

झालं.............(रहिल्यालं पुढच्या वेळी)
:)
:)

आदुसाहेब, सर, उगा, अमितदादा, संदिपदादा, ज्योती तै, व कंजुससाहेब सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद

लॉरी टांगटूंगकर's picture

22 Jul 2017 - 10:00 am | लॉरी टांगटूंगकर

लै भारी वाटतं आहे.. पुभालटा

तुषार काळभोर's picture

22 Jul 2017 - 10:57 am | तुषार काळभोर

>>>>एक्सपीरेंस च्या नावाखाली आम्हाला असेंबली लाईनला हेल्पर बनवलं गेलं आणि आमचा मल्टीनँशनल ड्रीम्स चा गॉगल खाळकण फुटला
ओह!!
मला वाटलं हे फक्त आमच्याच यमेनशीत असतं...
हे तर पुण्यातलं ग्लोबल वास्तव दिसतंय.

अभ्या..'s picture

22 Jul 2017 - 12:17 pm | अभ्या..

बेस्ट बेस्ट,
रिक्वेस्टा लैच आवडल्या.
जरा सोलापुरातून आलात तर द्या की ढोस, वाटू दे जरा " कडू सोलापूरचंय बे"

त्यातल्या त्यात निम्म्या पुण्याचा हिशोब तर लै भारी.
सोलापूरकरांच्या भाड्यावर अन मेशीवर जगतात म्हणे. ;)

डिक्टो सेम अनुभवलं आहे ६ वर्ष.

लग्न ठरले होते तेव्हा बायकोला एकच अपेक्षा सांगितली होती "बाई ग मेस च खायची वेळ फक्त आणू आयुष्यात परत."

मेथीत बटाटा, वांग्यात कोबी, फ्लोवारात मटकी, भेंडीत दोडका काय काय भयानक प्रकार होते.

आमच्या घरमालकाने डिपॉजिट पण माघारी दिले नाही.

विशुमित's picture

22 Jul 2017 - 4:46 pm | विशुमित

"बाई ग मेस च खायची वेळ फक्त आणू नको आयुष्यात परत.

पद्मावति's picture

22 Jul 2017 - 12:49 pm | पद्मावति

मस्तच!
पु.भा.प्र.

संजय पाटिल's picture

22 Jul 2017 - 6:19 pm | संजय पाटिल

छान खुसखूशीत लेखन...
पु.भा.प्र.

जव्हेरगंज's picture

23 Jul 2017 - 7:07 pm | जव्हेरगंज

प्रामाणिक आणि जबरी!!

आवडलेच!!

निशाचर's picture

23 Jul 2017 - 7:42 pm | निशाचर

वाचतेय. पुभाप्र!

अजया's picture

23 Jul 2017 - 7:50 pm | अजया

मस्त लिहिलंय. पुभाप्र.

प्रमोद देर्देकर's picture

23 Jul 2017 - 9:16 pm | प्रमोद देर्देकर

लय भारी भावा येवूदे अजुन
आणि ती (रहिल्यालं पुढच्या वेळी) ही ओळ
प्रत्येक भागाच्या शेवटी यायला पायजेल तेव्हढ बघा म्हण्जे झालं.

भीमराव's picture

24 Jul 2017 - 7:35 am | भीमराव

लॉरी भाऊ, पैलवान साब, अभ्यादादा, जव्हेर भाऊ, विशुमित, निशाचर, पद्मातै, पाटिलसाहेब, अजया ताई, देर्देकर साहेब सर्वांचे आभार,

अभिजीत अवलिया's picture

24 Jul 2017 - 7:51 am | अभिजीत अवलिया

मस्त सुरवात.