कुर्कुरीत रवा डोसा

पियुशा's picture
पियुशा in पाककृती
11 Jul 2017 - 3:16 pm

राम राम मिपाकर्स,
खुप दिसानी उगवले मिपावर ;)
नुकतच आमचं शुभ मंगल उरकल्यामुळे घर गृहस्थीतुन वेळ मिळणा झाला :)
मग मिपावर येन दूरच .. तरी अधून मधून मिपावर चक्कर टाकायचे आता कळतय अरे संसार संसार ;)
तर असो. आता आलेच आहे तर एक रेसेपी देऊनच जाते :)
घ्या साहित्य :
रवा १ वाटी
तांदुळाची पिठी अर्धा वाटी
२ चमचे मैदा ( ऑप्शनल ) कुणी बेसन पण वापरतात
जिरे - चमचा भर
आलं पेस्ट - अर्धा चमचा( ऑप्शनल )
दही - ३ चमचे
मीठ - चवीनुसार
हिरवी मिरची बारीक कापून किंवा पेस्टुन तुमच्या ऐपतीनुसार ;)
कृती :
वरील सर्व साहित्य पाणी घालून नीट पातळ मिक्स करून घ्या. रवा पाणी शोषून घेतो म्हणून मिश्रण घट्ट वाटल्यास ऐन वेळी जास्तिच पाणी घालून पातळ करू शकता आता हे मिश्रण कमीत कमी अर्धा तास सेट व्हायला ठेवून द्या.
आता नॉनस्टिक पॅनवर थोडं तेल पसरवून हे मिश्रण डावाने पूर्ण पॅन भर एकसारखे ओता . मिश्रण पातळ असेल तरच डोसा कुरकुरीत होईल
मिश्रण नीट ओतणे हीच खरी गोम आहे एकदा हे जमले कि हुश्श करा ;)
एक बाजू खरपूस झाली तरी छान लागतो हा डोसा :) सांबार , चटणी सोबत किंवा तसाही ट्राय करून पहा.
आता हेच मिश्रण घट्ट सर ठेवून यात कांदा उकडलेला बटाटा कोथिंबीर घातली कि झाला तुमचा रवा उत्तप्पा :)
d
लोभ असावा.....
आप्लिच पिवशी उर्फ जिल्बुशा :)

प्रतिक्रिया

झकास.. करुन बघेन हा रवा डोसा.. :)

पद्मावति's picture

11 Jul 2017 - 4:39 pm | पद्मावति

मस्तच!

जेनी...'s picture

11 Jul 2017 - 6:44 pm | जेनी...

भारीय ग्ग ! ...

वा वा, पोरगी संसाराला लागली हो. छान च झालाय डोसा.

सुबोध खरे's picture

11 Jul 2017 - 7:08 pm | सुबोध खरे

अभिनंदन
दोनाचे चार हात झाल्याबद्दल.
आणि
अशी सुरेख पाककृती टाकल्याबद्दल

रेसिपी आवडली गं सौ पियुषा. फोटूही छान आलाय. तू अगदी संसारी मुलीसारखी बोलायला लागलीस की! ;)
लग्नाला वर्ष होईपर्यंत प्रत्येक रेसिपीबरोबर एकेक उखाणा येऊ दे.

मितान's picture

11 Jul 2017 - 7:59 pm | मितान

+ १११
उखाणा आलाच पायजे :)

स्वाती दिनेश's picture

16 Jul 2017 - 12:41 pm | स्वाती दिनेश

रेवतीशी बाडिस..
स्वाती

सूड's picture

11 Jul 2017 - 8:06 pm | सूड

अरे वा!! झालं का लगीन. डावीकडची आमटी संदर दिसत्ये.

त्रिवेणी's picture

11 Jul 2017 - 8:32 pm | त्रिवेणी

'नवीन' पाककृती मस्तच एकदम. अशाच नवीन,नवीन पाककृती शिकून घे सासू बै कडून आणि इकडे रेसिपी टाकत जा.

पिलीयन रायडर's picture

11 Jul 2017 - 8:40 pm | पिलीयन रायडर

सौ.पियुशा* ह्यांची पाकृ आवडली. अन्नपुर्णा प्रसन्न आहे हो मुलीवर!

* / माझी आई, माझ्या लनानंतर जिथे जिथे माझा लेखी उल्लेख असेल तिथे, अगदी फ्रिजवर लावलेल्या नोटवर सुद्धा, "सौ" असं लावायची. अत्यंत इरिटेटिंग प्रकार. म्हणून तुझ्यासाठी आवर्जुन वापरण्यात येईल! =))

त्रिवेणी's picture

11 Jul 2017 - 8:54 pm | त्रिवेणी

माझ्या माहेरी पण माझ्या नावापुढे असच लिहितात.
एकदा तर सौ.दीदी अस लिहून कहरच केलेला.

पियुशा's picture

11 Jul 2017 - 8:47 pm | पियुशा

सुडा ,झालं हो झाल .......तुम्ही लाडू कधी देता? " डु आयडी , जिल्बुषा,पिवशी न पियुशा, मिपावर केला लेखनाचा श्री गणेशा, घातला धींगाना केल्या गमती जमती , मिपावरचे सख्या न सोबती। "नवीन" रावांचे घेते नाव आता उखाना आठवत नाही राव ;) बाकी शुभेच्छा बद्दल धँस हो :)

१ जुलैला नवरा 'नवीन' असलेलं लगीन अटेंड केलं मी, कही यह वह तो नही?

ने नाय नाय आम्ही 30 मार्च ला च उरकल :)

हुश्श !! नायतर हा आय्डी इतक्या जवळच्या ओळखीला आहे की काय विचाराने जीव अधांतरी गेला होता. =))

अजया's picture

11 Jul 2017 - 8:47 pm | अजया

पिवडे हे काय नवीन?
छान नवीन वाटतेय पाकृ.
नवीन नवीन लग्न झालंय ते कळतंय हां लिवण्यातून.
नवीन संसारात पाऊल टाकल्याबद्दल शुभेच्छा बर्र का!

लोलम लोल;) तुला मिस केले बाई लग्नात ;))

त्रिवेणी's picture

11 Jul 2017 - 9:23 pm | त्रिवेणी

राग राग झालेली बाहुली

मनिमौ's picture

11 Jul 2017 - 9:10 pm | मनिमौ

नव नवीन पाककृती येऊदे. बादवे सुगरण तू आहेसच आणी हा फोटू बघून सुगृहीणी झाल्याची खात्री पटली

नविन पाककृती सुरेख हो पिवडे!

नविन पाककृती सुरेख हो पिवडे!

पैसा's picture

11 Jul 2017 - 10:26 pm | पैसा

मस्त पाकृ!

दशानन's picture

11 Jul 2017 - 10:39 pm | दशानन

पाककृती छान!

* पण आलेलेल्या प्रतिसादातील एक प्रतिसाद कळला तर शप्पथ!!

अभ्या..'s picture

11 Jul 2017 - 11:07 pm | अभ्या..

छानच रेशिपी ग पिवशे.
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
रेशीपीतले तू स्वतः काय काय केले ? ;)

विशाखा राऊत's picture

12 Jul 2017 - 3:21 am | विशाखा राऊत

नवीन नवनधुची नवीन रेसेपी भारी आहे ;)

विशाखा राऊत's picture

12 Jul 2017 - 3:22 am | विशाखा राऊत

नववधुची **

रुपी's picture

12 Jul 2017 - 3:37 am | रुपी

मस्त पाकृ!
घरगृहस्थीसाठी शुभेच्छा :)

पाकृ आणि उखाणे टाकता टाकता लेखनही थोडं शुद्ध व्हायला लागलंय ;)

अर्र पिशवी सुद्द लिहायला लागली तर चाहत्यांचे काय होणार :(
- पिशवी असुद्दलेखन चाहता संघाकडून

कौशी's picture

12 Jul 2017 - 7:07 am | कौशी

लग्नाच्या शुभेच्छा पियु...

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jul 2017 - 7:14 am | अत्रुप्त आत्मा

यावेळी जिल्बी नसून चक्क डोसा निघाला! =))
धन्य धन्य गो जिल्बुषा... धन्य !
(तरिही पाकं क्रुतीत जिल्बीसारखं गोल गोल फिरवणं आलंच आहे! =)) )

प्रचेतस's picture

12 Jul 2017 - 8:28 am | प्रचेतस

शिकायली पिवशी आता. :)

सस्नेह's picture

12 Jul 2017 - 12:41 pm | सस्नेह

सौ. पिव्शी नुसती संसारीच नव्हे तर सुगृहिणी सुद्धा झाली हे पाहोन आणंद जाहला . डोसा बरीक आणिक जरा पातळ हवा होता !
सौ. पिवशी हीस अणेक आशीर्वाद ( त्यामध्ये ...पुत्रा/कन्या सौ..... भव, हाही इनक्लुड आहे !) :D

सुबोध खरे's picture

18 Jul 2017 - 7:57 pm | सुबोध खरे

आमची आजी म्हणायची
लग्न एक वर्ष होईपर्यंत नवीन समजलं जातं. म्हणून त्या मंगळसूत्राच्या वाट्या पण उलट्या घालतात
(मेडिकल ला इंटर्न शिप असते तसं.).
या एक वर्षात मुलीने चांगला स्वयंपाक करायला शिकून घ्यावा
नाही तर
नवऱ्याला आपण जे शिजवू ते मुकाटपणे गिळण्याची सवय लावावी.
( नवरे नव्या नव्हाळीच्या पहिल्या वर्षात बायकोचं सर्व काही ऐकतात )
म्हणजे पुढे संसार सुखाचा होतो

पहिला पर्याय अवलंबून बघतेय सध्या ;) नायतर दुसरा पर्याय आहेच हाकानाका ;)

नूतन सावंत's picture

14 Jul 2017 - 12:27 pm | नूतन सावंत

छान नवीन पाककृती,
स्नेहनकिता ,असं काय ग ?ती नवीन शिकतेय ना?पुढच्या वेळचा होईल हो पातळ डोसा.

अप्पा जोगळेकर's picture

18 Jul 2017 - 6:51 pm | अप्पा जोगळेकर

छान. सांबार, चटणी चा फोटो मस्त.
मैदा किंवा बेसन नाही वापरले तरी चालते.
ते रवा उत्तप्पाचे माहित नव्हते.