अनैतिक व्यापार पद्धती कशा हेराव्या ?

वकील साहेब's picture
वकील साहेब in काथ्याकूट
6 Jul 2017 - 7:05 pm
गाभा: 

आजच्या समाजात आपण हर घडीला कोणाचे ना कोणाचे ग्राहक असतो. आणि तो आपल्याला मस्तपैकी गिर्हाईक बनवत असतो. आपण जी वस्तू किंवा सेवा खरेदी करत असतो त्याची योग्य व रास्त किंमत मोजायला आपण तयार असतो. परंतु आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन व्यापारी आपली लुट करतो. हि गोष्ट कधी कधी आपल्या लक्षात येते तर अनेकदा येतही नाही. याची काही उदाहरणे -

१) आपल्याला एखाद्या विशिष्ट ठिकाणी म्हणजे समजा ६0 कि मी अंतरावर जायचे असेल तर आपण फक्त तेथे सोडन्या साठी कार ठरवतो. कार वाला जाण्या येण्याचे १२० किमी गृहीत धरून त्याचे दर सांगतो एसी कार १२ रु प्र.की.मी. आणि विना एसी कार ११ रु प्र.कि.मी. उन्हाचा त्रास नको म्हणून आपण एसी कार ठरवतो आणि १२ रुपये प्रमाणे १२० किमी चे १४४० देऊन मोकळे होतो. परंतु जातांना जरी एसी गाडी वापरली तरी परतीच्या प्रवासाची आकारणी एसी दरा प्रमाणे करण्याची काहीच गरज नव्हती हे आपल्या लक्षातच येत नाही.

२) एखाद्या प्रेक्षणीय स्थळी गेल्यावर आपण गाईड ठरवतो. तेव्हा आपण त्याला विचारतो कि बाबा तू येथे आम्हाला काय काय दाखवशील. तर तो हॉटेलच्या सराईत वेटर प्रमाणे एका दमात सर्व स्थळांची यादी सांगून टाकतो. आपण फक्त पहिले तीन नावे लक्षपूर्वक ऐकतो. नंतरची नावे काही लक्षात राहत नाहीत. मग तो आपल्याला जवळची २-४ ठिकाणे दाखवून "देखणे लायक बस इतनाही था" असे सांगून यात्रा आटोपती घेतो.

३) जीएसटी मध्ये लागू नसलेली सुद्धा एखादी गोष्ट हल्ली आपल्याला जीएसटी च्या नावाखाली काही रुपयांनी महाग विकली जात आहे.

तर विचारायचा मुद्दा काय कि " जागो ग्राहक जागो " यात समाविष्ट होणारे भिन्न भिन्न व्यवसायातील असे अजून किती तरी मुद्दे असू शकतात कि ज्यांच्यावर चर्चा घडल्याने आपण स्वत:ला "गिर्हाईक " बनवण्या पासून वाचवू शकतो. अशी काही माहिती, अनुभव तज्ञांनी येथे इतरांना वाटावे ही अपेक्षा

प्रतिक्रिया

एकुलता एक डॉन's picture

6 Jul 2017 - 7:11 pm | एकुलता एक डॉन

jio मुळे टेलिकॉम कंपनीचे दर खूप कमी झाले तरी फायद्यात आहेत ,हे कोणी विसेल्शन करू शकेल ?

दीपक११७७'s picture

6 Jul 2017 - 11:53 pm | दीपक११७७

आता अापण तिनच लोकांच्या कब्जात आहोत. Airtel, vadafone and Reliance. फक्त डाटा चे रेट स्पर्धात्मक आहेत. बाकी सगळं as it was च आहे.
आता फक्त ह्या तिघांन मध्ये छुपी युती कधी होते हेच पहायचे आहे, ती एकदा झाली की लगेच ग्राहकांचा फुटबाॅल होणार. इकडुन तीकडे आणि तिकडुन इकडे portability. जाऊन जाऊन जाणार कोठे.
:-D :-D

अनैतिक?? नीतिमत्ता ही फक्त विक्रेत्यानेच पाळायची असते का?

वयाने लहान / अपरिपक्व दुकानदार बघून त्याला फाटक्या नोटा सरकवणे, नमुन्याच्या नावाखाली शेंगा फोडून तोंडात टाकणे, भेंडीची टोकं मोडणे या व याच्यासारख्या अनेक लीळा अनैतिक नाहीत का?

सुबोध खरे's picture

7 Jul 2017 - 10:00 am | सुबोध खरे

आपण सोडून इतर सर्व लोक चोर आहेत हि साधारण भावना भारतीयांत रुजलेली आहे आणि त्यातून कम्युनिस्ट/ समाजवादी विचारसरणीमुळे गरीब हा सर्वात प्रामाणिक, कष्टकरी आणि नाडलेला असतो तर व्यवसाय करणारा, उद्योगपती किंवा व्यापारी हा गरिबांचे रक्त पिऊन आणि त्यांना लुबाडूनच मोठा झाला आहे हि वृत्ती तयार झाली आहे.
व्यवसाय करायचा असेल तर सरकारी बाबू लोक त्यांना अशाच तर्हेने( हा चोरच आहे) वागवतात कि प्रामाणिकपणे धंदा करणे हि अत्यंत कठीण गोष्ट होऊन बसते.

दीपक११७७'s picture

7 Jul 2017 - 11:09 am | दीपक११७७

१००% सत्य आहे

म्हणतात ना........ गरिबी मुळे शिक्षण सोडणारे चिक्कार मिळतात
पण गरिबी मुळे दारु पिणे सोडले असे म्हणणारा एक ही भेटत नाही.

सुबोध खरे's picture

7 Jul 2017 - 12:46 pm | सुबोध खरे

कं बोललात साहेब
येकदम कर्रेक्ट.

बऱ्याच गिऱ्हाइकांना प्रत्येक गोष्टीची काही किंमत असते हेच मान्य नसते. अगदी नुकतंच एका कापड व्यापारी मित्राशी या विषयावर बोलताना जाणवलं कि अगदी रास्त किमतीतही माल विकला तरी गिऱ्हाइकाचा दृष्टिकोन "अजून काही कमी जास्त होतंय का बघा" किंवा आवडला नाही तर माल परत घेऊ अशी सेवा दिली तर अगदी २-३ वेळेला तो माल वापरून परत आणून देतात (हे मी स्वतः पाहिलंय) आणि सांगतात नाही आवडलं म्हणून...
दुसऱ्याबाजूने अनेक व्यापारीसुध्दा गिऱ्हाइकाला " गिऱ्हाइक देतोय तर घे ओरबाडून " असं वागवतात.
त्यामुळे व्यापारी आणि गिऱ्हाइक या दोघांची "फुकट ते पौष्टिक " आणि " ओरबाडण्याचीं वृत्ती जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत याला उत्तर नाही ...

सुबोध खरे's picture

7 Jul 2017 - 9:53 am | सुबोध खरे

परंतु जातांना जरी एसी गाडी वापरली तरी परतीच्या प्रवासाची आकारणी एसी दरा प्रमाणे करण्याची काहीच गरज नव्हती हे आपल्या लक्षातच येत नाही.
यात तुमच्या ऐवजी दुसऱ्या कुणी गाडी वापरली असती तर त्याने ए सी चे पैसे दिले असतेच. त्या संधीचे हे पैसे आहेत.
पंचतारांकित हॉटेलात एक कप कॉफीचे २०० रुपये (अधिक कर) का असतात? तर तुमच्या एका कॉफीमुळे एक टेबल अडवले जाते त्याजागी दुसरा कुणी येऊन दोन हजाराचे बिल करून गेला असता त्यातुन होणारे नुकसान आणि तुम्हाला चांगली सेवा आणि चांगले वातावरण (अँबियन्स) दिल्यावर तुम्ही परत ग्राहक म्हणून येण्याची शक्यता यातील गुणोत्तरा प्रमाणे हे बिल लावले जाते.

यात तुमच्या ऐवजी दुसऱ्या कुणी गाडी वापरली असती तर त्याने ए सी चे पैसे दिले असतेच. त्या संधीचे हे पैसे आहेत.

सहमत. पण ही ट्रिक सगळ्यांना कळली आणि सगळे अशाच मागण्या करू लागले तर चित्र बदलेल.

एखाद्या प्रेक्षणीय स्थळी गेल्यावर आपण गाईड ठरवतो.

बरेच गाईड त्यांच्या ओळखीच्या दुकानात घेऊन जातात, ट्रॅडिशनल वगैरे वस्तू घ्यायला. गाईड ठरवताना आधीच सांगायचे - कोणत्या पण दुकानात नेऊ नको.

वकील साहेब's picture

8 Jul 2017 - 9:52 am | वकील साहेब

आपल्या सर्वांच्या प्रतिसादा बद्दल आभार.
कॉफी चे दर हे २०० असलेले चालतात कारण ते अगोदर जाहीर केलेले असतात. ते वाचूनच आपण कॉफी च ऑर्डर देत असतो. त्याबद्दल आक्षेप नाही. आक्षेप आहे तो छुप्या क्लुप्त्यांवर. आता वर दिलेले हे दोन्हीही किस्से फक्त उदाहरणा दाखल होते. चर्चेचा उद्देश असा होता की अजून अशा किती तरी ठिकाणी आपण नाडले जातो. लुटले जातो. कारण आपल्याला ते कावे माहीतच नसतात. म्हणून जाणकारांनी अशी उदाहरणे, प्रसंग या ठिकाणी वाटावेत ज्यामुळे आपण अशा ठिकाणी जेव्हा ग्राहक म्हणून जाऊ तेव्हा तशी दक्षता आपल्याला घेता येईल.
आता हे अजून एक उदाहरण घ्या - मिठाई आनन्यासाठी दुकानात गेलो त्याने भाव सांगितला ८०० रुपये किलो. म्हंटल ठीक आहे दे अर्धा किलो. तर त्याने मिठाई देण्यासाठी रिकामे खोके काढले. ते उघडले, त्याचा वरचा अर्धा भाग खालच्या अर्ध्या भागाच्या खाली जोडला आणि त्यात मिठाई भरून वजन करू लागला. मग मी त्याच्याशी तेथे वाद घातला कि खोक्यासह वजन करण्याची काय गरज आहे ? तू जेव्हा या खोक्या सह वजन करशील याचा अर्थ तू तुझ्याकडे असलेले खोके ग्राहकाला ८०० रुपये प्रति किलो च्या दराने विकतोस कि काय ? तू सांगितलेली किंमत हि खोक्याच्या किमती सह आहे असेच गृहीत धरून आम्ही खरेदी करत असतो ना. मग हि अशी लुट का चालू आहे तुझी ? ग्राहक न्यायालयात तक्रार करू का तुझी अस म्हंटल्यावर अखेरीस त्याने नमते घेत खोक्याचे वजन त्यात धरले नाही.
तर अशा काही बाबी असतील तर त्या इत्रांसोबत वाटाव्यात हि अपेक्षा.

मार्मिक गोडसे's picture

8 Jul 2017 - 11:09 am | मार्मिक गोडसे

मिठाईचे वजन करताना मोबाईलने शूट करा. नंतर आक्षेप घ्या, सुता सारखे सरळ होतात.