सेंचुरी राईड व पेठ किल्ला दर्शन २३/०६/१७

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in भटकंती
25 Jun 2017 - 6:30 pm

सेंचुरी राईड व पेठ किल्ला दर्शन २३/०६/१७
misalpav.com वर सक्रिय असलेल्या जगभरातील सायकलिंग प्रेमी मराठी माणसांचा एक व्हॉट्स गृप *सायकल सायकल* त्यावर एक आव्हान ..
जुन महीन्यात ५००किमी करा . जसे होतील तसे कळवत रहा . ज्यामुळे इतरानाही स्फूर्ती मिळेल .
३/४ जून ला अनायासें दोन सेंचुरी राईड झालेल्या .
उरलेले ३००करायला हाताशी पुरेसा वेळ .
म्हणून मी ही सहभागी झालो .
स्पर्धा , पैज ,इर्शा या पासुन दूर रहायचं .. हा खरतर माझा पिंड . पण आपल्या एखाद्या कृतीने जर एखाद्या चांगल्या उपक्रमात कोणी सहभागी होत असेल तर अशा गोष्टी करायला हरकत नाही, या भावनेने हे स्विकारले .
आता स्विकारलय तर निभावायचंच , म्हणून नेटाने तयारीला लागलो .
माझ्या शिप्ट ड्युटी व इतरांपेक्षा वेगळे सुटीचे दिवस या मूळे बऱ्याचशा राईड्स एकट्यानेच कराव्या लागणार हे नक्की .
३०० झाल्यावर .. मित्र मंडळीना कल्पना दिली ..
अशाच एका राईड ला जाउन परतताना , चंद्रशेखर व अनुपमा ह्या सायकलिस्ट जोडीची भेट झाली .
काही छोट्या राईड्स आम्ही केल्या होत्या एकत्र .
त्याना बोललो .. २३ च्या शुक्रवारी एक मोठी राईड करायचा विचार आहे .
माझे ५०० किमी होतील त्या दिवशी .
दोघानीही आम्ही येतोय असे तीथेच सांगितले .
चला दोन पार्टनर्स मिळाले ..थोडा हुरुप आला .
शुक्रवार हा सुटीचा दिवस नसल्याने फार कोणी येतील अशी शक्यता नव्हतीच ,तरीही अनुपमाने दुसऱ्या एका सायकल गृप वर या राईड ची घोषणा केली .
नुकतीच दहावी झालेला सोहम , बारावी झालेला ओंकार , नुकताच जॉब लागलेला व शुक्रवार सुटी असलेला राजाराम ,व कॉलेज ला सुटी घेउन यायला तयार असलेली अपेक्षा अशा चार तरुण मंडळीनी आम्ही नक्की येतोय असे सांगितले .
चंद्रशेखर चे अखेरच्या क्षणी रद्द झाल.. तरीही आम्ही सहा जण होतोच .
पहाटे साडेपाच ला " मटका "चौकात जमायचे ,
तेथून पाइपलाईन रोड ने शेलू व नेरळ मधील रेल्वे फाटक,नेरळ ते कशेळे , कशेळे ते आंबिवली व सर्वांची तयारी असेल तर पेठच्या रस्त्याने , जेथून पेठ नीट दिसतो त्या पठारापर्यंत जायच असा बेत नक्की केला .
५:२५ ला चौकात पोहोचलो तर सोहम तेथे हजर होता , कल्याण हून निघून वेळेवर हजर .
एका सैन्यातिल अधिकार्याच्या मार्गदर्शनाखाली ,सोहम खास प्रशिक्षण घेतोय , भविष्यात सैन्य किंवा तत्सम सेवेत दाखल व्हायची तयारी करतोय .
त्यामूळे वेळ पाळण्याची शिस्त आत्ताच अंगी बाणवल्ये .
मग बाकिचे येइ पर्यंत सोहम व मी " वेळ न पाळण्याच्या" आपल्या राष्ट्रीय रोगाची चर्चा करु लागलो .
पण फार उशीर न करत ..
अनुपमा अपेक्षा व ओंकार दाखल झाले . आमचा एक भिडू राजाराम बदलापुर ला हजर असल्याचा निरोप आलाय असे अनुपमा ने सांगितले .
चला म्हणजे आता वाट बघायची गरज नाही फक्त वाट पार करायची होती ..
पाउस नव्हता पण मस्त सर बरसुन गेली होती , रहदारीही नव्हती फारशी . १८/१९ च्या वेगाने बदलापूर गाठले .
राजाराम लक्ष ठेउन होता .. सर्व जण पोहोचताच निघालो .
वांगणीला काहीतरी खाउया असे ठरवले. वांगणीला पोहोचलो तेव्हा सर्व सामसुम होती , फक्त एक मिठाई दुकान उघडे होते ..
मग रासगिरा लाडू घेतले .. मुलानी चॉकलेट्स घेतली . पाच मिनिटात निघालो .
शेलू जवळ एक डबलसिट मोटर सायकल वाला आम्हाला पाहून थांबला , त्याला विनंती करुन मुलानी एक व्हिडिओ करुन घेतला त्याच्या कडुन आम्हा सर्वाचा .
नेरळ आलं .. आता कशेळे फक्त ११ किमी .. आता पोटपुजा तेथेच करु , असे सर्वाना सांगितले .. हो तरुण मंडळी आहेत , भूक चांगली असते या वयात .. विचारलेले बरे .. पण सर्वाना पटले .. एकंदर सर्वांचा मूड सायकली हाणायचाच दिसत होता ..
कशेळे रस्ता लागल्यावर एका मोहाच्या झाडाखाली थांबलो. सोहम चे लक्ष पूढच्या लांबवर पसरलेल्या रस्त्यावर गेले .. " सर स्वर्गात आणलता" त्याच्या तोंडुन आलेले शब्द.
आता प्रत्येकाची स्वर्गाची व्याख्या वेगळी ....
मग त्या स्वर्गाच्या ओढीने ही तरुणाई सुसाट सुटली ती पूढे चढ लागे पर्यंत स्वर्गातच होती ...
पावसाने मात्र पाठ फिरवली होती ... हा हा म्हणता कशेळे आलं सुद्धा .
नाक्यावरच्या एकमेव हॉटेल बाहेर सायकली लावल्या ..
फोमस , ॲटलास , स्पिंक्स , स्नेल , बिट्वीन , स्कॉट अशा सहा प्रकारच्या सायकली पाहून गाववाल्यांचा गराडाच पडला .. त्यातल्याच एक दोघाना , व वडा तळणार्याला , सायकल वर लक्ष ठेवायला सांगुन सर्वाना हॉटेल मध्ये जायला सांगितले व मी दोन तीन मिनिटे गाववाल्यांशी संवाद साधला .
तुम्ही अजिबात काळजी करु नका कोणी हात लावणार नाही अशी ग्वाही दीली सर्वानीच . मग निश्चिंत पणे मी ही आत गेलो ..
मिसळपाव व जीलेबी असा भरपेट नाष्टा करुन पाण्याच्या बाटल्या भरुन घेउन निघालो तेव्हा साडेनऊ वाजले होते .
म्हणजे नउ च्या आधीच आम्ही कशेळे गाठल होतं.
आता फक्त अकरा किमी राहीले . पाउस नाही अशी तक्रार अपेक्षाने सुरु केली ..
मग तीला सांगितले जुन मध्ये आज माझे ५०० किमी होणारेत पण त्या ५०० मध्ये ५० थेंब ही पाउस पडला नाही. तो बहुतेक माझे ५०० झाले कि मगच पडणार .कोठिंब्याची प्राथमिक शाळा आली .. तीच्या कुंपणाच्या भिंतीवर खाकी चड्डी पांढरा शर्ट अशा गणवेशात मुले एका रांगेत बसली होती . आम्हाला हात उंचावुन टाटा करत होती लहानपणी हाच गणवेश होता आमच्या शाळेचाही .
गोपाळ सावंत च्या घराशी पोहोचेपर्यंत पाउस पडलाच नाही . नेहमी या ठिकाणी येतो तेव्हा हा परिसर ट्रेकर्स ने फूलून गेलेला असतो . आज सर्वत्र सामसुम होती .
गोपाळ ला चहा ठेवायला सांगितला, व मुलाना पेठ ची माहीती देउ लागलो . जायच काय पूढे याचा ही आदमास घेतला .. सर्वच तयार होते .
चहा घेउन निघालो .आता माउंटन बाइकिंग चा अनुभव मिळणार होता .
डांबरी रस्ता संपला व खरी कसोटी सुरु झाली .
अपेक्षा व अनुपमा ने सायकल ठेउन पायी यायची तयारी केली .
सोहम आधीच वर जाउन पोहोचला होता .
ओंकार ने धावत जाउन सोहम कडे असलेले कुलुप आणले.
सायकली सुरक्षित करुन ओंकार , अनुपमा अपेक्षा निघाले सोहम कंटाळला एकटाच वर थांबुन .. तेव्हढ्यात राजाराम व मी पोहोचलो .. पुन्हा एकदा विचारले जायचे ना पूढे .
हो हो .. आम्ही तयार आहोत .. एक सुरात सर्व मूले .
मग थोडी ढकलत थोडी चालवत पठारावर पोहोचलो ..
शनीवार रवीवारी येणाऱ्या ट्रेकर्स साठी कणीसाच्या दुकानासाठी झोपडं कुडायचं काम सुरु होतं.. कुड्याच्याच फांद्यानी .. त्यावर काही फुले ही होती .. तीन चार फुले मटकावली . बाकिच्याना त्या फूलांत काही रस नव्हता.
एका ने विचारले पठार कुठाय ? अरे ही जी थोडी सपाटी दीसत्ये ना तेच पठार ..
मग त्या लहानशा सपाटीवर जाउन फोटो सेशन ला उत आला .
पेठ च्या पार्श्वभूमीवर सायकली उचलून फोटो काढून झाले .
ओंकार राजाराम अनुपमा व सोहम चे हे पहीलेच पेठ दर्शन होते .
तो सुळका दीसतोय ना त्याच्यावर पर्यंत जाता येते .. यावर कूणी विश्वास ठेवेना .. मग अपेक्षा ने त्याचे कोथळीगड हे नाव व कोथळ्यातुन कोरलेल्या पायऱ्या असे सर्व महत्व सांगितले .
जायला हवं एकदातरी असे भाव सर्वांच्याच डोळ्यात उमटले .. पण आज नको .. उशीर होइल .. असे सांगुन चला चला असा हाकारा सुरु केला .. शेवटी मी व अनुपमा निघालो .. मुलांचा पाय काय सुटत नव्हता तेथून .
येताना ही बरीचशी सायकल हातातुनच आणली .
सोहम मात्र माउंटन बायकिंगचा थरार अनुभवत सुसाट खाली पोहोचला .
परत गोपाळच्या घरी थोडं थांबून पाणी भरुन घेउन निघणार एव्हढ्यात माझ्या सायकल ची किरकोळ दुरुस्ती निघाली .. ओंकार च्या पटकन लक्षात आलं काय होतय ते. केबल एका ठिकाणाहुन निसटुन टायर ला घासत होती . ती नीट बांधुन होत्ये व निघतोय तो पर्यंत पाउस सुरु झाला . चार पॅडल मारतोय तो पर्यंत थांबला सुद्धा.
आता किती चढ व उतार आहेत याचा हिशेब मुले करु लागली ..
व उन नको निदान ढग तरी असुदेत अशी प्रार्थना ही सुरु झाली .
कशेळे ला आलो . भूक लागली होती .
नाश्ट्यानंतर २२ किमी ची राईड व ७/८ किमी ची पायपीट झाली होती . सकाळच्या हॉटेल वाल्याने सांगितले कि सकाळी खाल्लेत तेच पदार्थ आहेत ..
मग तेथे केळी . आईस्क्रीम असं काहीबाही खाउन नेरळ गाठूया व तेथे आरामात जेउया असे ठरले .
येताना जो स्वर्ग होता त्याचे दुसरे रुप आता दिसले कारण पाउस नको निदान ढगाळ हवा तरी , ती ही नाही चक्क उन पडलं होतं.. फक्त आजूबाजूला मस्त हिरवळ होती तोच काय तो आनंद .
लहानपणी आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे कधी इंजेक्षन घ्यायची वेळ आली कि ते सांगत खिडकी बाहेर हिरवं झुडुप दिसतय ना तीकडे बघ , म्हणजे इंजेक्षन दुखणार नाही ..
ते किती खरं आहे याचा आता प्रत्यय येत होता ..
नेरळ आलं .. एक हॉटेल दिसलं "हॉटेल सुप्रिया" तेथे थोडी चौकशी केली व जेवायचे नक्की केले . सर्वजण आल्यावर शाकाहारीच घेउया असे ठरले .. भाकरी व चपाती ही होती .. भरपेट जेवण झालं. मस्त रुचकर होतं व मालक व कामगारानी कौतुकाने चौकशी करुन ,थंड पाणी इत्यादी छान सेवा केली .
सकाळपासून केलेल्या खर्चाचा हिशेब तेथेच केला .
प्रत्येकी फक्त १४० खर्च झाला होता .
आता फार काही खर्च होणार नव्हता .
इथे आम्ही अपेक्षाला ट्रेन ने जायचा सल्ला दिला .. तीला थोडे बरे वाटत नव्हते ..
आम्ही मग न थांबता निघालो आता हवा थोडी मेहेरबान झाली उन जाउन ढग तरी आले .
मधेच थोडा शिडकावा ही झाला नावापुरता .
एक दोन किरकोळ थांबे घेउन निघालो .
आता ही वांगणी बदलापूर ला पाउस पडुन गेला होता आम्ही पोहोचायच्या आधीच .
ऱाजाराम चे घर आले . त्याचा निरोप घेउन निघालो आता चौघेच उरलो .
फॉरेस्ट नाक्यावर सोहम ओंकार अनुपमा वळले , मी सरळ निघालो रंगोली हॉटेल शी आलो व स्ट्राव्हा वर किमी पाहीले ते ९६ होते .
अजुन एक चौकार हवा होता , म्हणुन तशीच थोडी पुढे दामटली व एक लांब वळसा घालुन परत रंगोली पाशी आलो , हायवे सोडला व मातीच्या रस्त्याला लागलो तेथुन पुन्हा सीमेंट रस्ता घरापर्यंत . १००.८ किमी झाले होते .
सहा जणानी एक मस्त अनुभव घेतला होता .
पूढच्या मोठ्या राईड साठी योग्य अशी टिम मिळाली याचा खूप आनंद झाला होता .
जुन मध्ये ५०० करायचे होते .. ४५२ वरुन एकदम एक सेंचूरी मारुन ५५२ झाले होते ..
foto01

foto02

foto03

foto04

foto05

प्रतिक्रिया

भ ट क्या खे ड वा ला's picture

25 Jun 2017 - 6:36 pm | भ ट क्या खे ड वा ला

फोटो टाकण्याचा सराव नाही समजून घ्या .सायकल सायकल वाल्यांनी सांगितलं मिपा वरच वाचू . म्हणून लगेच टाकली हि पोस्ट.

फार छान भटकंती. फोटोही छान!

दशानन's picture

25 Jun 2017 - 11:02 pm | दशानन

अप्रतिम!!!

तुमच्या ग्रुप मध्ये कसे समाविष्ट व्हावे हे देखील सांगा, व्यनी केला तरी चालेल.

मस्त हो. जुलै साठी शुभेच्छा

अरिंजय's picture

26 Jun 2017 - 8:21 am | अरिंजय

फार छान वर्णन.

देशपांडेमामा's picture

26 Jun 2017 - 3:01 pm | देशपांडेमामा

सायकल चालवत रहा ..लेख लिहीत रहा :)

देश

मुक्त विहारि's picture

26 Jun 2017 - 5:35 pm | मुक्त विहारि

ह्या निमित्ताने तुम्ही इथे परत लिहिते झालात, ह्याचा आनंद.

छान राईड! पेठच्या किल्ल्याचे दर्शन करून पुन्हा एकदा मन भारावून गेले.

मी कोण's picture

30 Jun 2017 - 7:32 am | मी कोण

सुंदर, असाच सर्वांचा उत्साह वाढवित रहा ( खर तर आतुन उत्साहा बरोबरच जळायलाही होतय)