कोल्हापूरकर बिनडोकच !

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in काथ्याकूट
24 Jun 2017 - 6:38 pm
गाभा: 

दर दोन चार वर्षांनी कुणीतरी करवीरकर उपटतो आणि त्या अंबाबाईवरून वादंग निर्माण करतो. ती अंबाबाई आहे, सोनिया गांधी नाही ! हे आम कोल्हापूरकराना कळत नाही का ? वादंग निर्माण करणारी टाळकी दोन किंवा अडीच आणि श्रद्धाळू करवीरकर किती ?? काय राजकारण करायचे ते करा, एकमेकाचे कपडे काढा पण श्रद्धास्थानांच्या ठिकाणचे पावित्र्य चव्हाट्यावर आणाल तर कुणीही असला तरी जोड्याने मारू - एव्हढी साधी भूमिका घेण्याची हिम्मत आम कोल्हापूरकरांकडे नाही आणि म्हणे मटण खाणारे ! कसले बोडक्याचे झणझणीत !!

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

24 Jun 2017 - 7:15 pm | जेम्स वांड

एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो

असं लिहायचं राहिलं का मुतालिक सर?

Ranapratap's picture

24 Jun 2017 - 9:56 pm | Ranapratap

बरोबर बोललात, यांच्याकडून सर्व अधिकार कडून, सरकार किंवा इतर शहरातील लोकांच्याकडे द्यायला पाहिजे. नक्की काय प्रकार आहे हे, कोणी मिपा कोल्हापुरातील असतील तर कृपया सांगा.

श्रीगुरुजी's picture

24 Jun 2017 - 10:18 pm | श्रीगुरुजी

अंबाबाई हे निमित्त आहे. मराठा मोर्चा, छत्रपती/पेशवे ही काडी, अफजलखान/जोशी/कुलकर्णी ही काडी, अंबाबाईच्या देवळात या वादाचे निमित्त करून बहुजन समाजातील पुजारी नेमावेत ही मागणी असे अनेक बिंदू जोडले तर खरे चित्र स्पष्ट होईल.

सुखीमाणूस's picture

26 Jun 2017 - 2:27 pm | सुखीमाणूस

पुजार्याला मारणार्या जिजाउ ब्रिगेड वाल्या होत्या.
खर खोट अम्बाबाईच जाणे

मोदक's picture

25 Jun 2017 - 9:08 am | मोदक

.

रामपुरी's picture

26 Jun 2017 - 7:47 pm | रामपुरी

+११११

नया है वह's picture

29 Jun 2017 - 7:17 pm | नया है वह

+१११

गामा पैलवान's picture

25 Jun 2017 - 5:40 pm | गामा पैलवान

लोकहो,

कोल्हापुराचे महालक्ष्मी मंदिर खाजगी आहे की सार्वजनिक? माझ्या मते ते खाजगी असून त्याची मालकी कोल्हापुराच्या छत्रपतींकडे आहे. कोणी जाणकार कृपया प्रकाश टाकेल काय?

आ.न.,
-गा.पै.

अंबाबाई हे निमित्त आहे. मराठा मोर्चा, छत्रपती/पेशवे ही काडी, अफजलखान/जोशी/कुलकर्णी ही काडी, अंबाबाईच्या देवळात या वादाचे निमित्त करून बहुजन समाजातील पुजारी नेमावेत ही मागणी असे अनेक बिंदू जोडले तर खरे चित्र स्पष्ट होईल

Strongly Agree..!!

ब्राह्मणानी शेती करावी

सगळे problems दूर होतील

सोमनाथ खांदवे's picture

26 Jun 2017 - 9:35 pm | सोमनाथ खांदवे

नाण्या ची एकच बाजू बघण्यात क़ाय अर्थ ? पुजारी ने केलेल्या चुकी बद्दल सर्वकश चर्चा व्हावी , एकूण हा विषय कुणी मनावर घेतला नाही तेच बेस झाले

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2017 - 10:42 pm | श्रीगुरुजी

पुजाऱ्याने काय चूक केली?

सोमनाथ खांदवे's picture

26 Jun 2017 - 9:35 pm | सोमनाथ खांदवे

नाण्या ची एकच बाजू बघण्यात क़ाय अर्थ ? पुजारी ने केलेल्या चुकी बद्दल सर्वकश चर्चा व्हावी , एकूण हा विषय कुणी मनावर घेतला नाही तेच बेस झाले

प्रकाश घाटपांडे's picture

27 Jun 2017 - 9:39 am | प्रकाश घाटपांडे

बाबौ! आपन कोल्हापुरकर असतो तर आपन नस्त ऐकून घेतल ब्वॉ!
.
.
.
अजून एक काडी

दर दोन चार वर्षांनी कुणीतरी करवीरकर उपटतो

काय उपटतो म्हणे ?

देवीला दान केलेला घागरा नेसवला हे कारण पेपरला आले आहे.

श्रीगुरुजी's picture

27 Jun 2017 - 8:53 pm | श्रीगुरुजी

मग त्यात काय चुकलं?

गुजरात,राजस्थान मध्ये देवीला मराठी पद्धतीची साडी नेसवतील का? मला खरच माहीत नाही की नेसवतात का कधी. नेसवत असतील तर चांगलेच आहे, पण मराठी पद्धतीची साडी जर इतर राज्यात नेसवली जात नसेल तर आपणच का एवढा मनाचा मोठेपणा दाखवावा?

सोमनाथ खांदवे's picture

27 Jun 2017 - 9:48 pm | सोमनाथ खांदवे

श्रीमान गुरुजी जी , गेले कित्तेक वर्ष गणपती बसविताना भक्त मंडळी कसले ही प्रयोग करतात , येत्या गणेशोत्सव मध्ये बाहुबली च्या रुपात सुधा गणेशा ला पहावे लागेल. उद्या इतर पुजारी लोकांनी श्रीकृष्ण ,श्री राम , गजानन महाराज ,अक्कलकोट स्वामी ,साईबाबा, या देवतानां पैण्ट शर्ट घातली तर चालेल का ? अगोदर च हिंदू भक्त नां कुठल्या देवा ची पूजा करू ? हा प्रश्न पडलेला असतो त्यात या घागरा चे प्रकरण .

श्रीगुरुजी's picture

27 Jun 2017 - 11:00 pm | श्रीगुरुजी

घागरा हा पारंपरिक भारतीय वेष आहे. लोकांना क्रिकेट खेळणारा, अण्णा हजारेंचा पोषाख केलेला गणपती चालतो, गणेशोत्सवात वाटेल ते प्रकार केलेले चालतात, देवी समोर जिवंत कोंबडी-बकरी मारलेली चालते . . . पण घागरा हा पारंपरिक भारतीय वेष चालत नाही.

दशानन's picture

27 Jun 2017 - 11:05 pm | दशानन

+ हा प्रकार तर अर्वाचीन भारतीय स्त्रियांचा प्राचीन वस्त्र यात देखील येतो ना?

आणि हो चार टाळके काही करतात म्हणून तुम्ही पूर्ण कोल्हापूर (खरं तर करवीरकर) यांना बिनडोक कसे म्हणू शकता?

याच कोल्हापूर ने देशाला, राष्ट्राला एक एक हिरे दिले आहेत, अगदी व्यवसाय असो की सैनिक असोत! कोल्हापूरकर नेहमी पुढेच दिसले आहेत व असणारच!
मराठा बटालियन फक्त सर्च करा, मग बोलू!

नया है वह's picture

29 Jun 2017 - 7:20 pm | नया है वह

+१११११

चार टाळके काही करतात म्हणून तुम्ही पूर्ण कोल्हापूर (खरं तर करवीरकर) यांना बिनडोक कसे म्हणू शकता?
राजेशी सहमत !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राकासी राकासी... ;) :- Rabhasa