मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काँग्रेस !! उच्च नितीमत्तेचे उदाहरण !

डँबिस००७ · · राजकारण
उच्च नितीमत्ता असलेले काँग्रेस सरकार आम्हाला मिळाले ह्याचा खुप अभिमान बाळगला पाहीजे. हल्लीच कुलभुषण यादवच्या आंतरराष्ट्रिय कोर्ट ऑफ जस्टीसमध्ये भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध केस केली होती. त्या केस साठी हरेश साल्वे नावाच्या नामांकित वकिलाला नेमण्यात आले होते. मात्र १ रु ईतक्या मानधनावर हरेश साहेबांनी हि केस लढली व भारताच्या बाजुने लढली व भारताची बाजु मजबुत केली. हरेश साल्वे हे काँग्रेसचे नामी नेता एन के पी साल्वे यांचे सुपुत्र आहेत. हरेश साल्वेंचा एका काँग्रेस नेत्याचा संबंध असल्याने काही ट्रोल्सनी भारत सरकारवर टीकेची झोड उठवली होती. पण काही वर्षांपुर्वी काँग्रेस सरकारने ह्याच हरेश साल्वे बरोबर काय केले होते हे ते स्वतः विसरले होते. साल २०१७, ICJ ( आंतर राष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टीस ) भारत वि पाकिस्तान केसः कुलभुषण यादव भारताचा वकिलः हरेश साल्वे पाकिस्तानचा वकिलः खवर कुरेशी केसचा निर्णयः भारत जिंकला साल २००१, एनरॉन नावाच्या नावाजलेल्या कंपनीचे वकिल सल्लागार होते, पी चिदंबरम. एनरॉन कंपनीच्या केस बद्दल पुर्ण माहीती चिदंबरम यांना होती. साल २००४ एनरॉन ने भारत सरकार विरुद्ध आंतरराष्ट्रिय कोर्टात ५ बिलियन पाऊंडस ( ६ बिलियन डॉ ) चा दावा ठोकला. त्या कोर्टात भारताच्या वतीने केस लढणार होते श्री हरेश साल्वे. त्याच दरम्यान पी चिदंबरम हे काँग्रेसने स्थापलेल्या नविन सरकार मध्ये मंत्री झाले. (केले गेले ). चिदंबरम यांना केस ची पुर्ण माहीती असल्याने व काँग्रेसला हरेश साल्वेच्या निश्णात वकिली बद्दल व त्यांच्या इमानदारीबद्दल माहीती असल्याने, हरेश साल्वे यांना ह्या केस मधुन बाजुला काढण्यात आले. त्यांच्या जागी पाकिस्तानच्या खवर कुरेशीला मोठ्या रक्कमेच्या मानधनावर नेमण्यात आले. ( केस हरण्यासाठी ) ठरल्या प्रमाणे भारत सरकार ही केस हरला. एनरॉनला ५ बिलियन पाउंड्स व मोठी बिदागी वकिलाला मिळाली. एनरॉनला मिळालेल्या रक्कमेतला मोठा हिस्सा स्विस बँकेत गेला असल्याच कळल आहे. काँग्रेसची प्रकरण अशीच बाहेर पडो, काही अंध भुक्तांच्या डोळ्यात अंजन पडो !! रेफरंसेसः From Enron to Goldquest and Ishrat: The many half-truths of P Chidambaram https://www.google.ae/amp/www.firstpost.com/india/ishrat-jahan-enron-gol... Pak's ICJ lawyer Khawar Qureshi was hired by Congress-led UPA in 2004 http://www.dnaindia.com/india/report-wion-exclusive-pak-s-icj-lawyer-kha... Khawar Qureshi represented India once in US case https://www.dawn.com/news/1334636 India lost both money and case after appointing Pak's ICJ lawyer http://www.oneindia.com/india/india-lost-both-money-and-case-after-appoi... In 2004, UPA replaced Salve with Pak's ICJ lawyer for Enron arbitration http://timesofindia.indiatimes.com/india/in-2004-upa-replaced-salve-with... त. टी: वरचा लेख हा श्री मिलिंद जाधव यांनी मायबोलीसाठी लिहीला आहे. त्यांच्या कडुन रीतसर परवानगी घेउनच इथे दिलेला आहे

वाचन 24542 प्रतिक्रिया 0