जपुन टाक पाउल

Vinayak sable's picture
Vinayak sable in जे न देखे रवी...
26 May 2017 - 3:20 pm

"जपून टाक पाउल ...
इथे प्रत्येक वाट आपली नसते
जपून ठेव विश्वास
इथे प्रत्येक माणुस आपला नसतो
जपून घे निर्णय
इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो
जे भांडल्यावर आधी क्षमा
मागतात,
त्यांची चुक असते म्हणून नव्हे,
तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा
असते म्हणून..
जे तुम्हाला मदत करायला पुढे
सरसावतात
ते तुमचे काही देणे लागतात म्हणून
नव्हे,
तर ते तुम्हाला आपलं मानतात
म्हणुन......!

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

अरूण गंगाधर कोर्डे's picture

27 May 2017 - 12:24 pm | अरूण गंगाधर कोर्डे

पहिल्या चार ओळी छान आहेत. पाचव्या ओळीनंतर सहावि ओळ " फुंकरोनी स्विकार पर्याय " असे असते तर बरे झाले असते. पुढील ओळि पण परत
त्याच पद्धतीने जुळवल्यास कवितेचा साचा बदलणार नाही असे वाटते. पाहा जमल्यास.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2017 - 12:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता कशी आत भिडली पाहिजे राव. लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

पुंबा's picture

29 May 2017 - 11:47 am | पुंबा

कविता छान आहे..
व्हॉटसॅप फॉरवर्ड म्हणून नाव काढेल(ह. घ्या.)

ऑर्कुट अन फेसबुकावर आधीच नाव काढलेय कवितेने..पण मूळ कवीने.
या सायबांनी इथे आणून चिकटवलीय.
एक धागा उडाला तरी यांना वाटले नाही की स्वत:हून दुसरा मागे घ्यावा.

पण आपण चान चान म्हणायला हरकत नै...!

पुंबा's picture

29 May 2017 - 1:28 pm | पुंबा

ह्याह्याह्या..

जे भांडल्यावर आधी क्षमा
मागतात,
त्यांची चुक असते म्हणून नव्हे,
तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा
असते म्हणून..

ह्याच्यावरून वाटलेलंच. माझ्या लिस्टमधल्या 'आप्पांचा लाडका संत्या' आणि 'उंदरे पाटलांचा निखल्या' ह्या दोघांनी फेबू वर दिलं होतं हे ज्ञान.
:D