भारतात रेल्वेने प्रवास करताना काय खादाडी करावी ?

राघवेंद्र's picture
राघवेंद्र in काथ्याकूट
26 May 2017 - 9:23 pm
गाभा: 

मोदकने फाऊल नोंदवल्यामुळे हा नविन धागा काढत आहे.

रेल्वे आणि इतर प्रवासात सर्वात मोठा फरक म्हणजे कायम खादाडी करण्याची उपलब्धता. भारतात बहुतांश ट्रेन या दर तासाला कुठल्यातरी स्थानक मध्ये थांबतात. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर प्रत्येक स्थानकावर काहींना-काही स्पेशल खादाडी साठी उपलब्ध असते.

जसे की कुर्डुवाडी स्टेशनवर - गरम वाफ येणारी इडली सकाळी - रात्री केंव्हाही मिळते. ट्रेन २ मिनिटे थांबते पण ज्याला आवडते त्याला ती मिळतेच.

तर हा धागा अश्या स्पेशल खादाडी साठी जी आपल्याला रेल्वे प्रवासात करता येते. आपल्याला आवडणाऱ्या रेलवे स्थानकातील किंवा रेल्वेतील केटरिंगच्या आवडणाऱ्या खादाडी साठी.

उदा. कुर्डुवाडी स्टेशन - पुण्याकडचा खाण्याचा स्टॉल - गरम गरम इडली वाडा
दख्खनची राणी - सगळेच पदार्थ

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

26 May 2017 - 9:57 pm | गॅरी ट्रुमन

मला खाण्यापिण्यातले विशेष कळत नाही आणि रेल्वे प्रवासही फार करतो अशातला भाग नाही.त्यामुळे फार लिहिता येणार नाही. तरीही भरूचचे शेंगदाणे आणि वडोदर्‍याचे दूध मला आवडते एवढे तरी लिहितोच :)

प्रभू-प्रसाद's picture

26 May 2017 - 10:46 pm | प्रभू-प्रसाद

आहाहा...
दरवळ आणि चव ...रेंगाळत राहणारी.
पुण्याला जाताना हमखास घेतोच.

इंटर सिटी मद्धेच कुर्डुवाडी ते दौंड दरम्यान एकजण शेंगांचे लाडू, भडंग, खारे शेंगा, मुगडाळ व इतर वस्तू विकतो. त्याचे बोलने व वस्तूंचा दर्जा एकदम भारीच.

प्रभू-प्रसाद's picture

26 May 2017 - 10:46 pm | प्रभू-प्रसाद

आहाहा...
दरवळ आणि चव ...रेंगाळत राहणारी.
पुण्याला जाताना हमखास घेतोच.

इंटर सिटी मद्धेच कुर्डुवाडी ते दौंड दरम्यान एकजण शेंगांचे लाडू, भडंग, खारे शेंगा, मुगडाळ व इतर वस्तू विकतो. त्याचे बोलने व वस्तूंचा दर्जा एकदम भारीच.

सावळान हड़कुला माळकरी. गांधी टोपी, विजार नहेरु शर्ट, सोबत 2 व्यापारी पिशव्या.
ताई, दादा, माऊली, देवा, पौष्टिक खाऊ घ्या, चवदार आणि मजेदार खाऊ घ्या. दिवसभर पोटाला आधार दया, रिकामपोट डोके चालत नाही, चिडचिडी होते, चांगले दोन घास खाऊन घ्या, निसर्गाची देन आहे माऊली, चांगले खावा, चांगला विचार करा, फक्त 5 रूपयात पौष्टिक अन्न, घ्या माऊली, तुमच्यासाठीच देवाने पाठवली आहे ही ठेव, आनंदी मनाने आस्वाद घ्या,
आलो हा देवा, आलो, सगल्यासाठीच आहे है, ताई घेतला का तुम्ही, राहु दया सुट्टे नसतील तर, पैसे कुठे जाणारेत, आलो आलो.
.
माऊली जेउरची आहे. :)

स्रुजा's picture

26 May 2017 - 11:23 pm | स्रुजा

खिडकी वडा - कल्याणजवळचा ना? खुप वर्षांपूर्वी खाल्लाय पण अजुन आठवतो.

आदूबाळ's picture

26 May 2017 - 11:31 pm | आदूबाळ

हो, पण तो स्टेशनवर नाहीये. चांगला आत गावात आहे.

लंबर एक असतो.

वरुण मोहिते's picture

26 May 2017 - 11:51 pm | वरुण मोहिते

१)बाकी रतलाम चे पोहे
२)कोटा चे आईस्क्रिम
३)लुधियाना ला छोले भटुरे

४)राजमंद्री ला गाडी केव्हा पण थांबू दे गरम इडली वडा
५) वैझाग ला गेलात तर खूप धावपळ उडते लोकांची कारण स्टेशन बाहेर वाईन शॉप आणि तिथे फिश लोकल छान मिळतात
६)कानपुर ला गेलात तर तिथे स्टेशन बाहेरच एक कचोरीवाला आहे फेमस मधल्या एंट्रन्स ला

ह्या सगळ्या जागांवर गाडी जास्त थांबते म्हणून असे अजून अनेक आहेत नंतर भर टाकेन .

अत्रे's picture

27 May 2017 - 3:04 am | अत्रे

सेलूला चणे (चने?) खावेत. जालना आलं की पेरू, जांभळं..

शोरानुर ( त्रिशुरच्या अगोदर )जंक्शनला गाडी बराचवेळ थांबते. मंगळुर- एर्नाकुलम मार्ग आणि कोइमतुर कडचा मार्ग याचे जं०. डिझल/इलेक्ट्रिक एंजिनांची अदलाबदल होते. तर सांगायची गोष्ट इथे आइआरसिटिसी/सावे रेल्वेचाच स्टॅाल आहे. बरीच मोठी रांग लागते. फॅारिनरही घेतात. सामिष पदार्थ आहेत.
एर्नाकुलमचे कँन्टिन उत्तम.
हुब्बळीचे सर्वोत्तम

अबुरोड( राजस्थान) इथे मडक्यातली रबडी आणि द ही.
वापी - खारे दाणे.

विदेशी वचाळ's picture

27 May 2017 - 6:42 am | विदेशी वचाळ

मनमाड चा चहा प्यायला का ? घ्याल तर परत घेणारच नाही. नांदेड ते मुंबई यायचो (फा . फा. पूर्वीची गोष्ट आहे). नांदेड ते औरंगाबाद मीटर गेज ने यायचो आणि मग पंचवटी पकडायची. वेळ सकाळची ६ ची. कोणालाही चहा घ्यायची तल्लफ येईल अशीच वेळ. पण चहा घेतला रे घेतला कि सात जन्माची पुण्याई एकदम गटारात गेल्याची जाणीव व्हायची.

लाल पिवळी ता बसून नांदेड ते पुणे जुन्याच योग अगणित वेळा आला आहे. पाटोदा नावाच्या यष्टी शतांड ला डायवर बदलायचा. दुसरा डायवर कायम तेथे झोपलेला असायचा त्यामुळे यष्टी गेल्यावर त्याला उठावाणे त्याचे व आपले चहा पाणी तापाने व्हायचे. तेथे आगाराच्या कैंटीन प्रकारात जी भाजी मिळायची त्याला तोड नाही.

नांदेड नागपूर प्रवासात वारंग फाट्यावर नियमाला फाट्यावर बसवून सगळ्या गाड्या थांबवत. तेथे मुगाची डाळीची खिचडी अशी काही मिळायची कि जन्म जन्माची भूक मिटायची.

असो चालू देत ...

बाकी SF वरून LA ला जाताना, Buttonwillow येथे इंडियन जेवणाचे जे स्थान आहे ते पण गरजूंना मदतीचा हात आहे.

विदेशी वाचाळ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2017 - 12:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनमाडी चहा म्हणून कधी मनमाड फेमस असेलही पण आता मला सर्व पाकृ कारागिर आणि त्यांची कृती पाहिले की खायची इच्छाच मरुन जाते. घाणेरडे.... 'साले' (शब्द सौजन्य श्री दानवे) माणसांनी रेल्वे ष्टेशनावर उपवाशी राहावं पण काही खाऊ नये. शेंगा, जांभळे, पेरु वगैरे स्वच्छ धुवून घ्यावीत आणि मगच खावेत. काही लोक अखंड खात असतात कमाल वाटते मला.

-दिलीप बिरुटे

खरं आहे. अंकाइटंकाइ किल्ला जाण्यासाठी तपोवन गाडीने साडेअकराला मनमाडला उतरून पुढची पॅसेंजर मिळते. फार भयानक परिसर आहे.खायची इच्छा होत नाही.पुर्वी दौंड असंच होतं. आता लातुरच्या गाड्या वाढल्यापासून थोडं सुधारलय.

अशा वेळी उकडलेली अंडी किंवा टरफलवाली फळे (उदा. लिची) खावेत ज्याच्या कवचामुळे मुख्य पदार्थ शुद्ध राहतो. अर्थात अंड्यावर भुरभुरलेल्या मिठामुळेही इन्फेक्शन होईल अशी भिती असेल तर घरी केलेल्या खाद्यपदार्थाची ट्रंक सोबत ठेवावी किंवा महाराजा एक्स्प्रेसने प्रवास करावा. ;)

बाकी बिहार आणि उडीसा पट्ट्यात उकडलेल्या अंड्यांना पर्याय नाही असे वैयक्तीक मत.

इरसाल कार्टं's picture

29 May 2017 - 10:29 am | इरसाल कार्टं

युपीमध्ये उकडलेली अंडी खाऊन आठवडेच्या आठवडे ढकललेत, बाकी यूपीचा बाटी चोखा/लिट्टी चोखा जरूर खावा. पण स्टेशनवर नाही, बाहेर.
आणि हो सगळीकडची कचोरी खाऊन बघावी.
म्हणजे बघा, आपल्याकडे शेव-दही आणि गॉड चटणी टाकून देतात,
गुजरातेत कढी आणि गॉड चटणी,
झारखंडला चण्याची डाळ आणि दुधीची भाजी,
हरिद्वारला छोले किंवा मटारची भाजी.
असे वेगवेगळे प्रकार मिळतात.

चौकटराजा's picture

27 May 2017 - 4:14 pm | चौकटराजा

अलिकडे आठेक महिन्यापूर्वी सहकुटुम्ब जयपूर , ग्वालियर, ओर्छा चा दौरा केला. त्यात कोटा स्टेशन चे दरम्यान अत्यंत स्मरणीय असा बटाटेवडा खायला मिळाला. मला आवडतो तसा गोल आकाराचा जाड पिठूळ वडा. आतील सारण ही अगदी चविष्ट.

दीपक११७७'s picture

27 May 2017 - 6:57 pm | दीपक११७७

आपण जो वडा खाल्ला आहे तो पुर्वी जुन्या मेवाड हॉटेलात ...........
मिळत असे. खुप चविष्ट, चवदार रस्स्या सोबतं.

Ranapratap's picture

27 May 2017 - 8:44 pm | Ranapratap

मिरज हुन बेळगावला जाताना घटप्रभा स्टेशनवर मेंदू वडा मिळतो. पळसाच्या पानातून चटणी आणि वडा अत्यंत चविष्ट

मोदक's picture

28 May 2017 - 1:44 am | मोदक

मेंदू नाय वो.. मेदू वडा.

Ranapratap's picture

28 May 2017 - 10:38 am | Ranapratap

माझा वडा केलास रे

पिशी अबोली's picture

28 May 2017 - 1:10 am | पिशी अबोली

लोंडा जंक्शनला संध्याकाळी 7 च्या दरम्यान छान डोसा मिळतो.

कवितानागेश's picture

28 May 2017 - 1:29 am | कवितानागेश

गुजराथ मध्ये कुठेही दूध चांगले मिळतं. कोल्हापूर, सांगली इथेही दूध आणि दही उत्तम मिळतं.
मथुरेला चहा, इंदूर आणि देवास ला पोहे,
या दिवसात मुंबई पुणे प्रवासात कुठेही पटकन करवंदे मिळतात.
रत्नागिरीतल्या स्टेशनांवर काचेच्या बाटल्यांमध्ये ताजे कोकम सरबत घेतलंय बरेचवेळा.
कोकण रेल्वेनी गोव्याच्या खाली गेले कि कचचयाकेळ्याची भजी मिळतात... पाळम पुरी!
त्याशिवाय भेळ बहुतेक बर्याच लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मिळते आणि सगलीकडची चव वेगळी असते. ती प्रवासात मस्तच वाटते.
अवांतर. चेन्नईला मुख्य बस स्टँड च्या कॅन्टीन मधले सगळे पदार्थ मस्त असतात. आणि व्यवस्थित पार्सल करून देतात.

राघवेंद्र's picture

28 May 2017 - 5:57 pm | राघवेंद्र

शेगाव स्टेशनची कचोरी पण आवडायची पण आता पुण्यात सगळीकडे मिळते.

पिलीयन रायडर's picture

28 May 2017 - 10:31 pm | पिलीयन रायडर

मदुराईला जाताना रेल्वेत जे डाळवडे मिळतात ते अप्रतिम असतात.

आम्ही असे प्रवासाला बाहेर पडलो की, आई दोन भाकऱ्या, दुधात तयार केलेल्या चार चपात्या, कुरडया, शेंगदाण्याची चटणी आणि सुक्का झुणका कापडात बांधून देते, मी आपला सोबती म्हणून दोन चार कांदे घेतो, काम तमाम!

जेम्स वांड's picture

29 May 2017 - 8:17 am | जेम्स वांड

हैदराबाद निझामुद्दीन 'एपी एक्सप्रेस' मधली चिकन बिर्याणी फर्मास असते. ह्याच गाडीत कुल्हड मधलं दही पण जबऱ्या मिळते.

मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस मध्ये चहा अप्रतिम मिळतो

अलाहाबाद स्टेशनवर बारक्या खरबुजाच्या आकाराचे म्हणजे भले मोठे प्रतापगढी, कौसंबीचे पेरू,

भुसावळला आम्लेट पाव (आता क्वालिटी खराब झाली),

गाडी जर थांबलीच तर पांढुर्ना काटोल स्टेशन्सवर संत्री,

मथुरेचे पेढे, आग्रा पेठा,

आबु रोड रबडी,

जोधपूर मिर्ची बडा अन प्याज कचोरी,

जोधपुरलाच मिळणारी एक युनिक भाजी अन पुरी (मेथीच्या दाण्यांची चिंचेच्या कोळातली अतिशय अप्रतिम रस्सा भाजी असते).

अंबाला स्टेशन (कॅन्ट) वर कढी चावल

चिक्कोडीमध्ये व आसपास गावात जी उडप्पी हॉटेल आहेत, त्यामध्ये कांदा उत्तप्पा जबरी मिळतो, रेलवे रूट मध्ये तेथून जवळच रायबाग स्टेशनवर देखील.

चौकटराजा's picture

29 May 2017 - 6:55 pm | चौकटराजा

१९९२ मधे दक्षिण भारत पहायला गेलो होतो. मी भातखाउ आहे पण पंधरा दिवस पोळीशिवाय राहायचे म्हणजे टू मच. लई हाल झाले त्यांचा तो शित शित वेगळा असलेला भात खाउन व पाणी एकदम बेचव. येताना एकदाचे सोलापूर आले. ( हा आपला लिओनार्डो डा विन्ची रहातो तेच ) . पुरी भाजी खाल्ली अधाशासारखी व प्रथमच १५ दिवसात चवदार पाणी प्यालो. ती पुरी भाजी इतक्या वर्षानंतरही ही विसरलेलो नाही .