अभिमन्यु तुझा

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in जे न देखे रवी...
16 May 2017 - 9:35 pm

रागावली तु
रुसलीस तु
प्रत्येक क्षणी आठवलीस तु
तुझे अबोल ओठ
आणि त्यावरची लाली
करते जादु या काळजावरी
विरह तुझ्या न बोलन्याचे..
नाते अपुले जन्मान्तरीचे.
मी तुझाच आहे हे का कळे ना तुला...
प्रेम माझे पुर्वजन्मीचे कधी कळनार तुला..
मृगजळा परी तुझा भास ..
या क्षणी तुझ्या नावाचा घेतो मी श्वास..
प्रेयसी तु मी प्रियकर तुझा..
हवा नेहमी हाती हात तुझा
तु बोलत नाही मनातले प्रेम..
रानी.

दुख्ख होते मग या कोमल मनी..
सोड सगळ आता..
दे आवाज मला..
अजुनही वाट पहातोय
चक्रव्युव्हात अडकलेला अभीमन्यु तुझा...

कला

प्रतिक्रिया

दशानन's picture

16 May 2017 - 9:46 pm | दशानन

च्यायला,
मी मुलगी असतो व अशी कणाहीन रचना पाहून "महाभारत" सुरू केले असते!

सतिश गावडे's picture

16 May 2017 - 9:55 pm | सतिश गावडे

कविता वाचून तुमचा अभिमन्यू करणारे कौरव कोण हे कळले नाही. जरा सांगता का?

तो वाट बघनारा अभिमन्यू वेगळा आहे बहुतेक.
कवि अर्जुन असावा ;)

जव्हेरगंज's picture

18 May 2017 - 7:37 pm | जव्हेरगंज

=))