काही ग्राफिटीज्

राज-निती's picture
राज-निती in जनातलं, मनातलं
23 Feb 2009 - 5:46 pm

ससा 'भित्रा' पण शर्यतीत आरंभ 'शूर'.

कधी कधी संशयाची पाल चुकचुकत नाही,
तेव्हां जास्तच संशय येतो.

'चिरतारूण्याचे' रहस्य 'म्हातारपणात' असतं.

शब्दक्रीडा

प्रतिक्रिया

लक्ष्मणसुत's picture

23 Feb 2009 - 5:51 pm | लक्ष्मणसुत

बाबा तुझी गराफिटी लै भारी ब्वॉ.
लक्ष्मणसुत

विसोबा खेचर's picture

23 Feb 2009 - 6:02 pm | विसोबा खेचर

ग्राफिट्या छानच हो! :)

ब्रिटिश टिंग्या's picture

23 Feb 2009 - 6:07 pm | ब्रिटिश टिंग्या

सही आहेत! :)

हेरंब's picture

24 Feb 2009 - 8:41 am | हेरंब

वाहते ती अक्कल राहते ती बुद्धी !

JayGanesh's picture

24 Feb 2009 - 8:51 am | JayGanesh

मी वेडा होणार बहुतेक !!

राज-निती's picture

25 Feb 2009 - 7:50 pm | राज-निती

जय गणेश,
आपला अभिप्राय इतरांपेक्षा वेगळा आहे. पण खरं सांगू का, कुणालाही आपल्या मराठीचं असं 'वेड' लागलेलं केव्हाही चांगलच. त्याच कारण म्हणजे 'शहाण्या' माणसालाच चांगल 'वेड' लागू शकतं.

शंकरराव's picture

25 Feb 2009 - 8:01 pm | शंकरराव

टोले बाजी ... आवडली
मस्तच ग्राफिटी :-)

शंकरराव

JayGanesh's picture

24 Feb 2009 - 8:53 am | JayGanesh

आणखी एक....

''काळ्या म्हशीने पोंड्स पावडर लावु नये.''

नरेश_'s picture

25 Feb 2009 - 8:00 pm | नरेश_

ब्यूटी -पार्लर मध्ये तर आजाबात जाऊ नये !!!

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

लक्ष्मणसुत's picture

25 Feb 2009 - 8:08 pm | लक्ष्मणसुत

ब्यूटी -पार्लरचा आपला काय अनुभव आहे? आम्हालाबी सांगाना राव.

लक्ष्मणसुत उवाच्

दत्ता काळे's picture

24 Feb 2009 - 10:34 am | दत्ता काळे

लई बहारी. मलापण एक सुचलीये, ती अशी :

एकत्र नांदलेल्यांचे कालांतराने मार्ग भिन्न होतात -
चकणा पोटातच राहतो आणि . . .
दारू डोक्यात जाते.

छोटा डॉन's picture

25 Feb 2009 - 8:05 pm | छोटा डॉन

झक्कास , चालु द्यात ..!

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Feb 2009 - 9:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डानरावांची सोडून बाकी सगळ्या ग्राफिट्या (बघा शोधला की नाही मराठी शब्द!) आवडल्या.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

केदार_जपान's picture

26 Feb 2009 - 6:58 am | केदार_जपान

'हातात जॉब असणे हेच खरे.... जॉब सटिसफॅक्शन'.... :)

---------------
केदार जोशी...

नितीनमहाजन's picture

26 Feb 2009 - 10:44 am | नितीनमहाजन

सरळ मार्गी माणसाला लहानपणी चांगले वळण लागलेले असते.

नितीन