मिपा कट्टा वृत्तांत: २३ एप्रिल २०१७, न्यूपोर्ट मॅाल, जर्सी सिटी

आषाढ_दर्द_गाणे's picture
आषाढ_दर्द_गाणे in जनातलं, मनातलं
26 Apr 2017 - 2:52 am

"जरासा उशीर होईल, पोचतोचे"
राघवेंद्र ह्यांच्या आलेल्या फोनवरची माझी दिलगिरी ऐकून
"पण तू जाऊन नक्की करणार काय तिथे? ओळख आहे का कोणाशी?" मित्राच्या वडिलांनी विचारले.
"अहो काही नाही तर खफवर मारतो तश्या रँडमगप्पा मारून येईन..." मी.
"कश्यावर?" मित्रवडील
एक तर गोरज मुहूर्तावर न्यूयोर्कात आल्यापासून सबवेने वेळेचं गणित आधीच चुकवलेलं.
वरुन 'मिसळपाव' काये, गेल्या आठवड्यातून ह्या आठवड्यात कट्टा कसा ढकलला गेला आणि मी सात तास बसमध्ये बसून वर्जिनियातून त्याच्या घरी नक्की कशाला उलथलो ह्या सगळ्याचे मित्रास (सहकुटूंब. त्याचे.) स्पष्टीकरण्यात कट्ट्याचा अकराचा मुहूर्त टळून गेलेला.
"जाऊ दे ना काका; सांगतो आल्यावर" बूट चढवत म्हणालो.
हाड(वैरी)मित्राच्या "यशस्वी व्हा!" अश्या टोमणाशिर्वादाला ऐकून न ऐकल्यासारखे करत पावतास लांब असणाऱ्या न्यू पोर्ट मॉलला यायला सुटलो.

वाटेत जर्सीतल्या एका अज्ञात नंबरावरून फोन आला.
'हॅलो' म्हणण्याच्या आधीच (पुणेकर ना शेवटी!) "पावणेबारा ही काय वेळ आहे यायची? आम्ही गेलो निघून!" असं कोणी विदुषी सात्विक संतापात वद(डाफर)ल्या.
इराणी 'उबर'ड्रायवरला 'लवकर, लवकर' अशी चारी बोटांनी हवा पुढे झटकण्याची, फक्त भारतीयांनाच कळणारी खूण करत "इटीए ११:३९ आहे, हा काय आलोच" असं, आवाजतली दिलगिरी शक्य तितकी वाढवत उत्तरलो.
"अच्छा. कोण बोलतंय कळलं का?" पलीकडून पिलीयन रायडर(च असू शकणाऱ्या) म्हणाल्या.
"येतंय ध्यानात. भेटतो फूडकोर्टात." म्हणून फोन ठेवला. पोचलो होतो. आतला नजारा पाहून 'आ' वासला होता.
mall

'भव्य,नेत्रदीपक की प्रासादतुल्य' ह्यातले कुठले विशेषण मॉलसाठी वापरता येईल हा प्रश्न मनात घोळवत सरकत्या जिन्यांनी तिसऱ्या मजल्यावर पोचून मी इकडे-तिकडे निरखताना बाहेर पडलेल्या स्वच्छ उन्हापेक्षाही अधिक प्रसन्नेतेने माझ्याकडे पाहून हसणारा, हमखास मराठीच असू शकणारा एक स्त्री-पुरुष संमिश्र (नॉनव्हॉट्सअँप) घोळका बसलेला दिसला आणि 'यहीं मेरे अपने हैं!' असं मनात म्हणत जोडटेबलावर जमा झालो.
राघवेंद्रांशी त्यांचे नाव ऐकत हात मिळवला आणि सही रे सई ह्यांना 'अहो उभं राहायची गरज नाही, बसा ना' अशी कोपरखळी मारत आसन ग्रहण केले. कनेटिकटवरून अडीच तास प्रवास करून आल्याचा थकवटा जाणवू न देत त्या हसल्या.
पश्चात अस्मादिकांची जकासर, मिहीर ह्यांना ओळख करून दिली. बच्चे मंडळींना 'हॅलो' म्हटले.

चेहरे पक्के पण नावं अजिबात लक्षात न राहणे(ठेवणे?) हा जन्मतःच जडलेला रोग असल्याने मी कोणालातरी चुकून भलतीच हाक मारणार ही धास्ती मनात होती. शिवाय राघवेंद्र, पिलीयन रायडर आणि जयंत कुलकर्णीसर ह्यांची आधीच काहीतरी चर्चा चालू होती.
गोंधळलेल्या मनःस्थितीत मोजून दहा मिनिटे नुसतीच बत्तीशी दाखवून माझे गाल दुखायला लागल्यावर इ-कट्ट्याचे प्रयत्न चालू झाले.
शेकडो मैलांवरून स्रुजा, श्रीरंग आणि समर्पक हे मिपाकर व्हिडियो कॉलद्वारा जोडले गेले.
मॉलच्या गोंधळात ऐकायला अजिबात येत नव्हते, म्हणून मग 'हा अमुक, तो तमुक' असा एकतर्फी संवाद आणि फोन हाती घेऊन 'हाय, बाय' करून ई-कट्टा साजरा झाला.

सही रे सई ह्यांनी कामाच्या जागी मिसळपाववर मुशाफिरी करताना आलेल्या विनोदी अनुभवांची उजळणी केली आणि सगळे मनमुराद हसले
जकासरांनी त्यांच्या अमेरिकेतल्या वास्तव्याविषयी आणि पुढच्या प्रकल्पांविषयी माहिती दिली. तेवढ्यात मिपाकर नसणारे पण कट्ट्याला आलेले श्रीयुत पिलीयन रायडर आणि श्रीयुत सही रे सई हे दोन सदगृहस्थ कुठेतरी एकाच जागी काम करत होते/आहेत अशी काहीतरी ओळख निघाली आणि त्यांनाही ऐन रविवारी उठून कट्ट्याला आल्याचे मानसिक समाधान लाभले (असावे असा तर्क. चूभूद्याघ्या). अजून काही मिपाकर येणार असल्याची चर्चा चालू होती.
यथावकाश 'भोजन उरकून घेऊ' असा प्रस्ताव मांडला गेला आणि मंडळी खाणे आणायला पांगली.
thaali
[राघवेंद्र ह्यांची जबरदस्त थाळी]

भारतीय, अभारतीय पदार्थांची पंगत जमली. बर्याच दिवसांनी चांगले 'चाट' खायला मिळाल्याने मजा आली. जेवणावर गप्पा रंगल्या (रंगायच्याच).
राघवेंद्र ह्या मनुष्यकोषातून (मानविकीतून? 'ह्युमन एन्सायक्लोपीडिया' ह्यार्थी) माहितीचा ओघ वहाणे तेव्हापासून सुरु झाले (जे कट्टा संपेपर्यंत चालूच होते) जर्सीत राहणे, एकंदर अमेरिकेत काम करणे वगैरे विषय चर्चेला घेतले गेले. मीही चार-दोन शंकांचे निरसन करून घेतले.
सही रे सई ह्यांची कन्या आंबा खाताना बघून 'इथे हापूस कसा मिळवून खाता येईल' ह्यावर मौलिक चर्चा घडली.
'जॅक बावर' ह्या मिपाकरांचे तेव्हापर्यंत आगमन झाले होते, त्यांची ओळख झाली.
पलीकडे बसलेले 'मिहीर' हेही माझ्यासारखे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत हे कळले (एव्हाना माझ्या डोक्यात नावे आणि चेहरे जोडले जायला सुरवात झाली होती) आणि मग आम्हा समदुःख्यांनी उच्च शिक्षणास लागणाऱ्या प्रचंड वेळेची आणि मेहनतीची उजळणी करून शुष्क उसासे टाकले.
त्यावर (हमखास मिळणाऱ्या) सहानुभूतीचा मुखवास चघळताना मॉलच्या बाहेर कुठेतरी बागेत जायचं ठरलं आणि मंडळी निघाली.
वाटेत 'अफूची निर्यात करणारी टोळी' अजिबात वाटणार नाही अशी दक्षता घेत एक छानसा फोटो घेतला.
outdoor
[डावीकडून सही रे सई, श्रीयुत सही रे सई आणि ज्युनियर सही रे सई, राघवेंद्र, जयंत कुलकर्णी, जॅक बावर, मिहिर, मी (आषाढ_दर्द_गाणे), पिलीयन रायडर आणि ज्युनियर पिलीयन रायडर]

न्यूपोर्ट ग्रीन बागेत पोचून न्यू यॉर्कच्या स्तिमित करणाऱ्या आकाशरेखेचे प्रदर्शन करणारा एक कट्टा शोधला. आसपास गगनचुंबी काचमहाल लांब, आडव्या सावल्या पाडत उभे होते. सुरजचाचू बाहेर आल्याने मस्त वाटत होतं!
view
पण सरतेशेवटी पलीकडे पाण्याजवळच्या गजांपाशी मंडळी उभ्याउभ्याच गोळा झाली आणि कट्टा चांगलाच रंगला.
मिपाचा इतिहास, नागरिकशास्त्र आणि काही अंशी भूगोलही चघळल्या गेला.
नवख्या मंडळींनी शंकानिरसन करून घेतले. अस्सल मर्हाटी चर्चेत सतत हास्यफवारे उडत होते. त्यावर चमकून आकृष्ट होणाऱ्या नजरांची पर्वा न करत मंडळी बडबड करत होती.
photo 2
[ओव्हरएक्सपोज सेल्फीत (फ्रंट कॅमेरा हो, काही बोलायची सोय नाही!) डावीकडून मिहिर, जॅक_बावर, राघवेंद्र, मी, श्री सही रे सई, सही रे सई, जयंत कुलकर्णी, पिलीयन रायडर (फोटो नीट बसवण्यासाठी श्री. पिलियन रायडर ह्यांना हटवावे लागले. क्षमा असावी)]

पुढे मग ज्युनियर पिलीयन रायडर आणि ज्युनियर सही रे सई जिथे खेळात मग्न होते त्याजागी जाऊन, तिथे आधीच बाकड्यांवर बसलेल्यांना मोठ्याने गप्पा मारून हुसकावल्यावर मंडळी स्थानापन्न झाली. मिपावर अभ्यासपूर्ण लेखन करणाऱ्या मंडळींचे कौतुक झाले. पुढच्या कट्ट्यावेळी, काव्यवाचन, कथाकथन असा काहीतरी छोटासा उपक्रम करावा अशी सूचना जकासरांनी केली, जी सगळ्यांनीच उचलून धरली. शेवटचे सेल्फी घेतले गेले.
आणि सगळं चानचान चालू असताना अचानक कट्ट्याचा वृत्तांत लिहिण्याच्या जबाबदारीचा नारळ 'तू सगळ्यात नवा सदस्य आहेस' असं म्हणत माझ्या हाती दिला गेला. ह्या धर्मसंकटात पडल्याने माझ्या मनावर आलेलं मळभ आकाशी दाटून आलं होतं.
malabh

परत मॉलपाशी येता येता जर्सीत राहण्याच्या अजून काही गमती राघवेंद्रांनी सांगितल्या. काही मंडळी आपलं आपल्या वाटेने निघाली,
चारचा सुमार झाला होता, 'डंकिन'मध्ये भारतातल्यासारखा चहा मिळतो' ही खुफिया माहिती (अजून कोण) राघवेंद्र ह्यांनी दिल्यावर अजून कट्ट्याहून निघावेसे न वाटणाऱ्या उरलेल्या मंडळींनी तिकडे मोर्चा वळवला. पण तिथे चहा संपल्याने स्टारबक्सच्या दिशेने प्रयाण केले. मग कॉफ्यांच्या निमित्ताने अजून एक लघुकट्टा झाला. शेवटी एकमेकांना नंबर देऊन परत भेटायची सदिच्छा व्यक्त करत मंडळी पांगली.

तर ह्याठिकाणी अश्याप्रकारे अज्ञातच म्हणाव्या (अर्धज्ञात?) अश्या काही मराठी व्यक्ती मिपाच्या माध्यमातून एकत्र आल्या.
वेगवेगळ्या पार्श्वभूमी असणारे, वेगवेगळ्या वयोगटाचे, वेगवेगळ्या वेळी मिपावर जोडलेले लोक, एका सामायिक सांस्कृतिक संचिताच्या (cultural capital) जोरावर दिवसभर गप्पा मारु शकले, मजेत वेळ घालवू शकले ह्याचे परतताना अप्रूप वाटत होते.
मित्रगृही आलो.
"काय रे, झाला का कट्टा? दिवसभर गप्पा मारून मजा आलेली दिसतेय!" मित्रतीर्थरूप.
"बाडीस!" मी.

- आषाढ_दर्द_गाणे

मौजमजाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

मिहिर's picture

26 Apr 2017 - 3:10 am | मिहिर

भारी लिहिलाय वृत्तान्त एकदम. मस्त मजा आली कट्ट्याला. आषाढ_दर्द_गाणेने त्याच्या 'पब्लिक हेल्थ' ह्या वेगळ्याच विषयातल्या संशोधनाबद्दल व त्याच्या विद्यापीठाबद्दल भरपूर रोचक माहिती पुरवली.

आणि मग आम्हा समदुःख्यांनी उच्च शिक्षणास लागणाऱ्या प्रचंड वेळेची आणि मेहनतीची उजळणी करून शुष्क उसासे टाकले.

हा हा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Apr 2017 - 11:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वृत्तांत आणि फोटो भारी. मिपा कट्टे असेच जगभर होत राहो, मिपा परिवार असाच वाढत राहो, अशी श्री चरणी प्रार्थना.

-दिलीप बिरुटे

रेवती's picture

26 Apr 2017 - 3:55 am | रेवती

फोटू व वृत्तांत आवडला.

रुपी's picture

26 Apr 2017 - 4:22 am | रुपी

छान फोटो आणि वृत्तांत.

नुमविय's picture

26 Apr 2017 - 4:24 am | नुमविय

कट्टा चुकविल्याची रुखरुख अजूनच वाढली..

नंदन's picture

26 Apr 2017 - 4:46 am | नंदन

झालेला दिसतोय कट्टा. फोटो आणि वृत्तांत मस्तच.

पिलीयन रायडर's picture

26 Apr 2017 - 4:52 am | पिलीयन रायडर

तर असं झालं की चेपुवरच्या मिपा मित्र ग्रुपात एका मिपाकरांनी किस्सा लिहीला. की म्हणे ट्रेन मध्ये बाजुच्या माणसाने मोबाईलवर मिपा उघडले आणि कळाले की अरेच्चा, हा ही मिपाकरच दिसतोय. म्हणलं एखाद्या स्टेशनात जाऊन मिसळपाव ओरडलं तर २-४ मिपाकर नक्की सापडतील. असंच मग बातों बातो मे कट्टाच करायचं ठरलं. आधी आम्ही इसलिनलाच भेटणार होतो. पण थोडा कट्टा पुढे ढकलला तर येता आलं असतं असं सई आणि आदगा म्हणाल्याने कट्टा पुढे ढकलला. अंदर की बात ही की आदगा हा एक डु आयडी आहे असा मला दाट संशय होता. पण हा मनुष्य तर कट्ट्यालाच येतो म्हणाला! खातरजमा करायला कट्टा पुढे ढकलला खरं तर! =))

कट्ट्याच्या दिवशी आपणच मॉल झाडायला पोहचणार असं मला वाटलं होतं. पण सई त्याच्या आधीच अर्धा तास येऊन गाडीत एक झोप सुद्धा काढुन आली! राघवेंद्र जयंत काकांना घेऊन आले. टेबल पकडायचा काही प्रश्नच नव्हता कारण अक्खा फुड कोर्ट रिकामा! आम्ही २-४ टेबल जोडुन कट्ट्याच्या तारा जुळवायला सुरूवात केली. सईने फेसबुकवर लाईव्ह जाण्याची आयडीया सांगितल्याने लगेच एक ट्रायल रन घेतला. फेसबुकच्या "मिपाकर" ह्या ग्रुपवर दोन्ही व्हिडीओ पहायला मिळतील.

पोरांची एकमेकांशी आणि खास करुन जयंत "आजोबांशी" मस्त गट्टी जमली होती. आम्हालाही काकांना बरेच प्रश्न विचारायचे होते. आमच्या गप्पा, अधुन मधुन व्हिडिओ कॉल इ चालु होतंच. कट्ट्यासाठी आदल्या रात्रीच निघालेल्या आणि अजुनही न पोहचलेलल्या आदगाला कॉल करुन यारी दोस्तीत एक धमकी दिली. आला बिचारा धावत पळत. त्याला बराच वेळ टोटल लागत नव्हती की चाललंय काय?! शिवाय प्रत्येक जण त्याला नाव विचारत होता तेव्हा "आषाढ दर्द गाणे" असं नितांत सोप्पं आणि सहज नाव सांगताना नक्कीच त्याला फार मजा आली असणार. =))

प्रत्येक जण कुणाला तरी पकडुन काही ना काही बोलत होताच. अगदी अबीर आणि सई ज्यु. नी सुद्धा एका टेबलवर आपल्या लॉलीपॉप कट्टा जमवला होता. प्रत्येक्जण एकमेकांशी बोलता बोलता मध्येच समोर फोनवर कुणी मिपावर आला तर त्यालाही हातवारे करुन "ऐकु येत नाही. पण बरं झालं फोन केलात" असंही ओरडुन ओरडुन सांगत होता. राघवेंद्रनी "चला आता घ्यायचं का खायला?!" असं निर्वाणीचं विचारल्यावरही आम्ही "थांबा जरा, पंत आणि जुइशी बोलुन घेऊ" म्हणुन अजुन एक कॉल लावलाच.

खादाडीचं तर काही विचारुच नकात. (फेसबुकवर पहाच सरळ!) मी टेबलचं रक्षण करत बसले आणि तिकडुन अजुन एक माणुस अंदाजपंचे चेहरा घेऊन आला. "मिपाचा कट्टा हाच का?" असं त्यांनी ४ टेबल अडवण्यासाठी दोन हात पसरुन बसलेल्या मला एकटीला पाहुनही ओळखलं, म्हणजे पहाच की माणुस किती चतुर! हा कट्टाच अत्यंत हाय आयक्यु कट्टा होता. दोन पीएचडी आणि एक जयंत काका!!

तोवर मंडळी खायला घेऊन आलीच. खादाडीला चेपुवर लाईव्ह करुन मगच मी लोकांच्या मुखात घास जाऊ दिला. राघवेंद्रनी नक्कीच मला मनातल्या मनात दोन चार शिव्या घातल्या असतील. त्यांची ऑस्सम थाळी समोर ठेवुन मी त्याचे व्हिडिओ करत बसल्यावर आणखी काय होणार!

खाऊन पिऊन आणखीन सबंध नसलेल्या १५६८२ विषयांवर चर्चा करुन मग आम्ही न्युपोर्ट ग्रीनला जायचं ठरवलं. त्या बिचार्‍या जॅक बावरना दुसर्‍या दिवशी इंग्लंडला जायचं होतं. त्यांनांही "जाल हो.. त्यात काये?" असं म्हणत तिकडे घेऊन गेलो. (जसं काय आम्हीच जाउन त्यांच्या बॅगा भरणार होतो!) तिकडेही जाऊन गप्पाच मारल्या. पण तिथले विषय जास्त स्फोटक होते! तिथे म्हणजे सगळ्यांमधले मिपाकर जागृत झाले. आदगाला तर "खवची उचकापाचक करुन नक्की काय मिळतं?" हे ही माहिती नव्हतं. तो अजुनही जेन्युईनली सोज्वळ आहे. त्याला "गॉसिप!" असं उत्तर पटायलाही काही क्षण गेलेच! माझा आणि सईचा नवरा पोरांना खेळवत बसले त्यामुळे मी आणि सई फुल्ल ऑन मोकाट सुटलो होतो!

अजुन २ तास गप्पा मारुन झाल्या. निघण्याची वेळ झाली होती. आदग्याला ४८ तासाच्या आत वृतांत लिही म्हणुन अजुन एक यारी दोस्तीत धमकी दिली! त्याच्या एका संशोधनाच्या विषयावर मिपावर धागा टाकलास तर तुझा पेपर लोकंच लिहुन देतील असंही सांगितलं. त्याला अभ्यासु आयडींची नावं पण दिली आहेत दोन चार. =))

तर अशा प्रकारे एक दणदणीत कट्टा झालेला आहे! असेच कट्टे होत राहोत!

लॉन्ग लिव्ह मिपा!

ट्रेड मार्क's picture

26 Apr 2017 - 5:02 am | ट्रेड मार्क

मी ५०० मैल अंतरावर असल्याने कट्टा तर मिसलाच पण न्यू पोर्ट मॉलला पण मिस केलं. समोरच ऑफिस असल्याने एके काळी न्यू पोर्ट मॉलमध्ये रोज जाणे व्हायचे.

मंजूताई's picture

26 Apr 2017 - 6:38 am | मंजूताई

कट्टा वृत्तांत व फोटो!

प्रीत-मोहर's picture

26 Apr 2017 - 7:13 am | प्रीत-मोहर

मस्त झाला की कट्टा!

चांगलंय... मित्र मैत्रिणी भेटतात त्याचे वृत्तांत वाचायला मजा येते. पण माझी अशी कुठे जायची वेळ आली की दहा पावले मागेच सरतो.

मस्तच लिहिलाय वृ! लिहिते रहा. (पण जिलब्या पाडू नका :) )

आषाढ_दर्द_गाणे's picture

26 Apr 2017 - 8:49 pm | आषाढ_दर्द_गाणे

(पण जिलब्या पाडू नका :) )

बर्रर्रर्र...
प्रतिसादाकरता धन्यवाद!

श्रीरंग_जोशी's picture

26 Apr 2017 - 9:19 am | श्रीरंग_जोशी

वृत्तांत वाचून वाटले नाही की लेखकाची कट्टा वृत्तांत लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे.
कट्टा एकदम भन्नाट झालेला दिसत आहे. वर्णनशैली अन फोटोज आवडले.

काही मिनिटांकरिता का होईना या कट्ट्याला आम्हालाही व्हिडिओ चॅट द्वारे उपस्थित राहता आले ही खूपच समाधानाची बाब आहे.
आणखी एका यशस्वी मिपाकट्ट्यासाठी सर्व कट्टेकर्‍यांचे अभिनंदन.

आमच्या भागातही मिपाकरांची घनता वाढो अन असे कट्टे आमच्या शहरातही होवोत ही सदिच्छा.

ता.क. पिराचा उपवृत्तांतही भावला.

आषाढ_दर्द_गाणे's picture

26 Apr 2017 - 8:45 pm | आषाढ_दर्द_गाणे

धन्यवाद!

आमच्या भागातही मिपाकरांची घनता वाढो

तुम्हीच जरा दूधदुभतं खायचं मनावर घ्या. आपोआप वाढेल वजन, आणि पर्यायाने घनता.

समर्पक's picture

26 Apr 2017 - 10:05 pm | समर्पक

काही मिनिटांकरिता का होईना या कट्ट्याला आम्हालाही व्हिडिओ चॅट द्वारे उपस्थित राहता आले ही खूपच समाधानाची बाब आहे. आमच्या भागातही मिपाकरांची घनता वाढो अन असे कट्टे आमच्या शहरातही होवोत...

अरे वा! भारी कट्टा!! भारी मिपाकर!!!

आषाढ_दर्द_गाणे's picture

26 Apr 2017 - 8:45 pm | आषाढ_दर्द_गाणे

धन्यवाद!

किसन शिंदे's picture

26 Apr 2017 - 9:41 am | किसन शिंदे

फोटो आणि वृत्तांत दोन्ही भारी !!

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2017 - 9:59 am | टवाळ कार्टा

भारी

संजय क्षीरसागर's picture

26 Apr 2017 - 10:24 am | संजय क्षीरसागर

त्याच्या एका संशोधनाच्या विषयावर मिपावर धागा टाकलास तर तुझा पेपर लोकंच लिहुन देतील असंही सांगितलं.

ही खास पिरा स्टाईल फार आवडली !

अत्रन्गि पाउस's picture

26 Apr 2017 - 10:54 am | अत्रन्गि पाउस

ह्यांची व्याप्ती बघता सोबत ची कालवण पुरली का असा एक देशस्थी प्रश्न छळतॊय !!!

....कुणाचं काय तर कुणाचं काय !!!
:-))

आषाढ_दर्द_गाणे's picture

26 Apr 2017 - 8:47 pm | आषाढ_दर्द_गाणे

हाहा, अहो हि शंका मलाही आली होतीच!
पण ती नान ना अगदी खुसखुशीत होती, नुसतीच खाता आली असती!

राघवेंद्र's picture

26 Apr 2017 - 8:55 pm | राघवेंद्र

पंजाबी भाज्या कमी खाण्यासाठी केलेली ती युक्ती होती. आज काल हेल्थी भाज्या बाहेर मिळत नाही ( खायच्या पण नसतात :) ) त्यामुळे सुवर्णमध्य खूप कमी घ्यायच्या.

... मान गाये आप की नजर को

आषाढ_दर्द_गाणे's picture

26 Apr 2017 - 9:33 pm | आषाढ_दर्द_गाणे

पंजाबी भाज्या कमी खाण्यासाठी केलेली ती युक्ती होती. आज काल हेल्थी भाज्या बाहेर मिळत नाही ( खायच्या पण नसतात :) ) त्यामुळे सुवर्णमध्य खूप कमी घ्यायच्या.

वा!

पद्मावति's picture

26 Apr 2017 - 11:04 am | पद्मावति

फेसबूकवर मिपा कट्टा लाईव बघुनच कट्टा मस्तं झाला असणार हे कळलं होतंच. आता आदगा यांचा वृत्तांत आणि पिराचा उपवृत्तांत वाचून खात्री झाली. फोटोही छान आलेत.

मी आधी टाकलेला प्रतिसाद दिसतच नाहिये.

कट्टा छान झालेला दिसतोय, फोटो , वृत्तांत आणि उपवृत्तांत ही छान.

पहिलटकर असून बरं लिहीलंत की!! वर पिरातै म्हणतात तसं मलाही हा डुआयडी असल्याची प्रचंड शंका आली होती, आता साक्षात धागाच पाडलात म्हटल्यावर बोलती बंद आहे.
मित्राच्या कुटुंबियांना दाखवा हा धागा म्हणजे पुन्हा प्रश्न यायचे नाहीत. =))
लिहीत राहा, (फक्त रतीब घातला जाणार नाही असं बघा) . ;)

आषाढ_दर्द_गाणे's picture

26 Apr 2017 - 9:14 pm | आषाढ_दर्द_गाणे

तुमच्या(ही) 'ड्वायडी' असण्याच्या शंकेचे निरसन झाले ते उत्तम. #कायकायपापडलाटावेलागतात
बाकी

पहिलटकर असून बरं लिहीलंत की!!

हा तिसरा धागा काढलाय मी, पण कट्टा पहिलाच होता. तरी आभारी आहे!
आणि

(फक्त रतीब घातला जाणार नाही असं बघा) . ;)

हे असलं काही तरी म्हणणारे तुम्ही वरून दुसरे.
ससंदर्भच देता का, स्पष्टीकरण? लिहिणे आणि जिलब्या/रतीब पाड/घालणे ह्यात नक्की फरक काय त्याचे? :)

दादा, अभ्यास वाढवला की कळेल तुम्हालाच :))
आता अभ्यास वाढवायचा म्हणजे काय हे विचारु नका! कट्टयामध्ये शिकीवलं की न्हाई?

आषाढ_दर्द_गाणे's picture

26 Apr 2017 - 10:21 pm | आषाढ_दर्द_गाणे

हा #पळपुटेपणा झाला
आणि अभ्यास वाढवण्याइतका उत्साह नाही हो माझ्यात! :)

सच्चा मिपाकर वोही जो जिलब्या का मतलब जाने. वोक्के?

#पळपुटेपणा नव्हे तर #मिपाकरपणा आहे तो.

पहिलटकर कट्ट्याच्या बाबतीत म्हटलं हो. बाकी काही लिहून तुमचा कट्ट्याचा धागा हायजॅक करत नाही. रतीब, जिलब्या याचा कळेल अर्थ हळुहळू !! ;)

सही रे सई's picture

27 Apr 2017 - 1:25 am | सही रे सई

आदगा - इथे काही संदर्भ मिळतील बघ तुला :
http://www.misalpav.com/node/16970

नवीन लोकांनी एकदा तरी हा वाचावाच असा धागा आहे..

मितान's picture

26 Apr 2017 - 1:00 pm | मितान

अरे वा ! मजा आली वाचताना ! खमंग लिहिलंय वर पिरा ची फोडणी पण भन्नाटच !

कट्ट्याची भूक लागली आता हे वाचून... :)

आषाढ_दर्द_गाणे's picture

26 Apr 2017 - 9:15 pm | आषाढ_दर्द_गाणे

कट्ट्याची भूक लागली आता हे वाचून... :)

म्हणजे वृत्तांत लिहिण्याच्या उद्देश सफल झाला! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Apr 2017 - 1:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट झाला की कट्टा ! आदगा पहिल्यांदा लिहित आहेत यावर विश्वास बसणार नाही इतके मस्त लिहीले आहे ! पिरांचा उपवृत्तांत नेहमीसारखाच यशस्वी आहे ! फोटोही मस्तं.

आषाढ_दर्द_गाणे's picture

26 Apr 2017 - 9:21 pm | आषाढ_दर्द_गाणे

आदगा पहिल्यांदा लिहित आहेत यावर विश्वास बसणार नाही इतके मस्त लिहीले आहे !

आपल्यासारख्या ज्येष्ठ मिपाकरांनी दाद दिल्यानं मूठभर मांस चढलं अंगावर! आभारी आहे!

मस्तच. जयंत कुलकर्णी काका US मध्ये असतात हे माहित नव्हतं. बाकी वृत्तांत छानच आहे. गेल्या वेळच्या पिरातैंच्या न्यूयॉर्क कट्ट्यानंतर आम्ही वाशीला महाकट्टा केला होता. बघू, या वेळी पुनरावृत्ती होते का ते!

न्यूयॉर्क कट्ट्यानंतर आम्ही वाशीला महाकट्टा केला होता.

आता पुण्यात कट्टा करणे आले.

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2017 - 2:44 pm | टवाळ कार्टा

पुण्यात म्हणजे नक्की कुठे....नदीच्या अलीकडे / पलिकडे....विथ/विदाउट पिंचीकर (त्यात सुद्धा ठरावीक रस्त्यांवरच्या ठिकाणी जाणारे/न जाणारे)
आणि हो....३ धागे काढा =))

सूड's picture

26 Apr 2017 - 6:27 pm | सूड

विदाउट पिंचीकर

भाऊ मी पुणे म्हटलं. मध्येच पिंचिकुठून आणलंस? कशाशी खातात हे?

जयंत कुलकर्णी's picture

26 Apr 2017 - 6:04 pm | जयंत कुलकर्णी

नाही.... मी पुण्यालाच असतो....
दोन तीन महिन्यासाठी इकडे आलो होतो...
:-)

वेल्लाभट's picture

26 Apr 2017 - 2:28 pm | वेल्लाभट

जबर! हा माणूस अगदी वृत्तांत नियमित पाडत असल्यागत भारी लिहिलाय वृत्तांत. खासच. म्हणजे ते काय ते, मैत्रीयारीत वगैरे ही सुद्धा धमकी दिली गेली असावी. की वृत्तांत टॉप क्लास झाला नाही तर बघ! असं काहीसं. :)

कट्टा जोरदार झाला हे दिसतंयच. त्यामुळे त्याबद्दल नो क्वेच्चन. मजा आली वाचून. वा. धमाल.

संजय क्षीरसागर's picture

26 Apr 2017 - 3:00 pm | संजय क्षीरसागर

याची लिंक मिळू शकेल का ?

पिलीयन रायडर's picture

26 Apr 2017 - 3:31 pm | पिलीयन रायडर

त्यासाठी हा ग्रुप जॉइन करावा लागेल - https://m.facebook.com/groups/163835483668577

ग्रुपवर लाईव्ह गेल्याने तो व्हिडीओ ग्रुपपुरताच मर्यादित आहे.

ट्रेड मार्क's picture

26 Apr 2017 - 8:35 pm | ट्रेड मार्क

हा ग्रुप आम्हाला जॉईन करता येईल का?

पिलीयन रायडर's picture

26 Apr 2017 - 9:14 pm | पिलीयन रायडर

हो, सर्वच मिपाकरांसाठी खुला आहे. तिथे रिक्वेस्ट केलीत की अ‍ॅडमिन अप्रुव्ह करतात. कुणी चेपुच्या मित्रयादीत आधीच ह्या ग्रुपमध्ये असेल तर ती व्यक्ति तुम्हाला सरळ अ‍ॅड करु शकते.

सिरुसेरि's picture

26 Apr 2017 - 3:41 pm | सिरुसेरि

छान माहिती .

पैसा's picture

26 Apr 2017 - 4:31 pm | पैसा

आजकाल पूर्वीचे नवखे मिपाकर दिसत नैत ओ! उलट कोणी मी बै नवीन म्हटले की जास्त शंका यायला लागतात! =)) =)) =))

असो. कट्टा भारी आणि वृत्तांत लै भारी! जयंत कुलकर्णींसोबत गप्पा मारण्याची संधी मिळणार असेल तर मी पुण्याला किंवा मुंबईला यायचे कष्ट सुद्धा घ्यायला तयार आहे. चहा मिळाला नाही तरी बेहत्तर आहे! =)) =)) =))

स्रुजा's picture

26 Apr 2017 - 4:54 pm | स्रुजा

हाहाहा एक नंबर वृत्तांत. सराईतासारखा लिहीलाय अगदी. व्हिडीओ कॉलवर आगाखान कोण माणुस आहे हे पाहिलं नसतं तर माझा ही डु आयडी चा संशय अजुनच पक्का झाला असता इतका चांगला लिहीलाय वृत्तांत. आणि ७ तास प्रवास करुन खास कट्ट्याला हजेरी लावल्याबद्दल खास कौतुक. हा कट्टा मिस केल्यामुळे खरंच हळहळ वाटली. पुढच्या वेळी थोडं आधी प्लान करु म्हणजे तिकीटं काढता येतील.

बाकी,
आणि सगळं चानचान चालू असताना अचानक कट्ट्याचा वृत्तांत लिहिण्याच्या जबाबदारीचा नारळ 'तू सगळ्यात नवा सदस्य आहेस' असं म्हणत माझ्या हाती दिला गेला. ह्या धर्मसंकटात पडल्याने माझ्या मनावर आलेलं मळभ आकाशी दाटून आलं होतं.

ह्याला रॅगिंग म्हणतात. सुमडीत अडकवलं गेलं ;)

मिपाकट्ट्यावर नवीन येऊन गप्पा मारणार्‍यांबद्दल नेहमीच कौतुक वाटतं. कालच्या माझ्या कॉलमध्ये रेंज बिंज नव्हती म्हणुन मी सुटले नाही तर अशा वेळी एक टॉपिक सुचेल बोलायला तर शपथ !

पिराचा खास अनसेन्सॉर्ड वृत्तांत मी फोनवर ऐकला आहे त्यामुळे या वृत्तांताची वाट पाहतच होते. इतरांनीही पुरवण्या जोडा पटापट.

आदूबाळ's picture

26 Apr 2017 - 4:55 pm | आदूबाळ

झकास आहे वृत्तांत!

मिहिरभाऊंना आधी भेटलो आहे, आणि पिरा, जयंतकाका चेहेर्‍याने माहीत आहेत ते सोडा, पण हे टोळकं मराठी आहे हे कुठूनबी ओळखलं असतं.

अभ्या..'s picture

26 Apr 2017 - 5:06 pm | अभ्या..

झकास झकास. वॄतांत झकास.
मराठीच काय तर राघवेंद्राला मी जगाच्या पाठीवर कुठेही कसल्याही अवतारात पाहिलं तरी विचारीन "सोलापुरात कुठे राहतो बे? " म्हणून.
बाकी मंडळी टिपिकल टिपिकल. जंयंतकाकांना पाहिलेले असल्याने ओळखू आलेच.
पिरा नावाचा माणूस पण दिसला. धन्य झालो. ;)

आनंदयात्री's picture

26 Apr 2017 - 7:13 pm | आनंदयात्री

छान कट्टा झालेला दिसतोय. वृत्तांत पण झकास!

वरुण मोहिते's picture

26 Apr 2017 - 9:10 pm | वरुण मोहिते

आणि वृत्तांत हि छान .

चतुरंग's picture

26 Apr 2017 - 9:57 pm | चतुरंग

आणि मस्त वृत्तांत + पुरवणीवृत्तांत :)

(ईस्टकोस्टआद्यकट्टेकरी) रंगा

प्रभू-प्रसाद's picture

26 Apr 2017 - 10:17 pm | प्रभू-प्रसाद

वृत्तांत व फोटो एकदम सही!!

"सोलापुरात कुठे राहतो बे? "

असं विचारण्याकरिता तरी एक कट्टा सोलापूरात व्हावा..

राघवेंद्र's picture

27 Apr 2017 - 1:27 am | राघवेंद्र

मिपाकट्टा करू पुढच्या ट्रीपला , तो पर्यंत अभ्याला पकड ..

तो अजून थोडेच दिवस रिकामा आहे ...

प्रसादरावांचा कै उपयोग नाही. आपला गाववाला म्हनून प्रेमाने खरड केली तर वर्षे झाली उत्तर नाही. :(
राघवेंद्रस्वामी आपणच यावे अन कट्टा आयोजित करावा. पब्लिक येणार येणार येणार.
पुण्याचा एक टांगारु ग्रुप येतो म्हणतोय. पाहू कीती जण उत्साही आहेत. बाकी छत्रपती, मी, नितीन सोलापूरकर, कट्टप्पा हि ग्यांग आहेच.

तो अजून थोडेच दिवस रिकामा आहे

म्हणजे? लग्न ठरलं की काय अभ्याच? छान छान तस असेल तर. अभिनंदन रे

आनंदयात्री's picture

27 Apr 2017 - 8:18 pm | आनंदयात्री

हेच म्हणतो. अभ्याला लग्न ठरल्याच्या शुभेच्छा आणि अभिनंदन!

पिलीयन रायडर's picture

27 Apr 2017 - 8:24 pm | पिलीयन रायडर

अभ्याचे लग्न ठरलेय? अभिनंदन अभ्या!

च्यामारी, कोणाय रे ते? कैपण
.
.
माझा ऑलरेडी बालविवाह झालाय आणि आता सर्टिफिकेट घेणारे. ;)
-कमिटेड अभ्या..

पिलीयन रायडर's picture

27 Apr 2017 - 8:53 pm | पिलीयन रायडर

अभ्याची विवाहनोंदणी होणारे? अभिनंदन अभ्या!

आहेरपाकीट राघवाकडे जमा करणे प्लीज.

राघवेंद्र's picture

27 Apr 2017 - 9:15 pm | राघवेंद्र

:)

आनंदयात्री's picture

27 Apr 2017 - 9:23 pm | आनंदयात्री

हेच म्हणतो. अभ्याची विवाहनोंदणीच्या शुभेच्छा आणि अभिनंदन!

आनंदयात्री's picture

27 Apr 2017 - 9:27 pm | आनंदयात्री

*अभ्याला

अर्धवटराव's picture

26 Apr 2017 - 11:08 pm | अर्धवटराव

कसले भारी कट्टे बिट्टे करता तुम्ही लोक्स यार. च्यायला मला अजुन एकही कट्टा अटेण्ड करता आला नाहि :( वेस्ट कोस्ट वाले इतके बिझी असतात कि काय...

राघवेंद्र's picture

26 Apr 2017 - 11:21 pm | राघवेंद्र

आ द गा यांनी लिहिलेला वृत्तांत प्रचंड आवडला. उद्या 'वृंतान्त कसे लिहावे' याचे मिपा पुस्तक काढले तर त्यात हा वृत्तांत समाविष्ट करावाच लागेल. ( मिपा पुस्तकं साठी आयडिया, एकाच विषयावरील लेख एकत्र करणे. )

मागच्या कट्याला झालेला उशीर या वेळेस होऊ द्यायचा नाही असे ठरवून लवकर पोहचण्या प्रयत्न जयंत काका ना घेऊन केला पण काय 'सई रे सई', नाही 'सही रे सही', नाही 'सही रे सई' कुटुंबासाहित अगोदरच आल्या होत्या.

लवकरच पिरा आणि कुटुंब, मिहीर पण आले आणि कट्टा सुरु झाला.

अँग्री यंग मॅन टाईप एन्ट्री 'आ द गा' ने केली तसेच पाठोपाठ शोधत Jack_Bauer आला.

फेसबुक लाईव्ह , मिपा चा इतिहास , मिपाचा शब्दकोश, मिपा वरिल प्रसिद्ध व्यक्तिमत्वे अश्या चर्चा करत सोबत खादाडी करत कट्टा मजेत संपन्न झाला.
( तळटीप - प्रा. डॉ. यानां या वेळेस कॉल करायचा राहून गेला पुढच्या वेळेस पहिल्यांदा करणार. )

पुढे काय -
जयंत काका नी सुचवल्याप्रमाणे कट्याला पुढच्या वेळेस एखादे कथा वाचन,कविता वाचन अशी थीम करायची योजना आहे.
तसेच इस्ट कोस्ट वरिल १-२ दिवसात जाऊन येऊ अश्या सहलीच्या ठिकाणांवर सगळ्यांनी मिळून लेखमाला लिहण्याचा प्रस्तावाला तत्वतः मान्यता देण्यात आली.
आ द गा ने सुचवल्या प्रमाणे मिपाचा प्रसार अजुन सामान्य मराठी माणसापर्यंत (विशेषतः मुंबईतल्या ) पोहचण्यासाठी काही तरी प्रयत्न केले पाहिजे.

पिराताईंचा चष्मा आवडला. एकदम स्कॉलर वाटतात. :-P
कुलकर्णी साहेब नेहमीप्रमाणेच साधेसुधे आणि चेहऱ्यावरूनच विद्वान दिसताहेत.
बाकी मिपाबंधू-भगिनीही (आणि तुमचे कुटुंबीयही) अॅन युज्वल रॉक्स!

कट्टा वृत्तांत आणि उप वृत्तांत आवडले. फोटोही चांगले आले आहेत. आमच्या पहिल्या इकट्ट्याला या निमित्याने हजेरी लागली. लेकीचाही हा पहिला मिपा कट्टा होता! जयंत कुलकर्णी काकांशी आणि इतर मिपाकरांशी या निमित्याने संवाद साधता आला ही एक मोठी पर्वणीच आहे आमच्यासाठी.

खटपट्या's picture

27 Apr 2017 - 6:06 pm | खटपट्या

फोटो दिसत नाहीत.

सतिश गावडे's picture

27 Apr 2017 - 9:30 pm | सतिश गावडे

भारी झाला आहे कट्टा. जयंत काकांना कट्ट्याच्या निमित्ताने एकदा भेटण्याचा योग्य आला होता.

मुशाफिर's picture

28 Apr 2017 - 4:24 am | मुशाफिर

सूर्याजीपंताना गाडीत भेटलेला माणूस मीच! काही वैयक्तिक कारणांनी मी कट्ट्याला येवू शकलो नाही. पण त्यामुळे बरेच मिपाकर भेटले, हेही नसे थोडके :-)

राघवेंद्र's picture

28 Apr 2017 - 4:41 am | राघवेंद्र

आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद मुसाफिरजी!!!!

पुढील कट्याला भेटू !!!

मुशाफिर's picture

28 Apr 2017 - 4:44 am | मुशाफिर

प्रयत्न करेन.

प्रमोद देर्देकर's picture

28 Apr 2017 - 7:03 am | प्रमोद देर्देकर

व्रूत्तांत तर लई झकास .

जणु जिलब्या पाडणार्‍या मिपाकराने लिहल्यासारखा

पण,

पण जल्ला फटुच्या बाबतीत माझा गणेशा झालाय.

आदगा आता गणेशा कोण ते तुच शोधुन काढ , कोणाला विचारु नको.