ताज्या घडामोडी : भाग ५

गॅरी ट्रुमन's picture
गॅरी ट्रुमन in काथ्याकूट
11 Apr 2017 - 10:37 am
गाभा: 

यापूर्वीच्या भागात ३०० प्रतिसाद आल्यामुळे नवा भाग काढत आहे.

दोन राज्यातील तीन लोकसभा (जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आणि अनंतनाग तसेच केरळमधील मल्लापुरम) आणि १० राज्यांमधील १२ विधानसभा (आसामातील धेमाजी, हिमाचल प्रदेशातील भोरांज, मध्य प्रदेशातील अटेर आणि बांधवगड, पश्चिम बंगालमधील कांथी दक्षिण, राजस्थानमधील धोलपूर, कर्नाटकातील नंजनगड आणि गुंडुलपेट, तामिळनाडूतील डॉ. राधाकृष्ण नगर, झारखंडमधील लिटिपारा, सिक्किममधील अपर बुर्तुक आणि दिल्लीमधील राजौरी गार्डन) या मतदारसंघात दोन टप्प्यांमधील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम (९ आणि १२ एप्रिल) निवडणुक आयोगाने जाहिर केला होता. त्यापैकी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसंघातील तर तामिळनाडूमधील डॉ. राधाकृष्ण नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक निवडणुक आयोगाने रद्द केली आहे. इतर मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात ९ एप्रिलला मतदान पूर्ण झाले तर उरलेल्या मतदारसंघांमध्ये १२ एप्रिलला मतदान होईल. मतमोजणी १३ एप्रिलला होईल.

श्रीनगर मतदारसंघातून २०१४ मध्ये निवडून गेलेल्या पी.डी.पीच्या खासदाराने मागच्या वर्षी बुरहान वाणी प्रकरणानंतर उसळलेल्या असंतोषादरम्यान राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणुक जाहिर करण्यात आली. पण या मतदारसंघात अवघे साडेसहा टक्के मतदान झाले. तसेच मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर हिंसाचारही झाला. त्यामुळे निवडणुक आयोगाने राज्यातील अनंतनाग या मतदारसंघातील पोटनिवडणुक सध्या रद्द केली आहे. या मतदारसंघातून २०१४ मध्ये पी.डी.पी च्या मेहबूबा मुफ्ती लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर पोटनिवडणुकीत विजय मिळवून जम्मू-काश्मीर विधानसभेत प्रवेश केला आणि त्यानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

तामिळनाडूतील चेन्नई शहरातील डॉ. राधाकृष्ण नगर विधानसभा मतदारसंघातून २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जयललितांचा विजय झाला होता. त्यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती. ही पोटनिवडणुक प्रतिष्ठेची होती. अण्णा द्रमुकच्या शशीकला नटराजन गटाने पक्षाचे ज्येष्ठ नेते टी.टी.व्ही.दिवाकरन यांना तर ओ.पन्नीरसेल्वम गटाने ई.मधुसुदनन यांना उमेदवारी दिली होती. त्याचबरोबर जयललितांच्या भाचीने-- जे. दीपानेही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. ही पोटनिवडणुक जिंकेल त्या गटाला जयललितांचा वारसा मिळेल असे म्हटले जाईल हे नक्कीच. त्यामुळे या निवडणुका दोन्ही गटांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. या निवडणुकांसाठी पैशाचा महापूर वाहिला. तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांच्या घरावर आयकर विभागाचा ढापाही पडला. त्यातून निवडणुक आयोगाने ही पोटनिवडणुक रद्द केली.

दिल्लीमधील राजौरी गार्डन मतदारसंघातील पोटनिवडणुक महत्वाची आहे. या मतदारसंघात २०१५ मध्ये आआपचे जरनेलसिंग निवडून गेले होते. त्यांनी दिल्ली विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पंजाबमधील लांबी मतदारसंघात प्रकाशसिंग बादल यांच्याविरूध्द निवडणुक लढवली. पण त्याच मतदारसंघातून कॅप्टन अमरिंदरसिंग यांनीही निवडणुक लढवली. प्रकाशसिंग बादल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग या महारथींपुढे जरनेलसिंगची डाळ शिजली नाही आणि लांबीमध्ये त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. हातात असलेली दिल्लीतील आमदारकी उगीचच त्यांनी सोडली. आता आआपने त्यांना उमेदवारी न देता हरजितसिंग या नव्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. भाजप-अकाली दल युतीतर्फे अकाली दलाचे मनजिंदरसिंग सिरसा (२०१३ मधील विजयी उमेदवार) यांना तर काँग्रेसतर्फे मिनाक्षी चंदेला यांना उमेदवारी दिली गेली आहे. या मतदारसंघातील पोटनिवडणुक महत्वाची आहे कारण हा निकाल लागल्यानंतर १० दिवसातच दिल्ली महापालिकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील वारे कोणत्या दिशेने वाहात आहेत याची कल्पना राजौरी गार्डनमधील निकालामुळे येईल. दिल्लीच्या पश्चिम भागात असलेल्या या मतदारसंघात १९४७ मध्ये पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या शीखांची (आणि त्यांच्या वंशजांची) संख्या लक्षणीय आहे. तसेच पंजाबशी या भागातील शीख मतदारांचे जवळचे संबंध आहेत. अनेकांचे नातेवाईक पंजाबमध्ये आहेत. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला त्याचा फायदा उठवायचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. तसेच काँग्रेस नेते अजय माकन यांचा पूर्वीचा हा मतदारसंघ आहे. अजय माकन राजौरी गार्डनमधून १९९३, १९९८ आणि २००३ या ३ निवडणुकांमध्ये दिल्ली विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांचे घरही राजौरी गार्डनच्या मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे काँग्रेस इथे चांगलाच जोर लावत आहे. या मतदारसंघात भाजपचा विशेष जोर नाही. आतापर्यंत एकदाच २०१३ मध्ये भाजप-अकाली दल युतीने ही जागा जिंकली होती. २०१५ मध्ये आआपने तर इतर सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसने ही जागा जिंकली होती. या मतदारसंघात पराभव झाल्यास आआपच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर नक्कीच परीणाम होईल आणि १० दिवसांनंतर असलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकांसाठी ते पुरेशा आत्मविश्वासाने सामोरे जाणार नाहीत हे नक्कीच. त्या दृष्टीने आआप आणि केजरीवालांसाठी ही पोटनिवडणुक महत्वाची आहे.

१३ एप्रिलला पोटनिवडणुकांचे निकाल आल्यावर ते इथे पोस्ट करेनच.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

19 Apr 2017 - 8:04 pm | श्रीगुरुजी

कोळसे पाटील हा अत्यंत नालायक आणि डांबरट माणूस आहे. याच माणसाने आपल्या वकिली कौशल्याने मानवत हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार उत्तम पाटील (या हत्याकांडात गुप्तधनासाठी ११ मुलांचा नरबळी देण्यात आला होता) याला निर्दोष सोडविले होते व त्या बदल्यात भरभक्कम कमाई केली होती. २६/११ चा हल्ला संघाने केला कारण त्यात त्यांना करकरेंना मारायचे होते असा जावईशोध लावणारे पुस्तक कोल्हापूरच्या मुश्रीफने लिहिले होते. त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला कोळसे पाटील व पानसरे उपस्थित होते व त्यांनी संघाला शिव्या देणारी भाषणे ठोकली होती. हा माणूस सातत्याने संघाविषयी विखारी बोलत असतो. अशा हलकटांमुळेच निधर्मांध पक्षांची वाईट अवस्था झाली आहे.

गामा पैलवान's picture

20 Apr 2017 - 12:06 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

तुमच्याशी याबाबत अक्षर-अन-अक्षर सहमत. बऱ्याच दिवसांनी असा योग आला म्हणून आवर्जून लिहितोय. मोदींना २०१९ साली निवडून येण्यात असेच विखारी आरोप मदत करणार आहेत.

आ.न.,
-गा.पै.

पुंबा's picture

20 Apr 2017 - 12:30 pm | पुंबा

++११११

श्रीगुरुजी's picture

20 Apr 2017 - 3:35 pm | श्रीगुरुजी

जे सातत्याने विखारी आरोप करीत बसतात त्यांच्याविषयी जनतेत संताप निर्माण होऊन ते जी आंदोलने, चळवळी करीत आहेत त्याविषयी जनतेची सहानुभूती कमी होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बच्चू कडू. बच्चू कडूने शेतकर्‍यांसाठी कसला तरी मोर्चा काढला आहे. परंतु मोर्चात भाषणे करताना त्याची जीभ सातत्याने घसरत आहे. आधी तो हेमा मालिनीवर घसरला आणि ती रोज टंपरभर दारू पिते असे बरळला. परवा तो सचिन तेंडुलकरवर घसरला व सचिनचा कबुतर असा उल्लेख करून त्याने सचिनवर तोंडसुख घेतले. सचिनबद्दल जनमानसात चांगली प्रतिमा आहे. शेतकर्‍यांचे प्रश्न व सचिन यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसताना विनाकारण सचिनला मध्ये ओढल्याने या माणसाबद्दल व त्याच्या शेतकरी आंदोलनाबद्दल जनतेची सहानुभूती कमी होण्याची शक्यता आहे.

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2017 - 11:13 pm | श्रीगुरुजी

"आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू" असे बच्चू कडू पुन्हा एकदा बरळला आहे. माधव भंडारींनी जे वक्तव्य केलंच नव्हतं, त्यावर त्यांना झोडपून काढणारे शेतकरी नेते या जाहीररित्या केलेल्या वक्तव्यावर अजून गप्प आहेत.

विशुमित's picture

20 Apr 2017 - 6:53 pm | विशुमित

मानवत हत्याकांड खरंच खूप निर्घृण आणि तेवढेच रोचक हत्याकांड आहे. मोनोपॉज असलेल्या महिलेला संतती आणि गुप्तधन मिळावे म्हणून अविवाहित ब्राह्मणांच्या अतृप्त मुंजोबाला प्रसन्न करण्याच्या पायी ११ जणांचा नरबळी देण्यात आला होता. विशेष म्हणजे काही हत्या तर पोलिसांच्या आसपास झाल्या होत्या.

पण उच्च न्यायालयाने निर्णयाच्या शेवटच्या परिच्छेदात खालील नमूद केले आहे आणि तीन निष्णात तरुण वकिलांचे कौतुक केले आहे. हे तीन तरुण निष्णात वकील कोण होते? कोणी प्रकाश टाकू शकेल का?

""Counsel drew our attention to a very disquieting feature in the attempt of the police to see that the accused did not get the assistance of the local Bar. The suggestion has of course been denied by the police officer. If there is any truth in this unholy move for denying proper defence to the accused, no matter how heinous the offence, it is highly obnoxious to the notions of fair play and ऑल that justice stands for. Such ideas should be banished. I hasten to add that the accused before us कोल्ड not have been better defended as has been done by the three conscientious young counsel who impressed us with their industry and ability."""

https://indiankanoon.org/doc/148506/

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडायचा कट केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आणि उमा भारती यांच्याविरूध्द गुन्हेगारी स्वरूपाचा खटला चालविण्यात यावा असा निकाल दिला आहे. http://timesofindia.indiatimes.com/india/babri-case-supreme-court-restor...

प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदावरून जुलै महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यानंतर लालकृष्ण अडवाणी किंवा मुरलीमनोहर जोशींना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार केले जाईल अशा बातम्या येत होत्या (त्या खर्‍या असतील असे मला तरी कधीच वाटले नव्हते). यापुढे या वावड्या उठणे बंद होईल अशी अपेक्षा. उमा भारतींना मंत्रीपद सोडावे लागेल किंबहुना राममंदिरासाठी मी फासावरही जायला तयार होईन अशी डरकाळी त्यांनी मध्यंतरी फोडली होती. त्या तुलनेत मंत्रीपद म्हणजे किस झाड की पत्ती!!

नितिन थत्ते's picture

19 Apr 2017 - 11:16 am | नितिन थत्ते

सत्ताधारी पक्षाच्या "मार्गदर्शक मंडळावर" गुन्हेगारी कटाचा खटला.....
पक्षाध्यक्ष तडीपार....

असो.

अनुप ढेरे's picture

19 Apr 2017 - 11:35 am | अनुप ढेरे

सत्ताधारी पक्षाच्या "मार्गदर्शक मंडळावर" गुन्हेगारी कटाचा खटला.....
पक्षाध्यक्ष तडीपार....

हॅहॅहॅ. जामिनावर बाहेर असलेल्या अध्यक्ष-उपाध्यक्षांपेक्षा बरं आहे हे. :)

नितिन थत्ते's picture

19 Apr 2017 - 11:45 am | नितिन थत्ते

:)

ढेरेसाहेब... अशी लगेच हवा काढलीत की मिपावर असहिष्णुता वाढल्याचे आरोप होतील.

स्वत:चे हात कितीही काळे असले तरी त्याच हाताने दुसर्‍याकडे सतत बोटं दाखवण्यच्या कौशल्याला कधीतरी दाद द्यावी.. =))

पुंबा's picture

19 Apr 2017 - 12:35 pm | पुंबा

सुषमांना परराष्ट्रमंत्रीपदावरून हटवून त्यांच्याजागी वसुंधरा राजेंना आणण्याचा भाजपाच्या वरिष्ठ वर्तुळात मनोदय आहे असे ऐकले. असे झाले तर सुषमांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे येईल असे वाटते. तसे झाल्यास इतर पक्षातूनदेखील सुषमांना समर्थन मिळेल. बाकी आडवानी राष्ट्रपती होतील असे कधीही वाटले नव्हते. त्यांचं नशीब कायमचं फुटलेलं आहे.

गॅरी ट्रुमन's picture

19 Apr 2017 - 12:46 pm | गॅरी ट्रुमन

त्यांचं नशीब कायमचं फुटलेलं आहे.

असल्या माणसाचं नशीब कायमचं फुटलेलं आहे ते चांगलंच आहे. सुधींद्र कुलकर्णी या मुळातल्या कम्युनिस्ट माणसाच्या भजनी लागले आणि अडवाणी बियॉन्ड रिडेम्पशन कामातून गेले.

श्रीगुरुजी's picture

20 Apr 2017 - 3:29 pm | श्रीगुरुजी

अडवाणी, मुरली मनोहर जोशी व इतरांविरूद्ध न्यायालयाने खटला चालविण्याचा निर्णय दिल्यामुळे उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयामुळे अडवाणींची राष्ट्रपतीपदाची संधी हुकली, यामागे मोदींचा हात आहे अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया काही जणांनी दिल्या आहेत.

मुळात अडवाणींची राष्ट्रपतीपदाची उमेदवारी हा माध्यमांचा शोध आहे. स्वतः अडवाणींनी याबद्दल आजतगायत एक अवाक्षरही काढलेले नाही. भाजपकडून देखील याबाबत आजतगायत काहीही अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही. अनधिकृतरित्या सुद्धा भाजपच्या गोटात अशा हालचाली सुरू नव्हत्या. सध्या अडवाणींचे वय ८९ वर्षे आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी म्हणजे जुलै २०१७ मध्ये त्यांचे वय ८९ वर्षे ८ महिने इतके असेल. ते शारिरिकदृष्ट्या तंदुरूस्त असले तरी इतक्या वृद्धापकाळात भाजप त्यांना राष्ट्रपतीपदासाठी निवडण्याचा विचार करीत असेल असे वाटत नाही. ते स्वतःदेखील या पदासाठी इच्छुक असतील असे वाटत नाही. त्यामुळे न्यायालयात हा खटला पुन्हा सुरू होण्यामागे मोदी असतील असे वाटत नाही कारण अडवाणींचे आव्हान २०१३ लाच संपलेले आहे.

श्रीराम जन्मभूमी प्रकरण १९९२ मध्ये घडले. आता तब्बल २४ वर्षे उलटून गेल्यानंतर हे प्रकरण सुरू करून न्यायालयाला नक्की काय साध्य करायचे आहे ते समजत नाही. यातील अनेकजण केव्हाच स्वर्गवासी झाले आहेत. अडवाणी, मुरली मनोहर जोशी इ. नेते ९० च्या घरात आहेत. खरं तर हा खटला सुरू झाला तर भाजपचा त्यात फायदाच आहे कारण त्यानिमित्ताने पुन्हा एकदा श्रीरामजन्मभूमी, श्रीराम मंदीर इ. मुद्द्यांची चर्चा सुरू होईल व या मुद्द्यांवर नक्की कोणती भूमिका घ्यायची याविषयी बहुसंख्य पक्षांची अडचण होईल. जर खरोखरच हा खटला दोन वर्षात निकालात काढायचा असेल तर अंदाजे मे २०१९ मध्ये या खटल्याचा निकाल लागेल व त्याचा काळात लोकसभेची पुढील निवडणुक होईल. या खटल्यात अडवाणी, जोशी, उमा भारती इ. दोषी ठरले तरी भाजपला फायदा आणि निर्दोष सुटले तरी भाजपला फायदाच. अडवाणी दोषी ठरले असे जाहीर झाले तरी त्यांचे वय लक्षात घेता ते तेव्हा असतील का याविषयी शंका आहे आणि समजा असले तरी त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना कोणतीही शिक्षा मिळणार नाही (शिबू सोरेन भ्रष्टाचाराच्या खटल्यात दोषी ठरूनसुद्धा त्याचे वय ७० च्या आसपास आहे या कारणामुळे न्यायालयाने त्याला शिक्षा दिली नव्हती). तसेच या न्यायालयात शिक्षा झाली तरी नंतर उच्च न्यायालय व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात शिक्षेला आव्हान देता येईल व त्यासाठी किमान २ दशकांचा काळ जाईल. त्यामुळे या खटल्याला तसा काहीही अर्थ नाही.

त्यांचं नशीब कायमचं फुटलेलं आहे का हे माहिती नाही, परंतु भाजपमध्ये ते सर्वाधिक उंचीचे नेते आहेत याविषयी तिळमात्र शंका नाही. १९८५ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपचे देशभरातून फक्त २ खासदार निवडून आले होते. प्रत्यक्ष वाजपेयी व स्वतः अडवाणींचा पराभव झाला होता. अशा परिस्थितीत त्यांना भाजपच्या अध्यक्षपदावर नेमण्याचा अचूक निर्णय भाजप पक्षाने घेतला. त्याकाळात नुकताच उदयाला आलेला श्रीरामजन्मभूमीचा मुद्दा त्यांनी चटकन उचलला व देशभर रथयात्रा काढून भाजपला त्या मुद्द्याशी जोडून पक्षविस्तार केला. त्याचबरोबर समविचारी प्रादेशिक पक्षांशी युती करून पक्ष वाढविण्याची यशस्वी योजना त्यांनीच राबविली. शहाबानो प्रकरणात राजीव गांधींनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धुडकावून संसदेतील पाशवी बहुमताच्या जोरावर नवीन कायदा आणून मुस्लिम महिलांना कायमस्वरूपी अंधारात ढकलून दिले. या प्रकरणावरून देशात काँग्रेसविरोधी वातावरण निर्माण करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याच्याबरोबरीने बोफोर्स तोफांच्या खरेदीत दिली गेलेली लाच, जर्मन पाणबुड्यांच्या खरेदीत दिली गेलेली लाच याविरूद्ध वि. प्र. सिंग यांच्याप्रमाणे भाजपनेही देशभर जोरदार प्रचार केला होता. महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा जास्त बळ असताना कमीपणा पत्करून शिवसेनेशी युती करण्याचा त्यांचा निर्णय भाजपच्या विस्ताराला चांगलाच फायदा देऊन गेला. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या जनता दलाशी थेट युती न करता राजस्थान व गुजरात मध्ये त्यांनी जागावाटप समझोता करून दोघांनाही फायदा करून दिला. गुजरातेत भाजपने १४ जागा लढवून १२ जागा जिंकल्या तर जनता दलाने उर्वरीत १२ जागा लढवून ११ जागा जिंकल्या होत्या. राजस्थानमध्ये भाजपने १४ व जनता दलाने ११ लढविल्या होत्या व दोघांनी सर्व २५ जागा जिंकल्या होत्या. त्यांच्याच दूरदर्शी नेतृत्वामुळे भाजपची लोकसभेतील संख्या २ वरून ९० वर पोहोचली व उत्तरोत्तर ती वाढतच गेली. १९९१ च्या निवडणुकीत भाजपने आपली संख्या ९० वरून १२० वर नेली तेव्हाही अडवाणीच पक्षाध्यक्ष होते. भाजपचा विस्तार होण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.

आपल्यापेक्षा वाजपेयींची सार्वजनिक मान्यता जास्त आहे हे ओळखून १९९५ मध्ये झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात त्यांनी चतुराईने वाजपेयी हेच भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असे जाहीर करून स्वतः माघार घेतली. मोदींचा उदय होईपर्यंत वाजपेयी मध्यममार्गी व अडवाणी जहाल अशी प्रतिमा माध्यमांनी निर्माण केली होती. त्यामुळे अडवाणींवर माध्यमांचा कायम रोष असायचा. मोदींच्या उदयानंतर अडवाणी मध्यममार्गी व मोदी जहाल अशी प्रतिमा निर्माण झाली. कालांतराने मोदी मध्यममार्गी व त्यांच्याजागी नवीन आलेला जहाल (कदाचित योगी आदित्यनाथ) अशी प्रतिमा निर्माण होईल.

त्यांचे राजकीय जीवन पूर्ण निष्कलंक होते. त्यांनी राजकारणात घराणेशाही आणली नाही व स्वतःच्या पत्नीला व मुलानातवंडांना राजकारणापासून कटाक्षाने दूर ठेवले. स्वतःच्या पदाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न त्यांनी कधीही केल्याचे ऐकिवात नाही. १९९६ मध्ये नरसिंह रावांनी अत्यंत धूर्तपणे विरोधी पक्षातील काही विरोधकांना व आपल्याच पक्षातील विरोधकांना बदनाम करण्यासाठी जैन हवाला डायर्‍या प्रकरणाचे निमित्त करून अडवाणी, शरद यादव, मदनलाल खुराना, माधवराव सिंदिया, कमलनाथ इ. ना या प्रकरणात अडकविले. मे १९९६ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारी १९९६ मध्ये हे प्रकरण बाहेर आणून नरसिंहरावांनी एक जबरदस्त राजकीय खेळी खेळली. परंतु ही खेळी त्यांच्यावरच उलटली. संतापलेल्या माधवराव सिंदियांनी नवीन प्रादेशिक पक्ष काढून खासदारकीची निवडणुक जिंकली. आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेल्याने अत्यंत दुखावलेल्या अडवाणींनी खासदारकीचा राजीनामा देऊन या प्रकरणातून निर्दोष सुटेपर्यंत आपण निवडणुक लढविणार नाही असे जाहीर करून उच्च नैतिक भूमिका घेतली. यथावकाश निवडणुक झाल्यावर भाजपने १६० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष हे स्थान मिळविले व कॉंग्रेसला १४० जागा मिळून काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर फेकली गेली. कॉग्रेसच्या अपयशाचा नरसिंहरावांना फटका बसला व त्यांना पक्षाध्यक्षपद गमवावे लागले. एकंदरीत हवाला प्रकरण नरसिंहरावांवरच उलटले. हे प्रकरण अत्यंत फुसके होते. त्यात काहीच पुरावे नव्हते. त्यामुळे १९९८ मध्ये या प्रकरणाचा निकाल लागून त्यातील सर्वजण निर्दोष सुटले व अडवाणींवर आलेला कलंक दूर झाला. परंतु काँग्रेसला, विशेषत: नरसिंहरावांना, या प्रकरणाचा जोरदार फटका बसला.

नंतर १९९८ ते २००४ या काळात गृहमंत्री या नात्याने अडवाणींनी चांगले काम केले होते. त्यांची या काळातील उल्लेखनीय कामे म्हणजे बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्याला सुरूवात, अतिरेक्यांविरूद्ध पोटा या नवीन कायद्याची निर्मिती, अनेक देशांबरोबर गुन्हेगार हस्तांतरण करार, २००१ मध्ये भारतभेटीवर आलेल्या मुशर्रफच्या दबावाला खंबीर उत्तर, केंद्र व राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या संख्येवर १५ टक्क्यांची मर्यादा (या नवीन कायद्यामुळे महाराष्ट्रातील मंत्र्यांची संख्या ६९ वरून ४३ वर आली), पक्षांतरबंदी कायद्यातील काही पळवाटा काढून तो अधिक कडक करणे इ. त्यांनी अजून एक महत्त्वाचे काम केले. २००२ मध्ये गोध्रा येथे मुस्लिमांनी रेल्वेचा डबा पेटवून ६० नागरिकांना जिवंत जाळल्यानंतर जी दंगल झाली त्यासाठी मोदींना जबाबदार धरण्यात येत होते. मोदींवर व केंद्र सरकारवर प्रचंड टीकेचा भडीमार होत होता व मोदींना हटवावे यासाठी वाजपेयींवर सर्व बाजूने दबाव येत होता. वाजपेयींनी त्या दबावाखाली झुकून मोदींना हटविण्याचा निर्णय जवळपास नक्की केला होता. परंतु त्यावेळी अडवाणी खंबीरपणे मोदींच्या बाजूने उभे राहिले व मोदींना हटविण्यापासून त्यांनी वाजपेयींना परावृत्त केले.

परंतु २००४ मधील त्यांची भारत उदय यात्रा फसली. २००४ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यामागे अनेक कारणे होती. नंतर २००५ मध्ये ते पाकिस्तानच्या दौर्‍यावर गेले असताना माध्यमांनी त्यांचे उद्गार ट्विस्ट करून त्यांना फाडून खाल्ले व त्यांची देशभर बदनामी केली. त्यांनी पाकिस्तानमध्ये जिनाच्या थडग्याला भेट दिली असताना ते म्हणाले होते की "पाकिस्तानच्या स्थापनेनंतर संसदेच्या पहिल्या अधिवेशनात जिनाने केलेले भाषण हा धर्मनिरपेक्ष भाषणाचा उत्कृष्ट नमुना होता. जर पाकिस्तान त्या भाषणात सांगितलेल्या मार्गाने चालला असता तर आज पाकिस्तानात इतक्या समस्या निर्माण झाल्या नसत्या.". त्यांची ही वाक्ये माध्यमांनी ट्विस्ट करून सांगताना अडवाणींनी जिनाला धर्मनिरपेक्ष म्हणून त्याची स्तुती केली अशा बातम्या दिल्या. त्यामुळे देशभर अडवाणींवर टीका झाली. ते नक्की काय म्हणाले होते ते समजून घेण्याचा कोणीही प्रयत्न न करता त्यांना यथेच्छ झोडपून काढले गेले. २००४ मधील अपयशाचे खापरही बहुतांशी त्यांच्या भारत उदय यात्रेवर फोडले गेले होते.

त्या प्रकरणानंतर अडवाणींच्या राजकीय जीवनाला उतरती कळा लागली. २००९ ची निवडणुक आजारपणामुळे वाजपेयींनी लढविली नाही. त्यामुळे रालोआचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून अडवाणींचे नाव जाहीर झाले. परंतु २००९ च्या निवडणुकीत भाजपची संख्या अजून घसरली. त्यामागेही अनेक वेगवेगळी कारणे होती. त्यानंतर अडवाणी निष्प्रभ होत गेले.

त्यामुळे २०१३ मध्ये मोदींचे नाव पुढे आले. त्यावेळी अडवाणींनी जाहीर विरोध केला होता व पुन्हा एकदा ते भाजप मतदारांचे खलनायक ठरले होते. वास्तविकरित्या मोदींना त्यांनी केलेला विरोध हा आंधळा विरोध नव्हता. स्वतःला पंतप्रधानपद मिळावे ही आकांक्षा त्यामागे नव्हती. त्यांच्या म्हणण्यानुसार देशात २०१३ मध्ये जबरदस्त काँग्रेसविरोधी वातावरण होते. त्याचा फायदा घेण्यासाठी भाजपने आहेत ते मित्र टिकवून नवीन मित्र मिळवून एकत्रित निवडणुक लढली तर १९९९ प्रमाणे मोठे यश मिळू शकते. परंतु मोदी भाजपचे उमेदवार असतील तर मोदींच्या प्रतिमेमुळे भाजपशी युती करण्यासाठी इतर पक्ष बिचकतील व त्यामुळे भाजपला फारसे मित्र मिळणार नाहीत व अनुकूल परिस्थितीचा फायदा घेता येणार नाही. परंतु मोदींना विरोध करताना त्यांनी दोन चुका केल्या. त्यांना मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेचा व मोदींच्या निवडणुक प्रचाराच्या कौशल्याचा फारसा अंदाज आला नाही व दुसरं म्हणजे त्यांनी आपले मत पक्षांतर्गत व्यासपीठावर न मांडता थेट माध्यमांकडे मांडले व सर्व पदांचे राजीनामे देऊन आपली सर्व हुकुमाची पाने खेळून टाकली (हीच चूक नितीशकुमारांनी सुद्धा केली होती). खरं तर अडवाणींनी २०१४ ची निवडणुक न लढविता पक्षाचा मेंटॉर अशा भूमिकेत काम करायला हवे होते. आता अडवाणींकडे आव्हान देण्यासारखे काहीही राहिले नाही हे लक्षात आल्यावर मोदींना अडविणारे कोणीच राहिले नाही. मोदींनी २०१४ ची निवडणुक एकहाती जिंकून आपल्यावरील विश्वास सार्थ करून दाखविला.

काहीही असलं तरी अडवाणींना आयुष्याच्या संधीकाळात अशा खटल्याला तोंड द्यावे लागणार आहे याचे वाईट वाटत आहे.

गॅरी ट्रुमन's picture

20 Apr 2017 - 10:47 pm | गॅरी ट्रुमन

अडवाणी हे १९८०-९० च्या दशकात भाजपमधील सर्वाधिक उंचीचे नेते होते यात काहीच वाद नाही. पण आता तशी परिस्थिती नक्कीच नाही. त्यांनी (आणि जसवंतसिंगांनी) स्वतःच्या कृत्यांनी आपल्याविषयीचा आदर कमी केला आहे.

२००४ मध्ये सत्ता गेल्यानंतर भाजपची अवस्था पूर्ण सैरभैर झाली होती. एकामागोमाग एक हास्यास्पद आणि बेजबाबदार वक्तव्ये द्यायचा सपाटा भाजप नेत्यांनी लावला होता. त्यातलेच एक अडवाणींचे विधान म्हणजे कंदाहार विमान अपहरणप्रकरणी परराष्ट्रमंत्री जसवंतसिंग कंदाहारला जाणार हे त्यांना माहित नव्हते.

२००४-०९ मध्ये अडवाणी विरोधीपक्षनेते होते. पण १९९० च्या दशकातील आक्रमक विरोधी पक्षनेता मात्र पूर्ण मावळला होता.बाकी पाकिस्तानात जाऊन जीनांच्या तथाकथित धर्मनिरपेक्षपणाचे गोडवे गाणे आणि पाकिस्तान जर त्या मार्गावर चालला असता तर परिस्थिती वेगळी असती हे म्हणणे अत्यंत बेजबाबदार होते. जीना खरोखरच धर्मनिरपेक्ष असतील तर १९४७ मध्ये लाखो लोक धार्मिक उन्मादात मृत्युमुखी पडल्यावर तो मनुष्य किमान त्याविरूध्द काहीतरी बोलेल. तेवढे तरी जीनांनी केले का? आणि जीनांनी इतिहास घडवला असे काहीसे जीनांच्या कबरीच्या ठिकाणी जाऊन व्हिजिटर्स डायरीमध्ये अडवाणींनी लिहिले होते. जीनांनी इतिहास घडवला हे खरेच आहे पण तो इतिहास लाखो लोकांच्या रक्तावर घडवला होता त्याचे काय? आणि इतिहास घडविणे हा मापदंड असेल तर तसाच इतिहास गझनीच्या महंमदाने आणि औरंगजेबानेही घडवला होताच की. जीनांच्या 'धर्मनिरपेक्ष मार्गावर पाकिस्तान चालायला हवा होता' हे म्हणणे आणि परवेझ मुशर्रफने कुठेतरी (उदाहरणार्थ यु.एन मध्ये) दहशतवादाविरोधी तोंडदेखल्या एखादे वक्तव्य केले असेल त्याचा हवाला देत 'मुशर्रफने सांगितलेल्या दहशतवादविरोधी मार्गावर पाकिस्तानने चालायला हवे होते' असे कोणी म्हटले तर त्यात नक्की काय फरक आहे? अडवाणींनी याच पाकिस्तान दौर्‍यात ६ डिसेंबर १९९२ हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता असे म्हटले होते. हा तर ढोंगीपणाचा कळस झाला. बरं तो जर यांच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस असेल तर त्याचे प्रायश्चित्त म्हणून यांनी नक्की काय केले? भाजप अयोध्या आंदोलनामुळेच १९९८ मध्ये सत्तेत गेला हे कोणीही अगदी शेंबडं पोरही सांगू शकेल. आणि त्याच सर्वात वाईट दिवशी झालेल्या घटनेवर आधारीत मिळालेल्या सत्तेत हे चांगले उपपंतप्रधान म्हणून वावरले आणि तसे करताना त्यांना कसले वैषम्य वाटल्याचे ऐकिवात नाही. या बाबतीत बाळासाहेब ठाकर्‍यांना मानले. जे काही झाले त्याचा कसलाही आडपडदा न ठेवता कोणत्याही बुरख्याआड लपायची गरज त्यांना वाटली नाही आणि जर बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे असे जाहिर वक्तव्य त्यांनी निदान १९९२-९३ मध्ये तरी दिले होते. (१९९७ मध्ये अयोध्येत मंगल पांडेचे स्मारक बांधा असे म्हणत त्यांनीही टोपी फिरवली ही गोष्ट वेगळी).

मोदींना विरोध म्हणून राजीनामा द्यायचे नाटक केल्यावर भाजप कार्यकर्त्यांची त्यांच्या घरापुढे निदर्शने झाल्यावर त्यांनी भिंतीवरील लिखाण समजून घ्यायला हवे होते. अब जमाना बदल गया है आणि अडवाणींचे नेतृत्व भाजप कार्यकर्त्यांनाही आता मान्य नाही आणि नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. १९९० च्या दशकात अडवाणींच्या घरावर भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने होऊ शकली असती का? तरीही हे त्यावरच अडून राहिले. इतकेच नाही तर सप्टेंबर २०१३ मध्ये मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहिर करायच्या वेळीही अडवाणींनी नाटके करून झाली. त्यांना फारसे कोणी विचारले नाही तरीही २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी मोदी गांधीनगरमधून
आपला पराभव घडवून आणतील म्हणून भोपाळला स्थलांतरीत व्हायचा विचार करून झाला. १६ मे २०१४ रोजी भाजपचा लोकसभा निवडणुकांमध्ये अभूतपूर्व विजय झाल्यानंतर "हा सामुहिक नेतृत्वाचा विजय आहे" अशी क्षीण प्रतिक्रिया देऊन आपल्याला द्येय नसलेले श्रेय घ्यायचा प्रयत्नही करून झाला. दिल्लीमध्ये केजरीवाल जिंकल्यावर केजरीवालांनाही अडवाणी भेटणार अशा बातम्या आल्या होत्या. खरेखोटे तो भगवंत, अडवाणी आणि केजरीवाल जाणोत. मग मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना देशात आणीबाणीसदृश परिस्थिती आहे अशी पिंक टाकून झाली. म्हणजे प्रत्यक्ष आणीबाणी होती त्यावेळी हे बंगलोरला तुरूंगात होते पण २०१५ मध्ये आपल्या दिल्लीतील निवासस्थानी राहून भरल्या पोटी असली मखलाशी मात्र त्यांनी केली आणि त्यात त्यांना काहीही विसंगत वाटले नाही.

एकूणच अडवाणींचा रूसवाफुगवा म्हणजे टिपीकल भारतीय कुटुंबांमधील खाष्ट सासूची आठवण करून देतो. मी माझ्या मुलाला पहिल्या दिवसापासून वाढवले आहे म्हणून मी सांगेन तसेच व्हायला हवे अशी म्हणणारी सासू आणि मी माझ्या पक्षासाठी पहिल्या दिवसापासून काम केले आहे म्हणून मी सांगेन तसेच व्हायला हवे असे म्हणणारे अडवाणी यात नक्की फरक काय? अडवाणींनी पक्षासाठी खूप काम केले आणि अत्यंत तळमळीने काम केले हे कोणीच नाकारत नाही. पण म्हणून मी सांगेन तसे आणि तसेच व्हायला पाहिजे हे म्हणणे म्हणजे पराकोटीचा दुराग्रह झाला.

बाकी अडवाणींनी जनसंघातून बलराज मधोकांचा काटा कसा काढला हे अनेकांना माहित नसते. १९७३ मध्ये अडवाणी जनसंघाचे अध्यक्ष पहिल्यांदा झाले आणि त्यानंतर बलराज मधोकांना पक्षातून काढायचा त्यांनी पहिला निर्णय घेतला. त्यामागे कारण असे दिले होते की बलराज मधोकांनी जनसंघ आणि स्वतंत्र पक्ष यांच्यात युती व्हावी अशी मागणी केली आणि स्वतंत्र पक्षासारख्या उजव्या पक्षाबरोबर युती करणे वाजपेयी आणि अडवाणींना मान्य नव्हते. त्याबद्दल बलराज मधोकांना पक्षातून काढणे हाच उपाय होता का? समजा तसे मान्य केले तरी मग १९९० च्या दशकात भाजपने नरसिंह राव सरकारच्या नव्या आर्थिक धोरणांना बर्‍यापैकी पाठिंबा दिला आणि नंतर स्वतः सत्तेत आल्यावर खाजगीकरणाचा कार्यक्रम मोठ्या जोमात चालवला. अशावेळी जी मागणी बलराज मधोक १९७३ मध्ये करत होते त्याच वाटेवरून आपण आता बर्‍याच प्रमाणावर जात आहोत तेव्हा आता मतभेदाचे कारण नाही म्हणून त्यांना सन्मानाने परत पक्षात घेण्यासाठी भाजप अध्यक्ष असलेल्या अडवाणींनी नक्की कोणते प्रयत्न केले होते? यावरून असे वाटते की आपल्या नेतेपदाच्या मार्गात आव्हान नको म्हणून अडवाणी (आणि वाजपेयींनी सुध्दा) बलराज मधोकांना पक्षाबाहेर काढून परस्पर काटा काढला. बलराज मधोकही वाजपेयींसारखेच कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आणि तसेच तळमळीचे नेते होते. बलराज मधोकांचे मात्र वाईट वाटते. ते आपल्या तत्वापासून शेवटपर्यंत ढळले नाहीत. मागच्या वर्षी त्यांचे जम्मूमध्ये वयाच्या ९५-९६ व्या वर्षी निधन झाले. तोपर्यंत ते स्वतःचा भारतीय जनसंघ हा पक्ष चालवत होते. त्या पक्षाचे दहा सदस्य तरी होते की नाही कुणास ठाऊक. पण तरीही त्यांनी जी तत्वे प्रमाण मानली होती त्या तत्वांशी ते शेवटपर्यंत निष्ठा ठेऊन राहिले. अडवाणींप्रमाणे कोलांट्या उड्या मात्र त्यांनी मारल्या नाहीत. जर अडवाणींनी १९७३ मध्ये बलराज मधोकांना पक्षाबाहेर काढले तर त्यांनाही दुसरे कोणीतरी येऊन तीच दवा खिलवणार हा निसर्गाचा न्याय झाला. नशीब इतकेच की मोदींनी अडवाणींना पक्षाबाहेर काढले नाही. २००२ मध्ये मोदींची पाठराखण अडवाणींनी केली होती त्याची जाण मोदींनी ठेवली!!

या सगळ्या प्रकारांमुळे अडवाणींविषयीचा एकेकाळी असलेला आदर मात्र नक्कीच कमी झाला आणि आता नसल्यात जमा आहे. मी २०१४ मध्ये भाजपला मत दिले ते केवळ मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते म्हणून. जर अडवाणी त्याजागी असते तर मी भाजपला नक्कीच मत दिले नसते. माझ्यासारखे अनेक मतदार होते/आहेतच. आपल्याला १९९० च्या दशकात होता तसा जनाधार आता शिल्लक नाही हे समजून घेऊन अडवाणींनी गप्प बसणे श्रेयस्कर ठरेल.

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2017 - 2:52 pm | श्रीगुरुजी

इथे अडवाणींचे ते संपूर्ण भाषण आहे. संपूर्ण भाषणात 'जिना निधर्मी होता' असे कोठेही त्यांनी म्हटल्याचे दिसत नाही. या लेखात या भाषणाचे विश्लेषण आहे. माध्यमे त्या काळात सोनिया गांधी, मनमोहन सिंग व काँग्रेसच्या प्रेमात बुडलेली होती व त्यांच्या दृष्टीने अडवाणी, मोदी व महाजन हे खलनायक झाले होते. त्यामुळे अडवाणींचे भाषण ट्विस्ट करून त्यांना झोडपण्यात माध्यमांनी अजिबात हयगय केली नाही.

२००५ मध्ये अडवाणी कराचीत जे बोलले तेच ते पूर्वी फेब्रुवारी २००४ मध्ये भारतात सुद्धा बोलले होते. परंतु त्या काळात त्या भाषणाची दखलच घेतली गेली नव्हती कारण त्यावेळी त्यागमूर्ती सोनिया गांधींच्या त्यागाचा उदय झालेला नव्हता व भाजप सत्तेवर असल्याने अडवाणी व महाजन २००५ मध्ये जितके खलनायक होते, तितके खलनायक ते त्या काळात नव्हते. परंतु २००५ मध्ये भाजप सत्तेवर नव्हता व माध्यमे सोनिया गांधींच्या त्यागाने भारावून गेली होती. पराभवाचे खापर अडवाणी व महाजन यांच्या डोक्यावर फुटले होते. त्यामुळे अडवाणींचे कराचीतील भाषण हे त्यांना झोडपून काढण्यासाठी ट्विस्ट करून वापरले गेले.

जिनाने इतिहास घडविला हे अडवाणींचे मत चूक नव्हते. इतिहास गौरवशाली किंवा दैदिप्यमानच असायला हवा असा काही नियम नाही. इतिहास हा काळाकुट्ट, लाजिरवाणा आणि वेदनादायी सुद्धा असू शकतो. हिटलर किंवा अगदी ओसामा बिन लादेनने सुद्धा, काळाकुट्ट असला तरी, इतिहासच घडविला होता. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात एखाद्या व्यक्तीने एका राष्ट्राचा संस्थापक व प्रमुख बनणे हे त्या व्यक्तीने इतिहास घडविणेच आहे. जरी हिंसाचार, रक्तपात अशा अतिशय वाईट मार्गाने ते राष्ट्र स्थापन झाले असले तरी तसे घडविणे हे इतिहास घडविणेच आहे. जगाच्या इतिहासात स्वतंत्र राष्ट्र स्थापन करून त्याचे प्रमुख बनणे हे फार थोड्या लोकांना जमले आहे. जिनाने त्यासाठी अतिशय वाईट मार्गाचा वापर केला होता, तरी त्याने आपल्याला हवे ते साध्य करून दाखविले होते.

बलराज मधोकांचा इतिहास माहित नसल्याने त्या विषयावर पास.

मी आधी लिहिल्याप्रमाणे २००४ नंतर अडवाणींचा उतरता काळ सुरू झाला. माध्यमांनी त्यांना खलनायक बनविले. माध्यमांनी तसेही १९९० पासून त्यांना खलनायक बनविलेच होते. जुन्या धोपटमार्गानेच प्रादेशिक पक्षांपुढे नमते घेऊन युतीचे राजकारण करून व काँग्रेसविरोधी मतांची फाटाफूट टाळून सत्ता मिळवावी असे त्यांचे मत होते. नंतरच्या काळात मोदींची वाढती लोकप्रियता त्यांच्या लक्षात आली नाही. त्यामुळे ते २०१३ मध्ये पुन्हा एकदा खलनायक ठरले. २०१४ मध्ये निवडणुकीला उभे न राहता भाजपचा त्यांनी Patron किंवा Mentor अशा स्वरूपाच्या भूमिकेत काम करायला हवे होते. परंतु २०१३ मध्ये मोदींना विरोध करताना त्यांनी आपली सर्व हुकुमाची पाने खेळून टाकल्यामुळे नंतर डाव जिंकण्यासाठी त्यांच्याकडे काहीही शिल्लक नव्हते.

२०१४ मध्ये मोदीच पंतप्रधान पदाचे उमेदवार हवेत असे माझे मत होते. परंतु मोदींऐवजी अडवाणी पंतप्रधानपदाचे उमेदवार असते तरी मी भाजपलाच मत दिले असते कारण दुसरा योग्य पर्यायच नव्हता.

गामा पैलवान's picture

19 Apr 2017 - 1:42 pm | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

सर्वोच्च न्यायालयाने लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आणि उमा भारती यांच्याविरूध्द गुन्हेगारी स्वरूपाचा खटला चालविण्यात यावा असा निकाल दिला आहे. या निकालाद्वारे मोदींनी एका दगडात किमान तीन पक्षी मारले आहेत.

पहिला पक्षी म्हणजे उपरोक्त तिघे राष्ट्रपतीपदासाठी उभे राहू शकंत नाहीत. मोदींच्या पसंतीचाच उमेदवार पुढे येणार.

दुसरा पक्षी म्हणजे बाबरी नामक कोणतीही मशीद तिथे नव्हती, याची न्यायालयाकरवी खातरजमा होणार. उपरोक्त तिघे असाच दावा करणार आणि तो खराही आहे. काफिरांच्या मूर्तीपुजेच्या जागी मशीद बांधायला बाबर काय धर्मद्रोही होता का, असा प्रश्न आहे.

तिसरा पक्षी म्हणजे मुस्लिमांवर प्रभाव राखून असलेले मुल्लामौलवी. बाबरी मशिदीस उत्तेजना देणे हा इस्लामचा घोर अपमान असल्याचे सिद्ध झाल्याने बाबरीप्रेमी मुल्लामौलवींचा प्रभाव निश्चितच मर्यादित होईल.

मोदी, आय लव्ह यू!

आ.न.,
-गा.पै.

गॅरी ट्रुमन's picture

19 Apr 2017 - 1:48 pm | गॅरी ट्रुमन

या निकालाद्वारे मोदींनी एका दगडात किमान तीन पक्षी मारले आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून हे प्रकरण कोर्टात आहे. आजचा निकालही कोर्टानेच दिला आहे. मग मोदींनी कसे काय पक्षी मारले म्हणायचे? तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मोदी या निकालाचा तिहेरी फायदा घेतील. पण हे तीन पक्षी मोदींनी कसे मारले?

अनुप ढेरे's picture

19 Apr 2017 - 1:52 pm | अनुप ढेरे

कटाचे आरोप काढू नका अशी विनंती CBIने सर्वोच्च न्यायालयाला केली होती. त्यावरचा हा निकाल आहे. इथे म्हटल्याप्रमाणे.

सो मोदींवर संशय घ्यायला वाव आहे. :)

गॅरी ट्रुमन's picture

19 Apr 2017 - 1:59 pm | गॅरी ट्रुमन

:)

गॅरी ट्रुमन's picture

19 Apr 2017 - 2:05 pm | गॅरी ट्रुमन

ज्यांचा १९८४ च्या दंगलींमध्ये आणि आणीबाणीत हात होता त्यांना माझा राजीनामा मागायचा अधिकार नाही अशी मुक्ताफळे उमा भारतींनी उधळली आहेत. ( https://www.thequint.com/india/2017/04/19/ram-mandir-babri-masjid-demoli...)

पण ज्यांचा १९८४ च्या दंगलींशी आणि आणीबाणीतील अत्याचारांशी दुरान्वयानेही संबंध नाही अशा माझ्यासारख्या सामान्यांना मात्र त्यांचा राजीनामा मागायचा अधिकार आहे का?

उमा भारतींचे हे विधान म्हणजे शुध्द मखलाशी झाली. असले प्रकार करण्यात उमा भारती तरबेज आहेतच.

मोदक's picture

19 Apr 2017 - 5:16 pm | मोदक

सहमत.

उमा भारतींनी असे विधान करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे आरोपाची कबुली दिल्यासारखे आहे.

कोर्टाने लवकरात लवकर या खटल्याचा निकाल लावावा..

श्रीगुरुजी's picture

19 Apr 2017 - 3:01 pm | श्रीगुरुजी

मोदी राष्ट्रपती पदासाठी (किमान उपराष्ट्रपती पदासाठी तरी) केशुभाई पटेलांचे नाव पुढे आणून एका दगडात अनेक पक्षी मारतील असा माझा अंदाज आहे.

वरुण मोहिते's picture

19 Apr 2017 - 3:15 pm | वरुण मोहिते

मोदी कोणाला तरी उच्चविद्याविभूषित व्यक्तीचे नाव पुढे करणार . कि ज्यांना विरोध होताच कामा नये . आणि प्रतिमा हि उंचावणार .
अर्थात एक अंदाज .
बाकी उमा भरती आज रात्री राम मंदिराच्या जागेवर जाणारेत. तिरंगा , मंदिर , ह्यासाठी प्राण द्यायची तयारी त्यांची लहानपणापासून आहे :))

मोदक's picture

19 Apr 2017 - 5:06 pm | मोदक

मोदी कोणाला तरी उच्चविद्याविभूषित व्यक्तीचे नाव पुढे करणार . कि ज्यांना विरोध होताच कामा नये . आणि प्रतिमा हि उंचावणार .

असेच होईल. तसेही मोदी-शहा नेहमी धक्का द्यायच्या तयारीत असतात. त्यामुळे नारायण मूर्ती किंवा रतन टाटांचीही वर्णी लागू शकते.

गामा पैलवान's picture

19 Apr 2017 - 7:07 pm | गामा पैलवान

माहिती आयुक्त श्री. रत्नाकर गायकवाडांना यांना काल संभाजीनगरात मारहाण झाली. नुकताच प्रा. रवींद्र गायकवाडांच्या नावाने प्रसारमाध्यमांनी जितका शंख केला होता त्याच्या शतांशानेही या विषयावर मतप्रदर्शन झालं नाही. सगळे जण तत्त्वत: समान आहेत, पण काही लोकं अधिक समान असतात!

मूळ बातमी इथे आहे : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada...

-गा.पै.

गामा पैलवान's picture

20 Apr 2017 - 12:08 pm | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

गेल्या कित्येक वर्षांपासून हे प्रकरण कोर्टात आहे. आजचा निकालही कोर्टानेच दिला आहे. मग मोदींनी कसे काय पक्षी मारले म्हणायचे?

मला म्हणायचं होतं की मोदी पंतप्रधान असल्यामुळेच ही प्रकरणं पुढे रेटली जाताहेत. इतर कोणाचं सरकार असतं तर हे शक्यं झालं नसतं.

आ.न.,
-गा.पै.

मराठी_माणूस's picture

20 Apr 2017 - 2:26 pm | मराठी_माणूस

एक बातमी

http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/why-this-star...
सगळ्यांचे पाय मातीचेच असतात असे म्हणले जाते , इथे तर ह्यांचे पाय शेणाचे आहेत.

दुसरी बातमी.

http://www.loksatta.com/trending-news/indian-american-businesswoman-fine...

श्रीगुरुजी's picture

20 Apr 2017 - 7:56 pm | श्रीगुरुजी

दिल्लीतील ३ महापालिकांची निवडणुक २३ एप्रिल या दिवशी आहे. एबीपी न्यूज या वृत्तसंस्थेने आपल्या अंतिम मतदाता सर्वेक्षणाचे निष्कर्ष आज जाहीर केले. त्याचा सारांश -

- तीनही महापालिकात भाजपला सर्वाधिक म्हणजे सरासरी ४२.५% मते मिळण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल आआपला सरासरी २६% व काँग्रेसला सरासरी २०% मते मिळण्याची शक्यता आहे. भाजपला दक्षिण दिल्ली महापालिकेत सर्वात कमी म्हणजे ३९% मते मिळण्याची शक्यता असून उत्तर दिल्ली महापालिकेत सर्वात जास्त म्हणजे ४४% मते मिळण्याची शक्यता आहे.

- भाजपला तीनही महापालिकेत बहुमत मिळण्याची शक्यता असून दक्षिण दिल्लीत १०४ पैकी ६०, उत्तर दिल्लीत १०४ पैकी ७६ व पूर्व दिल्लीत ६४ पैकी ४३ जागा मिळण्याची शक्यता आहे.

- तीन महापालिकेतील एकूण २७२ जागांपैकी भाजपला एकत्रित १७९, आआपला एकत्रित ४५ व काँग्रेसला एकत्रित २६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

__________________________________________________________________________________________

- आआपने आपले अंतर्गत सर्वेक्षण केले असून त्यांच्या सर्वेक्षणानुसार आआपला एकूण २७२ जागांपैकी २१८ जागा व भाजपला ३० जागा मिळण्याची शक्यता आहे.

पंजाब व गोवा विधानसभा निवडणुकीत असेच अंतर्गत सर्वेक्षण आम आदमी पार्टीने केले होते व या सर्वेक्षणात पंजाब मधील ११७ जागां पैकी, किमान १०० जागा आआपला मिळतील असा दावा केला होता व गोव्यात ४० पैकी किमान ३५ जागा निवडुन येतील असे त्यांचे सर्वेक्षण सांगत होते. मात्र निकालानंतर पंजाब मध्ये १०० जागा मिळतील अश्या बाता मारणार्‍या केजरीवाल यांना अवघ्या २० जागा मिळाल्या व गोव्यातून तर केजरिवाल यांना बदकावर बसून दिल्लीला परत यावे लागले.

आयकर विवरणपत्रे भरताना आधार कार्ड क्रमांक देणे सक्तीचे केल्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे विचारणा केली आहे. एक गोष्ट समजत नाही. कोर्टाला कोणी जाब विचारू शकत नाही का? हा निर्णय पूर्णपणे एक्झिक्युटिव्ह डोमेनमध्ये येतो. कोर्टाने यात हस्तक्षेप का करावा? उद्या कोर्ट सरकारच्या प्रत्येक निर्णयात नाक खुपसायला लागेल आणि सरकारला निर्णय घेणेच मुश्किल बनून टाकेल. सरकारला निदान पाच वर्षांनी निवडणुकांना तरी सामोरे जायला लागते. सरकारचे निदान तेवढे तरी उत्तरदायित्व लोकांप्रती आहे. या न्यायाधीश मंडळींचे नक्की कोणाप्रती उत्तरदायित्व आहे? मग लोकांशी उत्तरदायी नसलेल्या ढुढ्ढाचार्यांनी सरकारच्या निर्णयप्रक्रीयेत हस्तक्षेप करणे हा लोकशाहीचा विपर्यास नाही का? न्यायालयाने सरकारचा एखादा निर्णय घटनाविरोधी किंवा नागरिकांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणारा असल्यासच त्यात नाक खुपसायला जावे. अन्यथा नाही.

पण होते कसे की अशा अनेक संस्था स्वतःच्या कार्यकक्षेच्या मर्यादा ओलांडून इतर गोष्टींमध्ये नाक खुपसायला जातात. मग कॅग म्हणते की सरकारने नैसर्गिक स्त्रोतांचा लिलावच करायला हवा आणि सामाजिक इंडिकेटर्समध्ये गुजरात मागे आहे आणि गुजरातमध्ये शिक्षणाचा हक्क कायद्याची अंमलबजावणी समाधानकारक झालेली नाही. त्यातही वाईट गोष्ट ही की बरेचसे लोक या गोष्टीकडे कार्यकारी संस्था आणि न्यायव्यवस्था/कॅग यांच्यातील मतभेद या दृष्टीने न बघता पक्षाच्या राजकारणाच्या दृष्टीने बघतात. म्हणून कॅगने नैसर्गिक स्त्रोतांचा लिलावच करायला पाहिजे असे मनमोहन सरकारच्या कार्यकाळात बोलल्यानंतर भाजप समर्थक आनंदित झाले होते आणि सामाजिक इंडिकेटर्समध्ये गुजरात मागे आहे असे कॅगने म्हटल्यावर मोदी विरोधक आनंदित झाले होते!!

गामा पैलवान's picture

21 Apr 2017 - 5:00 pm | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

माझ्या मते आधारपत्राची सक्ती करणे हा मूलभूत हक्कांचा भंग असू शकतो. संविधानाच्या मूलभूत रचनेविषयी प्रश्न उपस्थित झाल्याचं दाखवून सर्वोच्च न्यायालय आपणहून (स्युओ मोटो) विचारणा करू शकते.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2017 - 8:08 pm | श्रीगुरुजी

दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी प्रचार करताना काही दिवसांपूर्वी आआपने दिल्लीत लावलेल्या फलकांवर असे लिहिले होते की महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप विजयी झाल्यास ते दिल्लीत वीज व पाण्याच्या दरात वाढ करतील. दिल्लीत पाणी व वीजेचे दर दिल्ली राज्य सरकारच्या अधिकारात आहेत. याच अधिकारात केजरीवालांनी २ वर्षांपूर्वी दिल्लीवासियांसाठी पाणी व वीजेचे दर कमी केले होते. आआपच्या वरील जाहिरातीवरून असे दिसते की वीज व पाण्याचे दर कमी करण्याआ अधिकार राज्य सरकारला असून ते दर वाढविण्याचा अधिकार महापालिकेला आहे.

आआपवाले लोकांना किती मूर्ख समजतात याचे हे उत्तम उदाहरण आहे (अर्थात २०१५ मध्ये दिल्लीकरांनी आआपला ७० पैकी ६७ जागी जिंकून दिल्यामुळे दिल्लीकर अत्यंत महामूर्ख आहेत हा आआपचा विश्वास अनाठायी नाही). समजा आआपच्या म्हणण्यानुसार भाजपने महापालिका निवडणुक जिंकल्यानंतर वीज व पाण्याचे दर वाढविले तर आआपचे दिल्लीतील सरकार आपल्या अधिकारात ते कमी करू शकतेच ना.

इथे तर केजरीवालांनी अजून खालची पातळी गाठली आहे. या वृत्तातील खालील वाक्ये बघा.

Holding the BJP responsible for the widespread dengue and chikungunya in the national capital, Kejriwal told voters, “if your children get dengue or chikungunya, then you yourself will be responsible for it, because you voted for a party that spreads mosquitoes that breed dengue or chikungunya.”

“If someone in your home falls ill then you are responsible because you voted for the party which is synonymous to chikhungunya, malaria, dengue and garbage,” he added.

Kejriwal also alleged that with just two days left for the MCD polls, the BJP and the Congress are resorting to the “cheap politics” by engineering the water and power shortages. “The BJP and the Congress are stealing oil from the power transformers and ensuring that there is power shortage. They are doing it deliberately and resorting to cheap politics by disrupting water and power supply,” he alleged.

गॅरी ट्रुमन's picture

21 Apr 2017 - 9:20 pm | गॅरी ट्रुमन

“if your children get dengue or chikungunya, then you yourself will be responsible for it, because you voted for a party that spreads mosquitoes that breed dengue or chikungunya.”

एकूणच केजरीवालांना आआपचा धुव्वा उडणार अशी चिन्हे दिसायला लागलेली दिसतात.अन्यथा अशी डेस्परेट भाषा त्यांनी वापरली नसती.

दिल्लीमध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये डेंग्यु आणि चिकनगुनियाची साथ आली होती तेव्हा स्वतः केजरीवाल ऑपरेशनसाठी बंगलोरला होते. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांनी आरोग्यमंत्र्यांबरोबर दिल्लीत राहून परिस्थिती सांभाळायला हवी होती. किंबहुना तशी त्यांची जबाबदारी होती. पण हे त्यावेळी होते फिनलंडमध्ये. तिथल्या शाळांचा 'अभ्यास' करायला. इतर सगळे मंत्री पंजाब किंवा गोव्यामध्ये प्रचार करत होते. दिल्लीचे सगळेच्या सगळे मंत्री एकाच वेळी शहराबाहेर असायची ही पहिलीच वेळ असावी. त्यावेळी नायब राज्यपालांनी मनीष सिसोदियांना फिनलंडमधून ताबडतोब परत यायचा अभूतपूर्व आदेश दिला होता. म्हणजे जेव्हा खरोखर डेंग्यु आणि चिकनगुनियाची साथ आलेली असताना हे आपली जबाबदारी झटकून पळून जाणार आणि इतरांना त्याच डेंग्यू आणि चिकनगुनियाची भिती घालणार. कमालच आहे.

असो. दिल्ली महापालिकांसाठी मतदान २३ तारखेला रविवारी होईल आणि मतमोजणी बुधवारी २६ एप्रिलला होईल. घोडामैदान जवळच आहे.

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2017 - 11:51 pm | श्रीगुरुजी
सचु कुळकर्णी's picture

22 Apr 2017 - 2:11 am | सचु कुळकर्णी

काल / परवा S.S.P. सहारनपुर ह्यांच्या घरावर to be specific, कँप ऑफिसवर हल्ला झाला. कारण विचित्र आहे आणि हल्लेखोरांचि मानसिकता दाखवणार आहे. हे असले थर्डक्लास नमुने जे खासदार आहेत त्याना मोदिंनी कंट्रोलच नव्हे तर चांगला चाप लावायला हवा. पोलिस एक IPS ज्याच्या घरावर तिन पैसड्लाचे लिडर अन त्याचे समर्थक हल्ला करतात
त्यांना बाजिराव* काय असते हे एकदा कळाले तर पुन्हा असला प्रकार करायची हिम्मत नाहि करणार.

बाजिराव : चक्कि चा पट्टा असतो एक फुट, पकडायला एक लाकडि हँडल असत, चांगले चांगले मुके मल्हार गायला लागतात. बाजिराव चे रट्टे अश्या जागी पडतात की हे असले शेरखान चाहते हुये भि मँजिस्ट्रेट को नहि दिखा सकते कि पडी कहा है. Cowards.

इंडियन एक्स्प्रेस वाचून असं वाटतं, भारतात एकच ग्रेटम ग्रेट कॉलेज हाये, 'जे एन यू'. आठवड्यातून निदान ४ तरी लेख पाडलेले असतात 'जे एन यू' कसं भारी आहे, तिथले विद्यार्थी कशे आंदोलनं करत असतात, तिथले शिक्षक विद्यार्थी कशे क्रिटिकल थिंकिंग करणारे आहेत आणि शेवटी सरकार कसं या कॉलेजला हळू हळू मारून टाकतंय. नाही, सरकारी निर्णयांवर टिका टिपण्णी असावी की पण जे एन यू महात्म्य काय लावलंय. पुणे विद्यापिठ किंवा शिवाजी विद्यापिठ हे काय् विद्यार्थ्यांसाठी युटोपिया नाहीयेत, एक से बढकर एक घाणेरडे निर्णय लादून विद्यार्थ्यांवर सतत अन्याय इथेही होत असतो. पण ह्या विद्यापीठांच्या समस्या कधी संपादकिय पानातल्या लेखात आलेलं वाचलं नाही.

गॅरी ट्रुमन's picture

22 Apr 2017 - 10:03 am | गॅरी ट्रुमन

इंडियन एक्स्प्रेस वाचून असं वाटतं...

कोणाकडून अपेक्षा ठेवत आहात सौरा? "And they handed Yakub" विसरलात का? आणि त्या एक्सप्रेस ग्रुपमधला त्या कुबेरांचा लोकसत्ताही तसलाच.

1

बाकी तो डाव्यांचा आणि शहरी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या जे.एन.यु वर मोदी सरकार फारच मिळमिळीत कारवाई करत आहे अशी माझी तरी तक्रार आहे. मोदी सरकार सध्या करत आहे त्यापेक्षा बरीच जास्त कडक कारवाई व्हायला हवी.

पुणे विद्यापिठ किंवा शिवाजी विद्यापिठ हे काय् विद्यार्थ्यांसाठी युटोपिया नाहीयेत, एक से बढकर एक घाणेरडे निर्णय लादून विद्यार्थ्यांवर सतत अन्याय इथेही होत असतो. पण ह्या विद्यापीठांच्या समस्या कधी संपादकिय पानातल्या लेखात आलेलं वाचलं नाही.

अर्थात या विषयावर मराठी वृत्तपत्रे पण काही लिहीत नाहीतच.

श्रीगुरुजी's picture

22 Apr 2017 - 2:11 pm | श्रीगुरुजी

हा काय मूर्खपणा चाललाय? दिल्लीत येऊन असला मूर्खपणा करण्यापेक्षा आपल्या मागण्या राज्य सरकारकडे का मांडत नाही? या लोकांनी आयुष्यभर अम्मा, चिन्नम्मा, कलैग्नार, जालिकट्टू इं. च्या पलिकडे पाहिलं नाही आणि आता दिल्लीत येऊन तमाशा करताहेत.

श्रीगुरुजी's picture

22 Apr 2017 - 9:16 pm | श्रीगुरुजी

३-४ महिन्यांपूर्वी जालिकट्टूसारखा क्रूर प्रकार पुन्हा सुरू व्हावा यासाठी तामिळींचा जीव चालला होता. जालिकट्टूसाठी तामिळ विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मरीना बीचवर रात्रभर आंदोलन केलं. रहमान, विश्वनाथन् आनंद, कमल हासन इ. प्रसिद्ध कलाकारांनी जालिकट्टूला जोरदार पाठिंबा दिला होता. जालिकट्टू हा तामिळींनी जीवनमरणाचा प्रश्न केला होता.

आता तामिळ शेतकरी मद्रासला आंदोलन करायचं सोडून दिल्लीत महिनाभर आंदोलन करताहेत आणि तामिळ विद्यार्थी, कलाकार यांच्यासारखे जालिकट्टूचे समर्थक तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प आहेत. साहजिकच आहे. मुक्या प्राण्यांचे हाल होताना बघताना जी मजा येते तशी मजा शेतकर्‍यांच्या आंदोलनातून अजिबात येत नाही.

गॅरी ट्रुमन's picture

24 Apr 2017 - 10:15 am | गॅरी ट्रुमन

एक गोष्ट समजत नाही. नीती आयोगाच्या बेठकीसाठी दिल्लीला आलेल्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई.पलानीस्वामी यांनी या शेतकर्‍यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी शेतकर्‍यांच्या मागण्यांवर काहीतरी निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आणि त्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांचे आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित केले आहे. म्हणजे शेतकर्‍यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या तामिळनाडू राज्य सरकारच्या अधिकारकक्षेत निर्णय करता येण्याजोग्या होत्या. असे असेल तर मग तामिळनाडूत आंदोलन करण्याऐवजी हे शेतकरी थेट दिल्लीत कसे काय धडकले? अर्थात भारताचे नागरिक म्हणून त्यांना दिल्लीत येऊन आपले आंदोलन करायचा अधिकार आहेच. पण हा प्रकार थोडा विचित्र वाटला. स्थानिक पातळीवरच्या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवरच व्हावे ही अपेक्षा असेल तर मग ती आंदोलनेही स्थानिक पातळीवरच व्हायला हवीत.

दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत उत्तर भारतातील राज्यांमधील (विशेषतः उत्तर प्रदेश आणि हरियाणा) शेतकरी दिल्लीत येऊन आंदोलन करून गेले असे कित्येक वेळा झाले आहे. वर म्हटल्याप्रमाणे जर त्यांच्या मागण्या राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या असतील तर संबंधित राज्यात आंदोलन करणे अधिक योग्य ठरेल. पण अनेकदा अंतरामुळे या शेतकर्‍यांना त्या राज्यांच्या राजधानीपेक्षा दिल्ली अधिक जवळ पडते. उदाहरणार्थ मेरठमधील शेतकर्‍यांना लखनौपेक्षा दिल्ली अधिक जवळ आहे. तसेच रोहतक किंवा जिंदमधील शेतकर्‍यांना चंदिगडपेक्षा दिल्ली अधिक जवळ आहे. या कारणासाठी त्यांनी दिल्लीत येऊन आंदोलन करणेही समजू शकतो. पण तामिळनाडूतल्या शेतकर्‍यांना ही गोष्टही लागू पडणार नाही.

तिसरी गोष्ट म्हणजे ट्विटरवर असे म्हटले जात आहे की शेतकर्‍यांच्या नावावर एन.जी.ओनी वेगळेच लोक आंदोलनात घुसडले आहेत. हे लोक तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाल्यावर विमानाने चेन्नईला परतले. गरीब शेतकरी विमानाने चेन्नईला परततात ही गोष्टही थोडी विचित्रच वाटते. ट्विटवर कुणा अनिल कुमार आचार्य ने पुढील टिवटिवाट केला आहे. हे आचार्य कोण हे मला माहित नाही पण त्यांनी जो मुद्दा मांडला आहे त्यात तथ्य आहे का?

विशुमित's picture

25 Apr 2017 - 8:53 pm | विशुमित

अशा नालायक मंत्रांनी राजीनामा देऊन दुसऱ्या लायक आमदाराला आपले खाते सुपूर्द करावे. नाही तर मुख्यमंत्री आहेतच जवाबदारी घ्यायला.
त्यांना गाईचे दूध ही काढता येते म्हणे..!!

http://www.loksatta.com/aurangabad-news/toor-dal-purchase-planning-giris...

अभिजीत अवलिया's picture

22 Apr 2017 - 2:27 pm | अभिजीत अवलिया

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदीकरणासाठी केंद्र सरकारने ११७०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा एक अत्यंत महत्वाचा महामार्ग गेली १५-२० वर्षे रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत होता. काही ठिकाणी हा रस्ता धड दोन पदरी देखील न्हवता. उदा - बरेचसे नदीवरचे पूल इतके अरुंद आहेत की एका वेळी एकाच वाहन नीट जाऊ शकेल. अरुंद रस्ता, अवघड वळणे आणी बेशिस्त चालक ह्यामुळे अपघातांचे प्रमाण इतके प्रचंड वाढले होते की मुंबई गोवा महामार्गाला मृत्यूचा महामार्ग म्हटले जाई. ह्या रस्त्याच्या चौपदीकरणाला मंजुरी देऊन सरकारने एक खूप वर्षांची मागणी पूर्ण केलीय.

सतिश गावडे's picture

22 Apr 2017 - 2:56 pm | सतिश गावडे

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदीकरणासाठी केंद्र सरकारने ११७०० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

ही अतिशय आनंदाची बातमी आहे.
"मोस्ट डेंजरस हायवे इन इंडीया" या उपाधीने बदनाम झालेल्या या महामार्ग खरंच सुधारायला हवा. (महामार्ग नुसता नावाला, खेडेगावातून एसटी जावी म्हणून बनवलेले डांबरी रस्तेही या रस्त्यापेक्षा चांगले असतात.)

अमितदादा's picture

22 Apr 2017 - 2:36 pm | अमितदादा

देशामध्ये गो रक्षकांनी अक्षरशः उछाद मांडला आहे, एका मागून एक घटना घडत असताना आज सुधा जम्मू काश्मीर मध्ये गो रक्षकांनी पशुपालन व्यवसायावर जगणाऱ्या एका मुस्लीम कुटुंबीयावर हल्ला केला यात एका लहान मुलीला हि दुखापत केली. खर्या अर्थाने हे कुटुंबीय गाई ची पालन पोषण करणारे होते, ह्या हल्ला करणाऱ्या गो रक्षकांच्या बाप झाद्यानी कधी गाई पाळल्या च नसतील असं मला वाटत.
5 Including 9-Year-Old Girl Attacked By Cow Vigilantes In Jammu And Kashmir

खरतर कॉंग्रेस च्या काळात एका बाजूला गेलला लंबक (pendulam) हा मध्यभागी (equilibrium) आणण्यासाठी लोकांनी भाजपला आणि मोदींना निवडून दिल (त्यात मी हि होतो), परंतु लंबक मध्यभागी ठेवण्य ऐवजी परत दुसर्या विरुद्ध टोकाला नेण्याचा यांचा प्रयत्न पाहून माझ्यासारख्या पूर्वाश्रमीचा मोदी समर्थकाला खूप दुख होत आहे. ह्या देशाला पाकिस्तानच्या धर्तीवर एक पद्धती, एक संस्कृती, एक भाषिक, एक विचारिक बनवण्याचा कुटील डाव हाणून पाडला पाहिजे. सहिष्णू आणि सतत प्रवाही असणार्या माझ्या धर्माला (अनेक दोष असून तो मान्य करणारा धर्म) एका rigid चौकोटीत बसवण्याचा प्रयत्न करणार्यांना विरोध केला पाहिजेच.

ज्यांना गाई ची सेवा किंवा रक्षा म्हणजे काय हे कळल नाही त्यांना धर्म काय घंटा कळणार. ह्या fanatic लोकांना सरकारच्या अप्रत्यक्ष पाठींब्या मूळच मस्ती आलेली आहे जशी मुस्लीम fanatic लोकांना कॉंग्रेस च्या जमान्यात आली होती (किंवा पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल च्या जमान्यात येतीय). आज हा छोटा भस्मासुर पाळणाऱ्या संघाला आणि भाजपला, हा भविष्यात आपल्या डोक्यावर हात ठेवणार नाही ना याचा विचार केला पाहिजे.

जे काही चालू आहे आपल्या देशात ते डेंजर आहे एवढे नक्की!
रिमेंबर रिमेंबर 5th ऑफ नोव्हेंबर अशी आपली व्ही फॉर वेंडेटा होऊ नये म्हणजे मिळवले!
शहा तर म्हणतच आहेत की गल्ली ते दिल्ली एकच सत्ता! किती वाईट परिणाम होतील याची काळजी लागली आहे. हिटलर असाच तयार झाला होता व आजकाल ट्रम्प देखील!
विरोधी पक्षच नसला तर ? विचार करून पहा.

गॅरी ट्रुमन's picture

22 Apr 2017 - 5:05 pm | गॅरी ट्रुमन

जे काही चालू आहे आपल्या देशात ते डेंजर आहे एवढे नक्की!

1

देशात फार डेंजर चालू आहे हे चित्र ल्युटिन्स दिल्लीमधल्या मिडियावाल्यांनी आणि हलकटातल्या हलकट पुरोगाम्यांनी उभे केले आहे. या सगळ्यांना मोदी सरकारने रस्त्यावर आणले आहे त्याचा राग आहे तो. या पुरोगाम्यांची स्वयंसेवी संस्था नामक दुकाने, त्या नावावर परदेशातून येणारे पैसे, त्यावर यांची चालणारा मजा, एकमेकांना वेगवेगळे पुरस्कार देणे, वर्षानुवर्षे सरकारी बंगल्यांमध्ये बिनभाड्याचे, बिना लाईट-पाण्याचे बिल देता राहात सरकारी पैशावर फुकटे पुख्खे झोडणे इत्यादी गोष्टींवर चाप आला हा राग आहे बाकी काही नाही. तो इंग्लिश मिडिया बघणे, वाचणे बंद करा म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यात कुठलेही नवे डेंजर आलेले नाही हे समजेल.

शहा तर म्हणतच आहेत की गल्ली ते दिल्ली एकच सत्ता! किती वाईट परिणाम होतील याची काळजी लागली आहे.

काय सांगता राव? उगीच लांडगा आला रे आला करू नका. काय वाईट परिणाम होणार आहेत? नेहरूंच्या काळात नव्हती गल्ली ते दिल्ली एकाच पक्षाची सत्ता? निवडणुका होऊन मतदारांना सत्तांतर घडविण्याची पॉवर आहे तोपर्यंत घंटा काही वाईट परिणाम होणार नाहीत. आणि ती पॉवर काढायची हिंमत आणीबाणी लादणार्‍या इंदिरा गांधींचीही नव्हती. आणि असली फालतूची काळजी करत राहायची असेल तर करत रहा. कधीकधी वाटते की अशिक्षित लोक बरे. ते ल्युटिन्स दिल्लीमधील मिडिया वाचायला आणि बघायला जात नाहीत आणि त्यामुळे पुढच्या क्षणी आपल्याला कोणीतरी येऊन ठार मारणार आहे असल्या लांडगा आला रे आला असल्या फालतूच्या भित्या बाळगत नाहीत.

हिटलर असाच तयार झाला होता व आजकाल ट्रम्प देखील!

चुकीची माहिती एवढेच सांगतो. हिटलरने लोकशाही, निवडणुका वगैरे प्रकार बंदच करून टाकले, विरोधकांच्या कत्तली केल्या म्हणून सगळे काही झाले. तसे भारतात होत आहे का ते बोला. उगीच काल्पनिक भित्या नकोत.

विरोधी पक्षच नसला तर ? विचार करून पहा.

अत्यंत हास्यास्पद प्रश्न. लोकशाही मार्गातून लोक विरोधी पक्षांना घंटा धूप घालत नसतील पण कोणालाही निवडणुक लढवायची परवानगी आहे तोपर्यंत शष्प काहीही फरक पडणार नाही. पण सद्दाम हुसेनने केले त्याप्रमाणे बाथ पक्ष सोडून इतर पक्षांच्या अस्तित्वावरच बंदी असले प्रकार झाले तर प्रॉब्लेम निर्माण होईल. यापैकी काय भारतात चालू आहे?

आणि विरोधी पक्षांना लोक घंटा धूप घालत नसतील तर ते पूर्ण समजू शकतो. देशाच्या संसदभवनावर हल्ला करून, सगळे मंत्रीमंडळ ठार मारणे किंवा फिजीमध्ये झाले त्याप्रमाणे ओलिस ठेऊन वाटेल त्या मागण्या मान्य करून घेणे असले प्लॅन असलेल्यांचा उदोउदो करणार्‍यांना हे विरोधी पक्ष 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या' गोंडस नावाखाली समर्थन करत आहेत. जोपर्यंत कन्हैय्याकुमार सारख्या हरामजाद्यांना* विरोधी पक्ष समर्थन देत आहेत तोपर्यंत हे असले विरोधी पक्ष नकोत असे देशातल्या सामान्य लोकांना वाटले तर त्यात काय चुकले?

मोदी सरकारविषयी माझेही काही आक्षेप आहेत आणि वेळोवेळी मी ते मांडतही असतो. पण मोदी एक वाईट करत आहेत हे आवडले नाही म्हणून शंभर वाईट करणार्‍यांना मते द्यायचा विचारही करू शकत नाही.

मला वाटते की असल्या लहान कारणांवरून कित्येक पटींनी मोठ्या राक्षसांना मते द्यायचा काही सुशिक्षित लोक विचार करत आहेत पण अशिक्षित लोक मात्र ल्युटिन्स दिल्लीमधील मिडिया आणि पुरोगामी विचारवंत यांच्या कृष्णछायेपासून दूर आहेत म्हणून ते मात्र मोदींना समर्थन देत आहेत. कधीकधी वाटते की या असल्या सुशिक्षित लोकांमुळे इंदिरा गांधींच्या काळात होते तसे परत होणार आहे. इंदिरांनाही सुशिक्षितांचा बर्‍याच प्रमाणावर विरोध असायचा पण अशिक्षित लोक मात्र जोरदार समर्थन करायचे. त्यातूनच इंदिरा गांधी सुशिक्षितांच्या आशाआकांक्षांना आणि मतांना हिंग लावून विचारत नसत. काही वर्षांनी मोदीही बहुतेक तेच करणार आहेत. आणि तसे मोदींनी केले तर हे जगाच्या टोकावर बसलेले (टॉप ऑफ द वर्ल्ड) सुशिक्षित लोकच जबाबदार असतील.

*: मिपावरील चर्चेत हा शब्द नको असे संपादकांचे मत असल्यास तो शब्द जरूर काढावा.

अमितदादा's picture

22 Apr 2017 - 5:44 pm | अमितदादा

मूळ प्रतिसादातील घंटा आणि बापझादे हे शब्द भावनेचा भरात लिहिलेले आहेत ते नको होते मान्य, त्यामुळे ते शब्द उडवले किंवा प्रतिसाद उडवला तरी चालेल. आता मूळ मुद्याकडे येतो.
तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे मोदी सरकार ने भरपूर लोकांचे दुकान बंद केले, भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम चालू केली, तसेच governance च्या बाबतीती माझा मोदी न पाठींबा च आहे त्यासाठीच तर त्यांना लोक मत देतायत. मग अश्या मुद्यांची भाजपला गरज च काय आहे, कारण हि fanatic लोक उद्या भाजपला किंवा संघाला सुधा ऐकणार नाहीत.
ह्या होणार्या गोष्टी एक देश म्हणून आपल्या मूळ ढाच्याला धक्का लावतायत आणि सरकार अश्या गुंडांचे direct किंवा indirect समर्थन करते (राजस्थान गृह मंत्री) हि एक लाजिरवाणी गोष्ट आहे. ह्याच भुमिके (किंवा यासारख्या अनेक भुमिके मुळे) मुळे उद्या काही समाजात मध्ये परत फुटीरवाद रुजू नये म्हणजे झाले.
आज विरोधी पक्षांचा कारभाराला कंटाळून लोकांनी मोदींना मते दिलेत (संघ किंवा भाजप ला नाही), भाजप सुधा विरोधी पक्षाचा वाटेवरून जावू नये हि इच्छा.

गॅरी ट्रुमन's picture

22 Apr 2017 - 6:05 pm | गॅरी ट्रुमन

भाजपमधील असल्या प्रवृत्तींना सगळ्यांचाच विरोध आहे. माझा तर नक्कीच आहे. प्रश्न कधी उभा राहतो? भाजपमध्ये असल्या प्रवृत्ती आहेत हे पटले नाही म्हणून त्यापेक्षा कित्येक पटींनी वाईट प्रवृत्ती असलेल्या पक्षांकडे लोक आकर्षित होतात तेव्हा. समाजवादी पार्टी, आर.जे.डी , तृणमूल वगैरे पक्षांनी नक्की काय प्रकार केले आहेत? गोरक्षक धुमाकूळ घालत आहेत हे वाईट आहेच. वादच नाही. पण गोरक्षकांचे पटले नाही म्हणून कैराना, मालदा या गोष्टींकडे डोळेझाक करणार्‍या किंवा समर्थन देणारे पक्षही अनेक सुशिक्षितांना आपले वाटायला लागतात!! मिपावरच बिहार निवडणुकांच्या वेळी लालूला किती समर्थन मिळाले होते हे जुने धागे उघडून बघाच. आणि ते समर्थन कुणा अंगठाछाप लोकांकडून नाही तर चांगल्या चांगल्या अभ्यासू लोकांकडून मिळाले होते.

पुंबा's picture

23 Apr 2017 - 4:33 pm | पुंबा

बघा, भाजपचे सरकार आले की उन्माद चढणारे हे टगे एरव्ही भाजपाला समर्थन देणाऱ्या सुशिक्षितांमध्ये पण शंका निर्माण करतात की नाही?
इतक्या मेहनतीने आपण ६९ वर्षात उत्तम institutions जोपासल्या आहेत, त्यांना जर काही लोक आव्हान देणार असतील तर ते भीतीदायक नाही का वाटत. Rule of the law जाऊन rule of the man प्रस्थापीत होऊ नये यासाठी झगडायलाच पाहिजे प्रत्येक विचारी माणसाने.
माझ्या मते, गोरक्षक आणि तत्सम गुंड जे काही करताहेत त्याने अस्वस्थ होणे ही साहजीक आहे, स्वतः मोदींनी जर ह्यांच्यावर कठोर कारवाईस समर्थन दिले तर ते भाजपसाठी पण योग्य राहील.
अवांतर: 'आर्ट ऑफ लिव्हिंग' एन जी टी ला नडतंय ते भाजपाचे सरकार आहे म्हणून की कुणाचेही सरकार असते तरी अशीच भुमिका घेतली गेली असती?

गॅरी ट्रुमन's picture

23 Apr 2017 - 9:02 pm | गॅरी ट्रुमन

इतक्या मेहनतीने आपण ६९ वर्षात उत्तम institutions जोपासल्या आहेत, त्यांना जर काही लोक आव्हान देणार असतील तर ते भीतीदायक नाही का वाटत.

वाटतं ना. म्हणूनच आपल्या सगळ्या institutions चा मानबिंदू असलेल्या संसदभवनावर हल्ला करण्याच्या भयंकर प्रकाराचे समर्थन करायच्या प्रकाराला विरोधी पक्ष अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून समर्थन करतात ही प्रचंड मोठी भिती मला वाटते. गोरक्षक त्रासदायक आहेतच. पण म्हणून उघडउघडपणे देशद्रोह्यांचे समर्थन करणार्‍यांना मते द्यायची? हे काही पटत नाही.

Rule of the law जाऊन rule of the man प्रस्थापीत होऊ नये यासाठी झगडायलाच पाहिजे प्रत्येक विचारी माणसाने.

नक्कीच. पण तशी परिस्थिती निर्माण झाली आहे असले बागुलबोवे ल्युटिन्स दिल्लीमधील मिडिया, मोठे मोठे विचारवंत, केजरीवाल, अडवाणी असले लोक उभे करत आहेत. त्यात काहीही तथ्य नाही.परत एकदा लिहितो की गेल्या तीन वर्षात नवी कोणती भिती आपल्या दैनंदिन जीवनात निर्माण झाली आहे? हे सगळे चित्र मोदी सरकारने बडगा उगारल्यामुळे रस्त्यावर आलेल्या विचारवंतांनी उभे केले आहे. सामान्य भारतीयांपासून हे विचारवंत कित्येक प्रकाशवर्षे दूर आहेत.

माझ्या मते, गोरक्षक आणि तत्सम गुंड जे काही करताहेत त्याने अस्वस्थ होणे ही साहजीक आहे, स्वतः मोदींनी जर ह्यांच्यावर कठोर कारवाईस समर्थन दिले तर ते भाजपसाठी पण योग्य राहील.

नक्कीच. म्हणूनच माझ्यासारख्यांचे मत मोदी आहेत म्हणून भाजपला आहे. आणि मोदी जर असल्या मंडळींवर पुरेशी कारवाई करत नसतील तर महापालिका किंवा तत्सम निवडणुकांमध्ये काँग्रेसला मत देऊन ती नाराजी व्यक्तही करू. आणि भविष्यात उजव्या बाजूला मोदींपेक्षा अधिक चांगला नेता उदयास आला तर मोदींना बाजूला सारून त्या नेत्यालाही मत द्यायला काहीही हरकत नाही. मोदींना काहीही सोने लागलेले नाही. पण सध्या तरी विरोधी पक्ष इतके पॅथेटिक आहेत की मोदी बर्‍याच आघाड्यांवर अपेक्षेइतके काम करत नसले तरी त्यांनाच मत देण्याशिवाय पर्याय नाही.

भाजप प्रति असलेल्या भावनेच्या आवेगामध्ये पूर्ण प्रतिसाद गंडला आहे.

विसंगती दाखवली असती पण टंकळा आला आहे.

श्रीगुरुजी's picture

22 Apr 2017 - 8:58 pm | श्रीगुरुजी

देशामध्ये गो रक्षकांनी अक्षरशः उछाद मांडला आहे, एका मागून एक घटना घडत असताना आज सुधा जम्मू काश्मीर मध्ये गो रक्षकांनी पशुपालन व्यवसायावर जगणाऱ्या एका मुस्लीम कुटुंबीयावर हल्ला केला यात एका लहान मुलीला हि दुखापत केली. खर्या अर्थाने हे कुटुंबीय गाई ची पालन पोषण करणारे होते, ह्या हल्ला करणाऱ्या गो रक्षकांच्या बाप झाद्यानी कधी गाई पाळल्या च नसतील असं मला वाटत.
5 Including 9-Year-Old Girl Attacked By Cow Vigilantes In Jammu And Kashmir

या बातमीविषयी जरा साशंक आहे.

१) बातमी एनडीटीव्हीने दिली आहे. द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस इ. वृत्तपत्रात ही बातमी अजूनतरी छापलेली नाही. इंडिया टुडे व इतर काही वृत्तपत्रांच्या संकेतस्थळावर ही बातमी आहे, परंतु बातमीसाठी त्यांनी एनडीटीव्हीच्या बातमीचा संदर्भ दिला आहे. फक्त एनडीटीव्ही कडेच ही बातमी कशी आली याचे कुतुहल वाटत आहे. बातमी एनडीटीव्हीची असल्याने ही बातमी चिमूटभर मीठ घेऊनच वाचावी लागेल.

२) ही घटना काश्मिरमधील श्रीनगर जवळील एका गावात घडल्याचे सांगितले जाते. श्रीनगरसारख्या कट्टर मुस्लिमबहुल प्रदेशात (श्रीनगरचा समावेश असलेल्या काश्मिर खोर्‍यात ९०% मुस्लिम आहेत) असा प्रकार घडणे अवघड वाटते.

३) दिलेल्या बातमीनुसार गायीगुरांचा कळप नेणार्‍या कुटुंबावर काही जणांनी हल्ला लोखंडी सळ्यांच्या सहाय्याने केला. नक्की कोणत्या कारणासाठी हल्ला केला हे बातमीत लिहिलेले नाही. परंतु तरीसुद्धा स्वयंघोषित गोरक्षकांनी हा हल्ला केला असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हल्ला करणारे हे गोरक्षक होते व गोरक्षण या कारणावरून हा हल्ला केला असे सिद्ध करणारे त्या बातमीत एकही वाक्य नाही. हल्ला करणारे गोरक्षक होते हा कोणत्याही पुराव्याविना थेट निष्कर्ष काढलेला दिसतो.

४) ज्या कुटुंबावर हल्ला झाला त्यांनी सांगितले आहे की "हल्लेखोरांनी त्यांच्या कळपातील सर्व शेळ्या, बकर्‍या, गायी व कुत्रे सुद्धा पळवून नेले. त्यांच्या कुटंबातील एका ९ वर्षाच्या मुलीला अनेक जखमा झालेल्या आहेत व त्यांचा १० वर्षांचा मुलगा सुद्धा बेपत्ता आहे. हल्लेखोरांनी आमच्या कुटुंबातील सर्वांना बेदम मारले.".

हा काहीतरी नवीन प्रकार दिसतो. आजवर तथाकथित गोरक्षकांनी हल्ले केल्याच्या ज्या बातम्या आल्या आहेत त्या बातम्यांमध्ये त्यांनी गोहत्येच्या संशयावरून काही जणांना मारहाण केली असे सांगण्यात येते. परंतु वरील बातमीनुसार हल्लेखोरांनी फक्त मारहाण करून न थांबता सर्व गायी, शेळ्या, मेंढ्या व कुत्रे पळवून नेणे व कुटुंबातील १० वर्षाच्या मुलाला सुद्धा पळवून नेणे हा काहीतरी वेगळाच प्रकार दिसतो.

हा हल्ला गोरक्षकांनी केला हा निष्कर्ष नक्की कोणत्या आधारावर काढला ते समजत नाही. हा प्रकार खरोखरच घडला असेल तर त्यामागे दोन कुटुंबातील वैर असावे किंवा हा लूटमारीचा प्रकार असावा असे प्रथमदर्शनी वाटत आहे.

या प्रकाराची अजून जास्त सविस्तर माहिती बाहेर आल्यानंतर काहीतरी निष्कर्ष काढता येईल.

हतोळकरांचा प्रसाद's picture

23 Apr 2017 - 9:55 pm | हतोळकरांचा प्रसाद

देशामध्ये गो रक्षकांनी अक्षरशः उछाद मांडला आहे

अत्यंत हास्यास्पद वक्त्यव्य आहे हे! १३० कोटींच्या ह्या देशात किती घटना घडल्या आहेत अशा? १०-५ गुंडशाही करण्याची मनीषा बाळगणाऱ्या लोकांचं टोळकं कुठेतरी काहीतरी करतं आणि देशात लगेच अलार्मिंग वातावरण तयार होतं आणि मोदी हिटलरशाहीच्या दिशेने वाटचाल करू लागतात - दांभिकतेची परिसीमा मानायला हवी ही! या अशा घटनांपेक्षा कितीतरी जास्त घटना गल्लीत दादागिरी करून लोकांना त्रास देणाऱ्या टोळक्यांच्या बाबतीत घडत असतील ज्याचा सरकारशी, सरकारच्या धोरणाशी काहीही संबंध नसतो. तरी बरं मोदींनी अत्यंत उघडपणे गोरक्षकांबाबत स्वतःच मत मांडलेलं आहे!

गुरुजीं प्रमाणे मी पण काश्मीर मधल्या गो-रक्षकाबद्दल साशंक आहे, हे आधी नमूद करतो

<<<१३० कोटींच्या ह्या देशात किती घटना घडल्या आहेत अशा?>>
==>> प्रथम हे वाक्य सगळ्यात जास्त हास्यास्पद आहे. घटना एक घडो किंवा हजारो, जीवित हानी झाली असेल तर सरकार (गृह खाते) जवाबदार आहे.

<<<१०-५ गुंडशाही करण्याची मनीषा बाळगणाऱ्या लोकांचं टोळकं कुठेतरी काहीतरी करतं>>>
==>> पण हे टोळकं गोवंश/ गो हत्या कायद्याचे भाजपच्या सरकारच्या बॅनरचा उपयोग करून परस्पर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भाजप याची जवाबदारी झटकू शकत नाही. झटकली तरी माझी काही हरकत नाही.

<<<या अशा घटनांपेक्षा कितीतरी जास्त घटना गल्लीत दादागिरी करून लोकांना त्रास देणाऱ्या टोळक्यांच्या बाबतीत घडत असतील ज्याचा सरकारशी, सरकारच्या धोरणाशी काहीही संबंध नसतो.>>
==>> पण गो रक्षकांचा पवित्रा सरकारशी संबंधित आहे की नाही हे माहित नाही पण सरकारच्या धोरणाशी सुसंगत आहेत.

<<<तरी बरं मोदींनी अत्यंत उघडपणे गोरक्षकांबाबत स्वतःच मत मांडलेलं आहे!>>>
==>> सहमत.

सचु कुळकर्णी's picture

24 Apr 2017 - 12:09 am | सचु कुळकर्णी

पण गो रक्षकांचा पवित्रा सरकारशी संबंधित आहे की नाही हे माहित नाही पण सरकारच्या धोरणाशी सुसंगत आहेत
काय म्हणता ट.फि. / झ.फि. सरकार ला धोरण असत ? जर तुमच उत्तर हो असेल तर ..... तर माजी क्रुषिमंत्री साहेब ह्यांनी असे कोणते धोरण अवलंबले होते कि कास्तकारांच्या आत्महत्या दुपटिने वाढल्या होत्या UPA 2 मध्ये ? त्या सो कॉल्ड गो रक्षकांच्या दोन पायांच्या मध्ये बाजी चा खुंटा मारा डोळे पांढरे झाले की पोलिसांच्या हवालि करा. पण ट.फि. / झ.फि. धोरण ? 2 एक वरस हायेत बघा पहा काय व्हतय का. मोदि असे काहि खुप मोठे किंवा अजिंक्य नाहि झालेत हो ! विरोधि खुजे, बिंडोक झालेयत.

सचु कुळकर्णी's picture

24 Apr 2017 - 1:29 am | सचु कुळकर्णी

काय काय राव किती मोठा प्रतिसाद लिहिला होता... हे Vodafone नालायक 10 मिनटा करता गायबल होत. साहेबांविषयी लिहिल म्हणुन गैरसमज नसावेत. सबन पष्ट लिवल होत.

सचु कुळकर्णी's picture

24 Apr 2017 - 2:37 am | सचु कुळकर्णी

साहेबांचि भेट घेण्याच मला 3 वेळा भाग्य लाभल एकदा बारामति मध्ये विद्या प्रतिष्ठान, त्यांचि भिगवण चि धावति भेट तिसर्यांदा मुंबैत. त्यांच्या राजकारणातल्या उंची बद्दल कुठलेहि मराठी मन सांशक नाहिये पण...पण ...ह्याच उंचिचा माणुस समाविष्ट असलेल्या कँबिनेट ने (पंतप्रधानांसहित) एक अध्यादेश Ordinance पारीत केला होता जो नंतर एका रांगत्या शेंबड्या लेकराने पत्रकार परीषदेत टराटरा फाडुन टाकला होता. काय धोरण होत ह्यामागे ? UPA 2 मध्ये शेतकर्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात वाढल्या होत्या , ते हि आमचा कृषिमंत्रि असताना ? काय धोरण होते. ईथे कारण होत "" बिन पगारी ( जबाबदारी ) फुल्ल अधिकारी ""
लोक ईंकलुडिंग शेंबड रांगत पोर अन त्याची माय माउलि.
साहेबां सारखे द्रष्टे लोक काहि हि निर्णय घेवु देत त्याला रीव्हेरिफाय करणारे हे मायलौक होते. असो.
गौरक्षक आणि तमाम मुर्ख लोक झोडुन काढुया तुम्हाले भेटले
तुम्हि कुथाडा मले भेटले तर मि घोयस्तो. पण धोरणाच्या बाबतित बोलतांना एव्हढ लक्षात ठेवा की सध्याच नेत्रुत्व नो नॉनसेन्स वाल आहे आणि खुद मुख्त्यार आहे. कदाचित जास्तच मुख्त्यार होत चाललय. पण ह्या नेत्रुत्वाला थांबवणार कोण ? अजुनहि रांगणार शेंबड पोरग ? वामपंथी ? चला बाप जन्मात शक्य नाहि पण युगपुरूष केजरीवाल ? नहि नहि....।।। गब्बर के ताप से तुम्हे एकहि आदमि बचा सकता है खुद गब्बर ;) वाट पाहुया मोदिंकडुन अशी काहि चुक होण्याचि कि जेंव्हा भारतवर्ष त्यांच्यावर नाराज होईल आणि लॉलिपॉप चोखत युवराज देशाचे पंतप्रधान होतिल.

गामा पैलवान's picture

22 Apr 2017 - 7:06 pm | गामा पैलवान

अमितदादा,

मग अश्या मुद्यांची भाजपला गरज च काय आहे, कारण हि fanatic लोक उद्या भाजपला किंवा संघाला सुधा ऐकणार नाहीत.

गोरक्षकांच्या हिंसेचा भाजपशी कसलाही संबंध नाही. काश्मिर आणि दोन्ही पाकिस्तानांतल्या हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या मानाने गोरक्षकांची हिंसा अत्यंत किरकोळ आहे.

आ.न.,
-गा.पै.

दिल्लीतील तीन महापालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे आणि मतमोजणी २६ एप्रिलला होणार आहे. हे मतदान दिल्लीतील अरविंद केजरीवालांच्या आआप सरकारच्या कारभारावरील सार्वमत असेल असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे.

हे थोडे आश्चर्यकारक आहे. शक्यतो सत्ताधारी पक्ष अशा निवडणुका हे आपल्या कारभारावरील सार्वमत आहे असे म्हणत नाहीत. कारण पराभव झाल्यास त्याचा अर्थ सरळ लोकांनी आपल्या सरकारला नाकारले आहे असा काढता येऊ शकतो.मागच्या वर्षी ब्रेक्झिटच्या वेळी डेव्हिड कॅमेरनना ही अडचण आली होती. सुरवातीपासूनच लोकांनी ब्रेक्झिटविरोधी मत द्यावे अशी जाहिर भूमिका त्यांनी घेतली होती. पण प्रत्यक्ष ब्रेक्झिटच्या बाजूने लोकांनी मत दिल्यावर मात्र पंतप्रधानांच्या भूमिकेला लोकांनी नाकारले असा सरळ अर्थ निघाला म्हणून त्यांनी जनादेश गमावला अशी परिस्थिती उभी राहिली आणि त्यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे शक्यतो सत्ताधारी पक्ष अशी भाषा वापरत नाहीत. समजा महापालिका निवडणुकांमध्ये पराभव झाला तर केजरीवाल मग राजीनामा देणार का? बरेचसे सर्व्हे तर आआपचा धुव्वा उडणार आहे असे भाकित करत आहेत. सध्या चाणक्य आणि अ‍ॅक्सिस सोडून इतर कोणत्याच सर्व्हेवर विश्वास राहिलेला नाही. पण समजा हे सर्व्हे खरे ठरले आणि आआपचा धुव्वा उडाला तर मग केजरीवालांची भूमिका नक्की काय असणार हे बघणे इंटरेस्टींग ठरेल. ते निर्णय मुकाट्याने मान्य करणार आणि त्यांच्याच उपमुख्यमंत्र्याने म्हटल्याप्रमाणे हे त्यांच्या सरकारच्या कारभाराविषयीचे सार्वमत असल्यामुळे पराभव झाल्यास राजीनामा देणार की पूर्वीच ई.व्ही.एम विरूध्द बोलून 'अटकपूर्व जामीन' च्या धर्तीवर 'पराभवपूर्व सबब' केजरीवालांनी घेऊन ठेवली आहेच त्याचा वापर करणार?

श्रीगुरुजी's picture

22 Apr 2017 - 9:03 pm | श्रीगुरुजी

समजा दिल्लीतील ३ पैकी किमान २ महापालिकेत आआपला साधे बहुमत मिळाले तरी दिल्लीच्या मतदारांनी आआपवर पुन्हा एकदा विश्वास दाखविला हे सांगायला ते मोकळे. आणि जर तीनही महापालिकेत पराभव झाला तर पराभवाचे कारण त्यांनी आधीच शोधून ठेवले आहे. छापा पडला तर आम्ही जिंकलो आणि काटा पडला तर तुम्ही हरला.

प्लिज नवीन धागा सुरू करा, मोबाईल वाचताना अत्यंत त्रास होतो आणि तिरकस प्रतिसाद स्वरूप तर प्रतिसाद वाचू पण देत नाही. आशा नवीन धागा सुरू कराल.

श्रीगुरुजी's picture

23 Apr 2017 - 2:57 pm | श्रीगुरुजी

हे मतदान दिल्लीतील अरविंद केजरीवालांच्या आआप सरकारच्या कारभारावरील सार्वमत असेल असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे.

सिसोदिया केजरीवालांइतकेच धूर्त आहेत. त्यांनाही मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा आहे. त्यांनी मुद्दामच हे विधान केले आहे. जर निवडणुकीत आआपला बहुमत मिळाले तर आमच्या चांगल्या कामामुळेच महापालिकेत आम्हाला बहुमत मिळाले हे सांगायला ते मोकळे. जर आआपचा निवडणुकीत पराभव झाला तर आआपच्या मूर्खपणाला मतदारांनी मतपेटीतून थप्पड दिली आहे असे माध्यमे सांगायला सुरूवात करणार कारण सिसोदियांनीच तसे सांगितले आहे आणि जर केजरीवालांनी राजीनामा द्यावा ही जोरदार मागणी सुरू होऊन केजरीवाल पायउतार झाले तर त्यांच्याजागी सिसोदियांची वर्णी लागेल.

दिल्लीत आआपचा पराभव होणार याची चाहूल सिसोदियांना लागलेली दिसते. म्हणून मुद्दामच केजरीवालांची अडचण करण्यासाठी हे मतदान दिल्लीतील अरविंद केजरीवालांच्या आआप सरकारच्या कारभारावरील सार्वमत असेल असे त्यांनी आधीच बोलून ठेवले आहे. केजरीवाल जितके अडचणीत येतील तितकी सिसोदिया मुख्यमंत्री बनण्याची संधी वाढत जाईल.

नाहि हे साहेब धुर्त पणात केजरीवाल चे बाप आहेत बघाल तुम्हि, 24 x7 हे सतत (नाटकि, ईरीटेटिंग ) हसतमुख असतात. केजरीवाल स्वारी युगपुरुष ना तर धुर्त आहे ना राजकारणी, हे एक अहंकाराने आणि भ्रष्ट--आचाराने मुसमुसलेल क्रिचर आहे.
पण सिसोदिया साहिब पक्का राजकारणी आहे युगपुरुषांचा राजकीय अस्त हेच साहेब करतील. सुरुवातितच शेवटाचे रहस्य दडलेले असते. ज्या तर्हेने प्रसिध्दि साठी हपापलेल्या अण्णांचा वापर ह्यांनि केला ते बघता एकमेकांसोबत ते हाच खेळ खेळतिल. येणारा काहि काळ देशाला ह्यांचे माकडचाळे सहन करावे लागतिल आणि दिल्लिकरांना त्यांचे कर्मभोग. पण ह्या माकडांनी भारतिय समाजाचे न भरून येणारे नुकसान करून ठेवलेय.

दिल्लीमधील तीन महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडले. एकूण ५४% मतदान झाले अशा बातम्या आहेत.

या निवडणुकांसाठी अ‍ॅक्सिस या आतापर्यंत सर्वोत्तम ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या संस्थेने आणि सी-व्होटर एबीपी न्यूजने एक्झिट पोल घेतले. या दोन्ही एक्झिट पोलच्या अंदाजाप्रमाणे आम आदमी पक्षाचा धुव्वा उडणार आहे. दिल्लीतील तीन महापालिका मिळून २७२ जागा आहेत. इंडिया टुडेबरोबर अ‍ॅक्सिसने घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये २७२ पैकी भाजपला २०२ ते २२० तर एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये २१८ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या दोघांनाही २० ते ३० जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज या पोल्सनी व्यक्त केला आहे.

बुधवारी मतमोजणीत प्रत्यक्ष निकाल असेच लागले तर मात्र तो केजरीवाल आणि आम आदमी पक्षासाठी प्रचंड मोठा धक्का असेल. अपेक्षेप्रमाणे केजरीवालांनी ई.व्ही.एम बरोबर काम करत नाहीत असा दावा केला आहेच.

एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर विविध चॅनेलवरील चर्चेत आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी त्या निकालांसाठीही ई.व्ही.एम ला जबाबदार ठरवले आहे अशा पोस्ट ट्विटरवर फिरत आहेत. या चर्चा मी स्वतः बघितलेल्या नाहीत पण आम आदमी पक्षाच्या नेत्यांचा पूर्वेतिहास लक्षात घेता ते असा दावा करणे अगदी सहज शक्य आहे. एक्झिट पोलसाठी ई.व्ही.एम लागत नाहीत तरीही या अंदाजांसाठी ई.व्ही.एम ला जबाबदार ठरविणे हा प्रकार काही हजम होण्यापलीकडचा आहे.

अनुप ढेरे's picture

23 Apr 2017 - 10:25 pm | अनुप ढेरे

एक्झिट पोलसाठी ई.व्ही.एम लागत नाहीत तरीही या अंदाजांसाठी ई.व्ही.एम ला जबाबदार ठरविणे हा प्रकार काही हजम होण्यापलीकडचा आहे.

हा हा हा अगदी! एक्झिट पोलसाठीदेखील एवीएमना जबाबदार म्हणणं हास्यास्पद आणि कीव आणणारं आहे.

दशानन's picture

23 Apr 2017 - 10:47 pm | दशानन

+1
हा केजरी अति शहाणा समजतो स्वतः ला पण त्याला पण तेच अधिकार आहेत जे आपण सर्वांना आहेत. ;)
तोंड कोणाचे धरणार!

पुन्हा एकदा विंनती नवा धागा सुरू करा, mcd मध्ये खूप काही नवे घडणार आहे, शक्यतो नवा इतिहासच. प्लिज नवा धागा सुरू करा साहेबा!

गॅरी ट्रुमन's picture

24 Apr 2017 - 1:51 pm | गॅरी ट्रुमन

पुन्हा एकदा विंनती नवा धागा सुरू करा

एका मिपाकरांबरोबर याविषयी ई-मेलवर संपर्क झाला आहे. त्यांनी धागा सुरू केल्यास त्या धाग्यावर प्रतिसाद देईनच. काही कारणाने त्यांना शक्य न झाल्यास मी धागा सुरू करेन. आतापर्यंत महापालिका निवडणुकांमध्ये कधी फार इंटरेस्ट घेतला नव्हता. पण यावेळी मुंबई आणि आता दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये इंटरेस्ट घेत आहे.

mcd मध्ये खूप काही नवे घडणार आहे, शक्यतो नवा इतिहासच.

यशवंत देशमुखांच्या ट्विटर अकाऊंटवर दिल्ली महापालिकेत मतांची टक्केवारी किती असेल याचा पुढील अंदाज प्रसिध्द झालेला दिसला--

1

या अंदाजाप्रमाणे भाजपला ५०.७%, काँग्रेसला १९.१% तर आआपला १८.६% मते मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

मतांच्या टक्केवारीचा हा अंदाज बरोबर निघाला तर भाजपला २०२ ते २२० जागा हा बराच सावध अंदाज एक्झिट पोलवाले व्यक्त करत आहेत. निवडणुकांमधील मतांची टक्केवारी आणि मिळणार्‍या जागा या आकडेवारीचा मी आतापर्यंत जेवढाकेवढा अभ्यास केला आहे त्यावरून सांगतो की भाजपला ५०% आणि काँग्रेस-आआपला प्रत्येकी १९% मते मिळणार असतील तर भाजपला अगदी जबरदस्त मोठे यश मिळेल. २५०-२५५ जागांचा पल्लाही भाजपने ओलांडला तर आश्चर्य वाटू नये. अर्थात यामागे मतांच्या टक्केवारीचा हा अंदाज बरोबर असेल तर हे मोठे गृहितक आहे.

बुधवारी मतमोजणीच्या दिवशी रजा घेऊन निवडणुकांचे निकाल बघायचा मानस आहे. तशा हापिसात बर्‍याच रजा शिल्लक आहेत त्यामुळे एक दिवस रजा घ्यायला फार अडचण येऊ नये. फक्त दिल्ली महापालिका निवडणुकांचे निकाल बघायला रजा हवी आहे हे कारण चालायचे नाही दुसरे कोणतेतरी कारण बनवायला हवे :)

दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये मिपाकरांना इतका इंटरेस्ट असेल असे वाटले नव्हते. त्यामुळे निकालांचा धागा काढायचा विचार केला नव्हता. पण बर्‍याच मिपाकरांना असा धागा यावा असे वाटत आहे असे दिसते. वर उल्लेख केल्याप्रमाणे एकतर ई-मेलवर संपर्क झालेले मिपाकर किंवा काही कारणाने त्यांना शक्य न झाल्यास मी नवा धागा काढेनच.

श्रीगुरुजी's picture

23 Apr 2017 - 11:50 pm | श्रीगुरुजी

>>> अपेक्षेप्रमाणे केजरीवालांनी ई.व्ही.एम बरोबर काम करत नाहीत असा दावा केला आहेच.

नाचता येईना *गण वाकडं

प्रसाद_१९८२'s picture

24 Apr 2017 - 10:17 am | प्रसाद_१९८२

एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर विविध चॅनेलवरील चर्चेत आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी त्या निकालांसाठीही ई.व्ही.एम ला जबाबदार ठरवले आहे

---

केजरीवाल आणि कंपनीच्या ह्या दाव्यावर केंद्रिय गृहराज्यमंत्री किरण रिजजू ह्यांनी खालील ट्विट केले आहे.

--

सचु कुळकर्णी's picture

24 Apr 2017 - 2:51 am | सचु कुळकर्णी

कधि कधि वाटत युगपुरुषानि आपले अवतार कार्य संजय गांधि जिवंत असताना सुरु करायला हवे असते आणिबाणि लागण्यापुर्वी... शिद्दा आल्पस मध्ये पळाले असते युगपुरुष बिना मफलरचे.

सचु कुळकर्णी's picture

24 Apr 2017 - 4:27 am | सचु कुळकर्णी

Reports from all over Delhi of EVM malfunction, people wid voter slips not allowed to vote. What is SEC doing?
Playing Marbles ;). Wanna join.
शेख चिल्ली अँड कंपनि तुम्हारा बस चलता तो तुम ईलेक्शन......काउंटिग भि सिर्फ जंतर मंतर पर करते. जैसे हि पता चलता हार रहे है किसी बेवकुफ गरीब को लटका देते पेड से. फिर भाषण भि ठोकते.

गॅरी ट्रुमन's picture

24 Apr 2017 - 5:25 pm | गॅरी ट्रुमन

दिल्लीचे परिवहन मंत्री गोपाल राय यांच्यामते महापालिका निवडणुकांमध्ये आआपचा विजय झाल्यास तो दिल्लीच्या जनतेचा विजय असेल पण पराभव झाल्यास मात्र तो ई.व्ही.एम चा पराभव असेल. http://abpnews.abplive.in/india-news/aap-leader-and-delhi-minister-gopal...

एकूणच काय की ई.व्ही.एम वर दोष टाकून केजरीवालांनी सुरवातीपासूनच 'पराभवपूर्व सबब' (अटकपूर्व जामिनाला समकक्ष) आपल्याकडे तयार ठेवली आहे. पराभव झाल्यास त्या सबबीवर विसंबून राहता येईल आणि विजय झाल्यास त्या सबबीचा सोयीस्कर विसर पडेल :)

प्रसाद_१९८२'s picture

24 Apr 2017 - 7:55 pm | प्रसाद_१९८२

छत्तीसगडमध्य़े 300 हून अधिक नक्षलवाद्यांचा हल्ला, CRPF चे 26 जवान शहीद

---
---
http://abpmajha.abplive.in/india/naxal-attack-on-crpf-soldiers-in-sukma-...

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2017 - 3:29 pm | श्रीगुरुजी

प्रज्ञा सिंह ठाकूरला न्यायालयाकडून जामीन मंजूर

प्रज्ञा सिंह ऑक्टोबर २००८ पासून आजतगायत (म्हणजे साडेआठ वर्षे) विनाजामीन तुरूंगात आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या वडीलांचे निधन झाल्यावर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी सुद्धा तिला १-२ तासांसाठी जामिनावर सोडण्यात आले नव्हते. युपीए सरकारने २००९ च्या निवडणुकीत फायदा मिळविण्यासाठी तिला व इतर ९-१० जणांना खोट्या आरोपांखाली भयंकर कलमे लावून तुरूंगात अडकविले. मालेगाव पाठोपाठ इतर अनेक प्रकरणात तिचे व इतरांचे नाव आरोपी म्हणून घुसडण्यात आल्यामुळे व सर्वांना मोक्का लावल्यामुळे त्यांना जामीन मिळणे अत्यंत अवघड झाले होते. या सर्वांविरूद्ध कोणतेही ठोस पुरावे नसल्याने अनेक वर्षे त्यांच्याविरूद्ध आरोपपत्रच दाखल करण्यात आले नव्हते व त्यामुळे त्यांच्याविरूद्ध खटला सुरूच झाला नाही. जामीन नाही, आरोपपत्र नाही, खटला नाही व त्यामुळे आरोप सिद्ध होण्याचा/ न होण्याचा प्रश्नच नाही, यामुळे फक्त खोट्या आरोंपाखाली या सर्वांना आयुष्यभर तुरूंगात डांबून ठेवणे व त्यांचा संदर्भ देऊन "हिंदू दहशतवाद", "भगवा दहशतवाद"असा प्रचार करून भाजप व संघपरिवाराला बॅकफूटवर नेऊन निवडणुकीत फायदा मिळविणे या युपीएच्या कारस्थानात चिदंबरम, तत्कालीन गृहसचिव आर के नारायण, तत्कालीन महाराष्ट्र सरकार इ. प्रमुख भागीदार होते. हे कारस्थान कोणाच्या डोक्यातून शिजले असणार हे स्पष्ट आहे.

त्यांनी कबुलीजबाब द्यावा यासाठी तुरूंगवासात या सर्वांचा अनन्वित छळ करण्यात आला. प्रज्ञा सिंहला जेवणात मांसाहारी पदार्थ देणे, पॉर्न दाखविणे असे अनेक प्रकार केले गेले. वडीलांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन नाकारले गेले. खोटे पुरावे जमविण्याचे प्रयत्न केले गेले. याच काळात तिला कर्करोग झाला. परंतु कर्करोगावरील उपचारांसाठीसुद्धा तिला जामीन दिला नाही. याच काळात तिचे पाय अपंग झाले नसून ती व्हीलचेअरशिवाय हलू शकत नाही. एकंदरीत या सर्वाच्या आयुष्याची युपीए सरकारने वाट लावली. युपीए सरकारच्या दुर्दैवाने दबावाला व छळाला बळी पडून यापैकी कोणीही न केलेल्या गुन्ह्याचा कबुलीजबाब दिला नाही. प्रचंड गुंताडा करून ठेवलेले हे प्रकरण हलायला सुरूवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी स्वामी असीमानंदला जामीन मिळाला. आता प्रज्ञा सिंहला जामीन मिळाला आहे. कर्नल पुरोहित व इतर काही जणांना दुर्दैवाने जामीन मिळालेला नाही. त्यांचा तुरूंगवास अजून किती वर्षे सुरू राहणार खुदा जाने. हे सर्वजण बहुतेक उर्वरीत आयुष्य विनाजामीन, विनाखटला, विनाआरोपपत्र, विनासुनावणी तुरूंगातच राहणार आणि तिथेच संपणार.

विशुमित's picture

25 Apr 2017 - 7:26 pm | विशुमित

ओह्ह ... खूपच धक्कादायक आहे हे.

न्यायालय देखील केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चालत होते का UPA च्या काळात ? किती नतदृष्टेपणा म्हणायचा हा त्यांचा??

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2017 - 8:10 pm | श्रीगुरुजी

न्यायालय फारसे काही करू शकत नव्हते कारण आरोपपत्र दाखल झाल्याशिवाय खटल्याची सुनावणी होऊ शकत नाही आणि आरोपपत्र दाखल करण्यासाठी कोणतीच कायदेशीर कालमर्यादा नाही. मोक्का लावल्यामुळे जामीन नाही, आरोपपत्र दाखल न केल्यामुळे खटल्याची सुनावणी नाही व त्यामुळे विनाजामीन, विनाआरोपपत्र, विनाखटला आयुष्यभर तुरूंगवास.

विशुमित's picture

25 Apr 2017 - 8:38 pm | विशुमित

हो मग बरोबर आहे तुमचं..!!

वाईट झाले त्यांच्या बाबत.

हे एका ठिकाणी वाचायला मिळाले आणि मनाला चटका लावून गेले.

We are not looking at seers or saints in relation to the Malegaon blasts.
We are not looking at people from a particular community when we
question them. We are just detaining people on the basis of evidence.
There are a lot of people going around claiming to be saints.
– RAW Officer & ATS Chief Hemant Karkare

पण बिचाऱ्या साध्वीचा तरी काय दोष म्हणा.

गॅरी ट्रुमन's picture

27 Apr 2017 - 1:07 pm | गॅरी ट्रुमन

बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते विनोद खन्ना यांचे कर्करोगाने वयाच्या ७० व्या वर्षी मुंबईत निधन झाले आहे. ते १९९८, १९९९, २००४ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. ते वाजपेयी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्यांना श्रध्दांजली.

सचु कुळकर्णी's picture

27 Apr 2017 - 6:13 pm | सचु कुळकर्णी

श्रध्दांजली

गॅरी ट्रुमन's picture

26 May 2017 - 9:11 pm | गॅरी ट्रुमन

पंजाबचे माजी पोलिस महानिरीक्षक के.पी.एस गिल (कुंवरप्रतापसिंग गिल) यांचे दिल्लीमध्ये वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. ते १९८८ ते १९९५ या काळात पंजाबच्या पोलिस महानिरीक्षकपदावर होते. पंजाबमध्ये १९९२ मध्ये निवडणुका झाल्यावर बियंतसिंग यांचे काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत आले. मुख्यमंत्री बियंतसिंग यांनी पंजाब पोलिसांना दहशतवाद्यांना संपविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. गिल यांनी त्याचा पुरेपूर वापर केला आणि अनेक दहशतवाद्यांना दयामाया न दाखवता खर्‍या-खोट्या चकमकीत यमसदनी धाडले. पंजाबमध्ये जवळपास एक दशकभर ठसठसणारा दहशतवाद १९९२ मध्ये काही महिन्यात नियंत्रणात आला यामागे दहशतवाद्यांचे कर्दनकाळ असलेल्या के.पी.एस. गिल यांचा वाटा मोठा आहे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

Gill

राघवेंद्र's picture

26 May 2017 - 9:26 pm | राघवेंद्र

गॅरी भाऊ तुमचीच आठवण काढत होतो. पनवेल , भिवंडी आणि मालेगाव मनगरपालिकेचे निकालाबद्दल.

पनवेल मध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळाली आणि बाकी दोन्ही कडे काँग्रेस बहुमतामध्ये आहे.

गॅरी ट्रुमन's picture

26 May 2017 - 9:51 pm | गॅरी ट्रुमन

हो आज जाहिर झालेले महापालिका निवडणुकांचे निकाल पुढीलप्रमाणे:

पनवेल महापालिका
एकूण जागा: ७८
भाजपः ५१
शेकापः २३
काँग्रेसः २
राष्ट्रवादी: २

भिवंडी महापालिका
एकूण जागा: ९०
काँग्रेसः ४७
भाजपः १९
शिवसेना: १२
सपा: २
अपक्ष+इतरः १०

मालेगाव महापालिका
एकूण जागा: ८४
काँग्रेसः २८
राष्ट्रवादी+जनता दल: २६
शिवसेना: १३
भाजपः ९
एम.आय.एमः ७
अपक्षः १

मालेगाव आणि भिवंडी या दोन मुस्लिम वस्ती मोठ्या प्रमाणावर असलेल्या शहरांमध्ये निवडणुका झाल्या. एम.आय.एम ने नांदेडमध्ये यश मिळवले तितके यश या दोन शहरांमध्ये मिळवलेले दिसत नाही ही समाधानाची गोष्ट आहे. त्यातल्या त्यात मालेगावमध्ये थोडे तरी यश मिळाले पण भिवंडीत या पक्षाने किती जागा मिळवल्या हे बघायलाच हवे.

शिवसेनेला मात्र पनवेल आणि भिवंडी या दोन्ही शहरांमध्ये नक्कीच मोठा धक्का बसला आहे. पनवेलमध्ये स्वतः उद्धव ठाकरेंनीही प्रचारसभा घेतली होती. तिथे शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. भिवंडीमध्ये शहरातील दोन पैकी एक आमदार शिवसेनेचा आहे. तरीही शिवसेनेची कामगिरी त्यामानाने झालेली नाही.

काँग्रेससाठी मात्र हे भिवंडी-मालेगावातील निकाल नक्कीच समाधानकारक आहेत.

श्रीगुरुजी's picture

4 Jun 2017 - 10:20 pm | श्रीगुरुजी

http://indianexpress.com/article/lifestyle/life-style/bohra-muslim-women...

हा प्रकार भयंकर आहे.

केवळ गर्हणिय.. परंतु, दाऊदी बोहरा समाजाची पॉवरफुल लॉबी याच्याविरोधात कायदा होऊ देईल असे वाटत नाही. :(

श्रीगुरुजी's picture

5 Jun 2017 - 6:07 pm | श्रीगुरुजी

१-२ वर्षांपूर्वी एका बोहरा मुलीने या विकृत व अमानवी प्रकाराविरूद्ध ऑनलाईन याचिका काढली होती. परंतु त्याचे पुढे काय झाले ते समजले नाही. वरील लेखावरून असं दिसतंय की नवीन पिढीतील काही मुलींना तरी या प्रकाराचा संताप आलेला आहे व निदान आपल्या कुटुंबात तरी हा प्रकार ते सुरू ठेवणार नाहीत. भारतातील बोहरी लोकांप्रमाणे आफ्रिकेतील सुदानमध्ये सुद्धा हाच प्रकार चालतो. एका सुदानी लेखिनेने लिहिलेल्या ब्लास्फेमी या पुस्तकात याचे सविस्तर वर्णन आहे.

महिलांवर होणार्‍या अन्यायाविरूद्ध आंदोलने करणार्‍या तृप्ती देसाई, मुक्ता दाभोळकर, विद्या बाळ इ. समाजसेविकांनी शनीमंदिराच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश, हाजी अलीच्या दर्ग्यात महिलांना प्रवेश, शबरीमलाईच्या मंदीरात महिलांना प्रवेश इ. निरर्थक आणि निरूपयोगी विषयांवर हाय प्रोफाईल आंदोलने करण्यापेक्षा अंधश्रद्धेमुळे बोहरी मुलींवर होणार्‍या या अनैसर्गिक क्रूर अत्याचाराविरूद्ध आंदोलने करणे आवश्यक आहे.

खरे आहे. शनीमंदीर, शबरीमाला, हाजीअली ही आंदोलने निरर्थक वाटत नाहीत(कारण मुलभुत अधिकारांचा मुद्दा). पण या प्रथेविरूद्ध मुस्लिम महिलांमध्ये जागृती करणे, जनमत संघटीत करणे आवश्यक आहे.

गॅरी ट्रुमन's picture

5 Jun 2017 - 11:34 am | गॅरी ट्रुमन

एन.डी.टी.व्ही चे संस्थापक प्रणॉय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांच्या दिल्ली आणि देहरादूनमधील घरांवर सी.बी.आय ने धाडी घातल्या आहेत. आय.सी.आय.सी.आय बँकेला ४८ कोटी रूपयांचे नुकसान केल्याच्या प्रकरणावरून या धाडी घालण्यात आल्या आहेत असे वृत्त आहे.

आता परत एकदा अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विरोधकांची मुस्कटदाबी वगैरे ओरड सुरू व्हायची शक्यता आहे. या सगळ्यांची मोडस ऑपरेन्डी ठरलेली आहे. मोदी सरकारवर टिका केली की काहीही बेकायदा कृत्ये करायला हे मोकळे आहेत असे यांना वाटते. कारण त्या बेकायदा कृत्यांविषयी सरकारने बडगा हाणला तरी मग "आम्ही सरकारविरोधी भूमिका घेत आहोत म्हणून सूड बुद्धीने सरकार कारवाई करत आहे" अशी उलटी ओरड करायला हे मोकळे असतात. एन.डी.टी.व्ही हिंदीवर मागच्या वर्षी एक दिवसाची बंदी आणायचे प्रकरण चालू होते तेव्हा आणि इतर अनेकदा हा प्रकार बघायला मिळाला आहे. एक पत्रकार म्हणून (किंबहुना एक भारतीय नागरीक म्हणून) सरकारवर टिका करायचा अधिकार असला तरी बेकायदा कृत्ये करायचा अधिकार कोणालाही नाही हे या विचारवंतांना कोण समजावणार?

पुंबा's picture

5 Jun 2017 - 4:10 pm | पुंबा

'भ्रष्ट असूनसुद्धा धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्याआड काळे कारनामे करायला मोकळे' ही परिस्थिती बदलल्याबद्दल सरकारचे अभिनंदन.

श्रीगुरुजी's picture

5 Jun 2017 - 8:55 pm | श्रीगुरुजी

हा उघडउघड माध्यमस्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे. आपल्याविरूद्ध बोलणार्‍यांचा आवाज दडपण्याचाच हा प्रकार आहे. या सरकारच्या काळात असहिष्णुता कळसाला पोहोचलेली आहे याचेच हे निदर्शक आहे.

प्रणॉय रॉय बाकी कसेही असले (म्हणजे कर्जबुडवे वगैरे) तरी ते निधर्मी, सहिष्णुतावादी, पुरोगामी वगैरे आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील या कारवाईचा सर्वत्र निषेधच व्हायला हवा.

गामा पैलवान's picture

5 Jun 2017 - 10:01 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

प्रणय जेम्स रॉय यांच्यावर घातलेल्या धाडींचा माझ्याकडून तीव्र निषेध. या माणसाला नागडा करून भर चौकात फटकावून काढायला हवा होता. त्याच्यावर चक्क सरकारी धाडी? शासकीय मनुष्यबळ फुकटात मिळतं असं मोदींना वाटतं की काय!

आ.न.,
-गा.पै.

मध्यंतरी काश्मीरमध्ये मेजर गोगोई यांनी एका काश्मीरी माणसाला जीपला बांधून ती जीप मतदानकेंद्रात नेऊन तिथे अडकलेल्या कर्मचार्‍यांची सुटका केली होती. दगडफेक करणारे काश्मीरी लोक लष्कराला अशी कामे करू देत नसत. त्याविरूध्द त्यांनी ही शक्कल लढवली आणि त्या काश्मीरी माणसाला 'ह्युमन शील्ड' म्हणून वापरले. भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी त्याबद्दल मेजर गोगोईंचे जाहिरपणे कौतुक केले आणि म्हटले की काश्मीरातील युध्द हे पारंपारीक युध्द नाही त्यामुळे अशा युध्दाला उत्तर म्हणून असे काहीतरी वेगळे मार्ग अवलंबायला हवेत. त्याविरूध्द न्यू यॉर्कमधील कोलंबिया युनिव्हर्सिटीचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक पार्थ चॅटर्जी यांनी https://thewire.in/142901/general-dyer-indian-army-kashmir/ हा लेख लिहून एका अर्थी लष्करप्रमुखांची तुलना जालियॉवाला बाग हत्याकांडप्रकरणातील जनरल डायरशी केली!!

एक गोष्ट कळत नाही. या पार्थ चॅटर्जींनी एक पुस्तक लिहून राष्ट्रवादाविरूध्दही गरळ ओकली आहे. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टरमधून पी.एच.डी केले आहे. शिकॅगो, रॉचेस्टर, कार्नेगी मेलॉन इत्यादी पारंपारीक उजवी विद्यापीठे आहेत (फ्रेशवॉटर) तर हार्वर्ड, बर्केले, येल, कोलंबिया इत्यादी पारंपारीक डावी विद्यापीठे आहेत (सॉल्टवॉटर). एका उजव्या विद्यापीठातून पी.एच.डी केलेला मनुष्य डाव्या बाजूच्या विद्यापीठात प्राध्यापक बनतो आणि राष्ट्रवादाविरूध्द गरळ ओकतो!! फ्रेशवॉटर आणि सॉल्टवॉटर हा फरक अर्थशास्त्र विभागात तर असतो तितक्या प्रमाणात राज्यशात्र विभागात नसावा. अथवा कोलंबियामध्ये जगदीश भगवती हे उजवे प्राध्यापक आहेत त्याप्रमाणे रॉचेस्टरमधून पी.एच.डी करणारे पार्थ चॅटर्जी असे काही अपवाद असावेत.

गामा पैलवान's picture

5 Jun 2017 - 10:04 pm | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

इंग्लंडअमेरिकेतल्या विद्यापीठांतले दावे आणि उजवे विचारवंत हे विभाजन फक्त आम जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी पैदा केलेलं आहे. उडदामाजी काळे गोरे कोणी निवडायचे!

आ.न.,
-गा.पै.

ऑस्टेलियातील क्विन्सलंड राज्यातील ब्रिस्बेनपासून ४०० किलोमीटर अंतरावरील गॅलीली बेसिन येथील अडानींचा Carmichael प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे . कोळशाची खाण विकसित करणे, त्या खाणीतून काढलेला कोळसा वाहून नेण्यासाठी बंदर विकसित करणे आणि खाणीतला कोळसा त्या बंदरापर्यंत नेण्यासाठी रेल्वेमार्ग विकसित करणे असा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे ऑस्ट्रेलियातील प्रसिध्द 'ग्रेट बॅरीअर रीफ' ला धोका उत्पन्न होईल म्हणून त्याविरूध्द बरेच आक्षेप होते.पण ऑस्ट्रेलियातील पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पाला पाहिजे ते क्लिअरन्सेस ऑक्टोबर २०१५ मध्ये दिले.

मोदींच्या नोव्हेंबर २०१४ च्या ऑस्ट्रेलिया भेटीदरम्यान गौतम अडानीही तिथे होते आणि स्टेट बँकेच्या चेअरपर्सन अरूंधती भट्टाचार्यही तिथे होत्या. तसेच या प्रकल्पासाठी त्यावेळीच स्टेट बँकेने १ बिलिअन डॉलर कर्ज द्यायचे In-Principle Approval दिल्यानंतर भारतात अपेक्षेप्रमाणे गदारोळ उठलाही होता. हे कर्जाचे सॅन्क्शन नाही तर केवळ In-Principle Approval आहे आणि कर्जाचे प्रपोजल हातात घेण्यापूर्वी अनेक अटींची पूर्तता होणे गरजेचे होते आणि समजा कर्ज मान्य केले गेले असते तरी प्रत्यक्ष कर्जाची रक्कम दिली जाण्यापूर्वीही इतर अनेक अटींची पूर्तता करणे गरजेचे होते वगैरे गोष्टी या मंडळींनी अपेक्षेप्रमाणे लक्षात घेतल्या नाहीत आणि जणूकाही अडानीच्या घशात एक बिलिअन डॉलर घातले आहेतच अशा प्रकारचा अपप्रचार सुरूही झाला होता. वास्तविकपणे स्टेट बँक ज्या अटी घालणार होती त्या अटी खूपच कडक होत्या आणि या अटींची बातमी खरी असती तर एक बँकर म्हणून मला तरी त्यात काहीही चुकीचे वाटलेले नव्हते. पण अपप्रचार करायला काहीही मुद्दे पुरतातच. पुढे स्टेट बँकेने या प्रकल्पाला कर्ज द्यायला नकार दिल्यावर मात्र सगळे गदारोळ उठविणारे सोयीस्करपणे नाहिसे झाले होते.

संदीप डांगे's picture

6 Jun 2017 - 4:19 pm | संदीप डांगे

ट्रुमन, एक बँकर म्हणून खाजगी बँकेचे कर्ज असलेल्या खाजगी संस्थेवर सीबीआय कशी व कोणत्या हक्काने रेड मारू शकते ते स्पष्ट कराल काय? हे नक्की प्रकरण काय आहे ते एक बँकर म्हणून उलगडून सांगू शकाल काय?

अनुप ढेरे's picture

6 Jun 2017 - 4:49 pm | अनुप ढेरे

खासगी बँकादेखील भ्रष्टाचारविरोधि कायद्याच्या खाली येतात. गेल्यावर्षीपासुन.
हे वाचा.

http://www.livemint.com/Politics/MKctYIa9P95XHGKmo2UGwN/Chairperson-of-p...

अनुप ढेरे's picture

6 Jun 2017 - 4:52 pm | अनुप ढेरे
गॅरी ट्रुमन's picture

6 Jun 2017 - 7:45 pm | गॅरी ट्रुमन

प्रतिसाद लिहायला घेतला होता पण मध्यंतरी काही काळ मिपा गलपाटल्यामुळे माझा प्रतिसादही गलपाटला. नशीबाने याविषयी कितीतरी अधिक मुद्देसूदपणे शेफाली वैद्य यांनी http://mahamtb.com/Encyc/2017/6/6/Bhomika-on-raids-on-NDTV-and-Liberals-... या लेखात लिहिले आहे. आणि जर शेफाली वैद्य हे नाव ऐकून तो लेख एकांगी असेल असे वाटत असेल तर http://www.newindianexpress.com/opinions/columns/s-gurumurthy/2017/jun/0... हा लेख तर नक्कीच आवडेल.

श्रीगुरुजी's picture

6 Jun 2017 - 9:39 pm | श्रीगुरुजी

घटनाक्रम -

१) मागील आठवड्यात राज्य सरकारने लवासाचा विशेष दर्जा रद्द केला.

२) त्याच दिवशी काही वेळाने "शेतकऱ्यांच्या संपाबद्दल चर्चा" करण्यासाठी पवार फडणविसांना भेटले.

वरील २ घटना लागोपाठ घडल्या हा योगायोग आहे.

३) अंमलबजावणी संचनालयाने सिंचन घोटाळ्याची कागदपत्रे मागविल्याची बातमी काल प्रसिद्ध झाली.

४) आज पवारांनी दिल्लीत मोदींची भेट घेऊन "शेतकऱ्यांच्या संपाविषयी" चर्चा केली.

या २ घटना लागोपाठ घडल्या हा सुद्धा योगायोगच आहे.

शेतकर्‍यांचा संप १ जुन ला चालू होणार हे बरेच पूर्वीपासून माहिती होते. इथे मिपावर पण विशुमीतसाहेब चिमणरावांच्या धोतरात हात घालायला निघाले होते त्यावेळीपण हा रेफरन्स आला होता.

वरचे योगायोग नसावेत.

विशुमित's picture

9 Jun 2017 - 5:36 pm | विशुमित

चुकलेल्या शब्दाचा/म्हणीचा (धोतरास हात घालणे) लगेच प्रतिसाद देऊन खुलासा करून सुद्धा मोदक नामक मिपा सदस्य व्यक्तिगत पातळीवर उतरून वेळोवेळी हीन दर्जाची टिपणी करत आहेत.
रेफेरेंस देऊ शकले असते, त्यांच्यासाठी अवघड नव्हते ते.

कृपया आपण लक्ष्य घालावे आणि त्यांना योग्य ती समज द्यावी.

http://www.misalpav.com/comment/929940#comment-929940

स्वतःबद्दल इतके संवेदनशील असाल तर माझ्यावरही व्यक्तीगत पातळीवर उतरून कमेंट्स करताना (उदा. ट्रोल) असाच विचार केला असता तरी चालले असते.

राष्ट्रपतीपदासाठी निवडणुक १७ जुलै रोजी होणार असून मतमोजणी २० जुलै रोजी होणार आहे असे निवडणुक आयोगाने जाहिर केले आहे. नव्या राष्ट्रपतींचा कार्यकाल २५ जुलै पासून सुरू होईल.

२०१२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी लिहिलेल्या माझ्याच ३ धाग्यांची जाहिरात या निमित्ताने करतो:

१. http://www.misalpav.com/node/22057
२. http://www.misalpav.com/node/22215
३. http://www.misalpav.com/node/22275

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2017 - 5:59 pm | श्रीगुरुजी

राष्ट्रपतीपदाचा विरोधी पक्षांचा उमेदवार निवडण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एक समिती नेमण्यात आली असून त्या समितीच्या अध्यक्षपदी पवारांना बसविले आहे. त्या समितीत गुलाम नबी आझाद, शरद यादव, ममता, येचुरी असे तगडे नेते सुद्धा आहेत. आता येचुरी आणि ममता हे अहिनकुल समितीच्या बैठकीत मांडीला मांडी लावून बसतील का हा प्रश्नच आहे.

असो. २०१४ पासून केंद्रातील, राज्यातील, सर्व महापालिकातील सत्ता गमावल्याने व नंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळातून सुद्धा पायउतार व्हावे लागल्याने पवारांनी सर्व पदे व सत्ता गमाविली. त्यामुळे ते खूपच अस्वस्थ झाले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने "राष्ट्रपतीपदाचा विरोधी पक्षांचा उमेदवार निवडण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्षपद" हे अत्यंत महत्त्वाचे पद मिळाल्याने पवार पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले असून किंगमेकरच्या भूमिकेत शिरले आहेत. एक मराठी माणूस देशाचा राष्ट्रपती कोण होणार हे ठरविणार ही सर्व मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पवार शेवटी या पदासाठी स्वतःचेच नाव समितीतील इतरांकडून जाहीर करायला लावतील का?

आज राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला अन आजच हे अध्यक्ष मोदींना भेटले हाही योगायोगच!
तिथे बसून ते इतरांच्या उमेदवारीत खो घालतील हे नक्की. गेलाबाजार उपराष्ट्रपती तरी होता येईल का? वगैरे..

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2017 - 6:17 pm | श्रीगुरुजी

काहीही काय बोलताय? त्यांना शेतकर्‍यांच्या सर्व समस्यांची खडानखडा माहिती आहे. ते जरी कधीही अर्थमंत्री नव्हते तरी देशातील सर्व शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा निर्णय, शेतकर्‍यांना ४% इतक्या कमी व्याजाने कर्ज इ. आर्थिक निर्णय चिदंबरम/प्रणव मुखर्जी यांच्याऐवजी तेच घेत होते. ते राष्ट्रपतीपद, लवासा, सिंचन घोटाळ्याची चौकशी इ. साठी मोदींना भेटले नसून ते फक्त शेतकर्‍यांच्या प्रश्नाविषयीच मोदींना भेटले होते.

लोकहो,

उद्या इथे ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. ब्रेक्झिटसाठी ठोसपणे काम करता येत नाही म्हणून तेरेसा मे यांनी निवडणुका जाहीर केल्या. मात्र नागरिकांत तितकासा उत्साह दिसंत नाही. ब्रेक्झिट ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मग निवडणुका कशासाठी, असा काहीसा सूर आहे. शिवाय अवघ्या दोनच वर्षांत परत निवडणुका होत असल्याने नेमिची येतो पावसाळा अशी परिस्थिती आहे.

काही निरीक्षणे :

१. मजूर पक्षाचा प्रमुख जेरेमी कॉर्बिन राणीचा लाडका आहे.

२. मागील निवडणुकीच्या वेळेस स्वातंत्र्यपक्षास (युके इंडीपेंडंट पार्टी) १२% मतं मिळालेली होती. मात्र ही मतं देशभर सर्वत्र विखुरलेली असल्याने केवळ १ जागा मिळालेली होती. या खेपेस त्याचा फारसा बोलबाला नाही. या मतगठ्ठ्यावर हुजूर व मजूर हे दोन प्रमुख पक्ष टपून बसले आहेत.

३. या घटकेस हुजूर पक्षाची बाजू बळकट दिसते आहे.

असो.

बघूया उद्या काय होतं ते.

आ.न.,
-गा.पै.

गापै, कॉर्बीन तर मॉनार्की हटवावी असे म्हणतो ना? की उपरोधाने म्हणताय?

गॅरी ट्रुमन's picture

8 Jun 2017 - 12:11 pm | गॅरी ट्रुमन

जनमतचाचण्या थेरेसा मेंच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला जेरेमी कॉर्बिन यांच्या लेबर पक्षापेक्षा पुढे दाखवत आहेत. २०१५ मध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला मिळाले होते त्यापेक्षा जास्त मोठे बहुमत यावेळी मिळेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. जेरेमी कॉर्बिन या पुरोगामी उदारमतवाद्याचा पराभव होणार असेल तर ती नक्कीच चांगली गोष्ट होईल. सध्याच्या जगात पुरोगामी उदारमतवादीपणा सगळ्यांनाच कधीनाकधी गोत्यात आणणार आहे.

या निवडणुका जिंकून थेरेसा मे दुसर्‍या मार्गारेट थॅचर बनाव्यात हीच इच्छा. १९८० च्या दशकात ब्रिटनमध्ये मार्गारेट थॅचर आणि अमेरिकेत रॉनाल्ड रेगन हे उजवे सत्तेत होते आणि दोघांचे चांगले जमायचेही. कदाचित थेरेसा मे दुसर्‍या थॅचर बनू शकल्या तरी बट अलास... ट्रम्प दुसरे रेगन बनणे अजिबात शक्य वाटत नाही आणि सध्या ज्या पध्दतीने घडामोडी चालल्या आहेत तशाच चालू राहिल्या तर २०२० मध्ये ट्रम्प परत जिंकणेही कठिणच आहे.

असो मतमोजणी सुरू व्हायची आतुरतेने वाट बघत आहे.

पुंबा's picture

9 Jun 2017 - 9:45 am | पुंबा

ब्रितनमधील इस्लामी मुलतत्ववादाचा पराभव करण्यासाठी मेबाई योग्य ठरतील का? सध्या जी दहशत सामान्य ब्रिटिश माणसाच्या मनात आहे(?), ती दुर करणे त्यांना जमेल असे वाटते का तुम्हाला?

गॅरी ट्रुमन's picture

9 Jun 2017 - 10:00 am | गॅरी ट्रुमन

ब्रितनमधील इस्लामी मुलतत्ववादाचा पराभव करण्यासाठी मेबाई योग्य ठरतील का?

त्यासाठीच जेरेमी कॉर्बिन या उदारमतवादी पुरोगाम्यापेक्षा थेरेसा मे अधिक योग्य ठरतील असे वाटत आहे* . अर्थातच युरोपमधील भळभळत्या हृदयांपैकी कोणीही पाहिजे तितका कडकपणा दाखवू शकेल असे वाटत नाही. पण उदारमतवादी लोक आहेत त्या परिस्थितीचा आणखी आणि जास्त लवकर विचका करतील त्यामुळे उदारमतवादी लोक नकोतच.

*: आपल्या डॉनल्डतात्या ट्रम्पविषयीही सुरवातीला असेच वाटत होते. पण सौदी परराष्ट्रमंत्र्याबरोबरच्या भेटीनंतर ट्रम्पतात्यांनी सिरियातील आयसिसवर हल्ला करण्याऐवजी आयसिसवर हल्ला करायच्या लॉन्चपॅडवरच हल्ला केला. जगदंब जगदंब. तेव्हा या थेरेसा मे खरोखरच कॉर्बिनपेक्षा कडक आहेत की नुसता दिखावा आहे हे पण माहित नाही. अर्थात या सगळ्या गोष्टी आता बोलूनही फार उपयोग होईल असे वाटत नाही. कारण टोरीजना बहुमत मिळवायला अपयश आले तर टेरेसा मेंच्या जागी दुसरा कोणी (बोरीस जॉन्सन इत्यादी) पंतप्रधान व्हायची शक्यता आहेच. काय होते ते बघूच.

गणवेशातील पोलीस अधिकाऱ्याने कडक सलाम ठोकला की आपल्याला खूप आनंद होतो, अशी टिपणी पंकजा मुंडे यांनी या वेळी केली. आपल्याला लाल दिव्याचेही आकर्षण नाही. काही गोष्टी आवडतात, त्याचे कारण माहिती नसते. मंत्री झाल्यानंतर जेव्हा पोलीस आपल्यासमोर यायचे आणि कडक सलाम ठोकायचे, त्याचा आपल्याला खूप आनंद व्हायचा, असे त्या म्हणाल्या.

http://www.loksatta.com/pune-news/opposition-in-maharashtra-pankaja-mund...

काय बावळट विधान आहे!

हा माज आहे. पण राष्ट्रप्रेमी माज. त्यांना सगळं माफ असतंय.

गामा पैलवान's picture

8 Jun 2017 - 6:41 pm | गामा पैलवान

सौरा,

गापै, कॉर्बीन तर मॉनार्की हटवावी असे म्हणतो ना? की उपरोधाने म्हणताय?

अर्थात कॉर्बिन हा राणीचा आवडता आहे असं म्हणण्यापेक्षा तिला मान्य आहे असं म्हणेन. अगोदर मिलीब्यांड होता तो आजूनंच भयानक होता. त्यापेक्षा कॉर्बिन खूपंच बरा आहे.

राणी हटाव मोहीम अधूनमधून चाललेली असतेच. कोणी लक्ष देत नाही. कॉर्बिन राणीस मान्य आहे कारण तो स्वतंत्र मताचा नाही. तो मजूरपक्षाचा इयन डंकन-स्मिथ आहे.

आ.न.,
-गा.पै.

पुंबा's picture

9 Jun 2017 - 9:43 am | पुंबा

धन्यवाद गापै..

अत्रे's picture

9 Jun 2017 - 7:36 am | अत्रे

http://abpmajha.abplive.in/blog/bhakti-bisure-blog-on-tukaram-mundhe

शेवटी एफआयआर करुन रात्री साडेअकरा वाजता दोघं घरी पोचलो. कॉफी प्यायला थांबलो, मित्र भेटलेत म्हणत घरी थोपवलं होतं सगळ्यांना. त्यांना सगळी स्टोरी सांगेपर्यंत मुंढे सरांकडून मेसेज होता He has been suspended.

खरं तर कुणाची नोकरी जावी असं त्या ही दिवशी वाटत नव्हतं. आजही वाटत नाही. पण त्या ड्रायव्हरचा अॅटिट्यूड आणि आपल्याला कुणीच काही करु शकत नाही हा माज प्रचंड खटकला होता मला

"नोकरी जाणे" आणि "सस्पेन्शन" मधे काय फरक असतो? माझ्या मते सस्पेन्शन म्हणजे काही महिन्यांसाठी बिनपगारी घरी बसने आणि नंतर परत रुजू होणे.

अभिजीत अवलिया's picture

9 Jun 2017 - 9:18 am | अभिजीत अवलिया

स्वप्नात येणाऱ्या शिवलिंगाच्या शोधार्थ तेलंगणा मध्ये एका मुर्खाने हैदराबाद वारंगल राष्ट्रीय महामार्ग १५ फूट खोल खणला. मूर्खपणाचा कळस आहे हा अक्षरश:

http://www.hindustantimes.com/india-news/telangana-scavenger-held-for-di...

रस्ता दुरुस्त करण्याची पै न पै या सगळ्या गावकर्‍यांकडून, त्याला मदत करणार्‍या सरपंच वगैरे लोकांकडून आणि ह्या ये***कडून वसूल केली पाहिजे. असलं काही करण्याची हिंमत यानंतर होता कामा नये.

श्रीगुरुजी's picture

9 Jun 2017 - 3:09 pm | श्रीगुरुजी

हा मूर्खपणा भारतात नवीन नाही. २०१३ मध्ये उ. प्र. मध्ये शोभन सरकार नावाच्या एका साधूने जाहीर केले की उ. प्र. मधील उन्नाओ नावाच्या किल्यात जमिनीत हजारो टन सोने पुरून ठेवले आहे असे त्याला स्वप्नात दिसले. त्याच्या बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवून भारतीय पुरातत्व खात्याने तिथे तब्बल महिनाभर खोदकाम केले. परंतु त्यांना तिथे १ रूपया सुद्धा सापडला नाही. खोदकामाची मजुरी, कष्ट, वेळ इ. सर्व वाया जाऊन जगभर भारताचे हसे झाले ते वेगळेच.

ASI hits dead end, stops excavation for gold in Unnao

गॅरी ट्रुमन's picture

9 Jun 2017 - 10:38 am | गॅरी ट्रुमन

ब्रिटनमधील निवडणुकांचे निकाल जवळपास आले आहेत. ६५० पैकी ६३६ जागांवर मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यात पंतप्रधान थेरेसा मे यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला ३१० तर जेरेमी कॉर्बिन यांच्या लेबर पक्षाला २५८ जागा मिळाल्या आहेत. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला बहुमतापेक्षा थोड्या जागा कमी पडतील असे दिसत आहे.

मागच्या वर्षी लोकांनी सार्वमतात युरोपिअन युनियनमधून बाहेर पडायचा कौल दिला. असा कौल लोकांनी देऊ नये असे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरन यांनी जाहिर आव्हान केले होते. पण प्रत्यक्षात तसा कौल आल्यामुळे लोकांनी पंतप्रधानांच्या भूमिकेला नाकारले असा सरळसरळ अर्थ झाला त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि थेरेसा मे पंतप्रधान झाल्या. अन्यथा कॅमेरनचा व्यवस्थित कारभार चालू होता पण या कारणामुळे त्यांना जावे लागले.आताही हाऊस ऑफ कॉमन्सची मुदत २०२० पर्यंत होती त्यामुळे २०१७ मध्ये निवडणुका घेतल्याच पाहिजेत असे काही बंधन नव्हते. पण थेरेसा मे यांनी निवडणुका जाहिर केल्या. वास्तविकपणे मुदतीपूर्वी निवडणुका घेतल्या तर पूर्वी होते त्यापेक्षा जास्त बहुमत मिळावे ही अपेक्षा पंतप्रधानांची असणारच. पण तसे होताना दिसत नाही. थेरेसा मे यांचा लवकर निवडणुका घ्यायचा जुगार फसला असे म्हणायचे. लेबर पक्षाला मागच्या वेळेपेक्षा जास्त यश मिळताना दिसत आहे. बी.बी.सी वर बघितले की कॅन्टरबरीसारख्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाने कित्येक दशकात न गमावलेल्या जागा यावेळी गमावलेल्या आहेत. अनेक जागांवर लेबर पक्षाने मागच्या वेळेपेक्षा बरीच जास्त मते मिळवली आहेत.

इतर पक्षांच्या पाठिंब्यावर कदाचित कॉन्हर्व्हेटिव्ह पक्ष सरकार स्थापन करेल. पण त्या सरकारच्या पंतप्रधानपदावर थेरेसा मे असतीलच असे नाही. कदाचित दुसर्‍या नेत्याच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होईल. फेब्रुवारी १९७४ मध्ये लेबर पक्षाला ३०१ आणि कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला २९७ जागा होत्या आणि लेबर पक्षाचे हॅरॉल्ड विल्सन अल्पमतातल्या सरकारचे पंतप्रधान झाले. पण त्यांना बहुमताअभावी मनाप्रमाणे कारभार करता येईना म्हणून त्यांनी ऑक्टोबर १९७४ मध्ये परत निवडणुका घेतल्या. या निवडणुकांमध्ये लेबर पक्षाला १८ जागा जास्त मिळाल्या आणि निसटते बहुमत मिळाले (६३५ पैकी ३१९) तर कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाने २० जागा गमावल्या. आतापर्यंत एकाच वर्षात दोन निवडणुका झालेले १९७४ हे एकच वर्ष असे आहे. अगदी तशी परिस्थिती यावी इतका कमी फरक यावेळी दोन पक्षांमध्ये नाही.पण थेरेसा मे यांना जे स्थैर्य अपेक्षित होते ते काही मिळेल (किंबहुना परत पंतप्रधानपदच मिळेल) असे काही दिसत नाही.

डेव्हिड कॅमेरन आणि थेरेसा मे हे दोघेही आपल्या कर्माने पंतप्रधानपदावरून दूर झाले/होणार असे दिसते.

गॅरी ट्रुमन's picture

9 Jun 2017 - 10:41 am | गॅरी ट्रुमन

असा कौल लोकांनी देऊ नये असे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरन यांनी जाहिर आव्हान केले होते.

आव्हान नाही आवाहन.

एक बातमी नजरेतून सुटली होती -
http://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/electric-vehicle...

या अनुषंगानेच आणखी एक बातमी वाचलेली आठवते की DRDO ने ईलेक्ट्रीक बस साठी इंजिन बनवले होते/ बनवणार होते आणि त्याचा खर्च बराच कमी होणार होता. पण आता कुठे ती लिंक सापडत नाहीये.

ही घडामोड ताजी नाही त्यामुळे येथून हा प्रतिसाद उडवला तरीही चालेल. पण येथे टाकावीशी वाटली.

आपल्या देशातील थोरीयम रिजर्व्स वर हे दोन लेख आहेत.

हा आपल्या जवळील अमूल्य साठ्याबद्दल सांगतो -
http://www.firstpost.com/world/the-story-of-thorium-a-50000000000000000-...

आणि हा लेख आपल्या देशाच्या दुर्भाग्याबद्दल बोलतो -
http://www.thestatesman.com/opinion/rape-of-thorium-i-49070.html

आधार कार्ड पॅनकार्डाशी संलग्न करायच्या सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे आणि घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत हा निर्णय अंमलात आणू नये असा आदेश दिला आहे.

एकूणच 'ज्युडिशिअल अ‍ॅक्टिव्हिझम' चा हा एक भाग दिसत आहे. कार्यकारी निर्णय घ्यायचा अधिकार सरकारचाच. तिथे न्यायालयाने का नाक खुपसावे? राजकारण्यांना निदान दर पाच वर्षांनी निवडणुकांना सामोरे जायचे असते आणि त्या कारणाने तरी त्यांना लोकांप्रति उत्तरदायी असायलाच लागते. या न्यायाधीशांना असे नक्की कसले उत्तरदायित्व असते? अनेक लोकांनी (बिझनेस क्लासवाल्या) चार-पाच पॅनकार्ड घेतली आहेत आणि थोडे उत्पन्न या पॅनकार्डवर, थोडे त्या पॅनकार्डवर असे करून करचुकवेगिरी केली आहे अशा बातम्या वाचल्याचे आठवते. त्या प्रकाराला चाप लागावा म्हणून सरकारने हे पाऊल उचलले होते. हा निर्णय अंमलात आला नाही तर त्यामुळे जे करसंकलनाचे नुकसान होईल ते सुप्रीम कोर्ट भरून देणार का?

अत्रे's picture

9 Jun 2017 - 3:02 pm | अत्रे

अनेक लोकांनी (बिझनेस क्लासवाल्या) चार-पाच पॅनकार्ड घेतली आहेत आणि थोडे उत्पन्न या पॅनकार्डवर, थोडे त्या पॅनकार्डवर असे करून करचुकवेगिरी केली आहे अशा बातम्या वाचल्याचे आठवते. त्या प्रकाराला चाप लागावा म्हणून सरकारने हे पाऊल उचलले होते.

जे लोक डुप्लिकेट पॅनकार्ड बनवू शकतात ते डुप्लिकेट आधार कार्ड कशावरून नाही बनवू शकणार?

गॅरी ट्रुमन's picture

9 Jun 2017 - 3:36 pm | गॅरी ट्रुमन

हो ना कुठलेही कायदे केले तरी त्यातून पळवाटा निघतातच. म्हणून कुठचेच कायदे करू नका. काय म्हणता?

आहे ती व्यवस्था (पॅन कार्ड) सुधारता येईल का ते सरकारने बघावे.

आधार कार्ड पॅनकार्डाशी संलग्न कर्णे सुधार नाही का?

नाही, पॅन कार्डप्रमाणेच आधार कार्ड सुद्धा डुप्लिकेट बनवता येत असतील तर काहीच फायदा होणार नाही असे वाटते.

जर आधार कार्ड बाकी सर्व आयडी पेक्षा सुपिरिअर असेल तर सरकारने बाकी सर्व आयडी प्रुफ रद्द करून आधार कार्ड कम्पलसरी करावे. पण सरकारचे म्हणणे आहे कि आधार कार्ड कम्पलसरी नाही. यात काँट्रॅडिक्शन नाही का?

काँट्रॅडिक्शन नाही ,

सरकारला, बायोमेट्रीकमुळे आधार कार्ड डुप्लिकेशनची अडचण येईल असे वाटत नाही. डेटा सिक्यूरिटी वर देखील सरकारने सुप्रीम कोर्टात खात्री दिलेली आहे.
माझ्या माहितीप्रमाणे सरकारला आधार कम्पल्सरी करायचे आहे, पण सुप्रीम कोर्ट त्यास नाही म्हणते. याचे मुख्य कारण अजून सर्व लोक आधार खाली आलेले नाहीत.
पॅनकार्ड व आधार कार्ड जोडणी कम्पल्सरी करू शकत नाही याचे कारण देखील हेच आहे की सुप्रीम कोर्ट म्हणते ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही त्यांना देखील टॅक्स व टॅक्सरिटर्न भरता यायला हवा.

इतके असून देखील सरकार आधारकार्ड सगळीकडे कम्पल्सरी करण्यासाठी आपले म्हणणे पुढे दामटतेच आहे कारण, त्याने सरळ सरळ आर्थिक नुकसान टाळणे शक्य आहे.

खालील लिंक वर कुठे आधार कम्पल्सरी आहे ते सांगितले आहे. त्यातच एके ठिकाणी हे लिहिलेले दिसते -

On March 27, the Supreme Court ordered that the government cannot be stopped from using Aadhaar identification for its non-welfare schemes like opening of bank accounts, filing of tax returns, verification of new and existing mobile phone numbers and user credentials etc. However, it did maintain that the government cannot make Aadhaar mandatory for welfare schemes and it has allowed the government to use it in some schemes, not permitted to be used as a mandatory requirement.

लिंकः http://indianexpress.com/article/what-is/what-is-aadhaar-card-and-where-...

मार्मिक गोडसे's picture

9 Jun 2017 - 5:32 pm | मार्मिक गोडसे

जे लोक डुप्लिकेट पॅनकार्ड बनवू शकतात ते डुप्लिकेट आधार कार्ड कशावरून नाही बनवू शकणार?

biometric मुळे डुप्लिकेट आधार कार्ड बनवणे शक्य नाही.

एक शक्यता - तुम्ही दुसऱ्या कोणा गरीब माणसाचे (ज्याच्याकडे पॅन कार्ड नाही) बायोमेट्रिक वापरून, आधार केंद्र वाल्या माणसाला पैसे देऊन डुप्लिकेट आधार कार्ड बनवू नाही शकणार का?

अजून एक - ही बातमी पहा
http://m.gadgets.ndtv.com/internet/news/aadhaar-applications-with-the-sa...

नया है वह's picture

9 Jun 2017 - 7:00 pm | नया है वह

The case has been registered under relevant sections of the Aadhaar Act and cheating by impersonation

डुप्लिकेट आधार कार्ड बनवल्यास काय होते.

बायोमेट्रिक डुप्लिकेट आधार कार्ड आहे हे सिध्द करता येते.

पहिली शक्यता वाचा माझ्या प्रतिसादातली..

मार्मिक गोडसे's picture

9 Jun 2017 - 7:58 pm | मार्मिक गोडसे

एक शक्यता - तुम्ही दुसऱ्या कोणा गरीब माणसाचे (ज्याच्याकडे पॅन कार्ड नाही) बायोमेट्रिक वापरून, आधार केंद्र वाल्या माणसाला पैसे देऊन डुप्लिकेट आधार कार्ड बनवू नाही शकणार का?

आधार कार्डावर फोटो कोणाचा ठेवणार? उद्या त्या गरीब माणसाने स्वतःचे आधार कार्ड काढले तर ?

जमीन/ फ्लॅट खरेदीविक्रीच्या वेळी त्या गरीब माणसाला बरोबर घेउन जावे लागेल.

आधार कार्डावर फोटो कोणाचा ठेवणार?

डुप्लिकेट पॅन कार्ड वर पण फोटो डुप्लिकेट असतील ना. सेम स्ट्रॅटेजी वापरता येईल.

किंवा थोडा ब्लर असलेला, वेगळा दिसणारा फोटो काढता येईल. पॅन आणि आधार वरचा फोटो एकच असायला हवा अशी सक्ती नाहीए.

जमीन/ फ्लॅट खरेदीविक्रीच्या वेळी त्या गरीब माणसाला बरोबर घेउन जावे लागेल.

हा मुद्दा पटला. त्या गरीब माणसाला आधार कार्डाची गरज वाटल्यास प्रॉब्लेम होईल. पण आधार कार्ड काढणे कम्पल्सरी नाही असे सरकारने म्हटले आहे, म्हणून तो गरीब माणूस दुसरे कोणते आयडी प्रुफ वापरू शकेल.

जमिनीच्या खरेदीच्या वेळी गरीब माणसाला न्यायचे कारण कळले नाही. फोटो आपलाच (पण थोडा वेगळा, ब्लर असलेला) वापरायचा. फक्त बायोमेट्रिक त्याचे वापरायचे.

जी गोष्ट सरकार फुकट करत आहे ती सुद्धा कंपल्सरी करता येत नाही ?

आधार कार्ड काढणे कम्पल्सरी नाही असे ह्या अगोदरच्या सरकारचे धोरण असावे !

पण डुप्लिकेट आधार कार्ड काढणे बायोमेट्रीक मुळे कठीण होत असेल तर सर्व पॅन कार्ड रद्द करुन सरळ आधार कार्डलाच कायदेशीर बनवायला पाहीजे !!

जमिनीच्या तसेच महत्वाच्या व्यवहारात आधार कार्ड कंपलसरी करावेच, त्या बरोबर त्या ठीकाणी बायो मेट्रीक / आय स्कॅन सारख्या टेस्ट लावुन आधार कार्ड
वरील बा यो मेट्रीक डेटा क्रॉस चेक करावा म्हणजे कोणी डुप्लिकेट आधार कार्ड वापरुन फायदा घेऊ शकणार नाही.

टाटा मोटर्सने कंपनीतील सर्व पदे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्युनियर इंजिनियर पासून ते प्लांट मॅनेजर पर्यंत सर्व जण फक्त कर्मचारी असतील. कोणीही बॉस नसेल, असे चित्र दिसत आहे. पण मग रिपोर्टिंग कोणी कोणाला करायचे, उत्तरदायित्व कसे असेल, हे अजून स्पष्ट नाही. मात्र प्रत्येक विभागाचा, शाखेचा, प्लांटचा एक 'हेड' असू शकतो, ज्याच्याकडे त्या विभागाची जबाबदारी असेल. व्हिजिटिंग कार्डवर पदाऐवजी विभागाची माहिती असेल. उदा ‘Sales – Medium and Heavy Commercial Vehicles’.

याचे टाटा मोटर्स च्या कारभारावर, तसेच जर टाटापासून प्रेरणा घेऊन इतरांनी असं केल्यास एकूणच औद्योगिक जगावर काय परिणाम होतो, ते पाहणं रोचक असेल.
जगात असे निर्णय घेतले गेल्याची उदाहरणे असली, तरी भारतात बहुधा हे पहिल्यांदाच झाले असावे.

गॅरी ट्रुमन's picture

13 Jun 2017 - 2:23 pm | गॅरी ट्रुमन

गोव्यातील पंचायत निवडणुकांचे निकाल आले आहेत. गोव्यातील पंचायत निवडणुका पक्षपातळीवर लढविल्या जात नाहीत तर विविध अपक्ष/स्थानिक आघाड्यांना विविध पक्ष स्थानिक पातळीवर पाठिंबा देतात. त्यामुळे हे निकाल आले असले तरी त्यातून नक्की काय परिणाम होईल हे समजायला मार्ग नाही.

एकूणच गोव्यात मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन झाल्यानंतर मनोहर पर्रीकर 'स्टिकी विकेट' वर आहेत अशा बातम्या आहेत. एक तर पर्रीकरांचे सरकार म्हणजे भाजप, म.गो.पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्ष यांचे कडबोळे आहे. त्यातही स्वतः पर्रीकरांबरोबर फ्रान्सिस डिसूझा आणि पांडुरंग मडकईकर हे दोनच मंत्री भाजपचे आहेत. तर इतर ७ मंत्री एकतर म.गो.पक्ष किंवा गोवा फॉरवर्ड पक्षाचे आहेत नाहीतर अपक्ष आहेत. त्यामुळे पर्रीकरांना मनाप्रमाणे काम करता येत नाहीये अशा बातम्या आहेत. तसेच गोव्यातील खाणकामात राजकारण्यांचे गुंतलेले हितसंबंध लक्षात घेता त्या अवैध खाणकामाविरूध्द त्यांना फार काही करता येत नाहीये. खाणीतून काढलेली लोखंडाची भुकटी (ओर) वाहून नेण्यासाठी गोव्यातील मुरगाव बंदरात जेटी बांधण्यात येत आहे. त्या जेटीचा उपयोग जिंदल स्टीलसारख्या कंपन्या करणार आहेत. त्याला स्थानिकांचा विरोध आहे कारण वार्‍याबरोबर उडून हे धातूचे कण इकडेतिकडे उडून डोकेदुखी होत आहे. पण मुरगाव बंदराचा औद्योगिक कामांसाठी विकास करण्यात नितीन गडकरींनी पुढाकार घेतला आहे. ४० पैकी १२ जागाच मिळूनही पर्रीकरांचे सरकार गोव्यात स्थापन करण्यात नितीन गडकरींची मोठी भूमिका होती. त्यामुळे पर्रीकरांचा स्वतः त्या जेटीला विरोध असला तरी त्यांना गप्प राहावे लागत आहे. एकूणच इंदिरा गांधी त्यांच्या दुसर्‍या टर्ममध्ये १९८० ते १९८४) मध्ये शेवटचे काही महिने सोडता बर्‍यापैकी निष्प्रभ झाल्या होत्या आणि त्यांना पूर्वीच्या जोमाने काम करता येत नव्हते तसे काहीसे पर्रीकरांचे झाले आहे अशा बातम्या आहेत. या पार्श्वभूमीवर या पंचायत निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपसमर्थक उमेदवारांचा किती ठिकाणी विजय झाला आहे हे समजायला मार्ग नाही. पण पर्रीकरांची परीक्षा नक्कीच या निवडणुकांनी बघितलेली असणार.

विश्वजीत राणेंना भाजपात घेतले आहे. ते स्वतःची वाळपोई ही विधानसभेतील जागा पर्रीकरांसाठी सोडणार की अन्य कुठल्या भाजप आमदाराला राजीनामा द्यायला सांगून तिथे पर्रीकर पोटनिवडणुक लढविणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. की राष्ट्रपतीपदाची निवडणुक झाल्यानंतर परत एकदा पर्रीकर दिल्लीला जाणार? एकूणच सगळ्याचा विचका होताना दिसत आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Jun 2017 - 2:37 pm | श्रीगुरुजी

माझे पूर्वीचेच मत आजही कायम आहे. ४० पैकी फक्त १३ जागा मिळून दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भाजपने कडबोळे स्थापन करून सत्ता स्थापन न करता विरोधातच बसायला हवे होते. सत्तेसाठी केंद्रातून पर्रिकरांना परत राज्यात आणणे हा चुकीचा निर्णय होता. बहुमत नसताना सत्ता स्थापन करणे व पर्रिकरांना परत गोव्यात आणणे या दोन चुका भाजपने केल्या आहेत.

अभिजीत अवलिया's picture

13 Jun 2017 - 2:49 pm | अभिजीत अवलिया

आणि ह्यापेक्षा गोव्याच्या सत्तेपायी झालेली मोठी आणि अक्षम्य चूक म्हणजे संरक्षण खात्याला पूर्ण वेळ मंत्री नसणे.

गॅरी ट्रुमन's picture

14 Jun 2017 - 10:28 am | गॅरी ट्रुमन

लंडनमधील ग्रेनेफेल टॉवर या २७ मजली इमारतीला आग लागली आहे. आग रात्रीच्या वेळी रहिवासी झोपलेले असताना लागलेली असल्यामुळे नुकसान वाढायची शक्यता आहे. या दुर्घटनेचे फोटो पाहता हा बराच मोठा भयंकर प्रकार झालेला दिसतो.

fire1

fire2

परवाच दिल्लीतील उपहार थिएटरमध्ये झालेल्या दुर्घटनेला २० वर्षे पूर्ण झाली त्यावेळी टिव्हीवरील कार्यक्रम बघताना अशी आग लागल्यास त्या आगीला काबूत करता येईल अशी व्यवस्था आपल्याकडे टॉवर्समध्ये आहे का हा प्रश्न मनात आला होता. गेल्या २० वर्षात अशा टॉवर्सची संख्या कितीतरी वाढली आहे. त्यातच आज ही लंडनमधील टॉवरला लागलेल्या आगीची बातमी आली आहे!!

असो. आग लवकरात लवकर काबूत यावी, जिवीतहानी कमितकमी व्हावी आणि जखमींना कमितकमी त्रास होऊन लवकर प्रकृतीस आराम पडावा ही इच्छा.

श्रीगुरुजी's picture

15 Jun 2017 - 2:16 pm | श्रीगुरुजी

काही दिवसांपूर्वी सौदी अरेबिया आणि इतर काही गल्फमधील देशांनी कतारबरोबरचे राजनैतिक संबंध तोडून टाकले. त्यामागे कारण दिले होते--- "कतार हा दहशतवादाला मदत करणारा देश आहे". वास्तविकपणे सौदीने इतर कोणत्याही देशावर "दहशतवादाला मदत करायचा आरोप करणे" म्हणजे विजय मल्ल्याने गावात भट्टीच्या दारूचा धंदा चालविणार्‍याला "तू लोकांना व्यसनी करायच्या धंद्यात आहेस" असे म्हटल्यासारखे झाले.

त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी कतारवरचे निर्बंध उठवा असे आवाहन सौदी आणि इतर देशांना केले तर त्यानंतर काही तासातच अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्डतात्या ट्रम्प यांनी कतार 'सर्वोच्च पातळीवरून' दहशतवादाचे समर्थन करत आहे असा आरोप .

या गोष्टीला आठवडा उलटतो आहे तोच आज अमेरिकेने कतारबरोबर १२ बिलिअन डॉलरचा लढाऊ विमाने विकायचा करार केला आहे अशी आज बातमी आली आहे.

काय चालले आहे हे समजत नाही. यापूर्वीच्या अमेरिकेच्या अध्यक्षांनी इतक्या कमी कालावधीत इतक्या उघडपणे इतक्या प्रमाणावर कोलांट्या उड्या मारल्या नव्हत्या.

एकूणच डॉनल्डतात्या ट्रम्पकडून फार अपेक्षा ठेवलेल्या सगळ्यांचाच जबरदस्त मुखभंग आणि अपेक्षाभंग झाला आहे हे नक्कीच.

गॅरी ट्रुमन's picture

15 Jun 2017 - 5:46 pm | गॅरी ट्रुमन

हा या धाग्यावरील ३०० वा प्रतिसाद आहे. तेव्हा या धाग्यावर यापूर्वी आलेल्या मुद्द्यांवर काही प्रतिसाद द्यायचा असेल तरच तो लिहावा. नवा मुद्दा लिहायचा असेल तर तो नव्या धाग्यात लिहावा ही विनंती.