भटकंतीची बकेट लिस्ट

मोदक's picture
मोदक in भटकंती
22 Apr 2017 - 9:57 am

नमस्कार मंडळी,

आपण सगळे भटके लोकं अनेक ठिकाणे फिरत असतो, नवीन नवीन जागी भेट देण्याचे प्लॅन बनवत असतो आणि ती ठिकाणे फिरून झाली की पुन्हा नवीन ठिकाणांच्या शोधात इंटरनेट धुंडाळत असतो

अनेक ठिकाणे आपल्याला मित्रपरिवार आणि परिचितांकडून कळतात. अनेकदा अवचित एखाद्या ब्लॉगवरून नवीन ठिकाणाचा आपल्याला शोध लागतो आणि आपली must visit ठिकाणांची यादी तयार होत जाते.

तर अशी आपली मिपाकरांची भटकंतीची बकेट लिस्ट तयार करूया का?

माझी आत्ता आठवणारी यादी पुढीलप्रमाणे, बाकीचे नंतर सवडीने टंकतो.

१) श्री शैलम - शिवरायांचे मंदिर.

२) भारत आणि सर्व शेजारी देशांच्या सीमा (अटारी आणि फिरोझपूर झाले आहे, चुशुल व पूर्वोत्तर राज्यांच्या सीमा यादीवर आहेत)

३) अंदमान आणि सेल्युलर जेल

४) लक्षद्वीप (आणि स्नॉर्केलिंग)

५) प्रत्येक राज्यातील विशिष्ट सण शोधून त्या दरम्यान भेट देणे

६) इंडिया गेट - दिल्ली

७) मला एकदा मुंबई ते गोवा किनारपट्टीने प्रवास करायचा आहे (शक्यतो सायकलने)

८) विवेकानंद स्मारक

अशी तुमची यादी काय आहे?

*************
१) भारताबाहेरील ठिकाणे असली तर प्रतिसादातच भारतातील ठिकाणे आणि बाहेरची ठिकाणे असे वर्गीकरण करा

२) एक दोन वाक्यात तेथे भेट देण्याचे विशेष कारण किंवा त्या जागेचे महात्म्य / वैशिष्ट्य काय हे ही टाका

************

प्रतिक्रिया

अरे एका बादलीत कशा मावणार एवढ्या गोष्टी !!!
तरीपण प्रयत्न करते
भारतात -
१) मेघालय
२) सुंदरबन ओडिशा
३) लडाख
४) गोव्यातल्या गर्दी नसलेल्या खेड्यात
५) नर्मदा समोर असेल अशा कुठल्याही ठिकाणी
६) राजस्थानातल्या खेड्यात
७) काश्मीर
अजून वाढेलच ही लिस्ट ....

भारताबाहेर -
१) दक्षिण फ्रांस
२) स्कॉटलंड
३) व्हिएतनाम ला एकदा जाऊन मन भरलं नाही
अजून एकदा जायचंय
४) नॉर्वेत फियोर्ड्स हिवाळ्यात
५) ग्रीस मध्ये संतोरीनी
६) केनियात शेती जास्त असलेल्या भागात

ही न संपणारी लिस्ट आहे

लिस्ट करताना जाणवतंय की एवढं फिरायचं आहे, आपलं आयुष्याचं बकेट पुरेल का ??

अमर विश्वास's picture

22 Apr 2017 - 2:50 pm | अमर विश्वास

मितानजी ..
एक प्रश्न ... नॉर्वेत फियोर्ड्स हिवाळ्यात ? काही खास कारण ? कारण नार्वेत हिवाळ्यातले पिकनिक स्पॉट्स वेगळे आहेत ...

मी उन्हाळ्यात फियोर्ड्स मध्ये गेले आहे
आता तोच अनुभव बर्फ असताना घ्यायचाय म्हणून ..

अमर विश्वास's picture

22 Apr 2017 - 5:34 pm | अमर विश्वास

बर्फ असताना नॉर्वेत अनुभवण्यासारखे बरेच काही आहे ... नॉर्दन लाईट्स हे त्या पैकीच रक ....
नॉर्वेत २ वर्षे राहिल्यामुळे बऱ्याच गोष्टी अनुभवता आल्या .... नॉर्वे / फिनलंड ला हिवाळ्यात जरूर भेट द्या

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2017 - 10:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

४) नॉर्वेत फियोर्ड्स हिवाळ्यात

तेवढेच नाही. नॉर्वेतली हिवाळ्यातली दोन मुख्य आकर्षणे... नॉर्दर्न लाईट्स (ऑरोरा बोरियालिस) आणि किर्केनेसमधील स्नो हॉटेलमध्ये एक रात्र... विसरू नका. इतरही बरेच काही आहे हिवाळ्यात करण्यासारखे. अधिक माहितीसाठी इथे पहा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Apr 2017 - 11:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

भारतामधे:

१. कसोल
२. आसाम अभयारण्यं
३. ताडोबा अभयारण्यं
४. कन्याकुमारी
५. राजस्थानमधला भानघर चा झपाटलेला किल्ला

भारताबाहेरचं म्हणायचं तर

१. जर्मनी आणि स्वीस
२. रशिया
३. आफ्रिकन सफारीज (किलिमांजारो वाली).
४. इजिप्त
५. नॉर्थ किंवा साउथ पोल जस्ट फॉर सेक ऑफ पुशिंग द लिमिट्स

बाकी दोन क्वोट्सः

१. ट्रॅव्हलिंग इझ ओन्ली थिंग यु बाय येट यु बीकम रिच.
२. इफ ट्रॅव्हलिंग वॉज फ्री यु वील नेव्हर सी मी अगेन अँड आय वील नेव्हर स्पेंड टु नाईट्स इन सेम प्लेस.

बाकी वर मितान ताई म्हणतात त्याच्याशी डिट्टो सहमत. सालं पुर्णं आयुष्य खर्चं केलं तरी सगळा भारत पाहुन होणार नाही. जग तर खुप मोठं आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2017 - 10:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

३. आफ्रिकन सफारीज (किलिमांजारो वाली)... याचबरोबर विल्डरबिस्ट मायग्रेशन हा एक रोचक अनुभव आहे.

मी काय म्हणतो डॉक्टरसाहेब,

तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणांची यादी आणि वैशिष्ट्ये द्या म्हणजे बऱ्याच जणांचे कष्ट वाचतील ;)

राघवेंद्र's picture

10 May 2017 - 1:41 am | राघवेंद्र

+१

दशानन's picture

22 Apr 2017 - 3:11 pm | दशानन

एकाच स्वप्न राहिले आहे पाटणीटोप आणि एव्हरेस्ट!
:D

इरसाल कार्टं's picture

22 Apr 2017 - 4:10 pm | इरसाल कार्टं

सध्या एकच, लडाख(शक्य झाल्यास सायकलवर).
तेही यावर्षी नाहीच जमणारे. दोन वर्षांचा वेळ दिलाय स्वतःला.

लडाखवरून जरा पुढे जाऊ की ;)
जर शक्य असेल तर.
प्लान सांगून ठेवा, यायला आवडेल.

मला वाटतं बरेच मिपाकर जमतील.

लडाखवरून जरा पुढे जाऊ की ;)
जर शक्य असेल तर.
प्लान सांगून ठेवा, यायला आवडेल.

आदूबाळ's picture

22 Apr 2017 - 4:50 pm | आदूबाळ

१. बाली
२. मालदीव बेटं
३. बेळगाव

______

४) लक्षद्वीप (आणि स्नॉर्केलिंग)

स्कुबा डायव्हिंगही. मस्त ट्रिप आहे ही, बोटीने चार दिवस. नक्की करणे.

अमर विश्वास's picture

22 Apr 2017 - 5:41 pm | अमर विश्वास

बकेट लिस्ट खुप मोठी आहे .... बकेट कसली ... अख्खे पिंप भरेल ...

पण आत्ता या वर्षीचा प्लॅन / इच्छा :

ऑगस्ट मध्ये (परत एकदा) हिमालय .. .. या वेळी हेमकुंडसाहेब आणि valley of flowers
डिसेंबर मध्ये चद्दर .. फ्रोझन रिव्हर ट्रेक ... बघूया कसे जमतंय ते

भटकीभिंगरी's picture

22 Apr 2017 - 11:04 pm | भटकीभिंगरी

मी ऑगस्टमधे हमतापासला जातेय ..

कायरो म्युझिअम,पिरॅमिड्स ,कंबोडिया,थाइलंड.

भटकीभिंगरी's picture

22 Apr 2017 - 11:02 pm | भटकीभिंगरी

अंटार्टीकाला जायची स्वप्न पडु लागली आहेत ...

भटकीभिंगरी's picture

22 Apr 2017 - 11:02 pm | भटकीभिंगरी

अंटार्टीकाला जायची स्वप्न पडु लागली आहेत ...

कबीरा's picture

23 Apr 2017 - 8:22 am | कबीरा

- डेस्टिनेशन इस नॉट इम्पॉर्टन्ट बट द जर्नी इस
ह्या वाक्याशी पूर्ण सहमत. लाडक्या थंडरबर्ड वरून संपूर्ण भारत अनुभवायचा आहे. बकेट लिस्ट मध्ये हे आपलं एवढच.

बाकी प्रत्येक वेळी भटकंती करून परतताना ती घरची ओढ लागतेच -
** It's very nice to go trav'ling But it's so much nicer, yes it's so much nicer, to come home

१. ट्रान्स-सह्याद्री मारणे
२. पुणे-लेह-पुणे सायकलवरून करणे
३. मेघालयातले लिव्हिंग ब्रिजेस पाहणे
४. डोळ्यांवर पट्टी बांधून कर्वेरस्ता ओलांडणे ;-)

अजून नंतर सांगतो.

आदूबाळ's picture

23 Apr 2017 - 5:20 pm | आदूबाळ

४. डोळ्यांवर पट्टी बांधून कर्वेरस्ता ओलांडणे ;-)

लोल! माझ्या एका मित्राचा 'एकही स्त्रीधक्का न लागता विश्रामबागवाड्यापासून दगडूशेठपर्यंत आरपार जाणे' असा संकल्प आहे. वर्षातून एकदा पहाटे मानाच्या गणपतींना पायी जातो तेव्हाच फक्त पूर्ण होतो संकल्प.

अक्कलकोटी जाऊन यावे म्हणतोय.

दशानन's picture

23 Apr 2017 - 2:38 pm | दशानन

सोबत थोडी घेऊन पण ये =))

स्रुजा's picture

23 Apr 2017 - 6:37 pm | स्रुजा

खुप मोठी लिस्ट आहे , एक आयुष्य पुरतंय की नाही कोण जाणे.

सध्या उत्तर अमेरिकेवर भर आहे म्हणुन आधी तिथपासून सुरु करते

१. अलास्का
२. कनेडियन रॉकीज
३. हॅलिफॅक्स
४. बान्फ
५. अमेरिकेतील नॅशनल पार्क्स - खास करुन यॉसेमिटी आणि येलोस्टोन नॅशनल पार्क
६. ईस्ट आणि वेस्ट कोस्ट - बरेचसे भाग कव्हर करुन झालेत पण सानफ्रान्सिस्को आणि ग्रँड कॅनयन माझं अजुन राहिलंय.

यातले ३ रं यंदा प्लान्ड आहे .. सो एक ठिकाण चेक होईल.

करिबीअन मध्ये:

१. कॅनकुन
२. बहामाज
३. अरुबा

दक्षिण अमेरिका:

१. माचिपिचु ( परु)
२. ब्राझिल

युरोपः ( ही लिस्ट प्राधान्यक्रमाने आहे) - पुढचे २ वर्षं काही युरोपदर्शन करायचा मानस नाही, तेवढ्या वेळात छोट्या मोठ्या सुट्या वापरुन उत्तर आणि दक्षिण अमेरिका शक्य तेवढी संपवायची आहे.

१. इटली - पाँपे आणि इतर
२. स्कॉटलंड
३. आयर्लंड
४. ग्रीस
५. स्पेन
६. टर्की
७. फ्रान्स
८. जर्मनी , स्विस, ऑस्ट्रिया
९. पोर्तुगाल
१०. ईंग्लंड
११. नॉर्वे ( बरीच थंडी आधीच बघुन झालीये )

ऑस्ट्रेलिआ आणि न्युझीलंड

एशिया:

१. जपान
२. श्रीलंका
३. चायना
४. फुकेत आयलंड्स
५. दुबई
६. इंडोनेशिया
७. मालदिव्ज
८. उत्तर भारत , इशान्य भारत

उत्तर आफ्रिका:

१. मॉरिशस

मध्ये अमेझॉन वरुन एक मॅप घेतला होता. हा भिंतीला चिकटवता येतो - बर्‍यापैकी मोठा असतो. स्क्रॅच ट्रॅव्हल मॅप आहे - जिथे जाऊन आला आहात तो भाग स्क्रॅच करायचा आणि जिथे जायचंय तिथे पिन्स लावायच्या. केवड्।अं बघायचं राहिलंय असं खिजवत राहतो तो मॅप ;) पण एक भारी संवाद तुकडा ( कॉन्व्हर्सेशन पीस) आहे तो - खास करुन नवीन मित्रांमध्ये.

टवाळ कार्टा's picture

24 Apr 2017 - 11:57 am | टवाळ कार्टा

माझी लिस्ट ढापलीस....साला होम लोन नस्ते तर यातल्या अर्ध्या जागा बघून घेतल्या असत्या इतक्यात

आदूबाळ's picture

25 Apr 2017 - 2:30 pm | आदूबाळ

उत्तर आफ्रिका:

१. मॉरिशस

उत्तर आफ्रिका नै. दक्षिण अफ्रिका. उत्तर अफ्रिकेत वाळवंट आहे.

स्रुजा's picture

25 Apr 2017 - 4:05 pm | स्रुजा

खरं तर पूर्व आफ्रिका. कोण जाणे मी उत्तर का लिहीलं

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2017 - 10:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं ! ही तर बकेट नाही टँकर लिस्ट झाली ! यादीतले काही पर्याय पाहीपाहीपर्यंत इतर अनेक नावांची भर पडत जाते असा स्वानुभव आहे ;) :)

२. कनेडियन रॉकीज... यासाठी रेल्वेसहल उत्तम असे म्हणतात.

५. अमेरिकेतील नॅशनल पार्क्स - खास करुन यॉसेमिटी आणि येलोस्टोन नॅशनल पार्क... मी योसेमिटी आणि ग्रँड कन्यान बघितल्या आहेत पण सर्व महत्वाचे पार्क्स एका झटक्यात पहायला हा नंतर सापडलेला पर्याय मार्क करून ठेवला आहे.

हो . रेल्वेसहल फारच भारी आहे म्हणे. बरेच लोकं एक लेग रेल्वे ने आणि परत येताना विमानाने येतात , तसं स्वस्त पडतं .

यादीतले काही पर्याय पाहीपाहीपर्यंत इतर अनेक नावांची भर पडत जाते असा स्वानुभव आहे WinkSmile

अगदी, अगदी. तुमच्या लेखांबद्दलही हाच अनुभव आहे :)

तुम्ही दिलेली लिंक इंटरेस्टिंग आहे. आणि १५ दिवस हा काही फार मोठा काळ नाही त्यामुळे सुटी सहज मिळेल.

भारतातल्या खुप जागा आहेत बघायच्या राहिलेल्या खरं तर.

राजस्थान, लदाख, काश्मिर, इंदोर, दिल्ली, यशो बरोबर एकदा बेस कँप चा ट्रेक , पंजाब , बाघा बॉर्डर , लक्षद्वीप, दीव दमण , अंदमान, गुजरात, नर्मदा, इशान्य भारत तर लिहीलंच आहे वर यादीत... असो, हजारो ख्वाईशे ऐसी !!

अप्पा जोगळेकर's picture

24 Apr 2017 - 10:51 am | अप्पा जोगळेकर

तुम्ही फिरा आणि प्रवासवर्णन लिहा. आम्ही इथे फोटो पाहू.
मला तर सायकलच्या परिघात बसते तेवढे २००-३०० किमीच्या परिघात फिरायला छान वाटते. अन्य कोणत्याही वाहनाने फिरायचा अगदी कंटाळा येतो हल्ली.
इकडे मुंबई-पुण्यात सगळे खायला मिळते हल्ली. बास झाले तेवढे.
त्यातल्या त्यात 'पुणे-गोवा' डेक्कन क्लिफ हॅन्गर वाला प्रवास करायची इच्छा आहे.

अनुप ढेरे's picture

24 Apr 2017 - 11:06 am | अनुप ढेरे

ताज महाल पाहिला नाही अजून. लाज वाटते त्याची.

सतिश पाटील's picture

25 Apr 2017 - 10:58 am | सतिश पाटील

भारतात

1 अंदमान निकोबार
२ लक्ष्द्वीप
३ उटी कोडाई
४ ओडिशा
५ रामेश्वर
६ व्याघ्र अभयारण्य
७ स्पीती
८ झंस्कार व्याली
९ पाकव्याप्त काश्मीर
१० यूपी बिहारमधील एखादे बाहुबलीचे लग्नसमारंभ

भारताबाहेर
1 श्रीलंका
२ नेपाळ
३ भुतान
४ तिबेट
५ पाकिस्तान

तुर्तास एवढेच.

इराण आणि कास्पियन समुद्राच्या आसपासच्या देशात (आर्मिनिया, अझरबैजान वगैरे) जायची फार इच्छा आहे.

समर्पक's picture

25 Apr 2017 - 11:09 pm | समर्पक

तबरीज, शिराज, इस्फहान - इराणची स्थापत्य सौंदर्य स्थळे ! मशहाद ची केशर शेती पण!
अझरबैजान - बाकू जवळचे मड व्होल्कॅनो ! आणि सर्वात महत्वाचे प्राचीन हिंदू-पारशी अग्नी मंदिर...
अर्मेनिया व जॉर्जिया चे नृत्याविष्कार व वाईन फिल्ड्स ! :-)

रायनची आई's picture

25 Apr 2017 - 1:23 pm | रायनची आई

भारतात--
1) चांदबावडी- राजस्थान
2) रानी नि वाव, अडालज नि वाव- गुजरात
3) लडाख
4) दार्जीलिंग

भारताबाहेर--
1) पामुककले, आणि बाकीचे टर्की
2) ग्रेट ओशन रोड- ओस्ट्रेलिया
3) ब्लू ग्रोतो- नेपल्स- इटली
4) न्यूझिलँड
5) सान्तोरिनि- ग्रीस
6) christ the redeemer- ब्राझील
7) Northen Lights- नॉर्वे

समर्पक's picture

25 Apr 2017 - 11:12 pm | समर्पक

पामुक्कल सॉल्ट टेरेस आणि कॅपेडोशिया टेरेन +१

समर्पक's picture

25 Apr 2017 - 11:12 pm | समर्पक

पामुक्कल सॉल्ट टेरेस आणि कॅपेडोशिया टेरेन +१

बिन्नी's picture

25 Apr 2017 - 4:31 pm | बिन्नी

मस्त आहे धागा.
मला कश्मीर, मुंबई, पुणे , गुजरात मध्ये द्वारका, वाघा बॉर्डर, वली ऑफ फ्लॉवर्स आणि दिल्ली बघायचंय.
दुसऱ्या देशाची सुरुवात नेपाळ ने करणार यंदा.

वेल्लाभट's picture

25 Apr 2017 - 4:33 pm | वेल्लाभट

चूक आहे हे. अशी बकेट लिस्ट वगैरे नाही बनवता येत. किती दिवस प्रयत्न केला प्रतिसाद द्यायचा.

लडाख, स्पिती, झन्स्कार. चारचाकीने, घरापासून घरापर्यंत.
राजस्थान (एकदा गेलोय, परत जायचंय. चारचाकीने)
-- चारचाकीने डिफॉल्टच समजा भारतातल्या ठिकाणांसाठी.
दार्जिलिंग.
महाराष्ट्रातली गावं बघून तिथे त्यांच्यासोबत रहायचंय, जमलंच तर एखाद्या जत्रेत जायचंय, बैलांची शर्यत बघायचीय, बैलांचा बाजार बघायचाय, इत्यादी इत्यादी.
आणि हां, केरळातली ती प्रसिद्ध बोटींची शर्यत बघायचीय; जमल्यास सहभागी व्हायचंय.
बास.

बाकी सगळं भारताबाहेर. आणि ती यादी अमर्याद आहे. तरीपण,

स्वित्झर्लँड कधीही कितीही वेळा. आय अ‍ॅम इन लव्ह विथ धिस कंट्री.
ग्रीसच्या एखाद्या बारक्या बारक्या गल्ल्या असलेल्या गावात मुक्काम करायचाय, जमलंच तर एखाद्या स्थानिक बँडबरोबर एखादं तालवाद्य वाजवायचंय
आईल ऑफ स्काय ला जायचंय
ओल्ड ट्रॅफर्ड ला एखादी युनायटेडची मॅच बघायचीय
व्हिएन्ना ला जायचंय
नेदरलँड्स
फ्रान्स
अरे किती काय काय लिहावं? युरोप घेतला तरी आवरता येत नाही यादी. लेट इट बी.

जग फिरायचंय.

प्रीत-मोहर's picture

26 Apr 2017 - 6:28 am | प्रीत-मोहर

चूक आहे हे. अशी बकेट लिस्ट वगैरे नाही बनवता येत. किती दिवस प्रयत्न केला प्रतिसाद द्यायचा.

याच्याशी आणि

अरे किती काय काय लिहावं? युरोप घेतला तरी आवरता येत नाही यादी. लेट इट बी.

जग फिरायचंय.

याच्याशी सहमत

वरुण मोहिते's picture

25 Apr 2017 - 4:37 pm | वरुण मोहिते

त्यामुळे स्पेशल काही नाहीये सध्या लिस्ट मध्ये .
तरी बाबा अमरनाथ आणि एकदा तिबेट ला जायची इच्छा आहे .
परदेशात
१)लंडन इथे काही महिने जाऊन राहावं
२)लास वेगास इथे जाऊन खूप जुगार खेळावा
३) रिओ दि जेनेरिओ
४) तो गविंचा धागा आल्यापासून सेशेल्स ला जाण्याची फार इच्छा आहे .
सध्या तरी हि लिस्ट आहे .

पिशी अबोली's picture

25 Apr 2017 - 11:24 pm | पिशी अबोली

नद्या बघायच्यायत खूप साऱ्या. त्यांच्या काठावरची संस्कृती आणि तिच्या कथा ऐकत, निवांतपणे.

पूर्वांचल बघायचाय.

ज्या लोकांनी देशावर राज्य केलं त्यांचा देश, आणि ज्यांनी माझ्या राज्यावर राज्य केलं त्यांचा देश बघायचाय. पण पोर्तुगाल चं आकर्षण नाहीय. इंग्लंडचं आहे फार.

इटलीमध्ये जाऊन फिरत फिरत इतालीयन नीट बोलायला लागायचंय.

आणि मला एकदा मॉन्सूनचा पाठलाग करायचाय.

मॉन्सूनचा पाठलाग! भन्नाट आहे कल्पना, आवडली!

मोदक's picture

7 May 2017 - 2:12 am | मोदक

कल्पना भन्नाटच आहे.

"प्रोजेक्ट मेघदूत" गुगलून बघा.

निशाचर's picture

7 May 2017 - 3:18 am | निशाचर

लोकप्रभा साप्ताहिकात त्यावर लेखमाला आली होती.

इडली डोसा's picture

26 Apr 2017 - 2:14 am | इडली डोसा

मलाही खूप फिरायचं आहे.

येत्या काही वर्षात उत्तर दक्षिण अमेरीकेतले नॅशनल पार्क्स. अपालाचेन ट्रेलचा थोडा दक्षिण आणि थोडा उत्तर भाग. इक्वाडोर, पॅटागोनिया मध्ये हायकिंग आणि बरंच काही.

सध्या ब्युटीफुल ब्रिटिश कोलंबिया जितकं बघता येईल तितकं बघायचं आहे. यांच्या टुरिजम ऍड एकसे बढकर एक आहेत. ही एक माझी आवडती सगळ्यांसाठी

पाटीलभाऊ's picture

26 Apr 2017 - 12:00 pm | पाटीलभाऊ

अशाच एका भल्या मोठ्या बादलीच ओझं घेऊन अनेक वर्षांपासून फिरतोय. पण तरीही बादली काही खाली होत नाही...उलट अजून भरतेय.

प्रसन्न३००१'s picture

26 Apr 2017 - 12:35 pm | प्रसन्न३००१

बरीच ठिकाणं फिरायची आहेत भारतातील आणि बाहेरील, पण त्यातली निवडक काही

भारतात

१) अमृतसर - वाघा बॉर्डर, जालियनवाला, सुवर्ण मंदिर, खटखटकलां (भगतसिंगांचं गाव आणि समाधी)
२) राजस्थान - उदयपूर, जयपूर, चितोड, जैसलमेर
३) गुजरात - कच्छ रणोत्सव
४) कूर्ग
५) नॉर्थ ईस्ट राज्ये

भारताबाहेर

१) भूतान
२) न्यूझीलंड
३) जर्मनी - बर्लिन, म्युनिक, न्युरेम्बर्ग
४) पोलंड - ऑश्विच, वोर्सा, क्रॅकोव
५) नायगारा, न्यूयॉर्क (मॅडिसन स्क्वेअर गार्डन आणि ९/११ मेमोरियल साठी फक्त)

अजून खूप आहेत, जसं सुचेल तसं टाकतो इथे

Marathi_Mulgi's picture

28 Oct 2020 - 11:48 am | Marathi_Mulgi

प्रसन्न, खटखटकलां बघायचं असेल तर हुस्सैनीवाला विसरू नका.एकवेळ वाघा बॉर्डर नाही बघितली तर चालेल. पण हुस्सैनीवालाला जरूर जा.

सुहास बांदल's picture

26 Apr 2017 - 4:39 pm | सुहास बांदल

भारतात

सर्व काही

भारताबाहेर

बराचसा युरोप पाहून झाला असला तरी परत बघावासा वाटतो.

१. ट्रान्स सैबेरिअन रेल्वे
२. कंबोडिया - अंगकोरवट मंदिर
३. नॉर्थन लाइट्स
४. Auschwitz concentration camp

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2017 - 10:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

२. कंबोडिया - अंगकोरवट मंदिर... अंगकोरवट निश्चितच कंबोडियातिल सर्वात मोठे आणि सर्वात जास्त प्रसिद्ध आकर्षण आहे. पण, तेथे इतर अनेक आकर्षणे आहेत, त्यांच्यासाठीही वेगळा वेळ जरूर काढून जा.

लोनली प्लॅनेट's picture

28 Apr 2017 - 9:48 am | लोनली प्लॅनेट

अमेझॉन चे जंगल
इस्टर आयलंड
सहारा वाळवंट
इजिप्त पिरॅमिड
साऊथ पॅसिफिक
न्यू झीलंड
पाकिस्तान
हे सर्व पाहण्याची इच्छा आहे

कवितानागेश's picture

1 May 2017 - 7:39 pm | कवितानागेश

मक्का!

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2017 - 10:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुस्लिम नसलेल्या व्यक्तींना मक्केच्या सीमेत प्रवेश मिळत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2017 - 10:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

भटकंतीचे वेड डोक्यात असले की अशी यादी 'बकेट लिस्ट' नाही तर 'अनेक-टँकर-लिस्ट' बनते. यादीतील काही ठिकाणे पाहिली म्हणून कमी होतात तोपर्यंत तिच्यात नवी नावे जोडली जातात. केवळ आतापर्यंतची माझी यादी या आयुष्यात पुरी करता आली तरी मी पूर्ण समाधानाने निरोप घेईन :)

अख्खे जग फिरायचेय, खोटे कशाला बोला. फ्रान्समध्ये नेक्स्ट टाईम जाईन तेव्हा नेपोलियन किंवा त्याच्या सैनिकाच्या वेषात, रोममध्ये जाऊन रोमन सेंच्युरियन आणि सेनेटरच्या वेषात , ग्रीसमध्ये जाऊन स्पार्टन योद्ध्याच्या वेषात, इजिप्तमध्ये जाऊन फॅरो आणि टकलू हैवान इमहोटेपच्या वेषात व चिनी मंत्र्याच्या वेषात फोटो काढून घ्यायची इच्छाही फार आहे.

योगेश आलेकरी's picture

15 May 2017 - 11:43 am | योगेश आलेकरी

तशी बादलीतील यादी मोठी आहे पण मी ५ वर्षासाठी एक लक्ष्य ठेवतो व पूर्णतेसाठी धडपडतो..
येत्या ५ वर्षातील लक्ष्य-
भारतातील-
हिमाचल, काश्मीर , राजस्थान, मध्यप्रदेश, दक्षिण भारत पुन्हा एकदा दुचाकीवर.
भारत परिक्रमा दुचाकीवर.
हॉर्नबिल उत्सव नागालँड.
अंदमान निकोबार
एकाच दिवशी पूर्व किनारपट्टीवर सुर्योदय पाहून तोच सूर्य अस्ताला जाताना पश्चिम किनारपट्टीवरून पाहायचं. (चेन्नई मंगळूर ६६०किमी द्विचक्रीन्ग)

भारताबाहेरील-
भुतानातील चेलेला पास जो मागच्या वेळी राहिलेला
नेपाळ
मुंबई ते सिंगापूर बाईक वरून 7 राष्टांचा प्रवास.
लंका

पद्मावति's picture

15 May 2017 - 1:40 pm | पद्मावति

सुंदर धागा. देश विदेशातल्या पर्यटन स्थळांची चांगली लिस्ट बनतेय या धाग्यामुळे.

उदय's picture

15 Aug 2017 - 6:55 am | उदय

मसाई मारा किंवा सेरेंगेटी नॅशनल पार्क, आफ्रिका
माचू पिचू, पेरु
अर्जेंटिना/ब्राझील
मलेशिया
मानस सरोवर किंवा एव्हरेस्ट बेस कँप
इजिप्तचे पिरॅमिड
न्यूझीलंड
ऑस्ट्रिया/जर्मनी
फ्रान्स/स्पेन

पुढील १५ वर्षांचा प्लॅन तयार आहे. :)

अभिजीत अवलिया's picture

15 Aug 2017 - 10:55 am | अभिजीत अवलिया

चंद्रावर किंवा मंगळावर जाण्याची खूप इच्छा आहे. पण शक्य होईल असे वाटत नाही.

क्रूझमधून प्रवास करणे, कॅरिबिअन मधील एकातरी बीचला भेट देणे आणि स्नॉर्केलिंग करणे या तीन गोष्टी एकदम पूर्ण झाल्या.

त्यात भर म्हणून मॅजिक किंगडम आणि केनेडी स्पेस सेंटरलाही भेट देऊन झाली.

भर समुद्रात स्नॉर्केलिंग करणे हा एक सुंदर अनुभव आहे. लहान असताना पोहणं शिकायचं चान्स मिळाला नाही, २ वर्षांपूर्वी अर्धांगिनीकडून मी आणि मुलगी एकदमच शिकलो. फारसं पोहता येत नसतानाही धाडस करून समुद्रात उडी मारली. तोंडात पाणी जायला लागल्याने अड्जस्ट करताना मास्कची नळीच निघून गेल्यावर एकदा बूड बूड घागरी झाल्याने १-२ लिटर खारं पाणी पण पिऊन झालं. पण तरी नवीन मास्क घेऊन परत समुद्रात उडी मारली. आयुष्यात एकदा तरी घ्यावा असा अनुभव आहे.

Marathi_Mulgi's picture

28 Oct 2020 - 11:42 am | Marathi_Mulgi

लोलब, गुरेझ (काश्मीर)
पूर्व युरोप
पश्चिम युरोप
ऋषीकेश
गंगोत्री
कैलास मानस
अलास्का
स्कॅंडेनेविया
कॅनेडीयन रॉकीज्
रशिया
डलहौसी, चंबा व्हाया पठाणकोट
उत्तराखंड
अंदमान
कूर्ग
लक्षद्वीप
दक्षिण भारतातील मंदीर शिल्पकला