ताज्या राजकीय घडामोडी भाग ६- दिल्ली महानगरपालिका निवडणूक २०१७ विशेष

राघवेंद्र's picture
राघवेंद्र in काथ्याकूट
24 Apr 2017 - 8:15 pm
गाभा: 

रविवारी एकूण ५४% मतदान दिल्ली महानगरपालिका साठी झाले आहे आणि एक्झिट पोल अंदाज भाजपाला बहुमत मिळेल असे म्हणत आहे.

दिल्ली दक्षिण (१०४ जागा) , दिल्ली उत्तर (१०४ जागा ) आणि दिल्ली पूर्व (६४ जागा ) अश्या तीन महानगरपालिका आहेत.

ऍक्सिस - इंडिया टुडे चा एक्झिट पोल

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

महानगरपालिका भाजप आआप काँग्रेस
उत्तर 78-848-128-12
दक्षिण 79-859-137-11
पूर्व 45-516-104-8

एबीपी - सी वोटर चा एक्झिट पोल

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

महानगरपालिका भाजप आआप काँग्रेस
उत्तर 8867
दक्षिण 8399
पूर्व 4796

निवडणुकीचा निकाल दिल्लीकर ,अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्ष, काँग्रेस आणि EVM साठी कसा असेल या चर्चे साठी हा धागा उघडत आहे.

मतमोजणी २६ एप्रिल रोजी आहे.

प्रतिक्रिया

आपचा जो खोडसाळपणा सुरू आहे त्यावरून तरी दंगा तरी फिक्स आहे. बाकी 52% च्या आसपास मतदान ही खरी गेम आहे.

गॅरी ट्रुमन's picture

24 Apr 2017 - 10:08 pm | गॅरी ट्रुमन

सेफॉलॉजिस्ट यशवंत देशमुख यांनी ट्विटरवर दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये मतांच्या टक्केवारीचा खालील तक्ता प्रसिध्द केला होता. काही कारणांनी त्यांनी तो तक्ता ट्विटरवरून काढलेला दिसतो. त्यांनी तो तक्ता काढण्यापूर्वीच मी तो सेव्ह करून ठेवला होता हे चांगले झाले.

1

या तक्त्यावरून असे दिसते की दिल्ली महापालिकांमध्ये भाजपला ५०.७%, आम आदमी पक्षाला १८.६%, काँग्रेसला १९.१% आणि इतरांना ११.७% मते मिळतील असा त्यांचा अंदाज आहे. पण त्यामानाने भाजपला २७२ पैकी २०२ ते २२० हा जागांचा खूपच सावध अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. जर मतांची ही टक्केवारी खरोखरच अशी आली तर भाजपचा दिल्लीमध्ये अगदी पूर्ण स्वीप असेल. फक्त यासाठी खूपच महत्वाचे 'कॅव्हिएट' आहे आणि ते म्हणजे यशवंत देशमुखांनी मतांचा अंदाज अचूक व्यक्त केला आहे. तसेच आम आदमी पक्षाची आणि काँग्रेसची मते एखाद्याच भागात खूप मोठ्या प्रमाणावर एकवटली असली तर त्या भागामधील जवळपास सगळ्या जागा ते पक्ष जिंकू शकतील. पण तसे घडण्यासाठी तो भाग वगळता दिल्लीच्या इतर भागांमध्ये त्या पक्षांना जवळपास शून्य मते मिळायला हवीत. तसे होणे कठिणच आहे. काँग्रेस आणि आआपची मते बर्‍यापैकी विखुरलेली असतील (हीच शक्यता जास्त) आणि मतांची टक्केवारी यशवंत देशमुखांनी व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणेच आली तर भाजपने २७२ पैकी २५५ ते २६५ जागा जिंकल्या तरी आश्चर्य वाटू नये.

याचे कारण म्हणजे दिल्लीमध्ये मुख्यत्वे तिरंगी लढत असणार आहे. तिरंगी लढतीत नक्की कसा परिणाम होतो हे आपण २०१५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये बघितलेच आहे. त्यावेळी आआपला ५४.५%, भाजपला ३२.३% आणि कॉंग्रेसला ९.७% मते मिळाली होती. याचा परिणाम म्हणून आआपला ७० पैकी ६७ आणि भाजपला अवघ्या ३ जागा मिळाल्या होत्या. आता भाजपची मते आणखी १२-१३% कमी होऊन ती काँग्रेसला गेली असती तर आम आदमी पक्षाने ७० पैकी ६९ जागा जिंकल्या असत्या. या महापालिका निवडणुकांमध्ये तशीच परिस्थिती असल्यामुळे जर मतांची टक्केवारी अशीच राहिली तर भाजपचा अगदी जबरदस्त स्वीप असेल हे नक्की.

तसे खरोखरच होणार का? या प्रश्नाचे उत्तर मिळेल परवा.

केजरीवाल आताच मशीनच्या नावाने शंख करत आहेत!

"ईवीएम पर सवाल उठाते हुए केजरीवाल ने कहा, 'जीत या हार लगी रहेगी. अगर परसो (26 अप्रैल) इस तरह के नतीजे आए, जो पंजाब, धौलपुर, भिंड जैसी बेईमानी साबित करते हैं तो हम आंदोलन से आये थे, सत्ता का सुख भोगने नहीं, वापस आंदोलन करना पड़ेगा.'"

गॅरी ट्रुमन's picture

25 Apr 2017 - 10:40 am | गॅरी ट्रुमन

आतापर्यंत सत्तेची हवा डोक्यात गेलेले अनेक नेते होऊन गेले. वेळोवेळी अशा नेत्यांचा भारतीय मतदारांनी पराभवही केला आहे. यात इंदिरा गांधींचा १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमधील पराभव, १९८७ मध्ये बन्सीलालांचा हरियाणा विधानसभेत आणि १९९१ मध्ये देवीलालाचा हरियाणा विधानसभेतच पराभव, जयललितांचा १९९६ मध्ये तामिळनाडू विधानसभेत, शरद पवारांचा १९९५ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत, लालू यादवांचा २००५ मध्ये बिहार विधानसभेत तर २०१३ मध्ये भाजपचा कर्नाटक विधानसभेत झालेले पराभव हे लगेच आठवले. तसेच चळवळीतून राजकारणात आलेल्या आसाम गणपरिषदेच्या प्रफुल कुमार महंतांचा १९९१ आणि २००१ मध्येही पराभव झाला. तरीही या सर्व नेत्यांनी जनादेश मुकाट्याने मान्य केला. जर केजरीवालांनी झालेल्या पराभवाविरूध्द आंदोलन केले तर लोकशाही मार्गातून जनतेने व्यक्त केलेला कौल मला मान्य नाही, मी म्हणेन तीच पूर्वदिशा असे म्हणत पराभूत पक्षाने आंदोलन करायचा हा पहिलाच प्रकार असेल.

अण्णांच्या दिल्लीतील एप्रिल २०११ मधील जंतरमंतरवरील पहिल्या उपोषणाच्या काळापासूनच हा मनुष्य का कोणास ठाऊक प्रचंड डोक्यात जायचा. हा माणूस म्हणजे गायीचे कातडे पांघरलेला लांडगा असून भारतीय राजकारणाला लागलेला कलंक आहे हेच माझे अगदी पहिल्यापासूनचे मत होते आणि जशाजशा या मनुष्याच्या मर्कटलीला वाढत गेल्या तसे हे मत आणखी पक्के होत गेले. आपण भ्रष्टाचाराविरोधी आहोत, आपण लोकाभिमुख प्रशासन देणार, चांगल्या लोकांनी राजकारणात यायला पाहिजे वगैरे बकवास काही काळ चालेल पण यांचे प्रत्यक्ष वागणे त्याच्या पूर्णपणे उलटे असेल तर लोकांची चीड मतदानातून व्यक्त झाली तर त्यात काहीही नवल नाही.

मोदींच्या राज्यात लोकशाहीला धोका आहे आता कायद्याचे नाही तर एका माणसाचे राज्य येत आहे वगैरे विचारवंती बडबड करणार्‍या सुशिक्षित लोकांची यावर प्रतिक्रिया काय असेल याचीच आता उत्सुकता लागली आहे. लोकांनी लोकशाही पध्दतीतून दिलेला जनादेश नाकारणे आणि त्याविरूध्द आंदोलन करायची बेजबाबदार भाषा मुख्यमंत्री या जबाबदार आणि घटनात्मक पदावरील व्यक्तीने केल्यामुळे लोकशाही खूपच बळकट होत आहे ना भारतात?

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Apr 2017 - 1:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

"अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व..." इत्यादी, इत्यादी, इत्यादी, असंख्य विशेषणांनी केजरीवालचे पोवाडे गाणारी मंडळींना अगोदरच "कुठे लपवू हे (पोवाडे गाणारे) तोंड" असे झाले आहे. हल्ली कोणी नुसते 'क' असे म्हटले तरी त्यांना धडकी भरते !

त्यातच तुम्ही असे काही खरे खरे लिहून त्या निष्पाप लोकांच्या जीवाला किती यातना देत आहात याची काही कल्पना आहे काय, साहेब ? ;) =)) =)) =))

अर्धवटराव's picture

29 Apr 2017 - 1:23 pm | अर्धवटराव

सक्सेस हेज मेनी फादर्स, पण पराभव पोरका असतो. जर केजरीसाहेब जिंकले असते तर कमालीची सुसंगत विचारसरणी दुप्पट उफाळुन आलि असती. आपल्या मर्कटलीलांनी पराभव खेचुन आणलाय तर मूग गिळायलाच लागेल.

गॅरी ट्रुमन's picture

29 Apr 2017 - 2:03 pm | गॅरी ट्रुमन

जर केजरीसाहेब जिंकले असते तर कमालीची सुसंगत विचारसरणी दुप्पट उफाळुन आलि असती.

लोल.

केजरीवाल जिंकले तरी आणि हरले तरी त्या माणसाला आणि आम आदमी पक्षाला माझा तरी विरोध कायमच राहिल आणि सध्याइतकाच (किंबहुना त्यापेक्षाही जास्त) तिखट होईल :) :)

(दिल्ली विधानसभेतील मिपावरील विरोधी पक्षनेता) ट्रुमन

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Apr 2017 - 10:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

जर केजरीसाहेब जिंकले असते तर कमालीची सुसंगत विचारसरणी दुप्पट उफाळुन आलि असती.

हे मात्र १००% खरे आहे ! "मीच्च खरा/सज्जन/बरोबर/ इत्यादी आहे. बाकी सगळे जग खोटे/भ्रष्ट/चूक/इत्यादी आहे." ही चलाख व स्वमग्न विचारसरणी नक्कीच दुप्पट वेगाने उफाळून वर आली असती, यात वाद नाही ! =)) =)) =))

बादवे : निवडणुकीत सतत सडकून मार खाल्ल्यावर आणि पक्षनेत्यांना सार्वजनिक शपथ घालूनही पक्षात फूट पडण्याची लक्षणे दिसत आहेत हे पाहून पहिल्यांदा केजरीवाल यांना आपण चूका केल्या आहेत हे म्हणण्याची उपरती झाली आहे... "तो अजून एक स्वार्थी कावा आहे का ?" आणि "ती उपरती किती दिवस शिल्लक राहील ?" या प्रश्नांची उत्तरे भविष्यच देईल ;) :)

मात्र, केजरीवाल भक्त अजूनही सत्य कबूल करण्याचे प्रामाणिक धाडस करण्यात अयशस्वी ठरले आहेत व चुप्पी साधून आहेत :)

सचु कुळकर्णी's picture

29 Apr 2017 - 2:45 pm | सचु कुळकर्णी

अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस
हा पवाडा आम्हि कालच वर आनला व्हुता पन ना तर शाहिर आले... ना... जी जी र जी... करनारे...

मिपावरच्या दिल्ली विधानसभेच्या विरोधि पक्ष नेत्याच्या पालखिचा भोई
होबासराव

श्रीगुरुजी's picture

29 Apr 2017 - 9:48 pm | श्रीगुरुजी

२०१४ मध्ये ते केजरीवालांच्या प्रेमात होते.

२०१६ मध्ये ते कन्हैयाकुमारच्या प्रेमात होते.

२०१७ मध्ये ते स्वतःच्याच प्रेमात आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Apr 2017 - 10:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ???!!!

कारण आतापर्यंत केजरीवाल आणि कन्हैयाकुमारच्या अधःपतनावर शिक्कामोर्तब झाले आहे ;) :) :O)

सचु कुळकर्णी's picture

29 Apr 2017 - 11:23 pm | सचु कुळकर्णी

मिपावरच्या दिल्ली विधानसभेच्या विरोधि पक्ष नेत्याच्या पालखिचा भोई
होबासराव

दशानन's picture

29 Apr 2017 - 2:08 pm | दशानन

कार्टून

गॅरी ट्रुमन's picture

25 Apr 2017 - 10:26 pm | गॅरी ट्रुमन

यशवंत देशमुखांनी मतांच्या टक्केवारीचा अंदाज व्यक्त केला आहे त्याप्रमाणे मतांची टक्केवारी आली तर फेब्रुवारी २०१५ पासून आम आदमी पक्षाविरूध्द तब्बल ३५.७% चा कल असेल. याचाच अर्थ फेब्रुवारी २०१५ मध्ये आम आदमी पक्षाला मत दिलेल्या प्रत्येक तीन मतदारांपैकी दोन मतदार आता पक्षाविरूध्द जातील असा त्यांचा अंदाज आहे. अर्थातच हा एक्झिट पोलचा अंदाज आहे. प्रत्यक्ष निकाल अजून आलेले नाहीत. पण अवघ्या दोन वर्षाच्या काळात इतका जबरदस्त कल एखाद्या पक्षाविरूध्द आल्याचे कुणा एक्झिट पोलवाल्यानेही पटकन आठवतही नाही.

काँग्रेस सरकारच्या अनेक वर्षांच्या काळात आणि विशेषतः युपीएच्या दुसर्‍या इनिंगमध्ये सगळे राजकारणी म्हणजे चोर असतात, त्यांच्याकडून काहीही चांगले घडू शकणार नाही अशी अनेक मतदारांची नकारात्मक मानसिकता झाली होती. या पार्श्वभूमीवर अण्णा-केजरीवालांचे आंदोलन अनेकांना आकर्षित करू शकले. भ्रष्टाचारमुक्त कारभार, लोकाभिमुख शासन हे मुद्दे दिसायला भारदस्त होतेच. दिल्लीतल्या मतदारांना आणखी आकर्षित करणारे एक आश्वासन म्हणजे व्ही.आय.पी कल्चर संपविणे. दिल्ली राजधानी आणि सरकारचे ठिकाण असल्यामुळे दिल्लीतल्या लोकांना या व्ही.आय.पी कल्चरचा त्रास होतोच. तसेच दिल्लीमध्ये कुणा खरोखरच्या व्ही.आय.पी च्या काकाच्या मामाच्या पुतण्याच्या भाचीच्या नवर्‍याच्या मित्राच्या मावसभावाच्या शेजार्‍याचा बायकोच्या बहिणीचा नवराही आपण स्वतः व्ही.आय.पी असल्याप्रमाणे अनेकदा माज दाखवतो आणि असल्या उपटसुंभांपुढे काही बोलायचीही सोय नसते. त्यामुळे दिल्लीत व्ही.आय.पी कल्चरविरूध्दचा मुद्दा अधिक लोकप्रिय झाला. आपल्याला कदाचित ते मुंबई-पुण्यात बसून इतके समजायचे नाही. अण्णांच्या दिल्लीतील उपोषणाला जोरदार समर्थन मिळाले पण त्यानंतर चारच महिन्यात मुंबईत केलेल्या उपोषणाचा मात्र फज्जा उडाला.

एकूणच दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून काम करणे अपेक्षित आहे ते सोडून इतर सगळे करणे--- करदात्यांच्या पैशावर पक्षाचा पंजाब आणि गोव्यात प्रचार करणे, दिल्लीबाहेर कुठेही काहीही घडले तरी तिथे धावून जाणे (पण दिल्लीमध्येच डॉ. पंकज नारंग यांची झोपडपट्टीवाल्यांनी हत्या केली तेव्हा दखलही न घेणे, सियाचीनमध्ये बर्फात गाडले गेलेले हनुमंतप्पा दिल्लीत हॉस्पिटलमध्ये असताना पंतप्रधान मोदीही त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आले पण एकही खात्याचा कारभार न पाहाणार्‍या केजरीवालांना मात्र त्यासाठी वेळ मिळाला नाही), देशद्रोह्यांचे समर्थन करणे, सर्जिकल स्ट्राईकप्रकरणी लष्कराला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे हे प्रकार कधीनाकधी केजरीवालांना भोवणारच आहेत. तसेच इतर कोणत्याही पूर्ण राज्याच्या मुख्यमंत्र्याचे नाव दररोज बातम्यांमध्ये येत नसायचे (आठवून बघा कितीवेळा सरबानंद सोनोवाल, सिद्दरामय्या, रघुबर दास, विजय रूपानी, चंद्रशेखर राव, देवेंद्र फडणवीस यांची नावे राष्ट्रीय बातम्यांमध्ये आली आहेत) पण या अर्ध्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचे नाव मात्र जवळपास एक दिवसाआड बातम्यांमध्ये असायचे. या सगळ्या यादीमध्ये इतर अनेक गोष्टींचा समावेश केलेला नाही. बहुदा शिशुपालाच्या शंभर अपराधांप्रमाणे केजरीवालांचे शंभर अपराध या यादीमध्ये येतील. या सगळ्या घोटाळ्यात ज्या दिल्लीच्या मतदारांनी त्यांना विश्वासाने मते दिली होती त्यांना मात्र वार्‍यावरच सोडले गेले. ते मतदार कधीना कधी आपला हिसका दाखवून देतीलच. समजा या महापालिका निवडणुकांमध्ये नाही तर लवकरच कधीतरी!!

एकूणच केजरीवालांच्या मर्कटलिलांमुळे भविष्यकाळात भ्रष्टाचाराला विरोध, लोकाभिमुख प्रशासन इत्यादी मुद्दे प्रामाणिकपणे घेऊन राजकारणात उतरलेल्या खरोखरच्या चांगल्या लोकांकडेही मतदार संशयानेच बघतील.

विकास's picture

25 Apr 2017 - 8:50 am | विकास

कंटाळा आला कि ओ! ;)

AK

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Apr 2017 - 2:03 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

'आप'ची ही चिडचिड नक्की कशामुळे झाली आहे हे कळायला मार्ग नाही.

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2017 - 3:02 pm | श्रीगुरुजी

आआपच्या गोपाल राय यांच्या म्हणण्यानुसार जर दिल्ली महापालिकेत आआपचा विजय झाला तर आआपच्या दिल्लीतील कारभारावर लोकांन पसंतीची मोहोर उठविली असेल. पण जर आआपचा पराभव झाला तर तो भाजपने मतदान यंत्रात केलेल्या गडबडीमुळेच असेल.

म्हणजे केजरीवालांच्या मर्कटलीला, त्यांचा ढोंगीपणा, त्यांच्या नौटंक्या, अत्यंत बेजबाबदार वक्तव्ये व अत्यंत बेजबाबदार कारभार, त्यांच्या मंत्रीमंडळातील व आमदारांनी केलेला भ्रष्टाचार, त्यांनी वशिल्याने सर्वत्र नेमलेली आपली माणसे, आसेतुहिमाचल व कॅनडात लोकांच्या कराच्या पैशातून दिलेल्या पूर्ण पाने जाहिराती, केजरीवालांनी बेछूट आरोप केल्यामुळे कराव्या लागणार्‍या न्यायालयांच्या वार्‍या व त्यातून सुटण्यासाठी गलेलठ्ठ पैसे देऊन नेमलेल्या वकीलाचे मानधन लोकांच्या कराच्या पैशातून देणे, मोदींनी न मागता दिलेले अत्यंत आचरट व अनाहूत सल्ले, नवीन चित्रपट बघून लगेच त्याचे रसग्रहण करणे, दिल्ली सोडून इतर राज्यातच भटकण्यात वेळ घालविणे, दिल्लीत साथीचे रोग फैलावले असताना संपूर्ण मंत्रीमंडळ दिल्लीबाहेर असणे, मोदींविरूद्ध वापरलेली अत्यंत असभ्य भाषा, आपल्या प्रत्येक अपयशाचे खापर केंद्राच्या डोक्यावर फोडणे . . . यापैकी कोणत्याही गोष्टींमुळे दिल्लीकर आआपच्या विरूद्ध मतदान करणार नसून आआपच्या पराभवाला फक्त मतदान यंत्रातील गडबडच जबाबदार असेल.

केजरीवालांइतका नीच व नालायक नेता भारतीय राजकारणात आजवर झालेला नाही.

सतिश गावडे's picture

25 Apr 2017 - 9:31 pm | सतिश गावडे

>> नवीन चित्रपट बघून लगेच त्याचे रसग्रहण करणे
हे कुठे वाचायला मिळेल?

गॅरी ट्रुमन's picture

25 Apr 2017 - 9:53 pm | गॅरी ट्रुमन

1

1

1

सतिश गावडे's picture

25 Apr 2017 - 10:01 pm | सतिश गावडे

धन्यवाद :)

ही ट्विट्स त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून न टाकता आम आदमी म्हणून टाकली असावीत.

दशानन's picture

25 Apr 2017 - 10:03 pm | दशानन

हे कसे वेगळे करायचं बरं?

विशुमित's picture

25 Apr 2017 - 10:47 pm | विशुमित

ठीक आहे ना चित्रपट पाहिले म्हणून काय झाले ?

इतर नेते जनतेसाठी २४*७ अकूपाय असतात का ? माहित नाही म्हणून विचारले.

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2017 - 10:24 pm | श्रीगुरुजी

त्यांनी जेटलींची बदनामी मुख्यमंत्री या नात्याने केली होती. त्यामुळेच वकीलाची फी सरकारने देणे योग्य होते. परंतु ते चित्रपट आम आदमी या नात्याने बघतात. ते जरी इतरांची तुफान करमणूक करत असले तरी स्वतःची करमणूक करून घ्यायचा त्यांना हक्क आहेच. त्यासाठी ते येणारा प्रत्येक नवीन चित्रपट बघतात. तसेही मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर कोणतीच जबाबदारी नाही.

बोका-ए-आझम's picture

25 Apr 2017 - 8:37 pm | बोका-ए-आझम

केजरीवालांइतका नीच व नालायक नेता भारतीय राजकारणात आजवर झालेला नाही.

काहीही हं गुरुजी. इतकी निखळ करमणूक करणाऱ्या केजरीवालांबद्दल तुम्ही असे शब्द वापरणं शोभत नाही ;) राजनारायण, देवीलाल वगैरेंच्या निधनानंतर भारतीय राजकारणात आचरटपणाच्या नावाने जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्याचं एवढं महान कार्य करणाऱ्या या नरपुंगवाला तुम्ही अशी शेलकी विशेषणं वापरणं म्हणजे कैच्या कैच बुवा!

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 8:00 am | गॅरी ट्रुमन

बरोबर ८ वाजता ई.व्ही.एम उघडण्यात आली आहेत आणि मतमोजणी सुरू झाली आहे. नेहमीप्रमाणे सुरवातीला पोस्टल मतांची मोजणी सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये मतदारसंघ लहान असतात त्यामुळे मतदारांची संख्याही कमी असते. सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व मतदारसंघांमधील निकाल हातात यायला हवेत.

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 8:12 am | गॅरी ट्रुमन

तीनही महापालिकांमधून पहिले कल आले आहेत.

उत्तरः २ कल उपलब्ध. भाजप-२
दक्षिणः ४ कल उपलब्ध. काँग्रेस-२, भाजप-१, आआप-१
पूर्वः ३ कल उपलब्ध. भाजप-३

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 8:19 am | गॅरी ट्रुमन

उत्तरः ७ कल उपलब्ध. भाजप-६ ,आआप -१
दक्षिणः ९ कल उपलब्ध. भाजप-४ , काँग्रेस-४ , आआप-१
पूर्वः ४ कल उपलब्ध. भाजप-२, आआप-१, काँग्रेस-१

सुरवातीचे कल बघता भाजपने तीनही महापालिकांमध्ये आघाडी घेतली आहे असे दिसते. काँग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली दिसत आहे.

पूर्व दिल्लीतील पतपडगंजमधील एका वॉर्डमधून आआप उमेदवार पिछाडीवर आहे. हा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचा मतदारसंघ आहे.

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 8:23 am | गॅरी ट्रुमन

आतापर्यंत एन.डी.टी.व्ही बघत होतो. टाईम्स नाऊवर पुढचे आकडे आहेत.

तीन महापालिका क्षेत्रांमध्ये १०६ पैकी भाजप-७२, काँग्रेस-१७, आआप-१२ तर इतर-५

आतापर्यंतचे चित्र---

भाजपला चांगलेच यश मिळताना दिसत आहे. पण एक्झिट पोलमध्ये अंदाज व्यक्त केला होता त्यापेक्षा कमी.
काँग्रेसची कामगिरी बरीच चांगली.
आआपचा धुव्वा उडताना दिसत आहे.

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 8:25 am | गॅरी ट्रुमन

आकडे भरभर पुढे जात आहेत.

एकूण--- १ ४१ पैकी भाजप-८८, काँग्रेस-३० , आआप-१७, इतर-६

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 8:29 am | गॅरी ट्रुमन

एकूण-- १८३ पैकी भाजप-१२१, काँग्रेस-४०, आआप-१६, इतर-६
पूर्व- ५२ पैकी भाजप-३९, काँग्रेस-८, आआप-३, इतर-२
उत्तर-- ८३ पैकी भाजप ५३, काँग्रेस-१९, आआप-९, इतर-२
दक्षिण-- ४९ पैकी भाजप-२९, काँग्रेस-१३, आआप-४, इतर-३

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 8:35 am | गॅरी ट्रुमन

आतापर्यंतचे चित्र---

भाजपला एक्झिट पोलमध्ये अपेक्षित होते तितकेही यश मिळताना दिसत नाही. या क्षणी २२९ पैकी १५१ ठिकाणी भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. या रेटने भाजप १७० ते १८० दरम्यान स्थिरावेल.

काँग्रेसने बरीच चांगली कामगिरी केली आहे. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस आहे. अजय माकन दिल्लीमध्ये काँग्रेसला पुनरज्जिवीत करत आहेत असे चित्र आहे असे दिसते.

आम आदमी पक्षाचा मात्र जोरदार धुव्वा उडताना दिसत आहे. आतापर्यंत केवळ २२ जागांवर आआपला आघाडी मिळताना दिसत आहे.

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 8:41 am | गॅरी ट्रुमन

एकूणच ई.व्ही.एम मध्ये गडबड करण्यात आली होती पण एक्झिट पोलमध्ये गडबड किती केली होती याचा अंदाज बराच वाढवून सांगितला असे दिसते :)

आता २५५ पैकी भाजप १६८ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस ५४ जागांवर तर आआप २७ जागांवर आघाडीवर आहे. या प्रमाणात जागा मिळवायला भाजपला साधारणपणे ४०-४२% मते, काँग्रेसला २२-२४% मते तर आआपला १२-१४% मते मिळत असली पाहिजेत.

आआपला 'कॅपिटल पनिशमेन्ट' मिळताना दिसत आहे असे चॅनेलवर म्हणत आहेत. कॅपिटल पनिशमेन्ट ही 'कॅपिटलमध्ये मिळालेली पनिशमेन्ट' म्हणून आणि या झालेल्या मोठ्या पराभवानंतर कदाचित आआपचे अस्तित्वच धोक्यात येईल या अर्थीही :)

बोका-ए-आझम's picture

26 Apr 2017 - 8:46 am | बोका-ए-आझम

भारतीय राजकारणातल्या एका अभूतपूर्व घटनेची एका माणसाच्या लहरीपणामुळे आणि आचरटपणामुळे माती झाली. असो. आता तरी केजरीवाल सुधरावेत आणि उरलेली ३ वर्षे त्यांनी कामावर लक्ष द्यावे अशी इच्छा आहे. पण ' चोर चोरी से जाय, लेकिन हेराफेरी से ना जाय ' या न्यायानुसार ते कठीणच दिसतंय.

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 8:50 am | गॅरी ट्रुमन

आता २७० जागांवरील कल उपलब्ध आहेत. भाजप १८५, काँग्रेस ४१ तर आआप ४० जागांवर आघाडीवर आहे. आआपने काँग्रेसमधील अंतर बरेचसे भरून काढले आहे. हे लिहिता लिहिता आआप ४० तर काँग्रेस ४० जागांवर आधाडीवर गेला आहे. तरीही भाजपपेक्षा कितीतरी मागे आहे.

एकूणच मतदारांनी आआपला नाकारले आहे हे चित्र आहे.

दुसर्‍या क्रमांकासाठी काँग्रेस आणि आआपमध्ये चुरस आहे. याक्षणी आआप ४३ तर काँग्रेस ४१ जागांवर पुढे आहे. भाजप १८२ जागांवर पुढे आहे.

एकूणच राजौरी गार्डनइतका जोरदार धक्का आआपला बसलेला दिसत नाही. तरीही २०१५ मधील कामगिरी लक्षात घेता आआपची ही जोरदार घसरगुंडी आहे. तसेच आआप हा दिल्लीतील स्थानिक पक्ष असल्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये अजून चांगली कामगिरी व्हायला हवी होती. पण तसे होताना दिसत नाही.

केजरीवालांनी UPA च्या पराभवानंतर राहुल गांधींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असं कुणीही न विचारता सांगितलं होतं. आता तेही या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार का? अर्थात भाजपला हा विजय EVM मध्ये घोटाळा करुन मिळालेला असल्यामुळे केजरीवाल राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सब मिले हुवे है जी!

टाईम्स नाऊवर बोलताना भाजपच्या संबित पात्रांनी केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, खरे तर महापालिका निवडणुकांमध्ये पराभव झाला असला तरी विधानसभेत बहुमत असल्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये पराभव झाला तरी तसा राजीनामा द्यायची गरज नाही. पण होते कसे की केजरीवाल २०१५ मध्ये जिंकल्यानंतर आपण जगाच्या टोकावर आहोत (ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड) असे समजून इतर सगळ्यांना (विशेषतः पंतप्रधान मोदींना) काय करावे आणि काय करू नये याची लेक्चरबाजी करत होते.

मोदींच्या डिग्रीवर नसलेला वाद निर्माण करून---

आणि सर्वात विनोदी व्हिडिओ म्हणजे मोदी यांना ठार मारतील---

म्हणजे हे इतरांना काय करावे आणि काय करू नये अशी लेक्चरबाजी कोणीही विचारलेले नसताना करणार असतील तर यांनाही कोणीतरी येऊन लेक्चर देणारच. इलाज नाही.

बोका-ए-आझम's picture

26 Apr 2017 - 9:40 am | बोका-ए-आझम

संबित पात्रा हाणतोय. Kejriwal thinks he is PM by the day and CM by the night. Delhi voters will never accept such fly by night operators. हे वक्तव्य त्याने केल्यावर आपटार्डस् चे चेहरे कसे झाले असतील ते सांगायला हवं का? ;)

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 9:46 am | गॅरी ट्रुमन

इतका मोठा पराभव होऊनही आम आदमी पक्षाने आपला पराभव मान्य न करता ई.व्ही.एम वर खापर फोडायला सुरवात केली आहे. आआपचे नागेन्द्रर शर्मा (केजरीवालांचे सहकारी आणि मिडिया अ‍ॅडव्हायझर) यांनी पुढील टिवटिवाट केला आहे--

मागे म्हटल्याप्रमाणे आआपने ई,व्ही.एम चुकीची आहेत असे म्हणत 'पराभवपूर्व सबब' (अटकपूर्व जामिनला समकक्ष) आपल्याकडे ठेवली होतीच. त्याचा ते वापर करत आहेत.

वरुण मोहिते's picture

26 Apr 2017 - 9:50 am | वरुण मोहिते

अपेक्षेप्रमाणे त्यांचा थयथयाट चालू झाला आहे . कारण तर त्यांनी आधीच शोधून ठेवलेलं आहे . ह्या टर्म मध्ये भाजप चा कारभार सुधारावा हि अपेक्षा .

अनुप ढेरे's picture

26 Apr 2017 - 9:58 am | अनुप ढेरे

आपण काय इथे बसून पॉपकॉर्न खात या बातम्या वाचतो. भोगायचं दिल्लीवाल्यांना आहे कोणाचही सरकर आलं तरी. शीला दिक्षितांनी दिल्ली बरीच चांगली चालवलेली असं आता वाचायला मिळतय. केंद्रातल्या सरकारचे घोटाळे त्यांना भोगायला लागले.

केंद्रातल्या सरकारचे घोटाळे त्यांना भोगायला लागले.

नुस्ते तेवढेच नै, कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेतले घोटाळे थेट त्यांच्या संमतीने झाले म्हणतात.

बोका-ए-आझम's picture

26 Apr 2017 - 9:53 am | बोका-ए-आझम

Times now ने मुद्दामहून AAP मधून BJP मध्ये गेलेल्या शाझिया इल्मीला बोलावलंय. जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. #सब मिले हुवे है जी!

वरुण मोहिते's picture

26 Apr 2017 - 10:04 am | वरुण मोहिते

ईव्हीएम मशीन वर बोट दाखवणे चूक आहे पहिले आप ने आत्मचिंतन करावं . तरीही केजरीवाल काही ऐकणार नाहीत . आप मध्येच फूट पडणारे अजून आता .

अर्धवटराव's picture

26 Apr 2017 - 10:05 am | अर्धवटराव

आप देखील मनसेच्या वाटेवर जाताना बघुन दु:ख होत आहे. मनसेचं एक वेळ समजु शकतो. तिथे विचारधारा वगैरे प्रकार नव्हता, असला तरी लिमेटेड होता. आपचं मूळ तरी सशक्त होतं. केजरीवाल साहेबांनी आपल्या वैयक्तीक महत्वाकांक्षेसाठी म्हणा, किंवा एकुणच वकुबानुसरुन म्हणा, आपची फार धुळघाण उडवली.

अनुप ढेरे's picture

26 Apr 2017 - 10:06 am | अनुप ढेरे

सुरुवातीला अपेक्षा होत्या आपकडून. केजरीवालांनी एकच काम चांगलं केलं ते म्हणजे प्रशांत भुषण आणि योगेंद्र यादव यांना हाकलुन लावलं ते.

बोका-ए-आझम's picture

26 Apr 2017 - 10:38 am | बोका-ए-आझम

केजरीवालांनी एकच काम चांगलं केलं ते म्हणजे प्रशांत भुषण आणि योगेंद्र यादव यांना हाकलुन लावलं ते.

प्रशांत भूषण ठीक आहे. योगेंद्र यादव हा सेन्सिबल माणूस आहे. ते असल्यामुळे आआपचा एक किमान बुद्धयांक तरी होता.

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 10:24 am | गॅरी ट्रुमन

आपचं मूळ तरी सशक्त होतं.

आपचं मूळ सशक्त होतं असे चित्र उभे करण्यात मात्र केजरीवाल कमालीचे यशस्वी ठरले. खरी परिस्थिती तशी नक्कीच नव्हती. म्हणजे भ्रष्टाचार विरोध, लोकाभिमुख प्रशासन वगैरे मुद्दे महत्वाचे नाहित असे नक्कीच नाही पण ते मुद्दे मांडणारे लोक त्यावर काही चांगली अ‍ॅक्शन घेण्याच्या परिस्थितीत आहेत की नाही हे पण बघायला हवे. उद्या विजय मल्ल्याला बरोबर घेऊन कोणी दारूबंदी चळवळ चालवत असेल तर त्यावर डोळे झाकून थोडीच विश्वास ठेवायचा? डाव्या चळवळीत अग्रेसर असलेले जनेयुमधले लोक (खरे तर शहरी नक्षलवादी) बरोबर घेऊन कोणीही कुठलीही गोष्ट चांगली करू शकेल यावर माझा तरी विश्वासच नाही. हलकटातले हलकट लोक आहेत हे. आणि असल्या नकारात्मक मनोवृत्तीच्या अराजकतावादी लोकांना बरोबर घेणार्‍या कोणावरही विश्वास ठेवणे मला तरी कठिणच आहे. अनेक लोक सुरवातीच्या काळात केजरीवाल-केजरीवाल असे करत त्या मनुष्याच्या भजनी लागले होते. नशीबाने मी त्यातला कधीच नव्हतो :)

अर्धवटराव's picture

26 Apr 2017 - 10:43 am | अर्धवटराव

विचारधारा हवेत तगु शकत नाहि. तिला जीवंत ठेवणारे, सशक्त करणारे मेंदु नसतील तर त्या केवळ पुस्तकी गप्पा ठरतात. पण भारतात लोकशाहीची पानं पुढे सरकत होती. नेहरूंना नवीन राजा समजणारी
शिशु अवस्थेतली लोकशाही पुढे घराणेशाही, केंद्रीय पार्टी, केंद्र+राज्य स्तरीय पार्ट्या, आधि नाममात्र असलेला विरोधी पक्ष पुढे कडक बहुमतात येणं वगैरे पाऊलं टाकत प्रौढ होत होती. उजव्या समजल्या जाणार्‍या पक्षाने सबका साथ सबका विकास वगैरे भाषा करुनच सत्तेत यावं इतकी ति मॅचुअर झाली होती. आता स्वच्छ चारित्र्य आणि केवळ विकासाभिमुख राजकारण हा पुढील अध्याय होता. आपकडे आमच्यासारखे लोक याच अध्यायाचे रचनाकार म्हणुन बघत होते. पण या केजरी नामक कोल्ह्याने सगळी माती केली.

अशी मुक्ताफळं गोपाल राय यांनी उधळलेली आहेत. एकूण काय तर नकारात्मक राजकारण करायच्या सवयीतून हे बाहेर येण्याची चिन्हं दिसत नाहीत. काँग्रेस दुर्दैवाने तिसऱ्या क्रमांकावर गेलेली आहे. आशुतोषही आप का हरली हे सांगण्याऐवजी भाजप EVM मध्ये गोलमाल करुन जिंकली हे सांगायचा आणि प्रतिप्रश्न करायचा प्रयत्न करतोय.

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 10:29 am | गॅरी ट्रुमन

योगेन्द्र यादव यांनी आताच दिल्ली महापालिका निवडणुकांवर मार्मिक भाष्य केले--

लोक आपले नगरसेवक निवडायला बाहेर पडले पण दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांविरूध्द आणि देशाच्या पंतप्रधानांच्या बाजूने ते मत देऊन परत आले.

या प्रकारात दिल्लीच्या स्थानिक राजकारणाचे मात्र नुकसान झाले.

१. चूक EVM च्या software मध्ये नाही, तर केजरीवाल सरकारच्या software मध्ये आहे.
२. लोक आआपच्या दिल्ली विधानसभेतल्या कारभारावर भाजपच्या दिल्ली महानगरपालिकांमधल्या कारभारापेक्षा जास्त चिडले आहेत.

आत्ता आआपच्या एका भाऊने मस्त सबब सांगितली. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यामुळे भाजपला दिल्लीत मतं मिळाली. काय बोलावं आता या गणंगांना?

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 10:39 am | गॅरी ट्रुमन

१० फेब्रुवारी २०१५ रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाचा जोरदार विजय झाल्यावर सागरीका घोषने पुढील टिवटिवाट केला होता. आता ती काय म्हणेल बरे?

उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे ;)

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 10:50 am | गॅरी ट्रुमन

२०१५ मध्ये आम आदमी पक्षाचा जबरदस्त विजय झाल्यानंतरची उधोजीरावांची प्रतिक्रिया होती-- कोणत्याही लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते.

http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/delhi-poll-...

त्यावेळी उधोजीरावांनी केजरीवालना अभिनंदनाचा फोनही केला होता. यावेळी काय करणार ते बघायचे :)

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2017 - 2:05 pm | श्रीगुरुजी

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या लाटेमुळे उधोजींच्याच नाकातोंडात पाणी गेले असून ते व त्यांना पक्ष गटांगळ्या खात आहेत. त्यामुळे दिल्लीतील भाजपच्या विजयावर, खरं तर आआपच्या पराभवावर, ते काय डोंबलाची प्रतिक्रिया देणार.

एबीपी माझाच्या बातमीनुसार त्यांनी ५६ उमेदवार उभे केले होते, त्यातल्या ५५ जणांचे डिपॉझिट जप्त झालेय!
काय बोलतील आता.. :)

गॅरी ट्रुमन's picture

27 Apr 2017 - 10:19 am | गॅरी ट्रुमन

एबीपी माझाच्या बातमीनुसार त्यांनी ५६ उमेदवार उभे केले होते, त्यातल्या ५५ जणांचे डिपॉझिट जप्त झालेय!

मराठी चॅनेल आणि वर्तमानपत्रे मोड ऑन

एकाचे डिपॉझिट वाचले ही पण काही कमी महत्वाची गोष्ट नाही. एकूण मतदानाच्या १/६ पेक्षा कमी (१६.६६%) मते मिळाल्यास डिपॉझिट जप्त होते. जर उत्तर भारतीयांविरोधी भूमिका घ्यायचा इतिहास असलेल्या मुंबईतल्या एका 'मराठी माणसाच्या' पक्षाने दिल्लीत एका वॉर्डमध्ये का होईना १६.६६% पेक्षा जास्त मते मिळवली हे पण काही कमी महत्वाचे नाही.

मराठी चॅनेल आणि वर्तमानपत्रे मोड ऑफ

बहुतांश वेळा परिस्थिती अशी असते की शिवसेना उत्तर भारतात निवडणुक लढविते त्यावेळी त्या स्थानिक भागातील थोडाफार जनाधार असलेल्या कुणाला तरी आपला उमेदवार म्हणून उभा करते. त्या उमेदवारांनाही अगदी अपक्ष म्हणून निवडणुक लढविण्यापेक्षा मुंबईतून थोडीफार मदत (पोस्टर चिकटवायला, घरोघर प्रचार करायला, मतदानाच्या स्लीपा द्यायला वगैरे कामे करायला माणसे पाठवली जाणे) तर तेवढे बरे असते म्हणून ते ही शिवसेनेसारख्या पक्षाची उमेदवारी स्विकारतात. त्यांचे मुळातल्या शिवसेनेशी काही घेणेदेणे असतेच असे नाही. १९९१ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये अकबरपूर मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर पवनकुमार पांडे हा असाच उमेदवार निवडून गेला होता. १९९२ मध्ये बाबरी उध्वस्त झाल्यावर उत्तर प्रदेश विधानसभा बरखास्त झाली आणि नोव्हेंबर १९९३ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यापूर्वी महिनाभर ऑक्टोबरमध्ये शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला स्टेजवर बोलावलेही होते. त्याचा १९९३ मध्ये पराभव झाला. खरे तर थोडक्यातच डिपॉझिट वाचले त्याचे. त्यानंतर तो समाजवादी पक्षाशी संलग्न होता. १९९९ मध्ये सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून भाजप समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून त्याने लोकसभा निवडणुक लढवली होती. निवडणुक २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये याच्या भावाने (राकेश मोहन पांडे) आंबेडकर नगर (फैजाबाद) मधून बसपाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवली होती आणि भाजपच्या विनय कटियारला हरवले होते. पण २००९ मध्ये पवन कुमार पांडेने स्वतःच्या भावाचा प्रचार न करता सुलतानपूरमधून काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणुक लढविणार्‍या संजय सिंगचा प्रचार केला होता. २००९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर पवन कुमार पांडेने बसपामध्ये प्रवेश केला. तेव्हा या मनुष्याचे शिवसेनेशी (किंवा फॉर दॅट मॅटर कोणत्याही पक्षाशी) किती घेणेदेणे आहे हे समजून येईलच. तेव्हा १९९१ मध्ये अकबरपूरची विधानसभा जागा शिवसेनेने जिंकली त्याच अर्थाने बहुतेक कालच्या दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना उमेदवाराचे एका वॉर्डात डिपॉझिट वाचले असे म्हटले तरी फार चुकीचे ठरू नये.

प्रसाद_१९८२'s picture

26 Apr 2017 - 11:17 am | प्रसाद_१९८२

Jpg

प्रसाद_१९८२'s picture

26 Apr 2017 - 11:23 am | प्रसाद_१९८२

ज्या ४४ जागांवर आपचे उमेदवार पुढे आहेत तिथली ई.व्ही.एम. खराब आहे की बरोबर? आणि केजरिवालने ई.व्ही.एम.च्या विषयावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे आता आपचे निवडणुन येणारे उमेदवार, नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन आंदोलनात सहभागी होणार की राजीनामा न देता. ह्या प्रश्नांची उत्तरे केजरीवालने द्यायला हवीत.

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 4:45 pm | गॅरी ट्रुमन

ज्या ४४ जागांवर आपचे उमेदवार पुढे आहेत तिथली ई.व्ही.एम. खराब आहे की बरोबर? आणि केजरिवालने ई.व्ही.एम.च्या विषयावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे आता आपचे निवडणुन येणारे उमेदवार, नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन आंदोलनात सहभागी होणार की राजीनामा न देता. ह्या प्रश्नांची उत्तरे केजरीवालने द्यायला हवीत.

या प्रश्नाचे उत्तर आम आदमी पक्षनेते आणि ग्रेटर कैलाशचे आमदार सौरभ भारद्वाजने आधीच दिले आहे. बहुदा केजरीवालांचेही तेच उत्तर असावे :)

सगळ्या वॉर्डांमध्ये ई.व्ही.एम मध्ये फेरफार करण्यात आले होते. भाजपचे नेते त्यांच्या इन-हाऊस सेफॉलॉजिस्टसह (जी.व्ही.एल नरसिंह राव-- दुसर्‍या प्रतिसादात चुकून महेश रंगराजन लिहिले होते) कोणत्या मतदारसंघात किती टक्के मते इकडे तिकडे करायची हे ठरवतात आणि त्याप्रमाणे मते इकडची तिकडे केली जातात. ही मते फिरवताना संशयास्पद दिसणार नाही याची काळजी भाजप नेते आणि इन-हाऊस सेफॉलॉजिस्ट घेत असतात.

ज्या वॉर्डांमधून आम आदमी पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत ते इतके लोकप्रिय आहेत आणि त्यांनी इतके काम केले आहे की काही टक्के मते इकडची तिकडे करूनही शेवटी तेच निवडून आले. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या या नगरसेवकांना राजीनामा द्यायचे काही कारण नाही :)

याक्षणी भाजप १८४, आम आदमी पक्ष ४७ तर काँग्रेस २६ जागांवर पुढे आहे. यापुढे या आकड्यांमध्ये फार फरक पडू नयेत. दोन वर्षांपूर्वी भरभरून मते दिलेल्या आम आदमी पक्षाला लोकांनी चांगलेच नाकारले असा या निकालांचा अर्थ आहे. तीनही महापालिकांमध्ये आम आदमी पक्षाची कामगिरी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपेक्षाही वाईट झाली आहे असे एन.डी.टी.व्ही वर मदाखवत आहेत. हा पक्षाला बसलेला खरा झटका आहे. हा पक्ष स्थानिक पक्ष असल्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये नक्कीच अधिक चांगली कामगिरी करणे अपेक्षित होते. पण जर लोकसभा निवडणुकांपेक्षाही आआप खाली येत असेल तर मात्र पक्षासाठी ही चिंता करायची परिथिती आहे.

यापुढे आम आदमी पक्षाची वाटचाल अजिबात सोपी नाही. लोकांचा विश्वास नक्कीच उडाला आहे हे स्पष्ट दिसतच आहे. इतके महिने सत्तेचे लोणी होते आणि केजरीवाल दिल्लीपलीकडे यश मिळवतील असे चित्र जाणीवपूर्वक उभे केले जात होते त्यामुळे केजरीवालांची काम करायची पध्दत आणि हुकुमशाही प्रवृत्ती मान्य नसली तरी आमदार त्यांच्यामागे होते. पण जर केजरीवालांचा प्रभाव कितीतरी कमी झाला आहे असे चित्र उभे राहिले तर मात्र हे सगळे आमदार, नेते पक्षाबरोबर राहतीलच याची खात्री देता येणार नाही. मुळातच देवेन्द्र सेहरावत पक्षापासून नाराज आहेतच. वेदप्रकाश या आमदाराने तर सरळ पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळीच पक्षाचे ३०-३५ आमदार केजरीवालांवर नाराज आहेत असे संकेत त्यांनी दिले होते. पंजाबमधील डॉ. धरमवीर गांधी आणि हरभजन खालसा या चारपैकी दोन खासदारांना आधीच पक्षाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

अशावेळी केजरीवालांविरूध्द आवाज उठायला सुरू होणे स्वाभाविक आहे. मनीष सिसोदियांनी निवडणुकांपूर्वीच परस्पर 'या निवडणुका आमच्या सरकारवरचे सार्वमत असेल' असे म्हणून केजरीवालांनाच अडचणीत आणायचा प्रयत्न केला असे म्हणायला जागा आहे. एक तर केजरीवाल पंजाबमध्ये मुख्यमंत्री म्हणून जातील आणि आपल्याला दिल्लीचे मुख्यमंत्रीपद मिळेल ही त्यांची अपेक्षा असेलच. पण तसे काही व्हायचा प्रश्नच आला नाही. अशावेळी हे वक्तव्य आधीच परस्पर देऊन ठेऊन मग पराभव झाल्यावर 'लोकांनी आपल्या सरकारला नाकारले' म्हणून सरकारचे प्रमुख म्हणून जबाबदारी केजरीवालांनी घ्यायला हवी असे म्हणून केजरीवालांना बाजूला करायचा प्रयत्न झाल्यास त्याला सिसोदियांचीही फूस असेल ही पण शक्यता आहेच.

तसेच आम आदमी पक्षापुढे इतर आव्हाने तर असणारच आहेत. नायब राज्यपालांनी दिल्लीच्या करदात्यांच्या पैशावर पक्षाचा प्रचार दिल्लीबाहेर केला म्हणून सरकारला ९७ कोटी भरावेत हा आदेश दिलाच आहे. निवडणुक आयोगाने २१ आमदारांच्या लाभाचे पद मुद्द्यावर सुनावणी पूर्ण केली आहे आणि त्याचा निकाल कधीही लागेल. समजा निवडणुक आयोगाने या २१ आमदारांचे पद रद्द केले तर त्याविरूध्द कोर्टात जाऊन वेळकाढूपणा करायचा प्रयत्न हे करतीलच. पण ते शक्य नसेल तर या २१ जागांवर पोटनिवडणुक आली तर ते नवीन आव्हान उभे राहिल. तसेच अरूण जेटली, सुभाष चंद्रा इत्यादींनी केजरीवालांविरूध्द अब्रूनुकसानीचे खटले भरले आहेत. त्यातील अरूण जेटलींनी भरलेला खटला बराच पुढे गेला आहे. केजरीवालांच्या मते अरूण जेटलींनी भ्रष्टाचार केला असेल तर त्या भ्रष्टाचाराचे पुरावे द्यावेत इतका साधा मामला असूनही केजरीवाल त्या खटल्यात टाईमपास करत होते त्यावरूनच त्यांच्याकडे कसलाही पुरावा नाही हे स्पष्ट झालेच आहे. समजा कोर्टाने त्यांना दोषी ठरविले तर किती दिवस तुरूंगवासाची तरतूद आहे हे तपासून बघायला हवे. समजा २ वर्षांपेक्षा जास्त तुरूंगवासाची तरतूद असेल तर मात्र केजरीवाल स्वत: तुरूंगात गेले नाहीत तरी त्यांना आणखी ६ वर्षे निवडणुक लढवता येणार नाही आणि भारतीय राजकारणातील अरविंद केजरीवाल या नावाचा तो अस्त असेल.

एकूणच यापुढील काळात काय होते हे बघणे इंटरेस्टींग ठरेल.

प्रसाद_१९८२'s picture

26 Apr 2017 - 11:45 am | प्रसाद_१९८२

मनिष सिसोदिया ह्या नौटंकीबाज माणसाची अगदिच हास्यास्पद प्रेस वार्ता सध्या सुरु आहे, त्याच्या मते २००९ च्या निवडणुकीतील पराभवानंतर भाजपाच्या लोकांनी ई.व्ही.एम. कशी हॅक/टेंपरींग करता येईल यावर रिसर्च केला, जीबीएल नरसिंहाराव व अडवाणी यांनी या रिसर्च वर पुस्तक देखिल लिहिले व आज होणारे सर्व विजय त्या रिसर्चचाच एक भाग आहे असे हा मनिष सिसोदिया नावाचा महाभाग म्हणत आहे.

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 12:18 pm | गॅरी ट्रुमन

मी राजकारणात रस घ्यायला सुरवात केली अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून. १९८९ च्या लोकसभा निवडणुका त्यानंतर पहिल्या निवडणुका होत्या. तेव्हापासून दिल्ली म्हणजे भाजपचा बालेकिल्ला असे मानतच मी लहानाचा मोठा झालो. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणुक लढविणार्‍या बॉलीवूड नायक राजेश खन्नाने लालकृष्ण अडवाणींवर दोन-अडीच हजार मतांची आघाडी घेतली होती पण नंतर शेवटी अडवाणींनी ती निवडणुक थोडक्यात जिंकली.तो एकच अपवाद आहे असे वाटत होते. १९९३ ची विधानसभा तसेच १९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुका भाजपने अगदी आरामात जिंकल्या. पुढे १९९८ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला तो खरा तर माझ्यासाठी मोठाच धक्का होता. पण १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने ७ पैकी ७ जागा जिंकल्या तेव्हा वाटायला लागले की १९९८ ची विधानसभा निवडणुक हा एक अपवाद होता. पण २००० च्या दशकातील जवळपास सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसने आरामात जिंकल्या. २००३ आणि २००८ च्या विधानसभा निवडणुका तसेच २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुका काँग्रेसने आरामात जिंकल्या होत्या. त्यानंतर २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने दिल्लीतील ७ पैकी ७ जागा जिंकल्यावर १९९० चे दशक परत आले असे वाटायला लागले. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०१५ च्या विधानसभा निवडणुका मात्र अगदीच धक्कादायक होत्या.

आम आदमी पार्टीचा नाटकीपणा आणि ढोंगीपणा अगदी पहिल्या दिवसापासून नव्हे पहिल्या सेकंदापासून प्रचंड डोक्यात जायचा आणि अजूनही जातो. या असल्या पक्षाविषयी कुठल्याही क्षणी कुठलाही आपलेपणा मला कधीही वाटला नव्हता. फेब्रुवारी २०१५ च्या निवडणुकांमध्ये आआपचा विजय होणार अशी चिन्हे दिसायला लागल्यावरच (अर्थातच आआपचा इतका मोठा विजय होईल असे मात्र वाटले नव्हते पण विजय होणार असे मात्र वाटत होते) फेसबुक आणि मिपावरील दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून वावरायचे असेच ठरवले आणि त्याप्रमाणेच मिपा आणि फेसबुक या दोन्ही ठिकाणी केजरीवाल आणि आआपच्या ढोंगीपणावर प्रचंड कोरडे मी ओढलेच. मिपावरील आम आदमी पक्षाच्या सर्वात कट्टर विरोधकांमध्ये माझा समावेश नक्कीच आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या आज झालेल्या पराभवामुळे मला खूपच आनंद झाला आहे. १० फेब्रुवारी २०१५ रोजी आआप आणि केजरीवाल समर्थकांना किती असुरी आनंद होत होता हे त्यावेळी मी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर मिपावर काढलेल्या धाग्यात समजून आलेच. आपण ज्या पक्षाचा विरोध करतो त्याचा पराभव झाल्यास असुरी आनंद होणे हा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे.

१० फेब्रुवारी २०१५ रोजी केजरीवाल आणि आआप समर्थकांना जितका असुरी आनंद झाला होता त्याच्या चौपट असुरी आनंद मला होत आहे. आणि आजचा दिवस मी साजरा करणार आहे.

यापुढे आम आदमी पक्षात अजून भांडणे व्हावीत आणि केजरीवालांचे मुख्यमंत्रीपद जावे, आम आदमी पक्ष हा लवकरात लवकर इतिहास (किंबहुना एक दु:खद आठवण) बनावा हीच इच्छा. यापुढे केजरीवाल हे भारतीय राजकारणातील एक ट्रॅजिक फिगर म्हणून ओळखले जावेत आणि नुसती इतरांना नावे ठेऊन आणि आपल्या पदाच्या मर्यादा किंवा अधिकार काय आहेत हे लक्षात न घेता शहाणपणा करत अपेक्षित असलेली कामे न करता इतर सगळ्या गोष्टी करायच्या, इतर सगळ्यांना लेक्चरबाजी करायची हे प्रकार केले तर त्याचे परिणाम काय होतात याचे एक उदाहरण म्हणून केजरीवाल आणि आम आदमी पक्ष ओळखले जावेत ही इच्छा. आणि यातूनच दिल्लीतील जनेयु वगैरे हलकटातल्या हलकट डाव्या शहरी नक्षलवाद्यांना लवकरात लवकर त्यांची जागा दाखवून दिली जावी ही पण इच्छा.

या सगळ्यात वाईट याचेच वाटते की केजरीवालांच्या मर्कटलीलांमुळे यापुढील काळात भ्रष्टाचाराला विरोध, लोकाभिमुख प्रशासन वगैरे मुद्दे घेऊन राजकारणात आलेल्या प्रामाणिक लोकांकडेही मतदार संशयानेच बघतील. केजरीवालांनी या चळवळीचे हे भरून न येणारे नुकसान केले आहे.

बोका-ए-आझम's picture

26 Apr 2017 - 1:11 pm | बोका-ए-आझम

तसेच होवो ही इच्छा! त्याचबरोबर काँग्रेसलाही धुगधुगी मिळावी आणि त्यांनी एका राष्ट्रीय पक्षासारखे वावरावे असंही वाटतं.

चांदनी चौक विधानसभा मतदारसंघातून दिल्ली विधानसभेवर निवडून गेलेल्या आआप आमदार अलका लांबा यांनी त्यांच्या मतदारसंघातील तीनही जागांवरून आम आदमी पक्षाचा पराभव झाला याची 'नैतिक जबाबदारी' घेऊन राजीनामा द्यायची तयारी दाखवली आहे.

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 12:27 pm | गॅरी ट्रुमन
गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 12:29 pm | गॅरी ट्रुमन

चांदनी चौकचा परिसर म्हणजे लाल किल्ला आणि जामा मस्जिदचा परिसर. या भागात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम लोकवस्ती आहे.या भागातून आआपचा पराभव होत असेल तर विजय कोणाचा झाला हे बघायला हवे-- काँग्रेसचा की भाजपचा. की उत्तर प्रदेशात झाले त्याप्रमाणे ट्रिपल तलाकविरूध्दचा राग मुस्लिम महिलांनी भाजपला मत देऊन व्यक्त केला आहे?

सतिश गावडे's picture

26 Apr 2017 - 12:23 pm | सतिश गावडे

कविवर्य कुमार विश्वास यांचे नाव कुठेच दिसत नाही बातम्यांमध्ये.

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2017 - 12:34 pm | गॅरी ट्रुमन

एबीपी न्यूजवर आताच दाखविले की भाजपला जवळपास ४०%, आम आदमी पक्षाला २५% तर काँग्रेसला २३% मते मिळाली आहेत. म्हणजे एक्झिट पोल भाजपला ५०% मते मिळतील हा अंदाज व्यक्त करत होते तसे झालेले नाही.

या क्षणी दिल्ली विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्येही असेच मतदान झाले तर भाजपला ७० पैकी ४३, आआपला १२ आणि काँग्रेसला १० जागा मिळतील असेही एबीपी न्यूजवर दाखवले जात आहे.

प्रसन्न३००१'s picture

26 Apr 2017 - 12:48 pm | प्रसन्न३००१

१० फेब्रुवारी २०१५ रोजी केजरीवाल आणि आआप समर्थकांना जितका असुरी आनंद झाला होता त्याच्या चौपट असुरी आनंद मला होत आहे.

डिट्टो फिलिंग

अनुप ढेरे's picture

26 Apr 2017 - 2:05 pm | अनुप ढेरे

डिसेँबर 2013, फेब्रुआरी 2015, आणि आत्ता यात भाजपाचा व्होट शेअर साधारण सेम राहिला आहे. 34-35% आसपास. कॉम्ग्रेसला जी मतँ 2013 मध्ये गेलेली ती 2015मध्ये आपकडे गेली आणि 2015मध्ये आपला 54% मतं होती. सो २०१३ ही तीन लोकांमधली लढत होती. २०१५मध्ये काँग्रेस अगदीच निग्लिजिबल होती त्यामुळे २०१५ दोन लोकांची लढत होती. आता कॉंग्रेसची जुनी मतं त्यांच्याकडे परत येत आहेत आणि ही परत थ्री कॉर्नर्ड निवड्णूक झाली. सो भाजपाचा भरघोस फायदा झाला.

पुंबा's picture

27 Apr 2017 - 1:05 pm | पुंबा

हे विश्लेषण पटले.
भाजपा आणि काँग्रेस, दोघांचेही माध्यममार्गी मतदार फुटलेले. केजरीवालांच्या नालायकपणामुळे ते परत भाजप, काँग्रेसकडे परतले. आता हेच कायम राहील असे वाटते. केजरीवाल आणि आप हा फिनॉमेना संपलेला आहे. :(

एन.डी.टी.व्ही हिंदीवर आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज धक्कादायक माहिती देत आहेत.

१. आआपचा पराभव ई.व्ही.एम मुळेच झाला.
२. भाजपामधील सेफॉलॉजिस्ट (महेश रंगराजन यांच्याकडे रोख दिसत आहे) आणि सगळे लोक आधी ठरवतात की कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात मते दाखवायची म्हणजे आपले कामही होईल आणि आकडे संशयास्पदही वाटणार नाहीत.
३. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला हरवायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे काँग्रेसला जिंकवा. पंजाबमध्ये चौकाचौकात उभे राहून लोक अकाली दलाला शिव्या घालत होते. त्यामुळे अकाली-भाजप युतीला जिंकलेले दाखवले असते तर 'विद्रोह' झाला असता. त्यामुळे तसे करणे शक्य नव्हते म्हणून काँग्रेसला जिंकायचा सोपा मार्ग अवलंबला गेला.

याचाच अर्थ आपण मतदान करायला जातो आणि मशीनवरील कोणते बटन दाबतो त्यावर काहीही अवलंबून नसते. सगळे काही आधीच फिक्स्ड झालेले असते. मॉलमध्ये लहान मुलांच्या गाड्या असतात. ती लहान मुले आपणच गाडी चालवत आहोत असे समजत स्टिअरींग काय फिरवतात, ब्रेक काय दाबतात काही विचारू नका. पण प्रत्यक्ष ती मुले त्या गाड्या चालवतच नसतात. त्या गाड्या चालवत असतात मागे रिमोट कंट्रोल घेऊन फिरणारे लोक. सौरभ भारद्वाजांच्या मते मतदानाचे स्वरूप असेच दिसते.

हे अत्यंत धक्कादायक आहे.

अनुप ढेरे's picture

26 Apr 2017 - 4:44 pm | अनुप ढेरे
विकास's picture

26 Apr 2017 - 5:04 pm | विकास

दिल्ली MCD निवडणुका मतदान :
"लेहर" च्या बाजूने आणि "लहरी"च्या विरोधात ;)

विकास's picture

26 Apr 2017 - 5:14 pm | विकास

एवढ्या माणसाचे पटते आपल्याला..!!

http://www.loksatta.com/pune-news/nitin-gadkari-bjp-state-executive-meet...

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2017 - 8:13 pm | श्रीगुरुजी

अपेक्षेप्रमाणे दिल्लीमध्ये तीनही महापालिकांमध्ये भाजपचा विजय झाला. तीनही महापालिकात भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. आआप व काँग्रेसचा दारूण पराभव झाला. तरीसुद्धा तांत्रिकदृष्ट्या आआप दुसर्‍या क्रमांकावर आहे.

२६ महिन्यांपूर्वी दिल्ली विधानसभेत आआपने ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या. भाजपला फक्त ३ जागा होत्या तर काँग्रेसला भोपळा मिळाला होता. मागील २ विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी अशी होती.

२०१३ विधानसभा निवडणुक - भाजप ३४%, आआप २९%, काँग्रेस २५%
२०१५ विधानसभा निवडणुक - भाजप ३२%, आआप ५४%, काँग्रेस ९%

याचा अर्थ असा की दोन्ही निवडणुकीत भाजपची मते जवळपास कायम राहिली होती. परंतु २०१५ मध्ये आआपने काँग्रेसची तब्बल १६% मते मिळविली. त्याच बरोबरीने बसपची ४% मते देखील आआपकडे गेली होती. त्यामुळे आआपने तब्बल ५४% वर उडी घेतली. त्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या पराभवासाठी आपली मते मोठ्या प्रमाणात आआपकडे वळविली होती.

आजच्या निवडणुकीत अशी टक्केवारी आहे.

भाजप ३९%, आआप २६%, काँग्रेस २१%

म्हणजे आआपला आपली २०१३ मध्ये मिळालेली मते सुद्धा टिकविता आली नाहीत. २०१५ च्या तुलनेत काँग्रेसने आपली बरीचशी मते आआपकडून परत मिळविली आहेत. भाजपने आपल्या मतात घसघशीत ७% मतांची वाढ केली.

आजच्या निकालात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. फेब्रुवारी २०१५ मधील आआपची प्रचंड लाट ओसरू लागल्याचे ७ महिन्यांतच स्पष्ट झाले होते. सप्टेंबर २०१५ मधील दिल्ली विद्यापीठाच्या वार्षिक निवडणुकीत आआपच्या विद्यार्थी संघटनेने पहिल्यांदाच सहभाग घेतला. ती निवडणुक चौरंगी होती. अभाविप (भाजप), एनएसयूआय (काँग्रेस), एसएफआय (डावे पक्ष) आणि एआयएसए (आआप) या ४ विद्यार्थी संघटनांमध्ये लढत होती. त्या निवडणुकीत प्रचारासाठी आआपने दिल्ली विद्यापीठात एक रॉक शो आयोजित केला होता ज्याचे उद्घाटन केजरीवाल व सिसोदियांनी केले होते. उद्घाटन समारंभात केजरीवाल व सिसोदियांनी आआपच्या विद्यार्थी संघटनेला मते द्यायचे आवाहन केले होते. त्यावेळी आआपने जाहीर केले होते की त्यांच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार आआपला ४४% विद्यार्थी मत देणार आहेत.

प्रत्यक्षात मतदान होऊन निकाल लागल्यावर असे दिसले की चारही जागा अभाविपने जिंकल्या व आआपचे उमेदवार तिसर्‍या किंवा चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. अवघ्या ७ महिन्यांच्या अवधीत आआपची लाट ओसरायला लागल्याचे स्पष्ट झाले होते.

नंतर एप्रिल २०१७ मध्ये दिल्लीतील एका विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आआपचा दारूण पराभव झाला. ती जागा २०१५ मध्ये आआपने जिंकली होती. परंतु पोटनिवडणुकीत आआपच्या उमेदवाराला तिसर्‍या क्रमांकाची मते मिळून उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली. म्हणजे २६ महिन्यांनंतर आआपची प्रचंड लाट पूर्ण ओसरली आहे हे दिसून आले.

या महापालिका निवडणुकीमुळे आआपची लाट पूर्ण ओसरलेली असून ओहोटी सुरू झाली आहे हे स्पष्ट झाले आहे.

हे होणारच होते. केजरीवाल व आआपच्या नेत्यांचे मागील २६ महिन्यांपासून सुरू असलेले माकडचाळे, भ्रष्टाचार, ढोंगीपणा, अकार्यक्षमता, वशिलेबाजी इ. मुळे मतदार आआपला धडा शिकविणार हे स्पष्ट होते. केजरीवालांनी निवडणुक प्रचारात अजून खालची पातळी गाठली. भाजपला मते दिल्यास दिल्लीत डेंगू, मलेरियाची साथ येईल, भाजपचे कार्यकर्ते ट्रान्सफॉर्मरमधील तेल चोरत आहेत कारण त्यामुळे वीजटंचाई निर्माण व्हावी हा त्यांचा उद्देश आहे, भाजप महापालिकेत विजयी झाल्यास ते वीज व पाण्याचे दर वाढवतील (वीज व पाण्याचे दर वाढविण्याचा/कमी करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. तो अधिकार महापालिकेला नाही.) असा अत्यंत खालच्या स्तराचा व खोटारडा प्रचार ते करत राहिले. आपण काय करणार यापेक्षा भाजप किती नालायक हाच नकारात्मक प्रचार त्यांच्या मुळावर आला.

केजरीवाल आणि त्यांची टोळी यातून धडा शिकेल अशी अजिबात शक्यता नाही. किंबहुना त्यांनी या पराभवातून धडा शिकून वर्तन सुधारावे असे मला अजिबात वाटत नाही. कारण जोपर्यंत केजरीवाल, राहुल, उद्धव इ. मंडळी मोदींविरूद्ध नकारात्मक प्रचार करीत आहेत तोपर्यंत मोदींना अजिबात मते मिळविण्याची चिंता नाही.

प्रसाद_१९८२'s picture

26 Apr 2017 - 8:48 pm | प्रसाद_१९८२

जोपर्यंत केजरीवाल, राहुल, उद्धव इ. मंडळी मोदींविरूद्ध नकारात्मक प्रचार करीत आहेत तोपर्यंत मोदींना अजिबात मते मिळविण्याची चिंता नाही.

---
सहमत !

स्वराज पार्टी, विजेंद्र यांची त्यात ल्यात्यात सेन्सबल बोलत आहे सकाळ पासून, अजून होप ठेवावी का?
बाकी आप चा दन्गा पाहून काय बोलावे हेच कळत नाही आहे, मूर्खांच्या यादीत मी नव्हतो हे सुख की कधी अपेक्षा होत्या त्याच्या कडून याचे दुःख करू :(

गॅरी ट्रुमन's picture

27 Apr 2017 - 10:29 am | गॅरी ट्रुमन

कालच्या दिल्ली महापालिका निवडणुकांसंबंधी रोचक माहिती
१. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ३२ उमेदवारांना मिळून अवघी ५२ मते मिळाली आहेत. याचा अर्थ जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या प्राध्यापकांनीही सगळ्यांनी माकपच्या उमेदवारांना मते दिलेली दिसत नाहीत. त्यातल्याही अनेकांची मते आआपला गेली असावीत :)

२. ९० मतदारसंघात काँग्रेसचे, ४० मतदारसंघात आम आदमी पक्षाचे तर ५ मतदारसंघांमध्ये भाजपचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

३. नितीशकुमारांच्या जनता दल युनायटेडने दिल्ली महापालिका निवडणुक लढवली. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर मुळचे बिहारचे मतदार आहेत. त्यांची मते मिळतील अशी अपेक्षा असावी. पण जदयुला नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत :)

अनुप ढेरे's picture

29 Apr 2017 - 1:07 pm | अनुप ढेरे

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ३२ उमेदवारांना मिळून अवघी ५२ मते मिळाली आहेत. याचा अर्थ जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या प्राध्यापकांनीही सगळ्यांनी माकपच्या उमेदवारांना मते दिलेली दिसत नाहीत. त्यातल्याही अनेकांची मते आआपला गेली असावीत :)

नाही. साधारण ९००० मतं आहेत कम्युनिस्ट पार्ट्यांना. पण तेव्हाच, 'नोटा'ला ६०००० आहेत बहुधा.

मनोज तिवारी ला दिल्ली ची जबाबदारी देण्यामागे हे सुध्दा एक कारण होत. पुर्वांचली आणि बिहारी मते भाजपा कडे वळवणे.
भोजपुरी सुपर स्टार रहिन बा.

सुबोध खरे's picture

29 Apr 2017 - 12:33 pm | सुबोध खरे

१. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ३२ उमेदवारांना मिळून अवघी ५२ मते मिळाली आहेत.
म्हणजेच सहा उमेदवारांना त्यांच्या बायकांनी पण मते दिलेली नाहीत. ))))----

पैसा's picture

29 Apr 2017 - 12:55 pm | पैसा

=))

इरसाल's picture

29 Apr 2017 - 5:09 pm | इरसाल

याचा अर्थ असापण होतो कि काही उमेदवारांनी स्वतःलाही मतं दिली नाहीत.

अर्धवटराव's picture

29 Apr 2017 - 1:10 pm | अर्धवटराव

हा धागा प्रामुख्याने निवडणुकसंदर्भात तरिही एक ताजी नॉन राजकीय घटना सांगतो... बाहुबली २ नावाचा भयाण चित्रपट प्रदर्शीत झाला आहे. एका शब्दात चित्रपटाचं वर्णन करायचं तर "डोकेदुखी" हे एकच विशेषण वापरता येईल. अत्यंत सुमार कथानक, सुमार संगीत, बाहुबली १ पेक्षा एक इंच देखील अभिनयाची उंची न वाढवलेले कलाकार, तंत्रज्ञानाच्या वापरातुन युद्धदृष्यांना थ्रीलर बनवण्याऐवजी थिल्लर बनवणारे स्पेशल इफेक्ट्स, पांढर्‍या रंगात अधिकचा चुना मिसळुन घडवलेली नायकाची प्रतिमा... बरच काहि आहे. अजीबात बघु नका.
सर्वात जास्त राग आला त्या सो कॉल्ड सस्पेन्सचा... कटप्पाने बाहुबली को क्यु मारा. च्यायला त्याच्या...

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Apr 2017 - 1:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

तरीच केजरीवालने त्याचे ट्वीटरवर समिक्षण केले नाही ! ;)

अर्धवटराव's picture

29 Apr 2017 - 2:18 pm | अर्धवटराव

इथे केजरींचच समीक्षण व्हायची वेळ आलि आहे.

तसं बघितलं तर केजरीसाहेब अगदी चपखल उदाहरण आहे बाहुबलीचे. बाहुबली१ आणि २ मधे नेमका केजरीवाल २०१५ आणि २०१७ असाच फरक आहे. आता तुम्हाला नेमकी कल्पना येईल किती भयंकर चित्रपट आहे हा.

राघवेंद्र's picture

28 Aug 2017 - 9:58 am | राघवेंद्र

#BawanaByPoll
बवाना निवडणुकीचे निकाल येत आहेत आणि सहाव्या फेरीनंतर

काँग्रेस - सुरेंद्र कुमार - १३१८२
भाजप - वेद प्रकाश -९७४५
आआप - राम चंद्रा - ९४९९

भाजप आणि आआप या दोंघाना ही धोक्याची सुचना आहे.