एकाच नेटवर्क मध्ये दोन WiFi जोडणीसंबंधी मदत.

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in काथ्याकूट
17 Apr 2017 - 12:13 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकरहो,
मला एकाच नेटवर्क मध्ये दोन वायफाय जोडायचे आहेत. माझ्याकडे दोन राऊटर्स आहेत आणि मी दोन्ही एकाच नेटवर्कवर चालवण्याचा प्रयत्न केलाही, पण आयपी जेव्हा वीजपुरवठा बंद होऊन पुन्हा सुरु होतो तेव्हा दोन्ही राऊटर्स भांडायला लागतात आणि काही संगणक गोंधळून जाऊन विंटरनेट चालेना होतं. मग दोन्हींपैकी एक राऊटर रिस्टार्ट केल्यावर ते संगणक चालू झाले की दुसरा एखादा बंद होतो.

यात मी ISP ने दिलेले ip सेटअप एका राऊटर मध्ये केले आहे आणि एका राउटरला डायनॅमिक IP दिला आहे.
ऑफिसात सगळे संगणक आम्ही DHCP वर चालवतोय.

तरी, कृपया जाणकारांनी मदत करावी.

प्रतिक्रिया

अद्द्या's picture

17 Apr 2017 - 12:31 pm | अद्द्या

DHCP दोन्ही राउटर वर चालू आहेत का ?

अगदीच जर सेक्युरिटी ची कटकट नसेल .. तर मला ऍक्सेस द्या .. बघू काय होतंय ते :)

इरसाल कार्टं's picture

17 Apr 2017 - 12:36 pm | इरसाल कार्टं

एक्सेस बद्दल बघतो कसे जमते ते. व्यनि करेन.

अद्द्या's picture

17 Apr 2017 - 12:42 pm | अद्द्या

चालेल.. पण नाही जमलं तरी .. ज्या राउटर ला ISP कनेक्टेड आहे त्यावर च फक्त DHCP चालू ठेवा.. दुसरा " रिले " करू द्या.. रिले साठी पाहिल्याची आयपी देऊन ..

वायरलेस channel ऑटो वर ठेवा.. किंवा एकाच channel वर देऊन बघा..

दुसरा राउटर access point मोड वर ठेवा..

सुमीत's picture

17 Apr 2017 - 5:02 pm | सुमीत

हेच तुमच्या प्रोब्लेम चे निवारा करणारे उत्तर आहे, हा सेटअप खात्री ने चालवला आहे.

मला एकाच नेटवर्क मध्ये दोन वायफाय जोडायचे~~~

- माझे उपप्रश्न इथेच विचारतो लगे हाथ।
दोन डिवाइस जोडायचे आहेत एका मोबाइलच्या नेटचा इंटरनेट शेअरिंग वापरून.
मूळ नेटवर्कचा स्पीड किती हवा?
मोबाइलचा हॅाटस्पॅाट ६/८डिवाइसना एकाचवेळी वाइफाई देऊ शकतो असं स्पेसि लिहिलेलं असतं ते खरोखरच चालतं का कोणी पाहिलं आहे का?

मी ३-४ लॅपटॉप जोडले आहेत एकाच वेळी ..
jio वगैरे अनरिलाएबल असतील तर नाही सांगू शकत.. पण एयरटेल / वोडाफोन वर चांगलं चालतंय . ( अगदी HD व्हिडियो बघण्या एवढं नाही पण ईमेल वैगेरे फुटकळ गोष्टी करण्या इतकं तरी नक्कीच )

देशपांडेमामा's picture

17 Apr 2017 - 2:31 pm | देशपांडेमामा

१. ISP राऊटर चा LAN DHCP Scope आणि दुसर्या राऊटरचा LAN DHCP segment वेग वेगळा हवा
२. ISP राऊटर आणि दुसरा राऊटर इथरनेट केबलने जोडा
३. दोह्नी राऊटरचे Network SSID वेगळे हवेत
४. तुम्हाल राऊटरची Wireless रेंज वाढवायची असल्यास Wireless repeaters मिळतात. ते वापरा
५. वायरलेस channel ऑटो वरच ठेवा

देश

इरसाल कार्टं's picture

17 Apr 2017 - 5:09 pm | इरसाल कार्टं

समस्येचे निराकरण झालेले आहे.
एका राऊटर चे DHCP बंद करून टाकले आणि काम झाले.

अद्द्या's picture

17 Apr 2017 - 5:44 pm | अद्द्या

good :)

बहुतेकदा हाच प्रॉब्लेम असतो

अस्वस्थामा's picture

18 Apr 2017 - 2:46 pm | अस्वस्थामा

माझ्याकडे दोन राऊटर्स आहेत आणि मी दोन्ही एकाच नेटवर्कवर चालवण्याचा प्रयत्न केला

विडंबनाचं फुल पोटेन्शियल आहे बघा धाग्यात.. :D

अद्द्या's picture

18 Apr 2017 - 3:00 pm | अद्द्या

पाडाच मग जिलबी .

वाट कसली बघायची

इरसाल कार्टं's picture

18 Apr 2017 - 4:14 pm | इरसाल कार्टं

पाडाच जिलब्या!

दशानन's picture

18 Apr 2017 - 4:39 pm | दशानन

एकाला repitetor करा. रेंज पण वाढेल व इश्यु खतम!