एक मुक्तक

रामदास's picture
रामदास in जे न देखे रवी...
17 Apr 2017 - 3:58 pm

सकाळी घाईघाईत बुटाच्या लेसा बांधताना,
खण्णकन आवाज करत तो चौकोनी बिल्ला पोराच्या खिशातून लादीवर सांडला तेव्हा...
गजराचं घड्याळ वाजल्या सारखा मी दचाकलो.
पुन्हा एकदा तो लखलखीत तुकडा खिशात ठेवत पोरगा समंजस हसला...
म्हणाला ,
तुमचाच आहे , काल तुमच्या जुन्या शर्टाच्या खिशात सापडला आईला ,
बोहारणीला कपडे देताना.
"फेकून दे "म्हणाली
"अवलक्षणी आकाशाचा तुकडा ",
तोच दाखवून तुम्ही म्हणे तिला भूलवणीला लावलंत वगैरे वगैरे...
आणि तुम्ही तरी कुठे बघता आजकाल उद्याचा दिवस या तुकड्यात ,
सारखे हातावर हात चोळता आणि तळहातावरच्या रेषा वाचता ,
असू दया आता ते माझ्याकडे,
I am old enough ....
वगैरे वगैरे ....

मुक्त कवितासंस्कृतीमुक्तक

प्रतिक्रिया

मितान's picture

17 Apr 2017 - 4:24 pm | मितान

अहाहा !!!!!
दंडवत !

वेल्लाभट's picture

17 Apr 2017 - 5:00 pm | वेल्लाभट

कडडक ! शशक झाली असती याची.

पद्मावति's picture

17 Apr 2017 - 5:33 pm | पद्मावति

क्या बात है! क्लास्स.

राघव's picture

20 Sep 2017 - 6:48 pm | राघव

अवांतरः असल्या कलाकृती सुटणे म्हणजे फक्त बरेच दिवस मिपावर न आल्याचा परिणाम हां राघवा..!

दिनेश५७'s picture

20 Sep 2017 - 10:42 pm | दिनेश५७

मस्तच!

पिलीयन रायडर's picture

21 Sep 2017 - 11:56 pm | पिलीयन रायडर

अप्रतिम!!!

NAKSHATRA's picture

22 Jan 2021 - 8:26 am | NAKSHATRA

नेहमीप्रमाणेच अतिशय छान

चौथा कोनाडा's picture

22 Jan 2021 - 6:02 pm | चौथा कोनाडा

वाह,
+१