एक मिसळ बारा पावः नाशिकच्या मिसळपावची गाथा.

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जनातलं, मनातलं
9 Apr 2017 - 4:38 pm

नाशिकच्या मिसळीचे दिवाने हजारो है,

नाशिकच्या मिसळ दिवानग्यांची ही दिवानगी नक्की केव्हापासून सुरु झाली आणि काय काय रुप घेऊन कशी कशी नव्याने अवतरत आली ह्याची सुरसरम्य कथा मांडली आहे खालच्या माहितीपटातून. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही सेकंद चुकवू नये अशी नितांतसुंदर फिल्म मिसळपावडॉटकॉम वर असलीच पाहिजे म्हणून इथे शेअर करत आहे. एन्जॉय!!!

श्रेयनिर्देशः
दिग्दर्शक, कॅमेरामन, संकलकः तेजस जोशी
ध्वनी आणि आवाज : रुचिर पंचाक्षरी
संशोधनः लिनाली खैरनार, सी. एल. कुलकर्णी, फणिन्द्र मण्डलिक, संजीव जोशी

युट्यूबवरचा दुवा: https://www.youtube.com/watch?v=oA54bntoFxc

संस्कृतीसमाजजीवनमानउपहाराचे पदार्थचित्रपटमाहिती

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

9 Apr 2017 - 5:08 pm | अभ्या..

हायला खत्तरनाकच रे.
मस्तच गाथा मिसळपावाची.
नोट केलेल्या गोश्टी
१)तुमची पुण्यामुंबईची मिसळ हं सारखी नाही =)) =))
२) नाशिकला लोक्स सोलापूरसारखंच बोलतात.
३) दूधं घालायला. =)) =)) दूध चे अनेकवचन दूधं. सेम सोलापूर
४) प्रोप्रा.भगवंतरावांचे मुलाखत देता देता गल्ल्यावरचे बारीक लक्ष.
५) विजूशेठचा अन सीताबाईचा सच्चेपणा.
बाकी शेवटच्या लाईनीला असहमत बरका. ;) तुमची नाशिकची भारी पण आमचीही सोलापूरची मिसळ भारीच.

आमच्या सारख्या मिसळ खवय्यांना मिसळ कुठलीही आवडते चालते, फक्त ती गोड नको. उगा आमची तीच भारी आणि इतर ठीकाणची ती फालतू असा पोकळ अभिनिवेष आम्ही बाळगत नाही. आणि एक, चांगली मिसळ कधी कुठे मिळेल कधीच सांगता येत नाही. एखाद्या अगदी कळकट चहाच्या दुकानात देखील भारी मिसळ मिळू शकते. पुण्यातल्या नळस्टॉप जवळचा, आयकर गल्लीतला मिसळवाला अशीच भारी मिसळ देतो. मंगला थेटर बाहेरची मिसळ असंच एक उदाहरण.

उपेक्षित's picture

18 Apr 2017 - 5:24 pm | उपेक्षित

१००० वेळा सहमत पेशवे ....

Ujjwal's picture

10 Apr 2017 - 8:34 pm | Ujjwal

२) बराच फरक आहे

फिल्म आवडली. मस्त वाटलं पाहून.

बाकी नाशिक ही सासुरवाडी असल्यामुळे इथल्या मिसळीला वेगळाच झणझणीतपणा आहे;)

वेल्लाभट's picture

10 Apr 2017 - 7:13 am | वेल्लाभट

खलााााास व्हिडियो!!!!! तोंपासु!

व्हिडीयो पूर्ण पाहिला नाही पण नाशिकच्या बर्‍याच मिसळी खाणं झालंय. भगवंतराव, शामसुंदर, अंबिका, मखमलाबाद नाका, पाथर्डी फाट्यावरचं एक हाटेल, राजसारथीजवळची हातगाडीवरची मिसळ आणि बर्‍याच इतर. पैकी आमचा जीव अंबिका मातेवर. नासिकला गेलो की अंबिकाची काळ्या मसाल्याची मिसळ हाणायचीच.

बाकी ह्या मिसळीमुळे इतरही खाद्यपदार्थांची आठवण झाली, सायंताराचे साबुदाणेवडे, सुरतीची कढी भेळ, शौकीनची झटका पाणीपुरी, आरकेवरचं अननस सरबत, राउत आणि अकबरचा मसाला सोडा, विल्होळीच्या जैन मंदिरात सकाळी सकाळी मिळणारा पोटभरी नाष्टा, त्याच रस्त्यावरचा पुढचा हरीओम ढाबा आणि बरंच इतर.

Ujjwal's picture

10 Apr 2017 - 8:32 pm | Ujjwal

विहार ची मिसळ पण चांगली आहे

प्राची अश्विनी's picture

10 Apr 2017 - 9:17 am | प्राची अश्विनी

साधना मिसळ पण भारी आहे.

नंदन's picture

10 Apr 2017 - 9:45 am | नंदन

व्हिडिओ झकास आहे. नेमका, देखणी निमिर्तीमूल्यं असणारा. वाखु साठवली आहे, आता या मिसळजनस्थानवारीचा योग कधी येतो ते पाहू.

पुर्ण व्हिडिओ पाह्यला पण ठाण्याच्या मामलेदार कचेरीपासच्या मिसळीची सर कशालाच नाही.

मस्त डॉक्युमेंटरी आहे. जीन्स आणि मिसळपावची तुलना आवडली. अगदी परफेक्ट अ‍ॅनॉलॉजी.

पैसा's picture

10 Apr 2017 - 5:03 pm | पैसा

मस्त फिल्म! मिसळीसोबत पापड हे तिथलं एक खास प्रकरण दिसतय.

चतुरंग's picture

10 Apr 2017 - 7:19 pm | चतुरंग

मिसळीचा इतिहास बघून तोंपासु...स्लर्प...धन्यवाद हो डांगेण्णा!
नाशीकला जाऊन कित्ती वर्षं झाली? बहुदा शेवटला गेलोय तो १९८८-८९...असाच कधीतरी.
नाशीककर नगरवाल्यांसारखेच बोलतात "दुधं घातली", "ग्लासं ठेवली"! ;)
("अंबिका" या नावाचं आणि खास खाण्याचं काही नातं असावं का? कारण नगरलाही कचोरी घातलेली अंबिका भेळ मिळते..यंव रे यंव काय ती चव!)
-रं.गा.नगरकर

आज व्हिडिओ डाउनलोड करवून आणला (६४एमबी,१५मिनिटेचा), छान आहे. नाशिकच्या कोणत्या भागात आहे ही दुकाने? घाट दिसतोय. काळाराम मंदिर /गोराराम मंदिर बाजुला?
तिकडे जळगाव/खानदेशकडचे लोक असल्यामुळे मुग वापरतात.

हापिसात असल्यामुळे व्हिडिओ पाहिला नाही. पण नुकतीच 'मामाचा मळा'ला भेट दिली आणि तिथली मिसळ खाल्ली होती. मिसळपावमुळे मोठे खुश आणि उंट, घोडा, बैलगाडी यांमुळे बच्चेकंपनी खुश!

पद्मावति's picture

11 Apr 2017 - 1:15 am | पद्मावति

मस्तच! आवडला वीडीयो.

सचु कुळकर्णी's picture

11 Apr 2017 - 9:23 am | सचु कुळकर्णी

पायटि पायटि मंदिरात मारुतीरायाचा जन्मसोहला साजरा केला आन सोताचाबि ;) आन बातच गेलो मधु च्या हाटेलात एक मिस्सल तर्रि मारुन, एक आलुबोंडा रश्शात आन एक मुंगवडा. जिवाच अकोला करन म्हंतात याले.

सचु कुळकर्णी's picture

11 Apr 2017 - 9:27 am | सचु कुळकर्णी

मोबल्या वरुन मराठी टाईप नाहि होत आहे द्राविडिप्राणायाम करावा लागतोय.

चित्रगुप्त's picture

11 Apr 2017 - 4:06 pm | चित्रगुप्त

वा झकास.

जव्हेरगंज's picture

11 Apr 2017 - 6:46 pm | जव्हेरगंज

कोल्हापूरी मिसळ खूप वेळा चापली आहे.
पुन्हा कुठे ती चव भेटली नाही. पुण्यात तर अजिबात नाही.

व्हिडीओ मस्त!! नाशिकला जायची इच्छा होतेय!!

किसन शिंदे's picture

12 Apr 2017 - 4:58 pm | किसन शिंदे

ठाण्यातल्या मामलेदार मिसळीसारखी चव आजतागयत कुठेच मिळाली नाही. रच्याकने व्हिडिओ आवडला. व्हिडिओतला आवाज रानवाटाच्या स्वप्निल पवार सारखा आहे.

प्रचेतस's picture

12 Apr 2017 - 5:43 pm | प्रचेतस

बोगस आहे हो मामलेदार मिसळ

स्टॅम्प पॅड प्रॉडक्शन्स's picture

18 Apr 2017 - 2:13 am | स्टॅम्प पॅड प्र...

खूप मजा येतेय हे सगळे कंमेन्ट्स वाचून! तुमच्या प्रत्येकाच्या प्रतिसादाबद्दल खूप आभारी! या सगळे एकदा नाशिकला मिसळ खायला, अजून मजा येईन!

मनिमौ's picture

18 Apr 2017 - 6:51 am | मनिमौ

साठवली आहे. विकांताला सवडीने बघणार

राघवेंद्र's picture

18 Apr 2017 - 11:55 pm | राघवेंद्र

मिसळीची गोष्ट आवडली.

झकास. नाशिकला जावेसे वाटायला लागले व्हिडीओ बघून !