मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तिचा जन्मदिन, अर्थात व्हॅलेन्टाईन डे..!

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
आज १४ फेब्रुवारी की कायसा दिवस आहे, दुनिया हा दिवस 'व्हॅलेन्टाईन डे' म्हणून ओळखते. चांगलं आहे! परंतु आम्ही मात्र आजचा दिस हा 'तिचा' जन्मदिवस म्हणून ओळखतो..! काय विलक्षण योगायोग आहे पाहा! त्या शापित यक्षिणीचा, त्या जिवंतपणी दंतकथा बनलेलीचा जन्म आणि प्रेमदिन हे दोन्ही एकाच दिवशी...! तिची मोहकता, तिचं सौंदर्य, तिची अदाकारी, तिचं हास्य, तिचा अभिनय, तिची प्रत्येक गोष्टच जगावेगळी होती, खानदानी होती! ती..! जिथे सौंदर्याच्या सर्व व्याख्या संपतात, जिथे सुरेख-सुंदर-मधाळ-अवखळ-सौंदर्यवती-लावण्यवती इत्यादी अनेक शब्द केवळ अन् केवळ तोकडे पडतात! नव्हे, या शब्दांचा केवळ फापटपसारा वाटतो..! आम्ही रंभा, उर्वशी, मेनका वगैरे नाही पाहिल्या! पाहायची तितकिशी गरजही नाही. कारण.. ....कारण आम्ही तिला पाहिलं आहे आणि तेवढंच आम्हाला पुरेसं आहे! आज या लावण्याच्या खाणीला तिच्या जन्मदिनानिमित्त मिपा परिवार याद करत आहे... सलाम..! -- तात्या अभ्यंकर.

वाचन 13762 प्रतिक्रिया 0