गाभा:
नमस्कार,
काही मनोरंजक माहिती -
या संकेतस्थळानुसार मायबोली या मराठीतील दहा ते बारा वर्ष जुन्या आद्य संकेतस्थळाची आजची किंमत अंदाजे १९९४४ डॉलर्स, मिपा या अवघ्या दीड वर्ष जुन्या संकेतस्थळाची आजची किंमत १३७८२ डॉलर्स, ज्या संकेतस्थळाला जाहीर चॅलेन्ज देऊन तात्याने मिपा काढले त्या मनोगताची आजची किंमत ६९७२ डॉलर्स, उपक्रम या संकेतस्थळाची माहिती उपलब्ध नाही, सुरेशभट डॉट इन ची आजची किंमत १९०५ डॉलर्स, तर मराठी गझल डॉट कॉम ची आजची किंमत १००७ डॉलर्स आहे..
कालावधीच्या तुलनेत पाहता मिपाचे समभाग आजच खरेदी करून ठेवले पाहिजेत! येत्या ५-७ वर्षाच्या काळात जबरा भाव मिळेल! :)
तात्या, माझ्याकरता आजच्या बाजारभावानुसार मिपाचे काही समभाग आजच राखून ठेवा. धनादेश पाठवून देतो. :)
सर्वांचाच लाडका,
शेणगोळा.
प्रतिक्रिया
10 Feb 2009 - 10:52 pm | वेताळ
मलाही मिपाचे समभाग हवेत.काय चान्स आहे का तात्या समभाग मिळण्याचा?
वेताळ
10 Feb 2009 - 11:04 pm | शेणगोळा
हजर सभासदात तात्या दिसत नाही. बहुधा कुठल्यातरी बाईच्या किंवा बाटलीच्या मागे गेला असेल! :)
सर्वांचाच लाडका,
शेणगोळा.
11 Feb 2009 - 12:01 am | अघळ पघळ
>>हजर सभासदात तात्या दिसत नाही.
हॅ हॅ.. कारण तात्या हाच शेणगोळा आहे! :D
तात्या नवा आयडी आवडेश!!
------------
च्यायला शेणगोळा आयडीतुन सरपंच आयडीत...तात्या आमच्यावर काही कारवाई तर नाही ना...?? हवं तर उडवा बुवा हा प्रतिसाद.. =))
11 Feb 2009 - 12:02 am | शेणगोळा
हॅ हॅ.. कारण तात्या हाच शेणगोळा आहे
हा शोध आमच्याकरता नवाच आहे. धन्यवाद!
सर्वांचाच लाडका,
शेणगोळा.
11 Feb 2009 - 12:06 am | अघळ पघळ
काय तात्या?आता देऊ का दोघांचे आयपी...?? :D
---------
आणि नीलकांत तर ऑनलाईन दिसत नाही..मग सरपंच कसे काय डोकावुन गेले मध्येच?? की आणखी कुणी सरपंच आहे ?? ;-)
10 Feb 2009 - 10:58 pm | धनंजय
(यादी पूर्ण करण्यासाठी)
10 Feb 2009 - 11:01 pm | शेणगोळा
धनंजय!
सर्वांचाच लाडका,
शेणगोळा.
10 Feb 2009 - 11:22 pm | सर्किट (not verified)
आणि माझ्या कुटुंबाच्या संस्थळाची किंमतः
$1569.5
(मराठी गझल पेक्षा जास्त ? हे कसे झाले बॉ ?)
-- सर्किट
10 Feb 2009 - 11:27 pm | शेणगोळा
उत्तम!
आपल्या स्थळचेही काही समभाग आमच्याकरता आजच राखून ठेवा. त्याचा आज ना उद्या ३२०० डॉ.च्या आसपास भाव जाईल तेव्हा आम्ही ते अन्य कुणाला विकून १०० टक्के नफा कमावू. :)
सर्वांचाच लाडका,
शेणगोळा.
10 Feb 2009 - 11:35 pm | प्राजु
ही साईट मजेदार आहे.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Feb 2009 - 11:51 pm | भाग्यश्री
हाहा !! माझा ब्लॉग ज्याचं डोमेन नेम मी आता www.bhagyashree.co.cc केले आहे,
त्याची किंमत ९.७९ मिलिअन डॉलर्स आहे !!
बोला कोण घेत आहेत समभाग?? :))))))
(या अशा रिझल्टनंतर आय रिअली डाऊट त्या आकड्यांना काही अर्थ आहे का! )
http://bhagyashreee.blogspot.com/
10 Feb 2009 - 11:56 pm | शेणगोळा
मुद्दा आहे खरा गंमतीशीर! :)
भाग्यश्रीताई, आम्ही आप्ल्या ब्लॉगचे काही समभाग घेऊ इच्छितो! :)
सर्वाचाच लाडका,
शेणगोळा.
11 Feb 2009 - 11:12 am | घाशीराम कोतवाल १.२
http://bhurjipaav.blogspot.com
आमचा पन ब्लोग ईकायचा हाय
कोन घेनार फकस्त १००० डालर ला
देनार आम्ही
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
11 Feb 2009 - 12:50 am | भडकमकर मास्तर
म्हणजे मजा आहे बुवा...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
11 Feb 2009 - 12:56 am | अघळ पघळ
मास्तर, इथं इतक्या वेबसाईटची नावं आली आहेत की...ही वेबसाईट म्हणजे नक्की कुठली म्हणताय ते स्मजलच नाही.
अघळ पघळ
11 Feb 2009 - 1:00 am | टारझन
शेणगोळ्याची लेखण शैली पाहीली असता, आमच्या आतल्या गोटातून (कंपूतून) एक आवाज आला ...
आणि आम्ही इतिहास स्कॅण केला .. लेखणशैल्या चाळल्या ... शेणगोळा हा कोण्या मोठ्या व्यक्तीचा आयडी वाटला ..
असो .. त्या "मोठ्या" व्यक्तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
स्वत:चा लाडका,
टारगोळा
11 Feb 2009 - 1:45 am | ब्रिटिश टिंग्या
असेच म्हणतो!
सहमत!
- (आतल्या गोटातला कंपुबाज) टिंग्या ;)
11 Feb 2009 - 5:51 am | विसोबा खेचर
हरकत नाही, साला मिपा विकून खातो आणि मोकळा होतो! :)
बाय द वे, शेणगोळा आम्ही नाही! बाकी चालू द्या.. :)
तात्या.
11 Feb 2009 - 6:11 am | एकलव्य
बाबारे ... तात्याने विकले की किंमत घसरेल त्याचे काय?
(बिझी-बी) एकलव्य
11 Feb 2009 - 11:12 am | घाशीराम कोतवाल १.२
___________________________________________________
टॅग व्यवस्थित न बंद केल्यामुळे खालील सर्व प्रतिसाद ठळक येत आहेत. मागेही एकदा असे झाले असताना आम्हाला स्वत:ला संपादन करावे लागले व टॅग बंद करावा लागला..
आताही पुन्हा टॅग बंद करायचा राहिला आहे. सबब लेखन काढून टाकत आहोत. कृपया यापुढे आपल्या स्वाक्षरीतील टॅग बंद केला आहे याची खात्री करावी..
मुख्य व्यवस्थापन अधिकारी,
मिसळपाव डॉट कॉम.
11 Feb 2009 - 3:31 pm | बिपिन कार्यकर्ते
टॅग बंद करा
बिपिन कार्यकर्ते
11 Feb 2009 - 3:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मग तुम्हीच का नाही बंद करत हो?
अहो स्ट्राँग भुर्जी असेल त्यांची म्हणून टॅग उघडा टाकला असेल! ;-)
एक शंका आहे, ही किंमत कशी मोजतात?
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
11 Feb 2009 - 3:42 pm | दशानन
>>>एक शंका आहे, ही किंमत कशी मोजतात?
संकेतस्थळावर नियमीत होणा-या सदस्य / पाहूणे ह्यांच्या भेटी व नवीन लेखन येण्याचा वेळ ! ह्यांचे अवरेज काढतात व प्रत्येक १०० व्हिजिट ला एक डॉलर पण हे अवरेज कमीत कमी सहा महिने असावे लागते ह्या रेशोचा खेळ आहे....
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
11 Feb 2009 - 3:49 pm | परिकथेतील राजकुमार
हे आम्ही त्यांना कधिच कळवले होते !
प्रेषक : परिकथेतील राजकुमार, सोम, 02/09/2009 - 13:51
तुमच्या सहीत जरा बदल करता का ? तुमच्या त्या 'बोल्ड' अक्षरे चुकीची वापरली गेलेल्या सहीमुळे इतर सर्वांचे प्रतिसाद ठळक दिसत आहेत.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
11 Feb 2009 - 11:10 am | JAGOMOHANPYARE
सत्यमच्या राजूला दान करा....
11 Feb 2009 - 6:12 pm | अविनाशकुलकर्णी
तात्या तात्याच रहा..रामलिंगम तात्या नका होउ