आमची प्रेरणा: स्पंदन, सांजवेळ, हृदय, अवचित, मन, मोहरणे वगैरे शब्द इकडून तिकडे गुंफले की आजकाल मराठी रोमँटिक गाणं तयार होतं.
बावरे प्रेम हे या पंचनाम्यात समीरसूर यांनी आधुनिक गीत लेखकांवर असे ताशेरे ओढलेले पाहून अंमळ डचमळून आले. त्याचा निषेध म्हणून लगोलग एक गीत लिहून काढले. हौशी आणि बरा आवाज असणाऱ्या कुणीतरी या गीताला आवाज देऊन मराठी रोम्याँतिक गाण्याच्या दुनियेत अजरामर करावे ही विनंती आणि समीरसूर यांना ते सकाळ दुपार संध्याकाळ मात्रेसारखे ऐकवन्यात यावे ही विनंती.
सॉफ्ट कोरस:
ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला
जागली ह्रुदयात स्पंदने नवीs नवीs
साथ तुझी सख्या वाटते हवीs हवीs
लाउड कोरस:
ला ला ला ला ला ला
तुझा स्पर्श की मोहोर हा तनाs मनाs
गूज माझे कळे ओथंबलेल्या घनाs घनाs
लाउड कोरस:
ला ला ला ला ला ला
सांजवेळी सख्या का काहूर दाटते उरीs उरीs
का भास होती तुझे तू नसता जवळी तरीs तरीs
लाउड कोरस:
ला ला ला ला ला ला
मिठीत तुझ्या साजना बहरून आल्या जाईs जुईs
एक झाला आत्मा अता तुझ्यामाझ्या देहीs देहीs
लाउड कोरस:
ला ला ला ला ला ला
जागली ह्रुदयात स्पंदने नवीs नवीs
साथ तुझी सख्या वाटते हवीs हवीs
ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला
प्रतिक्रिया
27 Jul 2016 - 12:11 pm | उडन खटोला
गूज माझे कळले ओथंबलेल्या घनाs घना
हे
गूज माझे कळे ओथंबल्या घना
असं करा. बाकी मस्त जमलिय भेळ. (दरवेळी काय जिलेबी? मग वेरिएशन म्हणून भेळ)
27 Jul 2016 - 12:31 pm | रातराणी
सूचना पटली. सासं कुणी दुरुस्त करून देतील का प्लीज.
27 Jul 2016 - 1:23 pm | सस्नेह
बाकी भेळ किंवा दाबेली जे काय असेल ते मस्त आहे.
'गंप्या' आणि 'झंपी' हे शब्द मिस्सिंग !
27 Jul 2016 - 1:35 pm | रातराणी
थँक यू ग. पण सॉरी अगं ते गूज माझे कळे ओथंबल्या घनाs घनाs असं हवं. ते इकोसारखं कानात वाजत राहिलं पाहिजे. म्हणून प्रत्येक कडव्यात शेवटी तसे S S वाले शब्द घातलेत. तिथे हिरवीन कधी गालाला हात लावून अरेच्या गाल आहे होय इथे अशी चकीत झालेली दाखवायची, कधी कानाला हात लावून कानातल पडलं नाही ना असं तपासनारी तर कधी चक्कर येईपर्यंत गोल गोल फिरवायची अशी मी कोरियोग्राफी पण ठरवून ठेवली आहे. तुला कंटाळा आला असेल तर राहू दे आता. रिटेक करू आपण पाहिजे तेवढे.
27 Jul 2016 - 3:49 pm | जव्हेरगंज
'गंप्या' आणि 'झंपी' मिस्सिंग !
करेक्ट!!!!
29 Jul 2016 - 2:02 pm | उडन खटोला
गंप्या च्या आवाजात- झंपी आठव तुझा येई मज क्षणा क्षणा
झंपी "-"-"-"- - गंप्या -"-"-"-"-"-"-"-
27 Jul 2016 - 12:24 pm | अभ्या..
हिहीहीही, झबा आला डोळ्यासमोर हे गाणे म्हणताना.
27 Jul 2016 - 12:33 pm | रातराणी
आणि हिरवीन नाही दिसली होय डोक्यावर ओढणी धरून सैरावैरा पळणारी?
27 Jul 2016 - 12:48 pm | अभ्या..
मराठी पिक्चरची हिरावीन हि इमॅजिन करणे सुद्धा त्रासदायक. हिरो निदान कॉमेडी तर करतात.
27 Jul 2016 - 12:32 pm | नीलमोहर
अंगावर काटा आला वाचतांना.. आपलं.. कस्ससं कस्ससं झालं..
मन मोहरून गेलं.. नाही बावरून गेलं..
कधी ह्याच्यावरून.. कधी त्याच्यावरून.. कुण्णा कुण्णावरून गेलं..
इश्श, जाऊ दे बाई...
27 Jul 2016 - 12:37 pm | रातराणी
आँ अच्च्च जालं तर!
27 Jul 2016 - 1:26 pm | पैसा
मी चुकून "जंगली स्पंदने" वाचते आहे मगाचपासून.
27 Jul 2016 - 1:41 pm | रातराणी
तुमचा प्रतिसाद विडंबन काराना आमंत्रण आहे. :) एक मलाच सुचतय पण एस दादा रागवतात. =))
27 Jul 2016 - 1:49 pm | समीरसूर
अहो करा करा...थोडं झिंगाट लिहिलं की फर्मास तरतरी येते. एकदम कडक चहा पिऊन येते तशी... :-)
आणि असं झिंगाट लिहायला प्रतिभा लागत नाही असं थोडीच आहे. ;-)
27 Jul 2016 - 1:35 pm | एस
वाया नका घालवू तुमची प्रतिभा असले काही (बाही) खरडत बसण्यात. 'भग्न शरीरे' चा पुढचा भाग कधी येतोय?
27 Jul 2016 - 1:38 pm | रातराणी
सुचत नाहीये दादा आता :) जरा हलक फुलंक काहीतरी लिहून परत ट्राय करेन म्हणते. :)
27 Jul 2016 - 1:40 pm | समीरसूर
ज ब रा!!! हसून जबडा दुखायला लागला. :-):-):-)
तेरे मेरे स्पंदन में, कैसा है ये बंधन, बावराना....
मैने नही जाना, तुने नही जाना...
एक मोहर जाये, दुजा खिलता ही जाये...एक मोहर जाये, दुजा...खिलता ही जाये
मलमली सांज में सखा बहकता जाये...
जैसे पापी हो कोई, ओ ओ, जैसे पापी हो कोई, पुराना...
मैने नही जाना, तुने नही जाना...
तेरे मेरे स्पंदन में, कैसा है ये बंधन, बावराना....
मैने नही जाना, तुने नही जाना...
27 Jul 2016 - 1:50 pm | रातराणी
वा वा समीरजी इसपे तो हम मस्त रुलानी मुजीक दे सकते है. इतना रुलायेंगे की लोग रो रो के रो रो के शर्ट की बाही को नाक पुसेंगे.
27 Jul 2016 - 3:16 pm | ज्ञानोबाचे पैजार
तो तुंदिलतनु स्वप्नील (स्वेटर मधे पोट लपवत) हे गाणे गात कोठार्यांच्या सुनबाईच्या मागे धावतो आहे असे दृष्य डोळ्या समोर उभे राहिले.
पैजारबुवा,
28 Jul 2016 - 8:17 pm | रातराणी
मला उप प्रतिसाद द्यायचा सुचतं नाहीये पण या धाग्यावर सगळ्यांना दिला आहे. म्हणून हा पण ;)
29 Jul 2016 - 10:36 am | ज्ञानोबाचे पैजार
प्रत्येक वेळी उप-प्रतिसाद दिलाच पाहिजे असे नाही.
सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः
सर्वेभ्यो ब्राम्हणेभ्यो नमो नमः
असे म्हणाले की काम होते. आपल्या शास्त्रात सगळ्या सोई आहेत.
पैजारबुवा,
29 Jul 2016 - 10:56 am | रातराणी
आम्ही सगळ्याचं शास्त्राचा अभ्यास कमी केला आहे. अद्न्यानातले सुख :)
28 Jul 2016 - 1:35 am | पद्मावति
:) मजेदार कविता.
28 Jul 2016 - 8:08 pm | रातराणी
:)
28 Jul 2016 - 12:19 pm | नाखु
आणि टक्याची माफी मागून (पहिला मान त्या शिषोत्तमाचा आहे)
आम्ची चार आण्याची दाद :
अलाउड कोरस:
ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला
ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला
ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला
टाकली गद्द्यात कवने काहीs काहीs
हात तुझे वाच्का (का) सारते बाहीs बाहीs
अलाउड कोरस:
ह्या ह्या ह्या ह्या ह्या
माझा हर्ष की मुजोर हा बाणाs बाणाs
तूज माझे कळे झोंबलेल्या खुणाs खुणाs
अलाउड कोरस:
ख्या ख्या ख्या ख्या ख्या ख्या
दरवेळी सख्या का बाजार उठतो धागाs धागाs
का खास होती दंगल तू नसता कधी जागाs जागाs
अलाउड कोरस:
हुर्र हुर्र हुर्र हुर्र हुर्र हुर्र हुर्र
पीठाने तुझ्या बावळ्या बिघडूल्या जिलब्या ठाईs ठाईs
ऐक अता आत्मा बोल तयारी बिना खरडणे नाईs नाईs
अलाउड कोरस:
ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु
टंकली मुद्द्यात स्फुंटके धुरीs धुरीs
नको तुझी वा$हवा टोचते उरीs उरीs
अलाउड कोरस:
ह्याला लाह्या ह्याला लाह्या ह्याला लाह्या
ह्याला लाह्या ह्याला लाह्या ह्याला लाह्या
ह्याला लाह्या ह्याला लाह्या ह्याला लाह्या
नाखु लाहीवाला
28 Jul 2016 - 8:01 pm | रातराणी
ह्या ह्या कोरस भारी!
29 Jul 2016 - 3:04 pm | सूड
हा मुजोर बाणा नक्की कोणत्या भाषेतला आहे?
29 Jul 2016 - 4:04 pm | अत्रुप्त आत्मा
@अलाउड कोरस:
ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु››› =))
28 Jul 2016 - 12:30 pm | सतिश गावडे
आमच्या एका परम मित्राचा "कातरवेळ" शब्द राहिला की =))
28 Jul 2016 - 8:08 pm | रातराणी
कातरवेळ म्हणताना आमच्या गायिकेला जरा कात्रीत सापडल्यासारखं होत होतं म्हणून सांजवेळ हा सौम्य शब्द टाकला आहे.
29 Jul 2016 - 4:13 pm | वेल्लाभट
लोल