माझी जंगलची सैर

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 10:32 am

काल घरी काहीच काम नव्हत, म्हणुन म्हटल चला आज जंगलात फिरुन येऊ, सोबत माझा मित्र अमित पण होता. आम्ही बाईक वरुन जंगलात जायला निघालो तसा जंगलात जाणारा रस्ता हा काही एवढा खास नव्हता पण बैलगाड्यांच्या जाण्यायेण्याने बऱ्यापैकी गाढ रस्ता तयार झाला होता.

बंधाऱ्याच्या पिचींग वरुन जातांना खाली बघतांना खुप मस्त वाटत होत. बंधाऱ्यात थोडसच पाणी होत . काही मुले त्यात मासे पकडत होते. काही पाण्यात पोहोण्याचा मनसोक्त आनंद लुटत होते.,

आमच्या गावाकडच्या जंगलात रानातील आंबे खायला खुप मजा येते. त्या रानआंब्यांच्या चवेची सर या बाजारातील हापुस , ना कलम ना राजापुरी ना केशरी ला पन नाही येणार .. अस मला तरी वाटत .

थोड्याच वेळात आम्ही जंगल्याच्या जवळ येऊन पोहोचलो.
बाईक जांभळीच्या झाडाखाली लावुन आम्ही जंगलात ऊतरलो पण या वर्षी निसर्गाने साथ न दिल्यामुळे थोडेफारच आंबे आले होते .

समोरच्या एका आंब्याच्या झाडावर आंबे आम्हाला दिसले ..
अमित पटकन त्यावर सरसर चढला .मोजुन तिन चार पिकलेले आंबे सापडले ते रसाळ आंबे आम्ही चवीचवीने खाल्ले.

मग आम्ही आणखी पुढे चालायला निघालो जंगलात एका ठिकाणी एक छोटासा पाण्याचा झिरा आहे त्यातील पाणी मडक्यातील पाण्यासारखे थंड लागते .
भर ऊन्हाळ्यात देखील हे पाणी कधी आटत नाही .

जंगलात गेलेली माणसे नेहमी ईथे पाणी पितात आम्ही पण ते थंडगार पाणी पळसाच्या पानाचा द्रोण करुन पोटभर पिले.

पाणी पिऊन आम्ही खाली उतरलो. गप्पा मारत मारत मी आणि अमित चाललो होतो . एवढ्यात माझ लक्ष बाजुला गेले तिथे एक माणुस ओढ्याजवळ बसला होता त्याच्या हातात धारदार कुऱ्हाड होती. मी अमित ला शांत होण्याचा ईशारा केला . काही वेळ असाच शांततेत गेला .मग आम्ही समोरच्या आंब्याच्या झाडाकडे गेलो थोड्याच वेळात तो माणुस रागीट नजरेने बघत निघुन गेला. तो निघुन जाताच अमित पुन्हा तिथल्या झाडावर चढला या वेळेस आम्हाला पिकलेले आंबे खुप मिळाले आम्ही खुप आंबे खाल्ले बाकी राहिले ते पिशवीत घेऊन आलो. बाईक जवळ येऊन आम्ही सोबत आणलेली पाण्याची बाटली डिकीतुन काढली . मी घरुन येतांना भाकरी व लसणात ठेचलेली लाल मिरची आणली होती. मस्तपैकी आम्ही त्या शिदोरी वर ताव मारला त्या निसर्गरम्य वातावरणात ती मिरची भाकर पण पंचपक्वाना पेक्षा गोड लागत होती.
भाकरी खाऊन होताच आम्ही . आजुबाजुच्या दृश्यांचे फोटो मोबाईल मध्ये काढले. जंगलातील कोकीळेचा आवाज पण रिकॉर्ड केला .

आता खुप वेळ झाला होता .म्हनुन आम्ही बाईक वर बसुन गाढ रस्त्याने घरी निघालो. कारण त्याच्या येण्याची वेळ झाली होती......... वाघोबा.

कथाआस्वादअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

31 May 2016 - 11:03 am | चांदणे संदीप

बाके, काय म्हणता दिनुराव? बर्याच दिवसांनी येण केलंत! काळी मावशी बरी आहे का?

Sandy

अभ्या..'s picture

31 May 2016 - 11:05 am | अभ्या..

मावशी मोजींची ना?

चांदणे संदीप's picture

31 May 2016 - 11:51 am | चांदणे संदीप

हो, पण शेजारी बिजारी राहत असली तर सहज चौकशी करावं म्हटल!

दिनु गवळी's picture

31 May 2016 - 12:18 pm | दिनु गवळी

जरा बिझी होतो राव...

नाखु's picture

31 May 2016 - 12:31 pm | नाखु

अता आधिच्या क्रमशः पुर्ण करा..

अखिल मिपा दिनुजीवननिमिषसुश्रीविनाशी भयरोमांचाद्भुतअतर्क्य अनाकालनीय अनवट अफाट अगम्य कथा वाचक संघ
यांचे तर्फे जोरदार निवेदन.

दिनुजीवननिमिषसुश्रीविनाशी ही मिपा सिद्ध्हस्त लेखकांची नामावली आहे

जव्हेरगंज's picture

31 May 2016 - 7:47 pm | जव्हेरगंज

=))

हे विनाशी कोण?

नाखु's picture

1 Jun 2016 - 8:19 am | नाखु

त्यांचे लेखन कार्य

जव्हेरगंज's picture

1 Jun 2016 - 8:59 am | जव्हेरगंज

खिक्क!

आनन्दा's picture

1 Jun 2016 - 1:27 pm | आनन्दा

हा. तेच म्हणायला आलो होतो. म्हणले त्यांना विसरलात की काय?

जव्हेरगंज's picture

31 May 2016 - 7:51 pm | जव्हेरगंज

पुन्हा एकदा,
पेशल दिनूस्टाईल कथा!

शेवट वाचून स्पा च्या भाषेत सांगायचं तर "हरलोच आता =)) ;) "

अत्रुप्त आत्मा's picture

31 May 2016 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा

पांडू मोड अॉन
बरं मग!?
पांडू मोड अॉफ

फोटु मिळाले ना ते धुवून झाले की टाका इकडे. तो माणूस नंतर गायब झाला का? भूत होता का?

सिरुसेरि's picture

1 Jun 2016 - 9:44 am | सिरुसेरि

छान विडंबन .

दिनु गवळी's picture

1 Jun 2016 - 11:09 am | दिनु गवळी

तो साधारण माणुस होता लाकुडतोड्या

बोका-ए-आझम's picture

2 Jun 2016 - 12:23 pm | बोका-ए-आझम

आणि मग चटणी भाकरी खाल्लीत? एकाच दिवशी?