माणूस ..... खलील जिब्रान
लेखनप्रकार
माझ्या भटकंतीत मी एका बेटावर पोहचलो.
तिथे मला एक राक्षस दिसला. त्याचे शरीर अवाढव्य होते. पायाला लोखंडी खूर होते.
परंतु, त्याचे डोके मात्र माणसाचेच होते.
तो, पृथ्वीवरील घनदाट जंगले, उंच उंच पर्वतं, विस्तीर्ण पठारे, समृद्ध खाणी अधाशीपणे खायचा.
त्याचा तो अधाशीपणा मी बराचवेळ पहात राहिलो. शेवटी त्याला विचारले,
‘ इतके सारे खाऊन पिऊनही , तुझी तहानभूक शमतच नाही का?’
त्यावर राक्षस म्हणाला, ‘मित्रा, तसे तर माझे पोट कधीच भरले आहे!
एवढेच नव्हे, तर मला या खाण्यापिण्याचाही अतोनात कंटाळा आलाय .
पण, माझ्या मनात सारखी एकच भीती असते – उद्या खाण्यासाठी पृथ्वी राहणार नाही, आणि पिण्यासाठी समुद्र राहणार नाही. म्हणून मी आपला सारखा खात-पित राहतो!’
खलील जिब्रानच्या 'The Plutocrat' या रूपक कथेचा भावानुवाद.
वाचन
5785
प्रतिक्रिया
0