फुलांवर करायचे फोटोग्राफिचे किडे

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in मिपा कलादालन
4 Feb 2016 - 3:45 pm

सध्या फुल ह्याविषयावार छायाचित्रण स्पर्धा चालू आहे. तिथं कुठला फोटो टाकावा हे काही झेपेना आणि स्पर्धेसाठी नाही म्हणून प्रतिक्रियत टाकायाला पण फार जास्त फोटो झाले. म्हणून हा लेख. फोटोबरोबर काही तांत्रिक गोष्टींचीही चर्चा करण्याचा प्रयत्न. तसा मी होशी आणि चुका करून शिकलेलो आहे. काही त्रुटी राहिल्यास दाखावून द्याव्यात.

फुलं हा अनादिकाळापासून अनाहितांच्या शृंगारासाठी हक्काचा आणि प्रेमासाठी जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे त्यांना पुष्पांजली वाहून लेखाची सुरूवात करतो.
फोटो क्रं १
DSC_0429

खरिखुरी मॉडेल न मिळाल्यामुळी लालबाग येथील फ्लॉवर शो मधील मॅनेक्वीन चा फोटो काढला आहे. गोड मानून घ्या.

संत व्हॅलेंटाईन जन्मतिथिसारखे अपवाद सोडले तर पुरुषांना फुलांशी फारसं देनंघेनं नसायच. ह्याला काही अपवाद होते चाचा नेहरूंसारखे रंगेल किंवा मनगटावर माळ बांधून त्याचा वास घेत लावणीचा आनंद घेणारी मंडळी. गेले ते दिवस. असो.
पण जसजसे डिएसलार लोकप्रिय झाले तसं थोडं चित्र बदलल. कारण फोटोग्राफीमध्ये व्हाईट बॅलन्स, कलर मोड, डेप्थ ऑफ फिल्ड आणि काम्पोझिशन शिकण्यास फुलं अत्यंत योग्य.

फुलांचे फोटोग्राफी काढातानी कोणते नियम पाळावे लागतात का? तर उत्तर नियम पाळणे फारसं गरजेचं नाही, प्रयोग करत रहा., पण काही गोष्टींची काळजी मात्र जरूर घ्या. सुरुवात करण्याआधी, तीन गोष्टी पाहिजे तश्या सेट करून घ्या.
१. व्हाईट बॅलंस : फुलांचे नैसर्गिअक रंग पकडण्यासाठी हे जरून आहे. ग्रे कार्ड वापरणे अतिशय फायद्याचं ठरत. इथं थोड चिटिंगही करता येत. उदा. भर दुपारी भडक रंगाच्या फुलं काढताना कधी फ्लुरोसंट व्हाईट बॅलंस सेट करून पहा. डोळ्याला शांत वाटणारे रंग मिळतात.
२. कलर मोड : हा एक कमी चर्चलेला विषय आहे. बर्याच कॅमेरांम्ध्ये डिफॉल्ट मोड व्हिव्हिड असतो. गडद रंगाच्या फुलांचे फोटो काढताना हा मोड त्रासदायक ठरतो. रंग अति भडक दिअतात. न्युट्रल किंवा स्टंडर्ड मोड मला सोईस्कर वाटले आहेत.
३. एक्स्पोजर : व्हाईट कार्ड वापरून हे बरोबर सेट करता येतं. जर व्हाईट कार्ड नसेल तर वापरायचे काही ठोकताळे. जर फुल फि़कट रंगाचे असेल तर थोडसं अंडर एक्स्पोज करून पाहा. फुल जर गडद रंगाचे असेल तर थोडसं ओव्हर एक्स्पोज करून पाहा.

अक्सेसरीज :
१. लेन्स :
लेन्स हा एक महत्वाचा घटक मॅक्रो लेन्स आणि टेलिफोटो लेन्सेस फुलांच्या फोटोग्राफीसाठी जास्त उपयुक्त ठरतात. बॅकग्राउंड ब्लर आणि बोखेच्या द्रुष्टीने जास्त फायद्याच्या. या लेखातील बहुतांशी फोटो nikon D3100 , 60mm f2.8 macro lens वापरून तर एखादा 70-300mm lens वापरून काढले आहेत. मॅक्रो लेन्स नसेल तर क्लोज अप फिल्टर हा स्वस्त पर्याय उपलब्ध आहे. काही लोग एक्स्टेंशन ट्युब आणि लेन्स रिव्हर्सल रिंगचाही उपयोग करतात.
३. थ्री इन वन कार्ड - ग्रे, व्हाईट आणि ब्लॅक कार्ड एकत्र येतात. ग्रे आणि व्हाईटचा उपयोग वर पाहिला आहे. ब्लॅक लाईट अ‍ॅब्सॉर्बंट म्हणून किंवा बॅकाड्राप म्ह्णून ही वापरता येते.
३. फ्लॅश - रींग फ्लॅश वापरून बॅकग्राउंड पूर्ण घालवता येते (मी कधी वापरला नाही). हेच काम काही अंशी नेहमीचा एक्स्टर्नल फ्लॅश वापरून ही करता येते. जवळून फ्लॅश मारा, आणि पोस्टप्रोसेसिंग्मध्ये क्वाँट्रास्ट आणि शॅडो़ज एड्जस्ट करून काहीसा रींग फ्लॅश सारखा इफेक्ट मिळवता येतो.

आता फुलांचे फोटो काढण्याचे वेगवेगळे प्रकार.
१. गुच्छ, ताटवा व अनेक फुले एकत्र-
ह्या प्रकारच्या फोटोत, बॅकग्राउंडचा काँट्रास्ट आणि ब्लर ह्या दोन गोष्टींवर प्रयोग करता येतात. क्ल्टर किंवा गर्दीमुळे फोटोची शोभा जाणार नाही ह्याची काळजी घ्या. काही उदा.

फोटो क्रं २
DSC_0770

फोटो क्रं ३
DSC_0725

फोटो क्रं ४
roses

२. खाली पडलेलं फुल - असा फोटो काढताना आजूबाजूची परिस्थिती फोटोत दिसू द्या. फुलाचा रंग ऊठावदार असेल तर असे फोटो चांगले येतात. जमीनीवर पडलेल्या गुलमोहराचा फोटो.

फोटो क्रं ५
orphened beauty

३. बॅकग्राऊंड आयसोलेशन (ब्लर): हा सर्वात जास्त लोकप्रिय प्रकार आहे. ह्यात फुलाचा रंग बॅकग्राऊंडपेक्षा वेगळा आणि शॅलो डेप्थ ऑफ फिल्ड वापरून बॅकग्राऊंड एक्दम ब्लर करून टाकायचा.

फोटो क्रं ६ भडक फूल आणि हिरवी बॅकग्राऊंड
DSC_0727

फोटो क्रं ७
DSC_0224

फिकट फूल आणि फि़कट बॅकग्राऊंड

फोटो क्रं ८
flower1

पांढरे फुल आणि रंगतार भडक बॅकग्राऊंड

फोटो क्रं ९
1-DSC_0624

३. बॅकग्राऊंड डीफ्युजन - हा माझ्या सर्वात आवडीचा प्रकार. फुल अलगदपने बॅकग्राऊंडशी एकनिष्ट होण्याचा किंवा त्यातून बाहेर पडात असण्याचा होणार भास. येथे फूल आणि बॅकग्राऊंड ह्यांचा रंग एक असावा लागतो आणि डेप्थ ऑफ फिल्ड अत्यंत कमी ठेवावी लागत. काही वेळा पोस्टप्रोसेसिंगमध्ये ब्लर घालावा लागतो.

फोटो क्रं १०
Hibiscus

फोटो क्रं ११
DSC_0807

बॅक लाइट वापरून इथे छान इफेक्टस मिळवता येतात. त्याची काही उदा.

फोटो क्रं १२
DSC_0755

फोटो क्रं १३
DSC_0184

रेनलिलिसारखी फुलं जी दाटीवाटीनं लावतात तिथे पार्शियल डिफ्युजन मिळवता येत. दोन उदा.

फोटो क्रं १४
white1

फोटो क्रं १५
DSC_0829

४. मॅक्रोज आणि क्लोजअप.
फुलांच्यात आत एक अदभुत जग दडलेलं आहे, मॅक्रो लेन्सने ते प्रभावीरित्या टिपता येत. काही उदा.

फोटो क्रं १६ जर्बेरा
DSC_0487

फोटो क्रं १७ लाजाळू
DSC_0922

पा़कळी आणि त्यावरील पाण्याचे थेंब अथवा दवबिंदु हा एक रम्य देखावा. मक्रो लेन्स येथे प्रभावी ठरते.
फोटो क्रं १८
DSC_0569

फोटो क्रं १९
DSC_0586

फोटो क्रं २०
1-DSC_0571

५. फ्लॅश आणि मॅक्रो लेन्स वापरून काढलेले काही फोटो

फोटो क्रं २१ दोन कळ्या आणि फुल मिळून मस्त घड्याळ तयार झाल आहे.
DSC_0872

फोटो क्रं २२ उजव्या बाजून एक्स्टर्नल फ्लॅश
DSC_0819

फोटो क्रं २३ गुलाब
DSC_0317_1

फोटो क्रं २४ ब्रह्मकमळ
brahma_kamal2

फोटो क्रं २५ हे एक मेलेलं फुल. सर्व पा़कळ्या गळून पडल्या आहेत. बीया तयार होण्याचा मार्गावर आहे. पुनर्जन्म तो हाच.
DSC_0300

फोटो क्रं २६ वॉटर लिलि.
lilli3

६. मोनोक्रोम: रंग काढून घतले तरी फुलांच सौंदर्य कमी होत नाही ह्याचं एक उदा

फोटो क्रं २७
DSC_0488

७. प्रोसेसिंग - ह्यात अनेक किडे करता येतात.
इथे बॅकग्राउंड पूर्णतः काढून टाकता येत. गिम्प मध्ये फोरग्राऊंड सिलेक्शन टूल ह्यासाठी उपयुक्त आहे. उद.

फोटो क्रं २८ अजून एक वॉटर लिलि. इथे बॅकग्राउंड प्रोसेसिंगमध्ये काढून टाकले आहे.
lotus
खालील दोन फोटोतील ट्रिक वाचकांनी ओळखायची आहे.

फोटो क्रं २९ जास्वंद

Negative Thinking

फोटो क्रं ३० गुलाब
DSC_0279_1

फोटो स्टॅकिंग हा एक प्रकार अजून करून पाहिला नाही. तसं करायला किडे बरेच आहेत आणि एका पोस्टसाठी इतके फोटो पुरे झाले. :) तुमची मते, टिका आणि सुधारणांच प्रतिक्रियेमध्ये स्वागत आहेच :)

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

4 Feb 2016 - 3:49 pm | विजय पुरोहित

अप्रतिम! डोळ्याचं पारणं फेडणारी फोटोग्राफी...
एका धुंद, सुगंधित, स्वप्नमय दुनियेत हरवून जाण्याचा अनुभव आला........
अनेक फोटोग्राफिक संकल्पना आज प्रत्यक्ष पहायला मिळाल्या. नाहीतर फोटोग्राफीतील काही कळत नाही.

मयुरMK's picture

4 Feb 2016 - 3:55 pm | मयुरMK

तुमचाच नंबर
बाकी तुम्ही पण बेंगलोर मधे राहता का

पॉइंट ब्लँक's picture

4 Feb 2016 - 5:24 pm | पॉइंट ब्लँक

हो मी बेंगलोर मध्येच रहातो. :)

मयुरMK's picture

4 Feb 2016 - 5:43 pm | मयुरMK

mee pan :) म्हणजे जॉब साठी आहे अन्चीपेठ मध्ये

स्पा's picture

4 Feb 2016 - 3:55 pm | स्पा

अप्रतिम लेख
खूप सुधारणा हवी आहे स्वतामध्ये :)
धन्यवाद

संदीप डांगे's picture

4 Feb 2016 - 4:07 pm | संदीप डांगे

बाडीस... खंम्प्लिटली...

पॉइंट ब्लँक's picture

4 Feb 2016 - 5:25 pm | पॉइंट ब्लँक

धन्यवाद, शिकण्याला आणि सुधारणा करण्याला शेवट नाही.

प्रमोद देर्देकर's picture

4 Feb 2016 - 3:55 pm | प्रमोद देर्देकर

मस्त , चांगली छायाचित्र आहेत सगळी.

पद्मावति's picture

4 Feb 2016 - 3:58 pm | पद्मावति

अप्रतिम छायाचित्रे!

यशोधरा's picture

4 Feb 2016 - 4:00 pm | यशोधरा

नंबर २ आणि ८ खूप आवडले.

प्रीत-मोहर's picture

4 Feb 2016 - 4:04 pm | प्रीत-मोहर

__/\__

शब्दबम्बाळ's picture

4 Feb 2016 - 4:11 pm | शब्दबम्बाळ

सगळेच फोटो एकदम मस्त!! त्यामुळं कुठला जास्त आवडला हे ठरवता येईना.
पोस्ट प्रोसेसिंग पण छान केलंय...
मॅक्रो अजून कधी जमले नाहीत मला नीट, प्रयत्न करेन! :)

पॉइंट ब्लँक's picture

4 Feb 2016 - 5:29 pm | पॉइंट ब्लँक

मॅक्रो अजून कधी जमले नाहीत मला नीट, प्रयत्न करेन! :)

मॅक्रो शिकायला थोडा वेळ लागतो. डेप्थ ऑफ फिल्ड एकदा समजू लागली की मग वेगात प्रगती होईल. दोन गोष्टी एकाच वेळी हँडल कराव्या लागतात. जस तुमचं अपरेचर व्हॅल्यु छोटी होइल तशी डेप्थ ऑफ फिल्ड कमी होते तसच, जस तुमचा सबजेक्ट पासून अंतर कमी होईल तशी डेप्थ ऑफ फिल्ड कमी होते.

मयुरMK's picture

4 Feb 2016 - 4:21 pm | मयुरMK

गुलाबाच्या फुलाखाली एक्ष्त्रनल फ्लश मारला आहे व वरून फोटो टिपला आहे

पॉइंट ब्लँक's picture

4 Feb 2016 - 5:30 pm | पॉइंट ब्लँक

नाही. त्या दोन्ही फोटोतील इफेक्ट फ्लॅशमुळे नाही आहे :)

काही फुलांचे फोटोज पेन्टिंग्स वाटत आहेत अप्रतिम आहे प्रोसेसिंग :)

अजया's picture

4 Feb 2016 - 4:37 pm | अजया

अप्रतिम

उगा काहितरीच's picture

4 Feb 2016 - 4:48 pm | उगा काहितरीच

सुंदर फोटोज !

नाखु's picture

4 Feb 2016 - 4:49 pm | नाखु

पण हे सगळं आम्हाला जमेल असं (नक्कीच) वाटत नाही !

साध्या पॉवर शॉट कॅमेर्यातील खुड्बुड नाखु

पॉइंट ब्लँक's picture

4 Feb 2016 - 5:33 pm | पॉइंट ब्लँक

न जमायला काय झालं दादा. काढा कॅमेरा बाहेर, जा बागेत आणि कॅमेरातील मॅन्युअल मोड मधील सगळे सेटिंग ट्राय करून बघा. मग तुमचे फोटो पन एकदम "नाद खुळा" होणार. :)

भारी आहेत फोटो...आम्हाला हे असं कधी जमणार देव जाणे.

मार्मिक गोडसे's picture

4 Feb 2016 - 7:10 pm | मार्मिक गोडसे

अप्रतिम फोटोग्राफी. शेवटचे दोन फोटो Invert Color प्रोसेस केले असावेत.

पॉइंट ब्लँक's picture

4 Feb 2016 - 7:29 pm | पॉइंट ब्लँक

शेवटचे दोन फोटो Invert Color प्रोसेस केले असावेत.

साहेब तुम्ही जिंकलेले आहात. एकदम बरोबर ओळखलं.

खत्तरनाक फोटोग्राफी ओ साह्यबा. एक जयंतरावांचे अन स्पावड्याचे सोडले तर फोटोग्राफीतली एवढी विविधता प्रॅक्टिकली फक्त तुमचीच पाहायला मिळाली अन आवडली पण.
१३ आणि २३ व्या फोटोवर आपण दिलोजानसे फिदा झालेलो हाय.

स्पा's picture

4 Feb 2016 - 10:07 pm | स्पा

माताय जयंतराव आणि माझे नाव बाजूबाजूला नको बे, लय पोचलेली माणसे हैत हि

आपण उगाच आहोत असे वाटायला लागलेय
बराच मोठा पल्ला गाठायचा आहे

टॉर्चचा वापर करण्याची कल्पना आवडली. टॉर्चलाईट्समुळे शॅडोज् हार्श येतात. ते टाळण्यासाठी पांढर्‍या रुमालाचा किंवा कागदाचा वापर डिफ्यूजरप्रमाणे करून छान इफेक्ट साधता येतो.

पॉइंट ब्लँक's picture

5 Feb 2016 - 7:41 am | पॉइंट ब्लँक

धन्यवाद. चांगली आठवण करून दिलित. पॉप अप फ्लॅश साठी हे फार उपयुकत ठरतं. पोर्टेट साठी ह्याचा बर्याच वेळा उपयोग केला जातो.
एस्क्टर्नल फ्लॅश वापरताना, तो एकतर पोर्टेबल डिफ्युजर लावून वापरावा किंवा बाउन्स करून. काहीवेळा प्रकाश जास्त पसरू नये ह्यासाठी डिफ्युजरवर ग्रिडही लावावा अशी शिफारस वाचण्यात आहे. अजून वापरून बघितली नाही.

प्रचेतस's picture

4 Feb 2016 - 9:09 pm | प्रचेतस

एकापेक्षा एक अप्रतिम छायाचित्रे.

श्रीरंग_जोशी's picture

4 Feb 2016 - 9:14 pm | श्रीरंग_जोशी

एकाहून एक बहारदार चित्रे. शब्दच नाहीत कौतुक करायला.

या मेजवानीसाठी पॉइंट ब्लँक यांना मनःपूर्वक धन्यवाद.

शैलेन्द्र's picture

4 Feb 2016 - 9:29 pm | शैलेन्द्र

bhannat

चुकून चांगला फोटो काढतात नवशिके,ठरवून हवा तसाच फोटो काढतात ते फोटोग्राफर.
काम भारी आहे.डिएसएलआरला पूर्ण न्याय दिलाय तरीही पॅाइंट ब्लँक?

विवेक ठाकूर's picture

4 Feb 2016 - 11:07 pm | विवेक ठाकूर

इथे शेअर करुन आम्हाला आनंद दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

निवेदिता-ताई's picture

5 Feb 2016 - 12:58 am | निवेदिता-ताई

खूप छान

तुषार काळभोर's picture

5 Feb 2016 - 6:20 am | तुषार काळभोर

नमस्कारापुढे काही बोलूपण शकत नाही.
मंत्रमुग्ध करणारे फोटो!

फोटो क्र. ४, १३ आणि २३. वारलो, खपलो आणि पुनर्जन्म होऊन पुनरेकवार निर्वाण झाले. क्र. १३ तर काय आहे भेंडी. ती जुनी युरोपियन पोर्ट्रेट्स असतात तशा पोर्ट्रेटचा फटू वाटू राहिला.

पॉइंट ब्लँक's picture

5 Feb 2016 - 1:25 pm | पॉइंट ब्लँक

बॅटमॅन इज बॅक. वा काय आनंदाची गोष्ट आहे :) आता मस्त सुसंस्कृत मेजवानी मिळणार :)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

मृत्युन्जय's picture

5 Feb 2016 - 12:41 pm | मृत्युन्जय

पॉइंट ब्लँक यांना स्पर्धेत भाग न घेताच विजयी घोषित करुन टाकावे . एक एक फोटो म्हणजे रत्न आहे रत्न. सलाम. तुम्हाला सलाम आणि तुमच्या फोटोग्राफीलाही

पॉइंट ब्लँक's picture

5 Feb 2016 - 1:33 pm | पॉइंट ब्लँक

धन्यवाद :)

पॉइंट ब्लँक यांना स्पर्धेत भाग न घेताच विजयी घोषित करुन टाकावे .

असो नको करायला. स्पर्धेचा उद्देश प्रोत्साहन देने आहे. ह्या लेखाचा उद्देश मी चुका करत करत शिकलेले मिळालेले अनुभव इथे शेअर करणे आहे. आणि वर प्रतिसादातपन काही मिपाकरांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. स्पर्धेचे प्रोत्साहन आणि अनुभव शेअर करणे जर एकाच ठिकाणी करता आलं तर जास्त मजा येइल :)
आणि कोणाला माहित, स्पर्धेमध्ये अजून किती सुंदर फोटो येणार आहेत. पिक्चर अभी बाकी है :)

+१
अप्रतिम आहेत सगळेच फोटो

सर्वसाक्षी's picture

5 Feb 2016 - 1:33 pm | सर्वसाक्षी

आणि शैली आवडली. सुरेख

चिगो's picture

5 Feb 2016 - 1:42 pm | चिगो

निव्वळ अप्रतिम.. साष्टांग नमस्कार.. डोळ्यांचे पारणे फेडणारी फोटोग्राफी..

पैसा's picture

5 Feb 2016 - 3:11 pm | पैसा

खूप सुंदर फोटो!

सुमीत भातखंडे's picture

5 Feb 2016 - 4:00 pm | सुमीत भातखंडे

जबरी फोटो!

जबरदस्त !! काय एक्से एक सुरेख फोटोज आहेत.

अव्यक्त's picture

7 Feb 2016 - 12:36 pm | अव्यक्त

अगदी सर्व प्रकाशचित्रे डोळ्यांचे पारणे फिटवतात… आपल्या सारख्यांची फोटो ग्राफी बघून आमच्या सारख्या सामान्य माणसाना फोटोग्राफीतल्या ओ की ठो न कळणाऱ्याना एक आंतरिक उर्मी झपाटून जाते फोटोग्राफी करण्याची… तुम्ही आमच्या सारख्यांना काय सल्ला देवू शकता… basic कॅमेरा घेवून कशी फोटोग्राफी शिकता येईल… ह्यासाठी कुठे शिकवणी उपलब्ध आहे… मार्गदर्शन अपेक्षित… कसा स्वभ्यास करता येईल..

पॉइंट ब्लँक's picture

7 Feb 2016 - 6:42 pm | पॉइंट ब्लँक

एक आंतरिक उर्मी झपाटून जाते फोटोग्राफी करण्याची

धन्यवाद. काही तरी उपयोग झाला म्हणायचा फोटोग्राफिचा. मी गेल्या चार वर्षात पोर्टेट्स, मॅक्रो आणि मंदिर इतक्याच गोष्टींचा सराव केला आहे त्यामुळे पूर्ण माहिती मला नाही. तसेच एका छोट्या प्रतिसादात मार्गदर्शन करणं कठीण. असो मार्गदर्शन म्हणून नसलं तरी काही उपयुक्त माहिती खाली देत आहे.

basic कॅमेरा घेवून कशी फोटोग्राफी शिकता येईल

बेसिकच्या व्याखेबद्दल थोडी शंका आहे. तुम्ही पॉइंट अँड शुट बाबतीत बोलत असाल तर मला ह्याचा अनुभव नाही कारण मी पॉइंट अँड शुट कधी वापरला नाही. पण चांगला फोटो काढायला डीएसलारच पाहिजे असे नाही. पॉइंट अँड शुट वापरूनही लोक सुंदर फोटो काढतात. त्यासंबधात माहिती हवी असेल तर वेग़ळी "काथ्याकुट" करावी लागेल.
आता डीएसलार फोटोग्राफीबद्दल म्हणत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं आहे.
१. अनाहितांना दुखवण्याचा उद्देश नाही. पण एक वाक्य नेहमी फोटोग्राफिमध्ये सांगितले जाते. "Photography is an expensive hobby, as expensive as maintaining a wife." भावार्थ असा की पत्नीला दरवर्षी सणासुदीला किंवा काही खास दिवसांना भेट वस्तु खरेदी करून द्यावी लागते. तर फोटोग्राफीमध्ये तुम्हाला नवीन नवीन अ‍ॅक्सेसरीज विकत घेण्याचा मोह होतो आणि काहीवेळा ती घेणे गरजेचं असत. आणि सर्व चांगल्या दर्जाच्या गोष्टी बर्याच महाग असतात.
२. कॅनॉन भारी कि निकॉन भारी ह्या भांडनात पडू नका. बर्याचवेळा हा वाद स्वतःची खरेदी जस्टीफाय करण्यासाठी झालेला असतो. ह्या दोन्ही कंपनी चांगल्या दर्जाचे कॅमेरे तयार करतात. काही वैशिष्ट्यांमध्ये वर खाली होत जात, जसे की निकॉनचा लो लाइट परफॉर्मन्स जास्त चांगला असतो तर कॅनॉनचे व्हिडिओ फिचर्स जास्त चांगले असतात. स्वतः अभ्यास करून, कॅमेरा वापरून निर्णय घेणे योग्य. आणि आजकाल असं वाचण्यात येतयकी सेंसर मध्ये बहुतेक सोनीने कॅनॉन आणि निकॉन ह्या दोघांना मागे टाकलेले आहे.

ह्यासाठी कुठे शिकवणी उपलब्ध आहे

३. ह्या प्रश्नावरून तुम्ही बरयापैकी सिरियस आहात आणि वेळ द्यायची तुमची तयारी आहे आणि फक्त एसलार वापरून कामचलावू फोटो काढायचे नाहीत असं मानायला हरकत नाही. मी शिकवणी लावली नाही, आणी मला ह्या बाबतीत जास्त माहिती नाही. कुणाला डेडिकेटेड फोटोग्राफी कोर्सबद्दल माहिती असेल तर कृपया सांगा.
तस असेल तर तुम्हाला कुठ्ल्या प्रकारची फोटोग्राफि आधी व्यवस्थित शिकायची आहे हे ठववून घ्या. म्ह्णजे मॅक्रो आधी शिकायचे आहेत की पोर्टेट की आर्किटेक्चर कि लँड्स्केप कि वाईल्ड लाईफ, स्ट्रीट लाईफ. कारण ह्या प्रत्येक प्रकारात लागाणारी उपकरणं वेगळी आहेत. टेकनिक्सही बदलातात. एक प्रकार व्यवस्थित शिकायला कमीतकमी एक वर्ष द्यावं लागत. एकदा प्रकार निश्चित झाला की मिपावर त्यासाठी काथ्याकुट करा. तुम्हाला त्या त्या विषयात फोटोग्राफी करणारे लोक योग्य सल्ले देतील
४. कॅमेरा जरी म्हत्वाचा घटक असला तरी, फोटो क्वालिटीमध्ये लेन्समुळे जमीन आसमानाचा प्रयत्न पडतो. आणि सर्व चांगल्या लेन्सेस महाग (३०००० किंवा जास्ती) असतात. काही प्राईम लेन्सेस स्वस्त असतात( उदा. कॅनॉन किंवा निकॉन 50mm f1.8) त्यांची क्वालेटी चांगली असते पण प्रोफेशनल आउटपूट मिळवचे असेल तर तुम्हाला निकॉनमध्ये "N" series किंवा कॅनॉनमध्ये "L" series लेन्सेस वापराव्या लागतात. https://pixelpeeper.com/ ह्या साईटवर सर्व लेन्स आणि केमेरा कॉम्बिनेशसची फुल साईझ फोटोज उपलब्ध आहे. तुम्हाला एखादा लेन्स आणि एखादा कॅमेरा वापरून काय रिझल्टस मिळतील ह्याची कल्पना येइल.
५. प्राईम लेन्सेस पासून सुरवात करनं कधीही चांगल. फिक्स फोकल लेन्थमुळे ज्या मर्यादा येतात त्या बर्याच चांगल्या गोष्टी शिकवून जातात. कॅमेरा मॅन्युअल मोड मध्य वापरा आणि फोटो प्रोसेसिंग करण्यापासून कमीतकमी एक वर्ष दूर राहा. इन कॅमेरा जितका चांगला फोटो काढता येइल, तितका काढण्याचा प्रयत्न करा. एक लेन्स आणि कॅमेरा उपकरण वगळता दुसरी कुठलीही अ‍ॅक्सेसरीक पहिली दोन वर्ष विकत घेउ नका. कॅमेरा मॅन्युल एकदा पूर्ण वाचून काढा. त्या दिलेले सगळे मोड सगळे सेटिंग ट्राय करून पाहा.
६.

कसा स्वभ्यास करता येईल.

फोटो काढत राहा आणि प्रयोग करत राहा. तुम्ही काढलेले फोटो एखाद्या वेबसाईट्वर उपलोड करा आणि लोकांच्या प्रतिक्रिया मागवा. फेसबुक ह्यासाठी फारसं उपयुक्त नाही. आपले मित्र सहसा आपल्या फोटोवर टिका करत नाहीत. त्यांचा भर मित्राने फोटो काढलाय म्हणून लाईक करण्यावर असतो.
www.jjmehta.com/forum/ हा भारतातल्या फोटोग्राफर्सचा एक चांगला ग्रुप आहे. तेथे लोक चांगल्या सुधारणा सुचवतात. तसच www.dpreview.com/forums वर सर्व जगातले हौशी लोक उपलब्ध आहेत. ह्या साईटवर फोटो टाकताना पाळायचे काही नियम - अ. एकावेळी एक किंवा दोनच फोटो टाका. तुम्हाला जास्त डिटेल्ड प्रतिसाद मिळेल. ब. स्वत:च्या फोटोबद्दल पझेसिव्ह होउ नका. एखादी टिका जर आली तर, मला असाच फोटो काढायचा होता अस उत्तर देवू नका. आलेल्या टिकेबद्दल निट विचार करा. क. दुसर्यांच्या फोटोवर टिका करताना ती constructive criticism असेल ह्याची काळजी घ्या.
७. Last but not the least - photography ethics. अ. लोकांचे फोटो काढताना परवानगीशिवाय काढु नका.लहान मुलांचे फोटो त्यांच्या पालकांच्या परवानगीने काढा. ब. परवानगी घेवून काढले तरी ऑनलाईन शेअर परवानगिशिवाय करू नका. क. लहान मुलांचे फोटो काढताना विशेष काळजी घ्या. बाळ जर एक वर्षाहून लहान असेल तर कुठल्याही परिस्थितित फ्लॅशचा वापर टाळा, मोबाईल फोनचा देखील फ्लॅश वापरू नका. ड. वाईल्ड लाईक मध्ये फ्लॅश वापरू नका, पक्षी आणि वन्याजीव बिथरतात. फ्लॅश वापरल्यामुळे हत्तीने एक दोन फोटोग्राफर लोकांवर हल्ला केल्याची उदाहरणे कर्नाटकात आहेत. इ. पोस्ट प्रोसेसिंग मध्ये एखादा इफेक्ट किती अ‍ॅम्प्लिफाय करावा ह्याच्या मर्यादा ओलांडू नका. स्ट्रीट फोटोग्राफीच्या नावावार बरेज फोटोग्राफर गरीब लोकांचे फोटो काढून त्या फोटोवर इतके शार्पनिंग लावतात की कातडी माणसाची नसून सरड्याची आहे असे वाटेत. हे योग्य नाही.
युट्युब बरीच ट्युटोरियल्स उपलब्ध आहेत. त्यांची नक्कीच मदत होते. dpreview वर वारंवार काही लेख प्रसिद्ध होतात. ते वाचत राहा.

श्रीरंग_जोशी's picture

7 Feb 2016 - 7:17 pm | श्रीरंग_जोशी

थोडक्यात पण मोलाचे मार्गदर्शन खूपच आवडले.

अवांतर - धाग्यातल्या फोटोंचा पुन्हा पुन्हा आस्वाद घेतल्यावर धाग्याचे शीर्षक तेवढे रुचत नाहीये.

पॉइंट ब्लँक's picture

7 Feb 2016 - 7:29 pm | पॉइंट ब्लँक

धाग्यातल्या फोटोंचा पुन्हा पुन्हा आस्वाद घेतल्यावर धाग्याचे शीर्षक तेवढे रुचत नाहीये.

हम्म, पुढच्या वेळी चांगले शीर्षक देण्याचा प्रयत्न करीन. असो, प्रामाणिक मत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2016 - 12:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकापेक्षा एक. सुंदर.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2016 - 3:05 pm | श्रीगुरुजी

एकच शब्द वापरतो.

अप्रतिम!!!!!

असे फोटो मला काढता यावेत अशी मनात सुप्त इच्छा आहे.