अल्पना

मारवा's picture
मारवा in जनातलं, मनातलं
18 Jan 2016 - 4:21 pm

यंदाच्या लोकसत्ता च्या दिवाळी अंकात एक लेख वाचत होतो आसाराम लोमटे यांचा भवताल आणि भुमिका नावाचा. लेख अत्यंत सुंदर आहे त्यात एके ठीकाणी लोमटे त्यांच्या एका कथेचा उल्लेख करतात त्यात एका कार्यकर्त्याची कथा आहे नेत्यांसाठी त्याची संपलेली उपयुक्तता. टीचलेपण दाखवण्यासाठी एक शब्द वापरलेला "टिचरीगोटी" टीचलेली गोटी लहान पोरं सुद्धा खेळात घेत नाहीत. दुसरा शब्द "उकळलेली पत्ती" ज्याची रग आणि धग वापरुन झालेली आहे असा वापरुन फ़ेकलेला कार्यकर्ता अशा अर्थाने हे शब्द त्यात येतात. आता ती कथा वाचलेली नाही मात्र अगदी एका नेमक्या योजलेल्या शब्दात किती ताकद आहे बघा. अशा कार्यकर्त्याचा चेहरा झर्रक्कन डोळ्यासमोर तरळतो. तर सांगायच तात्पर्य असा एखाद दोन शब्दात जणु चिमटीत पकडल्या सारख एक माणुस नजरेसमोर उभा करणं, त्याच अर्कचित्रच जणु काढण हा प्रकार मला तरी रोचक वाटतो.. कवीमंडळी अर्थात असच काहीसं नेहमी कवितेतुन करताना आपण बघतोच.. अशीच एक खुप दिवसांपुर्वी अलेक पदमजी या विख्यात जाहीरात क्षेत्रातल्या वल्लीची मुलाखत बघितली होती. त्यात आता नक्की आठवत नाही पण ते असच मुलाखतकर्ता एकेका प्रसिद्ध व्यक्ती चे नाव घ्यायचा आणि पदमजी अगदी एकाच शब्दात त्याच चपखल सुंदर वर्णन करायचे.तर मग मलाही थोडी हुक्की आली. किंवा खाज म्हणा अचुक शब्द. म्हटल लोमटे/ पदमजी नाही तर आपल्या चिल्लर पातळीवर गंमत करुन बघायला हरकत ती काय आणि बिघडेल ते काय तर मित्रांनो बघा माझाही एक.प्रयत्न. आणी हो एक निवेदन कमीत कमी शब्द वापरण्यामूळे अर्थातच पुर्ण व्यक्ती/विषय/ कार्य अर्थातच व्यक्त होइलच असे नाही.म्हणुन हा काही त्या व्यक्तीवर विषयावर मारलेला अंतिम शिक्का म्हणुन न घेता जाणवलेला वा मुद्दाम अधोरेखीत केलेला ठळक विशेष समजावा. त्याचा अर्थ ती व्यक्ती तो विषय त्या विशेषणा पलीकडेही अर्थात बरीच शिल्लक राहु शकतो हे गृहीतच आहे.. आणि पुन्हा हे सर्व अर्थातच सब्जेक्टीव्हच असत. मला जाणवलेल माझ्यापुरत दुसर्‍याला कदाचितं त्या व्यक्ती/विषय संदर्भात दुसरं काही जाणवु शकतं त्यावर अर्थातच काही म्हणण नाही आणि फ़ार मोठा काही दावा आग्रह वगैरे मुळीच नाही. म्हणुन काही आवडलं तर घ्या खटकल तर सोडुन द्या इतकचं, तर हे बघा एका व्यक्त्ती/विषया बद्दल एकापेक्षा अधिक असेल तर स्लॅश त्याच्यासाठी.

विजय मल्ल्या - विलासी
ऐश्वर्या राय- - लासी
तेंडुलकर सचीन- शालीन
अलका कुबल - जलयुक्त शिवार
करीना कपुर - आरुषी
डेमी मुर- - ला ग्रॅन्डे बेल्लेझा
सोनाक्षी सिन्हा- आम्रपाली/ वसंतसेना
आलिया भट्ट - अ‍ॅलीस इन वंडरलॅन्ड
माधुरी नेने - परीणीता
मधुबाला - एक्स्टसी
अल पचिनो- कंदर्प
जॅकी चॅन- अ‍ॅक्रोबॅट
प्रवीण दवणे- चॉकलेटी जंगलातला गुलकंदी धबधबा
जी.ए. कुलकर्णी- मणिकर्णीका
डोस्टोव्हस्की- एथिकल ड्रामा
मिलन कुंदेरा- ब्रेथलेस जोकर
व.पु/.फ़डके - निऑन साइन्स
ग्रेस च्य कविता - धुक्याची स्पंदने/ संध्यारागीचे रंग
कोलटकर- रिलक्टंट मसीहा/ जेजुरीचा टुरीस्ट
बेकेटचे साहीत्य- निस्तब्धतेचा निखारा
गार्सीया मार्क्वेझ - मंत्रमुग्ध
वि.स.खांडेकर- आदर्श घोटाळा
नेमाडे - पोकळीतली वाळवी / उंट
विजय तेंडुलकर - ब्लेड
सतीश आळेकर - गारठा
विलास सारंग- खोली सोडलेला माणुस
गुलजार - अभिजात
मौज प्रकाशन - उडदामाजी काळे गोरे
श्री.पु.भागवत- इनक्युबेटर/ क्युरेटर/सॅनीटायझर
लिटील मॅगॅझीन्स- पोकळीचा पोत
विटगेन्स्टाइन- द एन्ड
इको उंबर्तो- भुलभुलैय्या
कुरुंदकर- क्रिस्टल क्लीअर
सुब्रतो रॉय- फ़ॉल फ़्रॉम ग्रेस
इंदिरा गांधी- दुर्गा
महात्मा गांधी- बनिया
पहीला बाजीराव- अजिंक्य
दुसरा बाजीराव- पेन्शनर
अखिलेश यादव - नाकतोडा
देवेंद्र फ़डणवीस- सखाराम गटणे
केजरीवाल - एकलव्य
नरेंद्र मोदी- दुष्यंत
जसोदाबेन मोदी- रकाना
शत्रुघ्न सिन्हा- गणशत्रु
शशी थरुर- मोस्ट एलीजीबल बॅचलर
ममता बॅनर्जी- भडका
सोनिया गांधी- होणार सुन मी ह्या..
मनेका गांधी- लाइव्ह-स्टॉक
किम जोंग- गालगुच्चा/ फ़ॅट बॉय/ ओमेन बेबी
मिपा संपादकपद- सतीच वाणं / दहावी फ़ मॉनिटरपद / तंटामुक्त गावसमिती सदस्यत्व / लोकसभास्पीक्ररपद
मिसळपाव- कार्निव्हाल / इराण्याची मिसळवाली हॉटेल.
मनोगत-उपक्रम- हडप्पा व मोहेंदोजरो
मिपा प्रतिसाद- - रंगपंचमी
रामायण - लव्ह स्टोरी
महाभारत- युग-स्पंदन
इसिस - तमस
बगदादी - ड्रॅकुला
केकी मुस- एकांत
राजु परुळेकर- प्रश्नोपनिषद / लॅरी किंग/जीनीयस
सुधीर गाडगीळ- सेल्फ़ी/शाल-श्रीफ़ळ/ची शोभा
पंकज उधास- गरीबांचा जगजीत सिंग
जगजीत सिंग- सुकुन
डेव्हीड ब्लेन- मॅजीक रीअलीझम
तलत मेहमुद- वेल्वेट
रविंद्रनाथ टागोर- सत्यम शिवम सुंदरम
इंडियन पॉप - मलेशियन विमान
इंडीयन पॉप सिंगर्स- त्यातील प्रवासी
परवीन बाबी/ बाजपेयी- द लोनली प्लॅनेट/ तनहाई
काटजु- विचीत्र विणा वादन
राजश्री प्रॉडक्शन- संस्कृतीवर्ग
विशेष फ़िल्म्स - विकृतीवर्ग
यशराज फ़िल्म्स- कागज के फ़ुल.
भारतीय संस्क्रुती- क्ले बॉक्स.
भारतीय अध्यात्म - काहीही हं श्री !

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

18 Jan 2016 - 4:42 pm | पैसा

काही काही प्रतिशब्द खूप आवडले तर इंदिरा गांधी:दुर्गा गांधीजी:बनिया यासारखे तेवढेसे चपखल वाटले नाहीत.

हे सगळं जर खरं असेल, तर एवढा मनमोकळेपणा एरवी सापडत नाही. त्याबद्दल अभिनंदन..

काही अगदीच नेहमीचे टाइपकास्ट सोडले (उदा. तलत मेह्मुद, राजश्री प्रोडक्शन) तर भारीये.

मारवा's picture

18 Jan 2016 - 7:43 pm | मारवा

हे सगळं जर खरं असेल,

अशीच एक खुप दिवसांपुर्वी अलेक पदमजी या विख्यात जाहीरात क्षेत्रातल्या वल्लीची मुलाखत बघितली होती. त्यात आता नक्की आठवत नाही पण ते असच मुलाखतकर्ता एकेका प्रसिद्ध व्यक्ती चे नाव घ्यायचा आणि पदमजी अगदी एकाच शब्दात त्याच चपखल सुंदर वर्णन करायचे.तर मग मलाही थोडी हुक्की आली. किंवा खाज म्हणा अचुक शब्द. म्हटल लोमटे/ पदमजी नाही तर आपल्या चिल्लर पातळीवर गंमत करुन बघायला हरकत ती काय आणि बिघडेल ते काय तर मित्रांनो बघा माझाही एक.प्रयत्न

अ‍ॅलेक पदमसींना मुलाखतकाराने किती वेळ दिला असेल प्रतिक्रियेसाठी?

मला वाटलेलं की तुम्हीही अगदी मनात आलेला पहिला शब्द याच पद्धतीने हे लिहिलंयत म्हणून. खरं म्हणजे तुम्ही तसं कुठे म्हणलं नैये. माझाच समज झाला. गैरसमज असेल तर क्षमस्व.

मला म्हणायचंय की हे शब्द खरंच अगदी मनात उमटलेले पहिले शब्द आहेत की अगदी विचारपूर्वक काढलेले शब्द आहेत?

आयडी म्हणजे माझ्या नावाची आद्याक्षरे आहेत ती. मराठीत लिवा किंवा इंग्रजीत - दोन्ही प्रश्नच बनतात. ए एस के- आस्क.
मी इतक्यातच आयडी बदलून घेतलाय. माझा आधीचा आयडी ओळखा पाहू...

राजेश घासकडवी's picture

18 Jan 2016 - 5:56 pm | राजेश घासकडवी

अल्पना हे नाव आणि लेखही आवडला. ब्लेड, रकाना, तमस, वेलवेट हे शब्दही चपखल.

कपिलमुनी's picture

18 Jan 2016 - 7:55 pm | कपिलमुनी

अल्पना = अल्पना टॉकीज् च्या आठवणी :P

तुषार काळभोर's picture

19 Jan 2016 - 4:53 pm | तुषार काळभोर

मला वाटलं कोणी अल्पनाच्या आठवणीत नॉस्टॅल्जिक वैग्रे झालं का काय.

मुक्त विहारि's picture

18 Jan 2016 - 7:58 pm | मुक्त विहारि

मस्त

उगा काहितरीच's picture

19 Jan 2016 - 12:43 pm | उगा काहितरीच

बरेचसे शब्द चपखल बसले. पण वि.स. खांडेकर अन् आदर्श घोटाळा नाही कळालं !

मारवा's picture

19 Jan 2016 - 10:50 pm | मारवा

तुम्ही वि.स.खांडेकराच साहीत्य वाचल असेल तर बघा त्यात एक जुन्या धाटणीचा टीपीकल स्वप्नील आदर्शवाद सतत दिसुन येतो. त्यांचा नायक टीपीकल आदर्शवादी असायचा. त्याचा आणि वास्तवाच्या कॉन्फ्लीक्ट मुळे उडणारा गोंधळ एकीकडे आणि सध्याच्या काळात नावातच प्रचंड विसंगती आढळणारी ही घटना त्या दोघांतुन जुळवणीतुन खांडेकरांच्या साहित्याचा इसेन्स पकडता येतो असे वाटले अथात हे परत सब्जेक्टीव्ह मला अस जाणवलं अनेक अँगल असु शकतात मी माझा मांडला इतकचं

गामा पैलवान's picture

19 Jan 2016 - 7:10 pm | गामा पैलवान

मारवा,

तुमचा प्रयोग आवडला. दिलेली नावेही आवडली. फक्त अ‍ॅलिस इन वंडरलँड मोदींना अधिक चपखलपाने लागू पडतं. आलिया भट्ट अर्थातच अ‍ॅलिस इन ब्लंडरलँड.

आ.न.,
-गा.पै.

मारवा's picture

19 Jan 2016 - 10:57 pm | मारवा

अ‍ॅलिस इन ब्लंडरलँड. मस्तय ! फार आवडल
मोदी पुरुष असल्याने थोड मात्र जमेल असे वाटत नाही. बाकी मोंदीसाठी अजुनही सुचतात बघा अर्थात मला जसोदाबेनना वगळुन त्यांना पाहण अवघड आहे. एक असही होत बघा
नरेंद्र मोदी- साधना
जसोदाबेन- साधन
नरेंद्र मोदी- सबसीडी
जसोदाबेन- सबसीडाइज्ड अजुन एक नविनच जुळलय बघा
इजराएल= बदलाPUR
आता मला अस वाटत इतकचं

प्रयोग आवडला, काही मस्त वाटले...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हम तेरे बिन कही रह नहीं पाते ... :- Sadak

चौकटराजा's picture

20 Jan 2016 - 9:42 am | चौकटराजा

बाळासाहेब ठाकरे /रंग माझा वेगळा