मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपावर आय डि न टिकण्याची कारणे व त्यावरील उपाय

नया है वह · · काथ्याकूट
२०१६व्या वर्षात आय डि/ डु आय डि मिळणे अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. त्याची काही कारणे.... बदलती मानसिकता: : लेखातील विचार पटत असतील तरच प्रतिसाद द्या. विचार वेगळे आहेत, पटत नाही असे वाटले तर वेगळे लेख लिहा, अशी संकल्पना रुजत आहे. सामाजिक बदल : आज लेखक उच्चशिक्षित आणि वैचारिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी आणि माझे लेखन सक्षम आहे तर मी का प्रतिसाद लिहायचे, असे लेखकांचे म्हणणे असते. बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात(लेखक-वाचक) दरी निर्माण होत आहे. तरुण लेखकांच्या-वाचकांच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही. संवाद कमी : टीव्ही, मोबाईल-व्हाॅट्सऍप, हाइक याच्या सतत वापरामुळे लेखक-वाचक एकमेकांबरोबरचे संवादच कमी झाले आहेत. मिपावरील केवळ राजकिय काथ्याकूटमुळे संवाद नाही तर वादच वाढत जातात. संपादकांचा हस्तक्षेप ः लेखकाला सर्व प्रतिसाद हवे तसेच मिळावे म्हणून लेखकाच्या कंपुतिल आय डि/ डु आय डिंचा हस्तक्षेप होतो आणि संपादकांणी आय डि बॅन करु नये म्हणून त्याच्या लेखात लेखकाच्या कंपुतिल आय डि सतत प्रतिसाद टाकतात. अहंकार ः लेखक आणि वाचक दोघेही उच्चशिक्षित, वैचारिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदलावे, मी बदलणार नाही अश्या अहंकारामुळे लेखामधे तणाव निर्माण होतो. इतर कारणे ः एकमेकांबाबत गैरसमज/पुर्वग्रह, कंपुबाजी, दुसऱ्यास त्रासदायक असणाऱ्या सवयी, सिलेक्टिव रिडिंग आदी कारणांमुळे लेखावर समस्या निर्माण होतात. उपाययोजना: आय डि टिकण्यासाठी : "रिस्पेक्ट फ्रोम इच रिडर' या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु "रिस्पेक्ट इच रिडर' करायचे ठरवले तरच आय डि टिकू शकतात. मनमोकळा संवाद : लेखक-वाचक यांनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे. स्पर्धा टाळावी ः मिपावर सर्वांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी. "तू माझ्या ले़खावर नीट प्रतिसाद दिला नाहीस आता मीही तुझ्या ले़खावर चांगला प्रतिसाद देणार नाही. स्वीकार महत्त्वाचा ः अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा. बदल करण्याची तयारी ः मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता लेखण सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी. जबाबदारीची जाणीव ः लेख झाल्यानंतर येणाऱ्या प्रतिसादंची जाणीव आणि ती स्वीकारण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत. तडजोडीची तयारी ः कोणत्याही चर्चेमध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत. थोडक्यात, आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर मिपावर आय डि टिकवणे शक्य होते.

वाचन 4290 प्रतिक्रिया 0