मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

४७ डोकी मारली!

हुप्प्या · · काथ्याकूट
२०१६ सुरु होते न होते तोच सौदी अरेबियाने ४७ लोकांचा एकाच दिवशी शिरच्छेद करुन त्यांना मृत्यूदंड दिल्याचे जाहीर केले. इतकी पराकोटीची रानटी शिक्षा जाहीरपणे चौकात देणारा आणि तरीही सुसंस्कृततेचा टेंभा मिरवणारा सौदी हा एकमेव देश असेल! कमालीची श्रीमंती असल्यामुळे त्यांची ही दादागिरी सगळे चुपचाप सहन करतात. तशात इस्लामचे हेडक्वार्टर असल्याचाही तोरा ते मिरवतात कारण मक्का आणि मदीना ही दोन इस्लामी तीर्थक्षेत्रे त्यांच्या ताब्यात आहेत. त्यातूनही ते भक्कम पैसे मिळवतात. ह्या ४७ लोकांमधे एक शिया धर्मगुरू आहे ज्याला शिया लोकांमधे बराच आदर होता त्यामुळे त्या पंथाचे लोक आता आंदोलन करत आहेत. अर्थात ते चिरडून टाकले जाईलच. पण इराणसारखा शिया देश, तिथल्या लोकांनी सौदी अरेबियाच्या वकिलातीवर/दूतावासावर हल्ला केल्याच्या बातम्या आल्या आहेत. सौदीच्या तुरुंगात अनेक राजकीय कैदी अनेक दिवस डांबलेले आहेत. राजकीय सोयीनुसार त्यातले अशा प्रकारे ठार केले जातात. कदाचित ह्यामुळे शिया आणि सुन्नीमधील संघर्ष वाढेल. आयसिस शिया लोकांना धर्मभ्रष्ट मानते. सौदीही त्याच माळेतला मणी आहे. अशा प्रकारे वरिष्ठ शिया धार्मिक नेत्यांना संपवून अजून एक आग भडकवत आहे. २०१६ च्या हिंसेची ही नांदी म्हणायची की काय?

वाचन 8217 प्रतिक्रिया 0