मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझनी (घजिनी)बद्दल काय मत आपले.

llपुण्याचे पेशवेll · · काथ्याकूट
आताच आलेला अमिरखानचा 'गझिनि' (किंवा घजिनी) हा चित्रपट पाहण्यात आला. या चित्रपटाने येण्यापूर्वी फार हवा केली होती. त्यासाठी आमिरने कमावलेली देहयष्टी आणि या चित्रपटाचे प्रोमोज् लक्षवेधी ठरले. मूळ संकल्पना 'मोमेंटो' या इंग्रजी चित्रपटावर बेतलेली आहे. परंतु खरे सांगायचे तर या हिंदी मोमेंटो ने मूळात मनावर पकडच घेतली नाही. बर्‍याच न पटणार्‍या घटना यात दाखवल्या आहेत. कदाचित आमिरच्या आधीच्या चित्रपटांमुळे अपेक्षा वाढल्या होत्या आणि त्यामुळे गझिनी नाही आवडला असेही झाले असेल. मिपाकरांचे काय मत आहे यावर? माझे मत आहे की ' नाही आवडला'. बघूया मिपाकरांची काय मते आहेत यावर. डीस्क्लेमरः उगाच या विषयावर निरुपयोगी कौल लावण्यापेक्षा यावर काथ्या कुटणे मला अधिक बरे वाटले.

वाचन 10907 प्रतिक्रिया 0