लाजाळू नि गुलाब

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
30 Oct 2015 - 5:11 pm

लाजाळूच्या झाडापुढे
गुलाबाच फूल नको
स्पर्शाविना मिटण्याची
त्याला नवी भूल नको!

गुलाबाच फूल भारी
लाजाळूला खेटलेल
लाजाळूच झाड वेड
येता जाता मिटलेल!

कुणी द्या रे रंग-वास
लाजाळूला मिरवाया
तोरा नवा दाखवून
ताटव्याला फुलवाया!

- संदीप चांदणे

कविता माझीप्रेम कविताशांतरसकविताप्रेमकाव्यमौजमजा

प्रतिक्रिया

क्या बात!!!
एकदम नवीन कल्पना!

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2015 - 5:48 pm | टवाळ कार्टा

म्हणजेच कच्चा माल म्हणायचे आहे कै? =))

दमामि's picture

30 Oct 2015 - 7:53 pm | दमामि

:):)
नाय वो,खरंच सुंदर गेय कविता आहे.
रच्याकने कच्चा माल "मिशी काढून .." मध्ये होता;)

पैसा's picture

30 Oct 2015 - 6:40 pm | पैसा

मस्त!

चांदणे संदीप's picture

30 Oct 2015 - 8:11 pm | चांदणे संदीप

धन्यवाद दमामि आणि पैसाताई! :))

@टका:
इथे लाजाळूच झाड म्हणजे एक मुलगा आहे आणि गुलाबाचं फूल म्हणजे अर्थातच मुलगी!
बहुतेक आता यापुढे हा अधिक चांगला कच्चा माल होऊ शकेल! येउद्या काहीतरी फर्मास!
अजून सविस्तर नंतर लिहीन!
;-)
Sandy

अत्रुप्त आत्मा's picture

30 Oct 2015 - 11:35 pm | अत्रुप्त आत्मा

येकदम मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त...झकास.