कांखेत कळसा एक ,मजेशीर अनुभव

दिवाकर कुलकर्णी's picture
दिवाकर कुलकर्णी in जनातलं, मनातलं
25 Oct 2015 - 1:24 pm

नारळाची झावळी दुपारी वीजेच्या तारावर पडली.वीज गेली.स्थानीक केंद्राला लगेच फोन केला.पाहातो म्हणाले. मी निवांत.
संध्याकाळी पुन्हा फोन. काँल सेंटरला करा म्हणाले.११ आंकडी नंबर दिला.लगेच फोन लावला.या खेपेला लागेच ना.रेंजचा
प्राँब्लेम बहुधा. कोपर्यावर आलो.चहाच्या टपरीजवळ. तिथं रेंज येते.तिथं दोन बांकडी टाकलेली.कांहींचा नाष्टा पण चालू होता.मला पण एक चहा सांगीतला.
दोन प्रयत्नानंतर फोन लागला.पलिकडून ग्राहक क्रमांक विचारला,पुन्हा घरी तंगडतोड.पुन्हा फोन लागायचे वांधे.कंम्लेट नंबर
लिहून घ्या,म्हणाले. माझा आवाज चढलाच,दुपारी दोन वाजता पहिला फोन केलाय,संध्याकाळचे सात वाजायला आलेत, अंधार पडलाय,.
टपरीवरची माणसं माझ्याकडं बघायला लागली.कामगार वर्ग दिसत हेता सगळा. एस्. एम्. एस्. केलाय.वायरमनला.तो तुम्हाला काँटँक्ट
करेल,काँल सेंटर वाले बोलले.
कामगारांचं चहापाणी आटपलं होतं. बिलात मोडीचे वांदे झाले होते.एका मिशावाल्या कामगाराला मीच सुटे दिले. ते गेले. कँल सेंटरला पुन्हा फोन केला.अर्धा
तास वाट बघा म्हणाले.कुठून बोलताय विचारल्यावर रास्ता पेठ पुणे म्हणाले, मी उडालोच , आहो मी कोल्हापूरहून तक्रार करतोय ,असूदे बोलले.
हे काय नवीन झंगट? मी मनातल्या मनात.
निदान या सगळ्या प्रकरणात अर्धा पाऊण तास गेला होता.कामाला हे पुण्याहून माणसं पाठवणार कि काय,मी मनाशीच म्हणालो.एव्डयात मिसेस् चा
फोन आला, वायरमन आलेत म्हणून,मी हुश्श केलं .लगेच घरी आलो. समोर तो मगाचा मिशावाला आणि त्याचा तो जोडीदार.तुम्ही? मी एकदम ऊद्गारलो.
आम्ही वायरमन या भागासाठी,काम नसेल तेव्हां बसतो टपरीवर चहा ढोशीत.
मी पुणे रास्ता पेठेशी नजर लाऊन बसले होतो, आणि हे तर माझ्या अस्तनीत निघाले होते.एक मजेशीर अनुभव होता.

मौजमजा

प्रतिक्रिया

एमेसीबीच्या कॉलसेंटरला शक्यतो फोन लाउ नये लोकल कर्मचारी जाम चिडतात अन काम करायला जरा लेट करतात कारण त्यांच्या लेखी लेखी कंप्लेंट तर तेंव्हा रजिस्टर झाली जेंव्हा कॉलसेतरने ती अ‍ॅक्सेप्ट केली अन त्यांच्या एरीयात झालेला असा प्रोब्लेम ऑन रेकॉर्ड जाणे त्यांना आवडत नाही.

उगा काहितरीच's picture

26 Oct 2015 - 9:42 am | उगा काहितरीच

एमेसीबी ला दंडवत ! घर बांधकामाच्या वेळेस भरपूर अनुभव घेतलेत . रच्याकने जेव्हा मी कॉल घेत होतो , व एमेसीबी चे कर्मचारी कॉल करीत असत तेव्हा जाम मजा येत होती.

इतकी खटपट करून दिवाकरांच्या घरी दिवा लागला याचाच खूप आनंद वाटला.

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Oct 2015 - 6:44 pm | राजेंद्र मेहेंदळे

एका गुरुवारी फक्त आमचीच वीज गेली. कॉल सेंटरला फोन वगैरे करुन भरपुर वाद घातला. म्हणे तुमचे बिल थकले आहे. मी तर बिल नियमित भरले होते. शेवटी जवळच्या कॉलनीतल्या एमेसीबी ऑफिसात गेलो. वायरमन दादा तिकडे तंबाखु मळत बसले होते. त्यांना सगळी बिले वगैरे दाखवुन समजावले. तर म्ह्णे अरेच्चा! खालच्या मजल्याची कापायच्या ऐवजी तुमचीच कापली ..मग आलो त्याला गाडीवर घालुन आणि कनेक्षन नीट केले.
२ मिनिटांचे काम आणि दिवसभराचा मनस्ताप

आहो, एम एस ई बी च्या विद्युत बिलावर''आयडियल इंडस्ट्रीज '' हे नाव ''आयदीमल इंडस्ट्रीज ''असे लिहिले आहे. शेवटी राबणाऱ्या लोकांना''आयदी''करून टाकले आहे. मालकाचे नाव डब्ल्यू .एस. एकनाथ , म्हणजे वडीलांचे नाव हे आडनाव करून टाकले.नाव चुकीचे आहे हे सांगायला गेल्यावर , अर्ज द्या म्हणाले. म्हणजे चुका तुम्ही करा,अर्ज आम्ही देत रहातो!!

एमेसिबिवाल्या ताईंची आठवण आली:)